गांधीजींना महात्मा केलेच कोणी? - अरुंधती रॉय
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/arun…
'आज संपूर्ण देश गांधीवाद अथवा विचारांच्या आधारे पुढे नेला जात आहे. मात्र, गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो', अशी वादग्रस्त टीका लेखिका व कट्टर साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी सोमवारी येथे केली. त्यांच्या वक्तव्यावर गांधीवाद्यांनी कडाडून टीका केली असून, हे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. इंडिया पीस सेंटरतर्फे आयोजित 'निवडणुकीनंतर देशातील शांततेची स्थिती' या विषयावरील व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरात त्यांनी गांधीजींवरील हे विधान केले.
महात्मा गांधी यांच्यावर टीका करताना अरुंधती रॉय यांनी त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला. 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत नेमके काय केले, याबाबतच इतिहास पुन्हा समोर आला पाहिजे', असे त्या म्हणाल्या.
पृच्छा
सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाबाबत मी गांधीवादी नाही. मी पॉलिटिशिअन गांधींना मानतो.
पुणे करार हा विषय सामाजिक, आर्थिक कि राजकीय?
इतरही विषय घेता येतील. पण असो.
या कराराने
विशिष्ट समाजाला विधिमंडलात आरक्षण मिळणार होते ज्याचा त्या एकूण वर्गाच्या आर्थिक परिस्थितीवरच परिणाम झाला असता.
पुणे करार
पुणे करार पूर्णपणे राजकीय.
विशिष्ट समाजाला विधिमंडलात आरक्षण मिळणार होते ज्याचा त्या एकूण वर्गाच्या आर्थिक परिस्थितीवरच परिणाम झाला असता.
विधीमंडळात कशा प्रकारचे आरक्षण मिळणार होते? सध्याच्या "राखीव जागां"प्रमाणे नक्कीच नव्हते. ते विभक्त मतदारसंघ असणार होते.
आणि त्यामुळे त्या विशिष्ट वर्गातील सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर कसा काय परिणाम झाला असता?
त्यांना विभक्त मतदारसंघ
त्यांना विभक्त मतदारसंघ मिळणार होते. म्हणजे त्यांच्या मतदारसंघात तेच मतदान करणार (सेम विथ मुस्लिम्स). सध्या जागा राखीव असते पण मतदान सर्व करतात. म्हणजे एखाद्या मतदारसंघात दोन-तीन दलित उमेदवार उभे राहतात त्यातल्या उच्चवर्गीयांना धार्जिण्या असणार्या उमेदवाराला इतर सर्व मिळून निवडून देऊ शकतात. विभक्त मतदारसंघात दोन दलित उमेदवारांपैकी कोण निवडायचा ते फक्त दलित आणि दलितच ठरवणार.
(हे प्रत्यक्षात कसे होत होते त्याविषयी काही शंका आहेत).
नितिनजी, काही मतदारसंघात फक्त
नितिनजी, काही मतदारसंघात फक्त एका समाजाला मतदानाचा हक्क असल्याने -
१. त्या समाजाचे लोक विधिमंडळात जातील. आपल्या मनासारखे, आपल्या समाजाला आवश्यक ते, कायदे करतील. किमान प्रभाव पाडतील. आपल्या पसंदीचा पंतप्रधान वा मुख्यमंत्री बनवतील. इ इ . - राजकीय. त्या पुणे कराराचे स्वरुप पाहता असे म्हणावे लागेल - मुस्लिम लीगला पाकिस्तान मिळाला, पण दलितांना मात्र तसेच राहावे लागले. दलितांचे खच्चीकरण किती प्रमाणात झाले याची कल्पना यावी. दलितांना सर्व राज्यांत इतर प्रकारचे आरक्षण असले तरी मायावती मुख्यमंत्री बनेपर्यंत दलित लेड राजकारण शून्याच्या जवळ राहिले.
२. विधिमंडळातले कायदे या लोकांना मान्य असलेले असावे लागतील. ते आपल्या समाजासाठी वाईट असा कायदा होऊ देणार नाहीत. शिवाय ज्या वाईट प्रथा आहेत त्या घालवणारे कायदे करतील. - सामाजिक. मायावतीचे सरकार इतर सरकारांपेक्षा फार वेगळे होते. भाजप नि एसपी पेक्षा कैक पट चांगले होते. http://drambedkarbooks.wordpress.com/2012/01/20/achievements-of-bahujan… इथे ग्लिम्प्स करा. दलित कल्याणावर नि अस्मिता जागी करण्यावर या सरकारचा प्रचंड भर होता. Gandhiji killed Dalit led politics in India and hence their social upheaval, though unintentionally.
३. हे लोक विधिमंडळाबाहेर म्हणजे शिक्षण, सरकारी नोकर्या, खासगी उद्योग यामधे आरक्षण करतील वा आपले हित पाहतील. जसे - आदिवास्यांनी ८०% प्रमाणात हो म्हटल्याशिवाय जमिनीचे अधिग्रहण होणार नाही. इथे त्यांना जबरदस्त बार्गेनिंग पावर येते.
Not only that an individual's (here, Gandhiji's) political views are based on social and economic views, decisions based on such political views do affect the socio-economic status of the stakeholders.
स्वतंत्र दलित मतदारसंघ
मुद्दा क्र २ विषयी सहमत आहे.
मुद्दा क्र १ मध्ये म्हटल्याप्रमाणे जसे विभक्त मतदारसंघांची परिणती पाकिस्तान निर्माण होण्यात झाली तसे दलितस्थान निर्माण होऊ शकले असते. पण तरीही क्र ३ मध्ये म्हटल्याप्रमाणे फायदे स्वतंत्र दलितस्थान किंवा स्वतंत्र मतदारसंघ केल्याने झाले असतेच असे नाही.
शेवटी दलितस्थान (किंवा विभक्त मतदारसंघ असलेल्या दलितांना) सवर्णांशी व्यवहार करावेच लागणार आहेत.
दलितांचे दुखणे सवर्णांनी त्यांना मनापासून जवळ केले नाही हे आहे. कायदेशीर दृष्ट्या सर्व काही मिळाले पण प्रत्यक्षात जी समानता हवी होती ती काही मिळाली नाही. आणि हे फक्त रोटी बेटी व्यवहारातले नाही. (त्यात काही विशेष नाही. कारण सवर्णांतही खुलेपणाने हे व्यवहार होतच नाहीत). पण इतरत्र सवर्णांनी त्यांना जवळ केले नाही. कायद्याने अस्पृश्यता पाळता येत नव्हती तरी व्यवहारात व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारे ती पाळणे सवर्णांना शक्य झाले.
...
चांगला प्रश्न.
बाकी, गांधींना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली, याबद्दल मलाही कल्पना नाही. ('दिलीच कोणी' हा फार पुढचा प्रश्न.)
तसेच, श्रीमती अरुंधती रॉय यांना 'भारताच्या सॅरा पेलिन' ही पदवी (माझ्याअगोदर कोणी दिली असल्यास) कोणी दिली, याबद्दलही कल्पना नाही.
धन्यवाद.
Gandhi as Mahatma
या विधानात बातमी म्हणून छापण्यासारखे काय आहे कळले नाही. डाव्या-उजव्या सर्वांनी गांधींची याच मुद्द्यांवरून याहून कडक टीका केली आहे. रॉय नवीन काहीच म्हणत नाहीयेत.
गांधी "महात्मा" कसे झाले यावर शाहिद अमीन यांचा हा संशोधनपर लेख सर्वांनी वाचावा असा आहे.
...
अरुंधती रॉय यांनी गांधींवर ताशेरे मारल्यानंतर, एरवी गांधींच्या विचारधारेच्या विरोधात दिसणार्या मंडळींना गांधीरक्षणाला धावून जाताना पाहून चांगलीच करमणूक झाली.
