लोकसत्ताचा अग्रलेख दि.०१/४/२०१३

पुरोगाम्यांच्या मुग गिळीबद्दलचा लोकसत्तातला सविस्तर ? अग्रलेख वाचला. कुबेर दादांनी लक्षीमनाला बळ देणार्या पित्त्यांविषयी परखड अवाक्षर न काढण्याची खबरदारी घेत दलित कार्यकर्त्यांच्या, पुरोगाम्यांच्या चळवळीला, चुळबुळीला खिजवी धाटणीचं आवाहन केलं आहे. पुरोगामी चळवळी विषयी प्रचंड दृढ झालेल्या समजाचेच हे फलित आहे. दलित नेतृत्वाची गत , पांढरी कापडं घालायची आणि त्याला माकड म्हणुन मिरवायचं ही निती यशवंतराव ते शरदराव सुप्पर डूप्पर हिट स्टाईल ने महाराष्ट्रात यशस्वी वाटचाल करत आली आहे. माने, लक्ष्मन ढोंबळे, ढसाळ, आठवले ही आजची ठळक उदाहरणं. आताचे ढोँबळेँ त्यांना अण्णा भाऊचे नाव घ्यायची मुभा आहे. शाहू फुलेची टिवटिव केली की काढ शाळा न् बस सांभाळत. हा अलिखित ढोस ! आंबेडकर तर लैच टोचतात . जो नाव घेईल तो राजकारणातून शहीदच !
आता अशा विचारधारेच्या पाण्यावर वाढलेलं मानेँच झाडं ! कोण दलित चळवळीतील कार्यकर्ते (जे रा.काँग्रेस आणि काँग्रेस च्या विरोधी आहेत ) त्याला कापण्या पासून वाचवायला जाणार आहेत. सालं मी तर थेट प्रश्न विचारतो. तुमचा ताकदवान इलेक्ट्रोनिक मिडीया करतो काय ? आज एखादा हागल्या बरोबर उद्या त्याच्या लेँडकावर चर्चा सत्र होते. आजचा सवाल ! लेँडकाचा कलर असा काय झाला ? काय म्हणतं जनमत ? वगैरे भंपक गिरी.
इथे सालं मानेँमागच्या यंत्रणेवर आसूड ओढायला काय होतं. वागळे भौ जबरी केतकर, राजदिप, खांडेकर, कुबेर बंधु . का गड्याहो काऊन काय बोलत नाय तुम्ही ? आठ दिवस उलटले तरी ? पुरोगामी चळवळीतले लोकं वाट बघतायेत मानेँनी समोर यावं मत मांडावं म्हणजे बाजू एकूण सत्यासत्यता पडताळून निर्णय घ्यायला मोकळे ! आता कर्ते करविते किँवा ना कर्ते नाकरविते माने फरारच आहेत. आणि बलात्कार जणू एकूण चळवळीनेच केलाय असा रेडा टाईप हंबरडा मिडीयाने फोडणं बरं नाही. माने दोषी असतील तर कसलीच गय न होता त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे . हे संविधानिक सत्य ! पण हाच विचार आमचा आहे हे ठसविण्यासाठी दलित चळवळीतील कार्यकर्त्याकडून नेमकं काय अपेक्षीत आहे. इंडिया जिँकल्याचा आनंद मुसलमानाने दावलाच पाहिजे. घरातला पितळी हंडा ईकून फटाके आणलेच पाहिजेत लोक बघण्या एकण्याची काळजी घेऊन उडवलेच पाहिजेत तरच देशभक्ती सिध्द होणार ! असला प्रकार झाला हा गड्याहो .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

हा अग्रलेख. सविस्तर प्रतिसाद नंतर देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>इंडिया जिँकल्याचा आनंद मुसलमानाने दावलाच पाहिजे. घरातला पितळी हंडा ईकून फटाके आणलेच पाहिजेत लोक बघण्या एकण्याची काळजी घेऊन उडवलेच पाहिजेत तरच देशभक्ती सिध्द होणार !<<

