जेल मधी जाऊ या, दिल्लीची बिल्ली

जेल मधी जाऊ या
राजनीती खेळ खेळू या.

जेल मधी गेला नेहरू
गादी मिळाली देशाची.

जेल मधी गेला लालू
गादी मिळाली बिहारची

जेल मधी गेला केजरी
मिळेल का गादी दिल्लीची?

काशी मधी गेली
दिल्लीची बिल्ली.

वाघाला म्हणाली
मी तुझी मावशी
पड माझ्या पाया.

वाघाने दिला मिशी वर ताव
जोरात फोडली डरकाळी एक.

मावशी उडाली हवेत तशी
जाऊन बुडाली दिल्ली तळी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवड्लि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केजरीवाल भारताची घटना वा न्यायालयीन प्रक्रिया नव्याने लिहू पाहत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नेहरू, लालू, केजरीवाल ही मंडळी लहानपणी तुमच्यासोबत विटीदांडू खेळली आहे का? तुम्ही त्यांचा सरसकट एकेरी उल्लेख केला म्हणून विचारतो. नेहरू हे या देशाने लढलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक होते. लोकांनीच त्यांना बहुमताने देशाचे पंतप्रधान केले होते, हे विसरू नका. थोड्या फार फरकोन लालूंबाबतही तेच बोलता येईल. टीका करताना सभ्यतेच्या किमान मर्यादा पाळायला हव्यात. अन्था टीका अगदीच चीप होऊन जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत वात्रटिकेच्या दर्जाबद्दल मी आपणांशी कदाचित सहमत असू शकेनही; पण...

नेहरू, लालू, केजरीवाल ही मंडळी लहानपणी तुमच्यासोबत विटीदांडू खेळली आहे का? तुम्ही त्यांचा सरसकट एकेरी उल्लेख केला म्हणून विचारतो.

त्याच न्यायाने, प्रस्तुत रचनेचे रचनाकार हे कदाचित आपले समवयस्क नसण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधू इच्छितो.

नाही म्हणजे, आपल्या टीकेच्या वा आक्षेपाच्या योग्यतेविषयी वा सुस्थानित्वाविषयी मला कोणतेही भाष्य करावयाचे नाही; मात्र, या निमित्ताने, श्रीयुत गूज़ यांना शिजविण्याकरिता वापरण्याचे सॉस हे श्रीमती ग्याण्डर यांनाही शिजविण्याकरिता लागू पडावे किंवा कसे, या गहन (परंतु रोचक) प्रश्नावर तूर्तास विचार करीत आहे, एवढेच.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही थोर व्यक्ती असली तरी तिची चेष्टा करायची नाही, एकेरीत उल्लेख करायचा नाही वगैरे नियम जाचक वाटतात. टीका करताना खोटं बोलू नये, शिंतोडे उडवू नये म्हणणं ठीक. पण एकेरीत उल्लेख केल्यावर असे शिंतोडे उडतात असं म्हणणं म्हणजे विभूती बनवून देव्हाऱ्यात बसवून पूजा करण्याकडे पहिलं पाऊल. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच असाच सुरू होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय आदरार्थी बहुवचन नामक मूर्ख प्रकारच आपल्या देवभाषेत कधी नव्हता, हे या माठांना कधी कळणार देव जाणे. कितीही रिस्पेक्ट दिला तरी संस्कृतात बोलताना अरेतुरेच केल्या जाते. सध्या संभाषणसंस्कृतवाले लोक चक्क आदरार्थी बहुवचनही संस्कृतावर लादू पाहताहेत ते पाहून एक संस्कृतप्रेमी म्हणून शरम वाटली. संस्कृतप्रमाणेच ग्रीक अन लॅटिनमध्येही असला प्रकार नाही.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महासंघीजींचे साहित्य वाचून त्या प्रभावाखाली विवेकजींनी नेहरूजींना उणेदुणे लिहिल्याने गांधीजींचे साहित्य वाचून त्या प्रभावाखालील मस्तरामजींना महासंघीजींच्या आप्तसंबंधितांमधील परंतु गांधीभक्तीत रममाण झालेल्या महत्ब्रह्मरावजींना अद्वातद्वा जे बोल लावले त्याचे खापर विवेकजींच्या माथी जाते असा शोध लवकरच लागेल. वाट पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संगती लावताना मेंदूचे तुकडे पडले राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संस्कृतात आदरार्थी बहुवचन नाही, हे खरेच आहे; पण वरील कविता संस्कृतात नसून मराठीत आहे. मराठीत लेखन करून संस्कृताच्या नियमांचा आग्रह धरता येणार नाही. विवेक पटाईत यांनी या कवितेचे तात्काळ संस्कृत भाषांतर करून मराठी कविता उडवून टाकावी, अशी विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय आदरार्थी बहुवचन नामक मूर्ख प्रकारच आपल्या देवभाषेत कधी नव्हता, हे या माठांना कधी कळणार देव जाणे.

