Skip to main content

भारतीय राजकारण (भाग ५)

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो. या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी! कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग: | | |

-------

हा पराभव हे संघाचे इंटेलिजंट प्लॅनिंग आहे असा "टांग उपर" दावा भाजपेयींनी सुरू केलाय.

Here are some reasons why:

1: BJP inducted three rejects of India Against Corruption movement and Aam Aadmi Party (AAP) into its fold — Kiran Bedi projected as BJP’s chief ministerial candidate, Shazia Ilmi and Vinod Kumar Binni. As per plans Bedi is BJP’s scapegoat to save Modi’s image.

2: Kejriwal’s Delhi WIN will be projected as a victory of a mass movement, media will eulogize Kejriwal, hail him as a hero and will dissect AAP’s campaign for days. Also this will divert attention of the people who are getting restless from Modi’s inability to deliver on his election promises.

3: Kejriwal will have no honeymoon period, both media and voters will demand immediate results, at least on corruption, power tariffs, VAT (value added tax), health hotline and WiFi. A hostile government at the Centre will not help him either. This spotlight on Kejriwal will come as a huge relief for Modi.

4: Sangh Parivar machinery can now unleash its foot soldiers to polarize voters with low-intensity disturbances ahead of the two big battles — Uttar Pradesh (UP) and Bihar.

5: BJP’s top brass is aware that if the party plans to win Delhi, the state will remain a headache — partly due to Kejriwal in opposition and partly because of impatient voters who expect immediate results and good governance, something the BJP is unsure of delivering. Proving that losing Delhi isn’t such a bad idea!

6: Now BJP can deploy numerous tactics to not let Kejriwal do what he want’s thus proving him a failure in Delhi. BJP team knows that many of the promises by kejriwal are impractical and cannot be fulfilled and this will snatch his ‘Nayak'(Hero) image.

7: This undeliverable performance of Kejriwal will surely break his image through out the country making him unpopular in other states limiting his scope in next Lok Sabha Elections.

8: Now the One-Man-Army AAP will not be able to spread itself in other states nationwide because the face(Kejriwal) of party will be busy managing Delhi for next 5 years. And there is no other mob-attractor face in AAP.

9: BJP knows that if they win Delhi, Kejriwal in Opposition will make their life hell and will criticize their every action if its not the best one.

10: Now the media houses have 2 faces Modi and Kejriwal to criticize. BJP knows this will surely save Modi from being the only target of media & mass criticism.

ऋषिकेश Tue, 10/02/2015 - 16:37

In reply to by अनुप ढेरे

:)
भाजपामध्ये मोदी सोडून कोणाला "मॉब अट्रॅक्टर" समजले जाते?

--

बाकी केंद्रात किंवा दिल्लीत एकाच व्यक्तीच्या हाती इतकी शक्ती एकवटणे लोकशाहीसाठी मारक ठरू शकते या मतावर दिल्ली निकालानंतरही कायम आहे.

अनुप ढेरे Tue, 10/02/2015 - 16:51

In reply to by ऋषिकेश

मॉब अट्रॅक्टरची गरज भाजपा पेक्षा सध्या आपला जास्तं आहे. ज्या राज्यात भाजपा जिंकले आहे तिथे त्यांची संघटना बर्‍यापैकी आधीपासून होती. anti-incumbency देखील होती. मोदींनी फक्त थोडा धक्का दिला.

सलील Tue, 10/02/2015 - 18:31

In reply to by अनुप ढेरे

संघटनेपेक्षा जिथे एखादा चांगला वा जम बसलेला लीडर ज्या ज्या राज्यात होता तिथेच भाजप जिंकला आहे. अपवाद उत्तर प्रदेश. तिथे बाकीचे इतके माजलेले होते म्हणून चेहरा नसूनही जिंकले आहेत. उलट जिथे प्रादेशिक चांगला लीडर होता तिथे भाजप फार काही करू शकला नाहीये. पण झाले ते उत्तम झाले. एकदा तरी झटका बसायलाच हवा होता. फार कोलांट्या उद्या मारणे चालू होते. आणि बेदी बाईला आणून डाव फसला हे फार उत्तम झाले. बेदीणे लगेच हात झटकले आहेत.

