मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १२
व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---------
१. ६ महिला (बायका शब्द अर्थशः चूक आहे का?), २५% कॅबिनेट महिलांचे.
२. बर्याच निवडीत एक लॉजिक आहे, जसे जावडेकर माध्यमाच्या पार्श्वभूमीवरचे आहेत तर सूचना, प्रसारण; डॉ़क्टर हर्ष्वर्धन - आरोग्य; गंगाप्रेमी उमा भारती - गंगा शुद्धीकरण, इ
३. सगळं क्रॉस रिपोर्टिंग केलं आहे. म्हणजे इकडे स्टेट मिनिस्टर स्वतंत्र प्रभार असेल तर त्या खात्यात दुसर्याच्या खाली काम करावे लागेल.
४. संघी लोकांचा प्रचंड भरणा आहे. ज्याला संघाचे खरोखरच (म्हणजे लिटरल) भय वाटते त्याने दडी मारावे इतके संघी मंत्रिमंडळात आहेत. संघ मंत्री ठरवण्यात गप्प होता असे मानायला अवघड जावे. इथून पुढे (किमान १९ पर्यंत) संघाचे उल्लेख सरकार दरबारी, मिडीयांत, इ इ आदराने होणार हे निश्चित.
५. एक "फेमिना मिस इंडिया अप्लिकंट, मॉडेल, अॅक्टर" सोडली तर सगळेच कंझर्वेटिव आहेत.
६. प्रगतीला अडसर ठरणार्या मनेकांना अल्लाद महिला व बाल कल्याणकडे शिफ्ट केले आहे. अशी चातुर्ये अनेक आहेत. अन्यथा मनेका नि पर्यावरण ही जोडगोळी ठरलेली असायची.
७. कोण्याही नावाजलेल्या नेत्याच्या मुलाला मंत्रिपद नाही.
८. मुस्लिम जवळजवळ नाहीत. दलित फारच कमी. आदिवासी जास्त. सहयोगी दल कमी.
इकॉनॉमिकल आणि सोशल बॅकवर्डनेस
इकॉनॉमिकल आणि सोशल बॅकवर्डनेस ठरवण्याचा जात हा अतिशय स्वस्त मार्ग उपलब्ध आहे. त्यात चुकीचे लोक फायदा घेण्याची आणि योग्य लोक वंचित राहण्याची शक्यता खूप कमी आहे.
मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न....
खरोखरचे गरजू इन्डिव्हिज्युअली माहित करून घ्यायचे तर १०० कोटी लोकांचा (समजा १९५० साली ४० कोटी लोकांचा) एलॅबोरेट सर्वे करावा लागेल जो करणे अत्यंत खर्चिक असेल. त्यातून जी लिस्ट तयार होईल आणि नुसता जात हा आधार धरला तर जी लिस्ट तयार होईल त्यात सिग्निफिकंट फरक येणार नाही असा त्याकाळी (आणि आजही) अंदाज असावा.
मान्य आहे. पण हा विचार
मान्य आहे.
पण हा विचार ज्याकाळी आरक्षण प्रथम आणलं त्याकाळासाठी योग्य आहे. जर आरक्षण अस्तित्त्वात आल्यानंतर साठ वर्षांनीही हेच वाक्य खरं ठरत असेल, तर इकॉनॉमिकल आणि सोशल बॅकवर्डनेसवर आरक्षण हा उपाय अयशस्वी झाल्याचंच सिद्ध होतं.
"क्रीमी लेयर" सारखे पुरवणी उपाय हे त्या सोपेपणासाठी मोजलेली किंमत आहे.
जर आरक्षण अस्तित्त्वात
जर आरक्षण अस्तित्त्वात आल्यानंतर साठ वर्षांनीही हेच वाक्य खरं ठरत असेल, तर इकॉनॉमिकल आणि सोशल बॅकवर्डनेसवर आरक्षण हा उपाय अयशस्वी झाल्याचंच सिद्ध होतं.
असं म्हणता येत नाही. ही साठ वर्षे चालू झाली तेव्हा आरक्षण द्यायला जागाच फार कमी होत्या. म्हणजे एकूणच साक्षरता २५% असेल तर (म्हणजे जवळजवळ ५०% वा सारेच दलित निरक्षर नि अर्धे सवर्ण निरक्षर) हा काळ अपुरा आहे असे मानावे लागेल. आज जी उरलेली ३०% इ निरक्षरता आहे, ती पुन्हा खालच्या जातींतच आहे. तेव्हा १००% साक्षरता होईपर्यंत तरी आरक्षणावर प्रश्नचिन्ह आणू नये.
अर्थातच त्याच दलित पिढिंनी आरक्षण पुन्हा पुन्हा उपभोगले तर त्याचा इफेक्टीवनेस कमी होतो नि त्याचा मेकॅनिझम असावा हे मान्य.
६. प्रगतीला अडसर ठरणार्या
६. प्रगतीला अडसर ठरणार्या मनेकांना अल्लाद महिला व बाल कल्याणकडे शिफ्ट केले आहे. अशी चातुर्ये अनेक आहेत. अन्यथा मनेका नि पर्यावरण ही जोडगोळी ठरलेली असायची.
जयराम रमेश यांच्यानंतर तथाकथित प्रगतीला अडसर ठरेल अशा व्यक्तीला पर्यावरण खाते न देण्याची काँग्रेसी परंपरा भाजपानेही चालु ठेवली आहे याचा खेद वाटतो.
बाकी, महिला व बालकल्याण हे खाते महत्त्वाचे आहे (हे खाते महिलांनाच का दिले जाते? असा प्रश्न पडतो - मात्र ते असो). याआधीच्या मंत्री श्रीमती कृष्णा तीरथ यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यापुढे मनेका गांधी किती चांगले काम करतात हे पाहणे रोचक ठरावे.
टॅक्स
The term “Tax” is no where defined in Indian Constitution.
Supreme Court of India has approved definition of “Tax” given by Australian High Court in the famous case, The Commissioner, Hindu Religious Endowments, Madras vs Sri Lakshmindra Thirtha Swamiar, 1954 is “A tax is a compulsory exaction of money by public authority for public purposes enforceable by law and is not payment for services rendered.”
गब्बरजी, पब्लिक (मंजे हा शब्द तसा तुमच्या क्लासला आवडणार नाही, पण) इंटरेस्ट लिटिगेशन टाकणार? आम्ही इतका टॅक्स देतो, आम्हाला काय सेवा मिळतात असे जे तुम्ही म्हणता तेच घटनेला नि कोर्टाला मान्य नाही.
A tax is a compulsory
A tax is a compulsory exaction of money by public authority for public purposes enforceable by law and is not payment for services rendered
ही व्याख्या मला मान्य आहे. पण फक्त ही व्याख्या पाळावी - सरकारने - प्रत्येकाकडून कंपल्सरीली टॅक्स वसूल करायचा व फक्त पब्लिक पर्पझेस साठी वापरायचा. म्हंजे भुकेने मरत असलेल्या गरीबाकडूनही दयामाया न बाळगता बंदूकीच्या दस्त्याने ठोकून टॅक्स वसूल करावा. व तेच तत्व श्रीमंतास लावावे - टॅक्स चुकवला की तितकीच कठोर - म्हंजे बंदुकीच्या दस्त्याने निर्दय पणे ठोकून टॅक्स वसूल करायचा.
१) (टॅक्स) कंपल्सरी ह्या
१) (टॅक्स) कंपल्सरी ह्या शब्दास प्रत्येकाकडून ची शर्त नसेल तर ते एक्स्टॉर्शन होते. नाही का ? नसल्यास कसे नाही ते सांगा. ताबडतोब मान्य करतो.
२) पब्लिक पर्पज ची व्याख्या ही आधीच करण्यात आलेली आहे - Non-excludable आणि Non-rivalrous. ही व्याख्या पब्लिक गुड्स ची आहे. पण सरकार या संस्थेसाठी बदल करून घ्यावी लागेल. व हे ठीक आहे. http://en.wikipedia.org/wiki/Public_good
३) तुम्हास कदाचित असे म्हणायचे असेल की - गब्बर (श्रीमंतांचा स्वयंघोषित प्रतिनिधी) माझी व्याख्या इतरांवर लादतोय का ? गब्बर ची व्याख्या ही आर्बिट्ररी आहे का ? त्यावर फक्त ४ मिनिटांचा व्हिडिओ देतो ... उत्तरादाखल - https://www.youtube.com/watch?v=4x5hjSpHXL8
१) (टॅक्स) कंपल्सरी ह्या
१) (टॅक्स) कंपल्सरी ह्या शब्दास प्रत्येकाकडून ची शर्त नसेल तर ते एक्स्टॉर्शन होते. नाही का ? नसल्यास कसे नाही ते सांगा. ताबडतोब मान्य करतो.
