चला, संपादकांना घोळात घेऊ या...
इशारा: शीर्षक वाचून इथे काहीतरी खमंग वाचायला आलेल्या सज्जन वाचकांची मी क्षमा मागते. आता आलाच आहात, तर वाचून जावा. ;-)
मी 'ऐसी'वर पडीक असायला लागून बरेच दिवस झाले. हे व्यसन ओसरेल, ओसरेल असा धीर धरूनही व्यसन तसा बराच काळ जीव धरून आहे. :प त्याची कारणं आपण आधीच चर्चिलेली आहेत. त्यात नव्यानं शिरायला नको. पण मला काही प्रश्न मात्र पडले आहेत.
मराठी संस्थळांवरच्या वावराचा अनुभव असं सांगतो की, काहीएक ठरावीक काळानंतर त्या त्या संस्थळाचा बहर ओसरतो. 'मायबोली' आणि 'मिसळपाव' मात्र दीर्घकाळ आणि जोमदारपणे टिकून आहेत. त्या त्या संस्थळांचा वर्जिनल स्वभाव हे जसं टिकून राहण्याचं कारण आहे, तसा तो परिणामही आहेच. अमुक एका प्रकारचे विषय या ठिकाणी नक्की वाचायला मिळतील, अशी खातरी लोकांना हळूहळू वाटते नि त्या त्या विषयांत रस असलेले लोक तिथे हटकून असायला लागतात. (कुठल्याही पाककृतीत काही शंका आली की आईलाही विचारायच्या आधी मी हमखास जाऊन 'मायबोली'च्या आहारशास्त्र विभागात चक्कर टाकते.:प) पण विडंबनं वाचायचा मूड आला, तर 'मिसळपाव'ला पर्याय नाही.
काही विषय असे काही संस्थळांचे यूएसपी होऊन जातात. यात लोकांच्या सहभागाइतकीच महत्त्वाची भूमिका संपादक / संस्थापक / चालक यांची असते. म्हणून सगळ्यांनाच प्रश्नः
- 'ऐसी'चा यूएसपी काय आहे? काय असलेला तुम्हांला आवडेल? (इथे मी श्रेणीव्यवस्थेसारख्या तांत्रिक सोयींबद्दल बोलत नाहीय. विषय आणि आशय या गोष्टींबद्दल बोलते आहे.)
- त्याकरता नवीन काय करता येईल? (धागे तर येतच असतात. ते ठीक. पण पाक्षिक आव्हानासारख्या गोष्टींमुळे त्यात सातत्य राहतं, जे विश्वासार्हता निर्माण होण्याकरता फार महत्त्वाचं. उदा. 'मायबोली'ची निबंधस्पर्धा. या स्पर्धेला संस्थळाबाहेरचे लोकप्रिय माध्यमांतले प्रतिनिधी परीक्षक म्हणून बोलावले जातात. आपल्याला आवडो वा न आवडो, पण त्यानं तिथे लिहिले जाणारे निबंध कितीतरी जास्त प्रमाणात संस्थळाबाहेरही वाचले जातात, हे खरंच आहे.)
- संस्थळबाह्य उपक्रम करता येतील का? (कट्टे आणि त्यांचे वृत्तान्त यांवरून मध्यंतरी बरेच लोक वैतागले होते. साहजिक आहे म्हणा! पण ते कट्टे बरेचसे परिचय आणि मौजमजा स्वरूपाचे, अनौपचारिक होते. यांखेरीज काही सांस्कृतिक कट्टे - हे मधे गुर्जींनीही सुचवलं होतं - करता येतील का? उदा. ३ लोक येवोत वा ३०, पण ऐसीकरांनी जमून अमुक नाटक पाहण्याचं योजलेलं आहे आणि मग त्याचा वृत्तान्त अमुक अमुक आयडी (उदा. चिंजं! जाहिरात जाहिरात!) लिहिणार आहे. असो, मागाहून विचार करता हे लैच अभ्यासपूर्ण वाटतंय. :प)
मला विचाराल (म्हणजे विचारा वा नका विचारू. मी तशीही पिंक टाकणारच आहे. :ड), तर इथे अजून मुलाखती आलेल्या मला आवडतील. मुलाखतीत तारांकितच लोक हवेत असं काही नाही. मागे एकदा 'मायबोली'वर कुणीतरी फूटपाथवर जुनी पुस्तकं विकणार्या एका विक्रेत्याची मुलाखत टाकली होती. अशक्य रोचक प्रकार होता तो. सध्या 'आप म्हणजे केजरीवाल' असं घातक समीकरण नांदताना दिसतंय. ते खोडून काढून 'आप'कडून उभ्या राहिलेल्या एखाद्या तुमच्याआमच्यापैकी असलेल्या माणसाची भूमिका मांडणारी मुलाखत मला 'ऐसी'वर वाचायला आवडेल. अशा मुलाखती ना वर्तमानपत्रांतून वाचायला मिळत, ना साप्ताहिकांतून.
ललित साहित्य (ललित निबंध आणि कविता) संस्थळांपेक्षा ब्लॉगांवर जास्त चांगलं आणि जास्त प्रमाणात असतं, असं (आपलं) मला वाटतं. महिन्यातून एकदा एखाद्या ब्लॉगची ओळख करून देणे, त्यातल्या निवडक पोस्टांबद्दल चार ओळी सांगणे, असलं काहीतरी इथे वाचायला मला आवडेल.
मुख्यधारेतल्या लोकांचं साहित्य इथे प्रकाशित झालेलं मला आवडेल.("न आवडायला झालं काय बोंबलायला? फुकट तिथे, फॅमिलीसकट येतील xxxचे.." इति गुर्जी. ऐकू आलंय!) दिवाळी अंकात कविता महाजनांच्या कादंबरीचा अंश, अवधूत डोंगर्यांचा लेख आणि सतीश तांब्यांची नवी कथा पाहून हुरळायला झालं होतं. अशा प्रकारच्या गोष्टी अजून वरचेवर नाही का करता येणार? खोटं नाही सांगत, त्यासाठी पदरचे 'थोडे' पैसे मोजायलाही माझी हरकत असणार नाही.
खेरीज 'ऐसी'कडून प्रकाशित होणार्या खास लेखांचं मुद्रितशोधन चांगल्या दर्जाचं असावं, उपक्रम जाहीर झाले तर ठरलेल्या तारखा आणि सातत्य पाळलं जावं, प्रतिसाद देणार्यांनी (जास्त नाही, पण थोऽऽडा) जबाबदार अभ्यास करून प्रतिसाद द्यावेत... अशा अनेक बारीकसारीक अपेक्षा..
असो. हे माझं झालं. तुमचं काय मत?
मुलाखत
तर इथे अजून मुलाखती आलेल्या मला आवडतील.
मलाही!
मुलाखतीत तारांकितच लोक हवेत असं काही नाही.
अगदि अगदि!
ते खोडून काढून 'आप'कडून उभ्या राहिलेल्या एखाद्या तुमच्याआमच्यापैकी असलेल्या माणसाची भूमिका मांडणारी मुलाखत मला 'ऐसी'वर वाचायला आवडेल.
हात्तेच्या मला वाटलं माझी किम्वा निदान माझ्या अक्षावरच्या मित्रांची मुलाखत घेणार आहात.
घोर निराशा झाली.
अरे आम आदमी च्या उमेदवारांच्या कसलय मुलाखती घेता ?
आम मतदाराच्या घ्या की.
तोवर
तोअवर ताईंसाठी माझे काही प्रश्न :-
(त्यांची मुलाखत आहे असे समजू)
१.ऐसीमध्ये फिट्ट बसण्यासाठी आणि हिट्ट होण्यासाथी तुम्ही नेमकं काय केलत ?
२.तुम्ही ती ऊर्जा आणि आक्रस्ताळेपणा कुठून आणता ?
३.साधारणतः कधीपासून तुम्ही अशा आहात ?
४.अशा असण्याचा कधी त्रास झाला का ?
५.आपण दुरुस्त व्हावं असं कधी वाटलं का ? कशामुळं वाटलं ?
आता पळा.
जगलो वाचलोच तर उरलेलं उद्या टंकतो.
बाय.
सदस्य संख्या
- 'ऐसी'चा यूएसपी काय आहे? काय असलेला तुम्हांला आवडेल?
अनेकविध आणि अनवट विषयांवरती बर्यापैकी खात्रीलायक माहिती एकाच छपराखाली मिळणे हि इथली जमेची बाजू आहे, पण मुळातच संख्येने कमी क्रियाशील सदस्यांमधे लेख किंवा प्रतिसादाचे वैविध्य ह्यापेक्षा अधिक मिळणे अवघड आहे, आणि ह्या छोट्या गोलामधे कोण काय लिहिणार ह्याबद्दल प्रत्येकाला बर्यापैकी अनुमान लावता येणे शक्य आहे त्यामुळे हळू-हळू प्रतिसादांची संख्या रोडावल्यास नवल वाटणार नाही.
सदस्यसंख्या वाढल्यास संस्थळावरील कंटेटचे विषयही वाढतील आणि मग त्यात असे अवांतर कार्याचे फाटे आपोआप फुटू लागतील*.
एखादा उपक्रम चालू झाल्यास किंवा होण्यास मदत करण्याची इच्छा आहे हे नमुद करतो, किंबहुना श्रावण मोडकांना एका अशाच उपक्रमात किरकोळ मदत केली होती असे सांगावे वाटते.
*वास्तविक पहाता इथे 'फाटे आपोआप फुटू लागतील असे वाटते' असे लिहायचे होते पण 'मन' ह्यानी त्यावर जोरदार 'सरसकट' मत मांडल्याचे आठवल्याने 'लागतील' वर थांबलो. ;)
पण मुळातच संख्येने कमी
पण मुळातच संख्येने कमी क्रियाशील सदस्यांमधे लेख किंवा प्रतिसादाचे वैविध्य ह्यापेक्षा अधिक मिळणे अवघड आहे, आणि ह्या छोट्या गोलामधे कोण काय लिहिणार ह्याबद्दल प्रत्येकाला बर्यापैकी अनुमान लावता येणे शक्य आहे त्यामुळे हळू-हळू प्रतिसादांची संख्या रोडावल्यास नवल वाटणार नाही.
सदस्यसंख्या वाढल्यास संस्थळावरील कंटेटचे विषयही वाढतील आणि मग त्यात असे अवांतर कार्याचे फाटे आपोआप फुटू लागतील
या प्रश्नाची जाणीव आहे. पण यावर उपाय काय व मराठी संस्थळाच्या आधीच मोजक्या वापरवर्गात तो कसा सोडवता यावा यासंबंधी काही सुचवण्या असतील तर स्वागत आहे.
खाली गुर्जी म्हणाले तसं छापिल माध्यमांत येथील लेखन येण्यासाठी प्रयत्न करता येईलच. त्याव्यतिरिक्त काही कल्पना?
सुचना
१. ऐसीचे मोबाईल अॅप बनविता आले तर सहभाग वाढवता येणे सोपे पडेल.
२. नियमीत ब्लॉग लेखन करणार्यांना सामावून घेणारी इव्हेंट ऐसीवर केल्यास त्यांचा सहभाग वाढणे शक्य आहे.
३. ऐसीवरच्या लेखनाचे प्रताधिकार ऐसीचेच असल्याने काही क्रियाशील सदस्य सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
४. 'बहुदा' ऐसीची 'प्रो-सवर्ण' अशी एक छबी आहे, त्याच्यामुळे सदस्य सहभागी होण्यास काचकूच करणे शक्य आहे.
५. मैक्रो-ब्लॉगिंगच्या धर्तीवर एखाद लेखनप्रकार असल्यास सद्स्य संख्या वाढण्यास मदत होउ शकेल. लेट दि एक्स्पर्ट डाय फॉर ए ग्रेटर गुड ;)
अर्थात हे सर्व ऐसीच्या मालकांना वाटेल असे नाही पण मेघनाने धागा काढला म्हणून प्रतिसाद तसदी.
गंभीरपणे
मी खरच गंभीरपणे विचारतोय.
मी आपला आम पब्लिकला सारखा "i agree" बटाण दाबून कुठलेही सॉफ्टावेअर वसविणारा किंवा संस्थळांची सदस्यता घेणारा माणूस आहे.
प्रताधिकार ऐसीचा आहे म्हणजे मी माझेच लेखन इकडे तिकडे देताना मला ह्यांची परवानगी वगैरे घ्यावी लागेल की काय ?
तसलं काही असेल तर वावर थांबवलेला बरा.
(तसलं काही नाहिये अशी माझी wishful thinking आहे.)
प्रताधिकार ऐसीचे आहेत नि
प्रताधिकार ऐसीचे आहेत नि ऐसीची छबी प्रोसवर्ण आहे, या दोन्हीशी मी सहमत नाही. माझ्या लेखनाचे प्रताधिकार नक्की माझेच आहेत. खातरी. आणि छबीबद्दल बोलाल तर 'आम्हांला बॉ असं वाटतं' या युक्तिवादाचा काही प्रतिवाद संभवत नाही.
पण माझ्या मते 'ऐसी' पुरेसं संतुलित आहे. 'प्रोसवर्ण'ची व्याख्या - निदान तुम्ही लावलेले निकष - कळतील का?
मत
'प्रो-सवर्ण'वर बरीच अवांतर चर्चा होईल अशी शक्यता वाटली, शक्यता असल्यास वेगळा धागा करावा.
ट्रॅकरवर नजर टाकल्यास लेखकांची जी नावे दिसतात त्यातली बहुतांश नावे सवर्ण वाटतात, किंवा धागा उघडल्यास बहुतांश प्रतिसादकांची नावे सवर्णांची वाटतात, तसेच लेखनाचा बाज, विषय, अनुभव, भाषा, शुद्धलेखन ह्यावरुन तरी बहुतांश सदस्य सवर्ण किंवा/आणि शहरी उच्च नसलातरी बर्यापैकी सुशिक्षीत वाटतो. आता ह्याविरुद्ध निष्कर्ष काढण्यासाठी काय विदा देता येइल असे तुम्हाला वाटते?
अर्थात हि माझी बाजू, इतरांना तसे वाटेलच असे नाही.
हे निकष लावून पाहिल्यास असा
हे निकष लावून पाहिल्यास असा निष्कर्ष काढता येईल की, ऐसीवर सवर्ण लोकांचं प्रमाण जास्त आहे. पण म्हणून ऐसी प्रो-सवर्ण ठरत नाही.
सवर्ण लोकांना काही विशेष प्रोत्साहन, आमंत्रण - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष - ऐसीतर्फे दिलं जात असतं, तर ते प्रो-सवर्ण आहे असं म्हणता आलं असतं. तसं काही नसल्यामुळे ऐसी प्रो-सवर्ण आहे, याच्याशी माझी असहमती.
बाकी सवर्ण लोकांचं प्रमाण 'ऐसी'वर जास्त आहे असं म्हणण्यापेक्षा एकूणच जालावर सवर्ण लोक जास्त दिसतात असं माझं निरीक्षण आहे. (विदा मागू नका, दया करा.) शिक्षण, जालसाक्षरता, जालाची उपलब्धता असण्याइतकी आर्थिक सुस्थिती, पोट भरण्यामागे लावावा लागत नाही असा रिकामा वेळ... अशी बरीच कारणं शोधता येतील.
परिप्रेक्ष्य
>>ऐसीवर सवर्ण लोकांचं प्रमाण जास्त आहे.
>>सवर्ण लोकांना काही विशेष प्रोत्साहन, आमंत्रण - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष - ऐसीतर्फे दिलं जात असतं, तर ते प्रो-सवर्ण आहे असं म्हणता आलं असतं.
वरील दोन वाक्यांचा संबंध जोडल्यास अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष आमंत्रण शक्य आहे, आणि त्याच कारणामुळे प्रोत्साहनही अधिक असण्याची शक्यता आहे. ऐसी प्रो-सवर्ण आहे असं कुणालाच म्हणायचं नाहीये किंवा कुणी(ऐसीकर) तसं म्हणतही नाही, पण ऐसीचा एकंदर कंटेंट तसा परिप्रेक्ष्य(छबी) निर्माण करु शकते असे मला वाटते.
गर्दीतही माणूस आपलाच(सुटेबल) गट शोधत असतो तसं काहीसं.
