मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०५

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद जवळपास १०० झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

field_vote: 
0
No votes yet

सरकारी नवीन नोटिशीनंतर ( पैसे ताबडतोब भरा) वोडाफोन (५३ह कोटी)भरण्यापेक्षा धंधा बंद करण्याच्या विचारात.
१३ तारखेपर्यंत विवरण द्यायचे आहे. किती पेट्या घेऊन कुठे उभे राहणार वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

2014 मध्ये मोदी सरकार आल्यावर सिक्युलर लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि मुसलमानांना वाईट दिवस येतील अशी भीती दाखवली. तेव्हा दोन तीन वर्ष तरी "कुठे हिटलरसारख्या छळछावण्या काढल्यात?" असे विचारले जातात होते. तसे काही घडले नसल्याने सिक्युलर लोकांना गप्प करण्यात यश आले.
डिटेन्शन कॅम्पच्या रूपाने आता त्या प्रत्यक्षात येण्याची पहिली पायरी सुरू झाली आहे का?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते फक्त बेकायदेशीर, परदेशी लोकांना हाकलणार आहेत. एवढ्या उदात्त कारणासाठी देशभक्त लोकांनी थोडं सहन करायला हरकत नाही!

फेसबुक वगैरे वाचत नाही का तुम्ही? ठाण्यात रॅलीही काढणार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेपाळ सोडून जगात आणखी एक स्वर्गवत हिंदू राष्ट्र निर्माण झाले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज २४ डिसेंबर. ट्रंपतात्यांनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. आम्हाला २६ तारखेला सुट्टी होती, ती घाईघाईनं बदलून २४ तारखेला दिली आहे. माझा अंदाज असा की लोकांनी ख्रिसमसच्या खरेद्या कराव्यात म्हणून ही सुट्टी आहे. धार्मिक कारण वगैरे अजिबात नाही. लोकांनी खरेद्या केल्या की मग अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे वगैरे ट्यँव‌ट्यँव‌ करता येईल. एकीकडे तात्यांवर महाभियोग चालला; पुढे ते त्यात दोषी ठरणार नाहीत, हेही स्पष्टच आहे. पण डाग लागला वगैरे.

आमच्या घराजवळ मोठा मॉल आहे. काल सकाळी ऑफिसच्या वेळेत गर्दी नव्हती, पण दुपारहून मॉलच्या आजूबाजूला चिकार गर्दी होती. शहरभर मॉल, दुकानांच्या भागात सगळीकडे ट्रॅफिक जॅम. आजही तसंच होईल असं वाटतंय.

माझ्याकडे २० डॉलरांचं एक कूपन आहे. कपड्यांचं दुकान. कसली गरज नाहीये, मग २० डॉलरांचं काही घ्यावं का, असा प्रश्न आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू घेता येत असतील तर ठीकच आहे! खाऊन संपून जातं.

जिम १ जानेवारीला उघडा आहे, ह्यावरून काल माझं आणि ट्रेनरचं बोलणं झालं होतं, 'नववर्ष-वाले येतात ना म्हणून १ तारखेला जिम बंद नाहीये', त्यानं स्पष्ट केलं. मला एकदम जाहिराती, फेसबुकवरच्या पोष्टी आणि प्रत्यक्ष आयुष्य एकत्र येत आहेत असं वाटलं. आज सकाळी जिमला गेले होते. तिथे ख्रिसमसच्या खरेदीवरून त्यानंच विषय काढला. "नातेवाईक विचारतात, तुला काय हवंय? मला काहीच नको असतं किंवा काही तरी छाटछूट. किंवा अगदी विचित्र काही तरी. ते ख्रिसमससाठी कसं मागायचं? ते लोक मागे लागतात, नवा लॅपटॉप घे, नवा फोन घे. मला त्याचा काही उपयोग नाही. टायपिंग आणि पावरपॉइंटसाठी नवा लॅपटॉप कशाला हवा!"

