फोडणीचे खमंग डोसे

साहित्यः

१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
मिठ

फोडणीसाठी
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल

पाककृती:
१) प्रथम तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
२) डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून घ्यावे.
३) वरील फोडणी करून ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.

४) आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.

हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.

अधिक टिपा:
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अहाहा उत्तम.

हे तर धिरडे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. आमच्याकडे हा पदार्थ 'रव्याची भाकरी' म्हणून झटपट नाश्त्यासाठी केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा! जागूताईंना इथे बघून फार बरं वाटलं. (पूर्वी इथे काही लिहिलं होतं का हो? असेल, तर माझ्या नजरेतून सुटलं बघा..)

हेच डोसे आमच्याकडे फोडणीऐवजी फोडणीची मिरची / रसाची मिरची / मिरचीचं लोणचं घालून करतात. तेही भारीच लागतात. आमच्याकडे त्याला रव्याचे घावन असं संबोधतात. पण नावात काय आहे!

बाकी काही न घालता नुसतं जिरं घातलं, तरीही त्या धिरड्यांना वेगळीच चव येते. चटणीपुडी आणि दह्यासोबत ती धिरडी भारीच लागतात. तशाच तांदुळाचं पीठ, ठेचलेली(ला) लसूण, किंचित हळद-तिखट-मीठ आणि मेथीपूड असं एकत्र सरसरीत भिजवून केलेल्या आंबोळ्या. त्यांच्यासोबत दूध-गूळ आणि शेजारी लसणीचं केशरी तिखट हवं. नुसती कणीक, गूळ, थोडा रवा आणि पाणी असं भिजवून केलेली गोडसर धिरडीही मस्त लागतात.

काय चवी आठवल्या! धन्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फोडणीची मिरची/रसाची मिरची/मिरचीचे लोणचे..... ह्यालाच कोकणात उसळी मिरची असेही म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण नावात काय आहे!
अगदी बरोबर.
मेघना, सुनिल, गवि धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण नावात काय आहे!

असे कसे?

'फोडणीचा भात', 'फोडणीची पोळी', झालेच तर 'फोडणीचा/ची ब्रेड' या नावांच्या अतिपरिचयामुळे, 'फोडणीचे खमंग डोसे' हे नाव वाचून "च्यायला, काय दिवस आलेत! शिळ्या डोशांनासुद्धा चुरडून, त्यांना फोडणी देऊन रिसायकल करतात वाटते हल्ली मंडळी!" अशी तत्काळ प्रतिक्रिया झाली, आणि "पाहू या तरी आत काय वाट लावली आहे ते!" या कुतूहलापोटी धागा उघडला, तर आत काही वेगळेच निघून अपेक्षाभंग झाला. नाममहिमा नाहीच, असे कोणत्या आधारावर म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय नेमका पदार्थ मागवण्यासाठी अथवा बनवण्यास विनंती करण्यासाठी अथवा स्वतः बनवताना त्याची पूर्वतयारी करताना सामान आणण्यासाठी पदार्थाचे नेमके नाव आणि त्याचे अन्य व्हेरियंट माहिती असणे अत्यावष्यक.

शिवाय उदा दोन्ही व्हिस्क्याच, पण ग्लेनफिडिच वेगळी आणि "रॉयल स्टॅग" वेगळी. नेम इज नॉट जस्ट नेम... !!
किंवा उदा दोन्ही डोसेच, पण दावणगिरी लोणी स्पंज डोसा वेगळा आणि कोण्या सत्कार-सन्मान हॉटेलचा "बटर सादा डोसा" वेगळा.
किंवा दोन्ही वडेच पण लोणीयुक्त सांबारात न्हायलेला गुंटूर वडा वेगळा आणि रस्त्याकडेच्या गाडीवरचा "मेंदूवडा" निराळा.

वगैरे.

