Skip to main content

पसारा आवरणे -एक अंधश्रद्धा

" हे बघ गं, हे जाजम ठेवू का इथे? " नवर्‍याचा प्रश्राचा सूर ऐकून मी ताबड्तोब दिवाणखान्यात गेले. जाजम ऐटीत घडीत सोफ्यावर बसलं होतं.
"हे इथे? कसं दिसेल"
"मग कुठेतरी ठेवायचं आहेच ना? इथे ठेवलं तर हवं तेव्हा मिळेल. आणि ते टोचरं वाटू नये म्हणून मी त्यावर पंचा अंथरणारच आहे. "
हे माझ्या नवर्‍याचं एक फॅड आहे. त्याला खुर्चीच्या पाठी टोचतात म्हणून त्याच्या आधी उश्या खुर्चीवर विराजमान होतात. सोफ्यांच्या पाठी पंचे पांघरून बसल्यामुळे घरात कायमस्वरूपी एम.एफ. हुसेनचं श्वेतांबरा प्रदर्शन लागलेलं असतं.
"तू म्हणालास की मी पसारा आवरत नाहीय तर माझे कागदपत्र जागेवर ठेवतोय. मग आता हे काय चाललयं?" मी हुकुमी एक्का काढला " छे छे पसारा नाहीच आवरत मी . "
शाळेत असताना शेवटचा पेपर देऊन घरी आल्यावर आई म्हणायची " आता तुमच्या टेबलातला पसारा आवरून टाका." तेव्हा त्याचा अर्थ माझी या वर्षाची पुस्तके बहिणीच्या खणात शिफ्ट करणे, तिची पुस्तके चुलतबहिणीला देण्यासाठी काढून ठेवणे, जुन्या वह्यांची कोरी पाने काढून पुढील वर्षासाठी रफ वह्या तयार करणे इतकाच होता. पसारा ह्या शब्दाचं अपुरेपण मला लग्न झाल्यावर लक्षात आलं. नव्याचे नऊ दिवस संपून खरा संसार सुरू झाला. रोज सात वाजता घरी आल्यावर आ वासून पडलेलं वर्तमानपत्र, तळाशी चहाची बांगडी मिरवणारे कप, गळ्यात गळे घालून नांदणारे वापरलेले आणि धुतलेले कपडे हे दिसल्यावर मला दमल्यासारखं वाटायचं. पण झाशीच्या राणीच्या आवेशाने मी तो पसारा आवरायला लागायचे. एक आठ दहा दिवसांनी मला मी वर्षानुवर्षं घरकामात चिणलं गेल्याचा फिल येऊ लागला. मग मी नवर्‍यावर पसारा आवरणे या कामाला जुंपायचा चंगच बांधला. घरी आल्यावर मी "प्लीज जरा तो पसारा आवर ना. " म्हणून काम लाडिक आवाजात त्याच्यावर लादलं आणि स्वंयपाकघरातले प्रयोग करायला गेले. दोनच मिनिटात पसारा आवरल्याची आकाशवाणी झाली. वर "स्वैपाक करायला मदत हवीय का?" अशी ऑफर आली. बाहेर डोकावले तर पेपरची घडी झालेली. पूराच्या पाण्यात दोघाचौघानी एकमेकाला घरून कौलांवर बसावं तसं त्याच घडीवर काही कपडे एकमेकांना धरून बसलेले. ते धुवायचे या कलमाखालील होते. इतस्तत: विखुरलेले कपांचा पिरॅमिड केलेला. तेलाची बाटली टीपॉयवरचं अढळस्थान टिकवून होती. आधीच भाकरी जमत नसल्याने वैतागलेली मी पार सटकले. पाचदहा मिनिटात शब्दांच्या फैरी झाडून " मी जाते लायब्ररित. पुस्तक मी इतके दिवस पेंडिग कधीच ठेवलं नाहीय." म्हणून दार धाडकन आपटून बाहेर पडले. परत आले तर मी पाणी ओतून ठेवलेलं पीठ मउसूत मळून तयार होतं. नवरा तन्मयतेने भाकरि करत होता. तव्यावरची आधीची भाकरी फुगली होती. " बघ, हे किती चांगलं येतय मला. आपण असं करूया ते आवराबिवरायचं तू बघ मी स्वैंपाक करत जाईन."
अर्थात ही श्रमविभागणी माझा किचन-कॉन्फिडन्स वाढेपर्यंतच टिकली. मी सुद्धा "पसारा आवर" या एका वाक्या ऐवजी कोबोल प्रोग्रॅम लिहिल्यासारख्या सुटया सुचना द्यायला शिकले, आणि कोणी येणार असेल तेव्हा तरी पसारा आवरायचा हे नवर्‍याने मान्य केलं. त्यातही "कोणी आपल्याकडे पसारा बघायला येत नाही. मन निर्मळ पाहिजे. मनापासून स्वागत करता आलं पाहिले पाहुण्यांचं" ह्या तत्वज्ञानाचे डोस पाजत त्याने पुढे त्यातून अलगद सुटका करून घेतली. मी ही मग आपल्याच घरातल्या पसार्‍याकडे दुर्लक्ष करण्याच्या कलेत पारंगत झाले. इतकी की शेजारच्या चिमुरडीने "काकू तुमच्या घरात एवढा पसारा का असतो नेहमी?" असा थेट प्रश्न विचारल्यावर तो मनाला लावून न घेता "तुझी आई घरीच असते ना म्हणून तिला वेळ मिळतो आवरायला. मला कसा मिळणार वेळ? " असं थेट उत्तर मला देता आलं. एकदा नणंदबाई आल्यावर या तत्वज्ञानाची पीसं काढली गेली. ती आम्हा दोघांना "घर आवरत जा जरा. " चा उपदेश करत असताना या बहिण भावापुढं "मन सुद्द तुजं" असं म्हणत नाचणार्‍या रामभाऊंसारखं नाचायला सुरू करावं काय असा विचार मनात चमकून गेला. पण एकंदरीत पसारा करण्याच्या कलेत मी गुरूपेक्षा पारंगत झाले. कोणी आलं तर काही वाटून न घेता सोफ्या वरचे कपडे, पेपर आदी बाजूला सारून बिनदिक्कत "बसा ना" असं म्हणता येऊ लागलं. सोसायटीचे सेक्रेटरी तर "नको, उगाच कशाला त्रास घेताय मी बसत नाही " असं म्हणत उभ्याउभ्याचं काम सांगायचे. नवर्‍याचे मित्र आले तर आताच रणकंदन झालयं की काय असं वाटून दारातल्या दारातून सटकायचे. मग पसार्‍याचे फायदेही लक्षात येऊ लागले.
त्यामुळे मुलं झाल्यावर घराचा नीटसपणा गेल्याचं दु:ख मला अनुभवाला आलं नाही. उलट मुलीला स्वत:च्या वस्तू स्वत: जागेवर ठेवायला पाहिजेत हे फार लवकर कळलं. एकदा टाय मिळाला नाही म्हणून ती रडत शाळेत गेली तेव्हा मात्र माझ्या नवर्‍याला स्वत:च्या तत्वज्ञानाचा पुनर्विचार करावासा वाटू लागला. मग पसारा आवरण्याचं त्यानं मनावर घेतलं. दिवसाला एक तास तो पसारा आवरण्याला देऊ लागला. ड्रॉवर असलेली कपाटं बनवून घेतली. कुठे काय ठेवायचं यावर महाचर्चा झाल्या. हॉलमधले "सहा खण" हा तिळा दार उघड सारखा परवलीचा शब्द झाला. कुठलीही गोष्ट जागेवर ठेवायची म्हणजे त्या सहा खणात ठेवायची हे समीकरण पक्कं झालं. हरवलेल्या वस्तूबद्द्ल "त्या सहा खणांपैकी कशात असेल" असं एकमेकांना सांगू लागलो. त्या दरम्यान माझ्या पासपोर्टचं काम चालू होतं. पोलीसठाण्यातून बुलावा आला होता. इतर कागदपत्र तयार होती. पण रेशनकार्ड मिळत नव्हतं. मग ऑफिसला दांडी मारून शोधण्याखेरिज गत्यंतर नव्हतं. मी सकाळपासूनच शोधाशोध सुरु केली. नवरा "तुला नाही मिळालं तरं हाफ डे घेऊन येईन आणि शोधेन" असं आश्वासन देऊन चालता झाला. सगळं घर शोधलं. हरवलेल्या असंख्य वस्तू सापड्ल्या पण रेशनकार्ड मिळेना. शेवटी निराश होउन मी चक्क धान्यांचे डबेही उघडून बघीतले. पण नाही म्हणजे नाहीच. धरतीने गिळलं की आकाशात उडालं? या संभ्रमात असतानाच नवरा घरी आला. मी ओतत असलेला अंगार मुकाट्याने गिळत त्याच त्याच जागी परत शोधू लागला. पावणेसहा झाले होते. सहाला निघायचं होतं.
नवर्‍यानं त्याचं "मनाचं" तत्वज्ञानास्त्र बाहेर काढलं. "हे बघ. आता मनाची टिकटिक होउ देऊ नकोस. आता आहेत ती कागदपत्र घेऊन जाऊयात. शांत हो. मन शांत असणं महत्वाचं. कदाचित काम होईलही. नाही झालं तर बघू. रडून आणि चिडून फार अवतार करून घेतलायस. आंघोळ करून घे फ्रेश वाटेल मग निघूयात." माझ्या कडेही दुसरा काय पर्याय होता? आंघोळ करून आले तेव्हा नवरा हातात रेशनकार्ड घेऊन उभा. (युरेका हा शब्द उच्चारण्याची संधी आंघोळ केल्यावरच मिळत असावी.)
"ते वरच्या रद्दीच्या कपाटात रिकामे खोके होते त्यातपैकी एकात मिळालं." - तो.
"त्यात कसं गेलं? "
"चल आधी मग सांगतो."
मग नंतर उलगडा झाला. "मागे आपण नविन माउस आणला ना तेव्हा त्याचा खोका तिथेच कॉंम्प्युटर ट्रॉलीवर होता.मी पसारा आवरताना त्यात बरोबर बसलं म्हणून ठेवलं."- नवरा.
"पण तू ते कार्डं खणातून काढून त्यात का ठेवलसं?"
"त्या दिवशी मी काहीतरी शोधायला खण उघडला तर हा सगळा पसारा. त्यात मग त्यांचं सॉर्टींग करताना वाटलं हे या पसार्‍यात हरवून जाईल. मग त्या खोक्यात ठेवून खोका होता तिथंच ठेवला होता पण तो तिथं रद्दीच्या कपाटात कसा गेला?"
"मी कॉंम्प्युटरजवळचा पसारा आवरताना तो खोका रद्दीत टाकला. पण टाकण्याआधी मी उघडून पाहिला होता. "
"तू वरचं प्लॅस्टीकचं आवरण काढून पाहिलस मी त्याखाली व्यवस्थित ठेवलं होतं. पण विसरूनच गेलो होतो. म्हणून तुला म्हणतो की वस्तू हाताशी लागतील अश्याच असल्या पाहिजेत."
आता पसारा ही वस्तू हाताशी लागतील अश्या ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था असून पसारा आवरल्याने वस्तू जागेवर मिळतात ही अंधश्रद्धा असल्याची माझी खात्री झालीय.