एक्सटॉर्शन म्हणजे काय तर Illegal use of one's official position or powers to obtain property, funds, or patronage.
मात्र टॅक्स कलेक्शन तेही फक्त गरीब नसलेल्यांकडून हे 'लीगल' असल्याने ते एक्सटॉर्शन होत नाही
Illegal use of one's official
Illegal use of one's official position or powers to obtain property, funds, or patronage.
१) इल्लिगल याचा अर्थ - जो कायदा त्याच्या सब्जेक्ट्स नी मान्य केलेला नसूनही लादला जातो तोच ना ?
२) मुंबईतील टोळीवाले (अब्दुल टूंडा, सलेम जलेला, शकील फोंडा) जी खंडणी वसूल करतात ती कोणत्या ऑफिशियल पोझिशन चा गैरवापर करून ?
१. होय तोच. गरिब
१. होय तोच. गरिब नसलेल्यांकडूनच टॅक्स घ्यावा हे भारतातील नागरीकांनी (सबजेक्ट्स हा राजेशाही शब्द लोकशाहीत लागु नाही) त्यांच्या प्रतिनिधींकरवी मान्य केले असल्याने ते लीगल आहे. अर्थात ते एक्सटॉर्शन नाही.
२. त्यांच्याकडे ऑफिशियल पोझिशन नसते तेव्हा त्यांनी पैसे वसूल करणे हेच इल्लीगल आहे. (कसे वसूल करतात हा प्रश्नच लागू नाही)
१. होय तोच. गरिब
१. होय तोच. गरिब नसलेल्यांकडूनच टॅक्स घ्यावा हे भारतातील नागरीकांनी (सबजेक्ट्स हा राजेशाही शब्द लोकशाहीत लागु नाही) त्यांच्या प्रतिनिधींकरवी मान्य केले असल्याने ते लीगल आहे. अर्थात ते एक्सटॉर्शन नाही.
सब्जेक्ट्स हा शब्द प्रजातंत्रात लागू आहे. अ) ज्यांनी एखादा कायदा पाळण्याचे मान्य केलेले आहे आणि ब) ज्यांना त्या कायद्याच्या पाळण्यासाठी निर्माण केलेल्या एन्फोर्समेंट मेकॅनिझम ला सामोरे जावे लागते ते सबजेक्ट्स. राजेशाहीत पहिला भाग (अ) बर्याच प्रमाणावर नव्हता.
फक्त गरिब नसलेल्यांकडूनच टॅक्स घ्यावा हे मान्य करणे - हे आर्बिट्ररी शिवाय दुसरे काही असूच शकत नाही. कायदा हा आर्बिट्ररी नसायला हवा. (आर्बिट्ररी म्हंजे नेमके काय ते मी वर दिलेल्या व्हिडिओत आहे.)
आर्बिट्ररी कायदा हा प्रजातंत्राच्या मुळावरच घाला घालणारा आहे. व याउप्पर - हा कायदा आर्बिट्ररी आहे असे आम्ही (गरीबांचे प्रतिनिधी) मान्य करतो. मग तर झाले. पण तो तुम्हास (श्रीमंतांस) पाळावाच लागेल - असा युक्तीवाद केला जाऊ शकतो. पण त्या युक्तीवादासच माझ्याकडे उत्तम प्रत्युत्तरे आहेत.
आर्बिट्ररी कसे?
आता (हाफिसातून) व्हिडीयो अॅक्सेस होत नाहीये. मात्र मी त्याचा इथे अर्थ 'unrestrained and autocratic in the use of authority' असा घेतो.
मग 'फक्त गरिब नसलेल्यांकडूनच टॅक्स घ्यावा हे मान्य करणे' हे अप्रत्यक्षरित्या (प्रतिनिधींकरवी) सर्वानुमते मान्य करणे हे अन्रिस्ट्रेन्ड नी ऑटोक्रॅटिक अर्थात आर्बिट्ररी कसे?
बाकी सर्व ठीक, पण...
...'आम्राणां केज्रिवालोऽस्मि'???
---------------------------------------
(अवांतर: 'आम्राणाम्' हा 'आमादेर'चा संस्कृत अपभ्रंश आहे काय?१ बोले तो, 'आमचा'२ अशा अर्थी? अॅज़ इन, 'हा आमचा केजरीवाल, आमचा याच्यावर भारी जीव'३, इ.इ.)
=====================================================================================
१ बंगालीतल्या कशाचा तरी संस्कृतात अपभ्रंश होऊ शकतो, यावरून बंगाली प्राकृत ही संस्कृतची जननी असावी, अशी अटकळ बांधण्यास हरकत नसावी.
२ 'आमादेर' = 'आमचा' = 'आम' + 'चा' = 'आम्राणाम्'.
३ 'आम-चा', पक्षी 'आंब्याचा', केजरीवालवर भारी जीव, यावरून, केजरीवाल आंबे खात नसून आंबे केजरीवालला खातात (आणि त्यांना तो जाम४ आवडतो), असाही निष्कर्ष काढता यावा.
४ 'किसान' ब्र्याण्ड. थोडक्यात, आंबे केजरीवालचा जाम करून खातात.
गरीबांवरील कर- निरर्थक संकल्पना
गब्बरजी, सादर प्रणाम.
मी मूळातून चालू करतो. अपेक्षित उत्तरे कंसात.
१. पोलिटिकल एंटीटीज, जसे भारत, असाव्यात का? (हो)
२. त्या असल्या तर त्यांच्यात सरकार असावे का? (हो)
३. असावे, तर त्यांना लागणारा खर्च (सगळ्या वा कसे हे सध्याला बाजूला असू द्यात) करावा लागेल का? (हो)
४. असेल, तर हा पैसा सरकारी स्रोत नि करांतून येणार का? (हो)
आता, मला सांगा, कि डायरेक्ट मार्जिनल प्रोपोर्शन कर नसले तर अकाउंटॅबिलिटीसाठी सरकारवर दबाव नसतो हे जगभराचे निरीक्षण आहे. मग आपण रेग्रेसिव करपद्धतीचा इतका आग्रह का धरता? म्हणजे खास गब्बरना खुश ठेवण्यासाठी मी इंन्कम टॅक्स नावाची कल्पना काढून टाकतो. तरीही गब्बर श्रीमंत आणि जास्त व्यवहार तेही जास्त किमतीचे करणारे असल्याने रिग्रेसिव टेक्स देखिल तेच जास्त भरतील. मग पुन्हा आरडाओरड. मग आपण म्हणाल लंपसम करपद्धती आणा.
कृपया हे समजून घ्या कि गरीब लोकांच्या लेबरचे एक बेसिक मिनिमम इंट्रींसिक पोस्ट टॅक्स मूल्य आहे. तुम्ही कोणतीही करपद्धती आणा ते तितकेच राहणार आहे. कामगाराला मळके तर मळके, पण कपडे पाहिजेतच. उद्या कारखान्यात नागडे येऊन काम करावे ही अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही. म्हणून स्वरुप कराचे असो वा बाजारमूल्याचे असो, गरीबांच्या कष्टांना जो भाव मिळायचा तो मिळणारच. (म्हणजे कर लावलाच तर ते रेट वाढवणार नि बॅ़क टू स्क्वेअर वन).
लक्षात घ्या, गरीबांवर कर लावावा कि नाही यावर मी बोलत नाहीय, पण त्यांच्यावर एक massive नि comprehensive कर लावणे, तेही श्रीमंतांच्या कल्याणासाठी या विधानालाच अर्थ नाही. कर लावून सरकारे फार तर १-२ मीटरच्या लाटा आणू शकतात, कधी सुनामी, पण ६-७ किमी खोलीचा समुद्र ढवळू शकत नाहीत.