या विषयावरील आमची मते येथे पाहावयास मिळावीत. साधारणतः दुसर्या उद्धृतानंतरचा ('ज्यांना उलटे काही एवढ्या तीव्रतेने सांगावेसे वाटते...') भाग पहावा.
सांगण्याचा मुद्दा, गांधींना रक्षणाची आवश्यकता (अथवा अपेक्षाही) नसावी. तदुपरि, अरुंधतीबैंच्या गांधींविषयी वक्तव्याचा प्रतिवाद करावा किंवा कसे, आणि केल्यास तो किंकारणेन करावा, हा ज्याचातिचा प्रश्न अत एव स्वातंत्र्य आहे.
अरुंधती रॉय सारख्या
अरुंधती रॉय सारख्या अतिविद्वान व्यक्तींना जास्त महत्व देऊ नये. आकाशाकडे पाहून थुंकण्या शिवाय त्यांना काहीही अन्य चांगले कार्य करता येत नाही.
महात्मा गांधीच्या आयुष्यात केलेल्या कार्यांच्या ००१% टक्का ही काही चांगले कार्य करू शकलो तर स्वत:ला धन्य समजेल.
मा. मोदी बाबत अरुंधती रॉयला भाषण द्यायला बोलवा- एवढे जहर त्यांच्या नरड्यातून निघेल, कल्पना ही करता येणार नाही.
आश्चर्य
डेटलाइनीवरून (आणि बातमीतील "आज येथे केले" या शब्दांवरून) प्रस्तुत वक्तव्य त्यांनी नागपुरात केले, असे सूचित होते.
सामान्यतः त्या आपली चित्रविचित्र विधाने कराची प्रेस क्लबसारख्या न्यूट्रल, थर्डपार्टी स्थानांवरून करतात. (ते ठीकच आहे; अनेक चाहत्यांना अटेंड करणे सोयिस्कर पडत असावे.)
पण नागपुरासारख्या ठिकाणी त्यांना आड्यन्स मिळाला? आश्चर्य आहे.
मार्मिक, वार्मिक,
मार्मिक, वार्मिक, वार्ममर्मिक, मार्मवर्मिक*, इ इ
*वर्माच्या मर्माला छेदणारे, इ. ह्या डाव्यांना मेंदूतला केम्लिनचा भाग एक्दम कडेकोट बंदोबस्तात असतो. टिका सगळी उजव्या विचारसरणीवर, म्हणून उजव्या हुकुमशहांवर! समदे डावे हुकुमशा सेफ - लेनिन, स्टेलिन, माओ, इ इ.
उजवे तेच वाइट निघू शकतात हा खासा डावा शोध कसा काय जगन्मान्य झालाय देव जाणो.
...
अरुंधती रॉयसारखे डावे विरोधी विचारही समजून घेतात म्हणणं म्हणजे अल कायदा फावल्या वेळेत अहिंसा शिबिरे चालवते म्हणण्यापैकी आहे.
म्हणूनच तर त्याला 'ष्टीरियोटैप' म्हणायचे. प्रत्येक नग हा ष्टीरियोटैपप्रमाणे असतोच, असे नाही, पण तशी पॉप्युलर समजूत असते.
ह्याविंग सेड द्याट, अरुंधती रॉय ही 'डावी' आहे किंवा कसे, कल्पना नाही. मूर्ख असावी, असे मात्र वाटते. (अर्थात, हे वैयक्तिक मत झाले; सबब, पुरावा मागू नये. टेक इट ऑर लीव्ह इट.) तोंडाळदेखील असू शकेल कदाचित. आता, 'मूर्ख + तोंडाळ' असा डाव्यांबद्दलचा ष्टीरियोटैप असल्यास कल्पना नाही१, पण मूर्ख अॅण्ड तोंडाळ डू नॉट अ लिबरल/लेफ्टिष्ट मेक. मग भले ही ती स्वतःस 'डावी' समजत (वा म्हणवत) असो, किंवा अन्य काहीही समजत (वा म्हणवत) असो. हे म्हणजे, नाझी पक्षाच्या अधिकृत नावात 'सोशालिस्ट' असा शब्द होता (भाषांतरात: राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष), सबब तो समाजवादी, 'लाल सलाम'छाप कट्टर डावा कामगारपक्ष होता, असे म्हणण्यासारखे आहे. किंवा, उत्तर कोरिया (पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरिया) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक) हे देश नावातून स्वतःस 'डेमोक्रॅटिक' म्हणवतात/म्हणवत असत, याचा अर्थ तेथे लोकशाही नांदते / नांदत असे, असे थोडेच आहे?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ प्रतिवादार्थ, सॅरा पेलिन किंवा अॅन कोल्टर यांसारखी 'आमच्या'कडील कट्टर उजव्या समजल्या जाणार्या दिग्गज 'महाभगिनीं'ची नावे लक्षात येतात. झालेच तर, "'लेजिटिमेट रेप'मध्ये स्त्रीस गर्भ राहण्याची सुतराम् शक्यता नसते" म्हणणारा जो कोणी महाभाग होता तो (त्याचे नाव या क्षणी विसरलो). अजूनही बरीच उदाहरणे देता येतील, परंतु तूर्तास एवढीच पुरेत.
म्हणूनच तर त्याला
म्हणूनच तर त्याला 'ष्टीरियोटैप' म्हणायचे. प्रत्येक नग हा ष्टीरियोटैपप्रमाणे असतोच, असे नाही, पण तशी पॉप्युलर समजूत असते.
Indeed.
सदर स्टीरीओटाईप (- डावे लोक विरोधकांचे विचार समजून घेतात*) ठाण्यातल्या कडव्या संघिष्ठांकडूनच ऐकलेला आहे. कोणास आवडो अगर नावडो, ठाणे हे शहर याच पृथ्वी नामक ग्रहावर (आणि जिथे 'अच्छे दिन' म्हणे येऊ घातले आहेत त्या भारतात) आहे. या विचाराला स्टीरीओटाईप असं लेबल मी लावलं.
*समजून घेतात आणि मान्य करतात या दोहोंमध्ये बराच फरक आहे. त्या फरकात अजिबात साटल्य नसल्यामुळे ते आधी लिहीलं नव्हतं.
जातीयवाद
संघ उघड जातीयवादी नाही, ह्याबद्दल ऐसीवरच काहीतरी उपचर्चा झाली होती.
"तुझी जात कोणती" हे तिथे कुणीच विचारत नाही. उलट संघाचा जातीभेदास कठोर विरोध आहे ऑन पेपर तरी.
आता त्यांचे संस्कृतला महत्व देणे, वगैरे मधून ब्राम्हणी संस्कृती डोकावत असेल; पण "जातीवाद भक्कम करायचा "
हे त्यांचे उद्दीष्ट दिसत नाही. म्हणता आलेच तर त्यांना धर्मांध म्हणता यावे.
(खरे तर तेही म्हणता येते की नाही हे मला ठाउक नाही; पण बरीच पब्लिक म्हणते.)
रा. स्व. संघ हे सरकारी
रा. स्व. संघ हे सरकारी आस्थापन नाही तेव्हा त्यांच्याकडून भेदभावविरहित व सर्वधर्मसमभावयुक्त वर्तणूकीची अपेक्षा करणे हे थोडेसे समस्याजनक आहे.
सगळे समान आहेत व प्रत्येकाने सगळ्यांना समान वागणूक दिली पायजेल अशा गैरवाजवी गृहितकातून ही अपेक्षा निर्माण होते.
