Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०७

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

गवि Wed, 12/08/2020 - 14:01

रशियानिर्मित लशीच्या बाबतीत इतर देश, उदा. युरोपियन किंवा अमेरिका येथील तज्ञ मन्डळी जी मतं (शंका, काहीसा अविश्वास इ ) व्यक्त करताहेत त्याविषयी बातम्या वाचताना डेटा क्वालिटी असा शब्द वाचला. लस काही लोकांना देऊन टेस्ट करतात हे माहीत आहे, पण या प्रकारच्या वैद्यकीय प्रयोगात (विशेषत: लशीबाबत) नेमका किती आणि काय "डेटा" जगापुढे ठेवला की ते स्टैंडर्ड, विश्वासार्ह, सेफ इत्यादि मानलं जातं?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/08/2020 - 17:04

In reply to by गवि

सध्या ३८ लोकांवर ह्या लशीची चाचणी केल्ये म्हणतात. फक्त. शिवाय हल्लीच केल्ये त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता दोन आठवडेतरी टिकेल का, हे माहीत नसणार.

हे मला वरवर समजलेले मुद्दे.

चिंतातुर जंतू Wed, 12/08/2020 - 17:27

In reply to by गवि

डेटा क्वालिटी म्हणजे इथे, किंवा एकूणच, काय अपेक्षित?

डॉ. ढेरे यांच्या मुलाखतीतून -

कुठल्या वयोगटात ही जास्त यशस्वी ठरू शकेल? (म्हणजे समजा अठरा वर्षांपुढच्या वयोगटासाठी ही लस यशस्वी झाली, तर एक ते अठरा वयोगटातल्या लोकांनी काय करायचं?) शिवाय, गर्भवती महिलांनी ही लस कशी घ्यावी? (कारण ही Live attenuated व्हायरसची लस आहे) नवजात अर्भकांना कशी द्यावी?

तुमच्या शरीरात जर आधीच या ॲडिनोव्हायरसविरोधी अँटीबॉडीज असतील तर शरीर प्रतिसाद कसा देईल? काही अडचणी येतील का? वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या जनसमूहांमध्ये ॲडिनोव्हायरस विरुद्ध वेगवेगळ्या प्रमाणात अँटीबॉडी सापडण्याची शक्यता असते. ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि भारतात अँटी ॲडिनो अँटीबॉडी सापडण्याचं प्रमाण पार २२ टक्क्यापासून ते ६० टक्क्यापर्यंत बदलू शकतं. या अँटीबॉडीज शरीरात असताना ही लस किती प्रमाणात काम करू शकेल?

लशीची परिणामकारकता या विशिष्ट बाबीसाठी डेटा क्वालिटी ठरवणारे हे केवळ काही मुद्दे आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/08/2020 - 21:21

In reply to by गवि

... सकाळच्या बातम्यांनुसार, रशियाने कच्ची विदा प्रकाशित केलेली नाही. म्हणून फाऊची आणि इतर अमेरिकी तज्ज्ञ शंका व्यक्त करत आहेत. (ह्यावर माझा अंदाज - कुठून, काय ह्याचा शेंडाबुडखा नसावा.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/08/2020 - 22:33

In reply to by गवि

अगदीच विदा नसेल तर किमान ३० विदाबिंदू तरी असावेत असं समजतात. (का, ते विचारू नका. माझं आकलन तेवढं मूलगामी नाही.) आणि तीससुद्धा नसतील (हे खगोलशास्त्रात नियमितपणे होतं) तर मग १० तरी विदाबिंदू असावेत आणि मग काही सांख्यिकी जुमले वापरता येतात.

इथे चाचण्यांकरता विदा नाही, मिळणार नाही अशी मोठी अडचण नाही. त्यामुळे ३८ हा आकडा मुळात फार छोटा वाटतो; किंवा सोयीसवडीनुसार हवे तेवढे निकाल तेवढे दाखवले, अशी शंका मला येते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/08/2020 - 20:22

In reply to by गवि

तीसच का, ह्याचं सैद्धांतिक किंवा theoretical उत्तर मला देता येत नाही; म्हणून एक प्रयोग करून तो लिहायला सुरुवात केली आहे. किती निरीक्षणं करून पुरेसा अंदाज येईल हे दाखवण्यासाठी. शनिवार-रविवारी पहिला भाग प्रकाशित करेन. त्यावरून ह्याचा किमान अंदाज घेता येईल.

अबापट Thu, 13/08/2020 - 07:10

In reply to by गवि

बाकीचे माहीत नाही.
पण नवीन लस बाजारात आणण्यापूर्वी फेज 1,2 आणि 3 च्या किती लोकांवर कशा चाचण्या घ्याव्यात याच्याबद्दल शास्त्रीय established पद्धती आहेत.
त्यानुसार चाचण्या करणे अपेक्षित असते.
या लसीच्या फार तर फेज1 चाचण्या चालू केल्या आहेत असे आपण म्हणू शकतो. ( इतर काही लशींच्या फेज 1 चाचण्या मे 2020 मध्ये संपून आता त्यांच्या अतिशय मोठया प्रमाणावर फेज 3 च्या चाचण्या चालू आहेत.) इतर लोकं यांच्या खूप पुढे जाऊनही अजून 'लस तयार आहे' च्या वल्गना करत नाहीयेत. (का करत नाहीयेत याला शास्त्रीय कारणे आहेत)
पुतीन साहेबांवर हे बंधन नाही . एक बार पुतीन बोला' लस रेडी हय तो रेडी हय ' छाप घोषणा असावी ही (असावी म्हणण्याचे एकच कारण , की त्यांनी डेटा {विदा} अजिबातच दिली नाहीये. )
अर्थात या लशीने रश्यात काही राडे झाले, तर तो (का ती ?) विदा बाहेर न येऊ देण्याचे सामर्थ्य ही श्री पुतीन यांच्याकडे आहे .
तरी...

विसुनाना Thu, 13/08/2020 - 12:49

WHO आणि तत्सम संस्थांनी कोविड्१९ रोगाला अटकाव करण्यासाठी मास्क वापरण्याची गरज नाही असे सुरुवातीला जाहीर केल्याने अनेक देशांमधील लोकांनी आणि काही देशांमध्ये तर त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनी 'मास्क वापरू नका' या घोषणेची बराच काळ पाठराखण केली. फेब्रुवारी महिन्यापासूनच सर्वांनी ताबडतोब मास्क वापरायला सुरुवात केली असती तर ही साथ इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरली नसती असे वाटते का?

https://erj.ersjournals.com/content/early/2020/04/27/13993003.01260-2020|

https://jamanetwork.com/journals/jama/fullarticle/2768532

कासव Sat, 22/08/2020 - 12:03

गिरिजा हे पार्वतीचं एक नाव आहे. पुढे आत्मक असं गृहीत धरलं तर ‛ज्यापासून उत्पन्न होते तो’ अशा दाते शब्दकोशातील एका अर्थानुसार पार्वतीपासून तयार झालेला असा अर्थ इथे घेता येईल का?

मराठी विश्वकोशाच्या जुन्या नोंदींत ‛गिरिजात्मज’ असा शब्द वापरलेला आढळतो. मात्र दाते शब्दकोशात (खाली स्क्रोल करत गेल्यावर विटकरी रंगात) गिरिजात्मक असा शब्द सापडतो.

आत्मज म्हणजे थेट मुलगा असा अर्थ झाला. म्हणजे गिरिजात्मज म्हणजे पार्वती-पुत्र असा स्पष्ट अर्थ होतोय.

मग गिरिजात्मज असा शब्द प्रचलित आहे की गिरिजात्मक? की दोन्ही?

वापरताना नेमका कोणता शब्द (की दोन्ही शब्द) वापरणे इष्ट राहील?

'न'वी बाजू Sat, 22/08/2020 - 15:24

In reply to by तिरशिंगराव

...त्याचे वरिजनल मुंडके छाटून त्यावर जर हत्तीचे मुंडके ग्राफ्ट केलेले असेल, तर हत्त्यात्मकसुद्धा!

'न'वी बाजू Sat, 22/08/2020 - 15:44

In reply to by 'न'वी बाजू

पार्वती आंघोळ करीत असताना राखण करीत बसलेल्या गणपतीने वाट अडविलीनीत, नि पुढे जाऊ नाही दिलेनीत, म्हणून शंकराने (बोले तो शिवाने) त्या पोराचे (बोले तो, गणपतीचे) मुंडके छाटलेनीत! उलटपक्षी, स्वराज्याचे राखण करीत बसलेल्या सावळ्याने 'खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राइ-राइएवढ्या' म्हणीत वाट अडविलीनीत, नि पुढे जाऊ नाही दिलेनीत, तर शिवाजीमहाराजांनी (बोले तो, शिवाने) त्या पोराचे (बोले तो, सावळ्याचे) मुंडके तर नाहीच उडविलेनीत, उलट त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिलीनीत.

तो शिवा नि हा शिवा यांच्यातील हा फरक लक्षात घेण्याजोगा आहे. (इव्हॉल्यूशन म्हणावे काय याला?)

'न'वी बाजू Sat, 22/08/2020 - 16:37

In reply to by 'न'वी बाजू

...या मुंडक्याची छाटाछाटी प्रकरणातून गणपतीबाप्पाला एका प्रकारचा सूक्ष्म एडिपस कॉम्प्लेक्स (आईबद्दल आत्यंतिक प्रेम नि बापाबद्दल तिरस्कार) निर्माण झाला असावा. (साहजिकच आहे. माझ्या बापाने जर माझे मुंडके उडविले असते, तर मलासुद्धा माझ्या बापाबद्दल तिरस्कार निर्माण झाला असता. त्यामुळे, बाप्पाला दोष नाही देणार मी.)

