तक्षकयाग : एक सुरेख नाटक.

संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो असे म्हणतात ! अनेक संघर्ष एकवटून “तक्षकयाग” हे प्रा.ल. मयेकर यांच्या कसदार लेखणीतून साकारलेले सुरेख नाटक काल पहिले.
सहकुटुंब “ मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने ही हया नाटकाची ओळख !

महांकाळ व हब्बाल हे दोन समाज एका देशात राहत आहेत राहत आहेत. ओमर (?) नी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी रचली आहे हीच नाटकाची सुरवात ! फाळणी पासून सुरु होणारे नाटक लेखकांच्या मनाचा ठाव घेत घेत पहिल्या अंकात सापते तेंव्हा सेश स्वतंत्र झालेला असतो. दुसऱ्या संकट स्वतंत्र देशाचे नवे राजकारण सुरु होते आणि दहशतदाशी येवून थांबते.
फाळणी पासून सुरु होणारे नाट्य मोजक्याच पण कमालीच्या उंच व्यक्तिरेखांनी नटलेले आहे . महाराज “मलयकेतू” हे शांती व निधर्मी प्रवृत्तीचे शासक आहेत. ह्याच राज्यात “ महागुरू भानुगुप्त” हा प्रखर राष्ट्रवादी धर्म गुरु आहे. मलयकेतू ने असहायपणे फाळणी स्वीकारली आहे आणि हब्बाल जमातीचे नेते “कौसर” हे फाळणीस अत्यंत उतावीळ झाले आहेत. महागुरू भानुगुप्त त्याला विरोध करून राहिलेले आहेत. हया विरोधाचा शेवट भानुगुप्ताना “कारावासात”टाकण्यामध्ये होतो.

महाराज मलयकेतू यांचा पुत्र “युवराज कुणाल” हा महागुरू भानुगुप्त ह्यांचे विचार शिरसावंद्य मानणारा आहे. महागुरू भानुगुप्त यांची तेजस्वी कन्या “वृषाली” शी युवराज कुणालचे प्रमाचे नाते फुलते आहे. तोवर फाळणी , जातीय दंगली भोगून देश स्वतंत्र झाला आहे. एकीकडे दोस्तीचा डाव रचत “कौसर” युद्धाची तयारी करत आहेत. ह्यावेळी मात्र महागुरू भानुगुप्त कल्पकतेने महाराज मलयकेतू ना कैदेत टाकतो व “युवराज कुणाल” राजा होतो.
पुढे देशात काय होते ? युवराज कुणाल व वृषाली यांच्या प्रमाचे काय होते ? महागुरू भानुगुप्त पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी नाटक जरूर पहावे.

अत्यंत ओजस्वी भाषा , नेपथ्य व वेशभूषा ही नाटकाची बलस्थाने आहेत. सगळ्या कलाकारांच्या भूमिका समर्पक ! अविनाश नाराकारांचे दिग्दर्शन व महागुरू भानुगुप्त चे मध्यवर्ती भूमिका अफलातून !

महागुरू भानुगुप्त ही स्वा.सावरकरांचे विचार ( कवीहृदय , मुलीवरचे प्रेम , कारावास म्हणून जीवनही ) परावर्तीत करणारी भूमिका आहे . तर महाराज मलयकेतू ही गांधीजी व पंडित नेहरू यांची आठवण करून देणारी भूमिका ! हया आणि इतर अनेक संघार्षानी ठासून भरलेले हे नाट्य “मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने संपवतो !

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

शिफारस पोचली.. या नाटकाची जाहिरात अजून पाहण्यात आली नाही*.. हे नाटक नुकतेच आले आहे काय?
अधिक विस्ताराने परिचय आवडेल (मात्र कथा टाळून Smile

*(असल्यास लक्ष वेधले नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण नव्या संचात आहे.
नुकतेच प्रयोग सुरु झालेत. ५/१० झाले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फाळणीविषयक नाटक, आता ६० वर्षांनंतर आत्ता एवढं प्रकर्षाने का बघावं? या प्रश्नाचं उत्तर धाग्यातून मिळालं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धागा, धाग्याचा विषय ह्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाही. फक्त वरील प्रतिक्रियबद्द्ल :-
फाळणीविषयक नाटक, आता ६० वर्षांनंतर आत्ता एवढं प्रकर्षाने का बघावं? या प्रश्नाचं उत्तर धाग्यातून मिळालं नाही.
braveheart,gladiator,हे पिरियड सिनेमे किंवा रिचर्ड अ‍ॅटनबरोचा "गांधी" किंवा केतन मेहताचा "सरदार" हे सिनेमे "अवश्य पहा" असं कुणी सुचवलं तर आपण त्याला "घटनेनंतर किती वर्षानी पहायचे रे हे" असं म्हणतो का ?
किंबहुना मागे शीतयुद्धकालीन काळावर आधारित धमाल विनोदी चित्रपट आपल्याच एका परिक्षणात सुचवण्यात आला होता. "घटनेनंतर किती वर्षानी चित्रपट पहावा" हा प्रश्न तिथेही लागू होणार नाही का? कालसुसंगततेच्या मुद्द्य्याचा उल्लेख दरवेळी धाग्यातून का अपेक्षित करावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फाळणी हा भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा भाग आहे. फाळणीवर आधारित अनेक कलाकृती आजही निर्माण होतात किंवा प्रसिद्धही होतात. अलिकडच्या काळात प्रसिद्ध झालेलं गाणी, जे अगदी फाळणीवर आधारितच आहे असं म्हणता येणार नाही, पण संदर्भ आहेत ते ही मला आवडतं. (गाणं- हुस्ना)