नावात बरेच काही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम करे ऐसा हो जाए
तोरे डोसे मोहे मिल जाए
तू जागू sss
मैं डोसे खा जाऊं
तू करती जाए

माफ करा, आपला परिचय नाही, तरी तुमच्या नांवावरुन हे गाणं आठवलं, म्हणून हे विडंबन!

ह. घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विडंबन चांगले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोश्याच्या फोडणीची ही कल्पना चांगलीच वाटते आहे. (आणि पुष्कळ दिवसांनी जागूताईंना पाहूनही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा सोपे अन मस्त आहेत की. दिसतायत पण खासच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच-तेच खाऊन कंटाळा यायला लागला होता. जागूताई जिंदाबाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त!
कदाचीत अवांतर: पाककृतीमधे सगळ्याच साहित्याचे प्रमाण दिले तर आमच्यासारख्यांना सोपे जाते. अगदी पाणी, मीठ, तेल वगैरेंचेपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धिरडा माझा आवडता पदार्थ याला 'डोसा' हे दाक्षिणात्य नाव देणे अनुचित (उद्याची ब्रेकिंग न्यूज - धिरड्याला दक्षिण भारतीय नावदिल्या मुळे मराठी अस्मिता आहत झाली आहे. मुंबेकरांकडून तीव्र निषेध नोंदविण्याची शक्यता आहे, कदाचित कुणी मोर्चा ही घेऊन येईल- काही उद्घोषणा - जय शिवाजी, जय मराठमोळा धीरडा, जय महाराष्ट्र)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धिरडे आणि डोसा यांत जमीनअस्मानाचा फरक आहे, नाही का?

धिरडे हे बेसनाचे बनते, नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धिरडे तांदूळ, कणिक, बेसन, डाळी सर्वप्रकरचे धान्य किंवा त्यांचे मिश्रण पासून धिरडे बनतात. त्यात आपल्या इच्छेनुसार अधिकांश भाज्या ही किसून, पाले भाज्या बारीक कापून किंवा पालक सारख्या वाफवून मिक्सर मधून काढून धान्याच्या मिश्रणात मिसळता येतात. आजगायत सौ.च्या हातून ५०-६० प्रकरचे धिरडे निश्चित खाल्ले असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लसूण-मिरची कापून घतलेले कणकेचे धिरडे मस्त लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावात काय आहे? वेल, म्हटलं तर नाही म्हटलं तर आहे.

एक जुना किस्सा आठवला.

माझा एक वैदर्भिय रूममेट होता. एकदा कोणत्याशा कारणाने मी साबुदाण्याची खिचडी बनवली. चांगली झाली असावी कारण खाल्यावर तो म्हणाला, "साबुदाण्याची उसळ" छान झाली होती!

त्यानंतर उसळ आणि खिचडी यावर आमच्यात एक परिसंवाद झाला. त्यात मला समजले ते असे की, विदर्भात, एखादा पदार्थ 'खिचडी' असण्यासाठी त्यात तांदूळ आणि (कुठलीतरी) डाळ असणे आवश्यक आहे. अन्यथा ती 'उसळ' असते.

त्याला माझ्याकडून जे बोधामृत पाजले गेले ते असे - निदान ठाण्या-मुंबईत तरी, एखादा पदार्थ 'उसळ' असण्यासाठी त्यात (मोड आलेले) कडधान्य असणे गरजेचे असते. अन्यथा ती 'उसळ' नसते.

माझा रूममेट अखिल वैदर्भियांची आणि मी अखिल महामुंबईकरांचे प्रतिनिधित्व करतो, असा आम्हा दोघांचाही दावा नाही! तरीही सदर (उसळ आणि खिचडी)
शब्द हे दोन्ही विभागात वर म्हटलेल्या अर्थाने सहसा वापरले जातात, हे मान्य व्हावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी एक आत्या विदर्भात रहायची. ती कधीतरी आमच्याकडे आली असता हे उसळ आणि खिचडी ही प्रकरणं समजली होती. तेव्हा न पडलेला प्रश्न आता पडला, सगळं काही एकत्र मिसळून टाकण्याला "खिचडी करून टाकली आहे", असा शब्दप्रयोग वापरला जातो. तो विदर्भाकडे वापरतात का?

