"चिडकी चिऊताई -" (बालकविता)

खिडकीत दिसली चिऊताई
बाळाची बोलावण्याची घाई
"ये ये" म्हणाला हात दाखवून
"खाऊ घे" म्हणाला खिडकीतून -

चिऊताई होती फारच चिडकी
समोर दिसली बंद खिडकी
चोच आपटली खिडकीवर
टकटक केली काचेवर -

बाळाने उघडली हळूच खिडकी
पटकन शिरली चिऊताई चिडकी
बाळाने दाखवला लाडूचा खाऊ
चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -

बाळाने मुठीत लाडू लपवला
बाळ हळूच खुदकन हसला -
चिडकी चिऊताई खूप चिडली
खिडकीत "चिव चिव " ओरडली . .

.

3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

लहान मुलांसाठी लिहिणे हे

लहान मुलांसाठी लिहिणे हे जगातील अवघड टास्क असते.
एक जापनीज कार्टून आहे. dead fish folktales from Japan. torrent वर मिळेल बहुतेक. ते पहा अस मी सुचवतो.

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

आवडले, मला आणि माझ्या धाकट्या

आवडले, मला आणि माझ्या धाकट्या बहिणाला, दोघांना!

(No subject)

(स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उशीराबद्द्ल क्षमस्व !

ऋषिकेश, सटवीचे कपाळ, सुशेगाद - प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !