समाजमन १ - भिल्ल आदिवासींचे “पलायन”

दिवस फिल्ड ट्रीपचे होते. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याची ट्रीप निघाली होती. आठ दिवस भिल्ल समाजाचा अभ्यास करायचा होता. माझ्या गटाला या समाजातील शिक्षणाचे स्थान, त्यांची त्यातील प्रगती आणि शिक्षण मध्येच सोडुन जाण्याचे प्रमाण हा विषय होता. मुंबईतुन उत्तरेकडे गेल्यावर भाषेची समस्या जी गावात प्रामुख्याने भेडसावते तीचा फारसा त्रास मला झाला नाही. हिन्दी चित्रपट पाहण्याची सवय कामी आली. लहानपणचा काही काळ मुसलमानांमध्ये गेला होता. शिवाय अनेक वर्षे शेजारी मध्यप्रदेशातील होते. त्यामुळे बर्‍यापैकी सवय होती. गावात शिक्षक जी हिन्दी भाषा बोलत ती तेवढी सोपी नव्हती. ज्या सहजपणे आपण “स्कॉलरशीप” म्हणतो त्यासहजतेने ते लोक “छात्रवादी” हा शब्द वापरीत. त्याची सवय करुन घ्यावी लागली.

येथे सर्वप्रथम मी “पलायन” हा शब्द एका विशिष्ट परिस्थीतीत वापरला गेलेला पाहिला. हिन्दीशी थोडी सलगी असल्याने मला जरासा धक्काच बसला होता. माझ्या माहितीत “पलायन” हा शब्द आजवर तरी हरलेला माणुस पळुन जातो, घाबरुन माणुस पलायन करतो, एखादी गोष्ट जमत नाही म्हणुन टाळण्यासाठी मध्येच टाकुन पलायन करतो अशा अर्थीच वापरला जाणारा होता. पण येथे सर्व माणसे अगदी सहजपणे भिल्ल आदिवासींच्या हंगामी स्थलांतर करण्याला “पलायन” हा शब्द वापरत होती. मी एका NGO मधल्या माणसाला मुलाखतीदरम्यान हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर मिळाले कि पुर्वी युद्धात हरल्यावर माणसे जीव वाचवण्यासाठी पलायन करीत त्याचप्रमाणे हे आदिवासी जीवनाचा लढा येथे हरुन अस्तीत्व टिकवण्यासाठी दुसरीकडे पलायन करतात. हे स्पष्टीकरण म्हणजे आपण एखाद्या समाजाबद्दल किती कठोर, अनुदार होऊन बेजबाबदारपणे भाषा वापरु शकतो याचा एक वस्तुपाठच होता.

पुढे सर्वेक्षणात अनेक गोष्टी पुढे आल्या. सर्वात मोठी समस्या पाण्याची होती. त्यामुळे शेतीवर अवलंबुन राहता येत नव्हते. राहाण्याच्या ठिकाणापासुन शाळा लांब होत्या. कित्येक मैल चालत जावे लागायचे. काही शाळांची अवस्था फारशी चांगली नव्हती. लग्न करायचे असल्यास वधुला वराकडुन हुंडा द्यावा लागत असे. महिना तीन हजारापेक्षाही कमी आमदनी असलेल्या कुटुंबांनी बनलेल्या त्यासमाजात वधुच्या पित्याला वराने द्यावा लागत असलेला हुंडा एक लाखाच्या आसपास होता. त्यामुळे समाज कर्जात बुडाला होता. व्यसनाचं प्रमाण बरंच होतं. अंधश्रद्धांचं प्रमाणही मोठं होतं. या सर्व बाबी जगणं दुष्कर करुन टाकत होत्या त्यामुळे काही मोसमात आजुबाजुच्या शहरांमध्ये जाऊन काम करणं हा एवढाच एकमेव पर्याय होता. ते करत असताना मुलांना एकटं सोडता येणं शक्य नव्हतं त्यामुळे शाळा मध्येच सोडण्याचं प्रमाण भरपुर होतं.

या सार्‍या गोष्टी डोळ्यासमोर असुनसुद्धा त्यांच्या अस्तीत्वाच्या लढाईला माणसे सहजपणे “पलायन” म्हणत होती. खरं म्हणजे हे आदिवासी दुसरं अतिशय दारुण युद्ध लढण्यासाठी बाहेर पडत होते. हे आदिवासी मला तरी शूरच वाटले. मात्र आपल्याकडे दुसर्‍यांबद्दल तुच्छता व्यक्त केल्याशिवाय आपण शहाणे आहोत हे सिद्ध करता येत नसल्याने अशा तर्‍हेची भाषा सहजपणे वापरली जात असावी.

