अलीकडे काय पाहिलंत? -९
यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.
याआधीचे भाग:१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८
शतरंज के खिलाडी अधुनमधुन पाहण्याची सवय आहे. अलिकडे बर्याच दिवसात पाहिला नाही. पण कुठुनही सुरुवात करुन पाहता येतो. असे एकसे एक सीन आहेत. छोट्याशा रोलमध्ये फारुख शेख, फरीदा जलाल सारखे कसलेले अभिनेते भाव खाऊन जातात. आगा तर अक्षरशः पाच मिनिटासाठी येतो आणि धमाल उडवतो. मात्र त्याकाळच्या नबाबांचा शैकीनपणा, बाहेर काय चाललंय याबाबतचा कमालिचा उदासीनपणा, घरातदेखिल दुर्लक्ष, स्वतःतच रमण्याची वृत्ती, छंदीपणा हा सत्यजित रेंनी जबरदस्त दाखवलाय. पात्रांची निवड इतकी अचुक की छोट्या छोट्या दृश्यांसाठी त्यांनी मोठमोठी माणसे आणलीत. जुना कलाकार डेव्हीडही आहे. लीला मिश्रा आहे. त्यामुळे जणुकाही इतिहासाचा एक तुकडाच आपण समोर साकार झालेला पाहात आहोत असे वाटते.
वाजिद अली शाहचे काम अमजदने झोकात केले आहे आणि त्याच्या वजीराचे काम विक्टर बॅनर्जीनेदेखिल चोख वठवले आहे. मात्र नबाबाची आई म्हणुन जुन्या काळातील अत्यंत करारी चेहरा असलेल्या वीणा यांच्या निवडीसाठी सत्यजित रेंना साष्टांग दंडवत घालावेसे वाटतात. देशासाठी, संस्थानासाठी, अगदी घरासाठीदेखिल काही न करणारे नबाब खानदानच्या इज्जतीचा प्रश्न येताच एकमेकांवर हत्यारं रोखतात. आणि फारसे काही न करताच परत आपल्या खेळात रमुन जातात इतका त्यांचा र्हास झालेला असतो.
शांतता कोर्ट : सुलभा देशपांडेंची बेणारे
>> अर्थातच सुलभा देशपांडयांच्या काळचं आता उपलब्ध नाही.
१९७१ साली सत्यदेव दुबेंनी 'शांतता...'वर चित्रपट केला होता. मूळ नाटकातलेच कलाकार त्यात होते. त्याची एक प्रत पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काइव्हमध्ये आहे. अर्थात, त्यात बेणारेबाईंची भूमिका सुलभा देशपांडेंनीच केली आहे.
ओह! आभार!
ओह! आभार!
तिथले चित्रपट तिथेच पाह्ता येतात की बाहेर नेता येतात? (बाहेर नेता येत नसावेत असं वाटतं.)
तिथेच पहायचे झाल्यास संपर्क कुणाकडे करायचा ?
तिकिट वगैरे काढणं पुरेसं आहे, की कुणाची परवानगी वगैरे बाबी आवश्यक आहेत?
म्हणजे कुणीही जाउन एखाद्या चित्रपटाबद्दल वगैरे मागणी केली तर चालतं का ?
आर्काइव्हमधले चित्रपट
>> तिथले चित्रपट तिथेच पाह्ता येतात की बाहेर नेता येतात? (बाहेर नेता येत नसावेत असं वाटतं.)
तिथेच पहायचे झाल्यास संपर्क कुणाकडे करायचा ?
तिकिट वगैरे काढणं पुरेसं आहे, की कुणाची परवानगी वगैरे बाबी आवश्यक आहेत?
म्हणजे कुणीही जाउन एखाद्या चित्रपटाबद्दल वगैरे मागणी केली तर चालतं का ?
चित्रपटाची प्रत आर्काइव्हबाहेर नेण्याची सोय आहे, पण ते फार किचकट आहे. त्यापेक्षा त्यांच्याकडेच चित्रपट पाहायची व्यवस्था तुलनेनं सोपी आहे. तिकीट वगैरे पद्धत नाही. तुम्हाला खाजगी स्क्रीनिंगसाठी रीतसर अर्ज द्यावा लागेल. अर्जात काही तरी संशोधनात्मक प्रकल्पासाठी अमुक चित्रपट पाहायचा आहे वगैरे सांगितलंत तर बरं होईल. चित्रपटाची प्रत दाखवण्याचा खर्च द्यावा लागेल. (अधिक माहिती इथे) सुमारे तीस आसनक्षमतेच्या प्रिव्ह्यू थिएटरमध्ये चित्रपट पाहायचा झाला, तर त्याचं भाडं द्यावं लागेल. चित्रपटांची यादी इथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयात चौकशी करावी.
भक्ती बर्व्यांची ती फुलराणी
भक्ती बर्व्यांची ती फुलराणी मी देखील पाहिली आहे. ही काही फार दुर्मिळ गोष्ट नसावी.
मात्र तरीही बाकी बाबतीत 'मेघुतै'च्या जळफळाटाशी सहमती आहेच!
समांतरः मी (वरीजनल संचातले का आठवत नाही पण प्रत्यक्ष चार-पाच तास चाललेले) 'कट्यार काळजात घुसली' सुद्धा पाहिले आहे. त्यामानाने हर्बेरियमचा प्रयोग म्हणजे नाटकाचा अपमान होता!
शांतता - सुलभा देशपांडे - अवांतर
इथे मूळ नाटकातला (१९६३) सुलभा देशपांडेंचा २ मिनिटांचा एक प्रसंग सापडला.
---
मी तो चित्रपट ८०च्या दशकात टीव्हीवर पाहिला होता. तो फार काही कळण्याचे माझे वय नव्हते. अमोल पालेकर, अरविंद देशपांडे हे इतर कलाकारांपैकी होते. त्यात चित्रपटाच्या शेवटी (अंधुक आठवते त्याप्रमाणे) बेणारेंवर कॅमेरा ठेवून (बहुधा) श्रीराम लागूंच्या आवाजात एक कविता म्हटलेली आहे. ती कुठली आहे कुणाला कल्पना आहे का ?
कदाचित बालकवींची 'घरटा' ही कविता ('गरीब बिचार्या चिमणीला सगळे टपले छळण्याला') असावी किंवा आरती प्रभूंची एखादी. फार परिणामकारक होते ते दृश्य.
घरटा / मरणमाडी
बहुधा नाटकात/मूळ संहितेत 'घरटा' आहे. पण चित्रपटात 'मरणमाडी' ही आरती प्रभूंची कविता असावी, अशी शंका आहे.
आठवणीतून देत आहे -
-----------
'मरणमाडी'
-----------
चाल बाबा चाल पुढे,
मोज तुझे तूच तडे
मन : नुस्ता एक तवंग
निष्ठूरपणे फुंकून बघ
दिसेल खरे कडू जग
रंगाविना सोलीव ढग.
दिसतील झाडे लाकडाची
फुटतील हाडे चुन्याची
पावले तुझी कातड्याची
मरणमाडी चढायची
एकेक पायरी जिन्याची
पावलोपावली विरत जाय
मागे फिरू नकोस बाबा
कुठे ठेवशील दरीत पाय..
डेढ इश्किया
विशाल भारद्वाजचे सिनेमे ज्यांना आवडतात त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. यातल्या उर्दूचे बरेच कौतुक झाले आहे. ती तशी आहेही. बाकी जुने लखनवी वातावरण उभे करण्यात ही मंडळी यशस्वी ठरली आहेत. 'वो जो हममें तुममें करार था' ही गजल चित्रपट संपल्यावर पाठलाग करत राहाते.
डेढ इश्किया
मलाही हा चित्रपट आवडला. नसीर-अर्शद ह्यांची जुगलबंदी तसंच अर्शद-हुमा ह्यांची जुगलबंदी (अभिनय आणि संवाद) चांगली रंगते. विजयराजचा खलनायक आपल्या जागी योग्य आहे. किडनॅप झालेला नवाब (आणि त्याची इटालिअन अम्मी), दाक्षिणात्य पोलीस किंवा हकीम अशा तुलनेनं छोट्या व्यक्तिरेखांत आणि सुरुवातीच्या कबरीतल्या प्रसंगासारखे छोटे प्रसंग ह्यांतसुद्धा कष्ट घेतले आहेत. माधुरी मध्यमवयीन आणि सुंदर दिसते (आणि नाचतेही) म्हणून भूमिकेत शोभते. अख्तरीबाईंचा आवाज ऐकायला मिळतो ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे रेखा भारद्वाजच्या आवाजातल्या उणीवा जाणवतात ही अडचण होते. मुशायरा आणि त्यातल्या शायरीद्वारे संघर्षनाट्य आणि प्रेमाचे विविध रंग उभे करणं चांगलं जमलं आहे, पण त्यामुळे जलदगतीची अपेक्षा असलेल्या प्रेक्षकांमध्ये चित्रपट फारसा लोकप्रिय होणार नाही अशी भीती वाटते. पटकथा आणि संवादांवर आधी कष्ट घ्यायचे आणि मग गुणी अभिनेत्यांकडून पडद्यावर रंग भरायचा असा पायंडा काही प्रमाणात हिंदी सिनेमात पडतो आहे ही माझ्यासाठी एकूणात आनंदाची बाब आहे.