याच आत्याने मला काहीतरी काम सांगितलं. "तू लाँड्रीतून माझे कपडे आणशील." मी मोठ्ठा सूर लावून "होऽऽऽ, आणेन की" असं म्हटलं आणि अर्थातच कपडे आणले नाहीत. संध्याकाळी मुलगी कशी कामचुकार आहे, तिला काही शिस्त नाही असा उद्धार सुरू झाल्यावर मी आज्ञार्थ आणि विध्यर्थ यावर गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हा विदर्भ-विध्यर्थ असले पाचकळ विनोद न सुचल्यामुळे घरातलं तापमान आणखी वाढलं नाही.

वैदर्भीय लोक बहुदा ढग आले, आभाळ भरून आले की वादळ आलं म्हणतात. हे नक्की आठवत नाही.

अतीच अवांतर - मोड आलेल्या कडधान्यांची भाजी असते त्यामुळे जेवणात वेगळी डाळ करावीच लागणार, असं ज्ञानामृत कानावर आलं तेव्हा मी, "मला भारतीय जेवणाचा कंटाळा आलाय, मी पिझा मागवून खाणार आहे," असं जाहीर केलं आणि स्वयंपाकाच्या गप्पा बंद झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साबूदाण्याच्या उसळीवर (खिचडीवर) सांबार (कोथिंबीर) घालून खाऊ शकणारे केवळ वैदर्भीयच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजरातीतही 'वादळो' (अनेक वचन) म्हणतात आणि हिंदीत अर्थात 'बादल'. विदर्भावर हिंदीची छाया आहे म्हणून ते लोक 'वादळ' म्हणत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहव्वा! सोमवारी झक्क न्याहारी! (तुम्ही धागा टाकला असेल हो शुक्रवारी आम्ही आता उघडला Smile )
जागू तैं ना इथे पाहुनही छान वाटले.

ऐसी अक्षरेवर स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे इथे तर नावावरच वादळ चालू झाल. (हाहाहा...) ह्यापुढे नाव टाकताना व्यवस्थित काळजीपुर्वक टाकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंबट दही पुरेसं नव्हतं म्हणून थोडं सावर क्रिम घातलं होतं. ही झटपट पाककृती सांगितल्याबद्द्ल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजीव कपूर यांच्या एका शो मधे वेगळ्या प्रकारची घावनं पाहिली होती. त्यात थोडा फेर-फार करून अशा प्रकारची घावनं करून पाहिली.

गव्हाचे पिठ साधारण २ वाट्या
बेकिंग पावडर १ छोटा चमचा
ऑलिव ऑईल १ चमचा
मीठ
चिरलेला पालक (मूळ कॄतीत ब्लांच करून लगदा केला होता)
चिरलेला कांदा (मूळ कृतीत कांद्याची पात + मिरच्यांचे तुकडे होते.)
पिठ भिजवण्यापुरते ताक + पाणी (मूळ कृतीत दूध होते.)

पिठ भिजवून १५ मिनिटे झाल्यावर त्याची घावनं घातली आणि लेमन चिली बटर बरोबर खाल्ली.
लेमन चिली बटर असे बनवले.

मीठ न घातलेले बटर मऊसर असताना त्यात लिंबाच्या सालीचा किस आणि चिली फ्लेक्स घालून छान घोटले. हे बटर परत थंड करायला फ्रि़जमधे ठेवले. घावनं तयार झाल्यावर त्यावर हे बटर घालून खाल्ले. या बटरमुळे खास मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते बटर मस्तच वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाच्या उद्याच्या डब्याचा प्रश्न सुटलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच हे बघुन बायकोने हे डोसे केले होते. अहाहा! जागूतै लैच आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

करुन पाहिले..पिठ खुप पातळ ठेवावे लागते..मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त यावरुन आठवलं की अनंत वर्षात कणकेची धिरडी केलेली नाहीत. आज करतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0