अँड्रॉइड साठी मराठी टंकलेखन "अ‍ॅप"

स्मार्टफोन्स वर (अतिशहाण्या फोनांवर?) मराठीत टंकलेखन करण्यासाठी अनेक "अ‍ॅप्स" (याला मराठी प्रतिशब्द आहे का?) आहेत - लिपिकार, पाणिनी, बरह, इ.

प्रत्येक अ‍ॅपच्या अभिप्रायांमध्ये "उत्तम, मायबोलीची आठवण करून दिलीत" ते "बेकार आहे, एकही शब्द नीट लिहीता येत नाही" असे हे टोक नाही तर ते टोक छाप आहेत.

यांतील कुठले अ‍ॅप कोणी वापरले आहे का? काही अभिप्राय? मी अँड्रॉइड वर चालणारे अ‍ॅप शोधते आहे.
गमभन बेस वापरलेले कुठले अ‍ॅप आहे का?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तर माहित नाही. मात्र धाग्याचा फायदा घेऊन मला असणारा प्रश्नही विचारून घेतो
एका जुन्या विंडोज बेस्ड फोनवर (सोनी एरिक्सन अ‍ॅस्पेन) अनेक प्रयत्नानंतरही देवनागरी फॉन्ट्स दिसत नाहि.. काय करता येईल कोणाला माहिती आहे का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिंग्लीश नावाचे 'अ‍ॅप' वापरुन पाहिले आहे का ? नसेल वापरले तर वापरुन बघा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.hapuslabs.android.soft...

बाकी आपल्या लेखात नमूद केलेले 'अ‍ॅप्स' (लिपिकार, पाणिनी, बरह, इ.) मी तरी नाही वापरलेत म्हणून त्याबद्दल काही सांगू शकत नाही...

एनीसॉफ्ट कीबोर्ड वापरून पाहिला आहे. कामचलाऊ आहे. म्हणजे - किरकोळ मजकूर टंकायला चांगला आहे. सतत अपडेट होत असतो, वगैरे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मल्टिलिंगदेखील उत्तम पर्याय आहे!

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

सर्वांचे आभार! एक-एक डाउनलोडून पाहते.

लिपीकार च्या कीपॅड ची किंमत १०० रु. आहे - फुकट ट्रायल मधे ठीक वाटते, पण ते मॅकबुक वरच्या टंकनव्यवस्थे सारखीच एक वापरते असे दिसते - म्हणजे जोडाक्षर तयार करायला दोन अक्षरांमधे एक अक्षर टंकावे लागते. गमभन सारखे "इंट्युइटिव" नाही वाटलं.
पाणिनी कीपॅड चे अभिप्राय चांगले आहेत, पण अनेकांनी "हे अ‍ॅप फोनवरची सगळीच माहिती का मागते" या बद्दल शंका व्यक्त केली, काय भानगड आहे कळले नाही.

असले अ‍ॅप तयार करणार्‍यांनी मराठी टंकन करताना नेहमी पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे माहितीपानावरच दिले तर किती उपकार होतील! जसे - ळ, क्ष, ज्ञ, जोडाक्षरं, र्‍या - र्या, आणि अ‍ॅ ऑ इत्यादी.

फोन चे मॉडेल व अँड्रॉइडची व्हर्जन समजल्याशिवाय योग्य उत्तर देणे कठीण.
सॅमसंगच्या फोनवर स्वतःचा देवनागरी कीबोर्ड आहे. कसा अ‍ॅक्टिव्हेट करायचा ते सांगेन
अन्यथा गूगलचे हिंदी ट्रान्स्लिटरेशन आहे. ते सर्वोत्तम. नवा कीबोर्ड डाऊनलोड करू नका.
विकत तर अजिब्बात घेऊ नका.

(हिंदी असल्याने एकमेव प्रॉब्लेम म्हणजे अ‍ॅ टाईप होत नाही. म्हंजे मॅनेज ऐवजी म्यानेज टाईप करावे लागेल. अदरवाईज अतीशय मस्त ट्रान्सलिटरेट होते)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माझा फोन "सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड" आहे, अँड्रॉइड ४.२.१. जेली बीन का काय ते.
सॅमसंगचाच कीबोर्ड कसा चालू करायचा हे प्लीज सांगा!