हरियाणा महाराष्ट्र इथे भाजपाचा जम बसलेला कोणी एक नेता होता असं वाटत नाही. लोकसभेचे निकाल आणि विधानसभेचे निकाल याची सांगड घालणं जमत नाही मला. पण दोन्ही राज्यात प्रचंड अँटी इन्कंबंसी होती.
दिल्ली मध्ये भाजपाच्या पानिपताचं एक कारण काँंग्रेस आणि इतर भाजपा विरोधकांचं पानिपत हेही आहे असं वाटतय. त्यांची मतं सगळी आप ला गेली.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 17:07

In reply to by ऋषिकेश

बाकी केंद्रात किंवा दिल्लीत एकाच व्यक्तीच्या हाती इतकी शक्ती एकवटणे लोकशाहीसाठी मारक ठरू शकते.

अगदी अगदी. ५-७ राष्ट्रपती, १०-२० उपराष्ट्रपती, ५०-६० पंतप्रधान, १००० मंत्री असा प्रकार असेल तर लोकशाही एकदम शाबूत राहिल.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:04

In reply to by अनुप ढेरे

अनुप हसतोस काय? याचंच भान ठेऊन आप नेहमी लोकांमधे जाउन, त्यांना विचारून मग निर्णय घेत असते. आजपर्यंतचे आपचे सारे निर्णय हे दिल्लीच्या लोकांचे आहेत. बंद केबिनमधले नाहीत. लोकांना हे लोकशाहीचं डीसेंट्रालायझेशन आवडलं म्हणून त्यांनी सत्ता आपल्याच (आपच्याच नव्हे) हाती ठेवायला त्यांना १००% जागा दिल्यात. लोकशाही म्हणायचं आणि एका माणसाला सगळे अधिकार द्यायचं याला काही अर्थ?

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 17:21

In reply to by ऋषिकेश

एकाच व्यक्तीच्या हाती इतकी शक्ती एकवटणे लोकशाहीसाठी मारक ठरू शकते

पण...पण व्यक्ती नाही, विचार पहा असे म्हणालेलात त्याचें कांय?

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 17:30

In reply to by ऋषिकेश

एका व्यक्तीच्या हातात सत्ता म्हणजे एकच एक विचार हे गृहीतक कशावरून खरे म्हणे? यामुळे तुमचे अगोदरचे विधान व आत्ताचे विधान ही परस्परांना छेद देताहेत.

पण येस, मुद्दा लक्षात आला. येनकेनप्रकारेण "क्षयझ होईल तेव्हा सुदिन" हे वाक्य म्हणावयाची संधी साधायची होती हे विसरलो ते आत्ता लक्षात आले. सॉरी.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 17:32

In reply to by बॅटमॅन

आज तरी त्यांना एंजॉय करू देत. ६७:३ असा पराजय करूनही आनंद घेऊ द्यायचा नाही म्हणजे काय राव?

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 17:35

In reply to by अजो१२३

तेच तर म्हणतोय. अगोदर वाटले की बीजेपी सडकून हरल्याचा छान आनंद वगैरे झाला असेल (आम्हांला तरी झाला बॉ). पण इथे पाहतो तर नेहमीचेच सुदिनवादि तुणतुणे. तस्मात राहावले नाही.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:00

In reply to by बॅटमॅन

ते काही नाही. आजचा दिवस डाव्यांचा, धर्मनिरपेक्ष लोकांचा, भाजपच्या सांप्रदायिक शक्तीला हारवून विजयाचे निशाण फडकावणारांचा. १६ मे ला देशाचं काय होणार याची हूरहूर लागून राहिलेली. आज एका प्रामाणिक, सक्षम आणि सेक्यूलर शक्तीने भाजपचा अवमानास्पद पाडाव केला आहे तेव्हा काँग्रेसनंतर देशाला आशेचा नवा किरण भेटला आहे.
शिवाय मोदी अक्षम, कुचकामी, ऐश करणारे, वचने विसरणारे, इ इ आहेत हे इतक्या उत्तमपणे त्यांना दाखवून मस्त कानपिचक्या दिल्या आहेत.

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 18:10

In reply to by अजो१२३

ऐसीवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. अरुणजोशींनी प्रो मोदी किंवा अँटी मोदी लिहिले तरी श्रेण्या मात्र भडकाऊ, खोडसाळ अशाच. हे दीडशहाण्यांनो, अडचण काय आहे नेमकी? (बादवे अजोंच्या वरील प्रतिसादाला पहिली रोचक श्रेणी मी दिली.)