मला हा बादरायण संबंध वाटतो.
मला हा बादरायण संबंध वाटतो. तेही एकवेळ बाजूला ठेवू.
एक उदाहरण देते: एखाद्या माणसाचा आंतरजातीय विवाह करण्याला आक्षेप नाही. पण जोडीदार आंतरजातीय असणे हा त्याच्याकरता निवडीचा निकषही नाही. तो जोडीदार शोधताना त्याच्या अपेक्षांची पूर्ती करू पाहील. जोडीदार आंतरजातीय निघाला, नो प्रॉब्लेम. नाही निघाला, नो प्रॉब्लेम.
तसंच ऐसीचं असावं (शक्यतादर्शक). अमुक अमुक धोरण आहे (ते धोरणाच्या पानावर जाऊन पहा प्लीज), मग त्याकडे कोण आकर्षित होतं, ते अलाहिदा.
बदका सारखा चालतो, बदका सारखा बोलतो....
सवर्ण लोकांना काही विशेष प्रोत्साहन, आमंत्रण - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष - ऐसीतर्फे दिलं जात असतं, तर ते प्रो-सवर्ण आहे असं म्हणता आलं असतं.
सवर्ण सदस्यांच्या सर्कलमधे सवर्ण असण्याची शक्यता अधिक, सवर्ण सदस्य त्यांच्या सर्कलमधे आमंत्रण देण्याची शक्यता अधिक, इथे सवर्ण सदस्य अधिक असण्याची शक्यता अधिक, त्यामुळे त्यांनाच प्रोत्साहन मिळण्याची शक्यता अधिक.
मी प्राथमिक विदा दिला आहे, आता तर्क किंवा अनुमानाचे काम आहे जे सापेक्ष असु शकते त्यामुळे ह्यापेक्षा वेगळा प्रतिवाद शक्य होईलसे वाटत नाही.
... म्हणजे (खाणेबल) पक्षी असणार.
सवर्ण लोकांना, ते फक्त सवर्ण आहेत म्हणून आमंत्रण, प्रोत्साहन दिलं जातं आणि बाकीच्यांना ते सवर्ण नाहीत म्हणून प्रोत्साहन, आमंत्रण दिलं जात नाही असं होत असेल तर मग 'प्रो-सवर्ण' छबी निर्माण होईल. आपापल्या परिवार, परिसरातल्या लोकांना आमंत्रण दिलं वर्णाचा संबंध का लावावा? कोणी लावलाच तर त्याबद्दल फार काही करता येईल, असंही नाही.
सोयिस्कर?
सवर्ण लोकांना, ते फक्त सवर्ण आहेत म्हणून आमंत्रण, प्रोत्साहन दिलं जातं आणि बाकीच्यांना ते सवर्ण नाहीत म्हणून प्रोत्साहन, आमंत्रण दिलं जात नाही असं होत असेल तर मग 'प्रो-सवर्ण' छबी निर्माण होईल.
'दिलं जात नाही' असे कृतीशील विधान मी केलेलं नाहिये, सिलेक्टिव्ह रिडिंग सोयिस्कर करत आहात काय? हे प्रामाणिकपणे विचारु इच्छितो.
"... दिलं जात नाही असं होत
"... दिलं जात नाही असं होत असेल तर ..." असं मूळ विधान आहे.
त्यातून हे सुचवण्याचा प्रयत्न - असं होत नाही हे माझं मत. पण मी हितसंबंधी असल्यामुळे त्याला कितपत महत्त्व द्यावं? तरीही कोणी अस्तित्त्ववात नसणारे हेतू जोडू पाहत असेल (हे असं कोणी करतं का हे मला माहित नाही. तुम्ही शंका उपस्थित केली आहेत पण हेतू जोडला आहे असं वाटत नाही.) तर मग त्याबद्दल आपण फार काही करू शकत नाही. सोडून देणंच इष्ट.
जाणिवपूर्वक 'प्रो-सवर्ण'
जाणिवपूर्वक 'प्रो-सवर्ण' भुमिका एसीव्यवस्थापन घेत नाही हे परत एकदा स्पष्ट करतो, पण परिप्रेक्ष्य निर्माण होण्यास वातावरण अनुकुल आहे का? तर माझ्यामते हो तसे वातावरण आहे. त्याबद्दल आपण काही करु शकतो का? तर हा प्रश्नच(अनेक प्रश्नांपैकी) बहुदा धागालेखीकेने मांडला आहे, त्याउप्पर त्यावर काही करावे का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ह्या भुमिकेशी काही अंशी सहमत.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Highbrow
अधिक माहिती http://aisiakshare.com/node/10
हायब्रोच्या दुव्यावरील व्याख्या व ऐसीवरील धोरणे बऱ्यापैकी पूरक आहेत असे वाटते.
प्रो-सवर्णमध्ये जातीय छटा आहे ती ऐसीवर निदान मला दिसली नाही.
पास
Used colloquially as a noun or adjective, "highbrow" is synonymous with intellectual; as an adjective, it also means elite, and generally carries a connotation of high culture.
फारच ढगळ व्याख्या, त्यात 'स'वर्णपण बसत असल्याने आमचाही पास.
तुमचा प्रतिसाद बदलल्याने हि पुरवणी -
प्रो-सवर्णमध्ये जातीय छटा आहे ती ऐसीवर निदान मला दिसली नाही.
ऐसीवरील लिहिण्याची पद्धत, अनुभव, विचार, शुद्धलेखन हे बहुतांशी कुठल्या वर्णात दिसून येते असे तुम्हाला वाटते?
प्रस्थापित
तुम्ही प्रमाणभाषेत लिहित असाल तर महाराष्ट्रात प्रमाण भाषा प्रस्थापितांची आहे असा एक सार्वत्रिक समज आहे ह्याची आठवण करुन देऊ इच्छितो.
पण बहुदा माझे प्रतिसाद 'तिरपे' समजून घेतले जात आहे, ह्यात उच्च-नीच वर्णभेद मला अपेक्षीत नाही तर परिस्थितीचे मी फक्त विश्लेषण करुन माझे मत नोंदविले. त्याच विद्यावर तुम्ही तुमचे मत नोंदवू शकत किंवा माझ्या मताला असहमती दर्शवू शकता.
समज
तुम्ही प्रमाणभाषेत लिहित असाल तर महाराष्ट्रात प्रमाण भाषा प्रस्थापितांची आहे असा एक सार्वत्रिक समज आहे ह्याची आठवण करुन देऊ इच्छितो.
हा समजच आहे आणि माझा ह्या समजाला विरोध आहे. प्रमाणभाषा 'कोणाचीही' असली तरी माझ्यासकट अनेकांना प्रमाणभाषा म्हणूनच ती शिकवली गेली आहे (सवर्णांची भाषा म्हणून नाही.) ही भाषा प्रस्थापितांची आहे म्हणून त्याला विरोध करणारे विद्रोही आणि प्रमाणभाषा आमचीच आहे असा दावा करणारे सवर्ण एकाच पातळीवर आहेत असे मला वाटते.
जातीयवाद आणि जात्/वर्णाचे सूचन
एखादं व्यासपीठ "प्रो-सवर्ण" असणं म्हणजे सवर्णांची बाजू उचलून धरणारं - पर्यायाने जो वर्ग पारंपारिक दृष्ट्या दलित समजला गेला त्याच्या विरोधी बोलणार्यांचं, त्यांच्यावरच्या अन्यायाचं कळत नकळत समर्थन करणारं - पर्यायाने जातीयवादी - असा माझ्या दृष्टीने होतो.
तुम्हाला ऐसीअक्षरेबद्दल असं म्हणायचं नसावं अशी मला आशा आहे.
एखाद्या ठिकाणचं वातावरण जातीयवादी असणं आणि विशिष्ट जात्/वर्णाच्या व्यक्ती तेथे बहुसंखेनं असणं या दोन भिन्न गोष्टी होत.
बागडणे
तुम्हाला ऐसीअक्षरेबद्दल असं म्हणायचं नसावं अशी मला आशा आहे.
नाही. हा फाटा अपेक्षीत नाही हे माझ्या ह्या धाग्यावरच्या आत्तापर्यंतच्या प्रतिसादातून स्पष्ट झाले नाही हे दुर्दैव.