Settings -> (personal) -> Language & Input -> इथे Android keyboard समोर सेटिंग्ज चे चिन्ह असते, त्यावर टॅप करा.
पहिला ऑप्शन Input languages असे दिसते. त्यावर टॅप करा.
त्याखाली अ‍ॅक्टिव्ह इनपुट मेथड्स शीर्षकाखाली अनेक भाषांची यादि दिसेल. त्यात मराठी समोर देखिल बरोबर ची खूण येईल असे टॅप करा. एकावेळी एकापेक्षा अधिक भाषा सिलेक्ट करता येतात. (माझ्या गॅलॅक्सी टॅब मधे मराठी आहे. तुमच्यात असलीच पाहिजे)

यानंतर आपल्या नॉर्मल कीबोर्डच्या स्पेसबारवर लॉंग क्लिक करून भाषा बदलता येते.
(सॅमसंगचा फोन सध्या हाताशी नाही, नंतर स्क्रीनकॅप टाकतो, जेणेकरून समजणे सोपे जाईल)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>अन्यथा गूगलचे हिंदी ट्रान्स्लिटरेशन आहे. ते सर्वोत्तम.

>>हिंदी असल्याने एकमेव प्रॉब्लेम म्हणजे अ‍ॅ टाईप होत नाही.

हा व्यक्तिगत आवडीनिवडीचा भाग असावा. ट्रान्सलिटरेशनमध्ये ते सॉफ्ट्वेअर मला काय टाईप करायचं आहे याचा अंदाज बांधू लागतं. आणि त्याचे अंदाज चुकीचे ठरतात. ह्यामुळे मला ते आवडत नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपण त्या अ‍ॅपने किती अन कसे अंदाज बांधावे हे त्याला शिकवू शकतो. किंवा त्याचे अंदाज बांधणे पूर्ण बंद करू शकतो. कित्येक फोन्स वर देवनागरी टंकायला ते मला तरी सर्वात सोपे वाटले. शेवटी तुम्ही म्हटला तसा व्यक्तिग आवडीचा भाग आहेच.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>किंवा त्याचे अंदाज बांधणे पूर्ण बंद करू शकतो.

गूगल ट्रान्सलिटरेटमध्ये हे करता येतं का? मी ते जेव्हा वापरून पाहिलं होतं तेव्हाचं मला आठवतंय की 'गमभन'सारखे कीबोर्ड (जिथे अमुक कळीनं तमुक अक्षर उमटणार हे ढळढळीत असतं) आणि गूगलची पद्धत यांत हाच फरक होता - गूगलमध्ये यावर माझा ताबा नसे; त्याच्या अंदाजावर मी परावलंबी होतो. हे मला पटलं नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वर रोचनाताईंना लिहिलेल्या प्रतिसादाप्रमाणे कीबोर्डसपर्यंत पोहोचा. "गूगल हिंदी इनपुट"च्या समोरचे सेटिंग्ज वाले चिन्ह टॅप करा.
पुढच्या मेन्यूतील पहिलेच ऑप्शन : इनपुट सेटिंग्ज आहे. त्यात प्रेडिक्शन, ऑटोकरेक्शन इ. ट्वीक करता येतात.
Image and video hosting by TinyPicImage and video hosting by TinyPic

वरील दोन्ही मायक्रोमॅक्स कॅनव्हासचे स्क्रीनकॅप आहेत. फोन रूटेड आहे. पण स्टॉक रॉमच आहे. आईसक्रीम सँडविच.

दुसरे म्हणजे एक - दोनदा गूगलची चूक सुधारली, की तिसर्‍यांदा तो आपल्याला हवे ते टाईप करतो, असा माझा अनुभव आहे. दुरुस्त केलेले स्टोअर करायचा ऑप्शन अँड्रॉईड स्टॉक कीबोर्ड सेटिंग्जमधून एनेबल करून घ्याव.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आम्ही त्यांचं अॅप वापरावं ही जाहिराती दाखवून पैशे कमावणाऱ्या अॅपवाल्यांची लै इच्छा. पण म्या जिंजरला पसंत केली.

https://play.google.com/store/apps/details?id=com.gingersoftware.android...
---
स्वाईप, फ्लेक्सी, गूगल कीबोर्ड वगैरे वापरुन कंटाळल्यावर हा कीबोर्ड सहज वापरुन पाहिला. ह्यांचा मराठी-देवनागरी कीबोर्डचा लेआऊट मला परफेक्ट वाटला. गेले सहाएक महिने वापरत आहे. दोन्ही अंगठ्यांनी टंकलेखन करण्यासाठी अत्युत्कृष्ट. लेआऊट थोडा इनस्क्रिप्ट टाईप आहे (फोनेटिक नाही). डाव्या बाजूला स्वर आणि स्वरचिन्हे. उजव्या बाजूला व्यंजने. त्यामुळे टंकलेखन अतिशय वेगाने होते. मराठी टू इंग्लिश बदलणेही सोपे आहे.