(इथेही तसेच होणार तेव्हा तुमचा श्रेणीखाना येऊद्यात!)

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:18

In reply to by बॅटमॅन

या लोकांची वैयक्तिक दुश्मनी आहे तेव्हा ते सुधरणार नाहीत. मी मात्र सुधरू शकतो. ते एक असो.
----------------
लहानपणी गोट्या* खेळताना आम्ही 'सत लागणे' , 'खट लागणे' हे शब्द वापरत असू. म्हणजे कोणी बाजूला थांबला आणि नेम लागला कि थांबणारा सत लागला असे म्हणायचो. मी कालच पुरोगामी लॉबीकडे कलटी मारली आणि आज इतके घवघवीत यश!!! मी सत लागलो केजरीवालला.

*खेड्यातले खेळ मागास असतात हे अगोदरपासूनच मान्य.

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 18:22

In reply to by अजो१२३

सत लागणे हा नवीन वाक्प्रचार कळाला. नाट लावणे, मन घालणे, हे आमच्याकडे विशेष प्रचलित असलेले पण सतच्या विरुद्धार्थी शब्द. सोलापुरी मित्रांमुळे खट लावणे/लागणे हे माहिती होते.

तदुपरि तुमचा 'अजोगुण' लागला म्हणायचा.

नितिन थत्ते Tue, 10/02/2015 - 19:05

In reply to by बॅटमॅन

मी पूर्वीपासून अजोंना सपोर्ट केला आहे.

पण अजोंचा हा परकायाप्रवेश* पटला नाही.

*गुंडोपंतांची आठवण झाली.

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 19:06

In reply to by नितिन थत्ते

सेम हिअर. जिथे पटत नाही तिथे विरोध अन जिथे पटते तिथे सपोर्ट हे आमचे जुने सूत्र आहे. तस्मात हा परकायाप्रवेश पटला नाही.

नितिन थत्ते Wed, 11/02/2015 - 12:16

In reply to by बॅटमॅन

आम्ही पटत नाही तिथे विरोध करतो तो प्रतिसाद देऊन. श्रेण्या देऊन नाही.

पटते तिथे सपोर्ट करण्याची संधी फारशी मिळत नाही.... ;)

अजो१२३ Wed, 11/02/2015 - 11:58

In reply to by नितिन थत्ते

लोक आमच्या भूमिकेला व्यक्तिगत पातळीवर घेत आहेत. एकापरीने ऐसीवर पुरोगामी नसायला वाव नाही. ५-७ आयडींनी सभ्य विरोधरुपी सपोर्ट केला पण अन्य सर्वांनी सर्व प्रकारचा खोडसाळपणा केला. मग पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? ऐसीकरांच्या धुरंधर प्रतिवादांसमोर शस्त्रे टाकून गुडीगुडी जगणेच जास्त योग्य.

ऋषिकेश Wed, 11/02/2015 - 12:27

In reply to by अजो१२३

हे मत वैयक्तिक असले तरी मी संपादकांच्या भुमिकेतून लिहितो आहे व तरीही इतर संपादकांशी चर्चा न करता थेट प्रतिसाद देतो आहे.

एकापरीने ऐसीवर पुरोगामी नसायला वाव नाही.

ऐसीकरांवर अनावश्यक टिका कशाला?
ऐसीवर असे कोणत्या विचारांच्या सदस्यांना बॅन केले आहे? की प्रतिसाद उडवले आहेत? की हाकलून दिले आहे?

प्रश्न राहिला श्रेण्यांबद्दल. जर एखादी व्यक्ती मुद्दाम ऋण श्रेण्या देत असेल तर संपादक मंडळ अश्या व्यक्तीशी संवाद साधून त्यास श्रेण्यांचा उपयोग समजावत असते व अनेकदा स्वतः धन श्रेण्या देत असते. अजोंना मिळाणार्‍या निगेटिव्ह श्रेण्या कोणत्याही एका व्यक्तीने दिलेल्या नाहित हे स्पष्ट करणे आता अगत्याचे झाले आहे. त्यात अनेकांचा सहभाग आहे. त्यामुळे इथे हे काही मुद्दाम होतेय वा ऐसीवर असे काही ठरवून होतेय असा आरोप असेल तर तो गैर आहे इतकेच स्पष्ट करतो.