अवांतर: घारे सरांचा खुसखुशीत लेख वाचून लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं.

Node read time
5 minutes
5 minutes

बॅटमॅन Mon, 31/03/2014 - 15:13

In reply to by स्वरा

असेच काही नाही. चड्डी-बनियन, झालंच तर फॉर्मल कपड्यांवरही तितकाच अवलंबून असतो हे ध्यानात आणून देऊ इच्छितो.

बॅटमॅन Mon, 31/03/2014 - 16:08

In reply to by स्वरा

अंहं चुकलात. आवराआवरीत जीन्स किती आहेत यावर जसा वेग अवलंबून आहे तद्वतच चड्ड्याबनियन किती अन फॉर्मल कपडे किती आहेत या % वरही त्या क्रियेचा वेग अवलंबून असतो असे सुचवावयाचे होते. अर्थात तुम्ही म्हणता तो अर्थ घेतला तरी चालेल, यद्यपि जरा वेगळा अर्थ होईल.

अन फॉर्मल कपड्यांतही आवराआवरी करायला अडचण कैच नसते. जरा इस्त्री बिघडली तर लगेच टोनी स्टार्क बनायचे, हाकानाका.

अनामिक Mon, 31/03/2014 - 16:10

In reply to by स्वरा

फॉर्मल कपड्यांत कशी करणार आवराआवरी..?

जशी जीन्स आणि चड्डी-बनियनमधे करता तशीच... कपडे सोडून काहीह बदल नाही :p

'न'वी बाजू Fri, 25/04/2014 - 20:22

In reply to by स्वरा

द्रवाचे मोजमाप लिटरऐवजी ग्यालनमध्ये करणार्‍या देशाचा असल्याकारणाने, विनोदाच्या वरील प्रयत्नाची अधिकृत दखल घेऊ शकत नाही.

बाकी चालू द्या.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

'आमचा' ग्यालन. साम्राज्याचा नव्हे.

'न'वी बाजू Mon, 31/03/2014 - 16:25

मी सुद्धा "पसारा आवर" या एका वाक्या ऐवजी कोबोल प्रोग्रॅम लिहिल्यासारख्या सुटया सुचना द्यायला शिकले

कोबॉल??????

भारीच बै प्राचीन तुम्ही!

आनंद घारे Mon, 31/03/2014 - 17:04

या लेखात बहुधा माझ्या लेखाचे वाभाडे काढले असावेत असे मला मथळा वाचतांना उगाचच वाटले होते आणि ते तुकडे गोळा करण्याची मनोमन तयारी केली होती. पण हा लेख तर चक्क माझ्या लिखाणाची पुष्टी करणारा निघाला आणि कॉलर जास्त ताठ झाली. पसारा करायचा आपला जन्मसिद्ध अधिकार नवरोबाने गाजवायचा हे बहुधा जागतिक सत्य असावे. नवरा म्हणजे घरातले दुसरे (किंवा तिसरे) मूल आहे असे उगाच म्हणत असतील का? पण त्याबद्दल त्याच्या बायकोला काय काय भोगावे लागते हे छान दाखवले आहे. काही वेळा पसारा आवरण्यामुळे प्रश्न निर्माण होतात ही पंचलाईन मस्तच!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/03/2014 - 19:26

'चहाची बांगडी' आणि 'कोबोल प्रोग्रॅम लिहिल्यासारख्या सुट्या सूचना' हा प्रकार फारच आवडला.

अक्षय पूर्णपात्रे Mon, 31/03/2014 - 19:34

एकटाच राहत असतांना माझे बरे चालले होते. बेडवर पसरलेल्या गोष्टी एका बाजूला लोटून स्वतःसाठी जागा करत झोपता येत असे आणि सकाळी बेडवर काहीच संस्कार करावे लागत नसत. आजकाल फार घड्या कराव्या लागतात. 'पसारा हाच माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे' असा अडगळीत पडलेला युक्तिवाद मूल झाल्यानंतर बाहेर काढला होता. पण पसारा वाटतो म्हणून परत ठेऊन दिला.

ऐसि पाहुणा Tue, 01/04/2014 - 05:14

पसारा आवरणार्‍या लोकांना ऐसिवर व्हिलन समजले जात आहे असे वाटते. मि पसारा व्यवस्थित आवरुन ठेवतो म्हणजे मि कुल नाही हे आपसुक ठरुनच गेले म्हणायचे. चाळिच्या दोन खोल्यांत बालपण गेल्याने सवयच लागलि. असो.

पाहुणे येतिल म्हणुन पसारा आवरणारे लोक दिखाउपणा करतात असे म्हणणे बरोबर ठरेल का? (म्हणावे असेच माझ्या मनात आहे पण विचारुन घेतो नैतर भडकाउ श्रेणि मिळायचि.) जाणकारांनि प्रकाश पाडावा.

आनंद घारे Tue, 01/04/2014 - 08:16

In reply to by ऐसि पाहुणा

कोणत्याही माणसाला स्तुती आवडते, निदा आवडत नाही हा मानवी स्वभाव आहे. इतरांचे मूल्यमापन करत राहणे हा सुद्धा मानवीच काय प्राणीमात्रांचासुद्धा गुणधर्म आहे. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कोणी पहात आहे असे वाटते तेंव्हा त्याने आपल्याला चांगले म्हणावे यासाठी आपण चांगले दिसावे असा प्रयत्न करणे क्रमप्राप्त होते. यामुळे दिखाऊपणात काही वाईट समजण्याचे कारण नाही.