एखादं व्यासपीठ "प्रो-सवर्ण" असणं म्हणजे सवर्णांची बाजू उचलून धरणारं - पर्यायाने जो वर्ग पारंपारिक दृष्ट्या दलित समजला गेला त्याच्या विरोधी बोलणार्यांचं, त्यांच्यावरच्या अन्यायाचं कळत नकळत समर्थन करणारं - पर्यायाने जातीयवादी - असा माझ्या दृष्टीने होतो.
"प्रो-सवर्ण" शब्दयोजना ऐसीवर बागडण्याच्या दृष्टीने योजिली होती, इतरवर्णियांना इथे बागडण्यास कदाचित कंफर्टेबल वाटणार नाही इतकेच.
चुकीचे गृहितक
"प्रो-सवर्ण" शब्दयोजना ऐसीवर बागडण्याच्या दृष्टीने योजिली होती, इतरवर्णियांना इथे बागडण्यास कदाचित कंफर्टेबल वाटणार नाही इतकेच.
सवर्ण वगळता इतर वर्णीयांच्या आवडीनिवडी 'चांगल्या' असू शकणार नाहीत असे काहीसे गृहीतक यातून उभे राहते, त्याला माझा प्रामुख्याने आक्षेप आहे.
>>सवर्ण वगळता इतर
>>सवर्ण वगळता इतर वर्णीयांच्या आवडीनिवडी 'चांगल्या' असू शकणार नाहीत असे काहीसे गृहीतक यातून उभे राहते, त्याला माझा प्रामुख्याने आक्षेप आहे.
असले गृहितक उभे करत असाल तर माझा नाईलाज आहे. चांगले-वाईट वर्गीकरण मला अपेक्षीत नाही हे परत एकदा स्पष्ट करतो तसे शब्दही मी वापरले नाहीत. प्रस्थापितांच्या भाषेबद्दल दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
सहमत
एखादं व्यासपीठ "प्रो-सवर्ण" असणं म्हणजे सवर्णांची बाजू उचलून धरणारं - पर्यायाने जो वर्ग पारंपारिक दृष्ट्या दलित समजला गेला त्याच्या विरोधी बोलणार्यांचं, त्यांच्यावरच्या अन्यायाचं कळत नकळत समर्थन करणारं
एखाद्या ठिकाणचं वातावरण जातीयवादी असणं आणि विशिष्ट जात्/वर्णाच्या व्यक्ती तेथे बहुसंखेनं असणं या दोन भिन्न गोष्टी होत.
हेच म्हणायचे आहे.
तपशीलाबद्दल प्रश्न
ढसाळांचं नाव आलंच आहे म्हणून - ढसाळ गेल्यावर मुखपृष्ठावर सुधीर पटवर्धन यांनी काढलेलं 'स्टेशन रोड' नावाचं चित्र, पटवर्धनांची परवानगी घेऊन लावलेलं होतं. "sudhir patwardhan station road" असा प्रतिमाशोध घेतल्यावर ते नेमकं चित्रही दिसेल.
या कृतीमधून नक्की कोणती वर्ण-पार्श्वभूमी सूचित झाली?
---
माझ्या शुद्धलेखनाच्या, भाषेतल्या चुका काढलेल्याही याच संस्थळावर दिसतील. यात कोणती वर्ण-पार्श्वभूमी सूचित होते?
सुधीर पटवर्धन शैलीतील चित्र
सुधीर पटवर्धन शैलीतील चित्र लावणे म्हणजेच 'चांगले' आणि जे ते करणार नाहीत ते 'मागास' अशी समजूत कृपया करुन घेउ नका, पोळीला पोळी न म्हणता चपाती म्हणणे गैर आहे असे समज चुकीचे आहेत. मी फक्त परिस्थितीचे विश्लेषण करत आहे, गरजेमागची प्रेरणा फक्त आदितीच्या प्रश्नाला उत्तर हेच आहे. कुणाला दुखवायचा हेतू नाही. चांगले-वाईट ठरवायचा हेतू नाही.
एका कलाकाराच्या शब्दांत
शुभा गोखलेंच्या दिवाळी अंकातल्या मुलाखतीमधून -
यात माझं अगदी व्यक्तिगत निरीक्षण सांगते. मी पुण्याला कला महाविद्यालयात होते तेव्हाची ही गोष्ट. जातींबद्दल बोलणं अनुचित वाटतं, पण हा विषयच तसा आहे. ब्राह्मणांच्या घरातले खूप कमी लोक या क्षेत्रात यायचे. 'गोखले' आडनावाची मी एकटीच होते. हा मूळ मुद्दा. पूर्वीच्या वर्णव्यवस्थेमधे हातानं काम करणं ब्राह्मण लोकांना माहीतच नव्हतं. माझा नवरा मला गमतीत म्हणतोच, "मी नाही असे मातीत, रंगात हात घालू शकत. अप्रगत लोक वाटता तुम्ही!" पण कलेचा इतिहास किंवा थिअरी त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे.
ब्राह्मण मंडळी सगळी बुद्धिजीवी. ते अजूनही दिसतं, पण हा फरक कमी होताना दिसतो. शिक्षण सर्वांना घेता येतं, त्यामुळे सरमिसळ होताना दिसते. माझ्या वेळेस ही लोकं आर्किटेक्ट्चरला असायची. त्यानंतर कमर्शियल आर्टला लोक जायचे. पेंटिंगला येणारे कमी. अशी ही कला-वर्णव्यवस्था होती. मुली तर शिक्षण - मॅट्रिक आणि लग्न यांच्यामधला काळ घालवायला, रुखवतं बनवायला कलाविद्यालयात यायच्या. घरीही कसं असायचं की, ही शिवण जरा बरं करते, रांगोळी बरी काढते म्हणून मग कलाविद्यालय. आणि गणित वगैरेंमधे गतीच नाही म्हणूनही कलाशाखेला. हे मी सांगत्ये माझ्या काळातलं. १९७५ साली मला मॅट्रिकला गणित आणि विज्ञानात खूप चांगले मार्क असूनसुद्धा मी फाईन आर्ट्स घेणं हे मी सोडून सगळ्यांनाच मूर्खपणाचं वाटलं होतं!
लेखनाचे प्रताधिकार
>> ३. ऐसीवरच्या लेखनाचे प्रताधिकार ऐसीचेच असल्याने काही क्रियाशील सदस्य सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
हा निष्कर्ष कशावरून निघाला ते जाणून घेण्यास उत्सुक आहे. प्रत्येक पानाच्या तळाशी 'Terms of use and privacy policy' असा दुवा दिसेल. त्यावरून उद्धृत -
We do not control the truth or accuracy of content posted or the safety, or legality of the items advertised or sold. You may find other users' information or writing or posts to be offensive, harmful, inaccurate or deceptive. The views expressed on the website are not those of aisiakshare.com, and any errors or omissions in them belong to the respective contributors / copyright holders.
मुळ विधानामागचा तर्क "मी"
मुळ विधानामागचा तर्क "मी" देतीलच.
बहुदा, संपादकीय अधिकारात - प्रसंगी लेखकाच्या परवानगीविना - लेखनात संपादक/व्यवस्थापक बदल/संपादकीय संस्कार करू शकतात, त्यामुळे असा समज झाला असेल असा प्राथमिक अंदाज.
अर्थात हे स्पष्टीकरण योग्यच आहे. लेखनावर 'प्रताधिकार' ऐसीअक्षरेचा नसतो.
मोघम
The views expressed on the website are not those of aisiakshare.com, and any errors or omissions in them belong to the respective contributors / copyright holders.
हे बरोबर आहे पण थोडं मोघम आहे, म्हणजे "all content on this site is © Copyright of its respective owners. Permission from the content owner should be sought before reproducing any aspect of this site" हे जास्त स्पष्ट आहे. मी ते एक गृहितक म्हणून मांडलं होतं हे स्पष्ट करायला विसरलो.