बाय द वे, मी सर्वात वर कोट दिला होता तो हे सांगण्यासाठी कि कर दिला आहे तर "म्हणून अधिकच्या" सेवा मागणे बंद करा
बाय द वे, मी सर्वात वर कोट
बाय द वे, मी सर्वात वर कोट दिला होता तो हे सांगण्यासाठी कि कर दिला आहे तर "म्हणून अधिकच्या" सेवा मागणे बंद करा
मग गरीबांना ही कोणत्याही अधिकच्या सेवा देणे बंद करा - सगळी वेल्फेअर सिस्टिम बंद करा. सरकारची प्रत्येक सेवा ही व्यक्तीच्या आर्थिक स्टेटस वर अवलंबून नसायला हवी. स्वस्त दरात धान्य, कर्ज; कर्जमुक्ती/माफी, सबसिड्या ह्या बंद करा. - कारण ह्या कर दिलेला नसूनही पुरवल्या जातात.
---
१. पोलिटिकल एंटीटीज, जसे भारत, असाव्यात का? (माझेही उत्तर - हो)
२. त्या असल्या तर त्यांच्यात सरकार असावे का? (माझेही उत्तर - हो)
३. असावे, तर त्यांना लागणारा खर्च (सगळ्या वा कसे हे सध्याला बाजूला असू द्यात) करावा लागेल का? (माझेही उत्तर - हो)
४. असेल, तर हा पैसा सरकारी स्रोत नि करांतून येणार का? (माझेही उत्तर - हो)
---
लक्षात घ्या, गरीबांवर कर लावावा कि नाही यावर मी बोलत नाहीय, पण त्यांच्यावर एक massive नि comprehensive कर लावणे, तेही श्रीमंतांच्या कल्याणासाठी या विधानालाच अर्थ नाही.
काय हो हे ???
श्रीमंतांच्या कल्याणासाठी गरीबांवर कर लावा - असे मी कधी म्हणालो ?
---
माझे मुद्दे नीट मांडतो -
१८+ वय; व खालील बाबी फक्त प्राप्तीकरास लागू.
१) प्रत्येक व्यक्तीने एक्झॅक्टली सेम अमाऊंट कर म्हणून भरावा. म्हंजे दरवर्षी ठरवायचे की या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून यानिर्णयाप्रत यायचे की प्रत्येक व्यक्तीने (उदा.) रु. १००० कर भरायचा. एक पै ही जास्त नाही वा कमी नाही. No welfare benefits for anyone. कसल्याही परिस्थितीत. व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहाचे मार्ग स्वतः शोधायचे.
२) क्र. १ मंजूर नसेल तर - रिक्वायरमेंट शिथील करून - प्रत्येकाने त्याच्या उत्पन्नाच्या एक्झॅक्टली समान % कर भरायचा. म्हंजे उदा. यावर्षी १७%. प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाच्या १७% कर द्यायचा. No welfare benefits for anyone. कसल्याही परिस्थितीत. व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहाचे मार्ग स्वतः शोधायचे.
३) क्र. २ मंजूर नसेल तर - रिक्वायरमेंट शिथील करून - बॉटम १०% उत्पन्न असलेल्यांनी शून्य कर भरायचा. बाकीच्यांनी आपल्या उत्पन्नाच्या ठराविक टक्के कर भरायचा. No welfare benefits for anyone. कसल्याही परिस्थितीत. व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहाचे मार्ग स्वतः शोधायचे.
या तिन पैकी एकही मंजूर नसेल तर माझे प्रत्यक्ष परमेश्वराशी सुद्धा एकमत होणे अशक्य आहे.
इक्विलिब्रियम
१) प्रत्येक व्यक्तीने एक्झॅक्टली सेम अमाऊंट कर म्हणून भरावा. म्हंजे दरवर्षी ठरवायचे की या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून यानिर्णयाप्रत यायचे की प्रत्येक व्यक्तीने (उदा.) रु. १००० कर भरायचा. एक पै ही जास्त नाही वा कमी नाही. No welfare benefits for anyone. कसल्याही परिस्थितीत. व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहाचे मार्ग स्वतः शोधायचे.
This is exactly what I was afraid of. In my response above, I talked that you will ask for lump sum tax.
२) क्र. १ मंजूर नसेल तर - रिक्वायरमेंट शिथील करून - प्रत्येकाने त्याच्या उत्पन्नाच्या एक्झॅक्टली समान % कर भरायचा. म्हंजे उदा. यावर्षी १७%. प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाच्या १७% कर द्यायचा. No welfare benefits for anyone. कसल्याही परिस्थितीत. व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहाचे मार्ग स्वतः शोधायचे.
If not so, you are seeking proportional tax.
३) क्र. २ मंजूर नसेल तर - रिक्वायरमेंट शिथील करून - बॉटम १०% उत्पन्न असलेल्यांनी शून्य कर भरायचा. बाकीच्यांनी आपल्या उत्पन्नाच्या ठराविक टक्के कर भरायचा. No welfare benefits for anyone. कसल्याही परिस्थितीत. व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहाचे मार्ग स्वतः शोधायचे.
And at last, marginal proportional tax.
Your demands are ditto along the lines predicted in the above response here.
But what about what I have written about equilibrium of markets? I am repeatedly writing that you may tax the poor in any fashion you want but the post tax value of their labor and post tax value of efforts of the rich will have nearly the same ratio irrespective of tax systems and tax rates.
Arun -बाय द वे, मी सर्वात वर
Arun -बाय द वे, मी सर्वात वर कोट दिला होता तो हे सांगण्यासाठी कि कर दिला आहे तर "म्हणून अधिकच्या" सेवा मागणे बंद करा
Gabbar - मग गरीबांना ही कोणत्याही अधिकच्या सेवा देणे बंद करा - सगळी वेल्फेअर सिस्टिम बंद करा
इथे आपण "मग" हा शब्द वापरला आहे. मी आपल्यासोबत सरकार कोणाकडून किती पैसे घेते आणि कोणावर किती खर्च करते "नि म्हणून" श्रीमंत सरकारचा सगळा रेवेन्यू कसा फुकट खातात हे डेमो करायला तयार आहे. पण असे करण्या अगोदर सीमा ठरवणे गरजेचे आहे - जसे श्रीमंत कोण? टेक्स कोणते? इ इ.
तरीही इथे आपला आक्षेप सर्वात तळागाळातल्या लोकांशी आहे असे मानतो. जीडीपीच्या जे काय टक्के त्यांच्यावर खर्च होतो तो चूक? ठिक. सर्व प्रकारचे प्रदूषण कर चालू करा. श्रीमंत लोक सरकारची पृथ्वी घाण करून, सगळ्या लोकांना त्रास देऊन कमावतात ते जशास तसे पूर्ववत करायला जितका खर्च येईल तितका कर लावा. व्यक्तिचे ग्रॉस उत्पन्न हेच करभारणीय उत्पन्न मानले जाते तसेच कंपन्यांचे करा. गरीबांच्या थेट उत्पन्नावरच कर व श्रीमंतांच्या फक्त नफ्यावर कर हा काय न्याय आहे? आणि हो, प्रत्येक वेळी कर पास ऑन नाही करायचा, अबसॉर्ब करायचा. पास ऑन केला तर हे कर श्रीमंतांवरचे म्हणताच येणार नाहीत.
गरीबांना जसे कल्याणकारी योजनांद्वारा न्याय दिला आहे त्यापेक्षा जास्त असंतुलित फेवर श्रीमंतांना "लिमिटेड लायेबिलिटीचा" या कृत्रिम संकल्पनेचे रक्षण करून दिली आहे. म्हणजे तुम्ही पैसे घालून धंदा चालू केला नि त्यात काहीही बरं वाईट झालं ( उदाहरणार्थ एका देशाची सगळी बालके अपंग झाली) तर तुमचे नुकसान, जबाबदारी काय? १० रु? ह्या असल्या हजारो नालायक सवलती मागे घ्या नि "मग" बघू.
अंततः, सरकारने कल्याण म्हणजे श्रीमंतांना लुटुन गरीबांना खावू घालावे हे मला मान्य नाही. सहसा, आर्थिक क्रिया सर्व गटातील लोकांच्या मूलभूत गरजा भागतील अशा असाव्यात. श्रीमंत लोक कितीका श्रीमंत होईनात, ऑब्जेक्शन नाही, उलट आनंद आहे, पण गरीबाचं गाडं चालू करून द्यायला जो पुश द्यावा लागतो तो द्यायची अनिच्छा असेल नि सगळा फोकस इतरत्र असेल वा सरकारची सर्व लोकांना आत्मनिर्भर ठेवायची व्यवस्था उभी करायची क्षमताच नसेल नि त्यामुळे मानवता मरत आहे, लोक मरू लागलेत, उपाशी आहेत, विषमता भयानक आहे, इ इ दिसले तर हा त्या गरीबांचा दोष आहे म्हणणे मूर्खपणा आहे.
