काही एचटीएमेल मदत

लेखातल्या हायपरलिंकवर क्लिक केल्यास ती वेगळ्या टॅब वा खिडकीत उघडण्यासाठी काय कोड टाकावा?
लिंक बनवताना <a href="युआरएल">लिंकचे शब्द</a> अशा प्रकारे लिंक दिली जाते त्यात target="_blank" असा कोड टाकायचा. याच लेखाची लिंक द्यायची असेल तर:
एचटीएमेल मदत अशी देता येते आणि याचा कोड असा आहे.
<a href"http://www.aisiakshare.com/node/339" target="_blank">एचटीएमेल मदत</a>

टेबल कसे बनवावे

पहिली ओळ, पहिला स्तंभ पहिली ओळ, दुसरा स्तंभ
दुसरी ओळ, पहिला स्तंभ दुसरी ओळ, दुसरा स्तंभ

असं टेबल लिहीण्यासाठी वापरलेला कोड असा आहे:
<table border="1">
<tr>
<td>पहिली ओळ, पहिला स्तंभ>
<td>पहिली ओळ, दुसरा स्तंभ>
</tr>
<tr>
<td>दुसरी ओळ, पहिला स्तंभ>
<td>दुसरी ओळ, दुसरा स्तंभ>
</tr>
</table>

लेखातल्या चित्राच्या शेजारी शब्द दिसण्यासाठी काय करावे?
लेखातलं चित्र उजव्या बाजूला दिसण्यासाठी align="right" असा कोड वापरता येतो आणि डाव्या बाजूला दिसण्यासाठी align="left" असा. तो कोड टाकण्याची पद्धत अशी:
<img src="http://flowerinfo.org/wp-content/gallery/lotus-flowers/lotus-flower-14.jpg" alt="कमळ" align="right" vspace=3 hspace=3 width="100" />
हाच कोड वापरून, आंतरजालावरून कमळाचं चित्रं वापरून काही अक्षरं त्याच्या शेजारी टाकली आहेत. यात vspace आणि hspace हे आणखी दोन टॅग्ज वापरून शब्द चित्राला अगदी खेटून उमटणार नाहीत याची काळजी घेतली आहे.

कमळ कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

दुसर्‍या एखाद्या लेखात केलेल्या एचटीएमेल फॉरमॅटींगसारखंच माझ्याही लेखाचं फॉरमॅटींग कसं करावं?
लेखाच्या ज्या भागाचं फॉरमॅटींग उचलायचं आहे तो भाग माऊस वापरून निवडा / सिलेक्ट करा. माऊसचं उजवं बटण दाबून 'View selection source' हे (किंवा अशा प्रकारचं) बटण निवडा. दुसर्‍या विण्डोत एचटीएमेल कोड उघडेल, तो वापरा. अगदी सुरूवातीला कदाचित हे कॉपी-पेस्ट जमणार नाही, पण एचटीएमेलचे टॅग्ज वापरणं अगदीच सोपं आहे.
अगदीच काही जमलं नाही तर "गुगलबाबा जिंदाबाद" या घोषणेचा नाही, पण कृतीचा उपयोग होतोच.

पण मग या सगळ्याची सरळ, वापरण्यास सोपी अशी बटणं कुठे सापडतील?
चित्र डकवण्यासाठी जे बटण वापरता त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला L व R अशी बटणं तयार केलेली आहेत!

मला धाग्यात लिंक द्यायची आहे, कशी द्यावी?
maahiti

योग्य लिंक देऊनही लिंक धाग्यात किंवा प्रतिसादात चालत नाहीये. काय करावं?
लिंक देताना मागे http लावलेलं नसेल तर ड्रूपॉल आपण होऊन मागे www.aisiakshare.com लावतं त्यामुळे मूळची लिंक दिसत नाही. यावर कायमस्वरूपी उपाय काय अजूनतरी सापडलेला नाही. असं होत असल्यास फक्त URL च्या मागे http:// एवढं लावलं की लिंक नीट चालते.