पैकी, आईबद्दल आत्यंतिक प्रेम हे 'आईला प्रदक्षिणा बोले तो पृथ्वीप्रदक्षिणा'वाला फंडा सांगणाऱ्या ष्टोरीतून उघड होते. बापाबद्दल तिरस्काराचे मासले मात्र अंमळ सटल आहेत.

(१) बाप्पा आपल्या वाहनावरून - उंदरावरून - घसरून पडलानीत, ते पाहून चंद्र म्हणे ख्याः ख्याः ख्याः ख्याः करून हसलानीत, तर चंद्राला म्हणे बाप्पाने शाप दिलानीत, की माझ्या वाढदिवशी तुझे जर कोणी तोंड बघितलेनीत, तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल, म्हणून म्हणे गणेशचतुर्थीला कोणी चंद्र पाहायचा नाही.

आता, हे सहज लक्षात येणार नाही, परंतु, येथे बाप्पाने बापाची गोची करून कसा सूड उगवला आहे, पाहा. शंकराच्या कपाळावर कोण आहे? चंद्र आहे. का आहे? तर शंकराच्या अंगाची आगआग होते, त्याला हीटसिंक म्हणून. म्हणजेच, ही ॲक्सेसरी शंकराला उतरवता येणे अशक्य; उतरविली, तर ॲट हिज़ ओन पेरिल.

आता, विचार करा. बाप्पा इथे हॅपी बड्डेचा केक कापतोय. शंकर शेजारी उभा आहे. बाप्पाला 'हॅपी बड्डे टूऽ यूऽऽऽ' गाऊन दाखविणाऱ्या तमाम आमंत्रितांना, झालेच तर खुद्द बाप्पालासुद्धा, अनायासे चंद्रदर्शन होणार नाही काय? आणि, हे होऊ देऊन कसे चालेल?

म्हणजे, या प्रसंगी शंकराला करोना झालेल्या रुग्णासारखे बाजूला काढून क्वारण्टाइन करणे आले!

आता विचार करा. बाप्पाची बड्डे पार्टी आहे, नि शंकराला एका खोलीत (क्लासिक मुघल फॅशनमध्ये) बंद करून ठेवलेले आहे. किंवा, फतवा काढून त्याला त्या दिवसापुरते घरातून हद्दपार करण्यात आलेले आहे. स्वतःच्याच (बायोलॉजिकल नसला, म्हणून काय झाले, परंतु) मुलाच्या बड्डे पार्टीतून त्याला पद्धतशीरपणे वगळण्यात आलेले आहे. आणि, हे एकदा नाही, दोनदा नाही, तर दर वर्षी होते आहे. एका बापाला याहून इन्सल्टिंग दुसरे काय असू शकेल?

म्हणजे, चंद्राला शाप देण्याच्या नावाखाली बापावर सूड उगवलानीत की नाही?

(२) दुसरी ती गोकर्ण महाबळेश्वरवाली (रावणाची) कथा घ्या. रावण बाप्पाच्या ताब्यात मोठ्या विश्वासाने शंकराची मूर्ती देऊन, टॅम्प्लीज़ म्हणून सुसू करायला गेला. तर, प्रॉमिस केलेले असतानासुद्धा, 'मूर्ती जड होत गेली' वगैरे काहीतरी फ़िज़ूल तथा लहान पोराचासुद्धा विश्वास बसणार नाही अशी लंगडी सबब देऊन मूर्ती जमिनीवर ठेवलीनीत. मग ती मूर्ती जमिनीला चिकटून बसली नि (सुसू करून परत आलेल्या) रावणाच्याने ती निघेना, म्हणून रावणाने 'जोर लगा के हैशा' सुरू केलेनीत, तर त्यातून फक्त मूर्ती वाकडी होत गेलीनीत.

आता, या सगळ्या भानगडीत शंकराचे काय हाल झाले असतील, विचार करा. घेतलानीतच ना बापावर सूड?

एडिपस कॉम्प्लेक्स, दुसरे काय?

'न'वी बाजू Sat, 22/08/2020 - 17:04

In reply to by 'न'वी बाजू

(कोणीही न विचारतासुद्धा, स्वतःच्या तत्त्वास मुरड घालून उगाचच दिलेले) स्पष्टीकरण:

उपरोक्त सर्व प्रतिसाद हे मी केवळ दोन कप चहा ढोसून दिलेले आहेत.

(आता सकाळीसकाळी हे पुण्यकर्म करून झाल्यावर, स्वच्छ आंघोळ करून बाप्पाची पूजा तथा आरती करायला मी मोकळा!)

स्पष्टीकरण समाप्त. (याहून अधिक स्पष्टीकरण मी देणे लागत नाही.)

----------

'I don't owe the world an explanation.'

चिंतातुर जंतू Sat, 22/08/2020 - 17:33

In reply to by 'न'वी बाजू

उपरोक्त सर्व प्रतिसाद हे मी केवळ दोन कप चहा ढोसून दिलेले आहेत.

ओबेलिक्स जसा लहानपणीच पोशनमध्ये पडलेला असल्याने त्याला पुनःपुन्हा पोशन प्यावे लागत नसे, तसेच श्री.रा.रा. न.बा. यांचे असावे हा संशय पूर्वीपासून होताच, तो दृढ करणारी ही कबुली आज या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मिळाली.

सुनील Sat, 22/08/2020 - 17:26

In reply to by 'न'वी बाजू

पहिली गोष्ट रोचक आहे यात शंका नाही पण एक गोची आहे.

भादव्यातील गणेश चतुर्थी म्हणजे बाप्पाचा हॅप्पी बड्डे नाही. तो येतो माघातला गणेश जयंतीला!

(भादव्यातल्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या नक्की कोणत्या अचिवमेन्ट्साठी सोहळा करतात हे काय मला ठाऊक नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 22/08/2020 - 18:10

In reply to by सुनील

बऱ्या अर्ध्याला कालच म्हणाले होते, "तुझं नाव गणपतीचं नाव आहे तर तुझा उद्या नावाप्रमाणे वाढदिवस आहे." ती माहिती सुधारून दिली पाहिजे त्याला!

'न'वी बाजू Sun, 06/09/2020 - 09:34

In reply to by नितिन थत्ते

('त्यांच्या' लेखी) मी 'काफीर' आहे. अर्थात, ('त्यांच्या'च) व्याख्येनुसार मी 'त्यांच्या' देवाला मानत नाही.

आता, (('त्यांच्या' मते) माझ्या लेखी) मुळात जे नाहीच, त्याबद्दल मी काय लिहिणार? आणि कसा? इतकी काही आपली कल्पनाशक्ती सुपीक नाही ब्वॉ. आणि, समजा असलीच, तरीही, (('त्यांच्या' मते) माझ्या लेखी) मुळात जे नाहीच, त्याबद्दल लिहिण्यात मी माझी उर्जा काय म्हणून खर्च करू? नाही लिहीत, जा!

- ((हिंदुत्ववादी नसलो, तरीही) हिंदू, आणि म्हणूनच 'आपल्या' देवांबद्दल काय मनाला येईल ते लिहू शकणारा) 'न'वी बाजू.

'न'वी बाजू Tue, 08/09/2020 - 08:21

'नेहरूंचे कपडे धुलाईसाठी स्वित्झर्लंडला (की पॅरिसला, की अशाच कोणत्यातरी ठिकाणी) जात असत' अशी (खास करून नेहरूद्वेष्ट्या गोटांत, परंतु कदाचित अन्यत्रसुद्धा) एक किंवदंता म्हणा, आख्यायिका म्हणा, जी काही असेल ती, प्रचलित आहे.