ही फारच रॅशनल, उच्च विचारांची
ही फारच रॅशनल, उच्च विचारांची अपेक्षा झाली. शेजारच्या भटोबाला* पाहून भटबहुल काँग्रेसचे भटबहुल केंद्रीय मंत्रीमंडळ* कसे जातीयवादी आहे ते सांगण्याचा पोरकटपणा करू नये ही अपेक्षा रास्त म्हणता येईल.
* कोणत्याही एका जातीविशेषाचे नाम व संस्थाविशेषाचे नाम घालता येईल.
http://timesofindia.indiatimes.com/india/Im-a-Brahmin-Congresss-general…
सोबत या बातमीचाही आनंद घेता येईल.
रा. स्व. संघ हे सरकारी
रा. स्व. संघ हे सरकारी आस्थापन नाही तेव्हा त्यांच्याकडून भेदभावविरहित व सर्वधर्मसमभावयुक्त वर्तणूकीची अपेक्षा करणे हे थोडेसे समस्याजनक आहे.
भेदभावविरहित व सर्वधर्मसमभावयुक्त वर्तणूकीची जबाबदारी सरकारवर तरी का असावी? सरकारला त्यातुन मुक्त करावे अशी शिफारस मी करीत आहे.
भेदभावविरहित व
भेदभावविरहित व सर्वधर्मसमभावयुक्त वर्तणूकीची जबाबदारी सरकारवर तरी का असावी?
कारण प्रत्येक व्यक्ती सरकारमधे समान भागीदार असते. एक व्यक्ती एक व्होट.
प्रत्येकास समान स्टेक राहील असे संविधानानुसार सरकारने आधीच मान्य केलेले आहे. Govt. draws its legitimacy partly because of that. याचा अर्थ हा की प्रत्येक व्यक्ती समान स्टेकहोल्डर असते व म्हणून प्रत्येक व्यक्तीस समान वागणूक देणे ही सरकारची जबाबदारी असते.
---
सरकारला त्यातुन मुक्त करावे अशी शिफारस मी करीत आहे.
हे तुम्ही कदाचित उपरोधाने म्हंटले असेल. पण सरकारला असे मुक्त करण्यासाठी कदाचित लोकशाही बरखास्त करून दुसरी व्यवस्था आणावी लागेल.
?
कारण प्रत्येक व्यक्ती सरकारमधे समान भागीदार असते. एक व्यक्ती एक व्होट.
??? ती 'कॉर्पोरेशन्स आर पीपल', 'मनी इज़ स्पीच' वगैरे उदात्त तत्त्वे कोणत्या भावाने गेली मग?
पण सरकारला असे मुक्त करण्यासाठी कदाचित लोकशाही बरखास्त करून दुसरी व्यवस्था आणावी लागेल.
त्यापेक्षा, उदाहरणादाखल, सुप्रीम कोर्टावरचे पुरेसे जज्ज विकत घेणे स्वस्तात पडणार नाही काय? झालेच तर 'लोकप्रतिनिधी'?
...
सुप्रीम कोर्टाच्या "वरचे" म्हणजे काय असावे ब्वॉ?
सुप्रीम कोर्टाच्या "वरचे" म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मालक. तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला एवढी शिंपल गोष्ट समजू नये?
(पण मग त्या हिशेबाने जज्जलोक हे सुप्रीम कोर्टाच्या "वर" असू शकत नाहीत. त्यांचे "धनी" निराळे. आमचे चुक्याच.)
जज्ज हा काय प्रकार आहे? तीन तीन ज?
दोन शक्यता.
१. आमची 'ज'ची कळ अडकली आहे.
२. आम्हाला ज्या 'जे जे जॉन जानी अँड जनार्दन' जॉर्पोरेशनने... आय मीन, कॉर्पोरेशनने... विकत घेतलेले आहे, ते आम्हाला आमची 'ज' कळ जास्तीत जास्त वापरण्यासाठी पैसे देते.
(अहो जिथे आख्खा देश विकत घेऊ शकतात, तिथे एक माणूस विकत घेता येणार नाही? तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला...)
तुमचं संघ संघ टुमणं वाचून वात आलाय----आता हे वाचा
जयपूरच्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अतिरेक्यांना प्रशिक्षण देतात असा आरोप केला आणि एक घनघोर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी त्याचा प्रतिवाद केला. पण शिंदे म्हणाले त्यात, खरेच काय खोटे आहे? आक्षेप घेण्यासारखे काय आहे त्यात? संघात अतिरेकी तयार केले जातात हे अगदी खरे आहे. गेली ८७ वर्षे लाखो अतिरेकी संघाने तयार केले आहेत. आज संघाच्या ५० हजार शाखा देशभरात आहेत. या शाखा चालवणारे लाखाहून अधिक मुख्य शिक्षक, कार्यवाह; देशभरातील हजारो प्रचारक अतिरेकी नाहीत तर काय आहेत? चांगले शिकले सवरलेले तरुण स्वत:चं घरदार सोडून आयुष्यभर संघ सांगेल ते काम, संघ म्हणेल तिथे करत असतात. हा अतिरेक नव्हे तर काय? पगार नाही, बँकेत खातं नाही, घरदार नाही, बायको- पोरं नाहीत, स्वत:चं असं काही नाही. असे हे प्रचारक. दरवर्षी असे प्रचारक घर सोडून संघाच्या कामासाठी बाहेर पडतात. हा सारा अतिरेक नाही तर काय? लाखो लोक आपापले उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या सांभाळून; घरदार, संसार सांभाळून अक्षरश: रोज संघाचे काम करतात. कोणता कार्यकर्ता संघाच्या कामाला किती वेळ देतो, याची चर्चा संघाच्या बैठकात होते. हे सारे आपापला वेळ पैसा खर्च करून काम करतात. त्यापायी कधी घरच्यांची, कधी बाहेरच्यांची नाराजीही ओढवून घेतात. हा सारा अतिरेक नाही तर काय?
बरे संघ काय काम करायला सांगतो? ओरिसा, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल कुठेही पूर आला, भूकंप आला, युनियन कार्बाइडसारखी दुर्घटना घडली, अन्य काही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती आली तर धावून जा, शक्य ती सारी मदत करा. जिथे, जिथे जो काही अभाव असेल तो दूर करा. शाळा चालवा, दवाखाने चालवा, अन्य सेवेची कामे करा. समाजात चांगले उपक्रम करा. युद्ध वगैरे सारख्या प्रसंगी तू-तू-मी-मी न करता खांद्याला खांदा लावून काम करा. पाकिस्तान आणि चीन युद्धाच्या वेळीही हेच सांगितले संघाने म्हणूनच तर पंडित नेहरू यांनी प्रजासत्ताक दिनाला संघाला परेडसाठी बोलावले आणि लालबहादूर शास्त्रींनी उच्चस्तरीय बैठकीसाठी गुरुजींना बोलावून घेतले होते.