अतुल ठाकुर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख पुनःपुन्हा वाचला. हेतू समजला.

लेखाच्या गाभ्याशी ५०००% सहमत.

हे स्पष्टीकरण म्हणजे आपण एखाद्या समाजाबद्दल किती कठोर, अनुदार होऊन बेजबाबदारपणे भाषा वापरु शकतो याचा एक वस्तुपाठच होता.

त्या भिल्ल समाजातील समस्या -

१) लग्न करायचे असल्यास वधुला वराकडुन हुंडा द्यावा लागत असे. (हुंड्याची अपप्रथा)
२) हुंड्यामुळे कर्जबाजारीपणा होता (excessive leverage)
३) व्यसनांचे प्रमाण बरंच होतं
४) अंधश्रद्धांचे प्रमाण ही बरंच होतं
५) पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वतःहून स्वतःसाठी स्वतःपुरता का होईना तोडगा काढलेला नव्हता
६) (काही प्रमाणात वरील बाबींमुळे) त्यांना रोजगाराच्या Endogenous संधी उपलब्ध नव्हत्या.

या सगळ्या समस्या बाहेरच्यांनी त्यां भिल्लांमधे निर्माण केलेल्या नव्हत्या. उलट बाहेरचे (उदा. एनजीओ) हे त्या भिल्लांना मदत करून त्या समस्या सोडवू पाहत होते.

इतकं सगळं समस्याजनक प्रकरण असताना बाहेरच्यांनी (उदा. एनजीओ) जर त्यांच्यावर टीका केली (पलायन म्हंटले) तर बाहेरचे बेजबाबदार ????? खरंच ???

---

एखाद्या घरात एखादा मुलगा दुर्वर्तनी असतो. दारू पितो, कर्ज घेतो/उधारी करतो, अंधश्रद्धांच्या आहारी जातो, घरात पाणी नसेल तर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे यत्न करायला हवेत त्याकडे दुर्लक्ष करतो. शिक्षणाकडे तितकेसे लक्ष देत नाही, व स्वतःच्या बेकारीबद्दल परिणामकारक रित्या तोडगा निर्माण करण्यासाठी यत्न करीत नाही. व या सगळ्या परिस्थितीमुळे त्यास शहरातून विस्थापित व्हायला लागते (perhaps because he cannot afford the cost of living in the city).

आता या मुलावर टीका करायची की नाही ? व या मुलावर टीका केली तर तो टीका करणारा बेजबाबदार ? Really ??????

(व्यक्तीची व्यक्तीसमूहाशी तुलना करणे तितकेसे संयुक्तिक नाही. पण यू गेट माय प्वाईंट....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या वर्तनाचा एक अर्थ काढून एक विशेषण वापरण्याचे स्वातंत्र्य मला आहे काय? तुम्ही जो प्रतिसाद लिहिला त्यातली सत्ये पाहून माझ्या मनात कैक विशेषणे आली आहेत म्हणून विचारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्लीझ. लिहाच.
तुम्ही लिहिल्याचे जे काही पाप लागेल ते मी घ्यायला तयार आहे.
गब्बर स्वार्थीपणाचा पुरस्कार करतो, गब्बर क्रूर आहे, स्वार्थांध आहे, धनदांडग्यांचा हस्तक आहे हे पूर्वीही बोलून झालच आहे.
तुम्ही लिहाच . गब्बरच्या उत्तरातून मजा येइल.
जे पाप लागेल ते माझ्या खाती लिहा. तुम्हाला वर्तनाचा एक अर्थ काढून एक विशेषण वापरण्याचे स्वातंत्र्य आहे असे समजा.
पोपने क्रुसेडर्सना जसे पापाचे शुद्धीपत्रक दिले तसे मी तुम्हाला व्हर्चुअल शुद्धीपत्रक देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे अवांतर आहे. मनोबा तुम्ही नेहमी कुंपणावर बसता. मी मांडलेल्या विशिष्ट मुद्द्याला बगल देता. जसे ते कॉमन टॉयलेट. इथेपर्यंत ठिक आहे. पण मला इतर ऐसीकरांशी भिडवू पाहता आणि वर रिस्क सगळी तुमची म्हणता. अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या वर्तनाचा एक अर्थ काढून एक विशेषण वापरण्याचे स्वातंत्र्य मला आहे काय?

ओह येस. अवश्य.

----

मी मांडलेल्या विशिष्ट मुद्द्याला बगल देता.