अनामिक Tue, 01/04/2014 - 08:21

In reply to by ऐसि पाहुणा

पसारा आवरणार्‍या लोकांना ऐसिवर व्हिलन समजले जात आहे असे वाटते.

असं काही नाही. हेच सगळे "निटनेटकेपणा-माझा मित्रं" असा लेख आल्यावर त्यावरही तुटून पडतील. आम्हाला घर कसं आवरलेलं आणि स्वच्छं लागतं असं सांगत सुटतील. भिंतीला लावलेल्या बेडमागच्या फटीत चुकून कागदाचा चिटोरा पडला तो काढायला किती कष्टं घेतले तेही सांगतील. थोडक्यात काय गंगा जिधर बेहती है उधर बेहनेका, क्या?

ऋषिकेश Tue, 01/04/2014 - 09:05

व्वा! रामदास काका नी घारे सरांच्या लेखानंतर जी आशा होती, तश्या छान ललित लेखनाच्या वर्षावातील ही सर अगदीच आवडली!
नववर्षात वाचलेला पहिलाच ललित लेख आवडून गेला. वर्ष आनंदात जाण्याची लक्षण दुसरं काय? :)

मी Tue, 01/04/2014 - 12:42

किस्सा १. -
ठाण्याच्या उन्हाळ्यात(मुंबइसारखा नसला तरी फारसा रम्य नाही) एका रुममेटला स्वच्छतेची फारशी आवड नव्हती, त्यातुन घरातल्या सगळ्या खोल्यांमधे उन+धूळ कायमचे वास्तव्यास असे, हा रुममेट गादीवर जेवढ्या भागात झोपत असे तेवढा भाग सोडून गादीचा इतर भाग आणि खोलीचा इतर भाग धुळीने आच्छादित असे, त्याला घामही फार येई, एकदा तर गादीला बुरशी लागली होती अशी शंका मला आली होती, त्याचे ते सप्तपदीप्रमाणे अनेक पाय खोलीत इतरत्र उमटलेले असत, इथे त्याच्याबद्दल लिहायला घेतली तर घासकडवींनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्तीचित्रण पुर्ण होइल.विस्तारकंटाळ्याने पुन्हा कधी.

किस्सा २. -
माझ्या एका रुममेटच्या खोलीत प्रवेश करताना लँडमाइन असल्याप्रमाणे आम्ही वावरत असु, जमिनीवर पडलेल्या कपड्यांखाली नक्की काय येईल ह्याची शाश्वती नसे, तो कपडे १५ दिवसातून एकदा धुवत असे, खाली पडलेल्या कपड्यांपैकी ज्याला कमीत कमी वास येतो असे कपडे तो वापरत असे. घरात एखादी गोष्ट न सापडल्यास, त्याच्या खोलीत सापडण्याची हमी होती, तिथेही न सापडल्यास त्याच्या गाडीत सापडण्याची हमी होती, पण शोधण्याची हिम्मत मात्र नव्हती.

बॅटमॅन Tue, 01/04/2014 - 12:54

In reply to by मी

आमचेही काही मित्र असे होते. हॉस्टेलात तसेही आंघोळ रोज करणारे मूर्खच गणले जातात, पण हे लोक जबरीच होते. आठवड्यातून एकदा केली न केली तरी बास. एकाची अशी तर्‍हा तर दुसर्‍याची दुसरीच तर्‍हा. तो नियमित आंघोळ करायचा, पण अंतर्वस्त्रप्रक्षालनाचे त्याला अंमळ वावडेच होते. शिवाय आंघोळ केली, की टॉवेलचा मुद्दा करून फेकून देत असे. त्या टॉवेलमध्ये जीवसृष्टी निर्माण करण्याचे पोटेन्शिअल आहे असा आमचा लै जुना दावा होता-यद्यपि टेस्ट करण्याची हिंमत कुणातही नव्हती. कधीमधी वादविवाद झाला तर अंतिम धमकी म्हणून "त्या मित्राचा टॉवेल फेकून मारीन" असे सांगत असू.

आमचा एक सीनियर होता, उगा फुकट माज करायचा. एकदा मात्र त्याचा माज उतरवायची संधी मिळाली खरी. एकदा त्या मित्राच्या रूमवर आला रहायला. आंघोळीला टॉवेल मागू लागल्यावर "तोच" टॉवेल दिला. आंघोळीहून परत आल्यावर त्याचे तोंड बघण्यालायक झाले होते. तेव्हा कैक मित्रांच्या तोंडावर अगदी "बुडाला औरंग्या पापी" छाप एक्स्प्रेशन होते ते अजून आठवते आहे.

बाकी कैक रूम्स या टूथपेस्ट संपल्यावर वार लावून जेवावे तशा आज या रूमकडे तर उद्या त्या रूमकडे अशा टूथपेस्ट मागत असत. एका मजल्यावर १० खोल्या असायच्या, त्यापैकी किमान २-३ खोल्या अशा जगताना पाहिलेल्या आहेत. एका रूमची एकच एक सामाईक टूथपेस्ट असे.

ते हि नो दिवसा गता:.......................................

'न'वी बाजू Tue, 01/04/2014 - 16:21

In reply to by बॅटमॅन

@मी आणि @बॅटमॅन:

अधिक लिहीत नाही, कारण हम लिक्खेगा तो बोलोगे के लिखता है (नि थत्तेचाचा म्हणतील '.'), आणि तसेही तूर्तास सविस्तर लिहिण्याचा कंटाळाच आहे, पण...

... तुम्हा मंडळींचे किस्से वाचून तुम्ही आणि तुमची मित्रमंडळी ही ऑब्सेसिवली अतिरेकी स्वच्छताप्रेमी होता, असे दुर्दैवाने आणि खेदपूर्वक सुचवावेसे वाटते.

अरेरे! देवा रे, कसे रे होणार या भारतवर्षातील हॉष्टेलसंस्कृतीचे! कसले कसले दिवस पाहायला मिळताहेत रे, देवा! या पुढल्या पिढ्यांत पिढ्यांपुढे काही दम आदर्श राहिलेला नाही, हेच खरे!

- (भारतीय हॉष्टेलसंस्कृतीच्या नावाने अतीव डिप्रेशनमध्ये गेलेला कोणे एके काळचा हॉष्टेलवासी, आणि अजूनही जुने आदर्श पूर्णपणे न सोडलेला आजचा गृहस्थाश्रमी) 'न'वी बाजू.

बॅटमॅन Tue, 01/04/2014 - 16:23

In reply to by 'न'वी बाजू

नै आता होऊनच जौदे. सविस्तर किस्से वाचण्यासाठी महोत्सुक झालो आहो.

(नवीबाजूंच्या सविस्तर लिखाणाचा फॅन) बॅटमॅन.

'न'वी बाजू Tue, 01/04/2014 - 16:58

In reply to by बॅटमॅन

- आठवड्यातून एकदा आंघोळ करणे हे सॅक्रिलिज आहे, असे नम्रपणे सुचवू इच्छितो. (कुठे फेडाल ही पापे?) किमान महिन्या-दीडमहिन्याचा अवसर तरी दोन आंघोळींमध्ये द्यायला पाहिजे, असे शास्त्र सांगते. हिवाळ्यात हिवाळ्याचे निमित्त करून हा कालावधी शक्यतो आणखीही वाढवता आला, तर उत्तम.

- पंधरवड्यातून एकदा कपडे धुणे??? यासारखा पाण्याचा अपव्यय दुसरा नसावा. आमचा एक सन्मित्र (त्यानेच सांगितल्यानुसार - आम्ही पाहायला गेलो नव्हतो, हे आधीच स्पष्ट करणे इष्ट आहे.) अंतर्वस्त्रे एका बाजूने काळी पडेपर्यंत वापरून झाल्यावर, तीच उलटून दुसर्‍या बाजूने काळी पडेपर्यंत घालत असे. दुसर्‍या एका सन्मित्राकडे कधी काळी पांढरा असण्याची शक्यता अगदीच नाकारता येणार नाही, अशी शंका निर्माण करणारा एक लेंगा होता. त्याला पाण्याचे दर्शन फार फार तर, अगदी खूपच झाले तर सेमिष्टरमधून एकदा होत असे.