अशी अपेक्षा अग्रलेखात व्यक्त झाली आहे असं वाटलं नाही. अग्रलेखातून उद्धृत केलेली खालची ही वाक्यं दलित चळवळीची आजची शोकांतिका दाखवतात -

नंतर एक प्रकारचे सुस्तावलेपण या सगळ्या मंडळींत आणि अर्थातच चळवळीतही येत गेले. दलित लेखकांचे लेखकराव होत गेले आणि तेही प्रस्थापित लेखकांप्रमाणे सरकारी कृपाप्रसादासाठी सत्ताधाऱ्यांच्या दारी हात बांधून उभे राहण्यात धन्यता मानू लागले. अशा धन्य धन्य झालेल्यांची वर्णी अनेक विद्यापीठांत वा राज्यसभांत लावली गेली

परिवर्तनाची भाषा करणाऱ्यांचे निखारे आमदारकी, खासदारकी वा गेला बाजार भटकेविमुक्त महामंडळ किंवा शेळीमेंढी महामंडळ मिळाले तरी विझतात हे त्यांना [राज्यातील चलाख राजकारण्यांना] कधीच कळले होते.

समस्त महाराष्ट्राने शरमेने मान खाली घालावी असे प्रसंग या राज्यात दररोज घडत आहेत. माने यांची त्यात भर पडली. अशा वेळी अन्यांप्रमाणेच माने यांचाही निषेध तितक्याच तीव्रतेने व्हावयास हवा. ते होताना मात्र दिसत नाही. एरवी बसता उठता शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेणाऱ्यांचा आवाज माने यांच्याबाबत नेमका कसा काय बसला? वास्तविक स्त्रीमुक्ती संघटना, बाबा आढाव आदींनी माने यांनी कथित अत्याचार केलेल्या महिलांना आधार देण्यासाठी पुढे यावयास हवे. या सर्वाच्याच जिभांना एकाच वेळी कसा काय चिकटा आला?

ही अपेक्षा चुकीची आहे का? मुद्दा निव्वळ मान्यांचा नाही. मुळात दलित चळवळीचं आज जे काही झालं आहे त्याविषयीचं आत्मपरीक्षण आज कोणाकडून होताना दिसत आहे का? की सर्व काही आलबेल आहे असंच म्हटलं जात आहे? आज आंबेडकर हयात असते तर त्यांनी ह्या परिस्थितीविषयी काय म्हटलं असतं? तसं म्हणणारं आज कोण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूंशी सहमत आहे. दलित चळवळीच्या आत्मपरीक्षणाची अपेक्षा व्यक्त केली तर त्रास करून घेण्याचे काही कारण दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकसत्तातच हा लेख आता आला आहे. तशाच भावनेची कोणाही व्यक्तीकडून अपेक्षा करणे माणुसकीच्या दृष्टीने नैसर्गिक वाटते.
बाकी जो स्वतःचं घर साफ ठेवू शकत नाही त्याने इतरांच्या स्वच्छतेवर केलेली टीका हास्यास्पद झाली तर दोष हसणार्‍यांचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातल्या त्यात दु:खात आणखी एक सुख म्हणजे बाबा आढावांनीही मान्यांना चौकशीला सामोरे जा अशी विनंती केली आहे. ही बातमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम. पण कर नाही तर डर कशाला या न्यायाने मानेंनी भ्याडागत लपायला नको होतं. लपल्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे वळणारच. इलाज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा लेख लिहिला आहे अ‍ॅड. पल्लवी रेणके यांनी आणि लेखात म्हटले आहे --
"भटक्या-विमुक्तांची चळवळ १९७०च्या दशकात बाळकृष्ण रेणके, दौलतराव भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभी केली. तेव्हा माने कुठेच नव्हते. या सीनियर मंडळींनी उपराकार म्हणून गाजणाऱ्या मानेंना ते प्रकाशझोतात असल्याने या चळवळीत आमंत्रित केले. मानेंनी मात्र प्रसिद्धीच्या जोरावर ही सगळी चळवळच खिशात घातली. जुन्याजाणत्यांना फेकून दिले. दरम्यान मानेंनी साहित्यिक म्हणून आमदारकी मिळवली. शिक्षण संस्था उभारून तिच्यासाठी जमीन-जुमला मिळवला. आश्रमशाळा आणि महाविद्यालयांचे जाळे उभारले."

