पिशी मावशीचे टाईममशीन

घोकत विज्ञानाची सूत्रे
भुत्या बनवतो अफाट यंत्रे
नावडले तर फेकुन देतो
अशी तयाची पिसाट तंत्रे ||1||

एके रात्री अजब जाहले
चमत्कार नच ‘आविष्कार’ तो
असे काहिसे यंत्र जाहले
काळ उलंघुनि चालक जातो ||2||

भुत्या गडगडा हसुनि बोलला
‘अफजलखाना पाहुन येतो’
बाहु पसरता खान मियाने
म्हणे ‘नको रे भूतकाळ तो’ ||3||

विज्ञानाचे युग हे आता
भविष्य उज्ज्वल वाटे त्याला
दोन दशक मग पुढती जाउन
हुरळुन गेला भुत्या आपुला ||4||

गेंडवताच्या शहरी जाता
दिपून गेले नेत्र तयाचे
दोन दशक आधीचे खेडे
आता झाले शहर जयाचे ||5||

दोन कोटि लोकांनी गजबजले
टॉवर गगनावेरी गेले
एकावरती एक असे ते
मस्त पुलांचे जाळे दिसले ||6||

रस्त्यावरती फिरुन पाहता
माणुस कोणी दिसतच नाही
गाड्यांमधुनी पळती सारे
चालत जाणे आता नाही ||7||

गाडीमधुनी कुणी उतरता
पायांमधले स्केट तयाचे
मोबाइलचे बटण दाबता
भर भर भर भर धावति सांचे ||8||

स्केट धावती स्वयंचलित ते
त्यांना ऊर्जा सूर्याची ती
आरुढ होणार्‍याची टोपी
धारण करते ‘पॅनल’ वरती ||9||

तशी धावते सुसाट मेट्रो
भूमीगत वा उंचावरुनी
क्षणा क्षणाला विमान उडते
एक एक ते आठ दिशांनी ||10||

कोणि कुणाशी बोलत नाही
थिजले स्नायू सारे चेहेर्‍याचे
हातातिल ती पिसाट यंत्रे
कथिती दुसर्‍यां भाव मनीचे ||11||

असे भटकता दोन प्रहर ते
भुत्यास पहिले झाड मिळाले
टुण् कन फांदीवरती बसता
‘नकली आहे’ त्याला कळले ||12||

चिव चिव कुठुनी ऐकू येते ?
पक्षी एकहि दिसला नाही
तेव्हा कळले फुलांमधुन त्या
स्वर पक्ष्याचा ऐकू येई ||13||

क्षणात दिसला बोर्ड नदीचा
टी.पी. सत्तर नाव तियेचे
भय पाण्याचे आता नाही
बरी पाइपामधुनी वहाते ||14||

बराच फिरला शोधत शेता
परंतु एकहि नाही दिसले
द्राक्ष उसाचे जुने मळेही
दिसले आता भकास रुसले ||15||

घरात बघता डोकावुनिया
स्वयंपाकघर दिसेच ना ते
कपाटातल्या रसायनाचे
घोट घेउनी भूक भागते ||16||

कुणी गुंतला फेसबुकावर
कुणी गुंतली ड्रेसबुकावर
विव्हळणार्‍या थकल्या बापा
मौनातुनची मिळते उत्तर ||17||

‘वैज्ञानिक’ ही ‘प्रगती’ पहाता
भुत्या निघाला शोधत राई
मैलोगणती बघुन हादरला
मोजुन मापुन सपाट भूई ||18||

मसणवटीची राई ज्याच्या
कुशीत वसली निवांत होती
डोंगर तो ही फोडुन नेला
पडक्या दिसल्या चारच भिंती ||19||

जरा पाहता डोकावुनिया
भुत्यास पिशिचा वाडा स्मरला
खोलित जाता पिशी हासली
अन् अश्रूंनी डोळा भरला ||20||

म्हणे ‘वीस वर्षांनी झाली
भेट आपुली भुत्या, कुचकटा
तुझे यंत्र तर चोरुन गेला
दिल्लीमधला एक भामटा’ ||21||

‘आता’ म्हटली ‘सिद्ध जाहले
नवे यंत्र ही बरेचसे ते
प्रयोगांतुनी सुधरुन घेई
अन मग गाठू दिवस जुने ते’ ||22||

एक आठवडा दोघे झटले
अखेर त्यातिल दोषहि मिटले
काळावरती आरुढ होउन
रिव्हर्स दोघे सुसाट सुटले ||23||

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

बाकीची निरीक्षणं मस्त आहेत. फक्त तेवढा '...विव्हळणार्‍या थकल्या बापा..'चा उल्लेख खारट वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद मेघना.
तांत्रिक प्रगतीच्या लाटेमध्ये येऊ घातलेल्या भीषण भविष्याचं ते वर्णन आहे. आजही ही स्थिती पहायला मिळत नाही असं नाही, हो ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

स्थिती अस्तित्वातच नाही असं नव्हे. पण तिचा तांत्रिक प्रगतीशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही.

हे कवितेच्या दृष्टीनं घोर अवांतर आहे, म्हणून पांढर्‍या ठशात : माझ्या आजीच्या वडलांच्या वृद्धापकाळी कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात कोणती तांत्रिक प्रगती होती? पण तेव्हाही त्यांच्या सुनांनी (आणि मुलांनी) त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, अशी एक कथा मी ऐकली आहे. याउलट आज मुंबईतल्या एका उच्चमध्यमवर्गीय तंत्रसुखवस्तू घरात अल्झायमरनं आजारी असणार्‍या एका वृद्ध गृहस्थांची दृष्ट लागेलशी प्रेमानं काळजी घेणारे कुटुंबीयही मी पाहिले आहेत. त्यामुळे तंत्र आलं - प्रेम आटलं... या समजावर माझा अज्याबातच विश्वास नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हं... आपापल्या अनुभवांप्रमाणे आपापली मतं होतात हे खरंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

पांढर्‍या ठश्यातल्या प्रत्येक शब्दाशी मनःपूर्वक सहमत. आधी बघितला नव्हता.

आणखी - "हॉकी स्टिक ऑफ सिव्हिलायझेशन" आठवली. तांत्रिक प्रगती ने भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले - ही बाब उपेक्षित नसून जाणूनबुजुन दरीत ढकलून दिलेली बाब आहे. (आचार्य पोफळे गुरुजी व काका देवासकर यांच्यातल्या स्यादवादी दृष्टीकोनाचा संवाद आठवला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे अविचार.

फार आवडली. मस्त जमली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरूवात छान वाटली, पण नंतर किंचित लांबल्यासारखी वाटली. कवितेत मोजक्या उदाहरणातून आपला मुद्दा वाचकाच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी निबंधाप्रमाणे एकामागोमाग एक मुद्दे आलेले आहेत हे खटकलं.

तांत्रिक प्रगती झाली, प्रेम आटलं वगैरेबाबत मेघनाशी सहमत. पण ही ललित कलाक़ृती असल्यामुळे भावना महत्त्वाची, तथ्याबद्दल वाद घालण्यात फारसा अर्थ नाही हेही खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0