आणखीन काय काय करायला सांगतो संघ? संघ म्हणतो या देशाला आपली माता माना. सगळ्या लोकांना आपले बंधू माना. अभाव असतील ते दूर करा. अभावच राहू नयेत यासाठी प्रयत्न करा. एकोप्याने राहा. माना झुकवून जगू नका आणि माना झुकवून जगायला लावू नका. मुसलमानही याच देशाचे आहेत हे त्यांना समजावून सांगा. म्हणूनच मग राष्ट्रवादी मुस्लिम मंच स्थापन करा. ख्रिश्चन धर्मगुरूंशी संघाच्या अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणा. कोणी पंजाब वगैरेसारखा वेडेपणा केला तरीही तुम्ही वेडेपणा करू नका. काही माथेफिरू पंजाबात वेडेपणा करीत होते तेव्हा म्हणूनच संघाने सुदर्शनजींना विशेष प्रयत्न करण्यासाठी तिथे पाठवले होते. केशधारी आणि सहजधारी असे वातावरण तापले असतानाच सुदर्शनजी तिथे घरोघरी फिरून एकतेचा संदेश देत होते. संघाचा हा संदेश न आवडून वेड्या लोकांनी एक दिवस मोगा येथील संघशाखेवर चक्क गोळीबार केला होता आणि भगव्या ध्वजापुढेच २० संघ स्वयंसेवक रक्ताच्या थारोळ्यात धराशायी झाले होते. संघाने मात्र त्यांच्यासाठी कोणतीही पदकांची वगैरे मागणी केली नव्हती. आपण आपल्या आईची सेवा करतो ती काय पुरस्कारासाठी करतो का? असा संघाचा सवाल असतो. म्हणूनच सहजपणे काश्मीरच्या एकतेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी आपल्या जीवाची बाजी लावतात. भारतीय जनसंघाची वाढती शक्ती सहन न होऊन कोणाचे तरी माथे ठणकते आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारखा द्रष्टा नेता बेवारस मृतावस्थेत सापडतो. तरीही संघ शांतच असतो. देशात आणीबाणी लावली जाते आणि हजारो स्वयंसेवक विनाकारण १८ महिने तुरुंगात डांबले जातात. पण संघ सांगतो आपलीच जीभ चावली गेली तर आपण दात पडून टाकतो का? मग जाऊ द्या, झाले गेले विसरून जा. सगळेच आपले आहेत. प्रात:स्मरणीय महात्मा गांधीजींच्या हत्येचा आरोप करून हजारो स्वयंसेवकांना आयुष्यातून उठवले जाते, पण संघ सांगतो- आपले काम कोणाच्याही विरोधात नाही. सारा समाज आपलाच आहे.
हे सारे अतिरेकी नाही तर काय? काहीही न मागता, कशाचीही अपेक्षा न ठेवता, स्वत:चाच वेळ-पैसा खर्च करून, कधी काही करायचे असते का? कोणी आपल्या विरोधात काहीही केले तरी त्याबद्दल कटुता बाळगायची नाही, असे कधी असते का? देशभरात केवळ ८०० लोकांना खासदारकीची संधी असताना लाखो लोकांना काम करायला लावायचे म्हणजे काय? काही द्यायचे नाही तर काम कशाला सांगायचे नाही का? सगळा अतिरेकच नाही तर काय.
कोण म्हणतो अतिरेक फक्त वाईट, दुष्ट, समाजविघातक, राष्ट्रविघातक गोष्टींचाच असतो? संघाने ८७ वर्षात साऱ्या जगाला हे दाखवून दिले आहे की- निस्वार्थता, निरपेक्षता, समाजाच्या आणि देशाच्या कल्याणाची कळकळ यांचाही अतिरेक असतो. आणि संघाने असा अतिरेक केला आहे. आता गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय अन्य कोणाला हा अतिरेक लक्षात आला नाही त्याला ते तरी काय करणार? होय ना हो शिंदेजी?
- श्रीपाद कोठे
नागपूर
३१ जानेवारी, २०१३
संजय जोशी कोण आहेत याची छोटीशी झलक
संजय जोशी कोण आहेत याची छोटीशी झलक खालील लिंकांवर पाहायला मिळेल.
'डीएनए'चा रिपोर्ट : Who’s the girl in the Joshi CD?
'रेडिफ'चा रेपोर्ट : Sex and the CD: Sanjay Joshi's rise and fall
संजय जोशी कोण ते वाचले.
संजय जोशी कोण ते वाचले. महात्मा गांधी कोण ते तुम्हाला माहित आहे का?
http://en.wikipedia.org/wiki/Mahatma_Gandhi#Bramhacharya.2C_celibacy एक झलक.
http://www.independent.co.uk/arts-entertainment/books/features/thrill-o… अजून एक झलक. हे लोक थोडे निर्भिडपणे लिहितात.
असतात हो विकृत लोक सगळीकडे. आता त्यांच्या पर्सनल गोष्टींबद्दल किती बोलणार? आणि तो मुद्दा आहे का? संघटनाचा काय संबंध? सगळी काँग्रेस अशी आहे का?
आमचेच हे हो सगळे. सगळे या देशाचेच.
मुसलमानही याच देशाचे आहेत हे त्यांना समजावून सांगा. म्हणूनच मग राष्ट्रवादी मुस्लिम मंच स्थापन करा.
मुसलमानही याच देशाचे आहेत. पण ते आमच्या संघटनेचे नाही बरं. त्यांना त्यांची वेगळी संघटना काढून द्या. आदिवासी आमचे नाहीत. एवढंच काय, बायकापण आमच्या नाहीत. (नाही म्हणजे रांधायला, घरकाम करायला, प्रचारकांना प्रेमाने घरी गिळायला बोलावल्यावर त्यासाठी जी मेहेनत करावी लागते त्यासाठी, रात्री बिछाना गरम करायला बायका हव्यातच.) पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या चुली काढून द्या. पण हे सगळे याच देशाचे बरं. हे सगळे आमचेच. आम्ही त्यांच्यासोबत जेवत नाही, त्यांना आपल्या बरोबरीचे समजत नाही, पण आमचेच हे हो सगळे. सगळे या देशाचेच.
असो. मेघनाचा प्रतिसाद मनाला भिडला. पण एवढा सोपा हाफव्हॉली सोडून देण्याइतपत निग्रह टिकला नाही. त्याबद्दल क्षमस्व.
मुसलमानही याच देशाचे आहेत. पण
मुसलमानही याच देशाचे आहेत. पण ते आमच्या संघटनेचे नाही बरं.
आरोप खरा आहे.
आदिवासी आमचे नाहीत.
हा आरोप खोटा आहे.
एवढंच काय, बायकापण आमच्या नाहीत. (नाही म्हणजे रांधायला, घरकाम करायला, प्रचारकांना प्रेमाने घरी गिळायला बोलावल्यावर त्यासाठी जी मेहेनत करावी लागते त्यासाठी, रात्री बिछाना गरम करायला बायका हव्यातच.)
हे तद्दन राळ उठवणे झाले. म्हणजे खवचट बायको चांगल्या नवर्याचे असे वर्णन आरामात करू शकते.
पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या चुली काढून द्या.
हा आरोपही खोटा आहे.
आम्ही त्यांच्यासोबत जेवत नाही, त्यांना आपल्या बरोबरीचे समजत नाही, पण आमचेच हे हो सगळे. सगळे या देशाचेच.
सगळा उपरोध अर्थहिन, तथ्यहिन, भंकस.
आमचेच. आम्ही त्यांच्यासोबत
आमचेच. आम्ही त्यांच्यासोबत जेवत नाही, त्यांना आपल्या बरोबरीचे समजत नाही, पण आमचेच हे हो सगळे. सगळे या देशाचेच>>.
संघ कार्यकर्ते शेजारी शेजारी जेवायला बस्ताना दलित, ब्राह्मण असे बसलेले मी स्वतः पाहीलेत. अर्थात तिथे कुणीच कुणाला एकमेकांची जात विचारत नाहीत हे खरे असले तरी त्या दोघांना मी ओळखत असल्याने मला माहित आहे. सो उगाच बरळू नका कृपया.
आमचेच. आम्ही त्यांच्यासोबत
आमचेच. आम्ही त्यांच्यासोबत जेवत नाही, त्यांना आपल्या बरोबरीचे समजत नाही, पण आमचेच हे हो सगळे. सगळे या देशाचेच>>.