  • या किंवदंतेत कितपत तथ्य आहे?
    • तथ्य असल्यास, तपशील?
    • तथ्य नसल्यास, या वावडीचा उद्गम कोठून व कसा असावा?
  • पूर्वीच्या काळी, इंग्रजांच्या जमान्यात, हिंदुस्थानातल्या आडगावांतले अनेक उच्चभ्रू/प्रतिष्ठित लोक आपापले (महागाईचे) कपडे स्थानिक धोब्यास घाटावर बडवून वाट लावण्यास सुपूर्त करण्याऐवजी, जवळपासच्या एखाद्या मोठ्या शहरातील एखाद्या नामांकित लाँड्रीकडे धुलाईकरिता पाठवीत, इतपत ऐकून आहे. त्यामुळे, स्वतः राहात असलेल्या ठिकाणी धुलाईची चांगल्या दर्जाची अथवा खात्रीलायक व्यवस्था नसताना, कपडे इतरत्र धुलाईकरिता पाठविणे, ही काही अभूतपूर्व अशी बाब नव्हे. परंतु, उलटपक्षी, स्वित्झर्लंड (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, पॅरिस) बाकी कशाकरिताही प्रसिद्ध असू शकेल, परंतु, लाँड्र्यांबद्दल प्रसिद्ध असल्याचे काही ऐकिवात आलेले नाही. अशा परिस्थितीत, कोण कशास मुद्दाम फाइट मारून झक मारायला स्वित्झर्लंडास (किंवा पॅरिसला) कपडे धुलाईकरिता पाठवेल? परवडत असले, तरीही? आय मीन, व्हाय, ऑफ ऑल द प्लेसेस, स्विट्झर्लंड? ऑर, फॉर्दॅट्मॅटर, पॅरिस?
  • बरे, हा स्वित्झर्लंडला (किंवा पॅरिसला) कपडे धुलाईसाठी पाठविण्याचा उद्योग नक्की कधी नि कोठून चालायचा म्हणे?
    • नेहरूंच्या लहानपणी, ते अलाहाबादेत राहात असताना? ब्रिटिशकालीन अलाहाबाद हे संयुक्त प्रांतांतले तसे मोठे, महत्त्वाचे, हायकोर्टाचे शहर होते. बड्या इंग्रज अधिकाऱ्यांची तेथे वर्दळ असावी. अशा परिस्थितीत, तेथे बऱ्यापैकी लाँड्र्या नसाव्यात, हे काही पटत नाही. बरे, नव्हत्या असे जरी मानून चालले, तरीसुद्धा, आख्ख्या संयुक्त प्रांतांत, उत्तर हिंदुस्थानात, किंवा गेला बाजार दिल्लीत लाँड्र्या नव्हत्या? निदान मुंबईत, कलकत्त्यात तरी? अरे, काय ब्रिटिश साम्राज्य आहे की मस्करी? बरे, अलाहाबादहून कपड्यांचे पार्सल युरोपला पाठवायला नि तेथून परत आणायला पोष्टेज किती लागत असेल, ही गोष्ट सोडून देऊ. ते नेहरूंना परवडत होते, हे अगोदरच गृहीत धरलेले आहे. परंतु, ते सोडून सोडले, तरीसुद्धा, दळणवळणाच्या तत्कालीन साधनांचा विचार करता, अलाहाबादेहून पाठविलेले कपड्यांचे पार्सल समुद्रमार्गे स्वित्झर्लंडला (किंवा पॅरिसला) पोहोचून, तेथे त्याची धुलाई होऊन, पुन्हा अलाहाबादेस परत येईपर्यंत टर्नअराउण्ड टाइम किती असेल? (नि मध्यंतरी नेहरूंनी काय नागडे बसायचे?)
    • नेहरू इंग्लंडात शिकत असताना? परंतु मग, इंग्लंडातल्या तमाम लाँड्र्या तेव्हा काय संपावर गेल्या होत्या काय? की, 'इंग्रजी मालावर बहिष्कार' म्हणून नेहरू तेथे आपले कपडे पाठवीत नव्हते?
    • पॅरिसला नेहरू कधी गेले की नाही, मला खात्री नाही. पंतप्रधान झाल्यावर एकदा दौऱ्यावर गेले होते म्हणतात. तसेच, कमला नेहरू क्षयाने आजारी असताना त्यांना स्वित्झर्लंडमध्ये ठेवले होते, तेव्हा त्यांना भेटायला नेहरू स्वित्झर्लंडास गेले होते. शिवाय, नंतर पंतप्रधान झाल्यावरही एकदा स्वित्झर्लंडास गेले होते म्हणतात. कदाचित तेव्हा असेल? शक्य आहे. परंतु मग, स्वित्झर्लंडास गेलेल्या माणसाने स्वित्झर्लंडातल्या लाँड्रीत (किंवा, पॅरिसला गेलेल्या माणसाने पॅरिसमधल्या लाँड्रीत) कपडे धुलाईकरिता टाकले, तर त्यात नक्की विशेष असे काय आहे? नाहीतर मग त्या माणसाने नेमके काय करणे अपेक्षित आहे? कपडे पोष्टाने अलाहाबादेस पाठवायचे?

उगाच काहीही ष्टोऱ्या बनवतात लेकाचे!

(अवांतर: जीनांबद्दलसुद्धा अशाच प्रकारची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ते म्हणे एकदा वापरलेला नेकटाय आयुष्यात पुन्हा कधीही वापरत नसत. पाकिस्तानी लोक ही गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगतात. ॲज़ इफ इट इज़ समथिंग टू बी प्राउड ऑफ. परंतु चालायचेच.)

सुनील Tue, 08/09/2020 - 09:26

In reply to by 'न'वी बाजू

शंका रास्त आहे.

सध्या अगदी छोट्या-छोट्या दुकांनाच्यादेखिल अनेक शाखा दिसतात. एकेकाळी ठाण्यांच्या जांभळी नाक्यावर गाडी लावणाऱ्या प्रीति सॅन्डविचवाल्याच्याही आता ठाण्यातच काही ब्रान्चेस आहेत.

परंतु, ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात निदान मुंबईत तरी अशी दुकांनाच्या चेनची प्रथा नव्हती. बहुतेक दुकाने ही 'आमची कोठेही शाखा नाही' हा पुणेरी बाणा बाळगूनच होती.

त्या वेळी मात्र 'ला मोड' नावाची एका लॉन्ड्रीच्या दुकांनाची चेन होती (अजून आहे काय याची कल्पना नाही). त्यांच्या टेंपो छाप गाड्या विविध शाखांतून कपडे गोळा करून मध्यवर्ती लॉन्ड्रीत वगैरे नेताना/आणताना दिसत.

'ला मोड' म्हणजे फ्रेन्चमध्ये फॅशन असे ज्ञान मला माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मामेभावाने दिले होते. (आमच्या इंग्रजीचीच बोंब तिथे फ्रेन्च कुठे यायला). शिवाय तोवर राज ठाकरेंचा उदय व्हायचा होता. त्यामुळे दुकानांच्या पाट्या मराठीत (खरे तर देवनागरीत. पण त्यालाच मराठीत असे म्हणायची पद्धत आहे. असो.) नसत. फक्त रोमन लिपीत लिहिलेले ते नाव मी बहुधा लामोडे असे वाचत होतो.

तर, सांगायचा मुद्दा असा की, या 'ला मोड' वाल्याची अलाहाबादला एखादी शाखा असण्याची शक्यता असावी. आणि अर्थातच त्यांचे दर हे इतर लॉन्ड्र्या/धोबी/परीट यांच्याहून खूपच चढे असावेत. तेव्हा नेहेरूंचे कपडे अलाहबादच्या 'ला मोड' मध्ये जात असावेत. आणि साहजिकच "रिवाजाप्रमाणे" त्याचे मॉर्फिकरण होऊन, नेहेरूंचे कपडे पॅरीसला जातात, असा प्रवाद झाला तयार केला गेला असावा.

'न'वी बाजू Tue, 08/09/2020 - 20:50

In reply to by सुनील

फक्त रोमन लिपीत लिहिलेले ते नाव मी बहुधा लामोडे असे वाचत होतो.

  • (स्मृती दगा देत नसेल, तर) पुण्यात प्रभात रस्ता आणि भांडारकर इन्स्टिट्यूट रस्ता यांना जोडणाऱ्या ज्या अनेक गल्ल्या आहेत, त्यांपैकी एका गल्लीच्या तोंडावर पूर्वी एक बंगला होता. (आता असेल की नाही, कोणास ठाऊक.) बंगलामालकाने बंगल्याचे नाव हौशीने फ्रेंचमधून ठेवले होते; मात्र, बंगल्यावर ते नाव फक्त देवनागरी लिपीत लिहिले होते. 'मॉनामूर'.
  • माझे तुमच्या काहीसे उलटे आहे. बोले तो, मी दुकानावरची Nutan अशी रोमन लिपीतील पाटी, 'न्यूटन' अशी वाचत असे. आणि मग, न्यूटन लोकांचे कपडे कधीपासून शिवू लागला, असा काहीबाही प्रश्न मला पडत असे.
  • फोर्टात एक सुप्रसिद्ध चष्मेवाला आहे. (बहुधा कधीकाळी, इंग्रजांच्या जमान्यात, तो घड्याळजीसुद्धा असावा; चूभूद्याघ्या.) Lund and Blockley Opticians. पैकी, पहिल्या शब्दाचा खरा उच्चार हा वस्तुत: मराठी कानांना अश्लील भासण्यासारखाच आहे. मात्र, या मराठीकरण/देवनागरीकरणाच्या भानगडीत (किंवा कदाचित त्यापूर्वीसुद्धा; चूभूद्याघ्या.) त्याच्या पाटीवरील नावाचा पहिला शब्द देवनागरीत (लाजेकाजेस्तव?) 'लुन्ड' असा लिहिलेला आहे.

चालायचेच.

Lund and Blockley Opticians

मार्मिक गोडसे Wed, 09/09/2020 - 10:22

In reply to by 'न'वी बाजू

जहांगीर आर्ट गॅलरीसमोर आहे. दोन वर्षापूर्वी त्या भागातील इमारतींच्या नक्षीकामांची दुरूस्ती चालू होती . हया ईमारतीची दुरूस्ती झाली असावी , खूप छान दिसत होती . ह्या बोर्डचा तेव्हा मी फोटो काढला होता , अर्थात ' LUND ' मुळेच .

तिरशिंगराव Mon, 14/09/2020 - 13:52

In reply to by 'न'वी बाजू

प्रभात रोडच्या एका गल्लीतून गेल्यावर कमला नेहरु पार्कच्या रस्त्यावर ती पोचते. त्या चौकात एक बंगला आहे 'बिन्तांग' नांवाचा. तर त्याचा अर्थ काय असावा ?

अबापट Mon, 14/09/2020 - 14:42

In reply to by तिरशिंगराव

तारा (star)असा अर्थ असावा त्याचा.
माझ्या मित्राच्या आजोबांनी(जे तत्कालीन मलेशियात सिव्हिल सर्जन होते) बांधलेला बंगला आहे. मित्राची सध्याची पिढी तिथे राहते.
अजून काही माहिती हवी असेल तर विचारा , सांगेन.