अॅक्च्युअली प्रत्येक माणूस कर
अॅक्च्युअली प्रत्येक माणूस कर भरतच नाही. प्रत्येक रुपया कर भरतो. साधारण हिशोब असा आहे की त्या त्या रुपयाच्या मार्जिनल युटिलिटीच्या इन्व्हर्स प्रमाणात कर. जे कार्यक्षम रुपये आहेत, मालकांना प्रचंड आनंद देतात त्यांना कमी कर भरावा लागतो. जे आळशी रुपये आहेत, फारशी मालकाला फारशी युटिलिटी देत नाहीत, त्यांना जास्त कर भरावा लागतो. म्हणजे सरकारी टॅक्स व्यवस्था ही कार्यक्षमतेला चालना देते आणि अकार्यक्षमतेला डिसइन्सेंटिव्हाइज करते.
इनहेरिटन्स झाला की संपत्तीचा
इनहेरिटन्स झाला की संपत्तीचा मालक बदलतो. त्यामुळे नव्या मालकाच्या प्रत्येक रुपयाची मार्जिनल यूटिलिटी किती आहे त्यावर इन्हेरिटेड वेल्थची कार्यक्षमता ठरेल. (उद्या - दूरची मावशी खपली आणि तिने आकाश अंबानीला एक कोटी रुपये दिले, तर त्याला फारसा फरक पडणार नाही. तेच माझ्याबाबतीत झालं तर मला पडेल.)
याच कारणामुळे इन्हेरिटन्स टॅक्सला अनेक देशांत तात्त्विक विरोध असतो - कारण फ्लॅट रेट करा किंवा प्रोग्रेसिव, कोणाला तरी अन्याय झाल्यागत वाटणारच.
शिक्षण किती महत्त्वाचे?
स्मृती इराणी यांच्या सद्य वादावरून मंत्री आणि त्यांचअॅअॅकेडेमिक शिक्षण' यांच्य किती महत्त्व असावे हा जुना प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहाणपणा आणि लिंग, जात, धर्म, वय, वर्ग, रहाण्याचे ठिकाण, शिक्षण इत्यादींचा ठोस व ठाम परस्परसंबंध नसतो हे माझे मत कायम आहे.
शिक्षणापेक्षा...
शिक्षणापेक्षा इराणी बाईंची तुलसीची प्रतिमा जास्त प्रभावी असल्याने हे बाय काय करणार असा खरा आक्षेप असावा. पण असे तर सरळ सरळ म्हणता येत नाही मग शिक्षण वगैरे काढले की कसे काहीतरी भक्कम तत्वावर बोलतो असे वाटते इतकेच. तसेही गेल्या ६५ वर्षात इतकी विविध उदाहरणे बघितली आहेत की एकाच निष्कर्षाप्रत येणे कठीण आहे.
स्मृती इराणी ह्या मानव संसाधन
स्मृती इराणी ह्या मानव संसाधन विकास खात्याच्या मंत्री आहेत. सडेतोड बोलतात (म्हंजे सडेतोड युक्तीवाद नव्हे). तरुण आहेत - म्हंजे संसाधने जेव्हा विकसनशील असतात तेव्हा त्यांची काय मनस्थिती असते त्याची जाण आहे. (स्मृतींचे अँटिथेसिस - मुरली मनोहर जोशींचे ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ते मला माहीती नाही.). शैक्षणिक अर्हतेचा व पर्फॉर्मन्स चा (किंवा शहाणपणाचा) काहीही संबंध नसतो असे म्हणणे हे समस्याजनक आहे कारण nobody ever claimed that an educated person is automatically skilled and competent but education is one of the ways individuals signal to the employer of their willingness to put in hard work and pursue reasonably rigorous analysis before making decisions. And when employers utilize screening as a way to evaluate - they are actually trying to reduce the extent of information asymmetry that exists between the employer and the candidate. (अधिक माहीती साठी - जॉब मार्केट सिग्नलिंग - मायकेल स्पेन्स)
व आता कुठे त्यांची कारकीर्द सुरु झालेली आहे .... अभी तो सुबह के माथे का रंग काला है ... अभी फरेब न खाओ ... बडा अंधेरा है.
आपल्याकडे असा प्रयत्न कधी
आपल्याकडे असा प्रयत्न कधी झाला होता? जर लोकपाल आंदोलनाबद्दल म्हणत असाल तर असहमती व्यक्त करतो. त्याहून कितीतरी मोठी व हिंसक आंदोलने आपल्याकडे झाली आहेत. (आठवा मंडल आयोगानंतरचे आंदोलन, राम मंदीर आंदोलन इत्यादी)
--
बाकी, सदर प्रतिसाद बातमीसाठी आहे की कोणता चित्रपट/व्हिडीयो बद्दल बोलताय? चित्र्पट वा विडीयो असेल तर दुवा द्यावा. अन्यथा प्रतिसाद बातम्यांच्या धाग्यात हलवता येईलच.
anarchy ,chaos
anarchy ,chaos कित्ती कित्ती छान असे हल्ली बर्रेच जण म्हणू लागलेत.
अशी अनागोंदी हे वादळ असते. त्यास सुदैव म्हणणे म्हणजे तूफानी चक्रीवादळात आपण सुरक्षित राहू
शिवाय रस्त्यावरून जाणआर्या लोकांकडचे मौल्यवान दागिने आपल्या दारात येउन आपोआप पडतील.
आपण भाग्यवान ठरु अशी अपेक्षा करण्यासारखे आहे.
सुदैवी की दुर्दैवी हे विचारण्या मागचा नेमका उद्देश काय ?
दुर्दैव असण्याची शक्यता तुम्हाला वाटते का ?
का वाटते साली ही शक्यता तुम्हाला?
एक तक्रार :-
असे कै च्या कै प्रश्न आणि विधाने करुन तुम्ही समोरच्याला मरेस्तोवार टंकायला उचकावता/भाग पाडता.
पुरावे आणि समर्थन देण्याची जिम्मेदारी त्याच्या गळ्यात मारता.
उदा :-
१. स्त्रियांवर अत्याचार वा लिंगाधारित भेदभाव शतकानुशतके झालेच नाहित.
("झालेले आहेत" म्हटले की तुम्ही पुरावे आणि आकडे मागणार)
२. विज्ञानावर विश्वास का ठेवायचा?
३. आयुष्यात आणि विज्ञानातही गणिताची अज्याबातच गरज नाही.
उपग्रह उडवयलाही गणित वगैरे फडतूस गोष्तींची गरज नाही.
खरं सांगा :- तुम्ही हे मुद्दाम समोरच्याचा आत्यंतिक त्रागा व्हावा म्हणून करता ना ?
तुम्ही नाही म्हणालात तरी तुमच्या कृतीतून तोच इफेक्ट येतो ही फ्याक्ट आहे.
-१
असे कै च्या कै प्रश्न आणि विधाने करुन तुम्ही समोरच्याला मरेस्तोवार टंकायला उचकावता/भाग पाडता.
पुरावे आणि समर्थन देण्याची जिम्मेदारी त्याच्या गळ्यात मारता.
खरे तर यात ती जिम्मेदारी स्वतःवर ओढवून घेणार्या पब्लिकचा दोष आहे. दावा होकारार्थी असो वा नकारार्थी, ठामपणे जर केला तर बर्डन ऑफ प्रूफ हे दावेवाल्यावरच असते. बलात्कार होतात असे कुणी म्हटले तर त्यावर सिद्ध करण्याची जबाबदारी येतेच, पण बलात्कार होतच नाहीत असे म्हटले तरीही ते सिद्ध करण्याची जबाबदारी तसे म्हणणार्यावरच येते. पब्लिकला हे कळू नये याचं आश्चर्य वाटतं.
