Skip to main content

गांधीजींना महात्मा केलेच कोणी? - अरुंधती रॉय

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/arun…

'आज संपूर्ण देश गांधीवाद अथवा विचारांच्या आधारे पुढे नेला जात आहे. मात्र, गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो', अशी वादग्रस्त टीका लेखिका व कट्टर साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी सोमवारी येथे केली. त्यांच्या वक्तव्यावर गांधीवाद्यांनी कडाडून टीका केली असून, हे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. इंडिया पीस सेंटरतर्फे आयोजित 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' या विषयावरील व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरात त्यांनी गांधीजींवरील हे विधान केले.

महात्मा गांधी यांच्यावर टीका करताना अरुंधती रॉय यांनी त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला. 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', असे त्या म्हणाल्या.

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 13:47

In reply to by ऋषिकेश

एकुणच पुरोगामी विचार बाळगणे म्हणजे मोठा समाजद्रोह केल्यासारखे आहे, तुम्ही काय जनसामान्यांतील नाहितच, तुम्ही काय पुरोगामी ऐसीवाले, तुमची ती काय छटाकभर मतं, कशाला ती ग्राह्य मानायची? असे म्हणणे असल्यास चर्चा करण्यालाही अर्थ उरत नाही.

याच्या नेमक्या उलट छापाचे विचार इतक्या वेळा ऐकले आहेत की पुरोगाम्यांना असं वाटायला लागणं हेच रोचक वाटतंय. शेवटी जनसामान्यांच्या मताला तरी किंमत काय असते म्हणा? ज्यांच्या मताला प्रतिष्ठा असते अशा लोकांनी आणि तशा लोकांची विचारसरणी उचलून धरणार्‍यांनी विथ अस ऑर अगेन्स्ट अस चा कांगावा इतक्यांदा केलाय की त्याला सीमा नाही. त्याच्या उलट झालेले पाहून तरी तो अतिरेक समजला असेलसे वाटते. असो.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 12:13

In reply to by मेघना भुस्कुटे

गांधींना महात्मा - राष्ट्रपिता मानलं जातं, त्याची कारणं अनेक आहेत. त्यात त्यांच्या लैंगिकताविषयक मतांचा समावेश होत नाही. त्या मतांना गांधीसमर्थक आणि गांधीविरोधक या दोघांनीही कडाडून / सौम्य विरोध केला आहे. असा विरोध असताना गांधींना त्यांच्या इतर कामाबद्दल महात्मा म्हणायचंच नाही, असा तुमचा आग्रह आहे का? तुम्ही नका म्हणू. तुम्हांला कुणी बळजबरी केली आहे? पण आपण मोठा पर्दाफाश करतो आहो, अशी समजूत नको. गांधीजींची लैंगिकताविषयक मतं पूर्वप्रसिद्ध आहेत. तरीही लोक त्यांना महात्मा म्हणतात. त्यामुळेच म्हणतात, असं नव्हे.

असेच असेल तर भारतीय समाजाच्या प्रगल्भतेचा प्रचंड आदर आहे. पण असे आहे असे मानणे लिविंग इन फूल्स पॅराडाईज "आहे" हे सत्य आहे. महानगरींच्या उच्चशिक्षित( प्रो-गांधी )लोकांत हा प्रकार असावा. पण जनसामान्यांत नाही. गाधीजींना महात्मा वा राष्ट्रपिता मानणार्‍या, कामवालीबाई, ऑटोड्रायवर, शेतकरी, गार्ड, इ इ लोकांना असे होते हे पटतच नाही. शेवटपर्यंत पटत नाही. ते हे सगळे विरोधकांचे विष मानतात. कोणाला चूकून पटले तर मग तो -"मग तो महात्मा कसा?" असे विचारतो. आता तो प्रयोग होता, महान होता, वासना नव्हती, इ इ किती गोष्टी सांगीतल्या तरी उपयोग नाही. लक्षात घ्या - जनसामान्यात दोनच प्रकारचे लोक आहेत - १. हे खोटे मानणारे २. खरे असेल तर महात्मा म्हणू नये म्हणणारे. अशिक्षित, अर्धशिक्षित लोक तर अगदी कडवटच आहेत, नि अगदी शिक्षित लोकही बरेच आढेवेढे घेतात. कोट केलेला उतार ऐसीवरच शोभतो.

चिंतातुर जंतू Tue, 20/05/2014 - 11:42

In reply to by अजो१२३

>> Gandhiji had mass following even among thinkers. Almost all of them are silent.
I am talking of the people who keep following him and also criticized him for this behavior. This excludes the list of people who left him for such behavior.

ही बायनरी विचारसरणी आहे का? म्हणजे, तुम्ही गांधींना महान मानत असाल, तर सूर्याखालच्या सगळ्या विषयांवरचं त्यांचं वर्तन आणि त्यांची मतं प्रमाण माना; अन्यथा चालते व्हा? मुद्दा नक्की काय आहे ते अजूनही कळलेलं नाही.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 11:46

In reply to by चिंतातुर जंतू

या मुद्द्यामधे अरुणजोशी हा आयडी नि महात्मा गांधी हे नेते गौण आहेत. म्हणजे माझा हेतू, उद्देश व त्यांचे एकूण कर्तृत्व यांचा संबंध नाही.

एका विशिष्ट व्यक्तिच्या विशिष्ट वर्तनावर भाष्य आहे. ते खूप व्यवस्थित लिहिलं आहे. त्यापलिकडे काही नाही.

मी Tue, 20/05/2014 - 11:14

In reply to by अजो१२३

>>सत्तरीतला माणूस, टीन मूलगी, तीही नात कोण्या अध्यात्मिक, सत्याच्या, निग्रहाच्या , इ इ परीक्षेसाठी एकत्र नागडे झोपतात ही संकल्पना आजच्या भारतीयांना कदापिही मान्य नसेल.
>>मग इतकी मूल्यभिन्नता असलेला माणूस

नक्की मुद्दा मूल्यभिन्नतेचा आहे का? त्यांची मूल्ये खुली व सामाजीक अवकाशात तपसणीला उपलब्ध आहेत. मी स्वतः त्यांच्या ह्या प्रयोगांबद्दल पुरुषस्पंदन मासिकात वाचले आहे.

यात लॉजिक असो, नसो, सुधारकासाठी हे शोभत नाही नि महत्त्वाचं तर नाहीच नाही.

नसेलही त्यात लॉजिक, त्यांना प्रयोग करावा वाटला त्यांनी केला. आयुष्यभर एकाच भुमिकेचे गाठोडे वहायची बळजबरी आहे का?

विचारवंत असल्या बुरसटलेल्या विचारसरणीसाठी गांधीजींचा समाचार घेताना दिसत नाही

ब्रम्हचर्य ह्या ऑर्थोडॉक्स संकल्पनेपुढे त्यांचे प्रयोग फारच मॉडर्न वाटत असल्याने त्यावर टिका करावी किंवा कसे ह्या गोंधळात नेहमीचा विचारवंत टिकाकार असावा. तरीसुद्धा त्यांचे ब्रम्हचर्याबद्दलचे विचार शुद्ध बावळटपणाचे होते असे मी मानतो पण त्यांचा खुलेपणाचा आग्रह मला चकीत करतो.

>>भारतीय लोक सार्‍या कंस्पायरसी थेरीज नि मोठ्या लोकांची लफडी दुर्लक्षित करतात, उलट चवीने चघळतात.
पण गाधीजींनी याला अपवाद असावं, नव्हे ते होतेच, अशी त्यांची अपेक्षा आहे
>>इन फूल नॉलेज ऑफ फॅक्ट्स, लोक स्वीकारतील का?

न स्विकारल्याने कोणाला फरक पडतो?

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 12:45

In reply to by मी

व्यक्तिशः आपणांस गांधीजींचे प्रयोग, त्याचे उद्दीष्ट नि त्यांचे महात्मा असणे यात काही गैर दिसत नाही. मला आपल्या मतांचा आदर आहे. ऐसीवरच्या वा कोठल्याही लोकांच्या अशा मतांचा एक मतभिन्नता मला आदर आहे.

मी तळागाळातल्या वा सामान्य भारतीय समाजास या प्रयोगांची किंचितही माहिती नाही आणि असती तर त्यांची प्रतिक्रिया वेगळी राहिली असती. शिवाय ब्रह्मचर्य ही विवेकानंद, गांधीजी, इ इ ची एक मूल्य म्हणून आयडीय अशास्त्रीय नि भंकस आहे असे मला म्हणायचे आहे. लाखो गांधीवादी ज्यांना हे सत्य माहित होते, नि केवळ इतक्याच सत्याचा त्यांना विरोध होता, त्यांनी कोण्या एका भयाने गांधीचा विरोध केला नाही, ही माहिती सोयीस्करपणे दाबली गेली किंवा निसर्गतः दबली.

मी Tue, 20/05/2014 - 13:33

In reply to by अजो१२३

लाखो गांधीवादी ज्यांना हे सत्य माहित होते, नि केवळ इतक्याच सत्याचा त्यांना विरोध होता, त्यांनी कोण्या एका भयाने गांधीचा विरोध केला नाही, ही माहिती सोयीस्करपणे दाबली गेली किंवा निसर्गतः दबली.

शक्य, गांधीवाद्यांना पटले तेवढेच मुद्दे कायम पटलावर राहिले आणि अरुंधतीसारखे अशा विचारांना लोकांसमोर आणून त्यावर टिका करतील पण ते प्रमाण नगण्य आहे. त्यांना पदस्तलावरुन खाली काढण्याचे काम करण्याइतपत ते संत/बुवा/धर्म नाहीत.

ऋषिकेश Tue, 20/05/2014 - 11:18

In reply to by अजो१२३

केवळ मुद्दा ३ वरः
लोकांना हे कित्येक वर्षे माहिती आहे. गांधीजींचे लेखन हे पुस्तकात बंदिस्त नव्हते तर ते गुजराती नियतकालीकांत, वृत्तपत्रांत छापून येत असे. त्याचे भाषांतर अनेक वृत्तपत्रांत येत होते. आणि ते तकालिन जनतेला व्यवस्थित माहिती होते. तरीही लोकांनी त्यांच्यामागे जाणे पसंत केले.

तुम्हाला धक्का बसणे स्वाभाविक आहे, पण म्हणून अश्या गोष्टी समजल्याने लोक त्यांच्या तसबिरी काढून टाकतील ही दिवास्पप्ने बघणे सोडा! लोकांना या गोष्टी आधीच माहिती आहेत. तसबिरी लावणार्‍यांनाही नी त्या लावायला विरोध असणार्‍यांनाही!

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 11:29

In reply to by ऋषिकेश

लोकांना हे कित्येक वर्षे माहिती आहे.

आपण नि मी पाहिलेला भारत फार भिन्न आहेत. पण तरीही आपले असे प्रामाणिक निरीक्षण असेल तर मुद्दा मान्य.

रोचना Tue, 20/05/2014 - 11:46

In reply to by अजो१२३

२. गांधीवाद्यांचे विचार - अनेक गांधीविरोधकांनी या वर्तनावर टिका केली आहे. पण सुधारक गांधीवादी काय म्हणतात? क्षणभर आपण प्रयोग नि प्रामाणिक्पणा बाजूला ठेउ. पण ब्रह्मचर्याचे फॅड तर चूकच आहे. विचारवंत असल्या बुरसटलेल्या विचारसरणीसाठी गांधीजींचा समाचार घेताना दिसत नाही. माणूस १००% स्वीकारायचे बंधन नाही, आज ते नाहीत म्हणून आज तरी नाहीच नाही. मग शासने, विचारवंत नि अगदी गांधीविरोधकही मूग गिळून गप्प का असतात? विचारवंतांना तर मते नको असतात ना? आज अरुंधती जे मुद्दे मांडले तसे कोण्या अन्य सुधारकाने हे लैंगिक मुद्दे मांडून टिका केली नाही. एक तर टिका झालीच नाही, खूप कमी झाली, घाबरत घाबरत झाली, दाबली गेली, इ इ.

गांधी विरोधकांनी टीका केली आहे, आणि मूग गिळून गप्प आहेत असे दोन्ही म्हणताहात. नेमके कुठले? शासनाने गांधींच्या वैयक्तिक मतांबद्दल मत का व्यक्त करावे हे कळत नाही. अनेक विचारवंतांनी मात्र मतं मांडली आहेत. खुद्द नेहरूंनी गांधींच्या लैंगिकतेबद्दलच्या मतांचे खंडन केलेले तुम्हाला माहित असेलच. तत्कालीन कम्युनिस्टांनी देखील केली होती. राहिली गांधीवाद्यांची मते. या "विकृत" चाचण्यांमधे त्यांच्याबरोबर सहभागी होण्यास भाग पडलेल्या त्यांच्या नातीने लिहीलेले पुस्तक "बापू, माय मदर" अवश्य वाचावे. सुशीला नायर ही महिला देखील यात सहभागी होती - तिचे भाऊ प्यारेलाल यांचे पुस्तक महात्मा गांधी: द लास्ट फेज आहे. निर्मल कुमार बोस या गांधीवाद्याचे "माय डेज विथ गांधी" हे देखील वाचावे - बोस यांनी मुलींच्या मनावर विकृत परिणाम होतील म्हणून गांधींच्या चाचण्यांचा विरोध केला होता. गांधींचे सेक्रेटरी के.पी. परशूराम आणि पटेल यांनी देखील केला होता, त्यांच्या पत्रव्यवहारात याबद्दल बरेच उल्लेख आहेत.

तुम्हाला अपेक्षित आहे तसे यांनी ब्रह्मचर्याचे सरसकट खंडन केले नाही, पण गांधी वादी यावर मूग गिळून काही बसले नाहीत. त्यांनी खंडन केले नाही म्हणजे त्यांची गळचेपीच झाली हेच जर म्हणायचे असले तर मात्र ही रीडिंग लिस्ट निरर्थक ठरेल.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 12:24

In reply to by रोचना

माहितीपूर्ण प्रतिसाद.

नेहरुंचे लेडी माऊंटबॅटनसोबतचे तथाकथित अफेअर, त्याचे स्वरुप, नि त्यावर झालेली टिका नि गांधीजींचे प्रयोग, त्यांचे स्वरुप नि त्यांवर झालेली टिका यांची जरी तुलना केली तरी कल्पना केली तर कळून येईल कि गांधीवादी इच्छा असून नसून गप्प बसले आहेत.

आता कम्यूनिस्ट म्हणजे गांधीवादी नव्हे. शिवाय या प्रयोग सामील होणारांची, अशा बुरसटलेल्या संकल्पनांत आस्था असणारांची, त्यांच्या घरच्या लोकांची, हे आपल्या घरातल्या लोकांसोबत होत आहे याचा रोष असणारांची टिका याला काही मी महत्त्व देत नाही.

नेहरू, पटेल, बोस, परशूराम, कर्वे यांची टिका "या प्रयोगांवर" होती हे मान्य. अजून ८-१० आहेत मानू. तिचे स्वरुप हा गौण भाग मानू. पण मोठमोठ्या गांधीवाद्यांची यादी हजारांच्या, लाखांच्या घरात आहे हे मला म्हणायचे आहे. त्यांनी स्पेडला स्पेड का नये म्हणू?

रोचना Tue, 20/05/2014 - 12:52

In reply to by अजो१२३

खरंय. कम्युनिस्ट काही गांधीवादी नव्हेत हे माहितच नव्हते मला. पण तथाकथित अफेअर्स आणि ब्रह्मचर्य हे दोन्ही एकच, हे मात्र पटले, आणि त्यांची तुलना रास्तच आहे. हे हजारो-लाखो मोठमोठे गांधीवादी सुद्धा चावटच. नेहरूंच्या अफेअर्स आणि एडविना मधे भलताच रस, आणि इकडे म्हातार्‍याच्या उद्योगांवर चिडीचुप!

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 13:18

In reply to by रोचना

आणि इकडे म्हातार्‍याच्या उद्योगांवर चिडीचुप!

यस्स! ब्रह्मचर्य ही एक तद्दन भंकस कल्पना आहे म्हणूनच घनघोर टिका व्हायला हवी होती. प्रयोगांवरदेखिल तितकीच कठोर टिका व्हायला होती. नाही तर स्वतःला सुधारक म्हणवणारे खोटारडे.

मेघना भुस्कुटे Tue, 20/05/2014 - 14:18

In reply to by अजो१२३

जगात कृष्णाची असंख्य देवळं आहेत. एकाच देवळात जाऊन भक्ती करता आणि स्वतःला कृष्णभक्त म्हणवता? तुम्ही कसले भक्त? तुम्ही त्या पलीकडच्या गल्लीतल्या डाव्या कोपर्‍यातल्या कृष्णमंदिरात कधी पाऊलही ठेवलेलं नाही. तुम्ही कसले भक्त? तुम्ही तर खोटारडे...