इथे काही ठराविक विचारांची मंडळी संख्येने अधिक आहेत हे कदाचित खरे असेलही किंवा नसेलही पण त्याला नाइलाज आहे. विविध विचारांच्या व्यक्ती इथे सारख्याच प्रमाणात आल्या तर आवडेलच पण त्यासाठी सद्य ऐसीकरांना दोष का द्यावा?

तेव्हा उगाच ऐसीची अश्या प्रकारची (एका प्रकारच्या विचारांना इथे टिकु दिले जात नाहि वगैरे) प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून हा प्रतिसाद. याउपर यावर चर्चा करेनच असे नाही.

अजो१२३ Wed, 11/02/2015 - 14:04

In reply to by ऋषिकेश

ऐसीकर हा शब्द संस्थळाच्या व्यवस्थापनाला वापरला नाही. ऐसीचे व्यवस्थापन अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पूर्ण आदर करते हा अनुभव राहिला आहे.
--------------
ऐसीकर हा शब्द ऐसीच्या अधिकतर सदस्यांसाठी वापरला आहे. संस्थळाची भूमिका वैचारिक विरोध करावा अशी असली तरी त्या प्रतलावर विरोध करणे सर्वांना संभव नसते. मी अनावश्यक टिका केलेली नाही. उदा. "समाजात समलैंगिक नावाची समांतर समाजमान्य व्यवस्था नसावी." हा एक विचार आहे. लवकर बरे व्हा, मग मोठे व्हा, तुमचा होमोफोबिया लवकर दुरुस्त होवो, इ इ अनेक प्रतिक्रिया मुद्दा नक्की काय आहे हे न समजून घेता टिका करण्याची प्रवृत्ती दर्शविते.
-------------------

त्यासाठी सद्य ऐसीकरांना दोष का द्यावा?

याला दोष म्हणता येणार नाही. ते एक निरीक्षण आहे. पुरोगामित्व ही ऐसीकरांची संवेदनशील अस्मिता आहे (जशी कुराण मुस्लिमांची असते) असं पाहण्यात आलं आहे. पुरोगामित्व, स्त्रीवाद, समलैंगिकता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, भांडवलवाद, पाश्चात्य मूल्ये, शिक्षण, नवा काळ, विज्ञान, भौतिक प्रगती, निधर्म, नास्तिकता, असम्यकता, मूल्यहिनता, अपारंपारिकता, आधुनिकता, नविन समाजव्यवस्था, इ इ यांच्या विरोधात लिहिलं तर इथल्या लोकांना नक्की मुद्दा काय आहे यापेक्षा अजोंना व्यक्तिशः कसं नामोहरम करावं याचं जास्त पडलेलं असतं असं आढळलं आहे. यात बराच दोष मला माझे मुद्दे नीट मांडता येत नाहीत याला देखिल हे मला मान्य आहे. नेट नेट आय कान्ट होल्ड द पोझिशन आय अ‍ॅम डिफेंडींग. बेटर रीट्रीट.
--------------------

त्यामुळे इथे हे काही मुद्दाम होतेय वा ऐसीवर असे काही ठरवून होतेय असा आरोप असेल

तसे मला दिवसाला प्रचंड ऋण श्रेण्या पडतात. तेव्हा असे करायला किमान ५-६ आयडी लागतील. बाय द वे, मला श्रेण्या देणारे लोक हे प्रांजळपणे कि उद्दामपणे देतात हे तुम्ही कसे सांगू शकता? ५० ऋण श्रेण्या द्यायला किती लोक लागतात? ते (ठराविक लोक नाहीत तर) दिवसभरात मला एकट्यालाच श्रेण्या देत असतात का?
ऐसीवरच्या कितीतरी लोकांना माझ्या विचारांचा जेन्यूइन विरोध आहे. हे लोक सहसा माझा विचार चूक कसा आहे हे सांगायचा प्रयत्न करतात. त्यातून संवाद होतो. इतर अनेक व्यक्तिगत विरोधापायी ज्यात काहीही भडकाऊ वा खोडसाळ नाही तिथेही तशा श्रेण्या देतात. यात व्यवस्थापनाचा काही संबंध नाही. असलाच तर नाईलाज आहे.

तेव्हा उगाच ऐसीची अश्या प्रकारची (एका प्रकारच्या विचारांना इथे टिकु दिले जात नाहि वगैरे) प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून हा प्रतिसाद.