आता हे लक्षात न घेता पब्लिक फुकाचा त्रागा करू लागली तर तो दोष पब्लिकचा की अरुणजोशींचा ;)
थोडक्यात, अरुणजोशींचे कैच्याकै वाटणारे दावे पाहून विरोधी त्रागा करण्याऐवजी तिकडेच त्यांच्यावर बर्डन ऑफ प्रूफ लादा. चर्चा अजून स्ट्रीमलाइन्ड होईल.
बर्डन ऑफ प्रूफ
बर्डन ऑफ प्रूफ च्या खेळाला पुरुन उरतात जोशीकाका.
मागे म्हटलं त्यांना गणिताची गरज नसेल विज्ञानात तर उपग्रह उडवून दाखवता का ?
तर " पुरेशी मोठी तरफ/फळी दिली तर आरामात उडवून दाखवतो " असे म्हणाले.
आता काय डोकं फोडू तिच्यायला ?
का छळता जोशीबुवा असे ?
बादवे, त्रागा करणं मी मधला बराच काळ सोडलं होतं.
अजो विरुद्ध इतर अशी फाइट सुरु असताना मी निवांत आपलं आपलं काम करत बस्लो होतो.
त्यांच्याशी त्या विज्ञानवाल्या धाग्यानंतर फारसा पंगा घेतला नाही.
पण हे दरवेळीच जमतं असं नाही.
उदा:-
"सूर्य उत्तरेला उगवतो आणि कधीच मावळत नाही" असं विधान हे करणार.
कशावरून ? असं विचारलं तर "हे माझं मत्/निरीक्षण आहे" असं म्हणून मोकळे.
मग आम्ही बिन्डोक सारखे ह्यांना पटवून देणार "असं नाही हो. सूर्य उगवतो, तसा तो मावळतो सुद्धा.
अहो जगातल्या कोणतयही व्यक्तीला विचारा.
"
हे उत्तर देणार
" जगातल्या व्यक्तींची मतं मला मान्यच नाहीत"
आम्ही वैतागून बोंबलणार
"अरुणराव भारतात रात्रीचे नऊ वाजलेत. सध्या सूर्य असता तर ऊन नसतं का पडलं ?"
हे पुन्हा उत्तर देणार
"ऊन पडलेलं आहे. तुम्हाला दिसत नसेल तर हा तुमचा (पक्षी आख्ख्या जगाचा!!) प्रॉब्लेम आहे."
आता सूर्य समोर दिसत नसताना तो आहे असं म्हणणं; किंवा उलट म्हणजे
सूर्य समोर दिसत असतानाही कुणी तो समोर आहे हे नाकारणं सुरुच ठेवलं तर
प्रत्यक्ष आयुष्यात त्याला ट्रीटमेंट द्यायला घेउन जातात.
जालावरती "कस्ला वैताग आहे साला" म्हणत तुम्ही फार दुर्लक्ष करु शकता.
पण पुन्हा नेमकी ती चर्चा उघडली तर हे प्रतिसाद असे वाकुल्या दाकह्वत उभे असतात.
-१
ते पुरून उरले तरी तो दोष त्यांचा नाही. तुम्ही अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजी डेव्हलप केली पाहिजे.
उदा:-
"सूर्य उत्तरेला उगवतो आणि कधीच मावळत नाही" असं विधान हे करणार.
कशावरून ? असं विचारलं तर "हे माझं मत्/निरीक्षण आहे" असं म्हणून मोकळे.
मग आम्ही बिन्डोक सारखे ह्यांना पटवून देणार "असं नाही हो. सूर्य उगवतो, तसा तो मावळतो सुद्धा.
अहो जगातल्या कोणतयही व्यक्तीला विचारा.
"हे उत्तर देणार
" जगातल्या व्यक्तींची मतं मला मान्यच नाहीत"आम्ही वैतागून बोंबलणार
"अरुणराव भारतात रात्रीचे नऊ वाजलेत. सध्या सूर्य असता तर ऊन नसतं का पडलं ?"हे पुन्हा उत्तर देणार
"ऊन पडलेलं आहे. तुम्हाला दिसत नसेल तर हा तुमचा (पक्षी आख्ख्या जगाचा!!) प्रॉब्लेम आहे."
तुमचं मत खरं कशावरून असा प्रश्न यात एकदाही विचारला का? नसेल तर तो दोष जोशीकाकांचा कसा =))
जनाआंदोलन नि दैव
आम आदमी पार्टीच्या समर्थकांना तो प्रयत्न फसला हे दुर्दैव वाटणार ना? केजरीवाल थेट म्हणाले कि "हो, मी अराजकवादी आहे." तरीही त्यांना देशात प्रचंड पाठिंबा मिळाला आहे, मिळतो आहे. दिल्लीत त्यांचे सरकार या आंदोलनानंतरच बनले. व्ही के सिंग, किरण बेदी मंडळी देखिल त्यांच्या साथीला होती तेव्हा. केजरीवालांना व्यवस्थेच्या बाहेरून न्याय हवा असतो ( मी बोलतो ते सत्य, मी करतो ते खरे, मी सांगतो तो/ती भ्रष्ट, मी ही प्रक्रिया पाळणार नाही, मला सांगणारा हा कोण, इ इ.)
केजरीवाल आपली प्रतिमा गंभीर नो-नॉन्सेन्स अशी उभी करू शकले नाहीत अन्यथा त्यांच्या तत्त्वांना देशात खूप पाठिंबा मिळाला असता. त्यांनी पोरकट ८-१० यू टर्न मारूनही आजही ते अनेकांची आशा आहेत. दिल्लीत ७ ही जागांवर २ नंबरला अराजकवादी आआप आहे, १५ वर्षे उत्तम प्रशासन देणारी काँग्रेस नाही. सत्तरीतल्या (कि आजच्याही?) सेनेत नि आआपमधे काही फरक नाही, वर्तन तेच आहे, फक्त तत्त्वज्ञानाचा मुखौटा वेगळा आहे.
अण्णांनी ऐनवेळी अंग काढून घेतले, उलट त्यांनी टी एम सी ला पाठिंबा दिला, बरेच लोक आंदोलन सोडून गेले, आआपने दिल्लीची सत्ता अकारण सोडली नि केजरीवाल प्रचंड बेजबाबदारपणे बोलू लागले; अन्यथा देशात आज वेगळी परिस्थिती राहिली असती. या देशात काँग्रेस नि भाजप दोन्ही न आवडणारे, नि चळवळ इ इ करून व्यवस्था स्वच्छ करू इच्छिणारे लोकच जास्त आहेत. आजच्या मोदींच्या दृढ नि स्थिर सरकारच्या पार्श्वभूमीवर माझी "कि दुर्दैव?" ही फ्रेज आउट ऑफ प्लेस वाटत आहे खरी पण केजरीवाल नुसते योगेंद्र यादवांसारखे सालस निघाले असते नि वर २०१४ मधे केंद्रात अनपेक्षित कडबोळं स्थापावं लागलं असतं वा ते ही करता आलं नसतं तर "व्यवस्थाच बदलावून टाकणार्या" जनांदोलनांची प्रचंड मागणी होती हे कोणीही मान्य करावे.
विवेकजी असं झालं नाही हे सुदैव म्हणतात. उद्या मोदी बोलाचाच भात निघाले तर मी ही त्याला कदाचित दुर्दैव म्हणू शकतो.
दुर्दैव
उद्या मोदी बोलाचाच भात निघाले तर मी ही त्याला कदाचित दुर्दैव म्हणू शकतो.>> ह्यातला कदाचित शब्द काढून टाका आणि स्पष्ट आणि स्वच्छ दुर्दैव असेच म्हणा. कारण उगाचच शुगरकोट कशाला करायचे. मोदीबाबाला चांगले काम करणार ह्याच मार्केटिंगवर मत दिले आहे मग ते नाही झाले तर झोडपण्याचा पूर्ण अधिकार आहेच की.
केजरीवाल यश पचवू शकला नाही असेच म्हणावे लागेल. ५ वर्ष थांबून चांगला कारभार करण्याची इच्छाच गेली त्याची. वाट्टेल ती करणे देवून मुख्यमंत्रीपद सोडले. लोक काय मुर्ख आहेत का? दुसरे म्हणजे आपच्या लोकांची भाषा नंतर नंतर फारच निगेटीव होत गेली आणि अह्मीच एकटे तेवढे चांगले असे झाले. म्हणून तर अनेक लोक उखडले आहेत. असो पण अजूनही त्याने शांत राहून चांगले काम केले तर केजरीवालला नक्कीच पुन्हा संधी लोक देतीलच की.