- बाकी, आमची स्वतःचीच तारीफ आम्हीच काय बरे करावी? परंतु, क्वचित कधी कपडे धुवायला घेतलेच, तर ते धुण्याकरिता भिजवून ठेवल्यावर ते भिजवले आहेत, हे पुढील आठवडाभर विसरून जाणे. मग त्यानंतर ते धुतल्यावर इनएविटेबली प्रचंड वास मारतातच. मग अशा अवस्थेतले ते कपडे खोलीतीलच नायलॉनच्या दोरीवर वाळत घातल्यावर, (१) ते लवकर वाळावेत, आणि (२) त्यांचा वास खोलीतून बाहेर पडावा, या दुहेरी प्रयोजनाकरिता खोलीत जोरदार पंखा लावणे. मग, आपली खोली आणि आपल्या मागली खोली यांच्यामध्ये 'व्हेंटिलेशन' या सबबीखाली माळ्यावर जी एक कॉमन जाळी असते, त्यातून तो वास आपल्या खोलीतून पूर्णपणे बाहेर पडून आपली खोली सुसह्य होते. पुढे मग आपल्या मागच्या खोलीतला जाणे, आणि त्याचे नशीब जाणे. तो इनएविटेबली शिव्या घालतोच - त्यातून आपला तमिऴ अपशब्दसंग्रह अधिक समृद्ध होतो हा अधिकचा फायदा - पण एवीतेवी तोही आपला दोस्तच. अत एव त्यातलाच. तो रिटर्न फेवर मारू शकतो, याची त्याला कल्पना असतेच, सबब तोही तसा शांतच असतो.

- बाकी, चुकून जर कधी आवरोमेनियाचा झटका आलाच, आणि खोली स्वच्छ केलीच (बोले तो, खोलीतील अनावश्यक गोष्टी खोलीच्या दाराबाहेर ढकलून देणे. हॉष्टेलचा जमादार पुढील काळजी घेतोच.), तर खोलीचा शेण्टर ऑफ ग्र्याविटी अचानक खोलीबाहेर जाऊन हलकेहलके वाटत असे.

इतरही अनेक हॉष्टेलकिस्से आहेत, पण ते स्वच्छता / नीटनेटकेपणासंबंधित नाहीत. ('अवर एक्स्पेरिमेण्ट्स विथ आर्सन' / 'अवर वेज़ ऑफ लिविंग डेंजरसली' / 'पाळीव प्राणी - भटकी कुत्री आणि आम्ही' / 'लुक्रेशियाचे पट्टशिष्य - अर्थात, आमचे खाद्यजीवन' असे तर्‍हेतर्‍हेचे विषय आहेत. त्यांसंबंधी पुन्हा कधीतरी.)

मन Tue, 01/04/2014 - 17:14

In reply to by 'न'वी बाजू

इतरही अनेक हॉष्टेलकिस्से आहेत
येउ द्यात.
प्लीझ येउ द्यात.
ह्यावेळी तेवढ्याचसाठी तुम्हाला "भडकाउ" अशी श्रेणी न देता माहितीपूर्ण दिली आहे.

मी Tue, 01/04/2014 - 17:39

In reply to by 'न'वी बाजू

किस्से तसे ओळखीचेच आहेत, फक्त हॉस्टेल वेगळे होते.

अश्याच एका हॉष्टेलात मी माझ्या मित्रासमवेत गेलो होतो, त्याच्या खोलीवर पोहचताच त्याने त्याचे बुट उतरविले आणि मला 'भडभडून'(शब्दशः) आले, टेस्ट डेव्हलप व्हायला लागते त्याप्रमाणे गंधही डेव्हलप व्हायला लागतो हे माझ्या मित्राकडे आणि त्याच्या साथीदारांकडे पाहुन लक्षात आले. त्या मोज्यांचा उपयोग क्लोरोफॉर्म म्हणून अवश्य करता यावा.

तुमचे 'मोज्यांवरचे' ते आख्यानही येउद्यातच.

बॅटमॅन Tue, 01/04/2014 - 17:50

In reply to by 'न'वी बाजू

त्या रम्य आठवणींच्या आठवणींबद्दल अतिशय धन्यवाद!!!!

-आंघोळीचा तसा स्वतः ऐकलेला उच्चांक १५ दिवसांचा आहे. टिपिकली स्पीकिंग, ५-६ दिवसांपेक्षा जास्त अंतर पडल्यास फावल्यावेळच्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये त्वग्मलनिष्कर्षण या महान कर्माचा समावेश होतो(एक मित्रवर्य या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी अख्ख्या मित्रवर्तुळात जगप्रसिद्ध होते-आहेत) अन चुकूनमाकून पाण्याचे दर्शन झाले तर मांजरासारखी प्रतिक्रिया होते. अन हाईट म्ह. तितक्या दिवसांनी आंघोळ केल्यास चेहरा जो कै अंमळ साफ इ. होतो असे आंघोळ करणारास वाटते त्यावर इतर सगळे नेमकी उलट प्रतिक्रिया देतात. आंघोळ केल्यावरही आंघोळ न करता दिसायचे त्यापेक्षा वाईट दिस्तात इ.इ. हे कै उमगत नै मात्र. आंघोळ म्ह. होस्टेलजीवनातल्या महाभारतातले शांतिपर्व आहे-सर्वांत मोठे अन अनेकविध उपाख्याने असलेले.

-अंतर्वस्त्रासंबंधी अजूनेक किस्सा आठवला, तो म्ह. आमचे एक मित्रवर्य त्यांच्या प्रियतमेस घेऊन खरेदीला जात असत-अन खरेदी म्ह. अंतर्वस्त्रांची असे. सेमिष्टरास किमान ५-७ जोड तरी आरामात जात, असे आठवते. कितीवेळा खरेदी केली इ.इ. ताळेबंद कधी मित्रवर्यांकडून तर कधी त्यांच्या प्रियतमेकडून काढून घेतला जात असे."व्हाय वॉश व्हेन यू कॅन बाय न्यू वन?" हे तत्त्व त्यांनी सांगितले.

अन

परंतु, क्वचित कधी कपडे धुवायला घेतलेच, तर ते धुण्याकरिता भिजवून ठेवल्यावर ते भिजवले आहेत, हे पुढील आठवडाभर विसरून जाणे. मग त्यानंतर ते धुतल्यावर इनएविटेबली प्रचंड वास मारतातच. मग अशा अवस्थेतले ते कपडे खोलीतीलच नायलॉनच्या दोरीवर वाळत घातल्यावर, (१) ते लवकर वाळावेत, आणि (२) त्यांचा वास खोलीतून बाहेर पडावा, या दुहेरी प्रयोजनाकरिता खोलीत जोरदार पंखा लावणे.

जितके पर्सनल लिहाल तितके ते युनिव्हर्सल होते या तत्त्वाचं अजूनेक उदा. दिल्याबद्दल अतिशयच धन्यवाद. तुम्ही मनकवडे आहा की कसे, असे विचारावे वाटत होते. कपडे बादलीत घातल्यावर ते धुवायचे विसरून गेले, तर काही दिवसांनी बादलीत एक चिकट्ट पांढरट थर तयार होतो. त्यापासून मारणारा वास निघणे त्या कपड्याच्या या जन्मी तरी निव्वळ अशक्यच. मग ते कपडे नुस्ते सुकल्यावर भर उन्हात किमान २-३ दिवस ठेवणे अन मग डिओचे थरावर थर मारल्याशिवाय परिधान न करणे इ.इ. ओघाने आलेच.

आवरोमेनियाबद्दलही तंतोतंत अस्सेच.

कुत्र्याबद्दल सांगायचे तर तूर्त वानगीदाखल हा एक किस्सा पुरा ठरावा. स्थळ आहे जिथे काय उणे. तेथील एक वसतीगृह. उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री लघवीस जावयाचे म्हणोन आमचा एक रूममेट उठला. झोपेत असल्याने दार धड बंद करावयाचे विसरला. खोलीत फुल स्पीडने पंखा सुरू होता, अन फट फट फट असा एक आवाज सारखा येत होता. पण झोप अनावर असल्याने तिकडे दुर्लक्ष केले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो, कॉटखालची बादली सरकवली इतक्यात....