प्रतिक्रिया

छान माहिती. धन्यवाद

अमोल केळकर

मला इथे भेटा

पासवर्द कसा बद्लाय्चा

ऐसीअक्षरेवर स्वागत!
उजवीकडील "माझे खाते" मध्ये जावे. तिथे संपादन या टॅब वर क्लिक करा
तिथे परवलीचा शब्द अर्थात पासवर्ड बदलता येईल.

याव्यतिरिक्त मराठीतून (देवनागरी) टंकनात शंका असल्यास टंकलेखन मदत बघावी.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद

धाग्यात लिंक कशी द्यावी याची माहिती धाग्यात वाढवली आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यूट्यूबवरील व्हिडीयो धाग्यात कसा दाखवायचा, याबद्दल कोणी मदत करू शकेल का?

१. यूट्यूबवर हवा तो व्हिडिओ निवडा. उदा : http://www.youtube.com/watch?v=ekR-6g4vA8Q
२. 'शेअर'वर क्लिक करा.
३. त्यात 'एम्बेड' हा पर्याय निवडा.
४. त्यात दिसेल तो कोड (आयफ्रेम विड्थ वगैरे) कॉपी करा.
५. धाग्यात पेस्ट करा.
उदा :

वर पेस्ट केलेला कोड काढून असा दिसतो.
(इथे काढला) (इथे काढला).

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद.

एखादी ओळ बोल्ड कशी करावी जमत नाही. ओळ सीलेक्ट केली नंतर इनसर्ट शेजारील ठळक अ दाबला तरी होत नाही.
दुसर म्हणजे हे जे खाली इनपुट फारमट चेंज कसा करावा तो फुल ठेवावा असा एक सल्ल्ला मिळाला आहे मी फायर फाक्स वापरतो त्यात हे सर्व कसे करता येईल.

एक प्रयत्न इथे च करुन बघतो ही ओळ बोल्ड होत का.

अरे वा बोल्ड तर जमल पण घरी जमत नाही म्हणजे घरी इनपुट फारमट मध्ये गडबड असावी.

ऐसीवर अजून एक प्रॉब्लेम म्हणजे एकाहून अधिक पॅराग्राफ सिलेक्ट केले तर ते सगळे बोल्ड होत नाहीत. प्रत्येक पॅरा वेगळा सिलेक्ट करून बोल्ड करावा लागतो. इतर संस्थळांवर असे आढळत नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

बोल्ड करण्यासाठी इनपुट फॉरमॅट बदलावा लागणार नाही याची काळजी घेते. (इनपुट फॉरमॅट सतत फुल एचटीएमेल करण्याचा काही काळापूर्वी प्रयत्न केला होता. तेव्हा काहीतरी गंडलं म्हणून सोडून दिलं. अक्षररंग आणि यूट्यूब कोड वगैरे वगळता फुल एचटीएमेलची गरज पडत नाही, त्यामुळे खपून जाईल असाही तेव्हा विचार केला.)

पण ही प्रत्येक परिच्छेदाची भानगड कशी निस्तरावी ते समजत नाहीये.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टेस्ट १
अ.

ब.

टेस्ट २.

अ.

ब.

टेस्ट ३
अ.

ब.

टेस्ट ४. (एकच एंटर)

अ.
ब.

टेस्ट ५ (कलर कोड)

अ.

ब.

टेस्ट ६ (अवतरण)

अ.

ब.

उत्तर: दोनदा एंटर दाबल्यावर आपोआप /b आणि /p येत आहेत. बहुतेक कोडमध्ये कुठेतरी एडीटींग टॅग्स पॅरा आधी बंद करायची लाईन असेल.

/blockquote मात्र येत नाही, अर्थातच.


कळलं. दोन पॅराग्राफमध्ये एक्स्ट्रा लाईन असेल तर बोंबलते. नाहीतर बोल्ड होते.

आता फुल एचटीएमएल न करतासुद्धा बोल्ड झालं.

(स्वगतः बिकांचं काय करावं आता !!!)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी