रीटा वेलिणकर

आधी सध्या काय वाचताय? ला प्रतिसाद म्हणून लिहिणार होतो पण लांबत गेल्याने वेगळा धागा काढतोय
समोरच त्या तिघी दिसतात. एक डावीकडे काहिशी सुटलेली, मध्यमवयीन, लांब केसाचा थेपटा सोडलेली स्त्री; आपल्या शेजारी उभ्या असलेल्या दुसर्‍या तुलनेने तरूण, आधुनिक पेहरावाच्या स्त्रीच्या गालांवर हात ठेऊन तिचे कौतूक तरी करत आहे किंबा तिचे सांत्वन तरी करत आहे. या दोघींच्या शेजारी उजवीकडे एक तिसरी स्त्री, सपाट, एकाच रंगात कोणत्याही आकारांशिवाय, या दोघींकडे बघतेय.. पुसटशा आनंदाने, काहिशा करूणेने आणि बर्‍याच प्रमाणात भावशुन्यतेने!

हे वर्णन आहे डॉ. गीव्ह पटेल यांच्या 'काँग्रॅच्युलेशन्स' या चित्राचे. आपल्याला हे चित्र 'रीटा वेलिणकर' च्या मुखपृष्ठावर भेटते. असे बोलके चित्र उत्सूकता वाढवते आणि कादंबरी वाचायला सुरवात करण्यापूर्वीच शांताबाई लिहितात. हे चित्र आहे डॉ. गीव्ह पटेल यांचे 'कॉग्रच्युलेशन्स'. हे खरंतर 'कन्डोलन्सेस'सुद्धा होऊ शकते. जगात आपला कोमल-मजबूत आधार देत एकमेकींना सावरणार्‍या स्त्रिया सर्वत्र आढळतात. इथे त्यांची नावे आहेत रिटा, सरस्वती आणि संगीता.

यानंतर सुरू होतो तो रिटा वेलिणकर या पात्राभोवती चालु असलेला भावनांच्या कल्लोळाचा प्रवास. साळवी नावाच्या विवाहीत बॉसबरोबर तिचे असलेले विवाहबाह्य संबंध, लहानपणापासूना आंग्लाळलेल्या पालकांसोबत राहून तिची झालेली घुसमट, चार बहिणींमध्ये आलेले 'मोठे'पण, कालांतराने आलेले कर्तेपण या सार्‍या संस्कारातून, पाश्वभूमीतून उभी राहिलेली रिटा जेव्हा आपले अंतरंग उलगडवून दाखवू लागते तेव्हा तिचा राग, लोभ, किळस, आनंद, उद्वेग वगैरे विविध प्रकार जाणवत असले तरी मुख्यतः दिसते ते त्याच्या मुळाशी असलेले दु:ख.
दु:ख हा विषय तसा स्थानातीत. मात्र इथे केवळ दु:खाला इतक्या स्वरूपात मांडून त्यातूनच इतर भावनांचे उगवणं, हे एकाच रंगाला डझनभर पोतात रंगवून वेगवेगळे रंग भासवण्यासारखं रंगवलं आहे. अन् हे आव्हान शांता गोखले यांनी केवळ पेललेच नाही आहे तर त्यातून एक प्रकारची सौंदर्य निर्मीती केली आहे. 'स्त्री जन्मा तुझी कहाणी' असे म्हणत रडत न बसणारी आणि समाजात खुलेआम विवाहबाह्य संबंध ठवायची इच्छा बाळगणारी रीटा तत्कालीनच काय पण हल्लीच्या समाजातही भुवया उंचावणारी ठरावी. तिचे अचाट तत्त्वज्ञान, तिचे दु:ख, तिचे साळवीवरच प्रेम आणि त्याच्यातील 'पूरूषावर'चा राग आणि त्याच्या 'गृहस्थ' असण्याचे आकर्षण+असुया या सार्‍यांचा परिपाक लहान प्रसंगांतून, चपखल वाक्यांतून, अचूक पात्र योजनेतून आणि साजेशा वातावरणनिर्मितीतून करण्याचे लेखिकेचे कसब वाखाणण्याजोगे आहे.

केवळ रिटाच नाही तर सरस्वती आणि संगीता या पात्रांची योजना त्यांच्या स्वतंत्र तरीही समांतर कहाण्या, त्यांच्यातले एकमेकींना सुखावणारे, दुखावणारे आणि असुयेने, प्रेमाने, रागाने भरलेले उभे आडवे प्रसंग यातून कमी प्रसंगातूनही तीन्ही व्यक्तीरेखा खुलतात. नुसत्या खुलत नाहित तर एका शाश्वत दु:खाचे तीन चेहरे भासतात. लहान परंतू भावगर्भ वाक्ये, समर्पक चित्रदर्शी वातावरणनिर्मिती हा शांताबाईंचा गुण 'त्या वर्षी' मध्येच जाणवला होता. पण रीटा वेलिणकर मधली कथांची वीण मला "त्या वर्षी"पेक्षा अधिक मोहक वाटली.