प्रताधिकार ऐसीचाच असं
प्रताधिकार ऐसीचाच असं म्हणायला ठीक आहे. आवडेलही. पण जे लोक इथे लिहीतात त्यांच्या लेखनाला, इथे मिळतो त्यापेक्षा जास्त न्याय इतरत्र मिळत असेल तर? (न्याय म्हणजे अधिक वाचकसंख्या आणि/किंवा मानधन.) प्रताधिकाराच्या मुद्द्यामुळे चांगले लोक कदाचित फक्त ऐसीच नाही, जालापासूनच फटकून राहू शकतात. सध्या छापील माध्यम हेच प्रस्थापित माध्यम आहे, तिथेच वाचकसंख्या खूप जास्त आहे आणि तेच मोठ्या प्रमाणात मानधन देणं जमवू शकतात, ही वस्तुस्थिती कशी नाकारायची?
पण कोणी इथला मजकूर फक्त कॉपी-पेस्ट करून मूळ स्रोताचा दुवा देत नसेल तर त्याबद्दल आक्षेप जरूर घ्यावासा वाटेल. पण हे असं करणारी व्यक्ती स्वतःच लेखक असेल तर ... माहित नाही. हा थोडा करडा भाग वाटतो.
१. +१ ही अॅपची सुचना मीही
१. +१ ही अॅपची सुचना मीही बरीच आधी केली होती. मात्र तांत्रिक सहभाग गरजेचा आहे. तुम्ही वा अन्य कोणी सदस्य या दृष्टीने मदतीस पुढे येत असेल तर स्वागत आहे.
२. नै समजले. कशा प्रकारचा इव्हेंट सुचवता आहात?
३. गैरलागु
४. हे मी दुसर्यांदा वा तिसर्यांदा ऐअकतो आहे. त्यामागचा तर्क समजला की त्यात काही बदल करणे शक्य/इष्ट आहे असे वाटले नाही. तरी काही उपाय सुचवत असाल तर विचार करता येईल.
५. अख्खे स्वरूप बदलायच्या मी एक सदस्य म्हणून विरोधात आहे. या संस्थळाची ती मर्यादा आहे नी चौकटही! मात्र मनात आलेले लहान विचार, काय खाल्ले, काय बघितले, काय वाचले आदी धाग्यांद्वारे लहान प्रतिसाद, शंका, मते, सुचवण्या, दुवे व त्यावरील चर्चेला ऑलरेडी प्रोत्साहन दिले आहे.
खुलासा.
१. मोबाईल संबंधीत तंत्रज्ञान मला ठाउक नाही, पण अॅपसंदर्भात इतर मदत मी करु शकतो.
२. वाचावे नेटके टाईप, ब्लॉगरला आमंत्रण देऊन ब्लॉग-समिक्षा करणे, मुलाखत घेणे वगैरे.
३. माझे मत दिले आहेच.
४. उपाय साधारणपणे मुद्दा क्र. ५ मधे आहे.
५. मला रेडइट(reddit)च्या धर्तीवर लेखनप्रकार अपेक्षीत होता.
मायक्रो ब्लॉगिंग बद्दल एक
मायक्रो ब्लॉगिंग बद्दल एक सुचवणी
ट्विटरद्वारे अपडेटवता येईल असा एखादा खरडफळा करून मुख्यपानावर / नवीन लेखनाच्या इथे चिकटवला, तर ट्विटरद्वारे लोकांना (१४० अक्षरांत शक्य तितक्या)गफ्फा झोडता येतील, दुवे देता घेता येतील.
मेघनाने वरती ऐसी-व्यसनाबद्दल लिहिलं आहे. ते मुळात लागायला तर पाहिजे. माझ्या (जाल-बाह्य) मित्रमंडळींपैकी काही स. अपवाद वगळता कोणाला मराठी संस्थळ क्या चीज हय याबद्दल काहीच कल्पना नाही. जवळजवळ सर्वांकडे इंटरनेट आहे - चेपुवर, ट्विटरवर असतात. अशा लोकांना ट्विटर इंटिग्रेशन सारखा "हूक" देऊन ऐसीवर आणणे, व्हिजिबिलिटी वाढवणे - इतका मर्यादित हेतू त्यामुळे साध्य झाला तरी पुरेसं आहे.
माझ्या (जाल-बाह्य)
माझ्या (जाल-बाह्य) मित्रमंडळींपैकी काही स. अपवाद वगळता कोणाला मराठी संस्थळ क्या चीज हय याबद्दल काहीच कल्पना नाही. जवळजवळ सर्वांकडे इंटरनेट आहे - चेपुवर, ट्विटरवर असतात. अशा लोकांना ट्विटर इंटिग्रेशन सारखा "हूक" देऊन ऐसीवर आणणे, व्हिजिबिलिटी वाढवणे - इतका मर्यादित हेतू त्यामुळे साध्य झाला तरी पुरेसं आहे.
अग्ग्ग्ग्गदी हेच म्हणतो.
मराठीत टाईप करणे हाही मोठा इश्श्यू वाटतो लोकांना. त्यामुळे मेगाबायटी लेखांच्या फॉरम्याटऐवजी मायक्रोब्लॉगिंग सुरू केले तर अत्युत्तम!!!
ळॉळ आर यू नट्स बाकी खास
ळॉळ =))
आर यू नट्स ;)
बाकी आमच्या प्योत्र इल्यिच चायकोव्हस्कीने खास तुमच्यासाठी बनवलेले मूजिक ऐका.
साहिर,
इथे भडक भाषा वापरण्याबद्दल मी कदाचित फेमस असेन.
मला जर क्ष१ आयडिचे तमुक मत पटले नाही, तर मी तिथल्या तिथे 'वाजवतो'
वाजविलेले बरोबर असेल, तर वाचणारे बहुतेकदा चांगली श्रेणी देतात, असा अनुभव आहे.
ऐसीवर श्रेणीसुविधा सुरू केली तेव्हापासून, व त्या सुविधेबद्दलच्या चर्चेत विरोधी सूर लावून भांडणार्यांपैकी मी एक आहे. अन श्रेणीदानपद्धती उपयोगी व चांगली आहे असे माझे मत आजकाल बनलेले आहे. तेव्हा, सरसकट श्रेणी पद्धतीस ब्लेम करू नये, असे वाटते. हे थोडे मॉडरेशन क्राऊड सोर्स करण्यासारखे आहे ;) इफ यु क्नो व्हॉट आय मीन.
*
इथे एक निरिक्षण नोंदवू इच्छितो. जे थोडे साहिर यांचे मताच्या बाजूने जाते.
ते म्हणतात,
"क्रियाशील सभासद वाढणारच नाहीत किंवा क्रियाशील होणारच ह्याची पूर्ण काळजी घेतली जाते. काहीही लिहिले की लगेच "खोडसाळ" वगैरे लेबल लावुन मुस्कटदाबी करण्यात येते."
(^^^याला कुणीतरी खोडसाळ श्रेणी देऊन मोकळे झालेलेही आहे.)
आता माझी निरिक्षणे/निष्कर्ष :
१. कोणत्याही संस्थळावर, अगदी उदा. मायबोली. जिथे आजच्या घडीला रजिस्टर्ड किमान ५० हजार लोक आहेत, तिथेही, मॅक्झिमम शे-पन्नास आयडीज अॅक्चुअली "अॅक्टीव्ह" असतात. रजिस्टर्ड लोक जे संस्थळ वाचतात, त्यापेक्षाही, अनरजिस्टर्ड लोक नुसतेच वाचनमात्र राहून वाचीत असतात. (This is my intuition. The site admin might be able to find out actual unregistered hits of a thread, and support or counter it.)
२. बहुतांश वाचनमात्र लोक, नॉर्मल ह्यूमन टेंडन्सीप्रमाणे, चांगली प्रतिक्रिया मनी उमटली, की 'वा! छान लिहिलंय हां याने/हिने' असं म्हणून पुढे जातात.
अर्थात, वाचनमात्र लोक "वा वा" म्हणण्यासाठी प्रतिसाद लिहित नाहीत, अथवा, केवळ वा! म्हणण्यासाठी मेंबरशिप घेत नाहीत. मेंबरशिप असली तरी, कर्ममूल्य १-वाल्या नवख्या लोकांना श्रेणी देण्याची फ्यासिलिटी नसावी असे वाटते.
३. मेंबरशिप घेऊन, काही लिहिण्याची 'वळवळ' जेव्हा होते, तेव्हा बहुतेकदा,
हा असा संताप होऊन ते केले जाते.
