बिच्चार्‍या, उगी उगी

__________ बिच्चार्‍या, उगी उगी__________.

गरीब बिचारा शोधतोय तो
सायबिणीचे पडके घर -
मी म्हणतो, "विचार, जवळ
चांगला बार असला तर..."
.
बुरसट चिरे न्हाते-धूते
अश्रू भले सुकवू नको
कुळाचारांस आसूसले
भाव भले आटवू नको
.
म्हटले कोणी : "रिबेलो
मूळचे अहो, त्या वाडीचे"
पात्रांव, छ्या! रिबेलो
आहेत सांगा किस झाडीके?
.
ब्रागांस, कून्य, नोरोन्या
कसची गोत्रे, कसची कुळे,
ईश्वराच्या डोळ्यापुढे
बामणांचेही गू पिवळे
.
.
.
सोड बाबुश - पीच थोडी
दर्जेदार काजूफेणी
सोनसळी फेसाळणारे
उसळणारे जादू-पाणी
.
प्याल्यात ओतते आहे बघ
साकी छोकरी गोड कोवळी
झोकात झुकते जणू काही
झुळकेसरशी डुले पोफळी
.
बारवाला बघतोच आहे
काळीज माझे झाले कलम
पैसे मोजून घेऊन माझे
दुखण्यावरती लावतो मलम
.
माझ्यासाठी खास आणला
उंची दारू भरून प्याला
त्याच्या हातून माझ्या हातात -
मध्यस्थ नको द्याला-घ्याला
.
.
.
हाती आहे नाही ते
उदारपणे लुटत राहा
उद्या येत्या गरिबीचा
उगी कशास धाक पाहा?
.
पैसे टाकून दारू झोकत
गाणारा तो और आहे
पडक्या वाड्यांत उकीरडे
रडत फुंकणे बोर आहे
.
मला रोक-टोकणार्‍यांनो
तुमचे म्हणणे ऐकू आलेय
माफ केले तुम्हा तरी
खरेच आता पुरे झालेय
.
सल्ला म्हणून दिला असता
मानले असते तुमचे बोल
मात्र तुमची शेरेबाजी
काही नाही - नुसता सल!

स्फूर्ती : अबु नुवास

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कवीचा मित्र जुन्या गोव्याच्या शालीन पोर्तुगीज जमान्याच्या रोमान्समध्ये अडकलेला आहे. कवीला वाटते : आता ही जळमटे आहेत नुसती. त्यापेक्षा मस्तपैकी बारमध्ये जावे. तिथली तडपन-धडकन जिवंत आहे.

मुल्ला नसरुद्दीनला विकिपेडियावरती शोधताना अनपेक्षितपणे अबू नुवास सापडला. त्याची "द रेच पॉझ्ड" कविता वाचून येथील नोस्टॅल्जिया लेख आठवला.

अबू नुवासच्या काळात अरबी-इराणी नागर संस्कृती बरीच समृद्ध झाली होती. पण कित्येक कवी भटक्या बदावी प्रेमकथा, आणि त्यातील उपमा-रूपकांमध्ये अडकलेली होती. अबू नुवासने त्याविरुद्ध काव्यात्मक बंड पुकारले. शहरात मुरलेल्या कवीने "प्रेयसीच्या टोळीचा काफिला निघून गेला आहे, तिच्या तंबूच्या खुंट्यांच्या भोकांपाशी मी हताशपणे रडत आहे..." अशी कविता करणे हास्यास्पद आहे. वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! काय फर्मास लिहिलं आहे!
एकदम म्हंजे एकदमच आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कवितेचा विषय आणि लय अतिशय आवडली.

पैसे टाकून दारू झोकत
गाणारा तो औरच आहे
पडक्या वाड्यांत उकीरडे
रडत फुंकणे नकोच आहे
या कडव्यात ताल थोऽडासा चुकल्यासारखा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य. थोडा विचार करून बदल करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पडक्या वाड्यांत उकीरडे
रडत फुंकणे नकोच आहे

कविता आवडली पण अजून नीट जाणून घेतो आहे. एक दोन ठिकाणी थोडासा वाचताना अडखळलो. निरंजन यांनी म्हणलेली त्यातली एक जागा.

उकीरडे पडक्या वाड्यांत
रडत फुंकणे नकोच आहे

हे कसे वाटेल?

पहिल्या कडव्यात

मी म्हणतो, "विचार, जवळ
चांगला बार असेल तर..."

किंवा

गरीब बिचारा शोधतोय तो
सायबिणीचं पडकं घर -

कवितेच्या मूडला शब्द थोडे जास्त 'करेक्ट' वाटत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

"उकिरडे" कडव्यात बदल केला आहे.

गोव्याच्या कोंकणीत (आणि त्यामुळे मराठीत) शब्दाच्या शेवटला ए->अं बदल होत नाही. घरगुती उच्चारातसुद्धा "ए"च राहातो. त्यामुळे तसेच ठेवले.

"असला तर/असेल तर" जज्जमेंट कॉल आहे. Smile म्हणून आधी होते, तसेच ठेवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. आणि पार्श्वभूमी वाचून आणखीनच जास्त भावली.

अशा 'आकारात' मांडण्याचं काही प्रयोजन आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म्म्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हम्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!