'स्त्री कादंबर्‍या' म्हणजे जी काही प्रतिमा डोक्यात होती त्याला हे पुस्तक ताकदीने छेद देते. कथेच्या सुरवतीला मुखपृष्ठावर भेटलेले 'कॉग्रेच्युलेशन्स' हे चित्र कथेत अनेकदा मनात डोकावते -कधी 'कॉग्रेच्युलेशन्स' म्हणून तर कधी 'कन्डोलन्सेस' म्हणून- आणि कथा संपताना नेमका भाव घेऊन अगदी साकार - मूर्त होऊन समोर येते. जणू हे पुस्तक ते चित्र समोर ठेऊनच लिहिलं असावं इतकं! मी चित्रपट पाहिलेला नाही, मात्र पुस्तक वाचूनही वाचकाला त्या भावनिक 'आंदोलनांचा' पुरेपुर आस्वाद मिळतो. आता चित्रपट बघेनच. पण ज्यांनी पुस्तक वाचले नसेल त्यांनी जरूर वाचा ही शिफारस!

पुस्तकः रीटा वेलिणकर
लेखिका: शांता गोखले
किंमतः रू ८०

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पुस्तक वाचलेले नाही पण चित्रपट पाहिला आहे. आवडला होताच... कथानक एवढं दमदार आहे म्हटल्यावर न आवडण्याचं कारणच नाही. पुस्तकांवरून निघालेले चित्रपट बहुतेक वेळी मूळ पुस्तकाच्या तुलनेत सुमार वाटतात. हाच नियम 'रिटा'ला लागू होतो की नाही कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

पण रीटा वेलिणकर मधली कथांची वीण मला "त्या वर्षी"पेक्षा अधिक मोहक वाटली
अगदी बरोबर. मला 'रीटा वेलिणकर'च्या तुलनेत 'त्या वर्षी' काहीशी कृत्रिम बांधणीची वाटली होती. 'रीटा'मधे या तीन बायकांच्या गोष्टींची वीण अगदी सहज, नैसर्गिक आहे.

तशीच 'रीटा वेलिणकर' काहीशी भेदक, थेट, लेखिकेच्या शब्दांचा आधार घ्यायचा तर - सप्पदिशी सुरी फिरवल्याप्रमाणे आहे. त्यातली तुटक-धारदार वाक्ये, कोरडी वाटावीत अशी मर्मभेदक निरीक्षणे, पूर्ण गोष्टीमध्ये भरून राहिलेला तिरकस काळ्या विनोदाचा सूर (हा 'त्या वर्षी'मध्येही भेटतो. मला शांताबाईंच्या गोष्टी आवडण्याचे मुख्य कारण.) यांमुळे ही गोष्ट समकालीन स्त्री-कादंबर्‍यांमध्ये उठून दिसते. (गौरीच्या कादंबर्‍या काहीश्या स्वप्नाळू होत्या, तर सानिया यांच्या संदिग्ध. त्यांचे-त्यांचे आपापले मोठेपण आहे, पण त्यांच्या सौम्यपणाच्या तुलनेत या कादंबरीला धार आहे. यालाच उद्देशून ऋषिकेशने 'स्त्री-कादंबर्‍यांची प्रतिमा' हे शब्द वापरले आहेत ना?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"हे पुस्तक तू वाचच" अशी सूचना करण्याबद्दल मेघनाचे आभार.

आणि कादंबरीबद्दल अशा प्रकारे लिखाण करण्याबद्दल ऋ, मेघना आणि रुचीचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रुची ने रीटा वेलिण्करवर कुठे लिहीलंय, दुवा आहे का?
(अवांतर - ऐसीचं सर्च फंक्शन नीट का नाही चालत?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. मलाही त्या वर्षी आवडली होती, पण रीटा वेलिणकर सुपर्ब आहे. २०१४ सालात वाचून काढलेली पहिली कादंबरी (हो, इतके दिवस मी रीटा वाचलीच नव्हती - आता मला विचार, अगं तू काय करत होतीस इतके दिवस? हाच प्रश्न मलाही पडलाय...). आता वाचनाचे हे साल नक्की चांगले जाणार हे नक्की.