'वो जो हममें तुममें करार था'
सदर चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. परंतु, ह्या गाण्यावरून बेगम अख्तरची आठवण आली.
माझ्या लहानपणी आमच्याकडे एक कॅसेट होती, बेगम अखतरची. त्यात ही गझल होती.
त्यातील इतर गझल होत्या - "ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया", "जिंदगी कुछ भी नही, फिर भी जिये जाते हैं" आणि इतर काही.
समकालीन मराठी नाटकांविषयी सेमिनार
ललित कला केंद्रातर्फे आयोजित समकालीन मराठी नाटक आणि नाटककारांविषयी सेमिनार
दिनांक - २७, २८ जानेवारी
वेळ - रोज सकाळी १० ते संध्याकाळी ६
ठिकाण - NISDA हॉल, आंबेडकर भवन, पुणे विद्यापीठ
२७ जानेवारी -
सत्र पहिले - मकरंद साठे यांची नाटके
वक्ते - अनिता दाते, वैभव आबनावे, अतुल पेठे
सत्र दुसरे - राजीव नाईक यांची नाटके
वक्ते - चिन्मय केळकर, आशुतोष पोतदार, विजय केंकरे
सत्र तिसरे - नॅरेटिव्ह फिक्शन्स ऑफ नाईक अँड साठे
वक्ते - हरिश्चंद्र थोरात, नितीन रिंढे
२८ जानेवारी -
सत्र पहिले - राजीव नाईक यांची थिएटरविषयीची पुस्तके
वक्ते - रेखा इनामदार साने, हिमांशु स्मार्त
सत्र दुसरे - मकरंद साठे यांची थिएटरविषयीची पुस्तके
वक्ते - प्रभाकर देसाई, पराग घोंगे
छापाकाटा पाहिलं
"छापाकाटा" पाहिलं.
मेघनानं प्रयोगाबद्दल म्हटलय :-
एकटेपणातून येणारी असुरक्षितता, अगतिकता, एकमेकींना घट्ट पकडून ठेवू पाहणं, त्याच वेळी सुटायसाठी धडपडणं, लहान गावात / जुन्या घरात / कर्तृत्वाला वाव नसलेल्या अवकाशात घुसमटत राहणं, परिणामी एकमेकींना ओरबाडणं... हे सगळं आहे. नि तरीही एकमेकींबद्दल कर्तव्याचा नि प्रेमाचा धागाही शिल्लक आहे. इथे ही गोष्ट आई-मुलीची आहे. पण ती कुठल्याही दोन व्यक्तींमधल्या नात्याची असू शकतेच...
हे सगळं रीमा आणि मुक्ता बारीक जागांतून भरत राहतात. (त्यांच्या अॅक्टिंगबद्दल काय बोलावे? त्याबद्दल एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. केवळ तेवढ्यासाठी मी नाटक पुन्हा पाहणार आहे.) श्वास घ्यायला जागाही न देता.
पण म्हणून नाटक चोख दोषरहित आहे असं अजिबात नाही. आईची व्यक्तिरेखा चक्क काळीकुट्ट वाटते.
ह्याच्याशी तंतोतंत सहमत आहे.
शेवटी आई जो निर्णय घेते, तो घेईपर्यंतचा तिचा असा काही प्रवास असेल की नाही? की केवळ लेखकाला वाटलं, आता टेन्शन बास, नि आईला शहाणपण आलं? तसंच मुलीचंही. मेलेल्या बापाशी या मुलीची इतकी घट्ट बांधीलकी आहे, हे अगदी शेवटी शेवटी मुलगी सांगेस्तोवर कुठेच दिसत नाही.
हे आत्ता, नाटक पाहिल्यावर तीन चार तासांनी ध्यानात येतय, मलाही हेच वाटत्य.
नाटक पाहताना इतका गुंगून गेलो होतो, की हे काही डोक्यात आलं नाही. त्यातही, त्या आईचा प्रवास का व कसा झाला हे. वडिलांना मुलगी घट्ट का बांधली आहे, हे तेव्हाही वाटलच होतं.
इतकं काही गंभीर पाहणं सध्या टाळत असतो; फार त्रास होतो म्हणून.
त्यात ह्या धर्तीवरच्या प्रत्यक्ष काही केसेस जवळून पाहिल्या आहेत.
अजूनच त्रास झाला सगळं आठवून. तस्मात, प्रयोग चाम्गला असला, तरी पुन्हा जाउन स्वतःला त्रास करुन घेणार नाही.
.
.
ऋषीकेशच्या म्हणण्यातील खालील भाग पटला नाही :-
मुक्ता बर्वेने मात्र अपेक्षाभंग केला. अडखळणारी व तोंडातल्या तोंडात केलेली संवादफेक, कधी जास्तच लाऊड अभिनय तर कधी पडेल अभिनय. किमान रिमापुढे आपण उभे आहोत हे समजून तिने स्वतःला बरेच चँलेंज करायला हवे आहे.
मुळात मुक्ता बर्वेनं रंगवलेलं पात्र आहे मैत्रेयी. त्यास काही विशिष्ट लकब किम्वा रिमा लागूंच्या भूमिकेइतकी अधिक खोली संहितेतच नाही.
रिमा लागूंनी विशेष भूमिका केली आहे हे जाणवतं ; कारण त्यांनी घेतलेलं बरिंग त्या चोख वठवतात.
मुक्ताच्या रोलला मुळात असलं काही बेरिंग नाहिच; ते वेगळं वठवलेलं असं पात्र जाणवणार नाही.
तरीही मुक्ताचं काम आवडलं. विशेषतः आशिष कुलकर्णीसोबतच्या प्रस्म्गातलं. त्यातही त्या दोघांचा एकत्रित जो पहिला प्रसंग आहे, त्यातलं.
"गोलमाल " चित्र्पटात अशीच सरळ साध्या माणसाची भूमिका अमोल पालेकरांनी केलीये. त्यात त्यांनी काही अभिनय केलाच नाही असं आपण म्हणतो का ? नाही ना? अगदि सरळ साधा असाच अमोल पालेकर त्यात वाटतो; आणि हेच अमोल पालेकराचं यश आहे.
तीच गोश्ट अभय देओल विविध भूमिका करतो तेव्हा.
अभय देओल खूप काही मुद्राभिनय वगैरे करत नाही.पण भूमिकेत शिरलेला असतो, भूमिका भिनलेली असते. त्यानुसार लागतात, तेवढे माफक एक्स्प्रेशन्स तो देतो; मुद्दाम वेगळ्म असं काहिच नाही. खर्जातला आवाज, मोथ्ठे डोळे, हेल काढणं वगैरे वगरिए काहिच नाही.
मला ह्यासाठी नेमकी संज्ञा ठाउक नाही, पण अभिनय करण्याची ही सुद्धा एक पद्धती असावी.
अनंत नाग हे तुलनेनं आपल्याकडे कमी परिचित नाव असावं. पण अनंत नाग ह्यांनी "मालगुडी डेज्" मध्ये कित्येक एपिसोड्समध्ये प्रमुख भूमिका केली आहे. त्यांच्या त्या भूमिकांबाबतही हेच म्हणता येइल. फार काही वेगळं ते करताहेत असं जाणवतं नाही. हे त्यांच्या नैसर्गिकतेचं मला यश वाटतं. मुक्ताचं ह्या नाटकातील कामही ह्याच धर्तीवर जातं असं मला म्हणायचं आहे.
अडचण हीच मी एका फारच सर्वसाधारण दर्शकाच्या भूमिकेतून पहात असतो. जाणकार म्हणून नाही.
त्यामुळे कैक गोष्टी क्लिक होत नाहित्,जाणवत नाहित. कैक गोष्टी मागाहून जाणवतात.
उदा :- ह्या नाटकाबद्दल मेघनाचं मत, नाटक पाहून झाल्यावर तीनेक तासांनी विचार करताना पटलं.
इन्व्हेस्टमेंट पाहताना फार काही वाईट वाटला नव्हता. पण तेच त्याचं चिंजंनी केलेलं परिक्षण केल्यावर संपूर्ण सिनेमा पुन्हा आठवून पाहिला.
त्यांनी दाखवलेल्या ढळढळित अशा चुका मग मला मागाहून जाणवल्या.
असो.
What Dreams May Come
अमुक यांनी या सिनेमाची शिफारस केली होती. (त्यांना धन्यवाद!) सिनेमा आवडला. सिनेमातील संकल्पना रोचक आहेत, पण त्या नीट कळण्याकरता बहुतेक अजून एक दोन वेळा तरी पहावा लागेल. (मॅट्रिक्स सिनेमा असाच दरवेळेला पाहताना थोडा अधिक उमगतो.) सुरूवातीचे 'स्वर्गातले' सीन्स फार भारी आहेत.
कम्बख्त मुकम्मल कलकल !!
काही फिल्मी आणि काही रोमेंटिक आयडीयाज घेऊन एका फेस्टिव्हलमध्ये कव्वालीचा फुक्कट कार्यक्रम प्रथमच अनुभवला .