इतक्यात कॉटखालून एक पांढर्‍या रंगाचे श्वान एकदम उसळून बाहेर आले आणि तुफान वेगाने खोलीबाहेर गेले. जे झालं ते इतक्या क्षणार्धात झालं की इट टुक अ मोमेंट टु सोक इन इट्स ऑसमनेस कंप्लीटलि.

गब्बर सिंग Fri, 25/04/2014 - 04:30

In reply to by बॅटमॅन

होस्टेल मधील सुमधुर जीवनाबद्दल चर्चा ... याचा वेगळा धागा असावा.

बेदर्द जमाना क्या जाने कैसी ये पढाई होती है...
(शेर कंप्लीट करण्याची गरज आहे ???)

अर्धवट Wed, 02/04/2014 - 09:57

In reply to by 'न'वी बाजू

अंतर्वस्त्रांच्या किश्श्यावरून "भिंती गेल्या कॉलम राहिले" हि अवस्था अत्यंत हताशपणे सांगणारा एक मित्र आठवला आणि भरून आलं

मी Tue, 01/04/2014 - 16:35

In reply to by 'न'वी बाजू

भांडे लपवू नका, ताक तुमच्याकडेच आहे, हँगओव्हरही तुमचाच आहे, आम्ही मायबाप गरीब वाचक.
किंवा
टिझर ट्रेलर न दाखवता आगामी चित्रपटाची झैरात करणे सध्याच्या चित्रपट व्यवसायात फाऊल धरला जातो, दामले/थत्तेंच्या(तुमचा काळ) वेळी गावात पोस्टर लावून चालत असावे. ;)

अमुक Tue, 01/04/2014 - 17:02

In reply to by 'न'वी बाजू

तुमची आवडती 'भडकाऊ' श्रेणी न देता 'उपेक्षित' अशी श्रेणी देऊन तुम्हांला भडकावण्याचा, किमानपक्षी उचकवण्याचा प्रयत्न आहे.
बोले तो, कृपया लिहिण्याचे करावे ही विनम्र के साथ की हुई विनंती.

अजो१२३ Tue, 01/04/2014 - 17:37

कोणी आलं तर काही वाटून न घेता सोफ्या वरचे कपडे, पेपर आदी बाजूला सारून बिनदिक्कत "बसा ना" असं म्हणता येऊ लागलं. सोसायटीचे सेक्रेटरी तर "नको, उगाच कशाला त्रास घेताय मी बसत नाही " असं म्हणत उभ्याउभ्याचं काम सांगायचे. नवर्‍याचे मित्र आले तर आताच रणकंदन झालयं की काय असं वाटून दारातल्या दारातून सटकायचे. मग पसार्‍याचे फायदेही लक्षात येऊ लागले.

भारीच.

ॲमी Tue, 01/04/2014 - 18:00

बापरे! भयानक किस्से सांगतायत लोक्स :O.
आधी वाटल मेक, प्रॉड, सिव्हील वगैरे (जिथे मुली कमी असतात तिथली) मुलं अशी रहात असतील. पण प्रियतमा वगैरे असलेलीपण तसंच वागतात म्हणजे अवघड आहे...

बॅटमॅन Tue, 01/04/2014 - 18:04

In reply to by ॲमी

आधी वाटल मेक, प्रॉड, सिव्हील वगैरे (जिथे मुली कमी असतात तिथली) मुलं अशी रहात असतील.

या सरसकटीकरणाचा किती खच्चून निषेध करू ओ आँ???????????????? जरा डॉळे उघडे ठेवा की हो, च्यायला. अशीच कमेंट मुलींबद्दल कुणी केली तर सगळे येऊन वाभाडे काढतील.

ॲमी Tue, 01/04/2014 - 18:47

In reply to by बॅटमॅन

आक्षेप कळला नाही. आमच्या चारी वर्षात मेकला २, प्रॉडला ० आणि सिव्हीलला ७ मुली होत्या म्हणुन तसं लिहील. की तुमचा आक्षेप 'या ब्रांचची मुलं अस्वच्छ असतात असे मी म्हणतेय' या समजुतीने केला आहे?

बॅटमॅन Tue, 01/04/2014 - 18:57

In reply to by ॲमी

होय, त्याच समजुतीने केला आहे.

बाकी इन जण्रलही आहेच. एतत्सदृश कमेंट कुणी बायकांवर/मुलींवर केली की मगच ऐसीवरचे श्रेणीधुरंधर सरसावतात अन आता मात्र अळीमिळी गुपचिळी असते. असो.

ॲमी Tue, 01/04/2014 - 19:04

In reply to by बॅटमॅन

मला नक्कीच तसं म्हणायच नव्हत. तसा अर्थ निघत असेल तर my bad.. ज्या मुलांचे किस्से तुम्ही सांगितले ते या ब्रांचचे असण्याची शक्यता जास्त आहे, असा माझा अंदाज होता (जो बहुतेक चुकीचा आहे).

नितिन थत्ते Tue, 01/04/2014 - 20:44

In reply to by बॅटमॅन

>>या सरसकटीकरणाचा किती खच्चून निषेध करू ओ आँ?

हे काय आणखी?

निषेध करायचाच तर पुरेसे सरसकटीकरण नसल्याचा करायला हवा. मेक, प्रॉड, सिव्हिलचीच मुले अशी असतात (पक्षी- इतर मुले स्वच्छ राहतात असा भयंकर आरोप?)

नितिन थत्ते Tue, 01/04/2014 - 20:58

>>"व्हाय वॉश व्हेन यू कॅन बाय न्यू वन?"

आम्ही टंचाई*ग्रस्त समाजवादाच्या काळात शीओईपी येथे असल्याने ही चैन परवडण्यासारखी नव्हती.

*ही टंचाई वस्तूंच्या बाजारातील उपलब्धतेची नसून आमच्याकडील पैशांच्या उपलब्धतेची असे.

तर तिथली पहिली आठवण पुढीलप्रमाणे:

जुलै महिन्यात आम्ही प्रवेश घेऊन हॉस्टेलात रहायला आलो, आम्हा मुंबईहून आलेल्या मुलांसाठी बी-अ‍ॅनेक्स नामक बैठ्या हाष्टेलात खोल्या होत्या. त्या ब्लॉकमध्ये बाथरूम्स नव्हत्या. आंघोळीसाठी शेजारच्या बी ब्लॉकमध्ये जावे लागे. त्यात पाणी गरम करण्याची कुठलीही सोय नव्हती. {ती सोय आम्ही तिसर्‍या वर्षाला पोचल्यावर झाली}. अशात आम्ही उष्ण कटिबंधातले लोक. पुण्याच्या थंडीत** थंड पाण्याने आंघोळ करणे शक्यच नव्हते. तर हॉस्टेलला गेल्यावर एक दिवस त्या थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर सीनिअर लोकांनी ओपन-कॉईल-लाकूड-पट्टी-हीटरची ओळख करून देईपर्यंत आंघोळीचा प्रयत्न केला नाही. :)

**पुण्यात उन्हाळा मुंबईपेक्षा जास्त असला तरी पावसाळा सुरू होताच तापमान चांगलेच थंड होते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/04/2014 - 21:53

In reply to by नितिन थत्ते

"टंचाई*ग्रस्त" या शब्दात मध्येच अॅस्टेरिक पाहून वेगळाच अर्थ असेल असं वाटलं होतं. पण मग त्याचा नितिन थत्ते आणि त्यांच्या होस्टेलमित्रांच्या स्वच्छता-सवयींशी असलेला संबंध लागेना ... पण पुढच्या स्पष्टीकरणाने काळजी मिटवली.

अनुप ढेरे Tue, 01/04/2014 - 22:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"टंचाई*ग्रस्त"

=))
थत्तेचाचा कंच्या ब्रांच चे ते नाही माहीत पण मेक/प्रॉड वाले कधीही 'टंचाई' ग्रस्त नसतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/04/2014 - 23:49

In reply to by अनुप ढेरे

तो 'ब्रांच' हा शब्दही पुन्हा विचित्र वाचला. आज मी ऐसीवर काही वाचन करत नाही ... एक एप्रिल संपू देत.