तिरशिंगराव Mon, 14/09/2020 - 17:54

In reply to by अबापट

तुम्ही दिलेला अर्थ गुगल ट्रान्सलेट मध्येही आहे. भाषा इंडोनेशियन डिटेक्ट झाली. आणि त्याशिवाय आणखी बरेच अर्थही दिलेत.

https://translate.google.co.in/#view=home&op=translate&sl=auto&tl=en&te…

भाऊ Tue, 15/09/2020 - 09:58

In reply to by 'न'वी बाजू

नुकतीच या नावाच्या टॉप १०० मधील् स्विडीश विद्यापीठाची टवाळी करू नये यासाठी सूचना देण्यासाठी एक् बातमी आली होती. स्विस भाषेत त्याचा हिरवळ असा अर्थ होतो म्हणे!

'न'वी बाजू Fri, 18/09/2020 - 06:44

In reply to by भाऊ

नाही म्हणजे, आपण हा मजकूर थेट त्या बातमीच्या दुव्यावरून उतरवून भाषांतरित केलात, हे उघड आहे, परंतु, त्या दुव्यावरील मजकुरात टंकनदोष आहे, असे वाटते.

१. सर्वप्रथम, 'स्विस' अशी कोणती भाषा नाही.
- स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा जर्मन आहे. ६० टक्क्यांहून अधिक स्विस लोक जर्मन बोलतात. ती स्वित्झर्लंडच्या राष्ट्रभाषांपैकी तथा राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत भाषांपैकी एक आहे.
- जर्मनव्यतिरिक्त, फ्रेंच आणि इटालियन या स्वित्झर्लंडमध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा आहेत. त्यांनासुद्धा स्वित्झर्लंडच्या राष्ट्रभाषांचा तथा राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत भाषांचा दर्जा आहे.
- याव्यतिरिक्त, रोमान्श नावाची केवळ स्वित्झर्लंडमध्ये बोलली जाणारी एक स्थानिक भाषा आहे. मात्र, ही भाषा बोलणारे लोक हे स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येच्या जेमतेम अर्धा ते एक टक्का इतकेच असावेत. या भाषेला जर्मन, फ्रेंच आणि इटालियनबरोबरच स्वित्झर्लंडच्या राष्ट्रभाषेचा दर्जा आहे, तथा, स्थानिक अधिकृत भाषेचा दर्जा आहे.

२. दुसरे (आणि त्याहूनही महत्त्वाचे) म्हणजे, स्वीडनमधल्या एखाद्या विद्यापीठाचे (किंवा, खरे तर, ते विद्यापीठ ज्या गावात आहे, त्या गावाचे) नाव हे स्वित्झर्लंडमधल्या एखाद्या भाषेतल्या शब्दावरून कशाला ठेवतील?

बहुधा त्या शब्दाचा अर्थ स्वीडिश भाषेत तसा होत असावा.

असो.

----------

(बादवे, तो शब्द हा स्वीडनमधल्या एका गावाचे तथा तिथल्या विद्यापीठाचेच नाव नव्हे, तर स्वीडनमधले एक बऱ्यापैकी कॉमन आडनावसुद्धा आहे. आता, कोणाच्या नावाला हसू नये, हे खरेच. परंतु कधीकधी बिकट परिस्थिती उद्भवू शकते. खूपखूप पूर्वी मी ज्या प्रॉजेक्टवर काम करीत असे, तेथे हे आडनाव असलेला एक सद्गृहस्थ क्लायंटचा सर्वेसर्वा होता. (बहुधा त्याचे पूर्वज स्वीडनमधून येऊन अमेरिकेत स्थायिक झाले असावेत. तर ते असो.) आता, उदाहरणादाखल, प्रॉजेक्टवरच्या इतर देशी बांधवांबरोबर बोलत असताना हा सद्गृहस्थ जर अचानक येऊन मागे उभा राहिला, तर त्यांना हिंदीतून 'अरे, तुझ्या मागे तो ** उभा आहे' असे सांगताना प्रचंड पंचाईत होत असे. पण करणार काय?

असो चालायचेच.

अनुप ढेरे Tue, 08/09/2020 - 15:26

स्विट्झर्लन्डच्या कपड्यांबद्दल माहिती नाही पण नेहरु भोपाळला गेले असताना नेहरुंची फेव्हरिट ५५५ सिगारेट नव्हती नेह्रुंकडे किंवा राजभावनात नव्हती (नेहरुंकडे स्वत:ची सिगारेट का नव्ह्ती देव जाणे). फक्त इन्दुरात अव्हेलेबल होती. तेव्हा एक विमान नेहरुंच्या सिगारेटी आणायला भोपाळहुन इन्दोरला पाठवण्यात आले.
हा किस्सा मध्य प्रदेश राजभवनाच्या अधिकृत सायटीवर वाचला आहे.
http://governor.mp.gov.in/Guvs_Anecdotes.aspx

सुनील Wed, 09/09/2020 - 08:13

"ममव" हा शब्दप्रयोग आता बदलावा लागणार असे दिसते!

ममव

'न'वी बाजू Wed, 09/09/2020 - 08:31

In reply to by सुनील

...'ममव' या शब्दप्रयोगात अभिप्रेत असलेली 'मध्यमवर्गीय' ही संकल्पना मुळात आर्थिक संकल्पनाच नाही मुळी! किंबहुना, तिचा व्यक्तीच्या मिळकतीशी वा आर्थिक स्तराशी काहीही संबंध नाही.

'मध्यमवर्गीय' ही एक मानसिक स्थिती (स्टेट ऑफ माईंड) आहे.

(त्यामुळे, 'ममव' हा शब्दप्रयोग रास्त आहे.)

'न'वी बाजू Thu, 10/09/2020 - 12:36

खालील चित्र जर येथे डकवता येते, तर मग ते खरडफळ्यावरच डकवताना तेवढे घोडे नक्की कोठे अडते? खरडफळ्यावर डकवताना त्रुटी येते आहे.

खरडफळ्यावर मजकुराच्या आकारावर काही बंधन आहे काय? (डेटा यूआरएल वापरले आहे.)

माझी चित्रकला

गवि Thu, 10/09/2020 - 13:50

In reply to by 'न'वी बाजू

१. माणूस ठीक
२. बाई ठीक
३. कुल्ला चुकलाय. एक गोलाकार अवयव दाखवण्याऐवजी एखाद्या श्वापदासारखा आकार बनलाय.
४. बाई म्हणजे माणूस नाही का? (पोटेंशियल काडी.)

घाटावरचे भट Thu, 10/09/2020 - 14:59

In reply to by गवि

त्यांना कुल्ल्यामधला हिंस्रपणा किंवा श्वापदासदृश एखादा गुण दाखवायचा असेल. चित्रकाराचं आणि बघणाऱ्याचं इंटरप्रिटेशन सारखंच असायला हवं असं कुठे आहे?

'न'वी बाजू Thu, 10/09/2020 - 16:17

In reply to by घाटावरचे भट

त्यांना कुल्ल्यामधला हिंस्रपणा किंवा श्वापदासदृश एखादा गुण दाखवायचा असेल

आपल्याला wild ass म्हणावयाचे आहे काय?

'न'वी बाजू Thu, 10/09/2020 - 17:11

In reply to by गवि

३. कुल्ला चुकलाय. एक गोलाकार अवयव दाखवण्याऐवजी एखाद्या श्वापदासारखा आकार बनलाय.

तो कुत्रा आहे.

(मला जर कुल्लाच काढायचा असता, तर तो मी त्या माणसावर - किंवा, प्रेफरेबली, त्या बाईवर - काढला नसता काय? शेपरेटली कशाला काढला असता?

तो काय डिटॅचेबल कुल्ला आहे काय? आणि, एकच कुल्ला दोघांमध्ये?

आणि, तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इ.इ.)

गवि Thu, 10/09/2020 - 18:08

In reply to by 'न'वी बाजू

मला जर कुल्लाच काढायचा असता, तर तो मी त्या माणसावर - किंवा, प्रेफरेबली, त्या बाईवर - काढला नसता काय? शेपरेटली कशाला काढला असता?

आपणांविषयी पूर्ण आदर बाळगून असे म्हणू इच्छितो की चित्रातील माणूस आणि बाई यांची शरीरयष्टी पाहता त्यांनी इतके अंग धरणे कठीण दिसते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/09/2020 - 19:45

In reply to by गवि

गविंचा निषेध.

'न'बांचं अक्षर छान असण्याबद्दल मला प्रमाणपत्र द्यायचं होतं. गविंनी वाट लावली, दुश्मनाची लावल्यासारखी!

यडमाठराव Thu, 10/09/2020 - 14:36

In reply to by 'न'वी बाजू

अमेरिकेतला "कुत्रा" भारतातल्या डुक्कर नावाच्या प्राण्यासारखा वाटतो. थोडाथोडा. पण ते ठीक आहे, मला चित्रकलेतलं काहीच येत आणि समजत नाही म्हणून असं होउ शकतं.

'न'वी बाजू Thu, 10/09/2020 - 16:22

In reply to by यडमाठराव

अमेरिकेतला कुत्रा कुत्र्यासारखाच दिसतो. माझ्या चित्रकलेतला कुत्रा मात्र कुत्रा सोडून बाकी कशासारखाही दिसू शकतो.

म्हणूनच ते 'हा कुत्रा आहे' असे लिहिले आहे. लोकांना समजावे म्हणून.

'न'वी बाजू Thu, 08/10/2020 - 18:48

In reply to by यडमाठराव

...आमच्या चित्रकलेतले डुक्कर हे असे दिसते:

"A Portrait of My Grandmother"

तिरशिंगराव Thu, 08/10/2020 - 19:17

In reply to by 'न'वी बाजू

ज्यांच्या नाकाच्या भोकांतून त्यांचा घसा दिसतो ती माणसं मला बघायला आवडत नाहीत.