एका विस्तीर्ण पटांगणात स्टेज आणि व्हीआयपीसाठी मुबलक जागा ठेवून मागे आमच्यासाठी उंच सखल मैदानात
खच्चून खुर्च्या मांडलेल्या होत्या .खुर्चीवर बसले कि खड्ड्यात पडल्यासारखे होऊन फक्त समोरची रेमी डोकी दिसत होती .
बाजूला स्क्रीन वगैरेच्या सोयी करायला आयोजक सोयीस्कर विसरले होते . त्यामुळे स्टेजवरचे नाट्य जर काही झाले असेल तर
त्याची गंधवार्ता आम्हाला नव्हती .
मुनव्वर मासूम( मासूम ,वा क्या बात है !)आणि साबरी ब्रदर्स अश्या दोन पार्ट्या असल्याने जंगी मुकाबला असेल अशी अपेक्षा
होती .पण टांss य टांssय फिस्स ..........सातच्या कार्यक्रमाचे ऑडिओ टेस्टिंग पावणे आठपर्यंत सुरु होते . साडेआठला दुसरी
पार्टी आली तिने नऊवाजेपर्यंत ऑडिओ तपासला . दहा वाजेपर्यंत बाहेर कार्यक्रमाची मुभा असल्याने कव्वाल्याऐवजी ऑडिओ
टेस्टिंग हा मेन आयटम पदरी पडला .
खालिस उर्दू मध्ये पहिल्या कव्वाल मुनव्वर मासूमने जी काही एके ४७ चालवली त्याने आमचे मुडदे बशिवले.
हाय तौबा !!आमच्या खिदमतीत कम्बख्त मुकम्मल कलकल सुरु झाली . कव्वाल गात सुरेल होता आणि साथसांगत झकास
होती . मग त्याने सगळ्यांचे आवडते दमा दम मस्त कलंदर म्हटले अन एक हिंदी शब्दांची रेलचेल असणारी कव्वाली म्हटली .
ती कळल्याने जरा एन्जॉय केली .नंतर साबरी ब्रदर्स म्हणून फिल्मी कव्वाल आले .त्यांचे भसाडे आवाज आणि आजूबाजूचा वाढता
स्पिरीटेड हिरवा माहोल विथ दरवळू लागलेला देशी ठर्रा परिमळ पाहून आम्ही दोघींनी तिथून काढता पाय घेतला .
टीप : पेपरात वाचलेले एका उर्दू कवीचे अफलातून नाव : पदमश्री बेकल उत्साही .... है न लाजवाब ?? खुदाहाफीज !
खिक --- अखियों के झरोके से
"अखोयों के झरोके से ..." हे अप्रतिम गाणं माझं आवडतं. सुरेख गोडवा, निखळ, निरलस प्रीती,आपुलकी म्हणजे काय ह्याची प्रचिती घ्यायची असली तर हे गाण्म ऐकावं. आज प्रथमच लक्षपूर्वक पाहिलं .
शृंगारिक वातावरण, अलगद अल्वार हवेत हिरवळीवर पडून नायक नायिका गाणी म्हणताहेत असा सीन.
इथपर्यंत ठीक. पण ३ मिनिट ४५ सेकंद ते ३ मिनिट ५५ सेकंद ह्या वेळात काय दिसतं ?
नायिका ख्रिश्चन स्मशानभूमीत एका कबरीला काहीतरी वाअहते आहे, नायक येतो, ती नायकासाठी स्मशानभूमीत "दुवा मांगते " आहे.
अरे पण नाय्क जिवंत आहे ना!
इतक्या छान वातावरणात एकदम "म्रुत्यू अटळ सत्य " वगैरे वगैरे डोक्यात आलं, माझं मलाच हसायला आलं.
दुवा:-
टीव्ही
फार्फार दिवसांनी; जवळपास तीन्-चार महिन्यांनंतर प्रथमच टीव्ही पाहिला.
समोर भरपूर जाहिरात्/हवा केली गेलेली मुलाखत लागली होती.
राहुल गांधी ह्याची मुलाखत अर्नब गोस्वामी घेत होता.
मुलाखती स्क्रिप्टेड असतात, ह्या माझ्या समजाला तडा गेला.
राहुल गांधी ह्याची झालेली केविलवाणी अवस्था पाहवली नाही.
बावचळणं, चाचरत ,तोतरं बोलणं , गोंधळणं हे सगळं त्याच्या ह्या इनमिन तासाभराच्या मुलाखतीत दिसलं.
अर्नब पुनः पुनः "राहुल्,तुम्ही व काँग्रेसी मोदिंना वाईट म्हणता, पण का म्हणता ? कोर्टानं तर क्लीन चीट दिली आहे"
वगैरे हल्ली जोर्रात केला जाणारा प्रश्न करत होता.
त्यानंतर थेट उलट हल्ला करायची स्म्धी सोडून राहुल गडबडला.
"मोदी वाईट आहेत, कारण ते वाईट आहेत" ह्या स्टाइलचं तो बोलत होता.
"चला, फक्त कोर्टात सिद्ध झालेल्या गोश्टींबद्दल बोलू, चला जाहीर भूमिकांपुरतच बोलू;" असा हल्ली लोकप्रिय खेळ खेलला जातो.
त्या साइडला अर्नब चालला होता. त्यालाही अधिक प्रभावी उत्तर देता आलं असतं की !
हे दोन मुद्दे घ्यायचे समोर :-
१. कोर्टानं मोदिंना क्लीन चीट दिली, पण माया कोदनानी व त्यांच्याच इतर सहकार्यांना शिक्षा दिली आहे.
सदर व्यक्ती गुजरात सरकारात मंत्री होत्या. मोदिंच्या जवळच्या आहेत. दंगली झाल्यानंतरही मोदिंच्या मंत्रीमंडळात त्यांना घेण्यात आलं.
ह्याचा अर्थ सरळ आहे. अगदि कोर्टानंही मोदि ह्या व्यक्तीला दोषी ठरवलं नसलं तरी मोदि सरकारवर ठपका ठेवलाच आहे; असाच अप्रत्यक्ष अर्थ आहे.
२. every action has reaction स्टाइलचं काहीतरी मोदी बोलल्याचं मिडियानं तेव्हा जगाला सांगितलं होतं.
हे विधानही मोदिम्ची भूमिका स्पष्ट करत नाही का?
.
.
.
वरील दोनही मुद्द्यांत अर्थातच फट आहे, त्यातही समोरुन अधिक प्रश्न येतीलच. दोनही मुद्दे १००% करेक्ट आहेत, असे नाही.
पण निदान त्यानं काहीएक स्पष्ट भूमिका दिसली असती.
निदान पाहणारे काही दर्शक तरी भुलण्याची शक्यता होती. निदान अशी केविलवाणी अवस्था झाली नसती.
इतके सरळ साधे मुद्दे ह्या माणसाच्या लक्षात कसे येत नाहित हेच समजत नाही.
राजकारणी नीच, हलकट, हरामखोर असतात. म्हणजेच पर्यायाने ते मूर्ख नसतात.धूर्त, लबाड, चाम्गले मुरलेले असतात.
हा इतर आम पब्लिक सारखाच माझा समज होता, तो चुकीचा आहे असे आता वाटते.
मी राहुल गांधीच्या जागी असतो, तर मोदिम्वर ह्या दोन मुद्द्यांवरून आरामाअत हल्ला चढवू शकलो असतो.
अप्रायझल मध्ये एखाद्या दुर्बल techie ची म्यानेजर वाजवत असला, आणि ती पब्लिक टेलिकास्ट झाली, तर जसं वाटेल तसं वाटलं.
मी ही ही मुलाखत पाहिली. जी
मी ही ही मुलाखत पाहिली. जी बाब तुम्हाला खटकली तीच मला रोचक वाटली (आता यात काय नवीन नै? ;) )
राहुल गांधी यांनी अतिशय चतुरपणे ही लढाई मोदी विरूद्ध गांधी अशी होऊ दिली नाही. मोदी या व्यक्तीविरूद्ध - प्रसंगी स्वतःच्या संभाव्य दुबळ्या होत जाणार्या इमेजला लक्षात घेऊनही - कोणतेही वक्तव्य टाळून ही मुद्द्यांची लढाई आहे दोन व्यक्तीची नाही हे त्यांनी अधोरेखीत केले जे एक खेळी म्हणून अत्यंत रोचक आहे.
तुम्ही म्हणता ती उत्तरे जनतेतील प्रत्येकाला (अगदी तुम्हाला-मलाही) माहिती आहेत. तीच पुन्हा गांधींनी देऊन टिव्हीवरील अन्य वाचाळवीरांपेक्षा अधिक ते काही देऊ शकले असते का साशंक आहे. या विषयावर इतके चर्वण झाले आहे की काँग्रेसची भुमिका पुरेशी स्पष्ट आहे. शिवाय हा व्यूह इतका भेदक आहे की त्यात गांधी शिरले असते तर अनेक आघाड्यांवर त्यांना पळ काढावा लागला असता. आर्णब ने तर नक्की फ्लोचार्ट बनवला असेल की प्रत्येक प्रश्नाच्या हो आणि नाही या दोन्ही उत्तरांवर राहुलला कसे कात्रीत पकडायचे ते. पण हा डाव राहुलने सुरूच होऊ दिला नाही.