अण्णांच्या आंदोलनात नेते,
अण्णांच्या आंदोलनात नेते, बाबू, जज, इ सर्व संस्था "भ्रष्टाचारमुक्त" करणे यासाठी थेट संसदेवर दबाव आणणे हा प्रकार होता. लोकपाल त्याची पहिली पायरी.
मग हे सगळे कसे होणार? हे आंदोलन अराजक माजवून थंड पडले असते वा आंदोलनाने खरोखरच देश स्वच्छ झाला असता. रिस्क आहेच कि. म्हणून स्टॅटस को पण चालला असता. कदाचित शब्द यासाठी वापरला.
खरं सांगा :- तुम्ही हे
खरं सांगा :- तुम्ही हे मुद्दाम समोरच्याचा आत्यंतिक त्रागा व्हावा म्हणून करता ना ?
तुम्ही नाही म्हणालात तरी तुमच्या कृतीतून तोच इफेक्ट येतो ही फ्याक्ट आहे.
समोरच्याला मी फार तर खवचटपणे बोलतो. तो खवचटपणाही अगदी अतिस्पष्ट असतो. ९९% वेळी माझा सरळ लिहायचा उद्देश असतो.
बहुतेकदा मी मला जे म्हणायचे आहे त्याचा अचूक नि पूर्ण संदर्भ मांडत नाही, गृहितके देत नाही, विधानेही कायद्याच्या भाषेत म्हणजे अचूक करत नाही. पण मी खात्रीपूर्वक सांगू शकतो कि समोरच्या त्रागा द्यायचा हा उद्देश नसतो. कृपया माझ्या खरडवहीतील डिस्क्लेमर वाचा.
मी अत्यंत नम्रपणे आज पुन्हा लिहितो - नेटवर सोम्या गोम्यांना विद्वानांमधे लूडबूड करण्याची संधी मिळते जी खर्या जीवनात मिळत नाही. त्याचा मी फायदा घेतो. माझेच म्हणणे खरे आहे असे मला कधीच म्हणायचे नसते. मी फक्त माझा पक्ष लिहितो. मला दुसरं काही पटेपर्यंत तो मी डिफेंड करतो. अर्थातच मी सोम्या गोम्या आहे हे ज्यांना माहित आहे ते बर्यापैकी लेखन करतात पण माझ्या लेखनावर प्रतिक्रिया देऊन आपला वेळ वाया घालवत नाहीत. तेच योग्य आहे. समोरच्यांना त्रागा द्यावा असे तुम्हाला वाटते का विचारणे नि उत्तर काहीही दिले तरी तोच उद्देश निघतोय असे मानणे यापेक्षा दुलर्क्ष कधीही छान.
१. स्त्रियांवर अत्याचार वा
१. स्त्रियांवर अत्याचार वा लिंगाधारित भेदभाव शतकानुशतके झालेच नाहित.
("झालेले आहेत" म्हटले की तुम्ही पुरावे आणि आकडे मागणार)२. विज्ञानावर विश्वास का ठेवायचा?
३. आयुष्यात आणि विज्ञानातही गणिताची अज्याबातच गरज नाही.
उपग्रह उडवयलाही गणित वगैरे फडतूस गोष्तींची गरज नाही.
The statements I have made come with enormous amount of qualifications, you cannot quote them in isolation.
Context
Well, that is not really true.
Let me give you the example of injustice against women in the context of requirement of current social and political reforms. For example sake, dowry and right to property were the two instances of injustice selected for discussion. I argued that these cannot qualify as two distnct iniquities as the moment we recognize right to property as one iniquity, dowry ceases to be a separate iniquity because it is paid by woman's father. All the burden to earn it is born by him. I acknowledged that the social injustice such as dislike of girl child in the family because of having to pay dowry still holds. But it cannot be called financial injustice.
Further it cannot be called gender based injustice because no men can guaranty whether he will bear male child or female child. As a man if I am equally likely to bear any of the genders, what incentivizes me to start this kind of custom? So the origin of this system cannot be blamed on men.
Further merely looking at the propriety of the custom, isn't it that the contempory demand for inheritance related rights by law for girl children was, in a way, has been met by the custom of dowry, though very less efficiently?
Also I am respecting the current law on the issue. Now, offenders must be punished but woemen's rights to inheritance must be addressed as well. I am just defending the nature of the issue in the old days so long as it was carried out in good faith.
Bringing the issue to the context, the case of injustice against in women in built up to seek reservations in the polity, etc. I have put my observations (note - they are not objections) in following fashion - limiting to only these two issues -
1. The criterion for reservation** is representation in proportion of population. Now almost all (100%) backward classes suffered social injustice on account of their caste. Was the case of gender injustice with "all" women? Answer is a clear no.
2. For whatever reasons, was all the injustice perpetrated was by or on behest of men? Were women not party to injustice on fellow women? So long as my individual perceptions go, most part of women's torture is committed by another women. This portion should excluded when applying reservation formula. Not everything can be blamed to men.
3. In peer comparison, women were subjugated to their spouse. But men were also, going by Indian ethos, fully controlled by their mothers.
4. Tribal women are aplenty in India. They form a huge fraction of population. They don't have to pay dowry, instead their parents get dowry. How is this accounted for?
5. When there was no elaborate banking system, wealth custody was with women in the form of gold. An argument was made (by others) that a woman was used as a puppet. Now, the same can be argued in favor of man holding bank account.
6. In Kerala (where from my office boss hails*) and north-east (where from my home boss hails*) there are matriarchical systems. Will these states be excluded? Will there be counter quota for men?
There was a blunt statement made on this forum which suggested that women, almost all Indian women, have lived under dire gender based discrimination for centuries together and their lives have been miserable. To counter this statement I said, along with all the explaination above, that extent of injustice attributable to pure gender is not as much as is being perceived.
Batman, you may find my arguments meritless and you can ignore them, but your ( I mean supporting Manoba in doing so.) quoting them isolation is a serious misrepresentation.
* Pun intended.
** I am pro-woman reservation for thousand reasons. My limited point is that the comment made on humanity's past was unjust.
Ishanya हे काय आहे त्यावर
Ishanya हे काय आहे त्यावर अवलंबून आहे
जर ईशान्य दिशा असेल तर मेघनाचे उत्तर बघावे.
अन्यथा एखाद्या व्यक्तीचे/जागेचे (हॉटेलचे घराचे)/गावाचे वगैरे विशेषनाम म्हणून असेल तर ती व्यक्ती अथवा स्थळमालक / त्या स्थळाचे स्थानिक ज्या प्रकारे ते लिहितील तेच (त्या त्या व्यक्ती/स्थळापुरते) योग्य.
ईशान्य हाच मूळ शुद्ध शब्द
ईशान्य हाच मूळ शुद्ध शब्द आहे. ईशान हे विष्णूचे नाव असून तो अष्टदिक्पालांपैकी एक आहे. ईशानची दिशा ती ईशान्य अशी व्युत्पत्ती आहे.
मुलं आईच नाव आडनाव* लावतात? -
मुलं आईच नाव आडनाव* लावतात? - यस.
मालमत्ता मुलींमधेच वाटली*** जाते? - यस.
लग्न झाल्यावर मुलगे सासरी** जातात? - यस.
आणि केरळी मुलींना लग्नात किलोकिलोने सोनं घालतात ते कशासाठी असतं? - त्या राज्यात ती त्यांची मर्जी आहे.
* मुले व मुली आईच्या गावाचे नाव लावतात. जे जयललिता (मूळ केरळी असल्यास) जे ही तिच्या आइच्या गावाचे नाव. तिकडे आडनाव नसते. पी ए संगमा मधे संगमा हे त्यांच्या आईचे आडनाव.
** १९६० पर्यंत तरी याचे उत्तर मेघालय नि केरळ मधे हो असे होते असे सगळ्यांनी म्हटले आहे. आता बाकी भारताचा परिणाम झाला आहे. निश्चित माहिती नाही.
***वाटली? सगळं काही बायकांच्या नावे असतं/असायचं.
best
best way to double your money is to fold it and put it back into your pocket!!!
;)
प्रश्नाचा विस्तार इत्का मोठा आहे की किमान अर्ध्या जगाचं आयुष्य त्याचं उत्तर शोधण्यात आणि विविध
trial error करुन पाहण्यात व्यतित होतय. शब्दशः लाखो पानं खर्ची पडलीत ;आणि तुम्हाला
एका लायनीत महाभारत ऐकायचय?