मिनिमिलस्टिक सुंदर थीम्स आहेत. (ज्यांना हव्या त्यांच्यासाठी बटबटीत रंगीतसंगीत थीम्सही आहेत.). स्टॉक अँड्रॉईड मटेरियल डिझाईन थीम्समुळे वेगळा कीबोर्ड वापरतोय असं वाटत नाही. महिनोन्महिने जाहिराती नाहीत. एखादी जाहिरात क्वचित दिसते पण ती नॉन इन्ट्रुजिव आहे. स्वाईप, गेसवर्ड्स, इमोजी वगैरे सपोर्ट आहे. तुम्ही टंकलेखन करता तसं अॅप शिकत जातं आणि ते वर्ड सजेस्ट करतं हे फीचर उपयुक्त वाटलं. स्वतःची डिक्शनरी बनवता येते. गूगल किंवा जिंजर अकाऊंटला कनेक्ट करुन ही सगळी माहिती वेगवेगळ्या डिवाईसवर एकसारखी ठेवता येते.

सुरुवातीला काही नोटिफिकेशन्स येत राहतात. (रेट करा, किंवा नव्या थीम्स घ्या वगैरे. पण त्यांची संख्या नंतर खूपच कमी होते. दोनतीन महिन्यातून एखादं नोटिफिकेशन येतं.)

---
जाहिराती संपूर्ण बंद करण्यासाठी $१.९९ देऊ शकता. फ्री आवृत्तीमध्ये जाहिराती जवळजवळ नाहीतच. वाटलं तर या कंपनीला सपोर्ट करण्यासाठी पैसे देऊ शकता. (कंपनीशी माझा काहीही संबंध नाही)

पूर्वी ज्यांना ट्रान्सलिटरेशन आवडत नसे त्यांनी परत एकदा गुगल इंडिक इनपुट की बोर्ड वापरून पहावा.

पूर्वी मराठीसाठी स्पेशल सोय नव्हती, ती सरसकट देवनागरी म्हणून यायची. त्यामुळे पहिल्यांदा प्रामुख्याने हिंदी शब्द प्रेडिक्ट होत. र्‍या सारख्या जोडाक्षरांची तर बोंबच होती. परंतु त्यांनी आता लिहा-> ळ -> असे मराठी पर्याय उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही इंग्रजी शब्द जरी टाइप केलात तरी त्यांचे योग्य मराठीकरण आता होते. उदा. office -> ऑफिस इत्यादी. र्‍या ऑ युक्त शब्दांचे ट्रान्सलिटरेशन व्यवस्थित होते.

indic project चा indic keyboard आहे तो मी वापरतो,छान आहे.आपण इंग्रजीतून टाईपायचे मराठी शब्द ,जसे ’ऐसी ' लिहिण्यासाठी aisi असे टायपायचे.४.४ एमबी आहे फक्त .डालो झाल्यावर language setting मध्ये जाऊन " मराठी अक्षरांतरण" सिलेक्ट करायचे .झाले काम.

™ ग्रेटथिंकर™

गुगल हिंदी इन्पुट वापरतोय अनेक महिने. चांगला अणुभव. पण अ‍ॅ साठी बर्‍याचदा बोम्ब होते. पण फोनेटिक असल्यामुळे ऐसी/मिपावर देवनागरी लिहिणे(गमभन वालं) आणि तिथे लिहिणे ऑल्मोस्ट सारखच पडतं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आयफोन (iOS 10.1.1) साठी एखादा चांगला मराठी किबोर्ड (इंग्रजीतून टाईपायचे मराठी शब्द) सुचवाल का? माझ्याकडे "marathi transliteration Keyboard" होता पण तो काही दिवस चलला आणि अता अपडेट साठी विचरतो आणि अपडेट बहुतेक फ्री नाहिये. तर गुगल इन्डिक सारखा एखादा फ्री किबोर्ड अ‍ॅप्पल साठी आहे का?