राजकारणी नीच, हलकट, हरामखोर असतात. म्हणजेच पर्यायाने ते मूर्ख नसतात.धूर्त, लबाड, चाम्गले मुरलेले असतात. हा इतर आम पब्लिक सारखाच माझा समज होता, तो चुकीचा आहे असे आता वाटते.
बघा राहुलने आपली इमेज बदलली की नाही. आतापर्यंट धुर्त, कपटी वगैरे इमेजचे रुपांतर आता 'बिच्चारा' राहुल झाला आहेच. कणव ही धुर्तपणापेक्षा मतांच्या दृष्टीने वरची लेव्हल आहे. ;)
मधे
मधे एकदा तर राहुलशेट त्यांच्या सिग्नेचर शैलीत "what if i ask you the same question" करु लागले, तेव्हा अर्णब म्हणाला :-
"this is not your speech. I know; we wll know major points you focus, rather questions you raise at your speech.
this is an interview and I am here to ask the question(you need not retaliate with the question ;) )"
.
.
राहुल आख्ख्या मुलाखतीत निदान पन्नास वेळेस तरी i want to change the system , (हात वरती नेत)not from here,not from top, but from bottom(हात खाली नेत)
असं म्हणत होता. त्याला काही विचारलं तरी i want to change हेच आणि एवढच ?
==))
==))
शिवाय हा व्यूह इतका भेदक आहे की त्यात गांधी शिरले असते तर अनेक आघाड्यांवर त्यांना पळ काढावा लागला असता
प्रमोद महाजन, चिंदंबरम ,अगदि सुब्रमण्यम स्वामीही लीलया असले व्यूह पेलतात.
असले बाउन्सर टाकणं हे पत्रकारांचं कामच आहे.
त्याला व्यूह वगैरे म्हणणं फारच वाटतं.
चिदु काय किंवा स्वामी कधीच परस्परविरोधी उलट सुलट विधानं करत नाहित असं नाही.
पण जेव्हा जे बोलतात, तेव्हा ते पेलून दाखवतात.
राहुल ऐवजी ही मंडळी असती, तर ह्यांची अशीच प्रतिक्रिया असली असती का, ह्याचा विचार करुन पहा, मी काय म्हणतोय त्याचा अंदाज येइल.
प्रमोद महाजन, चिंदंबरम ,अगदि
प्रमोद महाजन, चिंदंबरम ,अगदि सुब्रमण्यम स्वामीही लीलया असले व्यूह पेलतात.
अर्थात! ते त्यांचेच काम आहे (आठवा काँग्रेस कल्चर). (एकाधिकारशाही असलेल्या) काँग्रेसमध्ये राहुल इतक्या स्पेसिफिक्सच्या (अर्थात त्याच्या दृष्टीने 'खालच्या') पातळीवर उतरणार कसा? त्याने म्हटलेही की मला मुख्य प्रश्नावर चर्चा करायची आहे. (तिथे त्याला गोल गोल बोलता येईल ;) ). लहानसहान उदाहरणांवर बोलण्यात मला रस नाही. (किंवा तिथे मी अडकण्याची शक्यता आहे). असल्या मुद्द्यांवर भांडायला त्याचे पित्ते म्हणा किंवा निष्ठावान कार्यकर्ते म्हणा पुरेसे आहेत वगैरे वगैरे.
राहुल ऐवजी ही मंडळी असती, तर ह्यांची अशीच प्रतिक्रिया असली असती का, ह्याचा विचार करुन पहा, मी काय म्हणतोय त्याचा अंदाज येइल.
अंदाज आला आहे. पण फॅक्ट इज की तिथे इतर कोणी नव्हते.
इतरांना राहुलच्या वतीने/बाजुने भांडणे चालुन जाते. खुद्द राहुल तसे भांडला तर फाईट सरळ मोदी विरूद्ध राहुल होते. आणि तशी झाल्यास राहुल स्पर्धेत उभाच राहु शकत नाही हे त्याला पक्के ठाऊक आहे.
स्वादनादाची उधळण
'Schwartz Flavour Shots' साठी बनविलेली ‘Unleash Flavour’ ही जाहिरात पाहिली -
.
.
स्वादानुसार नाद आणि नादानुसार उधळण करण्याची तांत्रिक कसरत कशी साध्य केली ते पुढील चित्रफितीत -
.
The making of 'The Sound of Taste' from Grey London on Vimeo.
.
पूर्ण जाहिरातीविषयी माहिती इथे वाचायला मिळेल.
पुण्यात कृष्णा रेड्डी रेट्रोस्पेक्टिव्ह

प्रिंटमेकिंग तंत्रज्ञानातल्या प्रतिमेला भारतीय कलारसिकांच्या मनात चित्रकला किंवा शिल्पकलेइतकी प्रतिष्ठा नसते. त्यामुळे कृष्णा रेड्डी हे भारतीय कलाकार एक जागतिक किर्तीचे प्रिंटमेकर असूनही भारतात ते तितकेसे प्रसिद्ध नाहीत. जे.जे आणि नंतर शांतिनिकेतनमध्ये शिक्षण, इंग्लंडमध्ये हेन्री मूरसारख्या जगविख्यात कलाकाराकडे शिल्पकलेचे धडे, मग फ्रान्समध्ये ब्रांकुसीसारख्या जगविख्यात कलाकाराकडे धडे आणि अखेर प्रिंटमेकिंगकडे झालेला त्यांचा प्रवास ही एक अनोखी कहाणी आहे. द्रवपदार्थांच्या प्रवाहीपणाचा किंवा दाटपणाचा (व्हिस्कॉसिटी) वापर करून बहुरंगी प्रिंट्स एकाच प्लेट किंवा छापातून काढण्याच्या तंत्रात त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. मुंबई आणि इतर काही शहरांनंतर आता पुण्यात त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरलेलं आहे. पुण्यात असाल तर नक्की भेट द्या.
स्थळ : भारती विद्यापीठाचं कला महाविद्यालय (कॉलेज ऑफ फाइन आर्टस), भारती विद्यापीठ आवार, धनकवडी
वेळ : ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, सकाळी १० ते संध्याकाळी ७:३०
अधिक माहितीसाठी मुंबईत पूर्वी भरलेल्या प्रदर्शनाविषयीची बातमी.
"पार"
गौतम घोष दिग्दर्शित १९८४ सालचा "पार".
प्रमुख भूमिकेमधे नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी. बिहारच्या एका खेड्यातला शेतमजूर आणि त्याची पत्नी.
शेतमजूरांना न्याय्य मोबदला मिळवण्यासंदर्भात त्या भागातल्या ठेकेदाराशी झालेल्या संघर्षात त्याच्या घरादाराला आग लावण्यात येते. त्या संदर्भातले गावातले राजकीय नाट्य. नसीर-शबाना परागंदा होऊन कलकत्त्याला येतात. तिथेही उदरनिर्वाह नीट न होऊ शकल्याने गावाकडे परतायचे ठरते. परतण्याकरता लागणारे पैसेही बरोबर नाहीत. अशा वेळी नदीच्या एका काठावरून दुसर्या काठावर डुकरांच्या फौजेला पोहत पोचविणे - त्यांना "पार" करणे - असा सौदा ठरतो. नसीर आणि त्याची गर्भवती बायको शबाना हे काम करतात. पोचल्यानंतर हातात दमड्या पडल्यानंतर नसीर रात्री आपल्या बायकोच्या पोटाला कान लावून बाळाचा आवाज ऐकतो. चित्रपट संपतो.
चित्रपटाबद्दल लहानपणापासून ऐकलेले होते. संपूर्ण सिनेमा यूट्युबवर आहे असं दिसलं आणि पाहून घेतला.
चित्रपटाचा उत्कर्षबिंदू म्हणजे तो नदीत डुकरांबरोबर "पार" होण्याचा प्रसंग. हा प्रसंग वास्तवदर्शी शैलीत चित्रित झालेला आहे. मानवी अस्तित्वाची लढाई, त्यातला जीवटपणा, शेवटी नव्या जीवाच्या आगमनाचे सूचन - हा भाग परिणामकारकरीत्या साधलेला आहे. नसीरुद्दीन आणि शबाना यांचे अनेक चित्रपट गाजले. हा त्या मालिकेतला एक. आणि त्यातला हा प्रसंग संस्मरणीय खरा.
मात्र हा प्रसंग वगळता सिनेमाचे छायालेखन, सिनेमाची वापरलेली प्रिंट (की दोन्ही ? माहिती नाही) फारच सुमार आहे. या शेवटच्या प्रसंगाला पोचेस्तोवर जे पहायला लागलं ते कंटाळवाणं वाटलं - मग त्यात उत्पल दत्त, अनिल चतर्जी , ओम पुरी, मोहन आगाशे यांच्यासारखे मुरलेले लोक जरी असले तरी. मजूरांच्या संदर्भातला संघर्ष फारच ढोबळ वाटला. या सिनेमाची प्रिंट इतकी भयाण का असावी हे मला न सुटलेलं कोडं आहे. कुणी जाणकार प्रकाश टाकतील तर बरे.