ऐसी एका विशिष्ट प्रकारच्या (पुरोगामी, इ) विचारांना प्रो आहे अशी इमेज अगोदरच आहे.

अंतराआनंद Wed, 11/02/2015 - 14:23

In reply to by अजो१२३

अजो, मी तुम्हाला श्रेण्या देत नाही. खरंतर मी कोणालाच कोणत्याच श्रेण्या देत नाही कारण मला मुदलात ती कल्पनाच पटलेली नाही. ( मला फक्त पुण्य मिळावं म्हणून मनाला न पटणार्^या गोष्टी मी करत नाही :D )

नितिन थत्ते Wed, 11/02/2015 - 14:05

In reply to by ऋषिकेश

ऐसीची भूमिका म्हणून हा प्रतिसाद योग्य आहे.

पण सदस्यांना मते पटली नाहीत तर सदस्य त्याचा प्रतिवाद न करता अ‍ॅनॉनिमस ऋण श्रेणी देतात. त्यामुळे जे इतर सदस्य प्रतिसादांना थ्रेशोल्ड फिल्टर लावतात त्यांच्यापासून लपतात. म्हणून श्रेणी देणार्‍या सदस्यांनी केवळ मत पटत नाही म्हणून (भडकाऊ/खोडसाळ अशी) ऋण श्रेणी देण्यामुळे विरोधी मत दाबले जाते असा भास होऊ शकतो.

यावर थ्रेशोल्ड न ठेवणे हा पर्याय वापरता येईल..... पण पण..... मग त्या थ्रेशोल्डच्या सोयीचा उपेग काय?

मेघना भुस्कुटे Wed, 11/02/2015 - 12:37

In reply to by अजो१२३

'तुमची भूमिका आम्हांला मान्य नाही. पण नक्की भूमिका काय ते कळले आहे. तरी तेच तेच पुन्हा पुन्हा नाही उगाळलेत तर कमी कंटाळा येईल' असे स्पष्ट सांगणे म्हणजे टीका व्यक्तिगत पातळीवर घेणे नसते. संघ नामक त्रयस्थ संघटनेच्या कामाबद्दल चर्चा करत असता, चर्चेतला समोरचा माणूस लुटारू किंवा खोटारडा आहे असे बिनदिक्कत म्हणणे म्हणजे टीका व्यक्तिगत पातळीवर घेणे असते.

बाकी तुमच्या भूमिकेचं काय करायचं ते तुम्ही बघा. ते तुमचं स्वातंत्र्य आहे. मात्र 'ऐसीकरांनी मला जबरदस्तीने बदलवले हो...' अशी रड दर वेळी लावणार असाल, तर भूमिकाबदल अर्थहीन आहे. शिवाय तुमची भूमिका न बदलल्यामुळे ऐसीकरांचे शष्प वाकडे होत नाही, त्यामुळे त्यांच्यावर वृथा आरोप / फुकाचे श्रेय / अनाठायी बदनामी नको.

महत्त्वाचे: मुद्दा सोडून इतर फाटे फोडलेले दिसल्यास प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

बॅटमॅन Wed, 11/02/2015 - 12:38

In reply to by मेघना भुस्कुटे

बाकी मुद्दा सोडून इतर फाटे फोडलेले दिसल्यास प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

फाट्यावर मारणार म्हणजे हो नक्की काय करणार? सहज उत्सुकता म्हणून विचारले इतकेच.

राजन बापट Tue, 10/02/2015 - 18:11

"अँटिएस्टाब्लिशमेंट भावनां"चा परिपोष झाल्याने "आप" पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल आनंद आहे.

मात्र ६७-३-० हे फारच त्रासदायक वाटतं. अगदी रामराज्य जरी आलं तरी सक्षम असा विरोधी पक्ष हवाच. इन मीन तीन विरोधी सीट्स म्हणजे चेष्टा आहे. आणि लोकशाही चालणार कशी असा प्रश्न पाडणारी अवस्था आहे.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:14

In reply to by राजन बापट

आप हा अतिशय सज्जन लोकांचा पक्ष आहे. त्यांना कोणी विरोध करायची गरज नाही हे दिल्लीकरांना कळून चुकले आहे.
--------------
केजरीवाल साहेबांची तब्येत (म्हणजे मानसिक) १-२ महिने पाहून झाले ते चांगले का हे निश्चितपणे म्हणता येईल.