आता,
या परिस्थितीत, "(रेल्वे) डब्ब्याच्या आतले" लोक या अगांतुकाला डूआयडी म्हणून हाडहाड करू लागतात. अन तो/ती बहुतेकदा, 'कुठून यांच्या नादी लागलो' असे म्हणून पुन्हा वाचनमात्र होऊन गायब होतो.
माझ्यासारखे काही कलोसल ईगोवाले हार्डकोअर, ज्यांना 'आय अॅम ऑल्वेज राईट' असे वाटत अस्ते, तेच या स्पर्धेत टिकून रहातात. (जोशी, यालाच 'उत्क्रांती' असे म्हणतात. प्लीज नोट. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ;) )
४. जोशींचाच विषय निघालाय, तर त्यांच्या या संस्थळावरील वाटचाल अन मला ऐसी का आवडते या धाग्यावरील वर्तन वरवर पाहिले असता, खरेतर ऐसी हे नूब्ससाठी (NOOB) फर्टाईल सॉईल (उपजाऊ जमीन {सुपीक माती}) आहे असे म्हणायला हवे ;)
तर, निष्कर्ष :
माझ्या लाडक्या क्राऊड माड्रेटराहो,
विल्ड युअर पावर मोअर वाईसली.
प्रत्येकच वेळा, डिसेन्टिंग व्हॉईस इज नॉट अ ट्रॉल. आपण आपल्या श्रेणीदानाने त्यांना कडवट होण्यास भाग तर नाही पाडत आहोत? Are we forcing them to become real trolls by suspecting them to begin with?
धन्नेवाद!
------------
तळटीपा:
१ : इथे मला क्ष ऐवजी 'अमुक आयडीचे तमुक मत' असे म्हणायचे होते. पण इथे अमुक नावाचा एक आयडी आहे. त्यालाच रेफर करतोय असं मला रिसेंटली खरवडण्यात आलंय ;) त्यामुळे क्ष आयडीचे तमुक मत, असे यमकांध२ लिहावे लागले आहे.
तळ तळ टीप :
२ : यमकाने अंध नव्हे, तर यमकाबद्दल अंध असे वाचावे.
सहमत, पण आपण डू-आयडी अथवा
सहमत, पण आपण डू-आयडी अथवा ट्रोल नाही हे आपल्या वर्तनाने सिद्ध करायची जबाबदारी त्या त्या आयडीची नाही का?
नोकरीत दहा ट्रेनी ऑफिसर घेतले. सुरुवातीला प्रत्येक ट्रेनी ऑफिसरचं मूल्यमापन त्या दहांच्या सरासरी कर्तबगारीइतकं असतं. उरलेल्या नवांपेक्षा मी सरस आहे, वेगळा आहे, सरासरीच्या वर आहे - हे बॉसला१ पटवायची जबाबदारी प्रत्येक ट्रेनी ऑफिसरची असते.
"मला ट्रोल समजताय काय, आता दाखवतोच करून ट्रोलिंग" अशा बांगड्या फोडण्यात काय हशील?
१इथे बाकीच्यांना, कारण क्राऊडसोर्सिंग
दुसर्या भाषेत,
आपलं नाक कापून दुसर्याला अपशकून!
पण, अशी वागणूक सगळ्यांचीच नसते..
कन्सिस्टंटली वात्रट वागणार्यास लोक स्वतःहून बडवणारच. आपली क्रेडिबिलिटी आपणच एस्टॅब्लिश करायची असते. काही लोक स्पेशल शिवीगाळ करायला डुप्लिकेट आयड्या काढतात, हे मला अनुभवातून ठाऊक आहे. असल्या आयड्या वेचण्याचा माझा अनुभव भरपूर आहे अत्तपर्यंतचा.
तरीही, मी स्वतः लिहायला सुरुवात केली ती कशी, त्याचे अनुभवकथन वर केलेले आहे.
तेव्हा बांगड्या फोडणे, उर्फ, मी मरीन, पण तुला रंडकी करीन, हे डूआयडीचे वर्णन सार्थ असले, तरी, या म्हणी प्रमाणे वागणे टाळणारे संतप्त आत्मे ओळ्खून त्यांना प्रोत्साहन दिले तर बरे होईल असे म्हणतो.
;)
असो.
बिल झाले आता.
आय हॅव्ह ऑल्रेडी मेड माय प्वाईंट.
साहिर यांना मुद्दाम प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या उत्तराच्या अपेक्षेत..
नवीन, आकर्षक, करण्याजोगं असं
नवीन, आकर्षक, करण्याजोगं असं या व्यासपीठावर काय करता येईल या प्रश्नावर सदस्य आत्मीयतेने चर्चा करत आहेत हे पाहून बरं वाटलं. ऐसी सुरू होऊन सुमारे अडीच वर्षं झाली. या काळात एक स्वतंत्र ओळख तयार होते आहे हे दिसून येतं आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या कट्ट्यांमुळे या स्क्रीनवरच्या पांढऱ्यावरच्या काळ्या अक्षरांपलिकडे चेहरे, माणसं आहेत हेही लक्षात येतं आहे.
ऐसीचा युएसपी काय हे आत्ताच मांडण्याची, किंवा त्यावर चर्चा मी तरी करत नाही, कारण अजून मर्यादा स्पष्ट झालेल्या नाहीत. बरंच मोकळं अंगण आहे, जिथे आपण अजून पुरेसे बागडलेलो नाही. त्यामुळे सध्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे, जी काही बलस्थानं आहेत त्यापलिकडे इतर काय गोष्टी या माध्यमाद्वारे करता येतील हा प्रश्न मला जास्त महत्त्वाचा वाटतो.
१. सांस्कृतिक कट्टा
- एखाद्या भाषणाला, परिसंवादाला, नाटकाला, सिनेमाला, संगीताच्या जलषाला, चित्रकला प्रदर्शनाला एकत्र जायचं आणि नंतर कॉफी प्यायची गप्पा मारायच्या.
- कोणातरी लेखकाशी, नटाशी, उगवत्या दिग्दर्शकाशी गप्पा मारायला जमायचं. त्याच्या/तिच्या कामाच्या जागी, किंवा स्वतंत्रपणे कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये. गप्पांच्या बदल्यात सगळ्यांनी मिळून कॉफी पाजायची, जेवायला घालायचं. गप्पांमधून मुलाखत आपोआप होते.
२. ललित लेखन
- कथा, कविता, व्यक्तिचित्रणं ऐसीवर अधिक यावीत अशी मनापासून इच्छा आहे
- मेघनाने म्हटल्याप्रमाणे मुलाखती घेणं ही उत्तम कल्पना आहे.
- लेखनाविषयी शिकण्यासाठी आपल्या आपल्यातच काही लेखनाची वर्कशॉप्स घेता येतील.
३. ऐसीवरच्या लेखनाचं प्रिंट मीडियात प्रकाशन
- अनेक उत्तम चर्चा होतात, चांगले लेख येतात. यांच्यातल्या काहींचं रूपांतर मासिकांत, साप्ताहिकांत येऊ शकतील अशा स्वरूपात करता येईल.
- ते छापून येण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच काही प्रयत्न करावे लागतील. ऐसीच्या लेखकांकडून चांगलं लेखन येतं हे कळलं तर संपादकांकडून मागणी येईल.
नेहेमीप्रमाणे निगेटिव्ह थिंकिंगवाला प्रतिसाद देत आहे.
त्याकरता नवीन काय करता येईल?
इथे मायबोलीचा विषय लिहिलाच आहात म्हणून :
मायबोली हे कमर्शियल व्हेंचर आहे, व त्याचे कमर्शियल मॉडेल यशस्वी झालेले आहे. ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे. आजकालचे 'प्रथितयश' अण्णांसारखे असतात. 'भीड कहां हय? अगर भीड हय तो मय आवूंगा' असली मेंट्यालिटी अनेक प्रस्थापितांची असते.
ते नसेल, तर माझे पॉप्युलर नांव मी तुमच्या अनोळखी संस्थळास वापरायला दिले तर मला काय मिळेल? अशा प्रकारची विचारसरणी निर्माण होते आहे, तेव्हा 'संस्थळाबाहेरचे लोकप्रिय' इ. विसरा. परवाच एका 'लोकप्रिय' अभिनेत्रीने टीव्हीवर सांगितलेले : 'जो जास्त पैसे देईल त्या पक्षाचा मी प्रचार करीन'. निर्लज्जपणा पाहून कान, डोळे अन आत्मा निवले.