युट्यूब लिंक : http://www.youtube.com/watch?v=MOs1ReVcDA4
"जिवट"
मी वापरलेला शब्द "जीवट" असा नसून "जिवट" असा असायला हवा होता.
जिवट :
WORD | Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे
वि. १ रगदार ; पाणीदार ; जोरदार ; दमदार ; काटक ( मनुष्य , जनावर ). २ योग्य ; लायक ; समर्थ ; ऐपत , मालमत्ता वगैरे असणारा . ३ बळकट ; दृढ ; कणखर . असा पुरुष नित ती एक भोगिल जिवट असेल रंडी । - प्रला १८८ . ४ नफ्याचा ; फायदेशीर ; उत्पन्नाचा ( धंदा , उद्योग ). [ सं . जीव + ट प्रत्यय ]
( ठळक टाईप माझा ;-) )
संदर्भ : http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5…
Revolutionary roads
काही दिवसांपूर्वी Sam Mendes चा Revolutionary roads पाहीला.
आजवरचा माझ्या सर्वात जास्त अंगावर येणारा(तेंडूलकरांचा निशांत, जी. ए. ची स्वामी ही कथा फार कधी अंगावर आली नाही), प्रचंड फ्रस्टेटींग सिनेमा. रात्री झोप येईना झाली शेवटी झोपण्यासाठी अंदाज अपना अपना पाहून उतारा घ्यावा लागला. जॉन नावाचा एक वेडसर पण थोर पात्र सिनेमा मध्ये आहे.
सिनेमा बघायचा असल्यास सिनेमा बद्दल वाचू नये .
दिल के मरीज Revolutionary roads ना देखे.
२००१ सालचा 'दास
२००१ सालचा 'दास एक्स्प्रिमेंट' पाहिला.
एका विशिष्ट परिस्थितीत साध्या म्हणवल्या गेलेल्या माणसांमधलं क्रौर्य कसं जागं होतं, त्याची गोष्ट आहे. स्टॅनफोर्ड प्रिझन प्रयोगाचा गोष्टीला आधार आहे, पण सिनेमा प्रयोगाशी फारच रंगीत फारकत घेतो, असे आरोपही त्यावर झाले आहेत.
मला सिनेमा आवडला. लॉर्ड ऑफ दी फ्लाईजची आठवण येणं अपरिहार्य होतं. दोन्ही ठिकाणी जवळपास एकाच कामासाठी - सदसद्विवेकबुद्धीचं प्रतिनिधित्व - वापरलेला चष्मा तर पुस्तकाला केलेला चक्क सॅल्यूट असावा असंही वाटलं.
एका प्रयोगात भाग घेतलेल्या अर्ध्या माणसांना कैद्यांची, तर अर्ध्यांना गणवेशातल्या पहारेकर्यांची भूमिका दिली जाते. केवळ एका आठवड्याच्या अवधीत या सर्वसाधारण माणसांत कमालीचा बदल होत जातो. पहारेकर्यांमधली सत्ता गाजवण्याची नि त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती उफाळून येते; तर कैद्यांमधे भीतीचं साम्राज्य पसरतं. दोन्ही बाजूंना अपवाद असतात, पण त्यातून शांतता प्रस्थापित होत नाही. उलट आगीत तेलच ओतलं जातं. प्रयोगकर्त्या संशोधकांच्याही जिवावर बेतण्यापर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाते...
एकदा तरी बघावा, असा सिनेमा होता.
सिनेमा बघताना सोबतच्या लोकांना तणाव न झेपून त्यांनी केलेल्या 'फारच न्यूडिटी आहे ब्वॉ यात'प्रकारच्या केलेल्या सोवळ्या कमेंट्स ऐकून डोकं तापलं - हा एक अवांतर तपशील.
रोच्क आहे. कुठे पाहिला? एका
रोच्क आहे. कुठे पाहिला?
एका प्रयोगात भाग घेतलेल्या अर्ध्या माणसांना कैद्यांची, तर अर्ध्यांना गणवेशातल्या पहारेकर्यांची भूमिका दिली जाते. केवळ एका आठवड्याच्या अवधीत या सर्वसाधारण माणसांत कमालीचा बदल होत जातो. पहारेकर्यांमधली सत्ता गाजवण्याची नि त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती उफाळून येते
"बिग बॉस"ची आठवण थोपवू शकलो नाही :)
बाँबे टॉकीज चे ३ भाग पाहिले.
बाँबे टॉकीज चे ३ भाग पाहिले. दिबाकरचा बर्यापैकी आवडला. अनुरागचा बर्यापैकी नाही आवडला. करणचा त्याच्यामानाने बराचबरा झालाय, पण भारतीय सिनेमाची १००वर्ष असं काही नाही त्यात :-/ त्यामुळे 'ही कथा काय करतेय इथे?' वाटल. अजीब दासता है ये आणि लग जा गले ही गाणी मस्त वाटली ऐकायला. अर्ध्या तासाच्या एकाही कथेने इंप्रेस मात्र केल नाही त्यापेक्षा रामुचा डरना मना है छान होता :-D.
thank you for smoking
thank you for smoking पाहिला.
फक्कड जमून आलाय.
मिश्किल शैलीत चितारलेला आहे.
त्यातील प्रमुख पात्र नील ह्याचीच आजवर जालीय नक्कल पहात होतो.
आंतरजालवर काही अगम्य तर्कटे मांडून काही विशिष्ट लोकांना उपाशी मारणे, जाळून मारणे वगैरे कसे आवश्यक आहे हे "तर्कशुद्ध" पद्धतीने पटवून दिले जात होते.
अर्थात, चित्रपटत असे काही पटवले जात नाही. पण एकूणात तर्क तर्क करत मूळ मानवताच संपववायचा घाट घालण्याचा जो प्रकार दाखवलाय तो मस्त आहे.
सामान्य माणसे रोजचं आपलं आयुष्य जगतात, बेतास बात, कामला लगेल,पुरेल तितके तर्क वापरतात.
त्यांच्यावर एकदम अशा अजब लॉजिकचा मारा केला की ते बिचारे चितपट होउन जातात, हे एक दोन प्रसंगात मस्त दाखवलय.
अर्थात आख्ख्या पिच्चरमध्ये हे आणि एवढेच आहे असे नाही. हे फक्त मला आवडलेले एक दोन प्रसंङ आहेत.
ह्याशिवाय बरच काही आहे. (gun tobacco alcohol ह्या सर्वाची लॉबी, त्यांची मिटिंग हे प्रकरणही भन्नाट.)
अर्थात ह्या धाटणीचं मी प्रथमच पहात असल्यानं मला आवडलं असावं.
अशी मांडणी हा तिथे प्रचलित आणि स्थापित प्याटर्न आहे, असे काही जणांकडून कळले.
बिफोर मिडनाईट.
जी पुस्तके किंवा जे सिनेमे काही भागांत येतात त्यातले पहिले भाग सोडून मिळेल तो भाग वाचण्याचा किंवा पहाण्याचा एक विचित्र रिवाज आमच्याकडे पडला आहे. त्यामुळेच 'बिफोर सनराईज', बिफोर सनसेट' सोडून आम्ही (सपतीक(हो तेच ते...सप्त्नीक सारखे!)) डायरेक्ट 'बिफोर मिडनाईट' पाहिला. ज्याच्या अभिरुचीवर विश्वास आहे अशा एका मित्राकडून अलिकडेच या सिनेमाबद्दल ऐकल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती आणि हा सिनेमा नेटफ्लिक्सवर दिसला म्हणून पाहून टाकला.
हा सिनेमा ज्या इंडी जॉनरॉतला आहे त्यातल्या बर्याच सिनेमांप्रमाणे संवेदनाशील, उत्तम पटकथा आणि ज्यात काहीच घडतं नाही तरी जो सिनेमा एखाद्या विषयावर जसे नेमके भाष्य करतो त्याप्रमाणे हाही सिनेमा आहे. खरं तर या सिनेमाची कथा 'रोमँटिक कॉमेडी' सदरात मोडण्यासारखी आहे पण या सिनेमाला तसे संबोधणे त्याच्यावर खरोखरीच अन्यायकारक आहे. यात संवेदनशील प्रेमकथा आहे, किंचित नर्म विनोद आहे आणि अपेक्षित सुखान्तही आहे पण त्याबरोबर यात अतिशय मार्मिक संवाद आहेत, नात्यांचा खोलवर केलेला विचार आहे आणि एकूणच बरीच अधिक गंमत आहे. यातली जेसी (इथन हॉक) आणि सिलीन (ज्यूली डेप्ली) ही पात्रे लोभस आहेत. ही पात्रे, बोलत (अखंड बोलत), भांडत, विनोद करत, एकमेकांबरोबर प्रेम करत रहातात एवढीच गोष्ट पण ही पात्रे तुम्हा-आम्हा सर्वांसारखीच अपूर्ण (इम्पर्फेक्ट) आहेत, एकमेकांशी बोलताना आणि भांडताना ही पात्रे आपल्या विसंगती आणि अपुरेपणा कधी कुरवाळतात तर कधी विनोद करून त्याचा स्विकार करतात. कधी आपल्या जोडीदारातला अपुरेपणा आणि विसंगती कुरवाळतात तर कधी त्याला त्याचा स्विकार करायला लावतात. ही प्रेमकथा त्या अर्थाने एकमेकांवर प्रेम करणार्या सर्वच जोडप्यांची आहे, हे नातं गोग्गोड नाही पण लोभस आहे, बदलतं आहे, प्रवाही आहे आणि प्रत्येक उलटणार्या क्षणाबरोबर अधिकाधिक समृद्ध आणि खोल बनणारं आहे. अशी सशक्त पात्रे रोमँटिक कॉमेडीत क्वचितच दिसतात आणि म्हणूनच हा सिनेमा वेगळा ठरतो.