संघ कार्यकर्ते शेजारी शेजारी जेवायला बस्ताना दलित, ब्राह्मण असे बसलेले मी स्वतः पाहीलेत. अर्थात तिथे कुणीच कुणाला एकमेकांची जात विचारत नाहीत हे खरे असले तरी त्या दोघांना मी ओळखत असल्याने मला माहित आहे. सो उगाच बरळू नका कृपया.
शक्य
Organisations which are inspired by the Rashtriya Swayamsevak Sangh's ideology refer themselves as the members of the Sangh Parivar.[59] In most of the cases, pracharaks (full-time volunteers of the RSS) were deputed to start and manage these organisations. The organisations within the Sangh include the Vishwa Hindu Parishad, Vanbandhu Parishad, Rashtriya Sevika Samiti, Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Vanavasi Kalyan Ashram, Bharatiya Mazdoor Sangh, Vidya Bharati, Seva Bharati and many others spread in all parts of society
मी गांधीजींना महात्मा केलेले नाही
हे पाहा, मी गांधीजींना महात्मा केलेले नाही. आधीच खुलासा केलेला बरा. उद्या उगीच कोणी माझे नाव घेतले तर नसती पंचाईत नको.
हे काम ऐशीवरच्याच कोणाचे तरी असणार, या बाबत मात्र माझ्या मनात कोणतीही शंका नाही. माझ्यापेक्षा जास्त काळ ऐशीवर घालविणार्यांना संभाव्य संश्यिताचे नाव नक्की सांगता येईल. खरा आरोपी शोधण्यासाठी सच्चा ऐशीकरांनी पुढे यावे, असे माझे आवाहन आहे.
वरचा एक प्रतिसाद पुन्हा
संजय जोशी कोण ते वाचले. महात्मा गांधी कोण ते तुम्हाला माहित आहे का?
http://en.wikipedia.org/wiki/Mahatma_Gandhi#Bramhacharya.2C_celibacy एक झलक.
http://www.independent.co.uk/arts-entertainment/books/features/thrill-of... अजून एक झलक. हे लोक थोडे निर्भिडपणे लिहितात.
असतात हो विकृत लोक सगळीकडे. आता त्यांच्या पर्सनल गोष्टींबद्दल किती बोलणार? आणि तो मुद्दा आहे का? संघटनाचा काय संबंध? सगळी काँग्रेस अशी आहे का?
---------------------------------------
यावर कोणीही प्रतिक्रिया का दिली नसावी? आज कोणालाही वैवाहिक, लैंगिक, विवाह संस्थांच्या बद्दलच्या मतांबद्दल टिका करताना लोक गांधीजींचा अपवाद का करतात. क्षणभर राजकीय, सामाजिक, इ इ अर्थांनी ते महान मानले तरी लैंगिक विचार व वर्तन या एका मुद्द्यावरून त्यांचे महात्मापण प्रश्नार्ह बनते. गांधीजी आज असते तर माध्यमांनी त्यांचा महात्मा ऐवजी आसाराम बनवला असता असे मला वाटते.
महात्मा गांधी यांनी हे प्रयोग जाहीरपणे केले...
यावर कोणीही प्रतिक्रिया का दिली नसावी? आज कोणालाही वैवाहिक, लैंगिक, विवाह संस्थांच्या बद्दलच्या मतांबद्दल टिका करताना लोक गांधीजींचा अपवाद का करतात. क्षणभर राजकीय, सामाजिक, इ इ अर्थांनी ते महान मानले तरी लैंगिक विचार व वर्तन या एका मुद्द्यावरून त्यांचे महात्मापण प्रश्नार्ह बनते.
महात्मा गांधी यांच्या विषयी तुम्ही दिलेली लिन्क वाचली. खरे म्हणजे तुम्ही ही लिन्क द्यायची गरज नव्हती. महात्मा गांधी यांनी स्वत:च्या मनाची शुचिता तपासण्यासाठी केलेले ते प्रयोग आहेत. त्यांनी ते गुपचूप केले नाहीत. जाहीरपणे केले. त्यासाठी त्यांनी आपल्याच लोकांचा रोषही ओढवून घेतला. पण हा महात्मा डगमगला नाही.
तुम्हाला सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगायला पाहिजे की, संघोट्यांनाही आपल्या प्रात:स्मरणीय यादीत या महात्म्याला स्थान द्यावे लागले आहे. मोदींंनी आपल्या प्रचाराची सुरूवात याच महात्म्याला वंदन करून केली. तसेच विजयाच्या भाषणातही मोदींनी या महात्म्याचा उल्लेख केला. मोदींनी हेडगेवार किंवा गोळवलकर गुरूजी यांना हे स्थान दिले नाही. कारण त्यांना माहिती होते की, हेडगेवार किंवा गोळवलकर यची नावे घेतली तर आपल्याला मते मिळणार नाहीत. महात्मा गांधींचे नाव घेतले तरच मते मिळतील. कारण लोकांच्या ह्र्दयात आजही त्यांना स्थान आहे.
माध्यमांनी सावरकरांना आसाराम बनवले असते की आणखी कोण?
गांधीजी आज असते तर माध्यमांनी त्यांचा महात्मा ऐवजी आसाराम बनवला असता असे मला वाटते.
सावरकरांच्या होमोसेक्शुअॅलिटीशी संबंधित खालील लिन्क वाचा. आणि सांगा आज सावरकर हयात असते, तर माध्यमांनी त्यांचा आसाराम बनवला असता की आणखी कोण?
http://en.wikipedia.org/wiki/Talk%3AVinayak_Damodar_Savarkar#Savarkar.2…
दोन गलतियाँ एक सच्चाई नही बना
दोन गलतियाँ एक सच्चाई नही बना सकती. मला सावरकरांवरचे सगळे आरोप मान्य आहेत. आपण फक्त गांधीजींवर बोलू. तुमच्या बदनशीबाने मी फक्त एका वर्तनासाठी एक अख्खा माणूस चांगला कि वाईट असले काही म्हणत. दुसरे इश्शू मधे आणत नाही. नि मी संघ वा सावरकर प्रेमी नाही. त्यांना वाटेल तेवढ्या शिव्या द्या. माझा संबंध नाही.
मला फक्त गांधीजींचे एक विशिष्ट वर्तन चक्रावून टाकते. जे खरे गांधीवादी ते या विषयावर काय भूमिका घेतात यासाठी नेहमी कुतुहल राहिले आहे. हे केले नसते तर बरे झाले असते असे वाटते का? कि केवळ गांधीजी आहेत म्हणून कोवळ्या वयाच्या भाच्च्या पुतण्यांशेजारी नागडे झोपणे याचे समर्थन कराल. त्या प्रयोगाला अर्थ आहे असे मनःपूर्वक वाटते का?
तेजासाहेब, वाक्यरचना पून्हा
तेजासाहेब,
वाक्यरचना पून्हा करतो - सावरकरांच्या अनैतिकतेचे (समलैंगिकता वेगळी, अनैतिकता वेगळी), त्यांनी जे काही अनैतिक केले आहे असे तुम्ही जे म्हणत आहात ते मी तत्क्षणी मान्य करतो. हे ही मान्य करतो कि त्यांनी तसे अनैतिक वर्तन कदापिही करायला हवे नको होते.
Now let's turn to Gandhiji. मी गांधींनी शिव्या नाही दिल्या. पण मला त्यांचे वर्तन भयंकर खटकते. त्यांनी स्वतः तर या लैंगिक प्रयोगांचे खरेपण मान्य केले आहे. तुम्हांस देखिल खरेपणाच्या प्रांजळपणाबद्दल कौतुक आहे. माझे म्हणणे इतकेच आहे कि गांधीजी "असे" होते असे सांगीतले तर लोक साले विश्वासच ठेवत नाही. मग या सगळ्या न्यूजक्लिपा, इ इ दाखवल्यावर हे षडयंत्र आहे म्हणतात. मग त्यांचेशी बोलण्यात अर्थच नाही. म्हणजे त्यांना हे खरेच आहे असे देवाने सांगीतले तर नि:संकपणे गांधीजींना विकृतच मानतील.