एल्याबरेट, प्लीज़.

बाकी, 'गांधीमहोदयेन' वगैरे (बहुधा 'गांध्या'ऐवजी? ;)) हे विसाव्या-एकविसाव्या शतकातल्या सर्कारी संस्कृताचे (आकाशवाणी-बुलेटिन-छाप) 'पोलिटिकली करेक्ट' आविष्कार असावेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृतमध्ये आदरार्थी बहुवचन कधीच नव्हते. 'अत्रभवान्' इ.इ. आदरार्थी योजना असली तरी ते एकवचनच आहे. 'गांधीमहोदयेन' इ.इ. सुद्धा संस्कृतशी सुसंगतच आहे, कारण त्या शब्दात तृतीयेचे एकवचन आहे. त्याउलट एकदा पुण्यात वेदशास्त्रोत्तेजक सभेत बारक्या पोरांची संस्कृत भाषणे ऐकताना एकाने 'स्वामीविवेकानन्दानाम्' असे षष्ठी बहुवचनी रूप वापरून बसल्या जागी संस्कृतची षष्ठी केली तेव्हा आलेली हसण्याची उबळ दाबून ठेवली होती.

अर्थात, आमच्या वाचनात आजवर आलेल्या तोकड्या संस्कृतापुरतेच हे वक्तव्य लागू आहे. ऋग्वेदातील किंवा कुठल्या ब्राह्मणातील एखाद्या कोपर्‍यात तसे रूप असेल किंवा पाणिनीसायबांनी तसे काही नोंदवले असेल तर आगाऊच माफी मागतो. (होय, डिस्क्लेमर दिला नै तर कोल्हटकर नैतर धनंजय एकदम विरुद्ध उद्धरणं देऊन बाद करायचे Wink )

हे झालं मेन म्याटर. त्याचा इथे संबंध इतकाच, की बहुवचन=आदर आणि एकवचन=अनादर हे समीकरण मराठी, हिंदी, इ. संस्कृतोद्भव भाषांत रूढ असले तरी ते त्यांची जननी इ. असलेल्या संस्कृतात नाही. अंमळ बादरायण आहे, पण..असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठी-हिंदीसह इतर इंडो-युरोपीयन गटातील भारतीय भाषांची जननी संस्कृत आहे, हा सिद्धांत खरा नाही. या भाषांची जननी संस्कृत नसून प्राकृत आहे. प्राकृताची जननी संस्कृत आहे, असे खुसपट काही लोक काढतात. पण तेही खरे नाही. प्राकृत आणि संस्कृत या दोन स्वतंत्र भाषा असून, एकाच काळात त्या समांतर अस्तित्वात होत्या.

कृपया अफवा पसरवू नये, ही हात जोडून विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडोयुरोपियन फ्यामिलीमधील सर्वांत 'हेवीवेट' फ्यामिली म्ह. इंडो-इराणियन. त्यातही इराणियन आणि इंडो-आर्यन असे दोन उपविभाग पडतात. इंडो-आर्यन शाखेतील सर्वांत जुनी आत्ता उपलब्ध असलेली भाषा म्ह. वैदिक-जिलाच वैदिक संस्कृत असेही म्हटले जाते, कारण व्याकरण, शब्दसंपदा, इ. ताडून पाहता पाणिनीने पुढे 'संस्कृत' म्हणून विवेचिलेल्या भाषेचाच हा पूर्वावतार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या वरिजिनल सोर्समध्ये द्राविडी, ऑस्ट्रो-एशियाटिक, इ. भाषांतील अनेक शब्द मिसळून मग पुढे मराठी, हिंदी, इ. भाषा तयार झाल्या.