स्वरा Tue, 01/04/2014 - 22:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे मेक, प्रोड आणि सिविल मधे "टंचाई*' नसते... "टंचाई* बहुतेक केम, ईलेक-टेली आणि कॉम्प ला जाते.... अरे हेच तर अस्मिला म्हणायचं होतं ना.. =)) =)) =)) =))

आनंद घारे Tue, 01/04/2014 - 23:26

मेक, प्रोड, सिविल, केम, ईलेक-टेली, कॉम्प वगैरे 'टंचाई'ग्रस्त किंवा 'टंचाई'मुक्त ब्रँचेसमधले इंजिनीयरच असे नग असतात का?

प्रकाश घाटपांडे Wed, 02/04/2014 - 10:43

पसारा आवरण्याचे, शिस्त टापटीप राखण्याचे झटके अधुन मधुन येत असतात. परंतु ते कोणत्याही उपचाराशिवाय बरे होतात असा अनुभव आहे. माझ्यातली शिस्त बायकोने हळुहळू संवेदनाहीन केली आहे. पेन जागेवर न सापडणे या साठी मी फोनजवळ दोरीला पेन लावून ठेवण्याचे प्रयोग केले पण ते फेल गेले. पेन व टोपण. दोन मोजे, डबा व झाकण. बाटली व बूच यांचे असोसिएशन राखण्याचे प्रयोग देखील फेल गेले. बर हे असोसिएशन राखण्यासाठी मी सुचवलेले उपाय काही अव्यवहार्य नव्हते. उदा. पेन वापरताना टोपण पेनला लावूनच ठेवावे. दोन मोजे एकमेकांना फुली गाठ करुन ठेवावे. डबा व झाकण हे एकमेकांजवळच ठेवावे व काम झाल्यावर परत लावावे. बेसीन जवळचा नॅपकीन हा धुवायला टाकायच्या अगोदर त्या जागी धुतलेला नॅपकीन लावावा मगचे तो धुवायला टाकावा. फोनचे चार्जिंग झाल्यावर फोन काढताना बटण बंद करावे.....
हल्ली मला हा त्रास होत नाही कारण माझी जगण्यातील विरक्ती वाढत चालली आहे. बाकी तुम्ही काहीही करा माझ्या वस्तुला हात लावू नका म्हणजे झाले. अशा अलिखित सामंजस्यावर त्याचा शेवट होतो. मी वस्तू जागेवर व्यवस्थित ठेवतो त्यामुळे कात्री, स्टेपलर, पेन, स्क्रू ड्रायवर, फेवीस्टिक...इ चे तीन तीन सेट करुन देखील त्यांना वेळेवर सापडत नाही. मग घाईच्या वेळी माझ्या वस्तू वेळेवर व जागेवर सापडतात त्यामुळे त्यावर डल्ला मारला जातो. मग माझ्या गरजेच्या वेळी त्या गायब झालेल्या असतात. मग चिडचिड होते. असो जगण हीच एक समृद्ध अडगळ आहे अशी दृष्टी ठेवली की जगताना त्रास होत नाही. :)

आनंद घारे Wed, 02/04/2014 - 23:00

In reply to by प्रकाश घाटपांडे

बाकी तुम्ही काहीही करा माझ्या वस्तुला हात लावू नका म्हणजे झाले. अशा अलिखित सामंजस्यावर त्याचा शेवट होतो. हाच एकमेव उपाय असतो. तेवढे सामंजस्य होते हाच तुमचा केवढा मोठा विजय आहे. सगळ्यांचे नशीब इतके चांगले नसते. पसारा या नावाखाली त्या वस्तू कधी अदृष्य होतील याचा नेम नसतो
मग घाईच्या वेळी माझ्या वस्तू वेळेवर व जागेवर सापडतात त्यामुळे त्यावर डल्ला मारला जातो. हेसुद्धा ठीकच आहे कारण गरज भागणे महत्वाचे.
मग माझ्या गरजेच्या वेळी त्या गायब झालेल्या असतात. हे होऊ नये यासाठी आपल्या गरजेच्या वस्तू जागेवर आहेत याची अधून मधून तपासणी करत रहावे लागते.
तुम्ही स्वत:ला शिस्त लावून घेतली असेल किंवा ती लहानपणी लावली गेली असेल तरी सर्वांनाच ती लागलेली असावी अशी अपेक्षा का ठेवावी? शिस्त हा माणसाचा नैसर्गिक गुण नसतो. याची अनेक उदाहरणे मी माझ्या लेखात दिली आहेत.

अतिशहाणा Thu, 24/04/2014 - 23:44

ही जबरा चर्चा कशी काय हुकली.... हॉष्टेलची प्रसाधनगृहे आठवली आणि तो दरवळही जाणवला. असो इतरांच्या तुलनेत फारसे रोचक किस्से नाहीत. हॉष्टेलमधील एका शेजाऱ्याने त्याची जीन्स धुण्यासाठी म्हणून भिजवून ठेवली होती. दहापंधरादिवसांनी सर्वत्र वास सुटल्यावर त्याला ती धुण्याची आठवण झाली हा एक प्रसंग आठवतो.

बाकी मत पूर्णपात्रे यांच्याप्रमाणेच. एकटे असताना सर्व गोष्टी बेडवरच ठेवूनही व्यवस्थित चालले होते. जेव्हा लागेल तेव्हा हवी ती वस्तू सापडत होती. आता घरातील आवराआवरीच्या बिनपगारी रोजगार हमी योजनेत नियमित काम मिळते व कुटुंबप्रमुखाची ;) बोलणीही खावी लागतात. शिवाय एखादी वस्तू हवी असली की कुठे ठेवली आहे याची चौकशी करावी लागते.

मन Fri, 25/04/2014 - 10:41

In reply to by अतिशहाणा

+१
वस्तू "व्यवस्थित " ठेवणे हे त्या हरवण्याचे प्रमुख कारण आहे हे आमच्याही कुटुंबाच्या ध्यानी येत नाही ;)

मस्त कलंदर Fri, 25/04/2014 - 10:04

बापरे..
आम्हा मुलींच्या होस्टेलवर एक काश्मिरी मुलींचा ग्रुप होता जो पांघरूणाची घडी कधीच करत नसे, त्या दोघी तिथेच जेवत, लॅपटॉपवर पिक्चर बघत, चुकून कधी अभ्यास करत आणि पुन्हा तिथेच इकडेतिकडे अंगाखाली आलेले पांघरूण घेऊन झोपी जात. त्यांच्या रूममध्ये एक कोपरा होता, जिथे त्या काढलेले कपडे अक्षरशः फेकत आणि परत कधी चुकून त्यातलं काही घालायची वेळ आली की डिओने आंघोळ करत. त्या स्वतः आठवड्यातून एकदाच आंघोळ करत आणि तरीदेखील गोर्‍यागोमट्या असल्याने आमच्यापेक्षा छान दिसत. तेव्हा अस्वच्छतेचा मापदंड म्हणून त्यांचे उदाहरण दिले जाई. वरचे प्रतिसाद वाचून त्या काहीच नव्हेत असे वाटले.

'नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे' ही माझं मिपावरचं वाक्य आहे. पण अस्वच्छ घर मी इतकंही सहन नाही करू शकत. त्यामुळे मुद्दाम कधीकधी संगणक बंद करून घर जितक्यास तितकं ठेवते आणि बरेचदा गोष्टी हातासरशी जागच्या जागी ठेवते. दोनेक वर्षांपूर्वी एका काकूंकडे जाण्याचा योग आला होता. रिकामपणाच्या बर्याच सक्रीय असणार्‍या या बाईंच्या घरात धूळीचे थर साचले होते आणि याची त्या कुटुंबातल्या कोणालाच फिकिर नव्हती. भरीसभर भर म्हणून घरात सहा-सात मांजरे. त्यातले एक तर उडी मारून माझ्या ताटातल्या आमरसाच्या वाटीत पाय टाकून निघून गेलं. पण घरच्यांच्या चेहर्‍यांवरचं कौतुक ओसांडून वाहात होतं. जेवताना त्याच हाताने मांजराला धरणे, गोंजारणे, पिटाळणे आणि खाणे सगळंच चाललं होतं. असो.. तर मी पसारा करण्यापेक्षा आवरणारी आहे..