बॉर्रं. असतील खोटारडे. मग?

(प्रतिसाद रोचनाला उद्देशून असला, तरी उत्तर मी दिलेलं आहे, याची मला जाणीव आहे. तेच मला परत ऐकवून मला काही घंटा फरक पडणार नाही.)

मेघना भुस्कुटे Tue, 20/05/2014 - 14:33

In reply to by अजो१२३

अहो, शाळेत गृहपाठ म्हणून एकच उत्तर पाच वेळा लिहून आणायला सांगितलं, त्यावर मी वाद मुख्याध्यापकांपर्यंत नेला, आणि 'गाढवासारखं परत परत तेच तेच लिहून काढणार नाही' असं स्पष्ट सांगितलं. आता तुमच्याशी वाद घालताना लिहीन होय?!

तुमचं अज्ञान तुमच्यापाशी. राहिलं!

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 14:48

In reply to by मेघना भुस्कुटे

नक्की का? तसं दिसत नै म्हणून म्हटलं. ;)

(बॅटप्लेनमध्ये बसून झूऽऽम्मकन पळालेला) बॅटमॅन.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 14:47

In reply to by बॅटमॅन

पुरोगाम्यांच्या सिलॅबसमधे "शांत स्वभावाचा प्रतिगामी कसा हाताळावा" हा एक नविन धडा लवकरच समाविष्ट करण्यात येईल.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

मेघना भुस्कुटे Tue, 20/05/2014 - 14:51

In reply to by अजो१२३

त्यानं काय होतंय? मठ्ठ असल्याचा आव आणणारा, अडेलतट्टू, एकच बाजू पाहणारा प्रतिगामी कसा हाताळावा, त्याचं शिक्षण आवश्यक आहे!

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 14:57

In reply to by मेघना भुस्कुटे

अडेलतट्टू, एकच बाजू पाहणारा प्रतिगामी

हे सर्व समानार्थी शब्द नाहीत असे म्हटल्याचे पाहून रोचक वाटले. ;)

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 15:02

In reply to by मेघना भुस्कुटे

मठ्ठ असल्याचा आव आणणारा

sमेघनाजी, ट्र्स्ट डिफिसिट असेल तर कृपया माझ्याशी चर्चा करू नकात. तुम्हाला मी मठ्ठ वाटलो तर हरकत नाही, पण त्या "आव" शब्दावर माझं ऑब्जेक्शन आहे. That defies the very purpose and results of a long discussion.

मेघना भुस्कुटे Tue, 20/05/2014 - 15:05

In reply to by अजो१२३

घ्या! तुम्ही शंभरदा 'तथाकथित-तथाकथित' म्हणून पुरोगाम्यांना बडवलेलं चालतं. नि एकदा 'आव' शब्द वाचल्यावर इतकी चिडचिड? बरं नव्हे हे! ;-)

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 15:09

In reply to by मेघना भुस्कुटे

नै हो. मी आपणांस शुद्ध (तसे तर अतिरेकी) पुरोगामी मानतो. ज्या व्यक्तिशी मी संवाद करत आहे, तिच्याशी ट्रस्ट डिफिसिट ठेऊन करत नाही. दुसर्‍या बाजूने तसे होत असेल असे जाणवले तर मला संवादात किंचितही रस नाही.

मी फक्त तुमच्या ओफिशियल पोझिशनवर टिका करतो. किमान माझी तशी इच्छा असते.

मन Tue, 20/05/2014 - 15:18

In reply to by अजो१२३

प्लीझ चर्चा अशी थांबवू नका.
माझा उरलेला दिवस हसत खेळत कसा जायचा मग?
तुमच्या सकट इथले सारेच सध्या प्रामाणिक आणि मठ्ठ आहेत असं जाहिर करतो.
प्लीझ. माझ्या ह्या प्रामाणिक प्रतिसादासाठी तरी लढाई चालू द्यात.
विचाराचा विरोध मठ्ठपणाने वगैरे स्टाइलने सारं होउ द्यात.

@ मेघना :-
विचाराचा विरोध विचाराने करायचा असेल तर
मठ्ठपणाचा विरोध मठ्ठपणाने का करायचा नाही ?
तुला मठ्ठ बनायला कुणीही अडवलेलं नाही.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 15:31

In reply to by मन

मनोबा, तुला जर स्वतःच्या मनोरंजनाची इतकी काळजी असती तर विषय वैयक्तिक बाबींबरून "मूळ मुद्द्यावर" न्यायचा ना? मठ्ठ, प्रामांणिक, आववाले हे शब्द आले कि बोलायला काही उरलेलं नसतं हे माहित नाही का?

अस्वल Wed, 21/05/2014 - 11:13

In reply to by मी

पण तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्द्ल तुम्हाला अलका कुबलच्या सिनेमांची डीवीडी मिळो, ही मोदीचरणी प्रार्थना!

मी Wed, 21/05/2014 - 11:18

In reply to by अस्वल

अलका कुबलच्या डीवीडीला प्रचंड मागणी असल्याने आशा काळेच्या डीवीडीवर समाधान मानावे लागले. :(

अस्वल Wed, 21/05/2014 - 11:22

In reply to by मी

"रडणे" ही जर एक प्रतिक्षिप्त क्रिया मानली, तर
१नं. कुबल म्याडम, नंतर आशा काळे येतात का.. कल्पना नव्हती.
अवांतर- आता मला "श्रेणी"तला फक्त "श्रे" दिसतोय पानावर.

मी Wed, 21/05/2014 - 11:32

In reply to by अस्वल

अवांतर- आता मला "श्रेणी"तला फक्त "श्रे" दिसतोय पानावर.

काळजीकरुनकाइथलेसंपादकलगेचनवाधागाकाढतील. 'अलका की आशा'

ऋषिकेश Wed, 21/05/2014 - 11:24

In reply to by मी

ए जास्त परिक्षा घेऊ नका रे सर्वरची
खरच बंदबिंद पडला तर संध्याकाळी अदिती येईपर्यंत विना-ऐसी हाफिसात रहावं लागेल. खरच हाफिसचं कामही करावं लागेल मग कळेल! :P

मी Wed, 21/05/2014 - 11:33

In reply to by ऋषिकेश

संध्याकाळी अदिती येईपर्यंत विना-ऐसी हाफिसात रहावं लागेल.

छे, एवढ्या लोकांनी काम करण्यापेक्षा तीला फोन करुयात

गब्बर सिंग Wed, 21/05/2014 - 11:45

In reply to by मी

छे, एवढ्या लोकांनी काम करण्यापेक्षा तीला फोन करुयात

अगदी. तिच्याकडे रात्रीचा १ वाजला असेल. बेस्ट टाईम टू कॉल.

मी Wed, 21/05/2014 - 11:48

In reply to by गब्बर सिंग

तिच्याकडे रात्रीचा १ वाजला असेल. बेस्ट टाईम टू कॉल.

तुम्हाला लोकल कॉल पडेल न? तुम्हीच करा किंवा असं करा मिस्ड कॉल द्या परत फोन येईलच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/05/2014 - 01:42

In reply to by गब्बर सिंग

तुम्हां लोकांमुळे मी आजकाल फोन दुसऱ्या खोल्यांमध्ये ठेवून झोपते. च्यायच्ची कटकट. मोठे मॉनिटर वापरले की तुमचे प्रॉब्लेम्सही समजत नाहीत धड.

गब्बर सिंग Fri, 23/05/2014 - 00:36

In reply to by अजो१२३

पुरोगाम्यांच्या सिलॅबसमधे "शांत स्वभावाचा प्रतिगामी कसा हाताळावा" हा एक नविन धडा लवकरच समाविष्ट करण्यात येईल.

हाऊ टू टॉक टू अ लिबरल : इफ यू मस्ट _____ अ‍ॅन कोल्टर

वाचा व थेट निर्वाणपदास पोहोचा. गाडी अधेमधे कुठेही थांबणार नाही बर्का. (कासेगाव, पुसेगाव व ससेगाव वाल्यांनी इथेच उतरून घ्यायचंय.)