सिनेमाची पटकथा रिचर्ड लिंक्लेटर बरोबर इथन हॉक आणि ज्यूली डेप्ली यांनी लिहिली आहेत. ज्युली आणि इथनची केमिस्ट्री पहाता हे दोघे खरे जोडपे नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. सिनेमात एकच ग्राफिक सीन आहे पण काही जणांना तो 'जरा जास्तच' वाटू शकेल याची पूर्वसूचना. पण त्या दृष्यातही एकमेकांबरोबर अतिशय सुरक्षित असलेले आणि खूप जुन्या नात्यातले हे खरे जोडपेच आहे असे वाटून जाते. ते एकमेकांशी बोलत असताना जणू एकमेकांच्या मनातली वाक्ये पूर्ण करताहेत असेच वाटून जाते, कदाचित त्या दोघांनी एकत्र पटकथा लिहिली असल्याने ते भूमिकेशी इतके एकरूप झाले असावेत. सिनेमातला सुरुवातीचा कारमधला एक सीन जवळजवळ दहा-पंधरा मिनिटे (विनाकट) सुरु रहातो आणि तरी त्यात इथन आणि ज्युली सहजपणे अखंड बोलत रहातात. ज्यांना चित्रपटात अतिसंवाद आवडत नाहीत त्यांनी या सिनेमाच्या वाटेला जाऊ नये कारण पूर्ण सिनेमा अखंड संभाषणावरच उभारलेला आहे, मला सिनेमा पाहिल्यावर वूडी अॅलनच्या काही सिनेमांची आठवण झाली, त्यातला शब्दबंबाळपणा जसा त्रासदायक न होता आवडतो तसाच यातलाही वाटला. सिनेमा मनापासून आवडला आता मिळेल त्या क्रमाने 'बिफोर सनराईज' आणि 'बिफोर सनसेट' पहाणार आहे.
मिस्टर अँड मिसेस अय्यर
या आधीही खुपदा पहिलेला मिस्टर अँड मिसेस अय्यर पुन्हा एकदा पहिला.
वेगळं कथानक आणि उत्तमरित्या फिरलेला कॅमेरा, वरतून कोंकणा आणि राहुल यांचे सकस अभिनय्...मजा आली. दोन मनं जुळायला खूप दीर्घ सहवास मिळावा किंवा आवडी निवडी जुळाव्यात असंच काही नाही..माणसातला माणूस माणसाला कळाला की झालं, या साध्या कल्पनेवर आधारलेला "मिस्टर अँड मिसेस अय्यर" दर वेळेस नवीन काहीतरी देऊन जातो असं वाटतं.
चारपाच दिवसांमागे 'पाँपेई' हा
चारपाच दिवसांमागे 'पाँपेई' हा पिच्चर पाहिला. रोमजवळचे पाँपेई शहर हे व्हेसूव्हिअस ज्वालामुखीने ग्रासून नष्ट करून टाकले, त्याच्या आधीचे कल्पनाचित्र उत्तम रंगवले आहे. ष्टंट इ. टिपिकल होते, मजा आली. जुल्मी, अत्याचारी, इ. रोमन साम्राज्य दाखवायचा शिरस्ता यानेही पाळला. आता फँड्री व लेगो मूव्ही पाहण्याचे लक्ष्य आहे.
शॅडो किल
अदूर गोपालकृष्णन यांची शॅडो किल हि २००२ मध्ये केलेली फिल्म एका फाशी देणाऱ्या माणसाच्या वेदनेला प्रभावशाली दृश्यमाध्यमातून अस्वस्थ करून सोडते .मनुष्यवधाचे पातक कोणाला लागणार , जो हुकुम देतो त्याला की तो अंमलात आणतो त्याला ?खुनी माणसाला फाशी देणे हा सुद्धा खुनच नसतो का ? असे चिरंतन प्रश्न नायकासोबत आपलाही मेंदू कुरतडू लागतात . व्यवस्थित तयारी करून फाशीची शिक्षा अमलात आणणे हे , कार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याना सुद्धा अंतर्बाह्य किती हादरवून टाकणारे असते ते जाणुन व्याकुळ झाले .
आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी एका निष्पाप जीवाला फाशी दिली म्हणून पश्चातापाने पोळत असलेला , दारूत आपले दुख्ख बुडवत असलेला म्हातारा नायक कलीयप्पन आपली भूमिका अक्षरशः जगला आहे . संथ लयीत चालणाऱ्या फिल्ममध्ये हिरव्यागार भाताशेतांचे ,टेकड्या आणि जलाशये यांचे डोळ्यांचे पारणे फ़ेडणारे अनुपम छायाचित्रण आहे . इलया राजा यांच संगीत फिल्मचा प्रभाव अधिक खोलवर गहिरा करतो .टेकडीच्या पार्श्वभूमीवर सुरेल बासरीवादनातून निर्माण होणारा प्रतिध्वनी रोमांचक आहे .
बघायला हवीच
बघायला हवी ही फिल्म. हे वर्णन वाचुन "डेड मॅन वॉकिंग (१९९५)" हा अत्यंत अंगावर येणारा चित्रपट आठवला. याच विषयाशी समांतर आहे नक्की बघा.
एकूणच मृत्यू ही कल्पनाच रोचक आहे. चारेक वर्षांपूर्वी 'मृत्यू' भोवती फिरणार्या चार चांगल्या चित्रपटांबद्दल मिसळपाववर इथे लिहिले होते त्याचीही आठवण झाली.
"लूपर"
२०१२ साली आलेला "लूपर" हा हॉलीवूडीय साय-फाय.
ट्रान्सफॉर्मर्स आणि मार्व्हलच्या या जमान्यात हॉलीवूडीय साय-फाय बघणं ही धोक्याची बाब बनलेली आहे. तसा हा सिनेमा फार बक्कळ पैसा कमवलेला नव्हे. काही ठिकाणी ओझरता उल्लेख आला म्हणून कुतुहल म्हणून मागवला नि पाहिला.
सिनेमा आवडला. उपरोक्त मारधाड-सुपरसीजीआय्-माचोपटांसारखा नाही. एकंदरीतच स्पेशल इफेक्ट्सचा पोर्नॉग्राफिक वापर नाही, कथासूत्राला आवश्यक अशा दोन तीन प्रसंगापुरताच.
---स्पॉईलर अलर्ट सुरुवात ----------
सिनेमा घडतो तो काळ साल २०४४. त्याहीपुढील भविष्यामधे टाईम ट्रॅव्हलचा शोध लागलेला आहे. शोध लागल्या लागल्या जरी ते बेकायदेशीर झालेले असले तरी गुन्हेगारी जगतातील लोक ज्यांचा खून करावयाचा त्यांना भूतकाळात पाठवायला त्याचा वापर करतात. २०४४ सालचे हे सुपारी घेऊन मारणारे लोक त्यांना क्षणार्धात मारतात. त्यांच्या मृतशरीरांची वासलात लावतात. काळाच्या पेक्षा पुढे नि मागे होत असलेल्या प्रवासांतील "जन्ममरणाच्या फेर्यां"तुन इतरांची "मुक्तता" करणारे ते मारेकरी "लूपर्स". अशांपैकी एका लूपरची ही कथा. जेव्हा या लूपरला भविष्यातल्या "स्वतः"लाच मारण्याची पाळी येते तेव्हा काय होते ? भविष्यातला "मी" वर्तमानातल्या "मी"च्या समोर येतो तेव्हा काय होते? कोण कुणाला संपवतो ? जन्ममरणांच्या या चक्रातून इतर गुंतलेल्या लोकांचा एकंदर विचार करतां हा लूपर मोक्याच्या क्षणी काय निर्णय घेतो? अशा स्वरूपाचे कथानक.
---स्पॉईलर अलर्ट शेवट ----------
मी वर म्हण्टल्याप्रमाणे, कथानकाच्या , संकल्पनेच्या उत्तम बांधणीमुळे हा चित्रपट शेवटपर्यंत मला पहावासा वाटत राहिला. किंबहुना अनेक गोष्टींचे धागे हे शेवटी एकत्र येत असल्याने काही काही न कळलेल्या गोष्टी पुन्हा पहाव्याशा वाटल्या म्हणून हा सिनेमा दोनदा पाहिला. कुठलाही सिनेमा दोनदा पहावा वाटणं यात माझ्यापुरते त्याचे यश सामावलेले आहे. मी तो इतरांनी पहायला नाही अशी शिफारस करेन.