मग म्हणून मी तुम्हाला वरचे प्रश्न विचारले. कारण ते सत्य आहे हे तुम्हाला मान्य आहे. शिवाय तुमचे त्या वर्तनाला १००% सर्मथन आहे.
आता मधे संघाडे, भाजपाडे, सावरकराडे, इ इ मधे आणू नका. मला त्यांच्या असल्याच (अनैतिक म्हणून कि नको?) वर्तनाचे समर्थन करायचे नाही. विषयांतर नको.
मुद्दा नक्की काय आहे?
>> पण मला त्यांचे वर्तन भयंकर खटकते. त्यांनी स्वतः तर या लैंगिक प्रयोगांचे खरेपण मान्य केले आहे.
भारतीयांना लैंगिक संबंधांबद्दल आकर्षण असतं पण अपराधी भावनाही असते. गांधींनाही ती होती. लैंगिक भावनांचं उच्चाटन केलं तर आपण स्वच्छ होऊ वगैरे विचारांतून त्यांनी हे प्रयोग केले. ते लपूनछपून केलं नव्हतं. त्यांनी कधीही ते नाकारलं नाही. आता तुमचा नक्की मुद्दा काय? तुम्हाला त्यांचं हे वर्तन खटकतं एवढाच का?
मूल्यव्यवस्था आणि नीतीमत्ता
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."
पुस्तकाचं नाव - Masters and Johnson on sex and human loving (पृष्ठ क्र.१०)
लेखक - William H. Masters, Virginia E. Johnson आणि Robert C. Kolodny
प्रकाशक - Little, Brown and Company
(तिरपा ठसा लेखकांचाच)
असं झाल्यास दोष माझाच.
असं झाल्यास दोष माझाच. अतिशय उदारमतवादी आणि लोकांच्या बेडरूममध्ये डोकावून मूल्यमापन करू नये असं सुचवणाऱ्या परिच्छेदातलं महत्त्वाचं वाक्य संदर्भाशिवाय टंकणं ही चूकच. तर तो संपूर्ण परिच्छेद असा -
Sexual topics are often controversial and value-laden, but the controversy is often relative to time, place and circumstance. What is labeled as "moral" or "right" varies from culture to culture, from century to century. Many of the moral issues pertaining to sex relate to certain religious traditions, but religion has no monopoly on morality. People who have no closely held religious creed are just as likely to be moral as those whose values are tied to a religious position. There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable.
(शेवटच्या वाक्यातला तिरपा ठसा लेखकांचाच.)
गांधीजींचे प्रयोग - संदेह
कुछ ऐसा कहुंगा -
@ऑल-
१. एकदा गांधीजींना माझा विरोध आहे म्हटले तर तो पक्ष चिंजंना वा तेजांना "पटवून देण्यात" काही हशील नाही. माझा विरोध नाही. किमान करायची इच्छा नाही. मला माझा विरोध कसा खरा आहे हे पूर्वग्रहित हे दुसर्यांना पटवून देण्यात काही रस नसतो. पण अगदी त्याच मुद्द्यांवर कोणत्या कारणांनी लोकांची मते भिन्न असतात ते जाणायला आवडते.
२. देशात गाधींना प्रश्न विचारणे म्हणजे एन्सीपीत पवारांना विचारणे नव्हे. गांधीभय नावाचा प्रकार माझ्याकडे नाही. मला कोणती निवडणूक लढवायची नाही, चळवळ करायची नाही.
३. गांधींनी आपले प्रयोग लपवले नाहीत यासाठी आपणासं जितके कौतुक आहे त्यापेक्षा जास्त मला असावे. पण मला आश्चर्य नि शंका देखिल आहेत.
माझे विचार (संदेह इ) तीन भागात सांगेन -
१. प्रयोगावरचेच विचार - I find these experiments devoid of any logic. सुधारक गाधीजींना "ब्रह्मचर्य" सारख्या संकल्पनेचे इतके आकर्षण? इतका प्रभाव? म्हणजे ते स्वतः ब्रह्मचारी, वैगेरे राहिले असते तर ठिक, पण आपण खरोखरिचे ब्रह्मचारी आहोत का प्रयोग करून पाहावे वाटले हे त्या आकर्षणाची पातळी दाखवते. बरे याचा उद्देश, स्त्री-पुरुष समानता आणणे? काहीही? नवविवाहितांना १-२ वर्षे दूर राहा सांगणे हा एक प्रगोग.
While in Bengal to see what comfort he could offer in times of inter-communal violence in the run-up to independence, Gandhi called for his 18-year-old grandniece Manu to join him – and sleep with him. "We both may be killed by the Muslims," he told her, "and must put our purity to the ultimate test, so that we know that we are offering the purest of sacrifices, and we should now both start sleeping naked."
हे काय लॉजिक आहे? शुद्धता दाखवली तर आपण वाचू? (यात सेक्यूलरेझमही नाही, पण ते असो.) पती पत्नींनी दूर रहावे, लग्न करू नये, वासना झाली तर थंड पाण्याने आंघोळ करावी, इ इ काय लोजिके आहेत?
यात लॉजिक असो, नसो, सुधारकासाठी हे शोभत नाही नि महत्त्वाचं तर नाहीच नाही.
२. गांधीवाद्यांचे विचार - अनेक गांधीविरोधकांनी या वर्तनावर टिका केली आहे. पण सुधारक गांधीवादी काय म्हणतात? क्षणभर आपण प्रयोग नि प्रामाणिक्पणा बाजूला ठेउ. पण ब्रह्मचर्याचे फॅड तर चूकच आहे. विचारवंत असल्या बुरसटलेल्या विचारसरणीसाठी गांधीजींचा समाचार घेताना दिसत नाही. माणूस १००% स्वीकारायचे बंधन नाही, आज ते नाहीत म्हणून आज तरी नाहीच नाही. मग शासने, विचारवंत नि अगदी गांधीविरोधकही मूग गिळून गप्प का असतात? विचारवंतांना तर मते नको असतात ना? आज अरुंधती जे मुद्दे मांडले तसे कोण्या अन्य सुधारकाने हे लैंगिक मुद्दे मांडून टिका केली नाही. एक तर टिका झालीच नाही, खूप कमी झाली, घाबरत घाबरत झाली, दाबली गेली, इ इ.
३. लोकमान्यता - अगदी हमी देऊन सांगू शकतो कि एक आठवराभर गांधीजींचे प्रयोग माध्यमांतून झळकले तरी त्यांच्या सरकार दरबारच्या सगळ्या तसबीरी खाली येतील. त्यांचा प्रामाणिकपणा असो नसो, त्या ब्रह्मचर्याच्या कंसेप्टमधे तथ्य असो नसो, नक्की काय झाले हे सगळ्या लोकांना कळले तर लोक त्यांना महात्मा मानणार नाहीत. कदाचित असे लोकवर्तन चूक असावे, त्याबद्दल बोलण्यास मी क्षम नाही. भारतीय लोक सार्या कंस्पायरसी थेरीज नि मोठ्या लोकांची लफडी दुर्लक्षित करतात, उलट चवीने चघळतात. पण गाधीजींनी याला अपवाद असावं, नव्हे ते होतेच, अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्यांना लोक राष्ट्रपिता, महान आत्मा , इ इ म्हणतात. सत्तरीतला माणूस, टीन मूलगी, तीही नात कोण्या अध्यात्मिक, सत्याच्या, निग्रहाच्या , इ इ परीक्षेसाठी एकत्र नागडे झोपतात ही संकल्पना आजच्या भारतीयांना कदापिही मान्य नसेल. यात तो सत्तरीतला माणूस गांधीजीच काय, ईश्वर असला तरी. लोक याला एक खोटी कंस्पायरसी थेरी मानतात. मग इतकी मूल्यभिन्नता असलेला माणूस राष्ट्रपिता वा महात्मा, इन फूल नॉलेज ऑफ फॅक्ट्स, लोक स्वीकारतील का?