थेट बोल्लं की विशेषणे व अप्रत्यक्ष बोल्लं की "बगल देता" हा आरोप. हा मनोबांवर थेट अन्याय आहे. (पळा पळा .... आता अरुणराव एक मोठी लाठी घेऊन मारणार मला ....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पळा पळा .... आता अरुणराव एक मोठी लाठी घेऊन मारणार मला ....)

गब्बऽऽर!!!! तेरे लिये तो उनके प्रतिसाद ही काफी है Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवराऽऽऽऽ
ROFL
ROFL
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अतुलजींनी वापरलेला 'बेजबाबदारीने' हा शब्द अनुचित (म्हणजे चूक) आहेच आपण अधोरेखित केल्याप्रमाणे. पण त्यांनी वापरलेला समाजाच्या अनुदारीतेचा उल्लेख बेजबाबदारीचे अनौचित्य झाकाळतो. म्हणून तुम्ही हा प्रकार इग्नोर करायला पाहिजे होता.

पलायन शब्द केव्हाचा भाषेत आहे? एन जी ओ केव्हापासून आहेत? पलायनशब्द एन जी ओ नी सामान्य लोकांत वा आदिवास्यांत रुढ केला आहे का? असो.

तुम्ही एक मनुष्य आहात. सुसंस्कृत, सभ्य आणि सुशिक्षित आहात. तुमच्या मानव समाजाचे किती गुणावगुण असतील? आज किंवा आजपावेतोच्या संपूर्ण मानवतेच्या इतिहासात मानवाचे वर्तन कितपत as it should be आहे? ते तर जाऊच द्या - हे as it should be वर्तन काय आहे हे माहित तरी आहे का? प्रत्येक शहाणा आपापला अर्थ लावतोय. मानवता लीड करणार्‍या तुमच्या आणि माझ्यासारख्या 'मध्यापासून पुढच्या लोकांच्या' किती कृती सम्यक आहेत? मानवजातीची आजची (वा केव्हाचीही नागरी) परिस्थिती तुम्हास भरून पावलो टाईपची वाटते का?

तरीही तुमच्याबद्दल बोलताना कोणी हिनतेने बोलते का? उदा. तुम्हाला दुसर्‍या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकताच येत नाही तेव्हा वेठबिगार म्हणतात का?

आपण भारतीय आहात. अर्थतज्ञ आहात. भारताचे आर्थिक पोटेंशिअल इतर कोण्या जागेपेक्षा फार वेगळे असायचे कारण नाही. काय आर्थिक अवस्था आज भारताची? आपले व्यवसायबंधू यासाठी जबाबदार नाहीत? म्हणजे अर्थतज्ञांनी आपले काम चोख बजावले आहे आणि इतर समस्या आहेत अशी केस आहे का? कि जी केस आहे त्याकरिता कोणताही मनुष्य अर्थशास्त्री उत्तरच काढू शकत नाही अशी केस आहे? असं नक्कीच नसावं? अर्थशास्त्री थोडे बरे जरे असते तर इअतर समस्या राहिल्या असल्या पण आर्थिक समस्या शक्य तितक्या सुटल्या असत्या. असं झालं आहे का?

तरीही तुमच्याबद्दल बोलताना कोणी हिनतेने बोलते का? भारतीय अर्थतज्ञ म्हणजे वास्तविक तुच्छ असे म्हणते का त्यांचा विषय निघाला कि?

आदिवास्यांनी युद्धात पराभव झाल्यानंतर विस्थापन केले. युद्धात भाग घेतला नाही व घेतला तर त्यात पलायन केले नाही. युद्ध हरल्यानंतर विस्थापन ही त्या अप्रत्यक्ष कराराचे कलम आहे. जे विस्थापन करत होते ते सगळे काही युद्ध सोडून पळाले नव्हते. आणि अतुलजी अजून दोन गोष्टी म्हणतात. आदिवासी शूर होते आणि स्थलांतर सिजनल होते. पलायन म्हणावे का या प्रकाराला? समाजाने आदिवास्यांच्या सामान्य स्थलांतराला पलायनाची उपमा दिली आहे असं अतुलजी म्हणत आहे. ते खचितच अवमानास्पद आणि दु:खदायक आहे.