मग माने यांनी महामंडळाचा फायदा करून घेतला आणि मूळ चळवळीतल्यांना काही हाती लागले नाही म्हणून तर या लेखाची मळमळ नसेल कशावरुन?

संदर्भ -- http://www.youtube.com/watch?v=CZc8-trADAA
"भटक्या विमुक्तांच्या व्यथा वेशीवर टांगणारे कार्यकर्ते म्हणून बाळकृष्ण रेणके सुपरिचित आहेत. त्यांचं कार्य त्यांच्या कन्या अॅड. पल्लवी रेणके पुढं नेत आहेत. मुंबई हायकोर्टात वकिली करणाऱ्या पल्लवी रेणकेंनी आता आपलं करिअर भटक्या विमुक्तांसाठी वाहून घेतलंय."

त्यामुळे हा नवा लेख "with pinch of salt" धरायला हवा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडिया जिँकल्याचा आनंद मुसलमानाने दावलाच पाहिजे. घरातला पितळी हंडा ईकून फटाके आणलेच पाहिजेत लोक बघण्या एकण्याची काळजी घेऊन उडवलेच पाहिजेत तरच देशभक्ती सिध्द होणार ! असला प्रकार झाला हा गड्याहो

हे वाक्य भेदक आहे!

माने प्रकरणाचा चळवळीतील लोकांना दु:ख होऊही शकतं, झालंही असेल पण राजकीय सोयीप्रमाणे त्यांच्यावर निषेध व्यक्त करायचा दबाव आणणे योग्य आहे का? असा काहिसा भाव मला या लेखनातून जाणवला.

मुळात या राजकारणाची दुसरी बाजु (खरंतर कोणतीही बाजु)नीटशी माहिती नसल्याने सध्या कुंपणावर आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात या राजकारणाची दुसरी बाजु (खरंतर कोणतीही बाजु)नीटशी माहिती नसल्याने सध्या कुंपणावर आहे

चिजंच्या प्रतिसादाच्या दृष्टीने विचार केल्यास दोन्ही बाजूंच्या राजकारणाचा विचार करायची गरजच नाहीयेय.

चळवळ कोण करत आहे आणि तिचे नेतृत्व कोण करत आहे? आणि त्या चळवळीची कळवळ फक्त राजकिय आणि आर्थिक फायद्याचीच अशी आहे हे बघून वार्‍याच्या दिशेने तोंड का व कसे फिरवले जाते हे, ज्यांच्यासाठी ही चळवळ आहे (किंवा असे भासवले जात) आहे त्यांनी समजून घेण्याची गरज होती, आहे आणि राहिल (हा दुर्विलास).

त्यासाठी ह्या लेखात वापरलेली भाषाच वापरली जाणे आवश्यक नाही असे माझे (वैकक्तिक) मत आहे. विधायक भाषा वापरून मते व्यक्त करणे आणि आपल्याला हवे ते पदरात पाडून घेणे ही कला आहे आणि आजच्या ज्ञानधिष्टीत जगात ती सगळ्यांनाच ज्ञात असायला हवी आणी यायलाच हवी. प्रत्येकवेळी व्यक्त केलेला आक्रस्तळेपणा हा शेवटी 'इरेटेशन' होऊ शकतो. प्रत्येक वेळी आणि प्रत्येक गोष्टीत विद्रोहच आला पाहिजे असे जर वाटत असेल तर...

- (विचाराने नव्हे तर आचरणाने पुरोगामी असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करणे म्हणजे काही विशिष्टांविरोधात बोलणे एवढेच असल्याने अनेकांनी माने यांच्या आरतीच्या तबकाला आपलाही हात लावला"
हे वाक्य भेदक आहे!
बाकी लेखाचा काहीच्याबाही अर्थ लावून चार ओळी खरडल्या असल्यामुळे त्याविषयी न बोलणंच बरं.
(अवांतर: मागं एकदा लेखकाने जालसन्यास घेतल्याचे स्मरते. त्याचे काय झाले?????)

असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाला वरील ट्रोलांच्या पेकाटात लाथा घालण्याचे काम जाला बाहेर राहून शक्य नाही. या साक्षात्कारामुळे जालावर दमदार पुनरागमन केले आहे. असो . काही प्रोब्लेम ?:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले जरा मागचे लेख चाळून बघितलेत तर ट्रोल कोण आणि कुणाच्या कुठे लाथा घालायला हव्यात ते लगेच समजून येईल. तेवढ्यासाठीच तुमचे लेख उघडतो. पण काय आहे, ती एक म्हण आहे ना "शहाण्याला...." (पुढची म्हण माहीत असेल अशी आशा आहे) त्याप्रमाणे परीणाम शून्य.
असो
कळावे लोभ असावा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच्या 'लोकसत्ता'मध्ये ह्याविषयी दोन बातम्या आल्या होत्या. त्यांपैकी एकीत असा आरोप होता की अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याकडून फिर्यादी आणि त्यांच्या वकिलांवर दबाव येत आहे; तर दुसऱ्या बातमीत स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी फिर्यादी महिलांची भेट घेतली त्याबद्दल वृत्त होतं. ह्या महिलांची परिस्थिती खूप भयंकर आहे असं विद्या बाळ यांनी म्हटल्याचं त्यात दिलं होतं. आज वाचकांच्या पत्रांमध्ये अवधूत परळकर यांचं पत्र आहे. आरोप सिद्ध होण्यापूर्वीच माने यांना दोषी मानण्याचा आरोप त्यात त्यांनी पल्लवी रेणके यांच्यावर केला आहे, आणि जाताजाता न्यायसंस्थेवर ताशेरे ओढले आहेत. 'सकाळ' अपेक्षेप्रमाणे मूग गिळून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माने हे दलित चळवळीतले असल्याने मिडिया दहाही बोटे तोंडात घालून बसला आहे.ल़क्ष्मण माने ऐवजी कोणी ल़क्ष्मण गोखले असता तर केतकर्,वागळे वगैरे मंडळींनी हंबरडा फोडला असता.अजूनही महाराष्ट्रातले ब्राम्हण कसे बुरसटलेल्या,नीच विचारांचे आहेत ह्यावर चर्चा,मूल्यमापन वगैरे झाले असते.पण तसे होणार नाही. माने हे जाणत्या राजाचा दलित गडी आहेत."देशात अनेक महिलांचे शोषण होते.प्रश्न मोठा गंभीर आहे." असली वेळ मारून नेणारी वक्तव्य पवार करतील.
लोकांना काय ? ते 'धरणात मु**चे का?" असल्या वाक्यांवरही दात दाखवून हसतात्.
'रात्री बाई दिसली तर दुसरे काय करणार' असे वक्तव्य बारमतीच्या दादा-पादांनी केले तर आश्चर्य वाटायला नको.
(दलित चळवळींतल्या लोकांना जाणणारी) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्ष्मण माने 'शरण' आलेले आहेत. ही बातमी:
http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=285842

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा अगदी जय्यत तयारी करून शरण आलेले दिसतात्. खुद्द जाणता राजाच पाठीशी असल्याने तोंडे कोणाची कशी बंद करायची हे माने साहेब आता उत्तम शिकतील.
आणखी चार दिवसांनी त्या पिडीत महिला आम्ही चुकुन आरोप केले असेही म्हणू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाणत्या राजाला सध्या पुतण्यानेच मुतण्यात* अडकवलेलं आहे. त्याचा परिणाम इथे दिसतोय का काय?

*याचे संदर्भदुवे:
मूळ वक्तव्यासंदर्भात बातमी, शरद पवारांनी माफी मागितल्याची बातमी, आता अजित पवारांची माफी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.