*
महिन्यातून एकदा एखाद्या ब्लॉगची ओळख करून देणे, त्यातल्या निवडक पोस्टांबद्दल चार ओळी सांगणे, असलं काहीतरी
ब्लॉग नामक प्रकारांबद्दल माझा अनुभव, म्हणण्यापेक्षा वाचनानुभव जरा विचित्र आहे.
काही हार्डकोअर मराठी ब्लॉगर्स मराठी संस्थळांपासून फटकून आहेत. काहीसा कडवटपणा त्यांच्या मनात आहे.
यापैकी काही उत्तम लिहितात. पण काहीना काही कारणांनी त्यांचे संस्थळ चालक्/संपादकांशी खटके उडून जणू सवतासुभा मांडावा तसे त्यांचे ब्लॉग्ज आहेत.
काही ब्लॉगर्सही संपूर्ण लेख संस्थळावर न टाकता, 'लेखासोबतची छायाचित्रे पहाण्यासाठी इथे क्लिका' अशा तळटीपा देतात, तेव्हा हे असे का? अशी शंका मनी येते. आय मीन इथे लिहिलेला लेख फक्त आपल्या ब्लॉगची जाहिरात म्हणून आहे, की जेन्युइनली या संस्थळावर येणार्या लोकांसमोर आपले म्हणणे मांडावयाचे आहे? अशी शंका मनात डोकावते. ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी संस्थळाचा वापर करण्याची टेण्डन्सी असलेले व अत्यंत अॅरोगंट असे काही ब्लॉगर्स मला ठाऊक आहेत. (अर्थातच काही मान्यवर यात समाविष्ट नाहीत. चुकून अंगुलीनिर्देश केल्यासारखे वाटते आहे खरे. मोठ्या मनाने माफी द्यावी ही विनंती)
तेव्हा, "ब्लॉगची ओळख करून देणे" याबद्दल माझ्यातरी मनात शंका आहेत. ओळख करून देण्याची फारच इच्छा असेल, तर त्या ब्लॉगर्सना इथे येऊन त्यांचे लिखाण इथे टाकायला कुणी बंदी घातली नाहिये. आपण आपल्या ओळखीच्या ब्लॉगर्सना इथे लिहिण्यास आग्रह नक्कीच करू शकतो; मात्र संस्थळाने उपक्रम म्हणून हे करावे असे मला अजिबात वाटत नाहीये.
(एका दैनिकात ब्लॉगची ओळख करणार्या सदरावरून झालेले ब्लॉग्जवरील गरळयुध्द मी पाहीलेलेल आहे ;) )
अधिक मुद्दे सुचतील तसे.
कोणत्याही कारणाने मराठी
कोणत्याही कारणाने मराठी ब्लॉगर्सना 'ऐसी अक्षरे'वर लिहावंसं वाटत नसेल तरीही त्याबद्दल आपण कशाला विचार करावा? कोणीतरी काही चांगलं वाचलं, त्याची ओळख बाकीच्यांना करून द्यावी तसंही याकडे पाहता येईल. चांगली पुस्तकं, चित्रपट, नाटक पहावं तसे ब्लॉग्ज. यात फक्त मराठी ब्लॉग्ज असायचीही अट नसलेली बरी, आपण बहुतेकसे लोक इंग्लिश वाचतोच.
(दैनिकात जी 'चूक' झाली, ती आपण टाळू शकतो. काय जे आवडलं त्याबद्दलच बोलावं की झालं.)
अवांतर - प्रसिद्धीचा बाजार
परवाच एका 'लोकप्रिय' अभिनेत्रीने टीव्हीवर सांगितलेले : 'जो जास्त पैसे देईल त्या पक्षाचा मी प्रचार करीन'. निर्लज्जपणा पाहून कान, डोळे अन आत्मा निवले.
मागे एका धाग्यावर कशाकशाचा बाजार असावा आणि नसावा याची चर्चा झाली होती. ('सज्ञान व्यक्तिंतील अनपायकारक (कायदेशीर) परस्परसंमती' असा काहीसा तिथे योग्यतेचा निकष होता.) त्या निकषाआधारे अभिनेत्रीचे वर्तन अयोग्य वाटत नाही. या निकषाशी मी तितकासा सहमत नव्हतो, पण मला अन्यथाही तिचे वर्तन अयोग्य वाटत नाही.
आत्महित , परहित
१. जाहीरात करणाराने वा प्रचार करणाराने आपले हित पाहावे कि जनतेचे?
२. मी अपोलोचे टायर मार्केट करावेत कि ब्रिजस्टोनचे हे मला कोंण जास्त पगार देते यावर निर्भर नाही काय? कोणते टायर चांगले आहे हे सांगताना मी एकही असत्य विधान नाही केले तर?
३. डॉक्टर रुग्णास तेच औषध वेगवेगळ्या ब्रँडमधे उपलब्ध असल्यास ज्या कंपनीने त्यांना जास्त मार्केटींग केलं आहे ते प्रिस्क्राइब करतात कि त्यांचा वेगळा निकष असतो?
अनुमोदन!
त्याकरिता अशा चित्रांपासून सुरुवात करावी, ही उपसूचना.
झालेच तर, 'न'वी बाजूंच्या जुन्या-नव्या मायक्रोसॉफ्ट पेंट-क्रेयॉनचित्रांचाही१ विचार करता येईल. या उपक्रमासाठी (वेळेच्या उपलब्धतेनुसार) चित्रांचे योगदान / पुरवठा करत राहण्यास 'न'वी बाजूंना प्रत्यवाय (तूर्तास तरी) नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------
१ 'मी पाहीलेला सूरयोदय' किंवा 'शॉरट सरकीटमूळे लागलेली आग'-छाप.
अवांतर
वरील उपचर्चेतून एक मुद्दा आटह्वला.
परवाचा गवि ह्यांचा फ्लाइट डिलेड हा लेख मला वॉट्सअॅपवर आला.
म्हणजे तो वॉट्स अॅप वर इतरत्रही फिरत असणार.
हे असच सोसायचं का ?
मागे पुणे- आय पी एल संदर्भात अगदि पुणे टीम जाहिर झाली तेव्हा छोटा डॉननं मस्त खुसखुशीत टिप्पण्या टाकल्या होत्या मिपावर. त्या फिरत फिरत त्यालाच इ मेलवर आल्या!
.
.
.
मी भुक्कड लिहितो हे देवाचे माझ्यावर किती उपकार आहेत ?! माझं सगळं लिखाण सुरक्षित राहतं!
काय करावं?
तिरके प्रतिसाद वाचायला त्रास होतो म्हणून इथे लिहीते आहे -
मी यांचा मुद्दा, ऐसीवरचं वातावरण प्रो-सवर्ण किंवा (माझ्या शब्दांत) ब्राह्मणी वाटल्यामुळे इतर समाजातले लोक ऐसीवर येणार नाहीत / बिचकतील. आणि त्यामुळे विविधता दिसणार नाही, आणि हा आपलाच तोटा आहे.
असं कोणाला तरी वाटू शकतं आणि त्यात आपला तोटा आहे म्हणून तरी आपण याचा विचार करावा हे पटतं. पण मग तो प्रो-सवर्ण किंवा ब्राह्मणी वाटू नये म्हणून काय करता येईल, असा प्रश्न पडतो. जाणूनबुजून भाषेचा बाज बदलायचा तर ते जमणार नाही, म्हणून हास्यास्पद होईल आणि जमलं तर कोणाला तरी खिजवल्यासारखं वाटण्याचीही शक्यता आहे. ज्या जातीत, बोलीभाषेत, समाजात जन्माला आलो ते कोणीच बदलू शकत नाही. त्याबद्दल अपराधगंड बाळगणंही योग्य वाटत नाही.
मग काय करावं?
+१
सहमत. आपणहून आपल्या भाषेचा बाज अथवा विषयांचा आवाका बदलण्यात काही अर्थ नाही.