मेघना भुस्कुटे Thu, 22/05/2014 - 17:46

In reply to by असा

लिहिता तर यायला लागलं चांगलं. पण वापर कुठे नि कसा करायचा ते तुम्हांला अजून नीटसं कळलेलं दिसत नाही. आता याही प्रतिसादाखाली एक 'बर्मग' टंकून तुम्ही ते सिद्ध करालच म्हणा. पण असू दे, बसा खाली. सरावानं कळेल. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/05/2014 - 19:04

In reply to by मेघना भुस्कुटे

तुझं बरं आहे, तुझ्यावर पुढच्या मेंढराच्या मागे मागे जाण्याचे सांघिक संस्कार नाहीत. बुद्धी वापरून "बर्मग" लिहायची मुभा आहे तुला! निदान तुझ्या मागे कोणी मेंढरू येतंय यात आनंद मानायला शिक. ;-)

चिंतातुर जंतू Tue, 20/05/2014 - 12:53

In reply to by अजो१२३

>> मोठमोठ्या गांधीवाद्यांची यादी हजारांच्या, लाखांच्या घरात आहे हे मला म्हणायचे आहे.

खरंच का? 'गांधीवादी' आणि 'गांधींना महान मानणारे' ह्यांत तुमची काही तरी गल्लत होते आहे का? आज ज्यांना 'गांधीवादी' म्हणता येईल अशी कोण माणसं भारतात आहेत?
जाता जाता एक कोडं : मी फॅब इंडियामधले खादीचे कपडे अधूनमधून वापरतो, पण परदेशी मालसुद्धा वापरतो. गायीसकट अनेक पशू माझ्यासाठी खाद्य आहेत. मी ब्रह्मचारी नाही. सांगा पाहू मी गांधीवादी आहे का?

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 13:55

In reply to by चिंतातुर जंतू

'गांधीवादी' आणि 'गांधींना महान मानणारे' ह्यांत तुमची काही तरी गल्लत होते आहे का?

पहिल्यांदा आपण
१. गांधी नाव ऐकलेले
२. त्यांना पाहिलेले
३. त्यांचे विचार ऐकलेले, वाचलेले
४. त्यांचा अनुनय करणारे
५. इतर
आणि अनंत प्रकारे विरोध करणारे असे प्राथमिक वर्गीकरण करू.

मग नंतर गांधीजींचे सगळ्या विषयावर सगळे विचार / तत्त्वे लिहून काढू. कोण कोण काय काय मानते काय काय मानत नाही त्या प्रत्येक permutation combinations ना वेगवेगळी नावे ठेऊ. मग तो "सांगा पाहू" बुद्धिबळ खेळू. जास्त मजा येईल.

बाय द वे - स्वतंत्रता सेनानी म्हणून लाभ घेणारांची संख्या किती आहे याची कल्पना आहे का? आणि किती जणांनी स्वेअच्छेने हा लाभ घेतला नाही.

तेजा Mon, 19/05/2014 - 21:17

In reply to by अजो१२३

मी गांधींना शिव्या नाही दिल्या. पण मला त्यांचे वर्तन भयंकर खटकते.

कोणाला काय खटकायला हवे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला खटकणार्‍या गोष्टींमुळे मला वाईट वाटायचे कारण नाही. पण, तुम्हाला खटकणार्‍या गोष्टी मलाही खटकल्या पाहिजेत, असा आग्रह तुम्ही धरू शकत नाहीत.

माझे म्हणणे इतकेच आहे कि गांधीजी "असे" होते असे सांगीतले तर लोक साले विश्वासच ठेवत नाही.

लोक विश्वास ठेवत नसतील, तर त्यात माझा काय दोष? कमाल आहे राव! लोक अनेक गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. नरेंद्र मोदी यांचे लग्न झाले आहे, त्यांची बायको जिवंत आहे, या गोष्टीवरही लोक परवापर्यंत विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्याला आपण काय करणार?

आता मधे संघाडे, भाजपाडे, सावरकराडे, इ इ मधे आणू नका. मला त्यांच्या असल्याच (अनैतिक म्हणून कि नको?) वर्तनाचे समर्थन करायचे नाही.

'संघाडे, भाजपाडे, सावरकराडे' यातील एकही शब्द मी माझ्या कोणत्याही प्रतिक्रियेत वापरलेला नाही. संघवाल्यांसाठी मी 'संघोटे' असा सुशील शब्द वापरलेला आहे. वरील सर्व शब्द तुमचे आहेत. कृपया माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करू नका.

विषयांतर नको.

विषयांतर मी नव्हे तुम्ही करीत आहात. संघाचे अतिरेकी गुणगाण गाणार्‍या प्रतिक्रियेवर मी संघाच्याच संजय जोशी यांच्या वासनाकांडाचा संदर्भ दिला, तेव्हा तुम्ही विषयांतर करून थेट महात्मा गांधी यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगांवर घसरलात. महात्मा गांधी कुठे? संजय जोशी कुठे? थोडे तरी तारतम्य बाळगायला हवे आपण.
..............

आणखी एक गोष्ट. मी माझ्या समर्थन आणि विरोधाच्या गोष्टी लपवून ठेवलेल्या नाहीत. मी माझी मते स्पष्टपणे आणि ठामपणे मांडतो. तुम्ही मात्र तुमचा गांधीविरोध स्पष्टपणे न मांडता नथीतून तीर मारल्यासारखे आडून आडून विचार मांडत आहात. हे इष्ट नव्हे.

महात्मा गांधी कुठे? संजय जोशी कुठे? थोडे तरी तारतम्य बाळगायला हवे आपण.

I stop here. You don't read what I write.

By the way, I avoid comparisons. I try to assess a standalone fact. I am not comparing any Sanjay Joshi with Mahatmaji.

And yes, I too support Gandhiji, but never blindly. He must fall in line with my ethos and I will keep questioning till I am satisfied.

नितिन थत्ते Tue, 20/05/2014 - 10:14

In reply to by अजो१२३

>> माझे म्हणणे इतकेच आहे कि गांधीजी "असे" होते असे सांगीतले तर लोक साले विश्वासच ठेवत नाही.

गांधीजी "असे" होते यातून काय सुचवायचे आहे?

अरुण जोशींनी कुठल्यातरी वयात "बघू तरी काय असतं ते" असं म्हणून चरसच्या गोळ्या ओढल्या. नंतर आपल्या आठवणींमध्ये हा अनुभव लिहिला. आता अरुणजोशी चरस ओढत नाहीत. त्या आठवणीतल्या अनुभवानंतरही चरस ओढलेला नाही.

तो अनुभव वाचून लोकांनी अरुण जोशींना "चरसी/गांजेकस" म्हणावे काय? गांधींनी त्यानंतर कितीवेळा तसले प्रकार केले? रेग्युलरली गांधी असं करतच असतील तर गांधींना "असे" होते म्हणता येईल अन्यथा नाही. तशी माहिती दिसत नाही म्हणून लोक गांधी 'असे' होते यावर विश्वास ठेवत नाहीत.

त्या प्रयोगातल्या स्पेसिमेन्सची परवानगी घेतलेली नसणे किंवा त्यांच्या मनाचा विचार न करणे हे आक्षेप घेता येतीलच. गांधी आपले विक्षिप्त प्रयोग दुसर्‍यांवर लादत असत असे म्हणता येईल. पण ते सेक्श्युअली पर्व्हर्ट होते असा आरोप फारसा टिकण्यातला वाटत नाही.

जी व्यक्ती लपून असे व्यवहार करते त्या व्यक्तीचे व्यवहार उघडकीस आले तर लोक चवीने चर्चा करतात. पण गांधींनी स्वतःच या प्रयोगांबद्दल लिहिल्यामुळे लोकांनी त्या फॅक्टला स्कॅण्डलाइज केले नाही.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 11:33

In reply to by नितिन थत्ते

गांधीजी कस्तुरबांशी पूर्वी नीट वागले नाहीत, इ इ सर्वश्रुत आणि लोकमान्य आहे. गांधीजीच्या त्या व्यक्ति म्हणून सुधारण्यावर लोकांचे शिक्कामोर्तब आहे. पण आपण चर्चित असलेला विषय, काळ वेगळा आहे. यावेळी गांधीजी जे काही करत होते ते स्वतः महात्मा मानले जात आहोत हे माहित असून करत होते.

संघोटे काय करतात, भाजप, काँग्रेस काय करते, मोदी कोणाचे नाव घेतो हे महत्त्वाचे नाही. हे सगळेच मतलबी, चोर आहेत असे समजू.

गांधीजींच्या वर्तनाला आपले समर्थन आहे काय? त्यांची ही शुचितापरिक्षा गांधीवादी भारतातल्या सामान्य नागरिकांना, गटांना, कुटुंबांना, कॉलेजांत, सरकारी कार्यालयांत, इ इ त, महान लोकाचे तत्त्वज्ञान जसे वाचले जाते तसे वाचून दाखवू शकतात का? असे होते हि माहिती देऊ शकतात का? हे योग्य कसे हे पटवू शकतात का? त्याची आवश्यकता समजावून देऊ शकतात का? स्वतःही गांधींजींचा अनुनय करू शकतात का? किंवा तशी इच्छा करू शकतात का? वा ब्रह्मचर्याची व तत्संबंधित प्रयोगांची महान व्यक्तिंना/ समाजाला गरज आहे वा नाही हे सांगू शकतात का?

