माझ्या गावात कधी आता -

माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहात नाही -
आजोळी जाण्याचा त्यामुळे
प्रसंग कधी येतच नाही......

धूर सोडणारी झुकझुक गाडी
साधे झाडही दिसत नाही
शहरात राहिला मामा आता
त्याला नोकरी मिळत नाही ...

वेळ नसल्यामुळे तो
मला कधी बोलवत नाही
मामी सुगरण आहे का
त्यामुळेच माहित नाही...

वर्षात कधीतरी एकदाच
शिकरण-पोळी खाते म्हणे -
एवढे मात्र ऐकून आहे
बाकीच काही ठाऊक नाही...

मामाची रंगीत गाडी नाही
मामाची उंचउंच माडी नाही
लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही....

माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहातच नाही !

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही....

म्हणजे आजी जिवंत आहे की नाही?
असो. आशावादी कविता जास्त आवडली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहिण आणि तिचा नवरा शहरात 'मजा' करत असताना त्या बिचार्‍या मामाने फक्त भाच्यांना चार दिवस विरंगुळ्याचे जावेत म्हणून गावात पडून रहाणे सध्याच्या आर्थिक व्यवस्थेत गैरसोयीचेच नव्हे तर मामा वर अन्यायकारक आहे. Wink

असो. विषय-भावनेचा अंदाज येऊनही अगदीच गद्य वाटल्याने कविता आवडली नाही Sad
पु.ले.शु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!