Less than 1% Gandhians would
Less than 1% Gandhians would have criticized him. Gandhiji had mass following even among thinkers. Almost all of them are silent.
I am talking of the people who keep following him and also criticized him for this behavior. This excludes the list of people who left him for such behavior.
टिकास्पद न वाटणे नि म्हणून
टिकास्पद न वाटणे नि म्हणून टिका न करणे वेगळे नि गांधीभयाने (म्हणजे ते स्वतः भिती घालत होते असे नव्हे हो, आंधळे गांधीवादी काव्व करून उठतील या भयाने) न करणे वेगळे.
मुद्दा १ मधे गांधीजींवर टिका आहे, दोन मधे गांधीवाद्यांवर, तीन मधे भिन्नमूल्यी माध्यमे व लोक यांवर.
गांधींना महात्मा -
गांधींना महात्मा - राष्ट्रपिता मानलं जातं, त्याची कारणं अनेक आहेत. त्यात त्यांच्या लैंगिकताविषयक मतांचा समावेश होत नाही. त्या मतांना गांधीसमर्थक आणि गांधीविरोधक या दोघांनीही कडाडून / सौम्य विरोध केला आहे. असा विरोध असताना गांधींना त्यांच्या इतर कामाबद्दल महात्मा म्हणायचंच नाही, असा तुमचा आग्रह आहे का? तुम्ही नका म्हणू. तुम्हांला कुणी बळजबरी केली आहे? पण आपण मोठा पर्दाफाश करतो आहो, अशी समजूत नको. गांधीजींची लैंगिकताविषयक मतं पूर्वप्रसिद्ध आहेत. तरीही लोक त्यांना महात्मा म्हणतात. त्यामुळेच म्हणतात, असं नव्हे.
गांधीजींवर टीका करण्यात भीती कसली? पूर्वीही लोकांनी ती केली आहे. आत्ताही ती सहजशक्य आहे. 'भावना दुखावल्या' अशी बोंब ठोकून अंगावर धावून जाण्यात गांधीवाद्यांचा समावेश असल्याचं ऐकिवात नाही. हां, गांधींना 'प्रातःस्मरणीय' मानून त्यांचे समर्थकही सांभाळायचे आणि त्यांच्या प्रामाणिकपणे कथन केलेल्या प्रयोगांना 'भयंकर, संस्कृतिविध्वंसक' संबोधून त्यांना आडवळणानं मोडीत काढायचं अशी दुहेरी चाल असणारे मात्र टीका करायला भितात. पण तो त्यांचा प्रश्न आहे, नाही का?
गांधींना महात्मा -
गांधींना महात्मा - राष्ट्रपिता मानलं जातं, त्याची कारणं अनेक आहेत. त्यात त्यांच्या लैंगिकताविषयक मतांचा समावेश होत नाही. त्या मतांना गांधीसमर्थक आणि गांधीविरोधक या दोघांनीही कडाडून / सौम्य विरोध केला आहे. असा विरोध असताना गांधींना त्यांच्या इतर कामाबद्दल महात्मा म्हणायचंच नाही, असा तुमचा आग्रह आहे का? तुम्ही नका म्हणू. तुम्हांला कुणी बळजबरी केली आहे? पण आपण मोठा पर्दाफाश करतो आहो, अशी समजूत नको. गांधीजींची लैंगिकताविषयक मतं पूर्वप्रसिद्ध आहेत. तरीही लोक त्यांना महात्मा म्हणतात. त्यामुळेच म्हणतात, असं नव्हे.
असेच असेल तर भारतीय समाजाच्या प्रगल्भतेचा प्रचंड आदर आहे. पण असे आहे असे मानणे लिविंग इन फूल्स पॅराडाईज "आहे" हे सत्य आहे. महानगरींच्या उच्चशिक्षित( प्रो-गांधी )लोकांत हा प्रकार असावा. पण जनसामान्यांत नाही. गाधीजींना महात्मा वा राष्ट्रपिता मानणार्या, कामवालीबाई, ऑटोड्रायवर, शेतकरी, गार्ड, इ इ लोकांना असे होते हे पटतच नाही. शेवटपर्यंत पटत नाही. ते हे सगळे विरोधकांचे विष मानतात. कोणाला चूकून पटले तर मग तो -"मग तो महात्मा कसा?" असे विचारतो. आता तो प्रयोग होता, महान होता, वासना नव्हती, इ इ किती गोष्टी सांगीतल्या तरी उपयोग नाही. लक्षात घ्या - जनसामान्यात दोनच प्रकारचे लोक आहेत - १. हे खोटे मानणारे २. खरे असेल तर महात्मा म्हणू नये म्हणणारे. अशिक्षित, अर्धशिक्षित लोक तर अगदी कडवटच आहेत, नि अगदी शिक्षित लोकही बरेच आढेवेढे घेतात. कोट केलेला उतार ऐसीवरच शोभतो.
बरं. तुम्ही जनसामान्यांत
बरं. तुम्ही जनसामान्यांत प्रचार करा गांधीजींच्या प्रयोगांचा. अजून दहाएक वर्षांत गांधीजींची पदवी काढून घेतली जाईलही, कुणी सांगावं?
***
अधिक महत्त्वाचं:
सामान्यांत २ च प्रकारचे लोक आहेत असं म्हणता. मी जनसामान्यांत मोडत नाही काय? की गांधींनी असे प्रयोग केल्याचं माहीत असूनही मी त्यांना महात्मा म्हणते, मग मी समाजात मोडताच कामा नये? ऐकावं ते एकेक नवलच.
मग माझं गांधींबद्दलचं मत
मग माझं गांधींबद्दलचं मत ग्राह्य नाही का?
***
हे फक्त 'ऐसी'वरच्याच चर्चांना उद्देशून नाही. मला हे एकूणच बदलत्या संदर्भात महत्त्वाचं वाटतं.
मोदींना बहुमत मिळालं, याचा अर्थ (तथाकथित) पुरोगामी, लिबरल्स, विचारवंत, डावे, स्त्रीवादी, लैंगिक स्वातंत्र्यवादी आणि/किंवा या सगळ्यांची परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स बाय डिफॉल्ट मोडीत निघाली, अशा आवेशातला विजयोत्सव चालू आहे, जो मला घातक वाटतो.
म्हणून पुनरुच्चार. घटकाभर गृहित धरून चालू, जनसामान्यांना गांधींच्या या प्रयोगांबद्दल कणमात्रही माहिती नाही आणि ती मिळाल्यास ते गांधींची छीथू करतील. पण म्हणून ज्या लोकांना गांधींच्या प्रयोगांबद्दल ठाऊक आहे, ज्यांचा त्यांना विरोध आहे आणि तरीही गांधीजींनी महात्मा म्हणवण्याइतकं मोठं काम केलं असं जे मानतात, त्या लोकांचं अस्तित्व शून्य होतं का?
आपलं मत नक्कीच ग्राह्य आहे.
