हत्तीखाना
(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)
वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याचा दिवस
आज वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याचा दिवस आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.
या निमित्ताने वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्यदिन : पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पनामा, डॉमिनिका आणि मायक्रोनेशियाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.
राष्ट्रीय दिन/ स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : टोंगा
राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त टोंगाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.
पण हे असे प्रत्येकाचे खाने बनविले
तर मग प्रत्येक सभासद एक बेट बनून जाणार नाही का ?
मग परस्पर संवाद कसा होणार ?
म्हणजे वन टू वन च संवाद होईल सामाजिक संवाद एकसाथ कसा होणार ?
आणि हे थोडं अस्पृश्यते सारखं नाही का होणार ?
की बाबा आमच्या पंगतीला बसू नकोस.