मैत्रीचे, बंधनाचे, स्वत्वाच्या शोधाचे पैलू शोधण्यात, उलगडण्यात गोखल्यांनी कमालीचे रिस्ट्रेंट दाखवलंय - किती ठिकाणी वर्णनांचा अर्थ उघड उघड वाचकाला पटवून देण्याचे टेम्पटेशन त्यांनी टाळले आहे; त्याने लेखन कमालीचे मोजके आणि धारदार वाटलं. उदा:

"लहानपणापासून पावसाचे कसरती थेंब तिला खिळवून ठेवतात. ते कसे एकात एक मिसळतात, सैरभैर धावतात, मग सहज दुसर्‍यात मिसळून थेंब न राहाअ पाण्याचं तळं बनतात.
पण काही थेंब एकटेच थरथरत असतात. दुसर्‍या थेंबांशी मीलन होतच नाही त्यांचं. स्वत:चा जीव एकवटून ते शेवटी पडतात. फुटतात. आणि फुटण्याच्या क्रियेतून गती मिळालेले तुषार कुठे जातात ते आपल्याला दिसतच नाहीत."

रीटाच्या मनःस्थितीचे, स्वाभिमानाचे तसेच एकाकीपणाचे - आणि एकूण कादंबरीने घेतलेल्या स्वत्वाच्या शोधाचे हे एक मस्त कॅप्स्यूल आहे. पावसाच्या वर्णनापासून गोखले सहज दुसरीकडे वळतात. या थेंबांचा रीटाच्या परिस्थीतीशी थेट संबंध लावत नाहीत, ते वाचकावरच सोडतात. अशी अनेक वर्णनं, उदाहरणं कथानकात आहेत, वाचता वाचता त्यांची लिंक लागत जाते, कथेच्या विचारपूर्वक बांधणीची कल्पना येते. सरस्वती आणि साळवींच्या भेटीच्या वेळेस साळवीच्या चेहर्‍याचे आणि गाडीतल्या कोंदट, दमट वातावरणाचे बारीक वर्णन तिला (आणि आपल्याला) साळवीवरच्या संशयाला वाढवते. तिच्याबरोबर आपणही त्याचा शब्दन् शब्द निरखून पाहतो, खरंच रीटाने सांगितले आहे तसा तो आहे का हे बघतो. विक्टोरियाचं "वाहतं दु:ख" आणि रीटाचा स्फोट, या दोन्हीतून सरस्वती आपल्या स्वत:च्या जीवनासाठी शोधणारा मधला मार्ग... एका कथानकातले पात्र आणि प्रकरणं इतकी सुरात गायली की मजा येते. हॅट्स ऑफ टू गोखले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गौरीचे लेखन थोडेफार स्वप्नाळू होते पण मुख्यतः ते तार्किकतेचा कीस काढणारे होते.स्वल्पविराम,अर्धविरामांनी नटलेली लांबलांब पल्लेदार वाक्ये,आदि-अंत मुद्दाम लक्ष ठेवून वाचायला लावणारी.कारण ही बया ज्या अर्थबिंदूवरून सुरुवात करेल,तोच अर्थ वाक्याच्या शेवटी निघेल,याची खात्री नाही.तर कधीकधी एका वाक्यात फट्ट्दिशी वाट लावून टाकेल.मला तर तिचे लेखन म्हणजे एक सस्पेन्स स्टोरीच वाटते. कधी कुठला अर्थ निघेल याची काहीच पूर्वसूचना नसताना अनपेक्षितपणे वास्तव सामोरे येते. म्हणजे आपण कल्पना करीत असतो की हिला असे-असे म्हणायचे आहे,तर तिला अभिप्रेत गोष्ट भलतीच निघते.एका अर्थाने ही 'धक्कातंत्र शैली' म्हणता येईल.एकेक पान गळाया मध्ये हे प्रकर्षाने दिसते.बुद्धिगम्य असे लेखन.
आणि १९७५ हा एकेक पानचा काळ धरला तर कालक्रमाने रीटाच्या आधी. सगळे काही थेट मांडायचा तो काळ नव्हता. तेव्हा वाचकाला घुमवून्-फिरवून्,कन्फ्यूज करून किंवा संदिग्धतेच्या आड दडून लिहिण्याची बरीच कसरत या दोघींना करावी लागली असेल कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे त्याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर दिसतेय. मी मुख्यतः मुखपॄष्ठ पाहिले. मला तुम्ही म्हणताय तो अर्थ प्रतित होताना दिसला नाही.

असं वाटलं, एक तरूण स्त्री अनावॄत(बरोबर लिहीलाय क मी हा शब्द?) स्वतःला आरशात बघते आहे आणि कुंकू लावावे की नाही याचा विचार करत थबकली आहे आणि दुसरी मध्यमवयीन स्त्री तिचे काहीश्या दु:खी चेहर्‍याने खांद्यावर हात ठेऊन सांत्वन करते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

त्या चित्राचे मुखपृष्ठ इथे बुकगंगावर दिसेल. मला केवळ चित्राची लिंक न मिळाल्याने अख्ख्या पेजची लिंक देतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!