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 03:04

In reply to by अजो१२३

अरुंधतीबाईंनी गांधीजींच्या पंचाला हात आलरेडी घातलेला असताना बाकी लोक चक्क गांधीजींना डिफेंड करताना पाहून खूप रोचक वाटलं. ज्यांसोबत ते झोपत त्यांच्या भावभावनांबद्दलचं मौनही रोचक वाटलं. झालंच तर गेलाबाजार स्त्रीवादी दृष्टिकोनातून मांडणी वगैरे...

बाकी मोदीराज्य आलेले आहे, पण निव्वळ प्रशासकीय डिफॉल्ट इनर्शियामुळे अजून काही दिवस तरी अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावे असे मानण्यास हरकत नसावी.

रोचना Tue, 20/05/2014 - 11:58

In reply to by बॅटमॅन

प्रतिसाद आणि उपप्रतिसादांच्या इतक्या पायर्‍या झाल्यात की कळले नाही - हे ऑब्जरवेशन नेमके कुणाला उद्देशून आहे? एरवी स्त्रीवादी भूमिका घेणारे नेमके कोण इथे गांधींचे समर्थन, आणि मुलींच्या भावनांकडे दुर्लक्ष करतंय? हीच मंडळी एरवी अरुंधती समर्थकही असतात का?
यात नेमके रोचक काय आहे?

या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पॉइंटही डोक्यावरून गेला.

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 13:00

In reply to by रोचना

गांधीजींनी ब्रह्मचर्य एट ऑल चे प्रयोग केले, त्यात ते सोडून काही मुलींचाही सहभाग होता. त्या संदर्भात त्यांची संमती इ.इ. गृहीत धरली किंवा नाही, इ. बद्दल कुठे चर्चा दिसली नाही, व्हेअरअ‍ॅज़ एरवी कुठलीही मिथ डीकन्स्ट्रक्ट करणे हा ऐसीवरचा जण्रल ट्रेंड असतो त्याला अपवाद दिसला हे रोचक वाटलं. अन इथे गांधीजींच्या बाजूने बोलणारी मंडळी अरुंधतीबाईंच्या विरुद्ध बोलताना कधी दिसत नैत फारशी.

तदुपरि अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल: मोदीराज्य आल्यावर सर्व अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा बोर्‍या वाजेल असा ओरडा सुरू आहेच-त्यालाच उद्देशून बोललो. या संदर्भात म्ह. अन्कन्व्हेन्शनल मते मांडणे या संदर्भात म्हणालो.

रोचना Tue, 20/05/2014 - 14:16

In reply to by बॅटमॅन

अन इथे गांधीजींच्या बाजूने बोलणारी मंडळी अरुंधतीबाईंच्या विरुद्ध बोलताना कधी दिसत नैत फारशी.

स्पेसिफिक मुद्द्याकडे लक्ष न देता व्यक्तीसमर्थनावर भर देणे एकूणच धोक्याचे! :-)

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 14:30

In reply to by रोचना

अर्थातच. पण अरुंधतीबाईंच्या समर्थनाचा मुद्दा तुम्ही काढलात त्यासंदर्भात म्हणालो इतकंच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 20/05/2014 - 18:06

In reply to by रोचना

या निमित्ताने रोचना यांच्याकडून यादी मिळाली, दोन-चार प्रतिसाद मिळाले. दोनशेतले दोन टक्के प्रतिसादतरी वाचनीय निघाले.

अजो१२३ Thu, 22/05/2014 - 09:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या (धाग्याच्या) निमित्ताने लोक वाचनीयता कशी ठरवतात हे कळले. त्यातली त्यांची गती कळली.

तेजा Tue, 20/05/2014 - 17:41

या धाग्याच्या चर्चेत श्री. अरूणजोशी हे महात्मा गांधी यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाचे निमित्त करून जे काही लिहित आहेत, ते अश्लाघ्य आहे. गांधीजींची तुलना त्यांनी वासनाकांडात अडकलेले संघाचे प्रचारक संजय जोशी आणि आसाराम बापू यांच्याशी केली आहे, ही खरोखच शोचनीय बाब आहे. "महात्मा गांधी यांनी आपल्या काही महिला अनुयायांसोबत नग्न झोपण्याचे प्रयोग केले" एवढी एकाच वाक्याची माहिती अरुणजोशी यांना आहे. ही माहितीही त्यांनी इंटरनेटवर स्लरिंग करणारया कथित अभ्यासकांनी लिहिलेल्या थातूरमातूर लेखांवरून मिळविलेली आहे. याविषयीचे मूळ सदंर्भ असलेले कोणतेही वाचन त्यांनी केलेले नाही. अशा प्रकारे या विषयाच्या बाबतीत बिलकूल अज्ञानी असताना ते याबाबत धडक विधाने करीत आहे. ही विधाने ढळढळीत खोटी आणि असंबंद्ध आहेत. त्यांच्या खोट्या आणि असंबंद्ध विधानाचे एकच उदाहरण येथे देतो. जोशी लिहितात : "अनेक गांधीविरोधकांनी या वर्तनावर टीका केली आहे. पण सुधारक गांधीवादी काय म्हणतात? क्षणभर आपण प्रयोग नि प्रामाणिकपणा बाजूला ठेउ. पण ब्रह्मचर्याचे फॅड तर चूकच आहे."

ही वाक्ये हास्यास्पद आहेत. गांधींच्या या प्रयोगांना त्यांच्या अनुयायांकडून समर्थन मिळाले, तसाच विरोधही झाला. पण अरुणजोशी यांना यातले काहीच माहिती नाही. प्रामाणिकपणालाच क्षणभर बाजूला ठेवू म्हणणा-या अरुणजोशी यांचा हेतू अप्रमाणिक आहे, हे स्पष्टच दिसते. गांधींचे ब्रह्मचर्य त्यांना फॅड वाटते कारण गांधीजी वयाच्या ३७ व्या वर्षांपासून ब्रह्मचारी होते, हे त्यांना माहिती नसते. पत्नी सोबत असतांनाही ब्रह्मचर्य पाळणे ही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी गांधींना स्वत:शी, विकारांशी मोठा संघर्ष करावा लागला. तो त्यांनी वेळोवेळी नोंदवून ठेवला आहे. याची माहिती अरूणजोशी यांना असण्याचेही कोणतेही कारण नाही.

महात्मा गांधी यांच्यासोबत आश्रमात अनेक स्त्रिया राहत असत. या कोणी सामान्य स्त्रिया नव्हत्या. अत्यंत कुलीन, सौंदर्यवती, बुद्धिवंत अशा या स्त्रिया होत्या. विदेशी विदुषी होत्या, तशाच राजघराण्यातील स्त्रियाही होत्या. दिसायला अत्यंत कुरूप आणि फाटक्या माणसासोबत या स्त्रिया अत्यंत साधेपणाने आयुष्यभर राहिल्या. मॅडेलिनी स्लेड (Madeleine Slade) आणि राजकुमारी अमृत कौर ही दोनच उदाहरणे येथे देतो. स्लेड यांचे मीराबेन असे नामकरण गांधींनी केले. ही रुपवती ब्रिटिश नौदलातील एका रिअर अ‍ॅडमीरलची मुलगी होती. राजकुमारी अमृत कौर या कपुरथळा राजघराण्याच्या राजकुमारी होत्या. एकविसावे शतक सुरू झाले तेव्हा, अमेरिकी माध्यमांनी २० व्या शतकातील १०० जागतिक सौंदर्यवतींची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात राजकुमारी अमृत कौर यांचा समावेश होता. अर्थात हेही अरुणजोशी यांना माहिती नसणार. गांधीजींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगांना आश्रमातील अनेक स्त्रियांचा विरोध होता. हेही अरुणजोशी यांना माहिती नसणार.
या सर्व सौंदर्यवती महिलांसोबत राहत असताना गांधीजींनी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळले. आपणही एक सामान्य विकारी माणूस आहोत, याची जाणीव गांधीजींनी सतत ठेवली. त्यासाठी ते सजग राहिले. विकारांवर मात केली. म्हणून त्यांना जग महात्मा म्हणते.