'न'वी बाजू Fri, 09/10/2020 - 00:25

In reply to by तिरशिंगराव

तुम्ही कधी डुकराच्या नाकाच्या भोकांतून त्याचा घसा डोकावून पाहायला गेलात?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/10/2020 - 21:09

In reply to by 'न'वी बाजू

चित्र चांगलं काढलं आहेत, म्हणायला जावं तर कारण समजलं. आजीबद्दल प्रेम असणार तुम्हाला! प्रश्न असा आहे की मग बेकन आणि सॉसेजेस कसे खाता?

'न'वी बाजू Fri, 09/10/2020 - 00:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जगातला बेकन आणि सॉसेजेसचा तमाम सप्लाय एकाच डुकरातून येतो, हे तुम्हाला कोणी सांगितले?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/10/2020 - 01:24

In reply to by 'न'वी बाजू

काटा-सुरीनं, किंवा हातानं, किंवा चॉपस्टिकनं, किंवा ताटलीत घेऊन, असं किंवा ह्यांतलं एकही उत्तर न आल्यानं तुमचे कूलपॉइंट्स कापले आहेत.

'न'वी बाजू Fri, 09/10/2020 - 07:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किंबहुना, तुमच्या प्रश्नाला बरोबर उत्तर देणे शक्य नाही.

तुमचा प्रश्न असा होता:

बेकन आणि सॉसेजेस कसे खाता?

सर्वप्रथम, मी बेकन (शक्यतो) खात नाही. कारण, मला ते आवडत नाही. किंबहुना, बेकन हा प्रकार फार थोड्या अवतारांत मी खाऊ शकतो. एक म्हणजे, बेक्ड पोटेटोमध्ये किंवा पोटेटो स्किन्सवर भरपूर वितळलेल्या चीजमध्ये बेकनचे बारीक तुकडे घालून कधीकधी देतात, ते. किंवा मग, सॅलड बारमध्ये (कोविडोत्तरीत हा प्रकार तूर्तास नामशेष झाला आहे. चालायचेच.) कधीकधी बेकनचा चुरा दिलेला असतो. प्लेटीत सॅलड घ्यावे, वरून ड्रेसिंग (शक्यतो रँच किंवा ब्लू चीज) टाकावे, आणि मग वर त्या ड्रेसिंगवर हा बेकनचा चुरा हलकेच पसरावा. चव बरी लागते. परंतु एवढे हे दोनच प्रकार (आणि तेदेखील क्वचितच) सोडल्यास, बेकनच्या वाटेस मी जात नाही. बेकन स्ट्रिप्स तर नाहीच नाही. (जवळपास तिटकारा म्हणण्याइतकी नावड आहे मला त्या प्रकाराची, म्हटलेत तरी हरकत नाही.)

सॉसेज खातो. परंतु, वर दिलेले दोन अपवाद (आणि तेही अतिक्वचित) वगळता बेकन खात नसल्यामुळे (आणि खास करून ब्रेकफास्टला बेकन स्ट्रिपा वगैरे प्लेगासारख्या टाळत असल्याकारणाने), बेकन आणि सॉसेज एकसमयावच्छेदेकरून खाण्याचा प्रसंग कधीही येत नाही. त्यामुळे, मी बेकन आणि सॉसेज खातो, असे प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आणि, बेकन आणि सॉसेज खात नसल्याकारणाने, कसे खातो हा पुढचा प्रश्न आपोआप रद्दबातल ठरतो.

हं, आता, सॉसेज जेव्हा मी खातो, तेव्हा तोंडाने खातो. (काटेचमचे काय, किंवा हात काय, ही सॉसेज केवळ तोंडापर्यंत नेण्याची साधने (किंवा वाहने म्हणा हवे तर) आहेत, खाण्याची नव्हेत. (ताटली तर तेही नव्हे!) ते काम तोंडालाच करावे लागते.)

असो. तुम्ही बेकन आणि सॉसेज कशा खाता? (खाऊ लागला नसल्यास) मीही तसाच खातो, असे (ढोबळमानाने) म्हणता येईल.

बाकी चालू द्या.

सामो Fri, 09/10/2020 - 18:39

In reply to by 'न'वी बाजू

अमेरीकन्स तर बेकन कशाही रुपात मटकावतात. मग अगदी कुरकुरीत, खमंग तळलेल्या बेकन स्ट्रिप्स् तर आहेतच पण चॉकलेट बेकनचेसुद्धा वावडे नाही त्यांना.

'न'वी बाजू Sat, 10/10/2020 - 10:38

In reply to by सामो

नाही आवडत खरे.

ओह, बादवे, स्टारबक्सात ते एक बेकन गूडा सँडविच मिळते, ते बरे लागते. आणि, स्टारबक्सातच, ते बेकन घातलेले सू वीड (sous vide) एग बाइट्स मिळतात, तेसुद्धा बरे लागतात. बेकन ज्या फार थोड्या अवतारांत टॉलरेट करू शकतो, त्यांत आणखी दोनची भर.

सू वीड एग बाइट्सवरून आठवले. स्टारबक्सात हॅमचे अत्यंत बारके तुकडे घातलेले सू वीड एग बाइट्ससुद्धा मिळतात. तेसुद्धा बरे लागतात. अन्यथा, हॅमदेखील शक्यतो आवडत नाही.

असो चालायचेच.

----------
याचा फ्रेंच उच्चार काय वाटेल तो असो; आम्हां अमेरिकनांत याला 'सू वीड'च म्हणण्याची पद्धत आहे. चालायचेच.

किंमत मात्र क्लासिक स्टारबक्स फॅशन दणकट असते. एवढ्याश्श्या दोन एग बाइट्सना साडेचार डॉलरच्या आसपास. तेही चालायचेच.

सामो Sat, 10/10/2020 - 23:10

In reply to by 'न'वी बाजू

एग बाईटस कसले हेवी असतात. २ एग बाईट खाल्ले की पोट भरतच पण नॉशिआ येतो. बेकन गुडा सँडविच फार आवडते पण ते त्याच्या व्हीट ब्रेडकरता.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/10/2020 - 21:09

In reply to by 'न'वी बाजू

मी बेकन विसरलेच असते; पण तुम्हीच मागे कधीतरी डुक्कर पेरलेली चवळी, ह्या अमेरिकी खाद्यपदार्थाचा उल्लेख केला होता, म्हणून ते आठवलं.

बाकी एकसमयावच्छेदेकरून हे तुमचं मूल्यवर्धन आहे. मी पडले भटुरडी, मी शाकाहारी आहे! बेकन आणि सॉसेज एकत्र खाता येऊ शकेल, असा विचार माझ्या मनास कुठून शिवणार?

चिंतातुर जंतू Fri, 09/10/2020 - 15:09

In reply to by 'न'वी बाजू

आपल्या या अशा सर्जनशील नि्र्मितीसाठी आपण कोणती संगणक प्रणाली वापरता सर?

'न'वी बाजू Fri, 09/10/2020 - 20:04

In reply to by चिंतातुर जंतू

१. रंगारीकामासाठी तूर्तास अँड्रॉइडवरचे हे ॲप वापरतो. (ॲपच्या मर्यादा लक्षात येत आहेत, परंतु तूर्तास काम चालून जात आहे. याहून बरे फुकटातले ॲप सापडल्यास ते वापरेन.)

२. रंगारीकाम झाल्यावर इमेज पीएनजी फाइल म्हणून लोकली सेव्ह करून ठेवतो.

३. त्यानंतर मग या किंवा तत्सम संस्थळावर जाऊन, पीएनजी फाइलच्या बाइट्सचे बेस-६४-एन्कोडेड डेटा यूआरएल बनवतो, जेणेकरून पीएनजी फाइल कोठेही अपलोड करावी लागू नये. (यूआरएलमध्येच फाइलचे तमाम बाइट्स बेस-६४-एन्कोडेड फॉर्मॅटमध्ये सामावलेले असतात. यूआरएल अवाच्या सवा प्रचंड होते खरे, परंतु काम चालून जाते.)

४. मग हे यूआरएल इमेज टॅगमध्ये डकवतो, त्या वरच्या संस्थळावरच किती पिक्सेल बाय किती पिक्सेलची माहिती मिळते (मला वाटते ही माहिती त्या पीएनजी फाइलवरूनसुद्धा थेट मिळविता यावी.), तीसुद्धा इमेज टॅगमध्ये डकवतो, झालेच तर काहीतरी रँडम टायटलसुद्धा डकवून देतो, नि सबमिट करतो.

(का कोण जाणे, परंतु ही डेटा यूआरएलवाली ट्रिक नेहमीच्या धाग्यांवर चालते, परंतु खरडफळ्यावर वापरल्यास बहुतांश वेळा एरर देते.)

असो चालायचेच.

चिमणराव Sun, 11/10/2020 - 18:04

In reply to by 'न'वी बाजू

ते पेंट app होतेच माझ्याकडे पण चित्रं काढत नाही बसलो. तुमच्याच चित्राची डेटा साइटवरून( 64 bit )लिंक मिळवली, इमेज ट्यागमध्ये टाकली आणि इथे टाकले. चित्र कुठेही अपलोड न करता वगैरे म्हहणजे कसं येतं ते टेस्ट केलं.
लिंक फारच मोठी आहे हे खरंय. मोबाइल थोडा वेळ फ्रीज झाला. असो चालायचेच.
प्रयत्न म्हणजे चित्रं काढण्याचा नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/10/2020 - 21:53

In reply to by 'न'वी बाजू

'न'बा, तुम्हाला ज्ञानेश्वर झालात अशी भीती नाही ना वाटली?

(चिमण, ह.घ्या प्लीज. जोक 'न'बांवर केलाय.)

'न'वी बाजू Sun, 11/10/2020 - 22:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समजले नाही.

ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून दाखवली. आम्हीही दाखवली. त्या अर्थाने आम्ही ज्ञानेश्वर आहोतच. (फार कशाला, पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये उभे राहून अनेकदा आम्ही अतिस्थानिक सूर्यग्रहणेसुद्धा लीलया पाडलेली आहेत; त्या अर्थाने आम्ही योगेश्वर श्रीकृष्णसुद्धा आहोत, याचाही ज़िक्र याच पवित्र संस्थळावर इतरत्र आम्ही केलेला आहेच.)

उलटपक्षी, ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले. आम्हाला ते स्टंट अद्याप जमलेले नाही. (कोणी सांगावे, एखादे दिवशी जमेलसुद्धा. किंवा जमणार नाहीही कदाचित. तूर्तास तरी त्याबाबत काही भाष्य करणे हे घाईचे तथा अप्रस्तुत ठरेल. पुढचे पुढे पाहून घेऊ.)

तिसरे म्हणजे, ज्ञानेश्वरांनी पालींच्या संदर्भात काही केल्याचे, म्हटल्याचे वा लिहिल्याचे आमच्या वाचनात नाही. अर्थात, ज्ञानेश्वरीचे आमचे वाचन तोकडेच आहे, हे आम्ही कबूल करतो. त्यामुळे, ज्ञानेश्वरीच्या कंटेंट्सबद्दलची आमची माहिती ही प्रामुख्याने सांगोवांगीचीच असल्याकारणाने, तिचा समावेश 'विद्या'त करता येणार नाही, हे उघडच आहे.

तेव्हा, आम्ही ज्ञानेश्वर झालो (किंवा होऊ), अशी भीती आम्हांस नक्की कोणत्या अर्थाने वाटली (अथवा वाटावी), असे आपणांस वाटते, हे कृपया स्पष्ट करू शकाल काय?

आगाऊ आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/10/2020 - 02:13

In reply to by 'न'वी बाजू

तुमच्याकडून असा काहीसा प्रतिसाद अपेक्षित होता; माझा आजचा दिवस सार्थक झाला. :प

चिमणराव Mon, 12/10/2020 - 06:55

In reply to by 'न'वी बाजू

१) ज्ञानेश्वरांनी पालींच्या संदर्भात काही केल्याचे, म्हटल्याचे वा लिहिल्याचे आमच्या वाचनात नाही.

ऐकिवात असेलच. पाल चुकचुक किंवा च्यकच्यक करते ते "अम्ही नै जा, अम्ही नै जा! म्हणताना ऐकले असेलच. अध्यात्मिक डिस्पोझिशनवाल्यांना ते "नेति नेति" असं ऐकू येत असणार.

२) कोणतीही गोष्ट विषद करून सांगणे, निरूपण करणे ही वृत्ती आहेच.

३) पुण्याकडे प्रतिबालाजी, प्रतिशिरडी, प्रति हनुमंत आहेत तशा पाट्या पुणे सातारा रोडवर आहेत. तुम्ही ऐसीवरचे प्रतिज्ञानेश्वर.

४)ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून दाखवली
सत्ययुगात हे थोडे पिंच ओफ सॉल्टने घ्यायचे म्हणजे अवघड काम सोपे केले. ते तुम्ही करताच. लेखाच्या खाली लेखाचा मतितार्थ देता तेव्हा लेखक धन्य होतो.

५) तुमच्या शहरात एखादा 'न'बा स्क्वेअर' असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चिंतातुर जंतू Mon, 14/09/2020 - 18:47

In reply to by 'न'वी बाजू

'राजनैतिक (किंवा मुत्सद्द्याची)

त्याला उन्मुक्तता असा वेगळा शब्द आहे. करापासून मिळते तीदेखील उन्मुक्तता :-)

'न'वी बाजू Mon, 14/09/2020 - 19:57

In reply to by चिंतातुर जंतू

'उन्मुक्तता' असा शब्द तशा अर्थाने अधिकृतरीत्या रूढ आहे काय? कधी पाहण्यात आलेला नाही. (असल्यास भयंकर आहे.)

'उन्मुक्तता' या शब्दातून, मुत्सद्दी हा मनाला येईल ते करायला / वाटेल तो सावळा गोंधळ घालायला(/ नंगा नाच करायला) मोकळा असतो, असा अर्थ प्रतीत होतो. ते तितकेसे बरोबर नाही. मुत्सद्दी हा वाटेल तो नंगा नाच करायला मुक्त नसतो. फक्त, वाटेल तो नंगा नाच केल्याबद्दल त्याला/त्याच्यावर अटक, कायदेशीर कारवाई वा शिक्षा होऊ शकत नाही, इतकेच. मात्र, त्याबद्दल त्याला 'अवांच्छित व्यक्ती' (persona non grata) म्हणून घोषित करून देशाबाहेर हाकलून देता येतेच.

असो.

चिंतातुर जंतू Mon, 14/09/2020 - 20:05

In reply to by 'न'वी बाजू

'उन्मुक्तता' असा शब्द तशा अर्थाने अधिकृतरीत्या रूढ आहे काय?

महाराष्ट्र शासनाच्या शासन व्यवहार कोशात आहे.

कधी पाहण्यात आलेला नाही.

चालायचेच.

असल्यास भयंकर आहे.

चालायचेच. शासनानेच प्रकाशित केलेल्या विकृतिशास्त्र कोशात herd immunityसाठी हे पर्याय आहेत :
कळप प्रतिक्षमता, यूथ प्रतिक्षमता, टोळ्यांची प्रतिक्षमता, समाज पार्श्व प्रतिक्षमता

अमुक Tue, 15/09/2020 - 00:10

In reply to by सुनील

कवचकुंडलं असा शब्द सुचतो.
उदा.

कोविडवरची लस आपल्याला करोनाविरोधात कवचकुंडलं बहाल करील अशी आशा.
ट्रम्प कवचकुंडलं घेऊन जन्मला आहे अशा थाटात काम करतो, करवून घेतो.

सुनील Tue, 15/09/2020 - 08:37

In reply to by अमुक

अतिशय रोचक.

हा शब्द इम्युनिटीच्या दोन्ही अर्थांना समर्पक ठरू शकतो. म्हणजे तसा तो असायलाच हवा असे काही नाही. एका इंग्रजी शब्दाला दोन मराठी प्रतिशब्द असूही शकतात. पण हा शब्द अस्सल मराठी आहे म्हणून जास्त भावला.

मराठी प्रतिशब्द म्हटला की संस्कृतला वेठीला धरायचे आणि ठाक-ठोकून एखादा शब्द 'घडवायचा' की जो कधीच कुणी प्रत्यक्षात वापरणार नाही!
त्यापेक्षा, एखाद्या जुन्या मराठी संस्कृतीतील शब्दाला नवा अर्थ देणे अधिक योग्य, असे वाटते.

इथे मला, अडगळीत जाऊ घातलेल्या पांढरपेशा या शब्दाला पुनरुज्जिवीत करणारा तो अनामिक वीर आठवतो. नाहीतर, श्वेतगळपट्टीधारक हा शब्द बोडक्यावर बसला असता.

'न'वी बाजू Mon, 21/09/2020 - 20:01

In reply to by नितिन थत्ते

होय. इस्पितळ हा शब्द एके काळी छान रुळला होता. परंतु मग सावरकर नावाचा एक इसम उगवला, आणि त्याने रुग्णालय असा शब्द आणून घाण केली.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. (इस्पितळ या शब्दाच्या.)

----------

पुढेपुढे तर हा आलय प्रत्यय जोडून शब्द बनवण्याची फ्याशन इतकी बोकाळली, की नाही नाही तिथे गरज नसताना आलयवाले शब्द आणून वापरले जाऊ लागले. म्हणजे, रुग्णालय आणि औषधालयपर्यंतच जेव्हा होते, तेव्हा निदान हे शब्द ज्या शब्दांऐवजी वापरायचे, ते इस्पितळ, दवाखाना वगैरे शब्द निदान 'परकीय' आहेत, अशी अंजीरपानी एक्स्क्यूज़ तरी होती. परंतु मध्यंतरी, 'देशाला देवालयांची नाही, शौचालयांची गरज आहे', वगैरे विधाने करून एक महात्मा निवडून आला. च्यामारी? देवालय, शौचालय? मंदिर, संडास यांसारखे छान वापरातले - आणि, मुख्य म्हणजे, तत्सम/तद्भव - शब्द सोडून? (संडास या शब्दाच्या व्युत्पत्तीशी न्यास - म्हणजे कशाचातरी त्याग - या शब्दाचा संबंध आहे, असे मागे 'ऐसीअक्षरे'वरच वाचले होते. बोले तो, संन्यास आणि संडास एकाच पठडीतले. एक सर्वस्वाचा त्याग, तर दुसरा तुलनेने स्मॉलस्केल त्याग, इतकाच काय तो फरक. तर ते एक असो.)

(अतिअवांतर: आणि मग, परवापरवा अयोध्येत जे जंगी भूमिपूजन झाले, ते शौचालयाचे की काय, असाही प्रश्न पडतो. असो चालायचेच.)

नितिन थत्ते Mon, 21/09/2020 - 20:20

In reply to by 'न'वी बाजू

सावरकरी किड्याचा दंश देशभर इतका भिनला की छापखान्याचेही मुद्रणालय झाले. आणि फौलाद चे इस्पात झाले.

हा इस्पात शब्द इतका ऑड होता की यवनांच्या द्वेष्ट्यांनाही पोलादी पुरुषांना इस्पाती पुरुष म्हणावेसे वाटले नाही त्यांनी लोहपुरुष म्हणणे पसंत केले.

