पंजा माझा

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते त
हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो
वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर
तोच हल्ली घाबरवतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो
दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा
असे म्हणून धमकावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो
गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून
हळुच इंधनाचे दर वाढवतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो
९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो
नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत
लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो
कधी शेतावर तर कधी शहरात
आत्महत्या करायला लावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा वस्त्र फेडतो
दिवस-रात्र-जात-धर्म निरपेक्ष
अब्रूहीन जगायला लावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा फितुर होतो
कधी स्वकीयांवर अत्याचार
तर कधी परक्यांना 'आधार' देतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा माझा इतिहास पुसतो
माझी तलवार म्यान करुन
इतरांची दाढी कुरवाळतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा धमकावतो
ताई माई अक्का म्हणत म्हणत
दर पाच वर्षांनी फसवतो

---------------------------------------------------

पण आता नाही घाबरणार
पंजाला नाही जुमानणार
निरुपयोगी अन् त्रासदायक अपेंडिक्ससारखे
त्याला कापून काढणार

---------------------------------------------------

field_vote: 
1.333335
Your rating: None Average: 1.3 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile
छान कविता आहे.
म्हणजे रोज जे ऐकतो ते कवितेत छान गुंफलं आहे.

-ममो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो

हे जरा अस्थानी वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अजीबात अस्थानी वाटले नाही. काही लोकांच्या या भावना असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो
नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत
लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाबद्दल हे असावं असा अंदाज.
अंनिसवाले , ज्यांनी बिल आणण्याची मागणी कैक वर्षे लावून धरली; ते दोन्ही काँग्रेसवर आरोप करतात
की त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात त्यांच्याच आमदारांनी मागील दहा-बारा वर्षे सतत विरोध करुन हे बिल अडवून धरलं.
तुमचं म्हणणं अंनिसच्या विपरित आहे. त्यांनी काँग्रेसवर उशीराचं खापर न फोडता, बिल आणल्याबद्दल
काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत असं तुमच्या म्हणण्यावरून दिसतं.
.

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो
कधी शेतावर तर कधी शहरात
आत्महत्या करायला लावतो

हे मी सिरियस्सली विचारतोय. शेतकरी संकटात आहेत वगैरे वगरिए सातत्याने ऐकतो.
त्यास काँग्रेसवाले शासन जबाबदार आहेत असेही ऐकतो. मग त्यांचा सर्वात मोठा वोट ब्यांक ग्रामीण भाग कसा?
हे शेतकरी काँग्रेसला उचलून आपटत का नाहित? सिरियसली विचारत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काँग्रेस?

ते तर त्यांच्या स्वतःच्या पंजाविषयी सांगतायत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपल्या हस्तकमलांनी हे आशयघन काव्य टंकून ऐसीच्या पदकमलांवर सादर केल्याबद्दल कवीचे आभार.
(पंजा नाही तर इतर एखाद्या अवयवाच्या साहाय्याने कमलांखालील पंक तेवढा जरा पुसा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फडतूसांचा कैवारी ... (खुनी) पंजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंजावर एवढा राग असेल तर मग "आपला हात जगन्नाथ" वाल्यांचं काय होणार? अजून विनाहाती कुणाला जमेलसं दिसत नाही म्हणून आपली एक शंका इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॆटमन, अहो डावा पंजा शिल्लक आहे ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह तसंय होय? मग ठीके. नैतर वाटलं की सर्वांचा ठाकुर करून स्वतः गब्बर होतील की काय Wink

अतिअवांतरः "क्षयझ करून स्वतः गब्बर होणे" या वाक्प्रचाराचा उगम शोले पिच्चर असावा अशी एक लै जुनी शंका आणि तितकाच जुना दावा आहे.

अतिअतिअवांतरः ठाकुरचे हात एका फायटीत दिसतात तो फोटो पाहिलात काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतेक्श हिडियोच पाह्यलाय.
ह्ये पघा -http://www.youtube.com/watch?v=V3nUvSFmj0o

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता आहे की शोलेचे चित्रपट परिक्षण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहो क्या बात! धन्स हो व्हिडोसाठी.

@मनः गब्बरबरोबरच्या फैनल फैटीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणत्या सीनमध्ये बे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काँग्रेसवर टिका करताना तोल कसा सुटतो त्याचे ही कविता आदर्श उदाहरण आहे. मी काही कोण्या पक्षाचा वाहिलेला समर्थक नाही ( हे का वारंवार सांगावे लागते माहित नाही. कदाचित मी काँग्रेसचा विरोधकच असेन. १० वर्षांचा प्रतिसत्ताधारणेचा प्रभाव म्हणून! ) पण तेलाच्या किमती, दहा लाख कोटींचा भ्रष्टाचार (बजेटच्या ७५%),अंधश्रद्धा बिल, इ हे निरर्थक मुद्दे आहेत. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चालायचंच.
निवडणुकांचा मौसम आहे.
त्यांनी आयडीनाम सुद्धा जुळणारं घेतलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.