मी येथे जे काही लिहिले आहे, ते अरुणजोशी यांचे मतपरिवर्तन करावे यासाठी अजिबात लिहिलेले नाही. अरुणजोशी ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, त्या वर्गाची मानसिकता मला माहिती आहे. त्यांना समजून काहीच घ्यायचे नसते. त्यांना फक्त स्लरींग करायचे असते. हे सारे लिहिण्याचा माझा उद्देश वेगळा आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे स्लरींग अनेक दशकांपासून सुरू आहे. या स्लरींगच्या प्रतिक्रियेतून संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांचा महाराष्ट्रात उदय झाला आहे, हे मला आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायचे आहे. "स्लरींगचे उत्तर स्लरींगने", असे नवे तत्त्वज्ञान त्यातून उदयास आले, याकडे आपले लक्ष वेधायचे आहे. अरुणजोशी यांच्यासारखी मंडळी जे लिहित आहेत त्यात आणि अनिता पाटील विचार मंचवाले जे लिहित आहेत त्यात कोणताही फरक नाही.
खाली काही लिन्का देत आहे. त्या वाचा आणि आपणच माझ्या म्हणण्यात तथ्य आहे की, नाही हे ठरवा.

शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?
आज सावरकर हयात असते तर पुन्हा तुरुंगात गेले असते!
रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
लोकमान्य नव्हे भटमान्य!
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 18:01

In reply to by तेजा

गांधीजींबद्दल किंवा जगातल्या सर्वच लोकोत्तर व्यक्तिंबद्दल मला खूप आदर आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. धाग्याच्या विषयाच्या अनुषंगाने मी मला असलेल्या शंका प्रामाणिकपणे मांडलेल्या आहेत.

मूलतः तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणाबद्दलच शंका असेल तर कृपया इथून पुढे माझ्याशी संवाद करू नकात. जगात गांधीजींबद्दल नि इतर थोर पुरुषांबद्दल निष्कारण अत्यंत विकृत मते असलेले लोक मी पाहिले आहेत. त्यांना मी दुर्लक्षितो. तसेच तुम्ही माझ्याबद्दल करा.

गांधीजींच्या सर्व प्रयोगांना समोर ठेऊन, सर्व सत्ये जाणून अनेक लोकांनी त्यांना महात्मा म्हटले असे तुम्ही म्हणता, भारतीय समाज इतका प्रगल्भ नाही नि अजून इंफॉर्मेशन गॅप आहे असे मी म्हणतो. इतके मतांतर आहे मानू नि निरोप घेऊ.

पुन्हा सांगतो गांधीजींच्या इतर सर्व महत्तेवर मी प्रश्नचिन्ह उठवले नाही, तेव्हा उगाच उदाहरणे नको.

तेजा Tue, 20/05/2014 - 18:14

In reply to by अजो१२३

तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रामाणिकपणाबद्दल मी बोललेलो नाही. गांधीजींविषयी तुम्ही जी काही बेधडक वक्तव्ये केली आहेत, त्याबद्दल मी बोललो आहे. गांधीजींचा प्रामाणिकपणा क्षणभर बाजूला ठेवू असे विधान तुम्ही केले, त्यासंदर्भाने माझे विधान आले आहे.

कृपया लक्षात घ्या. आपले वैयक्तिक भांडण नाही. तुम्ही माझे काही नुकसान केलेले नाही, किंवा मीही तुमचे नुकसान केलेले नाही. वैचारिक वाद त्याच पातळीवर घेतले पाहिजेत असे मला वाटते. तरीही मी तुमच्याशी संवाद साधू नये, अशी तुमची इच्छा असेलच तर मी तुमच्या इच्छेचा सन्मानच करीन.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 18:35

In reply to by तेजा

If you presume that I am a confused but die-hard Gandhi lover, you will see a consistent line of thoughts in my arguments.

Everytime you argue, half the portion is allocated to doubting my intensions. I find it very difficult to address the core issue.

"The media would have made an Aasaram out of him" or "People would have thought of such experiments as pervert" are precise desciptions of what I think the reading of situation is.

And there is already huge anti-Gandhi venom in certain sections of the society, so much and so lethal that my kind of argumentation would be seen to be saintly by them. I don't want to and even cannot contribute to this process of poisoning going by my standards. But I genuinely want to be ready with equally fervid argumentation on Gandhiji's side when someone of them hits Achilles heel. May be that is why I argue with Gandhi supporters ruthlessly.

तरीही मी तुमच्याशी संवाद साधू नये, अशी तुमची इच्छा असेलच तर मी तुमच्या इच्छेचा सन्मानच करीन.

हेच योग्य राहिल.

फारएण्ड Thu, 22/05/2014 - 00:16

In reply to by तेजा

अरुणजोशी यांच्यासारखी मंडळी जे लिहित आहेत त्यात आणि अनिता पाटील विचार मंचवाले जे लिहित आहेत त्यात कोणताही फरक नाही. >>> हे आपले खरेच मत आहे काय?

अरूण जोशींनी गांधीजींच्या "एका" गोष्टीबद्दल त्यांच्या माहितीवरून काही लिहीले - ते बरोबर असेल, चुकीचे असेल. त्याचा प्रतिवाद करणारे तुमचे मुद्देही वाचले. ते ही इतरांना पटतील किंवा न पटतील. माझा मुद्दा तो नाही. पण "ते ज्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात" हे कोठून आले? परत संभाजी ब्रिगेडचा संदर्भ दिल्याने कोणता "वर्ग" ते उघड आहे.

आणि अरूण जोशी (किंवा "त्यांच्यासारखे लोक" चा तुमचा जो अभिप्रेत अर्थ आहे तो) गांधींवर टीका करतात म्हणून संभाजी ब्रिगेड/अनिता पाटील विचार मंच एकूण ब्राह्मणांवर घाऊकपणे व अत्यंत वाईट भाषेत लिहीतात ही त्याची प्रतिक्रिया?

पुन्हा एकदा- तुम्ही जे त्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करत आहात ते पटले नाही, तरी तुमचा तो हक्क आहे. पण येथे "एक कोणतातरी वर्ग" काहीतरी चूक करत आहे म्हणून ब्रिगेड वगैरेंचे कळत-नकळत समर्थन केले जात आहे. त्यावर माझी ही कॉमेण्ट आहे. तुमाचा राजकीय अभ्यास तुमच्या पोस्ट्समधून दिसत आहे - त्यामुळे ब्रिगेडचा उदय कशातून झाला आहे ते तुम्हाला माहीत नसेल असे वाटत नाही. तिच्याबद्दल लोकांचा आता भ्रमनिरास का झाला आहे हे तुम्हाला माहीत असेलच.

अजो१२३ Thu, 22/05/2014 - 09:02

In reply to by फारएण्ड

नैतर काय हो. कोण अनिता पाटील (वर्ग १)? तिला प्रक्षोभक वाटावे असे लेखन कोण मंडळी (वर्ग २) करतात? मग ती कोणत्या समाजाचे (वर्ग ३) थोर पुरुष उचलते नि टिका करते? ती तेजा यांसारख्या कोणत्या मंडळींना (वर्ग ४) झोंबते? मग ते तथाकथित अरुणजोशींना (वर्ग ५) दोष देतात कि त्यांनी एक विशिष्ट प्रकारची टिका करू नये.

अरे माझा काय संबंध? अरुणजोशी या आयडीने या वर्ग ४ च्या लोकांची चिंता का करावी? माणसानं काय गंध, टिळे, टोप्या, लेबले लावल्याशिवाय जगूच नये काय? फॅक्ट टू फॅक्ट, स्टेटमेंट टू स्टेटमेंट चर्चा करायचीच नाही? मी मान्य करतोय ना कि उच्च नि मध्यमवर्गीयांत बरेच लोक हे प्रयोग जाणून आहेत नि त्यातील काहींना ते प्रयोग महान वाटतात. पण लोक गांधीजींना त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, साधे होते, सत्ता नाकारली, खरे होते, इ इ हजार कारणांनी महात्मा मानतात. हे प्रयोग जनसामान्यांना माहित नाहीत नि झाले तर त्यांना जबरदस्त धक्का बसेल, इतका कि गांधीजींची महात्माता धोक्यात येईल. याचे कारण सद्य भारतीय समाजाची लैंगिक प्रगल्भता असो वा त्या प्रयोगांचे प्रयोजन, स्वरुप, तथ्य इ इ असो. अमान्य असेल तर यसे म्हणा, व्यक्तिगत माझ्यावरच का घसरता?