खरे तर कोणाला पोलादी पुरुष म्हणत असताना त्याचे पोलादी पुरुष हे संबोधन रद्द करून लोहपुरुष हे संबोधन रूढ करणे हे त्या पुरुषास फारच कमीपणा* आणणारे आहे हे येथे नमूद केल्याशिवाय राहवत नाही.

*पोलाद बोले तो स्टील हे कठीण/आणि मजबूत असते आणि लोह बोले तो आयर्न हे अगदीच लेचेपेचे (वाकेन पण मोडणार नाही) असते असे आम्ही इंजिनिअरिंगमध्ये शिकलो आणि पुढे अनुभवले देखील.

'न'वी बाजू Mon, 21/09/2020 - 19:57

In reply to by अस्वल

किंवा इमुनटी असा शब्द घडवू शकतो (फलाट, टमरेल टाईप. कठीण उच्चार { ॲ, ऑ } गुळगुळीत करायचे).

येथे एक लक्षात घेतले पाहिजे, की ते बाकीचे ते फलाट, टमरेल वगैरे शब्द कोणी 'चला प्रतिशब्द पाडू या' म्हणून जाणूनबुजून 'घडविले' नव्हते. ते आपसूक घडत गेले.

मुळात प्रतिशब्द 'घडवायचे' कशासाठी? त्यापेक्षा सरळसरळ मराठीत 'इम्युनिटी' असे लिहा/म्हणा ना! लोकांना जर ते जमले नाही, तर लोक त्यांना जमेल तसे म्हणतील/लिहितील, नि मग तसा पायंडा आपोआप पडेल; कदाचित असा पायंड्याने घडलेला शब्द 'इम्युनिटी'ची जागा घेईलसुद्धा! (कदाचित 'इमुनटी'सुद्धा प्रचारात येईल.)

आक्षेप जाणूनबुजून प्रतिशब्द 'घडविण्या'ला आहे. मग ते संस्कृतास वेठीस धरून असो, की देश्य/ग्राम्य अपभ्रंश लादून असो. ते नैसर्गिकरीत्या घडले, तर ठीक; अन्यथा, 'भाषाशुद्धी'त आणि यात वरकरणी फारसा फरक नाही.

यावरून आठवले. माझ्या लहानपणी, 'किशोर' मासिकात, मानवाच्या उत्क्रांतीतील वेगवेगळ्या टप्प्यांवर एक मालिका येत असे. त्यात ती सगळी निअँडरथाल मॅन, क्रो-मॅग्नॉन मॅन वगैरे मंडळी असत. कंटेंटच्या दृष्टीने मालिका चांगलीच होती, परंतु तीत उगाचच 'मराठीकरणा'च्या नावाखाली निंदरथळ, क्रूमग्न वगैरे नावे 'योजिलेली' असत. असला सकाळीसकाळी पिसाळलेले सावरकर चावल्यागत वेडेपणा काय म्हणून करायचा, म्हणतो मी.

असल्या 'घडवलेल्या' शब्दांना 'कोणाचेतरी कंडुशमन' याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही वाटत. मग असा कंडुधारक त्याच्या मर्यादित कल्टात लोकप्रिय होत असला, तरीही.

अस्वल Mon, 21/09/2020 - 22:58

In reply to by 'न'वी बाजू

अगदीच "घडवू" नये हे बरोबर आहे. मूळ शब्दाला मराठीत सहज बोले तो सुमडीत वापरता आलं तर चांगलंच.
बँकेत जाऊन तो चेक देऊन ये - हे वाक्य मराठीच आहे.
तसं माझ्या लॅपटॉपची बॅटरी संपलीये, उद्या चॅट करू हेही.

कदाचित बहुजन समाजाने हे शब्द आणखी वापरले तर त्यांचे कंगोरे ते काढून टाकतील आणि लापटप, बाट्री इ.इ. काहीतरी बनून जातीलही. (तपशील सोडा.)

कंटेंटच्या दृष्टीने मालिका चांगलीच होती, परंतु तीत उगाचच 'मराठीकरणा'च्या नावाखाली निंदरथळ, क्रूमग्न वगैरे नावे 'योजिलेली' असत

हायड्रोजन बाँबला उदजन ध्वम हे नाव वाचलेलं आहे. ध्वम? म्हणजे धुडूम असा आवाज येतो म्हणून?

'न'वी बाजू Tue, 22/09/2020 - 04:37

In reply to by अस्वल

हायड्रोजन बाँबला उदजन ध्वम हे नाव वाचलेलं आहे. ध्वम? म्हणजे धुडूम असा आवाज येतो म्हणून?

काय की. ध्वम् हा शब्द बहुधा सावरकरांचा असावा. त्यामुळे, त्यांनाच ठाऊक काय लॉजिक असावे त्यामागे ते. (चूभूद्याघ्या.)

पण तेही एक वेळ सोडून देऊ. उदजन म्हटल्यावर, म्हणणाऱ्याला हैड्रोजन म्हणायचे आहे, हे ऐकणाराला कळते का? (ज्यांना मुळात हैड्रोजन कशाशी खातात हेदेखील माहीत नाही, अशा अज्ञ मराठीभाषकबांधवांची गोष्ट सोडून देऊ. त्यांना हैड्रोजन म्हटलेलेही कळणार नाही, नि उदजनही. परंतु, ज्यांना हैड्रोजन किमानपक्षी ऐकून ठाऊक आहे, अशांनादेखील जर तो कळणार नसेल, तर मग त्या शब्दाचा उपयोग काय झाला? भाषा ही शेवटी कळण्यासाठी असते ना?)

(शिवाय, ज्याला हैड्रोजन शब्द समजत नाही, त्याच्या डोक्यात जर उदजन म्हटल्याने काही प्रकाश पडणार नसेल, तर त्याचा तरी काय फायदा झाला?)

बाकी ते ध्वम् वगैरे एक गंमत, टाइमपास म्हणून सोडून देऊ.

नितिन थत्ते Tue, 22/09/2020 - 16:33

In reply to by 'न'वी बाजू

ध्वम शब्द सावरकरांचा होता का माहिती नाही पण गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या पुस्तकात हा शब्द वापरलेला आहे. हस्तध्वम म्हणून

हारुन शेख Mon, 21/09/2020 - 20:37

In reply to by सुनील

सूटसाट, सूटसांड, सूटतूट असे शब्द मोल्सवर्थ शब्दकोशात आहेत त्याचा अर्थ By speciality. Remission or release (in matters of toll or duties). असा diplomatic Immunity च्या अर्थाच्या जवळ जाणारा आढळला.

diplomatic Immunity साठी 'राजनैतिक सूट' असा शब्द मी वाचलेला आठवतो.

'अभय मिळणे' असा एक वाक्प्रचार आहे. दूतांना, वाटाघाटी करायला येणाऱ्यांना ते अभय मिळत असे, पण हा झाला वाक्प्रचार.

रोगप्रतिकारशक्ती आणि diplomatic Immunity साठी एकच एक शब्द मराठीत असल्यास माहीत नाही.

diplomatic Immunity साठी 'राजनैतिक सूट' असा शब्द मी वाचलेला आठवतो.

'अभय मिळणे' असा एक वाक्प्रचार आहे. दूतांना, वाटाघाटी करायला येणाऱ्यांना ते अभय मिळत असे, पण हा झाला वाक्प्रचार.

'राजनैतिक सूट' (किंवा त्यापेक्षासुद्धा 'राजनैतिक अभय') हा पर्याय वाईट नाही. (किंबहुना, '(राजनैतिक) अभय' परफेक्ट वाटतो.)

रोगप्रतिकारशक्ती आणि diplomatic Immunity साठी एकच एक शब्द मराठीत असल्यास माहीत नाही.

रोगप्रतिकारशक्ती आणि राजनैतिक अभय दोहोंकरिता एकच मराठी प्रतिशब्द असणे गरजेचे नाही. (फक्त, असा एकच प्रतिशब्द जर असलाच, तर तो मीही ऐकलेला नाही.)

आभारी आहे.

नितिन थत्ते Mon, 21/09/2020 - 20:25

ऐसी अक्षरेच्या साईटवर एखादा धागा प्रतिसादांमुळे लांबलचक झाल्यावर खालचे प्रतिसाद पहात असताना उजवीकडे खाली "बॅक टु टॉप" साठी एक बटण/जागा दिसत असे. ती आज २१ सप्टेंबर २०२० रोजी दिसत नाहीये. (विंडोज १०- मॉझीला फायरफॉक्स)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/09/2020 - 07:00

In reply to by 'न'वी बाजू

हे शक्यतोवर, लवकरात लवकत बघते. हे माझ्या लक्षात आलं नाही.

अपडेट - नवीनतम ड्रूपाल ७.७३मध्ये सगळीच उपकरणं, लॅपटॉपवरचा कुठलाही ब्राऊजर असल्यासारखं वर्तन आहे. 'Prevent on mobile and touch devices' हा पर्याय निवडला होता; फोनवर हे बटण दिसणार नाही म्हणून. तो पर्याय आता निवडलेला नाही तर बटण लिनक्सवर फाफॉ आणि क्रोमवर बटण दिसायला लागलं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/09/2020 - 07:25

In reply to by नितिन थत्ते

प्रतिसादांच्या खोक्यावर एचटीएमेल कोडची बटणंही दिसणं गायब झालं होतं. आता ह्या दोन्हींचा संबंध काय आहे, हे मला समजलेलं नाही. पण तेही लिनक्स-फाफॉ/क्रोमवर दिसायला लागलं आहे.

