प्राध्यापकांचा संप

रविवारी सुट्टी असल्यामुळे मी सकाळी उशीरा उठतो. आणि जनरल नाँलेज वाढवायच्या बळकट हुक्कीने टिव्हीतल्या बातम्या , टिव्हीतल्या बाईकडे कानाडोळा करत बघत राहतो, ऎकत राहतो. दर आठवडी हिशोबाने आज ही बातम्या ऎकल्या आणि सकाळ भल्तीच उदास झाली. आईशप्पथ चहापण घरात नाय पिलो थेट बाहेर जाऊन पिवून आलो. अठ्ठेचाळीस दिवस संपावर असलेल्या संपकरी प्राध्यापक वर्गाच्या टिव्हीवरच्या प्रतिनिधी दोन लेडीज प्राधायापक माऊल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला न जुमानता आम्ही संपावर किती 'ठाम' आहोत हे मुठी वळवू वळवू सांगताना ऎकल्या पाहिल्या आणि जीव तिळ तिळ तुटला. पांढरी सफारी घातलेले तुंदिलतणु धारक प्राध्यापक महोदय , कैफियत मांडताना निस्तं काळजाला हात घालणं सोडा , पार पोटात हात घालू लागले. या देशातलं सर्वात मोठं दुःख मांडू लागले. त्यांच्या दुःखाने मी व्यथित होऊ लागलो , शासनाला द्यायच्या लक्ष शिव्यांची मनात जुळणी करु लागलो. दुःख जाणणारं जवळ कुणी नसल्यानं चिड चिड चिडलो आणि घराबाहेर पडलो.
टपरीवरच्या अण्णा जवळ मन मोकळं केलं. प्राध्यापकांच्या गरीबी विषयी अण्णाने हळहळ व्यक्त केली. चहाच्या पैशाला रेहेन दो साब म्हटला. मन भरुन आलं. अण्णाला कळलं ते टोपेँना कळेणा. छ्या ! चाळीस हजार, साठ हजार, ऎँशी हजार पगार असणार्या प्राध्यापकांची गरीबी शासनाला दिसूने ? विद्यार्थ्यांच्या हिताचे बोगस , फिजूल आव्हान बुध्दीवंत प्राध्यापक वर्गाकडे वारंवार करण्यात शासनाला लाज कशी वाटत नाही म्हणतो मी ? संपकरी प्राध्यापक शूर मंडळीँनी आजपर्यँत वेळोवेळी केलेल्या, करत असलेल्या सहाय्याची तसेच योग्य प्रसंगातल्या मुग गिळेपणाची जराही जाण न ठेवणार्या शासनाचा करावा तेवढा निषेध कमीच ! आज आर्थिक प्रश्नावर भांडणार्या या प्रबळ प्राध्यापक संघटनेनं आजपर्यँत शासनाला आणि विद्यापीठाला तुम्ही परीक्षा पद्धतीतील दोष दुर करा, वर्षानुवर्षे पदे न भरणार्या संस्थांवर कारवाई करा शिष्यवृत्तीचा गोंधळ दुर करा. यु.जी.सी चे फंड योग्य ठिकाणी खर्च करा इ..या आणि अशा फाल्तु मागण्यांवरुन कधी अडचणीत आणलंय का ? काढलेत कधी मोर्चे ? केलीत धरणे आंदोलने ? केलाय त्यासाठी संप ? गरीब बिचारे पैसे मागतात तर त्यासाठी तुम्ही त्यांना वेठीस धरता ? मान्य आहे ते दारातल्या पठाणा प्रमाणे मागणी करतात. पण त्यामागील अतिव गरीबी तुम्हाला दिसायला नको ? आता मात्र निवडणुकात तुम्हाला बघायलाच हवं.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

नवकाव्यासारख दिसत ब्वॉ!
बैठक च्या वेळी संपादकांनी हात फिरवला होता त्यामुळे वाचन सुलभ झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मागच्या लेखात/चर्चेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्राध्यापकांचा दर 'अमूक' एक असेल तर ते परत मिळवण्यासाठी (डॉक्टरांसारखे) ते प्रयत्न करणं सहाजिक वाटतं.

प्राध्यापक संघटनेनं आजपर्यँत
शासनाला आणि विद्यापीठाला तुम्ही परीक्षा पद्धतीतील
दोष दुर करा, वर्षानुवर्षे पदे न भरणार्या संस्थांवर
कारवाई करा शिष्यवृत्तीचा गोंधळ दुर करा.
यु.जी.सी चे फंड योग्य ठिकाणी खर्च
करा इ..या आणि अशा फाल्तु मागण्यांवरुन
कधी अडचणीत आणलंय का?

असं काही दिसलं नाही हे मात्र खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0