चला, कदाचित या सगळ्या वादविवादांमधे काही खोट असेल. आज वाणिज्य हेच युद्ध आहे. त्या नादात ज्यांना विकसित देशात जावे लागले (जावे लागले, गेले नव्हे. त्यांना हेच जीवन, हाच पगार आणि हीच स्वच्छता इथे असती तर बापजन्मी आजन्म गेले नसते)त्याला मी महापलायन म्हणालो तर? महारणछोडदास त्यांनाच म्हटले तर हा अस्थानी अवमान ठरेल. अपेक्षांचा संदर्भ वास्तविक असावा आणि भाषा संकेताप्रमाणे आदराची असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आज वाणिज्य हेच युद्ध आहे. त्या नादात ज्यांना विकसित देशात जावे लागले (जावे लागले, गेले नव्हे. त्यांना हेच जीवन, हाच पगार आणि हीच स्वच्छता इथे असती तर बापजन्मी आजन्म गेले नसते)त्याला मी महापलायन म्हणालो तर?

अरुणजी प्रतिसाद खुप आवडला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

मला सुद्धा एकदम आवडला.

मला आजपर्यंत इतका सणसणीत कुणी मारला नव्हता. आणि न्यु यिअर च्या सेलिब्रेशन ची शॅम्पेन पिल्यावर तर हा मुद्दा वाचताना आणखीनच झिंग आली. चियर्स !!!

द झिंग थिंग ... श्याम्पेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

achuk!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे काही वाचले की श्रामो आठवतात. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रत्येक समाजाला आपल्या समस्या स्वत: सोडवाव्या लागतात. हुंडा, कर्ज, व्यसन या समस्या स्वत: भिल्ल समाजाला सोडवाव्या लागतील. दुसरे (एनजीओ/सरकार) यात काहीही करू शकत नाही. समस्यांवर पोळी जरूर भाजून घेतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका अत्यंत प्रसिद्ध कादंबरीत भटक्या जमातींविषयी लिहिताना 'माणसं जगायला बाहेर पडली' असं वाक्य होतं त्याची आठवण झाली.

बाकी शब्दांचे अर्थ हे वापरानुरुप बदलतात. त्यामुळे एके काळी या शब्दाला अमुक अर्थ होता पण आता तो त्या विपरित स्वरूपात वापरला जातो - ही तक्रार असण्यापेक्षा निरीक्षण असणं योग्य. पलायन हा शब्द या अर्थाने किती प्रमाणात प्रचलित आहे हे माहित नाही. पुरेशा लोकसंख्येने पुरेशा वेळा जर वापरला तर शब्दकोशात भर पडेल इतकंच. आदिवासी जे करत आहेत त्यामागची भावना इतर शब्दार्थ-छटेमुळे बदलणार नाही. ती भावना म्हणजे 'विशिष्ट काळात इथे राहून पोट भरणं शक्य नाही, त्यासाठी इतरत्र जावं लागतं' ही स्थिती अर्थातच आदर्श नाही. दहा पंधरा हजार वर्षांपूर्वी सर्वच माणसं हेच करत होती. आता लोकसंख्येचा काही भाग करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पलायन' या शब्दाने एकूणातच अशा समाजघटकांकडे पाहण्याचा निर्मम दृष्टिकोन ध्यानात येतो. या लोकांच्या सद्य परिस्थितीचे स्मृतीहीन (memoryless) विश्लेषण करणे तितकेसे योग्य नसावे. अल्प उत्पन्न, हुंडा, व्यसनाधिनता यात नव्या चलनाधारीत आधुनिक व्यवस्थेचा सहभाग किती असेल या मुद्द्याला लक्षात घ्यायला हवे.

चलनव्यवस्था अर्थव्यवहारांच्या स्मृतींचा हिशोब ठेवण्यास मदत करतात. पण काही समाजांत अर्थव्यवहार क्लिष्ट नसतात म्हणून अर्थव्यवहारांच्या स्मृतीही चलनाशिवाय परंपरांद्वारे टिकून राहतात. चलनाधारीत नसल्या तरी परंपरांवर आधारीत विनिमयव्यवस्था या समाजांत नेहमीच अस्तित्त्वात असतात. चलनव्यवस्थेकडे जातांना परंपरांवर आधारलेल्या risk insurance, contract enforcement वगैरे बाबी गळून पडतात पण त्या अस्तित्त्वात नसतात असे म्हणणे धाडसाचे होईल. परीघावर असलेल्या समाजघटकांना नव्या चलनव्यवस्थेत भांडवलाअभावी एकाचवेळी कर्जबाजारीपणा ही आधुनिक समस्या आणि हुंडा ही सद्यकाळात टाकाऊ पण पारंपारिक व्यवस्थेशी नाळ टिकवून ठेवणारी परंपरा आढळते. याचा अर्थ हे लोक संक्रमणावस्थेत आहेत. त्यांना मदत करायची असल्यास त्यांच्या इतिहासाला लक्षात न ठेवणे कदाचित वस्तुस्थितीचे योग्य आकलन असणार नाही.