मन Fri, 25/04/2014 - 10:48

In reply to by मस्त कलंदर

अस्वच्छता आणि अव्यवस्थितपणा ह्या दोन सद्गुणांत बारिकसा फरक आहे असे नमूद करु इच्छितो.
वरील हाष्टेलचे किस्से अस्वच्छता क्याटेगरीत जास्त येतात. पण स्वच्छ,ठीकठाक असूनही इतरत्र गावंढळ, अव्यवस्थित
अशी मंडळी असू शकतात.
उदा :- मी स्वतः कमालीचा अव्यवस्थित व्यक्ती आहे. तरी ताटं, वाट्या, कपडे स्वच्छ असण्याबद्दल मी टोकाचा आग्रही असतो.
किंवा जमेल तेव्हा दिवसातून दोनदा स्नान होतेच. मग अव्यवस्थित आहे म्हणतोय तो कसा ? :-
कपडे इस्त्री न करणे. ढिगार्‍अयतून वाटेल ते उचलून तसेच घालणे. स्वयंपाकाला घेतलेले भांडे-डबे वापरुन झाल्यावर तथाकथित योग्य जागेवर न ठेवणे; बाहेर -गल्लीतल्या वाण्याकडे किंवा जवळपास चपला न घालताच जाणे; दाढी - (दोक्यावर केस होते तेव्हा) कटिंग करण्याबाबत कमालीचा उदासीन असणे; इत्यादी इत्यादी.

अतिशहाणा Fri, 25/04/2014 - 18:37

In reply to by मस्त कलंदर

जो पांघरूणाची घडी कधीच करत नसे

पांघरुणाची घडी घालणे हा वेळेचा संपूर्ण अपव्यवय आहे. हायजिन-स्वच्छता वगैरे कोणत्याच निकषात ही घडी बसत नाही. ही पांघरुणे बेडरुममध्ये असतात. घरी येणारे बेडरुममध्ये डोकावणार नाहीत इतपत शहाणे असतात. (बेडरुममध्ये डोकावणाऱ्यांना घरी येऊ देऊ नये हेही शहाणपण यजमानात असणे अध्याहृत आहेच.)

या मुद्द्यावर बंड पुकारल्याने गनिमाने आमचे अन्नपाणी एकदोनदा तोडल्याने आम्ही आता शरणागती पत्करली आहे. मात्र शक्य तितकी जनजागृती करत राहूच.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/04/2014 - 19:04

In reply to by अतिशहाणा

आमच्याकडे पांघरुणाची घडी घालण्याचा सौदा, पांघरुण दिवाणावरच पसरून, सुरकुत्या साफ करून ठेवण्यावर तुटला. हळूहळू बेबीस्टेप्स करत, ट्रेनिंग वाढत गेलं तसं, उठतो तेव्हा असतात त्याच अवस्थेत पांघरुण सोडून देण्याची सवय झाली. गेल्या दहाएक दिवसांपासून, थंडीत वापरत होतो त्या जाड पांघरुणात फार उकडायला लागलं. ते पांघरूण, बोळा करून तसंच दिवाणाच्या शेजारच्या एका खोक्यावर लोटलं आहे. तो खोका वापरायची वेळ आली की पांघरुण दिवाणावर, खोक्याचं काम झाली की खोका जागेवर जाऊन पांघरुण पुन्हा त्यावर ... उन्हाळा संपत आला की ते पांघरुण बहुदा जागेवर जाईल.

तात्पर्य काय ... प्रयत्नांती पसारा.

'न'वी बाजू Fri, 25/04/2014 - 20:06

In reply to by अतिशहाणा

घरी येणारे बेडरुममध्ये डोकावणार नाहीत इतपत शहाणे असतात.

ही समज आजच्या पिढीत (असलीच तर) असू शकेलही; अन्यथा, अशी सरसकट शाश्वती मी निदान हिंदुस्थानाच्या संदर्भात तरी - आणि भल्याभल्या, सभ्यप्रतिष्ठित म्हणवणार्‍यांच्या बाबतीतसुद्धा - देऊ शकत नाही.

(हिंदुस्थानात 'पर्सनल स्पेस' आणि 'खाजगी मालमत्तेचा - आणि दुसर्‍याच्या खाजगीपणाचा - आदर' या संकल्पना ज्या दिवशी सरसकटपणे रुजतील/रुळतील, तो सुदिन. मात्र, त्यामुळे संस्कृतिहनन होण्याचा संभव आहे.)

(बेडरुममध्ये डोकावणाऱ्यांना घरी येऊ देऊ नये हेही शहाणपण यजमानात असणे अध्याहृत आहेच.)

प्रश्न शहाणपणाचा नाही. 'जाने वाले को कोई भी रोक नहीं सकता', हेच खरे.

पांघरुणाची घडी घालणे हा वेळेचा संपूर्ण अपव्यवय आहे.

या विधानाशी मात्र सरसकटपणे सहमत, ऑल्दो, नॉट नेसेसरिली फॉर द रीज़न्स क्वोटेड. बोले तो, हायजीन/स्वच्छता वगैरेंच्या निकषात ते बसते किंवा नाही, याच्याशी आम्हांस यत्किंचितही देणेघेणे नाही. 'आम्हांस आळस आहे' एवढे कारण आमच्याकरिता पुरेसे आहे, हे आम्ही प्रांजळपणे - आणि क्वाइट निर्लज्जपणे - कबूल करतो.

या मुद्द्यावर बंड पुकारल्याने गनिमाने आमचे अन्नपाणी एकदोनदा तोडल्याने आम्ही आता शरणागती पत्करली आहे.

नाइलाजास काय इलाज?

मात्र शक्य तितकी जनजागृती करत राहूच.

यासारखा वेळेचा दुसरा सदुपयोग नसावा. (आपल्या हातात दुसरे तसेही काय असते?)

=====================================================================================================================================================

डिस्क्लेमर: या विधानात कोणताही अश्लील अर्थ अभिप्रेत वा अपेक्षित नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/04/2014 - 22:06

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही हिंदुस्थान असा शब्द वापरल्यामुळे मी उचकणार नाही. मी उचकण्यासाठी तशा प्रकारची सुसंगती इतर लिखाणात दिसावी लागते.

तुमची 'न'वी सही (बहुदा सहीच असावी) आवडली. मला बी तुमच्या पार्टीत कृपया घेणे.

(आपल्या हातात तसं म्हटलं तर माऊसही येऊ शकतो, असा एक अनश्लील अर्थ आपणांस सुचवू इच्छिते.)

१. हे फक्त फूटनोट लिहीता यावी आणि 'न'वी बाजूंवर प्रभाव पडावा म्हणून.

अक्षय पूर्णपात्रे Fri, 25/04/2014 - 22:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या हातात तसं म्हटलं तर माऊसही येऊ शकतो, असा एक अनश्लील अर्थ आपणांस सुचवू इच्छिते.

हे आधीच्या वाक्यापेक्षा सूप्तपणे जास्त अश्लिल आहे असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/04/2014 - 04:02

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

अश्लैल्य हे विचार करणाऱ्यावर अवलंबून असतं ही जुनी खेळी इथे खेळता येईल. पण तोचतोचपणा टळावा म्हणून ... माऊसमध्ये नक्की काय अश्लील असतं हे समजलं नाही. म्हणजे टंकताना वापरल्या जाणाऱ्या कीबोर्डातून अधिक अश्लैल्य बाहेर पडतं, ते त्याला धरायचं सोडून तुम्ही पळत्या माऊसाच्या पाठी का लागता?

'न'वी बाजू Fri, 25/04/2014 - 20:08

In reply to by अतिशहाणा

मात्र शक्य तितकी जनजागृती करत राहूच.

आणि

प्रचाराची वेळ संपल्याने स्वाक्षरी बदलली आहे.

या दोन विधानांचा मेळ काही जमला नाही. (असे वाटते; चूभूद्याघ्या.)

सानिया Sat, 26/04/2014 - 02:56

In reply to by अतिशहाणा

घरी येणारे बेडरुममध्ये डोकावणार नाहीत इतपत शहाणे असतात.

