गवत्या

'गवत्या ' मिलिंद बोकील यांच्या उत्तम निर्मिती पैकी एक आहे .
तत्त्वज्ञान स्वतः अनुभवले असले की कसे सहज निर्मिती मध्ये उतरून येते याचा सुंदर अनुभव म्हणजे हे पुस्तक .या पुस्तकाची लय शांत , संथ आहे . शास्त्रीय संगीतातला बडा ख्याल ऐकायची मजा ज्यांना माहित आहे त्यांना चटकन कळेल . एका माणसाचं संपूर्ण विकास (मानसिक )पातळीवरचा दाखवते . त्याचे आजूबाजूच्या निसर्गाशी सुंदर नाते कसे इवोल्व होते ते दिसते . गवत्या (डोंगर) हे एक पात्र म्हणून दाखवणे खूप सुंदर आहे .
पुस्तकाची निर्मितीमूल्य उत्तम आहेत . नेहमीप्रमाणेच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे परफेक्ट मुखपृष्ठ आणि आतील अर्थवाही स्केचेस आनंदात भर टाकतात .

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

पुस्तक आवडले. पण शेवट अगदीच 'आणि सर्व सुखासमाधानाने नांदू लागले' प्रकारचा गोग्गोड, मेडप आहे. त्याने अंमळ चिडचिड झाली.

हे परीक्षणही आवडले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेवट मला तरी करायचा म्हणून गो गोड केलाय असा वाटला नाही . मिलिंद बोकील अश्या रीतीने लिखाण करणारे नाहीत . शेवटचा सूर आध्यात्मीक प्रगतीचा आणि सकारत्मक आहे ही गोष्ट आवडतेच .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

मी बोलतेय त्यावरून कदाचित अनिल अवचटांवरून मागे उठला होता तसा धुरळा उठेल.
पण - मला बोकील प्रेडिक्टेबल वाटतात हल्ली बरेचदा. त्यांच्या लिखाणात एक प्रकारचा गुळगुळीत-सपक-सगळी टोकं बळंच जुळवणारा सराईतपणा आढळतो. 'गवत्या' पूर्ण टाकाऊ नाही, मान्य आहे. पण शेवटी अक्षरश: एकास एक अशा दरानं घाऊक उत्तरं आहेत. 'हां, आता काय राहिलंय? येऊ द्या.
त्याचंही उत्तर देऊन टाकू' असा लेखकाचा आवेश असल्यासारखी उत्तरं. आमचं आम्हांला काहीतरी ठेवा की हो... अशी चिडचिड होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

हे अजून एक मस्त परीक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आयला, परीक्षण आहे की भोसकाभोसकी? लैच गंदा मारलाय लेखकाला. हे परीक्षण वाचून घंटा कोणी विकत घेऊ धजणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या एका कारणासाठी हे पुस्तक घेतले असे वाचून झाल्यावर सगळ्यांना सांगतो आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0