गांधीजी, किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात मागे गेल्यास शिवाजी, तुकाराम, ज्ञानेश्वर या लोकांचा मोठा वारसा आहे. पण त्यांच्या चिऊ-काऊ गोष्टींपेक्षाही त्यांनी ज्या मूल्यांचा पाठपुरावा केला ती महत्त्वाची असतात. जातीपातींना विरोध, ज्ञानावर ठराविक वर्गाची असणारी मोनॉपॉली मोडून काढणे, संख्येने बहुसंख्य पण संख्येची आणि एकप्रकारे स्वतःचीच शक्ती किती हे माहित नसणार्‍या सामान्य लोकांना त्या शक्तीची जाणीव करून देणे हे दाखवण्यासाठी अशा ऐतिहासिक 'लेजंड्स'बद्दल कलाकृती बनवणं महत्त्वाचं असतं. अ‍ॅटेनबराचा गांधी त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. डॉ. स्ट्रेंजलव्हच्या धाग्याबद्दल सुचवलं गेलं आहेत त्यातही शीतयुद्धाचे संदर्भ वापरून मानवी वृत्तींवर टिप्पणी आहे ती महत्त्वाची आहे. शीतयुद्धाचे संदर्भ आता वितळून गेले आहेत, पण त्या मानवी वृत्ती आजही शिल्लक आहेत, म्हणून डॉ. स्ट्रेंजलव्ह आजही बघावासा वाटतो.

आज कोणी शिवाजीच्या लढाईतल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या तर त्यात मला फार रस वाटत नाही. शाळकरी वयात ते शिकून झालं. कॉलेजच्या वयात फाळणीमुळे झालेल्या दुष्परिणामांचे चित्रपट बघून झाले. शिवाजीने जे केलं, शेतकर्‍यांचं, सामान्यांचं आणि त्यांच्या भलं करणारं राज्य बनवलं, जातीभेद मानले नाहीत, ते आजही महत्त्वाचं आहे. फाळणीच्या वेळेस उदाहरणार्थ अनेक स्त्रियांची ससेहोलपट झाली. अनेकींनी आपला नवा धर्म, नवा देश स्वीकारला आणि त्या संसारात त्या रमल्या. आनंदात रहात असताना तिथे तिसर्‍याच व्यक्तीने त्यांना त्यांच्या मूळ देशात, धर्मात जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्या स्वतः, त्यांचे कुटुंबिय यांचे हाल झाले त्या प्रकारचे प्रश्न आजही महत्त्वाचे आहेत. उदा: परदेशी जाणार्‍या, तिथेच रहाणार्‍या लोकांची 'लॉयल्टी', परदेशी संस्कृतीतल्या आवडणार्‍या गोष्टी अंगीकारूनही पुन्हा स्वदेशीच राहू पहाणार्‍या माणसाचं 'इमान' अशा अंगांनीही फाळणीकडे बघता येईल.

अन्यथा स्वतंत्र भारतात (किंवा पाकिस्तानात) जन्म झालेल्या लोकांना, ज्यांचे कोणतेही नातलग, पूर्वज, मित्र फाळणीच्या दु:खाला सामोरे गेले नाहीत त्यांना फाळणीबद्दल ऐकण्या-वाचण्यासारखं नवं काय असणार आहे? Genocide वाईटच आहे, त्यात वेगळं काही सांगण्यासारखं आहे का, त्याबद्दल मतभेद आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रदीर्घ प्रतिसाद आवडला.
हे नाटक फाळणी वर आधारित असले तरीही "फाळणी" पुरते मर्यादित नाही. हिंदू - मुसलमान किंवा बहुसंख्य अल्पसंख्य अश्या विषयावरचे ते नाटक म्हणता येईल. दहशतवाद ,देशप्रेम प्रेमत्याग हया व इतर उपकथा ही हया नाटकाचे वैशिष्टय आहे.

नाटक हे एक टीम वर्क असते. विषय आशय हया बरोबर संहिता , दिग्दर्शन , अभिनय , नेपथ्य , रंगभूषा , वेशभूषा आणि संगीत इत्यादी अनेक कलांचा तो संगम आहे. जमून गेलेली नाटके साध्याच विषया वर आधारित असतील तरीही त्यांचा आस्वाद घेणे मला तरी आवडते.
त्यात वेगळं काही सांगण्यासारखं आहे का?
हो. नक्की आहे . आणि तेच पाहण्याची ही शिफारस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र. ल. मयेकर लेखक
अविनाश नारकर दिग्दर्शक
आणि प्रमुख भूमिका
ओजस्वी भाषा
प्रखर राष्ट्रवादी धर्म गुरु स्वा.सावरकरांचे विचार परावर्तीत करणारा
त्याविरुध्द गांधि-नेहरू-विचार असा संघर्ष
हया आणि इतर अनेक संघार्षानी ठासून भरलेले हे नाट्य...

नाटक का बघू नये ह्याची अनेक कारणं एकवटून दिल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तुम्हांला हा धागा वाचून तुमचा निर्णय घेता आला हे वाचून बरे वाटले.
पसंद अपनी अपनी .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0