Skip to main content

नोकिया ८०८ घ्यावा का ?

सध्या नोकिया ८०८ ची किंमत बरीच कमी झालीये तो सध्या १७-१८ हजार रु. मध्ये मिळत आहे.
४१ मेगा असल्याने त्याने सगळ्या स्मार्टफोन कॅमेरांना मागे टाकले आहेच.. पण P&S आणि काही DSLR ना पण मात देतो ...

काय म्हणता ?

काही दुवे ...

किंमत

स्मार्टफोन सोबत तुलना इथे HTC One आणि iPhone 5 पण हवे होते ...

गवि Thu, 30/05/2013 - 12:35

४१ मेगापिक्सेल सेन्सर आणि प्रत्यक्ष इमेज ४१मेगापिक्सेलची यात फरक आहे की सेमच?

१८ हजार म्हणजे कमी वाटत नाही किंमत अद्यापही.

परीक्षणे मात्र सर्वत्र चांगली आहेत.

तरीही विकीपानावर शेवटी एक वाक्य आहे की नोकियाने ८०८ प्युअरव्यू हा शेवटचा फ्लॅगशिप सिंबियन फोन असल्याचं जाहीर केलं आहे. हा फोन २०१२ फेब्रु मधे रीलीज झाला असं मानलं तर तो आधीच १ वर्ष जुना झाला आहे. या पार्श्वभूमीवर मग वरील घोषणेचा नेमका अर्थ काय घ्यावा?

म्हणजे यापुढे सिंबियनला भवितव्य नाही, यापुढे सिंबियनसाठी मिळणारी (अँड्रॉईड्च्या तुलनेत आगोदरच मर्यादित असलेली) अ‍ॅप्स मिळणे दुरापास्त होत जाणार.. ही ओएस ऑब्सोलीट होणार, सर्व्हिसवर परिणाम होणार किंवा कसे ???

आडकित्ता Wed, 05/06/2013 - 20:59

In reply to by गवि

म्हणजे यापुढे सिंबियनला भवितव्य नाही. यापुढे सिंबियनसाठी मिळणारी (अँड्रॉईड्च्या तुलनेत आगोदरच मर्यादित असलेली) अ‍ॅप्स मिळणे दुरापास्त होत जाणार. ही ओएस ऑब्सोलीट होणार. सर्व्हिसवर परिणाम होणार. हे सगळे असेच ;) (तुमचे प्रश्न स्टेटमेंटात बदलले आहेत.)

नोकिया की नैय्या डूब चुकी है. विंडोजके साथ तैरनेकी कोशिश मे लगे है. आतातरी देशी मायक्रोम्याक्स किंवा कार्बन घ्यावा. मायक्रोमॅक्स कॅनव्हास एचडी अन त्यापुढचे फोन्स केवळ सुपर्ब आहेत. सर्विस सेंटरचे जाळे जिल्हा लेव्हलपर्यंत पोहोचलेले आहे. कॅनव्हास-२ ला आयसीएस वरून पुढचे जेलीबीन अपडेट ऑफिशियली दिले गेले आहे. शिवाय देश का पैसा देशमे ;) किती दिवस लिमिटेड फीचर्सवाले नोकिया वापरणार?

तर्कतीर्थ Thu, 30/05/2013 - 12:55

केवळ ४१एम्पी सेन्सर असल्यामुळे मी हा फोन नक्कीच घेणार नाही. DSLR तो DSLR. सेन्सर आणि लेन्स लहान असल्याने इमेजमधला नॉईज आणि डिस्टॉर्शन वाढणार.

लॉरी टांगटूंगकर Thu, 30/05/2013 - 15:13

In reply to by तर्कतीर्थ

नै तर समदे डीयसयलआर अन् केमेर्या ऐवेजी फोन नसते का घेऊन फिरले ??? साध गणित आहे, किंमत इतकी कमी करावी लागते म्हणजे खप काहीही नाही. अन् अपेक्षेपेक्षा जास्त प्रोडक्शन करून ठेवलं गेलंय..

आठ-दहा महिन्यांपूर्वी सोनी एकस्पिरीया पी घेतलेला त्या वेळेला केलेली तुलना दाखवतो

प्रोसेसर, रॅम -कोर्टेक्स ए९/ए११ सिरीजचे प्रोसेसर त्यावेळेला लेटेस्ट म्हणावे असे होते, नोकिया ८०८ चा आर्म ११ सिरीजचा सिंगल कोर १.३ जीएचझेड त्या तुलनेत लै जुना आणि स्लो आहे. बाकी कंपन्या २ कोर अन् १ जीएचझेड देत आहेत. बाकी कंपन्या एक जीबी पर्यंत रॅम देत असताना याची रॅम जवळपास निम्मी आहे. प्रोसेसर आणि स्पीड तर इम्प्रेसिव्ह नाही. ब्रॉड्कॉमचा जीपीयु पण माली ४०० च्या तुलनेत कमी ताकदीचा आहे.

स्क्रीन- आपण अ‍ॅप्लिकेशन्स किंवा हेवी प्रोसेसिंग वापरत नसलो तर मुख्य महत्व स्क्रीन आणि अ‍ॅस्थेटीक्सलाच येतं, रिझोल्यूशन बाकीच्या फोन च्या तुलनेत कमी आहे आणि डॉट पर इंच रेटिंग तर खुपच कमी आहे. हा तिथं पण मार खातोय.

थोडक्यात म्हणावा असं यात ३८ मेपी सोडून काहीच नाहीये. अन् ज्याला फोटोग्राफीची बेसिक्स माहिती आहेत तो तर मेपि रेटिंग च्या मागे जाणार नाही. नुस्त मार्केटिंगसाठी अन् पब्लिसिटीसाठी कोणतं तरी स्पेसिफिकेशन भरपूरवर नेवून ठेवायचं जुनी ट्रिक आहे. निकॉन, कॅनॉन आणि सोनीच्या कॅमेर्यांनमध्ये सोनीचं मेपि रेटिंग (बर्याचदा) जास्त असतं ते यामुळेच, जास्त मेपि मंजे जास्त भारी कॅमेरा समजून लोकं विकत घेतात पण.

ॲमी Thu, 30/05/2013 - 13:20

४१ मेगापिक्सेल :O ? बाब्बो.... कोणाचे फोटो काढणार?
साध्यासुध्या माणसांचे फोटो जास्त रिझोल्युनच्या कअॅमेराने अजीबात काढु नयेत. उगाच सुरकुत्या, पुरळ काळी/पांढरी डोकी (black/white heads).... :-(