जॅपनीज वाईफ
अपर्णा सेनचा राहुल बोस, रायमा सेन, चिगुसा ताकाकू आणि मौशमी चटर्जी अभिनीत 'द जॅपनीज वाईफ' पाहिला. मन भरेपर्यंत बंगालीचा गोड गडबडगुंडा ऐकायचं सुख मिळालं.
तोडकं मोडकं इंग्रजी बोलणारा आणि आपल्याला फ़र्डं इंग्रजी येत नाही याचा गंड असणारा बंगाली स्नेहमॉय चटर्जी आणि इंग्रजी जेमतेम येत असलेली जपानी मियागे यांच्यात तोडक्यामोडक्या इंग्रजीतून सुरू झालेली पत्रमैत्री गहिरी होत जाते आणि लग्नात बदलते. घरच्या जबाबदा-यांमुळे ना मियागे भारतात येऊ शकते, ना स्नेहमॊय जपानला जाऊ शकतो. त्यामुळे ते आपापल्या मायदेशात आपल्यापुरता लग्नविधी करून विवाहीत होतात. ते लग्नबंधन ते पत्रांमधून पाळतात. पुढे स्नेहमॉयच्या आयुष्यात विधवा संध्या आणि तिचा मुलगा पोलटू यांचं आगमन होतं आणि स्नेहमॉयच्या एरव्ही संथ असलेल्या जीवनात उलथापालथ व्हायला सुरूवात होते, आपल्याला संध्याबद्दल वाटणारा जिव्हाळा म्हणजे मियागेशी प्रतारणा अशा भावनेने स्नेहमॉयची कुतरओढ व्हायला लागते.
हा चित्रपट कुणाल बसूच्या द जॅपनीज वाईफ अँड अदर स्टोरीजवरमधल्या द जॅपनीज वाईफ या कथेवर आधारलेला आहे.
अवांतर- मला उपमन्यू चतर्जींच्या इंग्लिश ऑगस्टवर काढलेला राहुल बोसचा इंग्लिश ऑगस्ट पाहायचा आहे. कोणी पाहिला आहे का? कुठे मिळू शकेल?
बंगालीत ऑ हा उच्चार असतो.
बंगालीत ऑ हा उच्चार असतो. शब्दाच्या सुरुवातीस अ हा स्वर असला की बंगालीत त्याचा ऑ/ओ होतो कारण बंगालीत अ हा स्वरच नाही. ऑ व ओ ही दोन्ही रूपे अ ची आहेत. कधी कुठले होते याबद्दल सर्वसाधारण रूल असा की सुरुवातीला असेल तर ऑ/ओ नैतर ओ, यद्यपि अजून काही उपनियम इ. एका वंग जालमित्राने सांगितले होते ते विसरलो. ऑ हा स्वर शब्दाच्या सुरुवातीसच येतो असे दिसते, ओ मात्र कुठेही जाऊ शकतो.
अन चोलबे ना मध्ये चॉ न होता चो असाच उच्चार होतो.
"३:१० टू युमा"
आपले काही काही आवडते सिनेमे आपण अधूनमधून परत परत पहातो. २००७ साली आलेला "३:१० टू युमा" हा वेस्टर्नपट माझ्याकरता या विभागात येणारा आहे.
कथासूत्र देण्यांत विशेष हशील नाही. रसेल क्रो, क्रिश्चन बेल यांच्या मुख्य भूमिकांबरोबर बेन फोस्टर आणि पीटर फोंडा या दोघांच्याही भूमिका मला अतिशय आवडल्या आहेत.
चित्तथरारक प्रसंग, वेगाने घडणारं कथानक, गोळीबार हे सर्व वेस्टर्नपटांमधले घटक आहेतच. परंतु जिवंत व्यक्तिरेखा, चुरचुरीत संवाद, यांसारख्या गोष्टींमुळे चित्रपट "खा आणि विसरून जा" सारखा फास्ट-फूडयुक्त न बनता चिरस्मरणीय बनतो असं आपलं माझं मत.
अन्य कुणी हा पाहिला आहे का ?
'मालगुडी डेज'
'मालगुडी डेज' पुन्हा बघायला सुरूवात केली आहे. दूरदर्शनवर एकेकाळी पाहिलं होतं आणि तेव्हा ते आवडत असे. आता ते काहीच आठवत नव्हतं म्हणून सुरूवात केली. "स्वामी आणि मित्र" याचा एक भाग पाहिला. काही मोठ्या माणसांच्या गोष्टीही पाहिल्या. त्यात कमीतकमी शब्दांमधे आशय पोहोचवण्याची प्रचंड क्षमता आहे. गिरीश कार्नाड, शंकर नाग वगळता फार कोणी नावाजलेले अभिनेते नाहीत, तरीही ते फारच आवडतंय पुन्हा पाहताना.
यूट्यूबर अधिकृतरित्या उपलब्ध आहे.
भरत जाधवनं केलेली 'मोरूची
भरत जाधवनं केलेली 'मोरूची मावशी' पाहिली.
१. अशोक पत्की आणि मंगेश कुलकर्णी हे या नाटकाचे खरे स्टार आहेत. गाण्यांचे टोटल भंकस-तरुण शब्द आणि ठेका धरायला लावणारं संगीत - दोन्हीही चिरतरुण.
२. भरत जाधवची पुण्याई पुरेपूर वापरलीय. लोक त्याच्या आणि मावशीच्या अशा दोन्ही प्रवेशांना खच्चून शिट्ट्या-टाळ्या वाजवतात. भरत जाधव पुरेपूर फुटेज वापरून घेतो. पण विजय चव्हाणहून त्यानं काही फार वेगळं केलेलं नाही. किंबहुना लोकप्रियता वाजवून घेणे, एवढ्या एका उद्देशाखेरीज भरत जाधवनं करण्यासारखं त्या भूमिकेत काय आहे हे मला कळलं नाही.
३. अद्वैत दादरकर या माणसाच्या एकांकिका स्पर्धांमधल्या कामाबद्दल फक्त ऐकलं होतं. टीव्हीवर दिसणारा दादरकर अगदीच निष्प्रभ वाटला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यानं केलेली भय्याची भूमिका भारी. नाचणं, वावरणं, बोलणं... सगळं सुखदरीत्या अनपेक्षित आणि सळसळतं. एकेका प्रसंगात तर 'बाकीचं मरू द्यात, हा माणूस काय करतोय ते पाहू या' असं म्हणून त्याच्याकडे नजर खेचली जात होती. (हे नाटकाच्या दृष्टीनं किती बरं त्याबद्दल नो कमेंट!) आता हा माणूस नाटकात असणार असेल, तर मी एकदा तरी पाहायला जाईनच.
मोरुची मावशी
मोरुची मावशी हे तेव्हाच्या काळातलं टिपिकल कमर्शियल नाटक. थोडं हिणवण्याच्या भाषेतच बोलायचं तर गल्लाभरु.
मला मुळात संहितेपासूनच बरच काही बटबटित वाटलं.(मी जुन्या टीमचं पाहिलं आहे. विजय चव्हाण मावशी होते.)
अत्र्यांचच "तो मी नव्हेच" मात्र बरच आवडलं.
अत्र्यांचच "भ्रमाचा भोपळा " कैच्या कैच वाटलं.
अॅडिशन्स
>> हो, ते गल्लाभरू आणि बटबटीत आहे याबद्दल दुमत नाही. पण त्यातल्या बायका किती फडतूस प्रकारे रंगवलेल्या असाव्यात? त्याबद्दल अत्र्यांची कीवच आली.
अत्रे स्त्रीद्वेष्टे नव्हतेच असा माझा दावा नाही, फक्त तपशीलापुरती एक सूचना - माझ्या माहितीप्रमाणे विजय चव्हाण वगैरे लोकांनी 'मोरुची मावशी' सादर केलं होतं तेव्हा त्यात पुष्कळच बदल करून घेतले होते. त्यामुळे मूळ अत्र्यांची संहिता वाचली असेल तर अत्र्यांच्या लिखाणाविषयी काही म्हणणं सयुक्तिक ठरेल.
(आणखी एक गोष्ट - अत्र्यांनी ते Charley's Aunt ह्या १८९२च्या नाटकावरून उचललं होतं)
वाचली आहे
संहिता वाचली आहे.तरीही त्याबद्दल हेच म्हणणे आहे.
तीन्ही संहिता वाचल्या आहेत :-
१.मोरुची मावशी
२.भ्रमाचा भोपळा
३. तो मी नव्हेच
.
.
मला वआटणारी शक्यता :-
इतर सर्व नाटक -साहित्य वगैरे पेक्षा तो मी नव्हेच फार फार उशीरा आलं; अगदि तीनेक दशकाचा फरक मधे पडला असेल.
इतक्या अवधीत माणूस अधिक मनोउन्नत झालेला असू शकतो.
अर्थात कित्येकांना तो मी नव्हेच हेसुद्धा धड जमलय असं वाटत नाहिच. पण तो स्वतंत्र विषय आहे.