अमेरिकी, २२-२३ वर्षांचा तरुण गिफ्टागिफ्टीला नावं ठेवतोय बघून दिल बागबाग हो गया!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्थव्यवस्था हा अमेरिकेत चिंता करण्याचा विषय होत आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्याचे सूर्यग्रहण बघण्यासाठी तयार असलो तरी त्यावर पाणी पडण्याची निश्चिती आहे. चार दिवसांपासून सूर्य ढगाआड आहे.
सामान्य माणसास चंद्रासारखी कोर असणारा सूर्य दिसणे यापलिकडे काही गंमत नाही तरी पाहण्यासाठी साधा पडदा*1 वापरतो.
मुंबई ठाण्याकडे कंकण दिसणार नाही, कुन्नुर उटी,काराईकुडीला कंकण आहे.

*-1 गिफ्ट रापर कागदाचे दोन घडी करून काम होते. दोनचार सेकंद पाहण्यासाठी ठीक. दोनतीन ग्रहणात वापरले आहे. शिफारस करत नाही. सोलर फिल्टरच वापरावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्यात सुरवातीला ढग होते पण नंतर विरळ झाले. फोटोग्राफिची फार तयारी न्हवती. कसेबसे फोटो काढले. अजूनही जनतेत अंधश्रद्धाच जास्त दिसते. मोजून चार कुटुंबे गच्चीवर हजर होती. (फोटोतली हिरवी छटा वेल्डिंग ग्लास मुळे) eclipse1 eclipse2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित ठाण्यात खंडग्रास ग्रहण दिसणार असल्यामुळे उत्साह कमी असेल. भारतातून खग्रास ग्रहण दिसणार असतं तेव्हा लोकांचा उत्साह बराच जास्त असतो. खग्रास ग्रहण खरोखरच कंकणाकृती किंवा खंडग्रास ग्रहणाच्या तुलनेत फार सुंदर असतं. तुलना नकोच, सुंदरच असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण मोदीकाकांना सांगून पुढचे ग्रहण ठाण्यात खग्रास करून आणू, हं!

#मोदीहैतोमुमकिनहै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्यात आणणार असाल तर सकाळी ८:०० ते १०:०० ह्या वेळात खग्रास ठेवा. तेव्हाच घरबसल्या सूर्य दिसतो. मग मीही 'मि पाहिलेला सुरयोदय' असं चित्र काढेन.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'मी पाहीलेला सूरयोदय' असे आहे ते.

परंतु ते असो.

ठाण्यात आणणार असाल तर सकाळी ८:०० ते १०:०० ह्या वेळात खग्रास ठेवा. तेव्हाच घरबसल्या सूर्य दिसतो. मग मीही 'मि पाहिलेला सुरयोदय' असं चित्र काढेन.

नसलेल्या (बोले तो, न दिसणाऱ्या) सूर्याचे/'सूरयोदया'चे चित्र काढणार? ॲबस्ट्रॅक्ट आर्ट? (अरे वा!)

मग काय चित्रात नसलेल्या सूर्याकडे बाण दाखवून 'ईथे सूरय आहे.' असे 'लीजंड' लिहिणार काय?

कल्पना उत्तम आहे. (आपल्यासारख्या कल्पक कलाकारांचा उस्ताद म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो. आमची कला दोन पावले पुढे नेऊन ठेवलीत. अशीच उत्तुंग शिखरे गाठत राहा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुद्द मोदीकाकांनाही ढगांमुळे ग्रहण दिसले नाही म्हणे,
तेव्हा त्यांच्या मनात काय आले असेल याचा एक अंदाज
"ढग आले की काही दिसत नाही, सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी मी हेच तर सांगत होतो ना"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्यात काल आम्ही ढग्रास सूर्यग्रहण पाहिले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खग्रास मला हुलकावणी देतय. योग कधी येतो बघुया. ९९ साली ऑफिसच्या कामामुळे बाहेरगावी होतो. २००९ मध्ये भोपाळ ला गेलो पण तुफान पाउस. सुर्य दिसला नाही, फक्त सावली अनुभवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९९ सालचं मलाही दिसलं नव्हतं. आम्ही कच्छला गेलो होतो. ढग होते. त्यामुळे प्रचंड मोठी सावली मात्र चालून आलेली दिसली; ते समजलं ते मात्र खग्रास स्थिती सुटली तेव्हा. ९९चं खग्रास ग्रहण अनुभवता आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुरेख फोटो!
दुसऱ्या फोटोसाठी कोणता फिल्टर वापरला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्स रे ! माझ्याकडे मायलर कागद होता. पण मी गच्चीवर गेलो तेव्हा माझा शेजारी वेल्डिंग काच आणी एक्स रे फिल्म घेउन आला होता. मग तेच वापरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिएसेलार नाहीये, मोबाइलने फिल्टरवरच फोकस होत होतं, ते सोडलं.
Pinhole च्या प्रतिमेचा फोटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायबोलीवरच्या आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत या धाग्यावर बरीच चर्चा होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक जितेंद्र जोशीच्या 'दोन स्पेशल' कार्यक्रमाचा प्रभाव असावा. परवा एक भाग उडत उडत पाहिला. त्यात तो पाहुण्यांची ओळख अशीच करून देत होता.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले बरेच महिने मी फार्मर्स मार्केटातून क्रॉसाँ विकत आणत आहे. दर शनिवारी सकाळी तिकडे जायचं, दोन क्रॉसाँ आणि कधीमधी सँडविचचा पाव आणायचा. त्या स्टॉलवरचे लोकही मला ओळखतात. आणि दर वेळेस मी 'क्रॉसाँ' मागितले की ते मला 'क्रॉसाँट का? बरं, बरं', असं म्हणतात.