माझे निरीक्षण असे आहे की किमान मिपाच्या तुलनेत तरी ऐसीवर एनाराय लोकांचा भरणा म्हणा प्रभाव म्हणा लैच आहे. एनाराय लोकांचा सामाजिक स्तर साहजिकच आम भारतीयापेक्षा जरा वरचा असतो आणि मराठी एनारायांमध्ये ब्राह्मणांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे भाषा किंवा विषय किंवा मते या बाबतीत ऐसी ब्राह्मणी वाटू शकणं अगदी साहजिक आहे. ब्राह्मणीही सर्वार्थाने नाही, कारण कैक एनाराय पारंपरिक ब्राह्मणी जाणिवेचे नाहीत.
त्यामुळे योग्य शब्द वुड बी 'उच्चभ्रू'. ऐसीचा जण्रल बाज असाच आहे.अन त्यात काही वाईट आहे असे मला वाटत नाही, सबब त्याबद्दल कुणी अपराधी वाटून घ्यायचं कारणही नाही. अन शिवाय ऐसी सुरू होऊन अडीच वर्षे झाली तरी अजून त्याचा पसारा तसा लहानच आहे. त्यामुळे या काळात सदस्याचा पोत अंमळ मोनोलिथिक असणे साहजिकच आहे. अन संस्थापकांसारखी विचारसरणी असलेले लोकच सुरुवातीला बहुसंख्येने आकर्षित होतात हेही निरीक्षण असल्याने यात वावगे कै वाटत नाही. संस्थळ म्हणून ऐसी मॅच्युअर व्हायला तसा अजून पुष्कळ वेळ आहे. (मॅच्युअर व्हायला वेळ म्ह. आत्ता बालिश आहे असे नै, फक्त अंमळ नवे आहे असे अभिप्रेत आहे.)
वरील विचारांबद्दल मतभेद असणे अगदी शक्य आहे, विशेषतः ऐसी पुरेसे मॅच्युअर झाले की नै याबद्दल(अर्थ परत मी दिल्याप्रमाणेच). पण माझे मत हे असे आहे.
सल्ला
मी यांचा मुद्दा, ऐसीवरचं वातावरण प्रो-सवर्ण किंवा (माझ्या शब्दांत) ब्राह्मणी वाटल्यामुळे इतर समाजातले लोक ऐसीवर येणार नाहीत / बिचकतील. आणि त्यामुळे विविधता दिसणार नाही, आणि हा आपलाच तोटा आहे.
मग काय करावं?
जे बीचकतील/येणार नाहीत अशांकडूनच (मग भले ते सवर्ण असो वा नसो) ते येण्यासाठी काय करता येईल असे विचारता येऊ शकते, माझ्या माहितीप्रमाणे असे ब्लॉगलेखक बोलावून त्यांना इथे लिहते(ब्लॉगवरचे लेखच पाहिजे असे नाहीतर निदान प्रतिसाद/किंवा चर्चात्मक लेख) केले पाहिजे, त्यांच्यामागे त्यांना फॉलो करणारेही येतील अशी शंका आहे. पॉप्युलर कल्चरमधले किंवा माइक्रोब्लॉगिंग करणारे इथे नित्यनियमाने लिहिणार नाहीत असे वाटते.
आत्ता आकार थोडा वाढवला आहे,
आत्ता आकार थोडा वाढवला आहे, (८२% होता, त्याचा १००% केला आहे, साधारण २५% वाढ). तो बदल जाणवत नसेल तर का होत नाहीये, हे पाहणं आलंच.
क्वोट करताना वेगळं दिसावं यासाठी काही करावं अशी सूचना कोणीतरी प्रत्यक्ष भेटीत केली होती. ते ही जमतंय का पाहते.
सध्या केलेला बदल दाखवण्यासाठी ब्लॉकक्वोट. हा बदल दिसायला बरा नसेल तर ते ही सांगा.
नवीन वेगवेगळ्या डिव्हाइसेस
नवीन वेगवेगळ्या डिव्हाइसेस रोजच्या वापरात आल्यामुळे आजकाल बहुतेक सगळ्या इ-कॉमर्स साइट वापरतात तसं रिस्पॉन्सिव्ह डिझाईन ऐसीने सुद्धा वापरायला हवंय असं वाटतंय. यामुळे मोबाईल अॅपची गरजसुद्धा कमी होइल.
रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे कोडिंगची अशी पद्धत, ज्यामुळे वेगवेगळ्या मापांच्या डिव्हाइसेसवर आपण पाहतोय ते पान त्या मापांनुसार नीट दिसेल.
यासाठी थोडी टेक्निकल मदत मी करु शकेन.
(अवांतर)
'घोळ' नावाचा (१) एक मासा असतो, आणि (२) अत्यंत काटेरी असतो, असे कायसेसे अंधुकसे१ आठवते. (चूभूद्याघ्या.२)
------------------------------------------------------------------------------------------------
१, २ "कारण शेवटी आम्हीं भटेंच! त्याला काय करणार?" - पु.ल.
माझे मत
'ऐसी'चा यूएसपी काय आहे?
चर्चेला येणार्या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः "आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा" वावर जास्त दिसतो (असे माझे मत आहे).
त्याकरता नवीन काय करता येईल?
मिपावर ऐसीपेक्षा अधिक हलके-फुलके वातावरण आहे, असे मला वाटते. अर्थात ऐसीने दुसरे मिपा व्हायची गरज नाही, गंभीर चर्चा हा ऐसीचा "ब्रँड" होऊ शकतो. एका हाताला "कॉलेज कट्टा टाईप मिपा" आणि दुसर्या हाताला "मराठी विकिपिडिया" याच्या मधली जागा ऐसी घेऊ शकेल. वर मी म्हणालो त्याप्रमाणे यूएसपी ठेवायचा असेल तर ऐसी इस ऑन राईट ट्रॅक.
ऐसीवर मला आवडणारी सदरे म्हणजे छायाचित्रण पाक्षिक-आव्हान, मुलाखती, ही बातमी समजली का?, अलीकडे काय पाहिलंत, सध्या काय ऐकताय/ ऐकलत?, माहितीचे लेख (चंद्रशेखर, प्रभाकर नानावटी यांचे लेख) इ.
संस्थळबाह्य उपक्रम करता येतील का?
महिन्यात एकदा कट्टा करणे, वार्षिक सहल, मराठी पुस्तकांचे प्रकाशन, मराठी उद्योजकता, अर्थशास्त्राबद्दल माहिती, ललित लेखन, एखाद्या मराठी शाळेत वाचनालयासाठी देणगी वगैरे. २-३ उद्दिष्टेच नजरेसमोर ठेऊन त्याप्रमाणे उपक्रम करणे बरे, असे मला वाटते.
चर्चेला येणार्या कुठल्याही
चर्चेला येणार्या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः "आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा" वावर जास्त दिसतो (असे माझे मत आहे).
मेरे तरफ से एक मार्मिक.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि
व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य या बाबतीत ऐसीची कथनी आणि करणी एक आहे. शिवाय "इथे" काय बोलायचे आणि काय नाही याबद्दल अप्रत्यक्ष नि सुचक विधाने केली जात नाहीत. मत न पटल्यास घाला घालतात पण त्यात अनुचित, गैर असे काहीच नाही.
व्यक्तिशः मला इथे केलेला गेलेला प्रतिवाद रिजनेबल वाटतो. लोक सहसा बरीच सहमती दाखवून चर्चा थांबवतात.
नैतरकाय.
नैतरकाय.
पटलं तर घ्या आणि राहा.( बाजारचं मॉडेल इथेही लागू होतं.)
१. अपेक्षित वस्तू बाजारात नसते.
२. अपेक्षित दुकानदाराने तंबू लावलेलाच नसतो. (शेजारी म्हणतात ते हल्ली इकडे येतच नाहीत.)
३. सांगितलेल्या भावाने विकत घेणारे गिऱ्हाईकच येत नाही.
४. बाजारात मालच नसतो. ( मग नक्की कोणत्या बाजारात असतो?)
५. गिऱ्हाईकांची गर्दीच नसते. ( ऑनलाईन बाजार वाढलाय म्हणे. B2B ?)
असो, चालायचंच.
शुभेच्छा!
शुभेच्छा!