विकांताला कंगना राणवतची
विकांताला कंगना राणवतची प्रमुख भुमिका असलेला 'क्वीन' पाहिला. खूप आवडला. लग्न मोडल्यावर एकटीच हनीमून tour ला जाणार्या मुलीची गोष्ट. Coming of age या प्रकारचे अनेक चित्रपट सध्या येतात. पण हा चित्रपट वेगळा आहे. लग्न हीच मुलीच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे असं मानणार्या कुटंबातील एक मुलगी रानी, लग्न मोडल्यावर एकटीच युरोपात भटकायला बाहेर पडते. आणि त्या प्रवासाने पूर्ण बदलून जाते. 'केल्याने देशाटन..' वगैरेचा पुरेपूर अनुभव तिला येतो. पहिला अर्धा भाग फारच मस्तं जमलाय. खुसखुशीत संवाद आणि चपखल संगीत. दुसरा भाग थोडासा घिसा-पिटा/stereotypical आणि म्हणून थोडा कंटाळवाणा वाटला. पण आवर्जून बघावा/दाखवावा असा आहे.
अवांतरः हा सिनेमा Bechdel test नावाची एक चाचणी उत्तीर्ण होतो.
अवांतरः Bechdel test चा धागा
अवांतरः Bechdel test चा धागा वेगळा काढला तर फार सोईचं होईल. (माझ्या नावावर काढला तरी चालेल. एकोळीचा सारांश वापरायचा असल्यास पुढीलप्रमाणे:) हा बेख्डेल टेस्टचा दुवा. एखाद्या कलाकृतीतलं स्त्रियाचं चित्रण पुरेसं स्वतंत्र - व्यापक आहे का, हे तपासण्यासाठी ही चाचणी वापरतात. तिला असलेल्या आक्षेपांबद्दलची ही चर्चा आहे.
***
अशा प्रकारच्या चाचण्या टोकाचे निकष वापरतात, असं समर्थन वर केलं आहे. ते ठीकच. चाचण्या नक्की कशा प्रकारे तयार केल्या जातात, त्या तशा असाव्यात की नसाव्यात याबद्दल मला काही मत नाही. तो शास्त्रातल्या तज्ज्ञांचा विषय आहे.
पण या चाचणीमध्ये असं अध्याहृत आहे की, दोन स्त्रिया एकत्र आल्यानंतर हमखास पुरुषांबद्दलच बोलतात, ज्याला माझा आक्षेप आहे. दुसरं म्हणजे अशा प्रकारची चाचणी फक्त स्त्रीव्यक्तिरेखांकरता अस्तित्वात असावी, हा तपशील बोलका आहे. (अशी चाचणी पुरुष व्यक्तिरेखांसाठी उपलब्ध आहे का? असल्यास माझी चूक सुधारा.) बरं, असली तर असली. ही चाचणी समलिंगी संबंध ठेवणार्या स्त्रियांसाठी निरुपयोगी आहे. त्याचं काय करणार?
अतिअवांतरः असंही शक्य आहे की मी या फडतूस चाचणीला फुकटचं महत्त्व देतेय!
हे बरंय... स्वतःच्या नावावर
हे बरंय... स्वतःच्या नावावर नवा धागा !
अवांतरः धागे वेगळे काढण्याबद्दल संपादक आता ताक पण फुंकुन प्यायला लागली आहेत बहुदा.
पण या चाचणीमध्ये असं अध्याहृत आहे की, दोन स्त्रिया एकत्र आल्यानंतर हमखास पुरुषांबद्दलच बोलतात,
हे असं आहे हे अध्याहृत नाहीये. किंबहुना हे असं नसताना चित्रपटांमध्ये असं(च) दिसतं ही काहीतरी गडबड आहे.
शांतता कोर्ट चालू आहे
तेंडुलकरांचं "शांतता कोर्ट चालू आहे " पाहिलं. तेही महिनाभरापूर्वी पाहिलं. बहुचर्चित आहे. पब्लिकला त्याबद्दल कल्पनाही असेल, कित्येकांनी पाहिलंही असेल.
यूत्यूबवर उपलब्ध असलेला विडियो अधिकृत असावा असं वाटतं.( पायरसी नाही.) अर्थातच सुलभा देशपांडयांच्या काळचं आता उपलब्ध नाही.
नव्या टीमनं मुद्दाम शूटिंगच्या उद्देशानं सादर केलेलं आहे.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. बेणारे बाईंच्या भूमिकेत रेणुका शहाणे. संदिप कुलकर्णी , आनंद इंगळे व इतर यशस्वी व्यावसायिक कलाकार बाकीच्या भूमिकेत आहेत.
पहिला अंक संथ वाटला.त्या कालातली कोणतीही संहिता घेतली तरी ते काहिशी संथच वाटते.
मला मुळात पात्रं तशी का रंगवलीत तेंडुलकरांनी हे समजलं नाही.
बेणारे मॅडम मुद्दाम बालिश्, उथळ वागतात असं सुरुवातीला दाखवलय (जीभ बाहेर काढून वाकडं दाखवणं; वयाला न शोभणारा अल्लडपणा करणं वगैरे.)
शिवाय सुरुवातीला मधून मधूनच एकदम सेंटी डायलॉग मारुन "बाईंना माणसाची तिडिक आहे. त्यांना काही वाईट अनुभव आले असणार " हे लक्षात येतं.
हे असं थेट सांगायची गरज होती का. डायरेक डायलॉग वगैरे कशाला ?
पहिल्या अंकाच्या शेवटी शेवटी सादरीकरणाला ग्रिप येते.
.
.
*******************************************************कथेचा प्लॉट*****************************************************
*********************************************************************************************************************
वेळ घालवण्यासाठी एका शाळेतील एक कुमारी शिक्षिका, इतर शिक्षक (त्यातील एक सपत्नीक) व इतर काहीजण एका समारंभासाठी एका गावात आलेत.
कार्यक्रमास वेळ आहे. तोवर वेळ घालवण्यासाठी "चला कोर्ट कोर्ट खेळुया" असं ठरतं.
ह्यातील बेणारे ह्या शिक्षिका अविवाहित आहेत. त्यांच्याबद्दल बरीच उलटसुलट कुजबूज संबंधित लोकांत आहे.
पुरुष स्पर्षाला आसुसलेली/हपापलेली अशी स्त्री, पाय घसरलेली बाई वगैरे गॉसिप तिच्याबद्द्दल सुरु आहे.
ह्याबद्दल तिच्याचकडून अधिक माहिती काढायला; थोडक्यात, तिचं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणायला पब्लिक आतुर आहे.
शेवटाचा संपूर्ण अंक प्रमुख पात्र बेणारे मॅडम ह्यांना जवळजवळ संवादच नाही. जिव्हारी लागतील अशा एकानंतर एक आरोप सुरु असताना बेणारे मटकन खाली बसते, ती बसतेच.
ती हतबल आहे. सगळे मिळून तिला "टार्गेट" करताहेत. मॉब मेंटॅलिटीचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "शांतता ...". आपल्याला काही अडाचणीतून बाहेर काढण्यासाठी तिनं
काही लोकांना वेगवेगळय वेळी अम्दत मागितली होती. त्यावेळी त्यांनी तिला सभ्यपणे झिडकारुन लावलच; पण नंतर संधी मिळाल्यावर तिच्या सगळ्या गोष्टी ते सगळ्यांसमोर जाहीर करताहेत.
तिनं ह्यांना अप्रोच केल्यावर तिला झिडकारणं ह्यांना पुरेसं वाटलेलं नाही; तर तिच्या "त्या टाइपच्या" वागण्याबद्दल एकदा त्यांना धडा शिकवायचाय तिला.
तिचं पात्र मला नीट समजलं नाही. ती आख्ख्या नाटकात हतबल वाटते. सुरुवातीला विविध वेळी बाष्कळपणा करुन विषय टाळू पाहते.
लोकं हल्कट असल्याने तिच्या बाश्कळपणाला पुरुन उरतात व बरोबर तिला घेरतात. आरोपांचा भडिमार करतात.
ती बावचळते, गोंधळते, केविलवाणी होते. हतबल ठरते. (ती जायचाही प्रयत्न करते, पण दाराला बाहेरुन कडी बसलेली आहे "चुकून".)
**************************************************कथेचा प्लॉट समाप्त******************************************************************************
आता हे सगळं पाहिलं ती दुर्बल, अशक्त वाटते मानसिक पातळीवर . पण ती ज्या आडवाटेनं आयुष्य जगू पाहते आहे,लग्नापूर्वीचं मूल वाढवू पाहते आहे,
ते धाडसाचच काम आहे.
मला हेच कन्फ्युजन आहे. ती धाडसी आहे, की हतबल?
.
.
.
लोकांचा घोळका झुंड बनला की किती वाईट बनतो, ह्याचं उदाहरण म्हणजे "शांतता..." म्हणता यावं.
कामं सगळ्यांचीच चांगली. त्यातही आनंद इंगळे जास्त भावले. त्यांचा वावर सहज, व भूमिकेस चपखल बसणारा आहे.