राजकीय
उद्दाम पोलीस अधिकार्याला सर्वपक्षीय आमदारांनी धोपटले
Taxonomy upgrade extras
दैनिक सामना मध्ये ही बातमी वाचनात आलीः उद्दाम पोलीस अधिकार्याला सर्वपक्षीय आमदारांनी धोपटले.
http://www.saamana.com/2013/March/20/Link/Mumbai1.htm
- Read more about उद्दाम पोलीस अधिकार्याला सर्वपक्षीय आमदारांनी धोपटले
- 15 comments
- Log in or register to post comments
- 7256 views
भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू
Taxonomy upgrade extras
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्या नेत्याचे भय असते.
- Read more about भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू
- 27 comments
- Log in or register to post comments
- 5379 views
गडकरी पुन्हा अध्यक्ष होणार का?
Taxonomy upgrade extras
मटा मधे बातमी वाचली की अडवाणींनी गडकरींच्या नावाला विरोध केलाय आणि सुषमा स्वराज यांचे नाव सुचविले आहे. गडकरींना भाजपातुन विरोध आहे, पण संघ मात्र गडकरींच्याच अध्यक्षपदासाठी आग्रही आहे. संघाची नाराजी ओढवुन न घेण्यासाठी सुषमा स्वराजही अध्यक्षपदाला अनुत्सुक आहेत, कदाचित पंतप्रधानपदासाठी सर्वसहमतीच्या उमेदवार म्हणुन स्वत:ची पोझिशन मजबुत करायचा विचार करताहेत. काही मंडळी जेटलींचे नाव मांडत आहेत. मोदीगटाचा जेटलींना पाठींबा आहे.
- Read more about गडकरी पुन्हा अध्यक्ष होणार का?
- 16 comments
- Log in or register to post comments
- 3552 views
पाकिस्तानमध्ये काय होईल?
Taxonomy upgrade extras
पाकिस्तानची निर्मिती ही धर्माधिष्ठित असली तरी प्रत्यक्षात त्या भागात एकाच प्रकारची संस्कृती नव्हती. किंबहुना भारताइतकेच प्रांताप्रांतात असणारे चालीरीतीतील बदलच नव्हे तर भाषा, आचार, विचार याबाबत संपूर्ण पाकिस्तानात वेगवेगळे मतप्रवाह, जनसमुदाय होते - आहेत. भारताला जसे एका घटनेने (संविधानाने या अर्थी) बांधले आहे तसे पाकिस्तानचा 'बायंडिंग फॅक्टर' हा धर्म वाटला, असला तरी त्यांहून मुख्य फॅक्टर होता 'भिती'.
- Read more about पाकिस्तानमध्ये काय होईल?
- 14 comments
- Log in or register to post comments
- 3826 views
नरेंद्र मोदी यांचा गुजरात निवडणुकांमधला विजय
Taxonomy upgrade extras
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला तिसर्यांदा विजय मिळाल्याचं वृत्त हाती आलेलं आहे.
मोदींचं वर्णन करताना "The curious case of Narendra Modi" असं म्हणावंसं वाटतं. गोध्रामधे जे झालं ते घडवणार्यांशी निकटचे संबंध असणारेही मोदी आणि गुजरात राज्याला प्रगतीपथावर नेऊन ठेवणारेही मोदीच. माझ्यामते गोध्राकांडानंतरचा धडा मोदी शिकलेले आहेत आणि इतक्या खुल्लेपणे राजरोस हिंसाचारावर शासकीय वरदहस्त ठेवणे परवडणार नाही हे त्यांना उमजलेलं आहे.
- Read more about नरेंद्र मोदी यांचा गुजरात निवडणुकांमधला विजय
- 36 comments
- Log in or register to post comments
- 6703 views
अतर्क्य की तर्कसंगत?
Taxonomy upgrade extras
नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः
हिंदू धर्मशास्त्रानुसार आत्मा अमर असतो. तो कधीही नष्ट पावत नाही. मृत्यूनंतर आत्मा निघून गेलेले शरीर हे अचेतन असते. अर्थात, ते जाळून नष्ट केले तरी निघून गेलेला आत्मा पुन्हः दुसर्या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म होणारच असतो. अशी हिंदूंची धारणा असते. किती हिंदू हे मानतात किंवा कसे, हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू! पण ही हिंदू धर्माची धारणा आहे, हे मात्र खरे.
म्हणूनच, अस्थी गोळा केल्या की प्रत्यक्ष दहनभूमीचे माहात्म्य संपते. दफनभूमीचे माहात्म्य असते ते ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांत.
- Read more about अतर्क्य की तर्कसंगत?
- 14 comments
- Log in or register to post comments
- 6358 views
बाळासाहेबांनंतर काय ?
Taxonomy upgrade extras
असं म्हणतात की नेहरू गेल्यानंतर तत्कालीन देशीविदेशी पत्रकार/निरीक्षक "नेहरूंनंतर कोण?" आणि त्याहीपेक्षा "नेहरूंनंतर काय ?" असे प्रश्न विचारू लागले होते. पुढे काय घडलं ते सर्वज्ञात आहे. यातला "काय ?" हा प्रश्न म्हणजे "भारताचं काय होणार ?" अशा अर्थाने होता.
- Read more about बाळासाहेबांनंतर काय ?
- 22 comments
- Log in or register to post comments
- 5865 views
हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
Taxonomy upgrade extras
एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा गटाविषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही. उदा: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जपान्यांविरुद्ध चीड होती, पण जपानी लोकांबद्दल विनोद मात्र निर्माण झाले नाहीत. किंवा आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत.
- Read more about हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
- 28 comments
- Log in or register to post comments
- 15673 views
एका बाहेरच्याने?
Taxonomy upgrade extras
अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाच्या जोडीला राजकीय आखाड्यात उतरून चार हात करण्याची घोषणा केली आहे हे आपण जाणतोच. भारतात अनेक नवे राजकीय पक्ष समोर येत असतात. काहि काळातच त्याच्यात 'नवीन' असे काहि उरत नाही किंवा असलेच तर ते हवेसे असते असे नाही. मात्र साधारणतः भारतीय राजकारणाचा आणि राजकीय पक्षांचा एक ठाम किंवा ठोस असा तोंडावळा बनलेला आहे. एक सैलसर असली तरी बर्यापैकी स्थिर चौकट आहे. आणि राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो त्या चौकटीला भेदायचा प्रयत्न क्वचितच करतो.
- Read more about एका बाहेरच्याने?
- 13 comments
- Log in or register to post comments
- 3388 views
राष्ट्रपतींचा दयाळूपणा -
Taxonomy upgrade extras
.
नवीन मा. राष्ट्रपती "दयाळू" आहेत की नाहीत, हे मला माहित नाही.
जुन्या मा. राष्ट्रपतीनी दयाळूपणा दाखवण्यात "उच्चांक" केला आहे, हे मला विविध माध्यमांद्वारे माहित झाले.
आपल्या न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवावा, हे मला कळत नाही.
खालचे न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय-
ह्या तिन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी "पूर्ण विचार करूनच" समोरच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली असणार ना ?
असे असतांना,
केवळ "दयेच्या अधिकारा"खाली मा. राष्ट्रपती सदर शिक्षा रद्द करण्याचा उच्चांक प्रस्थापित करून जातात-
हे खरोखरच अनाकलनीय कोडे वाटते !
- Read more about राष्ट्रपतींचा दयाळूपणा -
- 42 comments
- Log in or register to post comments
- 7423 views