हे उच्चार बरोब्बर अस्सेच. हा संवाद बरोब्बर अस्साच.

आज मी 'र'चा उच्चार थोडा घशातून केला. खाँसाँ असा काय तरी. मला जितपत फ्रेंच 'र' म्हणता येईल तितपत. आज त्यांनी माझा उच्चार न सुधारता दोन क्रॉसाँ पिशवीत भरून दिले.

शिकवलं मी त्यांना आणि त्यांनी मला.

(ह्यावरून 'पाव लाव' वगैरे विनोद अपेक्षित.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

croissant उच्चाराची खुबी अशी - ''oi''चा उच्चार ''वा'' 'r' हा घशातून निघतो असं ढोबळपणे म्हणतात, पण उच्छवास सोडताना जर तुम्ही ''अ'' म्हटलंत तर जो ध्वनी येतो तो फ्रेंच ''र'' त्यामुळे आधीच्या ''क''चा उच्चार ''ख''कडे झुकलेला वाटतो. तेव्हा ख् + र् + वा ख्र्वा आणि पुढे साँ असा ख्र्वासाँ. मला वाटतं गडबड ''वा'' न उच्चारता अनुनासिक ऑकार उच्चारल्याने तो फ्रेंच वाटे ना आणि फ्रान्सबाहेर फ्रेंचचे उच्चार जो तो आपापल्या चष्म्यातून करतो. निदान करकरीत क ऐवजी ''ख''सदृश उच्चार केल्यावर त्याला फ्रेंच ढब आली असावी. पण या शब्दात ''ट''चा उच्चार फ्रेंचमध्ये होत नाही हे न जाणणाऱ्यांचे खकार ऐकल्याने समाधान झाले की ''तुम नहीं सुधरोगी'' अशी त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली ?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित तसाच 'ही बाई सुधारण्यातली वाटत नाही, माफ करूया', असा विचार असावा. किंवा 'ग्राहकराणीला नाराज करू नये' असं बेकरीत शिकवलं असेल. किंवा नवीन वर्षाचा संकल्प. आता ह्यापुढे काय होतंय, त्यावरून कदाचित उलगडा होईल.

एकदा अटलांटा विमानतळावर पुढच्या विमानाची वाट बघत होते, तिथे एका बेकरीच्या दुकानात अशीच 'ट'ची गंमत झाली होती. मी 'क्रॉसाँ' मागत होते. दुकानातल्या आफ्रिकी-अमेरिकी तरुणीला ते समजत नव्हतं. काचेआडच्या पावाकडे मी बोट दाखवलं, त्याचा फायदा झाला नाही. मग 'तो नाही का, चंद्रकोरीच्या आकाराचा, चिकार लोणी घालतात तो फ्रेंच पाव', असं वर्णन सांगितलं, तरीही काही नाही. मग फक्त 'चंद्रकोरीच्या आकाराचा पाव' असं म्हणल्यावर 'तुला क्रसाँट हवाय का' असं अत्यंत तुच्छतापूर्ण आवाजात विचारण्यात आलं. मी हो म्हणल्यावर तिचा चेहरा 'कुठून कुठून परदेशी लोक येतात' असा झाला होता.