आपलं मत नक्कीच ग्राह्य आहे. मला आपला सामाजिक स्तर माहित नाही. आपण खालच्या सामाजिक स्तरात, विचारवंत नसलेल्या म्हणजे सामान्य व्यक्तिशी, याच विषयावर चर्चा करा. जसे ऑटोड्रावर, कामवाली, भाजीवाला, ईस्त्रीवाला, इ इ ४-५ लोकांशी. जर त्यांची मते आपल्याप्रमाणेच आढळून आली तर केवळ आपलंच मत ग्राह्य आहे माझं नाही हे देखिल मानायला मी तयार आहे. या बाबतीत मी माझा अनुभव आपणांस सांगीतला आहे.
मोदींना बहुमत मिळालं, याचा अर्थ (तथाकथित) पुरोगामी, लिबरल्स, विचारवंत, डावे, स्त्रीवादी, लैंगिक स्वातंत्र्यवादी आणि/किंवा या सगळ्यांची परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स बाय डिफॉल्ट मोडीत निघाली, अशा आवेशातला विजयोत्सव चालू आहे, जो मला घातक वाटतो.
अशी शंका आपणांस येणे रास्त आहे हे मान्य, पण फक्त पुरोगामी शब्दापुरती. इतर संज्ञांचा वास माझ्या वाक्यात का आला हे कळले नाही. अवांतर होईल.
"कुटुंबव्यवस्था मेली तर मेली" अशी वाक्यरचना आपण करता. त्यात बराच निर्दयपणा असतो. ते वाक्य मला खालीलप्रमाणे ऐकू येते- "तुझं घर मोडलं तर मोडलं." कुटुंब टिकवून समस्या सोडवण्याची इच्छा असणारांचाच मोठा गट असतो असे माझे निरीक्षण आहे.
"विवाहसंस्था गेली तर गेली, तिचं काय महत्त्व?" हे मला "एक नाते, जे आजवर फार महान नि आकर्षक मानले गेले आहे, स्त्री वा पुरुष म्हणून तुझ्यावर अन्याय करेल, तेव्हा टाळ" असे ऐकू येते. याला मी अतिरेकी पुरोगामीता म्हणतो. विवाह व कुटुंब या लोकांच्या मोठ्या आस्थांचे विषय आहेत. म्हणून आपली मते प्रातिनिधिक असतीलच असे नाही असे वाटते.
शिवाय इथे एकिकडे आपण "महात्माजींचे महान लैंगिक वर्तन समजून घेण्याइतकी प्रगल्भता भारतीय समाजात आहे" असे म्हणत आहात तर दुसरीकडे अनेकदा आपण याच समाजावर अत्यंत संकुचित असल्याचा, स्त्रीयांवर अन्याय न करण्याची साधी जाणिवही नसल्याचा आरोप करता.
मला केवळ आपले मत प्रातिनिधिक नसावे, अल्पसंख्य असावे असे म्हणायचे आहे. अतिरेकी पुरोगामी शब्द चुकत असेल तर मागे.
नि प्लीज, तो मोदी, संघ, इ इ ना मधे नका आणू. क्वालिटेटिव बेसिसवर तुमची भूमिका मांडा. निरीक्षणे मांडा. मतांतरे मान्य करून चर्चा समाप्त करू यात.
लोकांची मतं नक्की काय आहेत,
लोकांची मतं नक्की काय आहेत, याचा माझं मत ग्राह्य मानलं जाण्याशी काय संबंध आहे? हाच तो बहुमतवाद आणि लोकशाहीमधला फरक.
गांधींनी आपलं वागणं लपवलं आहे का? - नाही. उलट त्याबद्दल पुस्तकात लिहिलं आहे. ते कुणालाही वाचण्यासाठी उपलब्ध आहे.
त्यावर टीकेस बंदी आहे का? - नाही. कुणीही टीका करायला मोकळा आहे.
तरीही गांधींना महात्मा म्हटलं जातं, याला तुमचा आक्षेप का? - कारण तुमचा अनुभव सांगतो, की लोकांना खरे गांधी ठाऊक नाहीत. आता यावर उपाय लोकांना खरे गांधी माहीत करून देणे. तसं करा. 'गांधीवादी गांधींना नावं का ठेवत नाहीत?' या त्राग्याला अर्थ काय आहे, सांगा बरं.
शिवाय भारतीय समाज प्रगल्भ आहे हे माझं विधान नाही. तुमचंच आहे. सरसकट समाजावर संकुचित असल्याचा आरोप मी कधीही केलेला नाही. वेळोवेळी मला अन्याय्य वाटणार्या संस्थांवर, रूढींवर टीका मात्र केली आहे. त्याला सरसकट समाजाचा मानभंग का बरं मानता? तुम्ही संकुचित समाजात मोडत नसाल (नसालच), तर तुम्हांला ती टीका इतकी झोंबण्याचं काय कारण आहे?
तेही एक असो. वरच्या अवांतराबद्दल: मी वरच म्हटलं आहे की माझं निरीक्षण फक्त ऐसीवरच्या चर्चांना उद्देशून नाही. एकूणच निरीक्षण आहे. मोदींना मधे आणत नाहीय, स्वतंत्र निरीक्षण मांडतेय. या चर्चेचं निमित्त. तुम्हांला त्या निरीक्षणाबद्दल काही बोलायचं नसेल, तर बोलू नका. साधा उपाय आहे, किनाई?
अत्यंत सहमत आहे. मार्मिक
अत्यंत सहमत आहे. मार्मिक श्रेणीने समाधान होईना.
एकुणच पुरोगामी विचार बाळगणे म्हणजे मोठा समाजद्रोह केल्यासारखे आहे, तुम्ही काय जनसामान्यांतील नाहितच, तुम्ही काय पुरोगामी ऐसीवाले, तुमची ती काय छटाकभर मतं, कशाला ती ग्राह्य मानायची? असे म्हणणे असल्यास चर्चा करण्यालाही अर्थ उरत नाही.
असे काही असेल तर मग तुमचे प्रश्न नी चर्चा ज्यांची मते ग्राह्य वाटतात त्यांच्यासमोर मांडणे अधिक इष्ट नाहि का?
असे काही संतापजनक वाचले की प्रतिवाद करायची इच्छाच मरून जाते. असो. माझ्याकडून या धाग्यावरील चर्चेवर पूर्णविराम!
क्षमस्व
असे काही संतापजनक वाचले की प्रतिवाद करायची इच्छाच मरून जाते. असो. माझ्याकडून या धाग्यावरील चर्चेवर पूर्णविराम!
माझ्यामते आपण दोघांनी तरी काहीच प्रतिवाद केला नाही. शिवाय मी इथे कोण्या व्यक्तिवर वा संस्थळावर टिका केलेली नाही. काही निरीक्षणांतील विरोधाभास मांडला आहे नि 'इथे चर्चा करणारे लोक' सोडून बाहेरच्या, विषयाशी संबंधित लोकांवर टिका केली आहे. मग ते लोक असोत, नेते असोत, आज असोत वा नसोत.
अशी चर्चा नि टिका करताना मी रुथलेस वाटलो तरी 'इथे चर्चा करणारांची' ज्यांच्यात आस्था आहे त्यांचे अस्थानी टिका करून 'इथे चर्चा करणारांना' दुखवण्याचा माझा उद्देश यत्किंचितही नसतो. माझ्या आर्ग्यूमेंटची एज जात नसली तर मी सुर सॉफ्टच ठेवण्याचा प्रयत्न करतो.
तरीही, आपणांस संताप यावं असं माझ्याकडून काहीतरी झालं आहे, क्षमस्व.
महात्मा केले कोणी या माहिती
महात्मा केले कोणी या माहिती अधिकारात केलेल्या चौकशीला "कल्पना नाही" असे उत्तर सरकारने दिले होते. :)
सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाबाबत मी गांधीवादी नाही. मी पॉलिटिशिअन गांधींना मानतो.