तेजा Thu, 22/05/2014 - 16:21

In reply to by फारएण्ड

@ फारएण्ड,

होय, अरुणजोशी आणि अनिता पाटील विचार मंचवाले यांच्यात कोणताही फरक नाही,हे माझे खरेच मत आहे. आणि मी त्याच्यावर ठाम आहे. मी हे मत उगाच व्यक्त केलेले नाही. सावरकरांच्या कथित समलैंगिकतेचा विषय चघळताना जो उत्साह 'अपाविमं'वाले दाखवितात, त्याच उत्साहाने अरुणजोशी गांधीजींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाची चर्चा करतात. दोघांच्या युक्तिवादाची लाईन सेम आहे. अगदी वाक्येही सेम आहेत. उदाहरण पाहू या.

अपाविमंवाले म्हणतात : आज सावरकर हयात असते तर पुन्हा तुरुंगात गेले असते
अरुणजोशी म्हणतात : गांधीजी आज असते तर माध्यमांनी त्यांचा आसाराम बनवला असता.

हे साम्य अद्भूत नव्हे काय?

'अपाविमं'वाल्यांचा संबंध संभाजी ब्रिगेडशी असावा, असे ब्लॉगवरील लेखन वाचून जाणवले. त्या अनुषंगाने वरील प्रतिसादात ब्रिगेडचा उल्लेख केला आहे.

माझ्या प्रतिसादातील वर्ग हा शब्द जातीवाचक नसून प्रवृत्तीवाचक आहे. गांधींवर टीका करणारे सगळेच ब्राह्मण नाहीत. संभाजी ब्रिगेडवालेही गांधींचे विरोधकच आहेत. बामसेफला सोबत घेऊन त्यांनी गांधींविरोधात मोठी मोहीम चालविली आहे, हे नेटवर वावरणार्‍या आपल्यासारख्या जाणकारांना माहिती असेलच.

फारएण्ड Fri, 23/05/2014 - 00:21

In reply to by तेजा

व्यक्तिविरोध व जातिविरोध हे दोन्ही तुम्ही सारखेच धरले आहे. मुळात अरू़ण जोशींचे इतर लेखन वाचून त्यांचा गांधींना घाऊक विरोध आहे असे वाटत नाही (त्यामुळे "व्यक्तिविरोध" ही येथे म्हणणे योग्य नाही). केवळ त्या एका वागण्यावर ती टीका आहे. याउलट अपाविमं व सब्रि यांच्या मुळात असलेल्या ब्राह्मण समाजाविरूद्धच्या प्रचारयंत्राचा तो लेख म्हणजे केवळ एक भाग आहे.

अरूण जोशी म्हणतात - गांधीजींच्या इतर अनेक गोष्टींबद्दल त्यांना आदर आहे. पण ही एक गोष्ट वाईट होती व पटण्यासारखी नव्हती (त्याबद्दल तुमचे मत वेगळे आहे, याची कल्पना आहे)
अपाविमं वाले म्हणतात - ब्राह्मण समाज वाईट व देशद्रोही आहे. ते सिद्ध करायला प्रत्येक घटनेतून चुन चुन के ब्राह्मण व्यक्ती बाजूला काढून ते आणि फक्त तेच कसे वाईट होते हे दाखवतात.

त्यामुळे यांची एक पोस्ट तेथील एका लेखासारखी वरकरणी वाटली तरी त्यामुळे हे दोन्ही सारखेच हे बरोबर नाही.

तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे अपाविमं ही "अशा" लेखांवरची प्रतिक्रिया आहे. हे ही कोठून आले कळत नाही. य दोन्ही गोष्टींचा तर एकमेकांशी काहीच संबंध नाही.

तेजा Fri, 23/05/2014 - 16:37

In reply to by फारएण्ड

अजोंचे लेखन हे याच विषयावर व अविधायक उद्देशाने प्रेरित असलेले दिसत नाही. अनिता पाटील नामक ट्रोलबद्दल मात्र असे म्हणवत नाही.

सावरकरांची बदनामी ही अविधायक आणि गांधीजींची बदनामी मात्र विधायक असे काही आहे का?
अपाविमं आणि अजो यांचा व्यक्ती म्हणून विचार न करता प्रवृत्ती म्हणून विचार करा. मला वाटते निरपेक्ष बुद्धीने, पूर्वग्रह बाजूला ठेवून पाहिल्यास या प्रवृत्तीमधील साम्य येऊ शकेल.

अरुणजोशी म्हणतात - गांधीजींच्या इतर अनेक गोष्टींबद्दल त्यांना आदर आहे...

आदर आहे, असे म्हणून कोणी बदनामी करण्याचा परवाना घेऊ पाहत असेल, तर ते चूक आहे. आदर हा कृती-उक्तीतून दिसावा लागतो. मी संजय जोशींच्या वासनाकांडाचा विषय काढताच अजोंनी अत्यंत त्वेषाने गांधींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगांचा विषय काढला. त्याचे वाक्य असे होते : "संजय जोशी कोण ते वाचले. महात्मा गांधी कोण ते तुम्हाला माहित आहे का?" या वाक्यामागील प्रेरणा जातीय आहे की व्यक्तीगत याला महत्त्व नाही. त्यातून साध्य होणार्‍या परिणामाकडे पाहावे.

अपाविमं ही "अशा" लेखांवरची प्रतिक्रिया आहे. हे ही कोठून आले कळत नाही. य दोन्ही गोष्टींचा तर एकमेकांशी काहीच संबंध नाही.

या मुद्यावरील माझे विवेचन एकदम तात्कालिक घेऊ नका. ते व्यापक अर्थाने केले आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेला दशकभराचाही इतिहास नाही. पण, ज्या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा ही संघटना करते, तो समाज महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वस्तीस आहे. मग ही संघटना अलिकडेच अचानक का वाढली? हा प्रश्न जेव्हा मला पडतो, तेव्हा जी काही उत्तरे मिळतात, ती व्यथित करणारी आहेत. पण, हा विषय एका प्रतिसादात मावणारा नाही. त्यावर जरा विस्ताराने लिहावे लागेल. कधी तरी त्यावर नक्की लिहीन.
........................
जाता जाता आपल्या समाजाचे एक कटू सत्य सांगतो. आपल्या समाजात महापुरुषांची महत्ता जातीनुसार बदलत जाते. त्याच प्रमाणे महापुरूषांच्या बदनामीची तीव्रताही जातीनुसार बदलत जाते. काही समूहांना फक्त आंबेडकरांचा उपमर्द सुखावून जातो, त्यातून "वर्शिपिंग फाल्स गॉड"चा जन्म होतो. काहींना शिवरायांच्या बदनामीतून विकृत आनंद मिळतो, त्यातून जेम्स लेन जन्माला येतो. काहींना महात्मा गांधी यांच्या बदनामीने हिस्टेरिया होतो. त्यातून "मी नथुराम गोडसे बोलतोय"चा जन्म होतो. काहींना सावरकरांचा उपमर्द केल्याने आनंद होतो...
ही यादी फार मोठी आहे.

महापुरुषांच्या बदनामीने विशिष्टच समाज पेटून उठतात. इतरांना त्याचे काही देणे घेणे नसते. येथे महात्मा गांधी थोडेसे अपवाद आहेत. त्यांच्या बदनामीने कोणताच समाज पेटून उठत नाही.

तेजा Fri, 23/05/2014 - 16:44

In reply to by तेजा

अपाविमं आणि अजो यांच्यातील साम्य दाखविण्यासाठी मी दिलेल्या लिंका निरपेक्ष भावनेने वाचा. विचार करा. निष्कर्ष काढताना निरपेक्ष राहा.

अपाविमंवाले म्हणतात : आज सावरकर हयात असते तर पुन्हा तुरुंगात गेले असते
अरुणजोशी म्हणतात : गांधीजी आज असते तर माध्यमांनी त्यांचा आसाराम बनवला असता.

तेजा Thu, 31/07/2014 - 16:45

In reply to by फारएण्ड

अपाविमं वाले म्हणतात - ब्राह्मण समाज वाईट व देशद्रोही आहे. ते सिद्ध करायला प्रत्येक घटनेतून चुन चुन के ब्राह्मण व्यक्ती बाजूला काढून ते आणि फक्त तेच कसे वाईट होते हे दाखवतात.