हाहाहा सुरुवात तर करु यात.
हाहाहा सुरुवात तर करु यात. परवाच मला बाँड आणि स्टॉक मधला फरक कळाला :( हाय टाईम!!! :P
४०१ क देखील रॉथ चांगलं की प्रिटॅक्स ते वाचत होते. उपयोग शून्य झाला कारण रिटायर कोणत्या टॅक्स ब्रॅकेट मध्ये होणार आहे त्याचा क्लू शून्य आहे.
सगळी स्टेट्स (राज्ये) ५२९ प्लॅन ऑफर करतात. आम्ही मात्र "इनी मिनी मायनी मो" करत एक स्टेट निवडलं. कोणी ५२९ बद्द्ल जास्त माहीती दिली तर बरं होईल. म्हणजे तशी माहीती आहे नेटवर पण .....
स्कॉट अॅडम्स
स्कॉट अॅडम्सचा सल्लाः
Everything you need to know about financial planning*
- Make a will.
- Pay off your credit cards.
- Get term life insurance if you have a family to support.
- Fund your 401(k) to the maximum.
- Fund your IRA to the maximum.
- Buy a house if you want to live in a house and you can afford it.
- Put six months’ expenses in a money market fund.
- Take whatever money is left over and invest 70% in a stock index fund and 30% in a bond fund through any discount broker and never touch it until retirement.
आगाऊ सूचना
मोल्स्वर्थभटाचा अख्खा शब्दकोश आनलैन अव्हेलेबल असताना "इतर कोश काजवे वांग" कशाला?
मोरेश्वरो वा अमरेश्वरो वा शब्दार्थप्रश्नेषु अहो समर्थः|
अन्यैस्तु कोशै: परिदीयमानम् शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात् ||
(लवंगी-जगन्नाथपंडितांचा फ्यान) बॅटमॅन.
त्यातून पहा, व्युत्पत्तिकोश चांगला आहे. कोशकार कृ.पां.कुलकर्णी. अप्पा बळवंत चौकात प्रगती बुक ष्टाल येथे मिळतो, ५००-६०० च्या घरात किंमत असावी. वर्षदीडवर्षाखाली विकत घेतला होता तेव्हा ४६८/- पडले होते.
माहिती करिता
माहिती करिता धन्यवाद....शब्दकोश ऑफलाईन वापरासाठी हवा आहे.
व्युत्पत्तिकोश बघेन आवडतोय का ते.
मोल्सवर्थ शब्दकोशात शब्द मिळत नाहीत* कधीकधी. काही शोधायच्या टिप्स असतील तर द्याव्या.
*उदा. दर्शनी पानावरील दुव्यातले 'विश्रब्ध मनाच्या कातरवेळी' हे गाणं ऐकून 'विश्रब्ध' या शब्दाचा अर्थ माहित करून घ्यावा वाटलं. मोल्सवर्थ मध्ये शोधला पण मिळाला नाही.
गुगलवर जनरल शोध घेता हिंदी, संस्कृत मध्ये विश्रब्ध चे अर्थ मिळाले- पण मराठीत त्याच अर्थाने वापरतात का हे स्पष्ट झाले नाही.
आणखीन होते काही शब्द जे मोल्सवर्थम्ध्ये मिळाले नाहीत पण आत्ता हेच एक ताजं उदाहरण आठवत आहे.
खंडांची नावे कोण ठेवली असावीत?
माझाही एक प्रश्न-
शहरांची नावे तेथील लोक (सरकारे) ठेवतात, उ.दा. मुंबई बंगाळुरू, कोलकाता, पेकिंग, बीजिंग, लेनिनग्राड इ.
देशांची नावेही अशीच ठेवली जातात. रिपब्लिक ऑफ इंडिया, पाकिस्तान, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, इ.
आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया इ. खंडांची नावे कोण ठेवली असावीत आणि त्यामागे कोणते लॉजिक, परंपरा, अस्मिता असावी?
गूगलं शरणं व्रज
अमेरिका खंडाचे नाव Vespucci Amerigo नामक इटालियन एक्स्प्लोररच्या नावावरून पडले. कोलंबसादि लोकांनी पैल्यांदा जरी ते खंड शोधले असले तरी त्यांना ते आशिया खंडाचा पूर्व भाग असेलसे वाटले होते. पण ते तसे नसून तो एक वेगळाच लँडमास आहे असे सिद्ध करणारा हा पहिलाच गृहस्थ असल्याने त्याचे नाव या दोन्ही खंडांना दिले.
तदुपरि ऑस्ट्रेलिया खंड हे गोर्यांनी काबीज केले. दक्षिणेकडचा प्रदेश म्हणून त्याला ऑस्ट्रेलिया असे नाव दिले. सेम गोज़ विथ अंटार्क्टिका. Australis आणि Antarcticus हे दोन्ही शब्द लॅटिन भाषेतील असून त्यांचा अर्थ 'दक्षिणेकडचा' असा आहे.
आता वरिजिनल त्रिखंड पृथ्वीकडे येऊ. त्यातही अगोदर आफ्रिकेचे बघू. Afri नामक टोळीच्या नावावरून आफ्रिका असे नाव पडलेले आहे. आफ्रि हे नाव लॅटिन भाषेत रोमन लोक आजच्या लिबियामधील आता बेचिराख झालेल्या पण जुन्या काळी मोठे बंदर असलेल्या कार्थेज शहरात राहणार्यांना उद्देशून वापरत असत. तोच शब्दप्रयोग पुढे अख्ख्या आफ्रिका खंडाला एक्स्टेंड झाला.
Europe आणि Asia ही दोन्ही नावे ग्रीक पुराणकथांमधील राजकन्या/राण्यांची आहेत. Europa ही एक राजकन्या होती जिचे Zeus ने अपहरण केले. राणीच्या नावावरून प्रदेशनामाकडे हा प्रवास झाला. वरिजिनल एरिया हा ग्रीस, इटली, इ. च्या आसपासच असावा.
सेम गोज़ विथ Asia. ती Lydia म्हंजेच तुर्कीचा पश्चिम किनार्याजवळील एक भाग येथे पुजली जाणारी देवता होती.
हिरोडोटसने लिबिया, आशिया व युरोप या "एकाच" भूमीला तीन वेगळी नावे का दिली म्हणून आश्चर्य व्यक्त केलेय एके ठिकाणी. पण ते असो. त्याला सर्व भूगोल ठाऊक नव्हता.
ग्रीकोरोमन परंपरेतली ही नावे आहेत आणि त्या परंपरेला उचलून धरणार्या इंग्लंड-फ्रान्स-जर्मनी-हॉलंड-इटली-स्पेन-पोर्तुगाल या देशांचे गेल्या पाचशे वर्षांपासून युरोप सोडून उरलेल्या भूभागावर प्रत्यक्ष राज्य होते. आता राज्य गेले तरी सांस्कृतिक प्रभाव राहिला आहे, सबब त्यांचे राज्य असताना त्यांनी रूढ केलेले शब्दप्रयोग अजूनही चालू आहेत.
प्राचीन भारताला आफ्रिका आणि युरोप खंड ठौक होते. शिवकाळातच कैक वेगवेगळे शब्दप्रयोग पहावयास मिळतात. इंग्रेज, फरासीस, डिंगमार(डेन्मार्क), वलंदेज(डच), फिरंगी, इ.इ. तर आफ्रिकेतले हबशीही ठौक होते. पण ग्रीस-रोम इ. ठौक नसावे. रूमशाम हा एक शब्द प्रचलित आहे खरा, पण दॅट रेफर्स टु कॉन्स्टँटिनोपल.
शंका
अमेरिका खंडाचे नाव Vespucci Amerigo नामक इटालियन एक्स्प्लोररच्या नावावरून पडले.
पुढच्याच वाक्यात कोलंबसाचे नाव तर छान देवनागरीत लिहिलेय... याचेच नाव रोमनमध्ये का बरे? (हे नाव) देवनागरीत लिहावयास लाजता काय?१ की केवळ प्रस्तुत सद्गृहस्थ इतालियन आहे, म्हणून त्याचे नाव रोमी लिपीत, असे काही लॉजिक आहे? (पण अब की बार तर तर मोदी सरकार आले ना?)