१. नारायण कोचरलकोटा
२. रोजेनझ्विग, रॉबर्ट टाउनसेंड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं मत थोडंसं वेगळं आहे.
मूळ संस्कृत शब्द एकच असला तरी भाषेच्या लहेजाप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो.
उदा. यातायात हा शब्द आपण किती निगेटिव अर्थाने वापरतो मराठीत पण हिंदीत सहज वाहतूक म्हणून वापरतात.
आमच्या गावात ट्रॅफिक पोलिसच्या बोर्डावर वाहतूक पोलिस, यातायात पोलिस, संचार पोलिसु असं वेगवेगळ्या भाषांत लिहिलेलं असतं ते पाहून मला गंमत वाटायची.
हिमाचल प्रदेशात फिरताना गावाच्या नावाखाली 'प्राणिसंख्या -अमुकतमुक' असे बोर्ड असायचे.
तेव्हा मला वाटायचं हे लोक प्रत्येक गावातले नेमके प्राणी कुठले आणि कसे मोजत असतील?
मग कळले ते गावच्या लोकसंख्येबद्दल लिहिलंय.
इथे आमच्या कर्नाटकात 'अभ्यास' हा शब्द 'सवय' अश्या अर्थाने वापरला जातो. एखाद्याला दारू प्यायचा / सिगारेट ओढायचा अभ्यास असू शकतो!
यावरून कर्नाटकी लोक किती दर्दी , दारूसुद्धा अभ्यास करून पितात असा अर्थ कुणी काढत नाही.

तद्वतच 'पलायन' हा शब्दं त्या भागात रुटीनली 'स्थलांतर ' या अर्थाने वापरत असतील.
हे एन जी ओ वाले उगीच सेंटी मारत असतील.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>यावरून कर्नाटकी लोक किती दर्दी , दारूसुद्धा अभ्यास करून पितात असा अर्थ कुणी काढत नाही.<<
खर तर दारु सुद्धा अभ्यास करुनच प्यायली पाहिजे.आमचे सोत्रिंचा यावर अभ्यास दांडगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

म्हणजे जो व्यसन करायला मदत करतो तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीनत्व दाखवण्यासाठी तो शब्द वापरत असतील असे वाटत नाही.
बाकी या अदिवासींच्या स्वतःच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांना पलायन करावे लागते की पारंपारिक स्रोत व जीवनपद्धती नष्ट झाल्याने त्यांना स्थलांतर करावे लागते हे उघड गुपित असते.
किमान त्यांची एक फंक्शनिंग कम्युनिटीतरी असते. ज्या लोकांसाठी त्यांचे स्रोत हिरावले जातात त्या शहरी लोकांना दैववशात स्रोतांसाठी झगडावे लागले तर एकमेकांचा जीव घेतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तद्वतच 'पलायन' हा शब्दं त्या भागात रुटीनली 'स्थलांतर ' या अर्थाने वापरत असतील.

जाऊ द्या! आपण त्याला 'हिजरत' म्हणू. कसें?

हे एन जी ओ वाले उगीच सेंटी मारत असतील.

आपण त्या एनजीओवाल्यांचे घर उन्हात बांधू हं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे आमच्या कर्नाटकात 'अभ्यास' हा शब्द 'सवय' अश्या अर्थाने वापरला जातो. एखाद्याला दारू प्यायचा / सिगारेट ओढायचा अभ्यास असू शकतो!

चालायचेच. मराठी 'सत्कार' बंगालीत 'अंत्यविधी' नाही होत? तसेच.

यावरून कर्नाटकी लोक किती दर्दी ... असा अर्थ कुणी काढत नाही.

'दर्द' म्हणजे 'दुखणे' हे लक्षात घेता, कर्नाटकात लोकांस सांधेदुखी, अर्धशिशी आणि मूळव्याध एकसमयावच्छेदेकरून उपटण्याचा प्रादुर्भाव असल्याखेरीज अशा निष्कर्षाप्रत येणे हे तसेही सयुक्तिक ठरणार नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तुम्ही अचानकच फार फार आवडायला लागलात हो.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांना असले वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत असं ऐकल्यावर जातीवंत डॉक्टर आनंदी होणारच! (इथे जातीवंत म्हणजे 'जन्माने' असा अर्थ काढू नये कोणी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0