जगाचा मक्ता घेतलेल्या देशातल्या लोकांना फार फार आत्मविश्वास असतो, तो नक्की कुठून येतो, ह्याचा विचार मी सुरू केला.

---

तिर्री मांजर आमच्याकडे आली त्या सुरुवातीच्या महिन्यांतलीच गोष्ट. तिला बाहेर सोडायला सुरुवात केली होती. आजूबाजूला इतर कोणी मांजरं नाहीत, ह्याबद्दल तिची खात्री पटली होती. मी बाहेर काही तरी खुरपत होते. समोरून एक मोठा कुत्रा जात होता. माझ्या गुडघ्यापर्यंत निदान उंच असेल.

तिर्री शेपूट फुलारून त्याच्यावर ओरडली. कुत्र्याच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा हलली नाही. तो नेहमीप्रमाणे डुलत-डुलत, चालत पुढे गेला.

ह्या प्रकाराचं वर्णन मी बऱ्या अर्ध्याला सांगत होते. "तिला बहुतेक वाटतं की ती माझ्याएवढी उंच आहे. आणि मग तिनं त्या कुत्र्याला दम द्यायचा प्रयत्न केला"... म्हणून मी घशातून तसा आवाज काढून दाखवला.

बरा अर्धा थंडपणे म्हणाला, "ती फ्रेंचमध्ये 'रा' म्हणत होती तर!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फ्रान्सबाहेर फ्रेंचचे उच्चार जो तो आपापल्या चष्म्यातून करतो.

१. स्वित्झर्लंड/बेल्जियम/क्वेबेकमध्येसुद्धा???

२. उच्चार चष्म्यातून कसा करता येईल?

२अ. चष्मा ओठांसमोर धरून उच्चार करणे अपेक्षित आहे काय?

२ब. काँटॅक्ट लेन्सवाले लेन्सेस डोळ्यांतून काढून ओठांसमोर धरत असतील काय?

२क. लेन्स इंप्लांटवाले नेमके काय करत असतील?

२ड. ज्यांना चष्मा/लेन्स/अन्य तत्सम काही नाही, असे फ्रान्सबाहेरील लोक फ्रेंचचा उच्चार करण्याच्या भानगडीतच पडत नसतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

घशात लेझर मारून, हा पर्याय का नाही? आणि तुम्हाला 'काळा चष्मा' माहीत का नाही?

-- आपली, 'लेसिक'प्रेमी आणि अतिउजेडग्रस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किंबहुना, फ्रान्सबाहेरील चष्मा/काँटॅक्ट लेन्सवाल्यांनासुद्धा आपापली आयुधे नरड्यात कोंबून फ्रेंचचे उच्चार करता येतीलच, म्हणा. हे लक्षातच आले नव्हते माझ्या. आणून दिल्याबद्दल आभार.

..........

अतिअवांतर: चिंजंच्या नरड्यात चष्मा कोंबलेला आहे, आणि ते (पुण्यात) फ्रेंच पाजळीत आहेत, असे चित्र डोळ्यांसमोरून तरळून गेले. क्षणिक परमसंतोष जाहला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुधे नरड्यात कोंबून

म्हणजे, tool in deep throat का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(ह्यावरून 'पाव लाव' वगैरे विनोद अपेक्षित.)

इतका भिकार विनोद आम्ही करीत नाही. पूर्णविराम.

(याहूनही भिकार विनोदांचे आम्हांस अर्थातच वावडे नाही, आणि ते आम्ही अनेकदा आनंदाने करतोही. परंतु इतका भिकार विनोद? अरे, आमचे काही ष्ट्याण्डर्ड आहे की नाही?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या इनोदाचे ष्टयांडर्ड कळले. चक्क हसूही आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करा की मग! नुस्त्या धमक्या कसल्या देता!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इर्शाद कधीच गेला. तूर्तास हसीनाचे राज्य चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंप्रंना भौतिकशास्त्राचे नियम बहुमताच्या जोरावर रेटता येत नाहीत हे किती बरं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही प्रतिसाद, खरडी वगैरे गायब झाल्याची खरड खरडफळ्यावर बघितली. httpवरून httpsवर जाताना हे झालं असणार. ते कामही पूर्ण झालेलं नाही, मात्र त्या डेटाचं काही करता येईल का पाहते.

क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.