आफ्रिकेतले हबशीही ठौक होते.
'हबशी' या जातिवाचक नामाचा 'अॅबिसिनिया' या स्थलवाचक नावाशी काही संबंध असावा काय?
पण ग्रीस-रोम इ. ठौक नसावे. रूमशाम हा एक शब्द प्रचलित आहे खरा, पण दॅट रेफर्स टु कॉन्स्टँटिनोपल.
१. कॉन्ष्टॅण्टिनोपल ही रोमन साम्राज्याच्या पूर्वार्धाची२ राजधानी होती, असे कायसेसे ऐकून होतो ब्वॉ. म्हणजे दूरान्वयाने का होईना, पण रोमशी संबंध आलाच ना?
- १अ. (अतिअवांतरः) 'इस्तंबूल' हा 'कॉन्ष्टॅण्टिनोपल'चा अपभ्रंश असावा काय?
- १ब. 'इस्तंबूल' की 'इस्तनबूल'?
२. सिकंदर इ.स.पूर्व चौथ्या शतकात भारतवर्षात कडमडला होता ना? मग ग्रीस ठाऊक नाही? आणि मग ते यवन-यूनानी वगैरे कोणत्या भावाने? (या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर 'थोरल्या' असे मिळू नये, अशी आशा आहे.)
=========================================================================================================================================================
तळटीपावली:
१ समांतर संदर्भ: दुवा.
(शिवाय 'इंग्लंड', 'स्कॉटलंड' यांऐवजी 'इंग्लंद', 'स्कॉटलंद' असेही लिहिण्याकडे कल असे, असे कळते, परंतु याचे कारण हे मराठीतील नैसर्गिक उच्चारपद्धतीशी जवळिकीपेक्षा अगोदर उल्लेखिलेली रूपे ही मराठी कानांना अश्लील भासतात असे असण्याबद्दल ऐकलेले आहे.)
२ बोले तो, पूर्वेकडच्या अर्धाची. पश्चिमेकडील अर्ध गळून पडल्यानंतरसुद्धा जवळजवळ हजारएक वर्षे हा अर्ध टिकून होता, या अर्थी वास्तविक त्यास 'उत्तरार्ध' म्हणावयास हवे. पण लक्षात कोण घेतो?
याचेच नाव रोमनमध्ये का बरे?
याचेच नाव रोमनमध्ये का बरे? (हे नाव) देवनागरीत लिहावयास लाजता काय?१
नेमके;)
हबशी' या जातिवाचक नामाचा 'अॅबिसिनिया' या स्थलवाचक नावाशी काही संबंध असावा काय?
आहेच, नव्हे ते दोन्ही एकाच शब्दाची रूपे होत.
तदुपरि दूरान्वयाशी सहमत आहे. अन इस्तंबूल आपलं इस्तनबूल हा अपभ्रौंश न्हवे. तदुपरि त्याची व्युत्पत्ति ठौक नै.
अन अलेक्झांडर कडमडला, त्यानंतर इंडो-ग्रीक किंग्डम, इ. प्रकार झाले. पण ते लै म्ह. लैच जुने आहे. गुप्तोत्तर काळात याची मेमरी क्षीण झाली होती, सबब यवन=परकीय इतकेच समीकरण उरले होते. प्रत्यक्ष ग्रीस देशाबद्दल काही पेश्शल ज्ञान असल्याचे कधी वाचनात आले नाही.
वर्क फ्रॉम होम
१. अगदी साधी उदाहरणे म्हणजे तुम्हाला काही डॉक्युमेंट, पॉवर पॉइंट बनवायची असतील तर ते करण्यासाठी ऑफीसात जाण्याची गरज असतेच असे नाही. ती डॉक्युमेंट बनवून तुम्ही ईमेलद्वारा संबंधित व्यक्तींना पाठवून अभिप्राय घेऊ शकता.
२. समजा एखादी मीटिंग असेल तर तुम्ही प्रत्यक्ष मीटिंगला न जाता घरून कॉन्फरन्स कॉलद्वारा किंवा स्काइपसारख्या माध्यमातून घरात बसून त्या मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकता.
३. (सॉफ्टवेअर इंजिनिअर) तुम्ही एकट्याने काही प्रोग्रॅम लिहीत असाल तर तो तुम्ही घरी बसून करू शकता. त्यासाठी ज्या सिस्टिमवर तुम्ही काम करता ती कंपनीची सिस्टिम घरातून इंटरनेटद्वारा अॅक्सेस करण्याची सोय कंपनी तुम्हाला करून देते. तुम्ही एखाद्या क्लायंटची सिस्टिम सपोर्ट करत असाल तरीही हेच लागू असते म्हणजे क्लायंट तुम्हाला ही सोय करून देतो. कधी कधी काही जॉब्स सिस्टिममध्ये चालू असतात. ते व्यवस्थित चालू आहेत की नाही हे पहायचे असते. ते जॉब काही वेळा १०-१० तास चालू असतात. तेव्हा तेवढा वेळ ऑफिसमध्ये नुसतेच थांबण्याची गरज नसते. अशी कामे घरी जाऊन करण्याची सोय करून दिली जाते.
फायदे बरेच आहेत. तोटे म्हटले तर "तुमचा वेळ" असा कोणताही वेळ उरत नाही. कंपनी तुमच्या २४ तासांवर अतिक्रमण करू शकते.
थत्तेंनी दिलेलाच आहे
थत्तेंनी दिलेलाच आहे प्रतिसाद.
माझ्या माहितीतल्यांनी ऑफीसला जायचा/कम्युटचा कंटाळा आला, घरी कोणीतरी आजारी वगैरे कारणांसाठी एखाददोन दिवसांचेच WFH केले आहे. त्यापेक्षा अधीक करणारे कोणी नाही. पण ऐकीव माहितीनुसार IBM, याहू वगैरेंनी बर्याचजणांसाठी WFH दिलेल काही वर्षांपूर्वी; कॉस्ट कटींग म्हणून. ते अजूनही चालू आहे की नाही कल्पना नाही.
डेटा - पेशन्स् : शंका
पेशन्स हा एकवचनी शब्द अनेकवचनात वापरतात असे म्हणायचे आहे का ? काही उदाहरणे ?
मला कळले नाही. कारण 'पेशन्स' हा गुणात्मक असून संख्यात्मक नाही. 'पेशन्स् वाढव !', 'लोकलमध्ये किती पेशन्सने वागावं लागतं', इ. म्हणताना 'पेशन्स' हा पुल्लिंगी गुणात्मक शब्द असल्याचे दिसते.
[ काहिसे निगडीत : मराठीत पेशन्स = धीर. हाही गुणात्मक पुल्लिंगी असल्याने 'पेशन्स'ला पुल्लिंग लावणे कानाला योग्य वाटते.]
----
डेटा = माहितीसाठा (डेटाबॅन्क्) असा अर्थ घेतला तर 'तो डेटा' असे म्हणण्यात चूक कसे ?
डेटा = माहिती असा अर्थ घेतला तर माहिती हाच मुळात कुठल्या वचनात वापरावा याविषयी मते निघतील.
उदा. 'माझ्याकडे १० माहित्या/माहिती (= १० डेटम्*-पॉइन्ट्स्) आहेत' असे आपण कधी म्हणतो का ?
'माझ्याकडे खूप माहिती (/डेटा) आहे' हे कानाला बरोबर वाटते का ?
* डेटा-पॉइन्ट्स् की डेटम्-पॉइन्ट्स् हादेखील मतांतराचा मुद्दा.
+१
ती गाडी असल्याने मारुतीच का, सुमोसुद्धा स्त्रीलिंगीच आहे. एव्हर हर्ड ऑफ अ फीमेल सुमो?
तदुपरि मारुती हा शब्द स्त्रीलिंगी वापरल्याचे अजूनेक उदा. पुलंच्या बालीवाले बेटे नामक लेखात आहे. बालीवाले लोक रामायण सादर करत असताना सीतेचे काम करणार्या मुलीचे नाव मिस मारुती आहे असे त्यांना एकाने सांगितल्याचे त्यात नमूद आहे.
दलित फारच कमी हे पहा दलित
हे पहा दलित किमान ६ आहेत
आणि स्मृती इराणीबद्दल - ती मॉडेल, अॅक्टर "होती" आता नाही.
असो.