काही महिन्यांपूर्वीच आलेल्या एका पाहुणीने पहाटे ३ वाजता, अर्धवट लोटलेल्या बेडरूमचे दार उघडून "अच्छा... ही तुमची बेडरूम होय!" म्हणून जवळजवळ आत शिरकावच केला होता त्याची आठवण झाली. या प्रसंगाची अधिक माहिती प्रतिसादात देता येणार नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

उपाशी बोका Sun, 27/04/2014 - 10:51

In reply to by अतिशहाणा

या मुद्द्यावर बंड पुकारल्याने गनिमाने आमचे अन्नपाणी एकदोनदा तोडल्याने आम्ही आता शरणागती पत्करली आहे. मात्र शक्य तितकी जनजागृती करत राहूच.

प्रतिसादातील हा षटकार. (टाळ्या, टाळ्या).

पांघरुणाची घडी घालणे हा वेळेचा संपूर्ण अपव्यवय आहे.

या बाबतीत असहमत आहे. काही गोष्टी केवळ सुंदर दिसतात किंवा आपल्याला समाधान मिळावे म्हणून आपण करायच्या असतात. It's for quality of life. लहानपणी कुठेतरी वाचले होते, विनोबा भावे म्हणाले होते की संत्रे (किंवा मोसंबे असेल, आता नक्की आठवत नाही) कसे सोलावे, तर त्याच्या सालीचा द्रोण होईल असे सोलावे (अर्धा भाग तसाच ठेवावा) आणि त्यातच उरलेली साल आणि बिया टाकाव्यात. त्यामुळे पसाराही होत नाही, साफ करायला पण सोपे पडते आणि ते दिसते पण सुंदर.
व्यवस्थित राहाण्याची एकदा सवय लागली की आपण फार काही विशेष करतोय असे वाटत नाही. माझ्या पहिल्यावहिल्या नोकरीतला माझा ex-बॉस, हरी, संध्याकाळी घरी जाताना नेहमी त्याच्या टेबलवरचे कागद नीट ठेऊन, टेबलची काच ओल्या कापडाने नीट पुसून नंतरच घरी जायचा. (कितीही उशीर झाला तरीही). मला पण तीच सवय लागली आणि आता त्याच्यासाठी काही विशेष करावे लागत नाही. याचा फायदा असा होतो की दुसर्‍या दिवशी टेबल छान स्वच्छ दिसते आणि कामाचे कागद पण जागच्या जागी पटकन मिळतात.

रुपाली जगदाळे Fri, 25/04/2014 - 22:12

मस्त लेख. मजा आली.
माझ्या स्वतंत्र कथेतून -
“तिने सभोवार नजर फिरवली. आधीच्या घराच्या तुलनेत फ्लॅट छोटासाच होता. पण सगळ्या वस्तू कशा जिथल्या तिथे होत्या. वेगळे होताना तिने मोजक्याच वस्तू उचलल्या होत्या. जुन्या घरासाठी भरपूर समान तिने हौसेनं घेतलं होतं, सहा वर्षात तीनदा डेकोरेशन बदललं होतं. पण ते सगळं कशासाठी असाच प्रश्न नंतर तिला पडत होता. सगळ्याच गर्दीचा तिला वैताग येऊ लागला होता. जगायला अशा किती गोष्टींची गरज असते? कमीत कमी गोष्टीतही घर चांगलं सजवून होतं. आणि मोठ्या घराच्या अशा किती खोल्यांचा वापर केला जातो? कितीतरी वर्षांपासून तिला लहान घरात शिफ्ट व्हायचं होतं. पण प्रशांतला स्वतंत्र बंगलाच पाहिजे होता. मग त्याचा तो उकिरडा का करून टाकेना! त्या आठवणीनेही ती शिसारली. त्याच्या स्वच्छतेच्या कल्पनाही त्याच्यासारख्याच बोथट होत्या. कपडे धुवून झाल्यावर ते तो घरभर पसरून ठेवी. त्याच्या बाथरूममध्ये तर जाण्याचीही सोय नसे. घरातली कुठलीही गोष्ट तिच्या जाग्यावर परत जात नसे. आणि मुलांनाही तेच शिकवायचे चालले होते. घर हे घरासारखं पाहिजे म्हणे. म्हणजे कसे? उकीरड्यासारखे?
टिव्ही चालू करावा असं क्षणभर मनात आलं, पण लगेचच शरीरातून नकार उमटला. थोडा वेळ ती सगळी शांतता अंगात भिनवून झाल्यावर तिला उठावच लागल. सकाळपासून फक्त चहा तिच्या पोटात गेला होता. प्रशांत येण्याआधी दोघांना तयार करण्याच्या नादात ती ब्रेकफास्ट करायचेही विसरून गेली होती. उठून तिने पुन्हा चहा ठेवला. नाश्त्याची वेळही टळून गेली होती. तिने ऑम्लेट ब्रेडवरच भागवायचे ठरवले. ब्रंच करून ती पुन्हा सोफ्यावर येऊन बसली. शेजारी पुस्तक पडले होते ते उघडले आणि वाचायला सुरुवात केली. तशीच कधी झोपून गेली हे तिला कळलेच नाही.
जाग आली तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त झालं होत. फर्निचरवर धूळ साठलेली, सिंकमध्ये भांडी तशीच, सभोवार कपड्यांचा ढिगारा. आश्चर्यानं ती बेडरूममध्ये गेली तर बेड सगळा विस्कळीत अवस्थेत. खाली कारपेटवर कपड्यांचा ढिगारा. बाथरूममध्ये टोयलेटला गंज चढलेला. ती घाबरली. घटस्फोट झाल्यापासून एकही दिवस तिने घरात पसारा होऊन दिला नव्हता. तिच्याकडून होत नव्हतं म्हणून दर आठवड्याला तिने साफसफाई करायला बाई ठेवली होती. मुलांना स्वच्छतेची सवय लावता लावता ती मेटाकुटीस आली होती. मुलगा तरी थोडा बरा होता पण नऊ वर्षांच्या इराने, प्रशांत पासून वेगळे राहायला लागल्यापासून तिच्याविरुद्ध जणु बंडच पुकारले होते. जे बाबा सांगेल तेच खरं, आईला काही कळत नाही आणि तिचं काही ऐकायची गरज नाही अशाच अविर्भावात ती नेहमी असायची. पण तरीही कधी गोडीगुलाबीन तर कधी धाकानं तिने तिला किमान तिच्या गोष्टीतरी व्यवस्थित जागेवर ठेवायला शिकवलं होतं. आणि आता असा कचरा! कुणी विस्कटल हे सगळं? आणि या जुन्या घरातल्या वस्तू इथे कशा आल्या? ती बेडरूममधून बाहेर आली तर समोर जुन्या घरातली फेमिली रूम! "हे बघ,हे कपडे धुवून झालेत!" लोन्ड्रीरूममधून प्रशांत एक मोठी बास्केट घेऊन आला आणि तिच्यासमोरच त्याने ती पालथी केली. धुतलेल्या कपड्यांची चळत खाली पडली. कपडे, पुस्तकं, पेन्सिल्या, कंगवे, नकली दागिने,क्रेयॉनने रेघोट्या ओढलेले कागद, विद्रूप केलेल्या बाहुल्या. परत सगळ समोर बघून तिचा बांध सुटला. तिने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. प्रशांत लोन्ड्रीरूममधून अजून कपडे आणून तिच्या भोवती फेकतच होता. बाहेर कुणीतरी दरवाज्याची बेल दाबत होतं तिकडेही त्याचं लक्ष नव्हत. तिच्या ते लक्षात आलं पण तिला जागेवरून हलायलाही जमत नव्हते. कपड्यांच्या ढीगाऱ्यात ती गळ्यापर्यंत बुडाली होती. एक एक कपडा म्हणजे जणू काही एक एक किलोचं वजन झालं होतं. पण बेल अजूनही ऐकू येत होतीच. धसक्यान तिला जाग आली,कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. कसेबसे पुसून शांतपणे तिने दरवाजा उघडला, दारात सारीका उभी होती. “

'न'वी बाजू Sat, 26/04/2014 - 08:36

In reply to by रुपाली जगदाळे

दारात सारीका उभी होती.

ठळक केलेला शब्द असाच लिहिण्याची काही आंतरजालीय प्रथा येऊ घातली आहे काय?