कुठल्याही एका समाजाला "चुन चुन के" टार्गेट करणे चूक आहे. पण त्याबरोबरच एकाच विशिष्ट समाजाचा "चून चून के" उदो उदो करणेही चूक आहे. ब्राह्मण समाजातील कुप्रवृत्तीच्या ठराविक व्यक्ती निवडून सगळा समाज तसाच आहे, असे म्हणणे समर्थनीय नाही. पण, ब्राह्मण समाजातील चार सत्प्रवृत्त लोक निवडून सर्व समाज सत्प्रवृत्तच आहे, असा दावा करणेही समर्थनीय नाही. या दोन टोकाच्या प्रवृत्ती आहेत. दुर्दैवाने त्या सर्वच जातींत आढळतात. जातीय उतरंडीचे समर्थन करताना ब्राह्मण ही कशी सर्वश्रेष्ठ जात आहे, असे हिरीरीने मांडणारे ठायी ठायी भेटतात. त्याची प्रतिक्रिया म्हणून अपाविमंचे लिखाण आले असावे, असे मला वाटते. अर्थात मी म्हणतो तेच खरे आहे, असा माझा दावा नाही. हे माझे एक निरीक्षण आहे. कोणाला आणखी काही कारण मीमांसा करता येणे शक्य असल्यास जरूर करावी. मला वाचायला आवडेल.

मी जेथे काम करतो त्या ऑफिसात एक ज्येष्ठ अधिकारी होते. ब्राह्मण समाज हा संस्कृती असलेला भारतातील एकमेव समाज आहे, असे ते वारंवार सांगत असत. आता ते रिटायर्ड झाले आहेत.

सुनील Thu, 31/07/2014 - 18:12

In reply to by तेजा

शेवटच्या वाक्याचा उर्वरीत प्रतिसादाशी असलेला संबंध समजला नाही.

म्हणजे, ते गृहस्थ तसे न म्हटते तरी, जेव्हा व्हायचे तेव्हा, रिटायर झालेच असते की!

की, ते तसे म्हणत म्हणून त्यांना मुदतपूर्व रिटायर केले गेले, असे सुचवायचे आहे?

मी Thu, 31/07/2014 - 18:28

In reply to by सुनील

की, ते तसे म्हणत म्हणून त्यांना मुदतपूर्व रिटायर केले गेले, असे सुचवायचे आहे?

आता ते टायर्ड झाले आहेत असंही चाललं असत.

मी Thu, 31/07/2014 - 18:43

In reply to by बॅटमॅन

छे अशाप्रकारच्या दशकी (२५*१०) आणि सम संख्येला प्रतिसाद देणं फारच सामान्य आहे, आम्ही ३, ७, २४९ वगैरे इतर लोकांना अगम्य वाटणार्‍या नंबरांवरच प्रतिसाद देतो. :प

बॅटमॅन Thu, 31/07/2014 - 19:06

In reply to by मी

चालतंय सोडा. पण्णास-शंभ्राच्या पटीत प्रतिसाद दिसले की कस्सं हायसं वाटतं, उगा के एल पी डी वाटत राहतं असे ९९, १४९, इ. प्रतिसाद पाहिले तर म्हणून देतो झालं.

ऋषिकेश Fri, 23/05/2014 - 10:07

In reply to by तेजा

अजो आणि अनिता पाटिल तुलना पटलीही नाही आणि रुचली तर अजिबात नाही!

दोघांची कारकिर्द बघता उद्देशातील महदंतर लगेच समोर यावे आणि दुसरे म्हणके अजोंचे लेखन हे याच विषयावर व अविधायक उद्देशाने प्रेरित असलेले दिसत नाही. अनिता पाटिल नामक ट्रोलबद्दल मात्र असे म्हणवत नाही.

अजो१२३ Fri, 23/05/2014 - 18:26

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, तुलाच उद्देशून बोलतो. तसा तुला उद्देशून नाही.

१. माझ्यामते ऐसी कोणी ब्लास्फेमस लिहू लागले तर सरळ बंदी घालेल. किंवा किमान सक्त ताकिद देईल.
२. माझ्या कोणत्या प्रतिसादात मी असे लिहिले आहे कि गांधीजींचे लैंगिक विचार विकृत वा वासनापूर्ण, इ इ होते? माझा जो काही विरोध आहे तो त्यांच्या त्या विषयावरच्या ऑफिशियल पोझिशनलाच आहे.
३. आर एस एस मधे कोणी चरित्रहिन निघाले म्हणजे पूर्ण आर एस एस ला चरित्रहिन म्हणता येत नाही तसेच गांधीजींचे ब्रह्मचर्यावरचे, लैंगिकतेवरचे विचार बुरसटलेले होते म्हणून काँग्रेसला तसे म्हणता येत नाही हा मूळ मुद्दा होता. किंवा उलटा मांडा - गांधीजींचे ब्रह्मचर्यावरचे, लैंगिकतेवरचे विचार बुरसटलेले होते म्हणून पूर्ण काँग्रेसला तसे मानता येत नाही आर एस एस मधे कोणी चरित्रहिन निघाले म्हणजे पूर्ण आर एस एस ला चरित्रहिन म्हणता येत नाही.
४. ब्रहम्चर्य या संकल्पनेत काही शास्त्रीय, नैतिक, अध्यात्मिक तथ्य नाही असे माझे सामान्यतः मत आहे, ज्यांचे नाही त्याचा मला आदर आहे.
५. संजय जोशी कोण ते मला नव्हते. पण त्याची नि गांधीजींची तुलना करणे मूर्खपणा आहे. हा स्टँड माझ्याकडून कितींदा टाईप करून घेणार? पण त्याचे उदाहरण दिल्याने माझ्या मनातले गांधीजींवरचे प्रश्न मला या फोरमवर विचारावे वाटले. याला कनेक्टिंग लिंक पलिकडे महत्त्व नाही.
६. आसाराम केला असता असे मला प्रामाणिकपणे वाटते. याचे कारण ओशो. ओशोंना प्रचंड महान नि प्रचंड घाण मानणारे लोक नि माध्यमातले लेखक एकत्र पाहिले आहेत कारण ओशोचा जमाना मिडियाचा होता. जनतेची लैंगिक विषयांवरील प्रगल्भता व माहितीचा अभाव हे मुद्दे फरक पाडू शकतात असे मला तीव्रतेने वाटते. आता प्लीज ओशो नि गांधीजींची तुलना कशी शक्य आहे, इ इ म्हणू नका. मुद्दा तो नाही.
७. हे जे कोण अनिता पाटील, बामसेक, ब्रिगेड, इ इ (फॉर दॅट मॅटर कोणीही विथ रेर अपवाद्स) आहेत त्यांची जी काही उदात्त, उन्नत , अधिकृत तत्त्वे आहेत नि सदवर्तने आहेत त्यांना माझा पाठिंबा आहे. जे जे काही वाइट आहे त्याला विरोध आहे. पण नक्की काय काय कसं कसं आहे हे ठरवायची माझी पात्रता नाही. मला कोणत्याही संघटनेवर मर्यादेबाहेर टिका करायला आवडत नाही.
८. ऐसीवरचे सदस्य हे बुद्धीजीवी, उदारमतवादी नि टिकेस खुले (हे धोरणातच आहे) आहेत हे अध्याहृत आहेत. अँटागोनिझम वा भावना दुखावले जाणे हे इथे खेल खेल में आहे, खरोखरीचं नाही. त्यात सिरियस काही नाही.
९. अ ने ब लोकांचे वाचन करून क लोकांच्या ड नेत्यांना काहीबाही लिहिणे नि त्यातून ई लोकांच्या भावना दुखावणे नि मग त्यांनी फ लोकांना टार्गेट करणे या सामाजिक खेळात मी कुठेच नाही. मला कुठे वर्गीकॄत करू नये ही पुन्हा विनंती.
10. Please note that the maximum audience on this site is a different class. Probably all members with ill-conceived, parochial views are hooted out or are not active at all.
११. आणखी एक. ज्यांच्यांत गांधीद्वेष भरला आहे त्यांच्यासोबत आर्ग्यू करण्यात काय हशील? ते काय बदलतात का? आणि माणसानं इतकं संवेदनशील का असावं? टिकाकार म्हणजे द्वेष्टाच असं काही सूत्र आहे का?
१२. हा अख्खा धागा पाहिला तर माझे आरोप फार स्पेसिफिक, जस्ट अराउंड वन पॉइंट आहेत. शिवाय सगळ्या लोकांच्या सगळ्या व्यक्तिगत मतांचा मी आदर करायचा प्रयत्न केला आहे.
१३. आता हे सगळं कमी पडत असलं तर गांधीजी माझ्याजागी असते तर त्यांनी जे केलं असतं तेच मी करत आहे असं मानायला मी तयार आहे.