(अतिअवांतरः एका परिचिताने पर्सेपोलिस येथील झर्क्सेस राजाचा शिलालेख (इसपू ४००-५००) क्यूनिफॉर्मवरून उतरवून घेतला अन त्याचे लिप्यंतर वाचावयास दिले. थोडी खटपट केल्यावर ओल्ड पर्शियन चक्क एखाद्या प्राकृतसारखीच वाटू लागली. परिचिताच्या मते मागधी प्राकृतापेक्षा कै संस्कृतपासून ओल्ड पर्शियन दूर नव्हती.)

संस्कृत=पाणिनीने सांगितलेली भाषा

आणि

प्राकृत=नाटकांची आणि अशोकाच्या शिलालेखांची भाषा असे कॉमन पर्सेप्शन आहे.

संस्कृत आणि प्राकृत यांत मूलत: फरक काहीच नाही. फक्त वरिजिनल वैदिक भाषेशी बरीच सिमिलर असणारी एक उपबोली पुढे संस्कृत म्हणून स्टँडर्डाईझ करण्यात आली, तर पंजाब ते बंगाल आणि काश्मीर ते महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या 'इंडो-आर्यनोद्भव' भाषांत स्थानिक तसेच कालपरत्वे बदल होऊन ज्या बोली तयार झाल्या, त्या म्ह. प्राकृत. नावावरून पाहता प्राकृत म्ह. सहज न शिकवता येणारी तर संस्कृत म्ह. मुद्दाम बनवलेली अस इंप्रेशन होते. पण ते सर्व काळासाठी बरोबर नाही. जी 'भाषा' संस्कृत म्हणून कायम करण्यात आली ती नेटिव्हलि बोलणारे प्रदेश पाणिनीच्या काळात अस्तित्वात होतेच-काश्मीर, गांधार, इ.

हा फरक बर्‍यापैकी सोयीस्कर आहे. दोन्हीही भाषा वरिजिनली जिवंतच होत्या. फक्त एक भाषा तौलनिकरीत्या लैच अगोदर बंदिस्त करण्यात आली इतकेच. प्राकृतचे स्टँडर्डायझेशन नव्हते असे जर वाटत असेल तर तेही चूक आहे. हेमचंद्र नामक गुजराती पंडिताने महाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण लिहिलेले आहे.

असो, तर घडाभर तेल सांडून मूळ मुद्याकडे येतो. 'जननी' एकच एक होती, तिच्या एका अवतारास संस्कृत, तर दुसर्‍या अवताराला प्राकृत म्हटले गेले/जाते. या अवतारांत स्थलकालपरत्वे लै फरक पडल्याने लेबले वेगळी दिली जाऊन त्यांना वेगळी संदर्भचौकट प्राप्त झाली, नैतर मूलतः ती एका प्रकारची 'क्लोन्स'च आहेत.

त्यामुळे या दोन्ही "वेगळ्या भाषा" होत्या ही शब्दयोजनाही तादृश योग्य नाही-विशेषतः पाणिनीपूर्व काळासाठी. त्यानंतरही काही शे वर्षांनंतरच हे विधान तुलनेने योग्य आहे.

संस्कृत-प्राकृत या शब्दच्छलात न अडकता इकडे पहावे, ही विनंती.

अन तेही असो. मूळ मुद्दा बहुवचनाचा आहे, तुमच्या 'जननी प्राकृता'त याचे उदा. मिळाल्यास पहावयास आवडेल. पाणिनीपूर्वकालीन प्राकृतात तर मिळणे असंभव आहे, नंतरही कधी येते ते पाहणे रोचक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संस्कृत आणि प्राकृत या दोन समांतर भाषा होत्या, हे मान्य केले. हे ठीकच आहे. मराठी, हिंदी इ. भाषा संस्कृतोद्भव नसून, प्राकृतोद्भव आहेत, हेही मान्य करायला हरकत नसावी.