यडमाठराव Wed, 30/09/2020 - 16:02

बातमी देतांना जात-धर्माचा उल्लेख असू नये असा काहीतरी नियम वाचल्याचं आठवतं.
पण बऱ्याचदा बातम्यांत "एक द्लित के साथ ..." , "... यह व्यक्ती अल्पसंख्य समुदाय से था..." अश्या बातम्या वाचल्या. त्या बातम्या नियमांत बसतात का? नसतील तर त्या बातम्या देणाऱ्यांवर काय कारवाई होते?

वामन देशमुख Wed, 30/09/2020 - 21:49

भाषेवर संस्कृतीचा प्रभाव असतो. In fact, भाषा ही संस्कृतीचे अपत्य असते असे म्हणायला हरकत नाही.

मराठी भाषा-संस्कृतीच्या संदर्भात- नऊ महिने, चौथा दिवस हे शब्दप्रयोग स्त्रियांच्या संदर्भात वापरले जातात.
तसे पुरुषांच्या संदर्भात वापरले जाणारे काही शब्दप्रयोग सांगता येतील का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/09/2020 - 22:08

In reply to by वामन देशमुख

बहुतेकशी 'सर्वसमावेशक' अनेकवचनं.

पुल्लिंगी एकवचन - तो आला, अनेकवचन - ते आले.
स्त्रीलिंगी एकवचन - ती आली, अनेकवचन - त्या आल्या.
पुरुष आणि स्त्रिया एकत्र असतील तर - ते आले.

अख्खी भाषाच अशी पुरुषकेंद्री 'सर्वसमावेशक' आहे.

वामन देशमुख Thu, 01/10/2020 - 11:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रीलिंगी एकवचन - ती आली, अनेकवचन - त्या आल्या.

स्त्रीलिंगी एकवचन - मुलगी आली, सर्वसमावेशक अनेकवचन - मुले आली.

मुद्दा तो नाही हो.

मला असे शब्दप्रयोग हवे आहेत, जे मराठी परिप्रेक्ष्यात केवळ पुरुषांसाठी वापरले जातात.

गवि Thu, 01/10/2020 - 16:01

In reply to by अनुप ढेरे

साधारण तेवढेच अंतर विस्थापन, पण दिशा बदलून, "पायात गोळे आले" हे विरुद्धलिंगी रुप होईल का?

'न'वी बाजू Thu, 01/10/2020 - 18:34

In reply to by गवि

'पायात गोळे' उभयलिंगीं येऊ शकतात.

(नाही म्हणायला, आजकाल 'कपाळात'सुद्धा उभयलिंगीं जाऊ शकतात, म्हणा!)

(अवांतर: 'कपाळमोक्षा'चा 'कपाळात जाण्या'शी काही संबंध असावा काय?)

चार्वी Thu, 01/10/2020 - 14:35

भाषा लिंगभेदभावरहित (सर्वसमावेशक) वाटते तिथे तशी ती नसते, पुरुष अद्याहृत असतो या अदितीच्या मताशी सहमत
तरी पुरुषांच्या संदर्भात काही वाक्प्रचार आठवले ते असे-
मिशांवर ताव देणे
सव्यापसव्य करणे (कारण जानवे पुरुषच घालतात)
*
परंतु प्रश्नकर्त्याने दिलेली उदाहरणे भाषेवर संस्कृतीच्या प्रभावाची वाटत नाहीत

वामन देशमुख Thu, 01/10/2020 - 15:56

In reply to by चार्वी

मिश्यांवर ताव, सव्यापसव्य इ. बद्धल आभार.

परंतु प्रश्नकर्त्याने दिलेली उदाहरणे भाषेवर संस्कृतीच्या प्रभावाची वाटत नाहीत

भेटेन नऊ महिन्यांनी...

'न'वी बाजू Thu, 01/10/2020 - 18:21

In reply to by वामन देशमुख

कविता वाचली. भयंकर आहे. परंतु, भाषेवर, भाषेतील अभिव्यक्तीवर 'संस्कृती'च्या प्रभावाचा दाखला म्हणून सादर केली आहे, ते काहीसे सयुक्तिक वाटते.

फाशीची शिक्षा झालेला कोणीतरी 'क्रांतिकारक' - कोठल्यातरी रँडम ब्रिटिश अधिकाऱ्याला 'ठीऽऽऽश... ठ्यांऽऽऽश' (किंवा, 'ध्वम्!') केले असावे बहुधा... असल्या खेळण्यांचा त्या तत्कालीन सबकल्चरमध्ये षोक फार! (तरी बरे, एके-४७ वगैरे 'सुधारित' खेळण्यांचा शोध तेव्हा लागला नसावा; चूभूद्याघ्या.) परंतु हे काहीसे अवांतर झाले, त्यामुळे असोच. - हां, तर काय सांगत होतो... फाशीची शिक्षा झालेला कोणीतरी 'क्रांतिकारक' आपल्या आईला समजावून सांगतोय, की आई, रडू नकोस! नऊ महिन्यांनी पुन्हा भेटेन. बोले तो, नऊ महिन्यांनी पुन्हा तुझ्या(च) पोटी जन्म घेईन. किंवा, नऊ महिन्यांनी पुन्हा मला जन्म दे, मग तर झाले!

म्हणजे, हा पुत्र मेल्यावर पुन्हा त्याला जन्माला घालण्यासाठी त्याची आई लगेच, ताबडतोब (तंगड्या फाकवून?) सज्ज राहणार की काय, असा प्रश्न पडतो. की, तिने तसे सज्ज राहावे, अशी या 'सुपुत्रा'ची अपेक्षा आहे?

स्त्रीकडे केवळ 'अपत्यांना जन्म घालणारे यंत्र' या दृष्टिकोनातून पाहाणाऱ्या (आणि, तिच्या - प्रसंगी स्वतःच्या आईच्यासुद्धा! - सेक्स लाइफविषयीच्या - 'सेक्स लाइफ'करिता 'लिंगायुष्य' असा मराठी शब्द योजावा काय? - वैयक्तिक निर्णयांत ढवळाढवळ करू पाहणाऱ्या; नव्हे, तिला त्याबद्दल आदेश देऊ पाहणाऱ्या) संस्कृतीच्या द्योतकाचा उत्तम दाखला आहे हा!

(शिवाय, 'आई' हे येथे जर 'भारतमाते'चे - किंवा 'हिंदमाते'चे; टेक युअर पिक! - प्रतीक मानले, तर, ही 'माता' त्या काळी कोणाची 'अंकित' - ('अंक' बोले तो मांडी, नव्हे काय?) - होती, हे लक्षात घेता, या असल्या मंडळींच्या 'पितृत्वा'बद्दल काही रोचक प्रश्न उद्भवतात. (नाही म्हणजे, प्रस्तुत 'माते'ने आपल्याला पुन्हा जन्म द्यायला 'सज्ज' राहावे, अशी 'अपेक्षा' ('अपेक्षा' नव्हे, खरे तर; 'ऑर्डर'च जवळजवळ!) एकदा का (उघडपणे, आणि क्वाइट निर्लज्जपणे!) व्यक्त केल्यावर, तीच ॲनालॉजी मग तिच्या लॉजिकल कन्क्लूजनाप्रत का नेऊ नये?) पण मग, हादेखील एडिपस कॉम्प्लेक्सचा दाखला समजावा काय? की आईविषयी आत्यंतिक प्रेम, नि बापाला 'ध्वम्!'?)

ही असली कविता शालेय अभ्यासक्रमात घालणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विचारसरणीबद्दल शंका निर्माण होतात. निदान बी.ए./एम.ए. वगैरे 'मॅच्युअर ऑड्यन्स' पातळीवरच्या अभ्यासक्रमात तरी ठेवायची, तत्कालीन विचारसरणीची ओळख म्हणून! परंतु, शालेय अभ्यासक्रमात, त्या संस्कारक्षम वयातील ऑड्यन्ससमोर ही असली भंकस फेकणे म्हणजे... थूः! आणि, ही कविता म्हणजे काहीतरी सुंदर भावोत्कट वगैरे आहे, अशा थाटात शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मानसिकतेबद्दल काय बोलावे!

(वास्तविक, 'ही असली घाण कविता लिहिणाऱ्याला उलटे टांगून...' वगैरे वगैरे लिहिणार होतो. परंतु, अधिक विचार करता, कवीने तत्कालीन विचारसरणी आत्यंतिक प्रामाणिकपणे उघड केली आहे, याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. आणि, तत्कालीन संस्कृतीतील स्त्रीविषयक मानसिकतेचे यथार्थदर्शन घडविणारा आरसा म्हणून, एक म्युझियम पीस म्हणून ही कविता जतन करून ठेवण्यासारखी आहे. फक्त, शालेय विद्यार्थ्यांच्या गळी उतरवू नये, इतकेच.)

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/10/2020 - 01:12

"राम राम!" ह्यानं संवादाची सुरुवात आणि शेवट करणं.

बिनपाण्यानं करणं, हा शब्दप्रयोग बायकांबद्दल वापरला तरी बहुतेकदा पुरुषांच्या भावना दुखावत नाहीत (गोट्या कपाळात गेल्यासारख्या), पण हा वाक्प्रचार बहुदा दाढी-मिशीसाठीच असावा. बायका ब्लीच करतात, हजामत करत नाहीत.

नऊ महिने, चार दिवस हे प्रकार मराठीच काय, इतर भाषिक बायकांच्या बाबतीत ह्याच आकड्यांशी घोळतात. त्यामुळे ते निव्वळ मराठी वगैरे वाटत नाहीत.

बाकी अ. द, मराठेंच्या पुस्तकात - मराठी भाषेतील असभ्य म्हणी, वाक्प्रचार आणि संकेत - ह्यात बराच माल मिळेल.