संस्कृत आणि प्राकृत यांच्यात मूलत: फरक नाही, हे विधान फारच धाडसी आणि अनैतिहासिक आहे. तुमच्याच पुढच्या विवेचनाला छेद देणारेही आहे. संस्कृत आणि प्राकृत यांची स्वतंत्र व्याकरणे आहेत, तर मग या दोन्ही भाषा एकच कशा ठरविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. संस्कृत आणि प्राकृत यांचा अतिशय मर्यादित अर्थ घेतल्याने प्रॉब्लेम आहे.

मराठीची आई म्ह. महाराष्ट्री प्राकृत आहे. पण महाराष्ट्री प्राकृतची आई ही संस्कृत आणि आजी वैदिक संस्कृत आहे. मुलगी बह्वंशी आईवर गेली असली तरी काही आजीत असलेले गुणधर्म तिने घेतलेले आहेत जे आईत नाहीत. शिवाय आजी ही आईच्या अगोदरची असल्याने 'कुणापासून उद्भव' म्हटले तर 'अल्टिमेटलि संस्कृतोद्भव' म्हटल्यास चूक ते काय? संस्कृतचे नाव आले की झिडकारणे ही एकच टेंडन्सी मला दिसते.

शिवाय, प्राकृतचे स्वतंत्र व्याकरण कधी रचले गेले हा काळ तरी आपल्याला माहिती आहे काय? तो काळ अन मी कुठल्या काळाबद्दल बोलतोय तो काळ हे दोन्ही लै वेगळे काळ आहेत, त्यांत बराच फरक आहे. वर्‍हाडी अन पुणेरी मराठी वेगळ्या असल्या तरी बोलीच आहेत, भाषा नाहीत. पण कालांतराने त्यांतील फरक भाषेएवढा झालेला दिसेल-जर परिस्थिती तशी झाली तर. तोच न्याय इथे आहे. पाणिनीय संस्कृत बोलणार्‍या माणसाचे बोलणे मागधी प्राकृतवाल्याला समजत नव्हते असे आजिबात नाही. आपल्याच भाषेची वेगळीशी बोलीभाषा आहे असे वाटण्याइतपत फरक होता. कालांतराने तो वाढत वाढत जाऊन वेगळ्या भाषा तयार झाल्या.

बाकी, संस्कृत=ब्राह्मणी आणि प्राकृत=बहुजनवाली असे समीकरण करून संस्कृतच्या प्रभावाला विरोध करतो आहोत म्हंजेच तथाकथित वैट्ट वैट्ट दूष्ष्ट बामणी काव्याविरुद्ध बोलतो आहोत असे समाधान करून घ्यायचे असेल तर अवश्य करून घ्या. सध्या त्या विचारधारेची चलती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संस्कृत=ब्राह्मणी आणि प्राकृत=बहुजनवाली असे समीकरण करून संस्कृतच्या प्रभावाला विरोध करतो आहोत म्हंजेच तथाकथित वैट्ट वैट्ट दूष्ष्ट बामणी काव्याविरुद्ध बोलतो आहोत असे समाधान करून घ्यायचे असेल तर अवश्य करून घ्या. सध्या त्या विचारधारेची चलती आहे.

हे अगोदर कन्फर्म करून घेऊनच चर्चा करा. चर्चेला उत्तम दर्जा प्राप्त होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरील विधानात नक्की काय कन्फर्म करायचे बाकी आहे?

समीकरण व्हॅलिड आहे, अन त्यावरून काढलेला निष्कर्षही. शिवाय सध्या त्या विचारधारेची चलती आहे हे निरीक्षणही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील विधानात नक्की काय कन्फर्म करायचे बाकी आहे?

कन्फर्म करून घ्या म्हणजे तुम्ही स्वतः कन्फर्म करा असे नाही. ज्यांचेशी चर्चा करत आहात त्यांची भूमिका जाणून मग चर्चा करा असे.

तुमचे काम - क्न्फर्मेशन मागणे
दुसर्‍याचे काम - देणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रैट्ट. पण जे जाणवते ते कुणाच्या कबूल करण्या-न करण्याने बदलणारे थोडीच म्हणा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कितीही थोर व्यक्ती असली तरी तिची चेष्टा करायची नाही, एकेरीत उल्लेख करायचा नाही वगैरे नियम जाचक वाटतात.

ही जाचकता सगळ्याच मोठ्या नेत्यांसाठी आहे का?
नियम सगळ्यांसाठीच असे असेल तर मग :

"अटलबिहारी वाजपेयी आला, आडवाणी गेला,
हेडगेवार आला, गोळवलकर गुरूजी गेला,.."

अशी वाक्यरचना चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अटलबिहारी वाजपेयी आला, आडवाणी गेला,
हेडगेवार आला, गोळवलकर गुरूजी गेला,.."

अशी वाक्यरचना चालेल का?

अर्थातच चालेल. इथे कॉंग्रेस भाजपा असा भेद बिलकुल नाही.

सगळ्यांचाच कायम एकेरीत उल्लेख करावा असं म्हणणं नाही. किंबहुना आदरार्थी बहुवचन योग्य तिथे सांसदीय भाषेत लावतातच. मात्र कायमच सांसदीय भाषा वापरली पाहिजे याला आक्षेप आहे. 'रांडेच्या' हा शब्द सर्वसामान्य संवादात येऊ नये हे बरोबर आहे. पण योग्य ठिकाणी - म्हणजे एखाद्या कादंबरीत आला तर त्याला आक्षेप असू नये इतकाच मुद्दा आहे.

राम, कृष्ण वगैरेंचे उल्लेख एकेरीतच होतात हे गमतीदार नाही का? लोक काय त्यांच्याबरोबर गोट्या खेळलेले असतात का? देवांना एकेरीत हाक मारलेली चालते तर कर्तृत्ववान माणसांनी काय मोठा तीर मारलाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्या देशाचा माहौल बदलला आहे. मागे उजवे, संघी नि भाजपेयी दिसले कि बडवायचे हा माध्यमांत सगळीकडे प्रघात होता. आता लोकांनी मोदींना निवडून दिल्यापासून डावे लोक सॉफ्ट पडले आहेत नि सगळे फोरम थोडे उजवे उजवे वाटू लागले आहेत. म्हणून असे प्रश्न विचारले जाणारच. तसं ऐसीचं रेप्यूटेशन पाहता वाजपेयी, हेडगेवार व आडवाणींसाठी वापरावयाच्या विशेषणांची निगेटीव लिस्ट बनवावी लागेल अशी स्थिती नव्हती का काही काळापूर्वी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नव्हती. ऐसीचा कल डावीकडे आहे याचा अर्थ उजवीकडच्या सगळ्या लोकांना इथे दूषणं(च) दिली जातात (आणि या विधानाचा व्यत्यासही) असं अजिबात नाही.

सगळे फोरम थोडे उजवे वाटू लागले आहेत, हे निरीक्षण रोचक आहे. त्यामागचं मला दिसणारं कारण असं: बहुमत मिळालं याचा अर्थ आपण जे काही बोलतो ते आपोआप बरोबर ठरलं आणि आपल्याविरुद्ध बोलणारे आपोआप चूक ठरले, असं काहीसं गृहीतक उजवीकडे कल असणर्‍या बहुतांश लोकांनी करून घेतलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण एकवचन-अनेकवचनाच्या गलबल्यात हा आणि कुठून आला मुद्दा मध्येच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसादांचा फ्लो नीट पाहाल तर लेखकाने 'यांना' एकेरी संबोधले तर 'त्यांनाही' संबोधले तर 'इथे' चालेल का असा प्रश्न एका प्रतिसादकाने केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग त्यालाही होकारार्थी उत्तर मिळालेले असताना विशेषणांच्या लिष्टेचा प्रष्ण आला कुठोन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राम, कृष्ण वगैरेंचे उल्लेख एकेरीतच होतात हे गमतीदार नाही का? लोक काय त्यांच्याबरोबर गोट्या खेळलेले असतात का? देवांना एकेरीत हाक मारलेली चालते तर कर्तृत्ववान माणसांनी काय मोठा तीर मारलाय?

साला, हाच मुद्दा आपण कायम उपस्थित करतो. यद्यपि तेव्हाही लोकांना पटत नै हा भाग वेगळाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो सचिन तेंडुलकर,
ती लता, ती आशा.
गणपतीही तोच.
ती पार्वती,तो शंकर-
पण ती आई
तेव्हा ते बाबा.

गांधी ते, नथुराम तो
गावसकर तो, ब्रॅड्मन तो
कितीही म्हातारा झाला
तरी ए.के. हन्गलही तो
हा तर -
consistency च्या आईचा घो

ह्यापेक्षा कोंकणी बरी. कुठेही/कुणालाही कितिही मोठ्ठ्ठा माणूस असला तरी एकेरीतच "बरो मरे".
बेष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं आपलं एक निरिक्षण -
साधारणपणे आपल्याला जवळची वाटणारी व्यक्ती असेल तर एकेरी विषेशण लागतं. त्या व्यक्तीबद्दल आदरापे़क्षा प्रेम जास्त असलं की.
अर्थात एखाद्याला हलकं किंवा अपमानास्पद लेखायचं असेल तरीही एकेरी संबोधन वापरतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही वात्रटिका आहे, सामान्य लोकांसाठी हलक-फुलक मनोरंजन. गंभीर स्वरुपाची टीका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवडणुक संपलीकी आता........ हॆंगओव्हर उतरणार कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मे २०१९ मधे (हरल्यावर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आशय समजला,
पण कविता म्हणून आवडली नै (जरा प्राचीला-गच्ची छाप जुळवाजुळव वाटली). सॉरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद बाबत सर्वाना धन्यवाद. कुणाची ही भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. वात्रटिका, विडंबन, व्यंग लिहिण्याचा उद्देश्य हसत हसत समाजाच्या परिस्थिती मग ती सामाजिक असो वा राजनीतिक लक्ष वेधणे होय. आपली कमी झालेली लोकप्रियता वाढविण्यासाठी कुणी जाणून-बुजून जेल मध्ये जातो कदाचित त्याचा उद्देश्य पुन्हा मुख्यमंत्री बनणे असू शकतो . या कडे लक्ष वेधण्यासाठी ही वात्रटिका लिहिली. अर्थात शब्दांची जुळवा जुळावी कितपत जमली, हे वाचकच ठरवू शकतात. पंडितजीना किंवा इतर कुठल्या नेत्याला कमी लेखण्याचा उद्देश्य नव्हता. निवडणुकीच्या आधी इतर नेत्यांवर ही लिहिल्या आहेत उदा:

डोळे झाले माझे अधू दिखती नहीं है दिल्ली.
मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दिखाए मुझे जो लालकिला.

(२) उम्मीद

झाले शरीर जरी म्हातारे दिल अभी जवान है.
वरेल का मला ती षोडसी उम्मीद अभी कायम है.

कुणा निश्चित व्यक्ती किंवा वर्गाला उद्देश्यून मी कधीच लिहित नाही. जे मला वाटते किंवा डोक्यात येते ते शब्दांत बांधण्याचा प्रयत्न करतो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. पटाईत हे गेली कित्येक वर्षे दिल्लीत रहातात अशी माझी समजूत आहे.

एकंदरीत सगळ्या हिंदी भाषिक राज्यांतून सर्वच नेत्यांचा एकेरी उल्लेख करण्याची सवय आहे. हे आपल्या मराठी डोक्याला अपमानास्पद वाटते, पण इंग्रजीतल्या तू सारखेच ते नैसर्गिक आहे. हिंदी बातम्या / पेपर पाहिल्यावर हे जाणवते.

तेव्हा त्या एकेरीवरून झाली तितकी चर्चा नेहेमीप्रमाणेच ऐसीस्टाईल कीसकाढू वाटली.

अजो'बांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण त्यांनी नेहेमीप्रमाणे खुसपट काढून इथेही परंपरा कायम ठेवली.

शेवटी, पटाईतजींना माझ्या तर्फे दीड मीटर गेंड्याची कातडी सप्रेम भेट. कुणाच्याही भावना दुखावल्याबद्दल माफीबिफी मागू नका, ही नम्र इनंती Wink

जय हिंद, जय महाराष्ट्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-