Skip to main content

मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आज जिममध्ये ५/६ "ग्लॅमर" नावाच्या मासिकाचे अंक होते अन एक "वीमेन टुडे" चा अंक होता. त्या मॉडेल परफेक्ट बायका पहायला लागू नयेत म्हणून "वीमेन टुडे" चा अंक घेतला तर त्यातही तेच - "How to obtain gravity defying butt", पोट पातळ कसे कराल त्याचे १२ व्यायामप्रकार वगैरे. म्हणजे परत तेच या मासिकातही तेच "अतिरेकी आदर्श शरीराच्या" कल्पना विकणे.
डोकं खरच आऊट होतं. या अपेक्षा पुरषांनी लादल्या अन मग स्त्रियांच्या गळी उतरल्या आहेत की व्हाइसे व्हर्सा? पण इतकं सौष्ठवपूर्ण, नितळ शरीर सामान्य स्त्रियांचे असते का? अन कशाला या अवाजवी अपेक्षा? कशाला ते बोटॉक्स अन खोटे बुब्ज (स्तन)?
अमेरीकेत तर अति अति आहे हे फॅड. अन कॅलिफोर्नियात तर उच्चांक आहे. हे नीरीक्षणावर बेतलेले विधान आहे, त्याला मर्यादा आहेत. पण ५५ वर्षे वयाच्या बायका अतिशय उथळ व बालीश वागताना पाहील्या आहेत, फक्त या हेतूने की वय कमी भासावे.
__________________________________
शिळ्या कढीला ऊत आहे का हा धागा (मनातील विचार)? असावा. पण मला जाम खटकत असेल तर हे सौंदर्याला दिले जाणारे अतिरेकी महत्त्व अन अतिरजित कल्पना. या कल्पनांचे, अपेक्षांचे catalyst पुरुषच आहेत अन स्त्रिया easy pray. की पुरुष मुद्दाम करत नाहीत पण highly visually oriented असतात कोणास ठाऊक. पण तसे असेल तर बहुसंख्य UX designer, पुरुष हवे होते. तसं तर दिसत नाही स्त्रियाही तितक्याच प्रमाणात दिसतात. (परत विदा नाही. फक्त बेफाम नीरीक्षण आहे ;))
असो, As far as I know most women pretty much beat themselves over this "I am not desirable" hang up.
__________________________________
आता कोणीतरी काढणारच - त्यात वाईट काय आहे? अन स्त्रियांनाही तस्सेच वागायचे स्वातंत्र्य आहे की वगैरे.
__________________________________
मध्येच मनात विचार येतो कितीशा स्त्रियांना राजकारण, क्रीडा विषयात गम्य व रुचि असते? पुरषांनाही अपेक्षा असणार की. अन मग त्या पातळीवर बोलता येत नाही म्हणून ते फक्त सौंदर्यावर लक्ष केंद्रित करतात की काय?
की अनेक स्त्रियांना रुचि असते पण मीच त्या गोटात नाहीये? असे अनेक प्रश्न उद्भवतात. अन मुख्य aesthetically अन intellectually, inferior वाटण्यात पर्यवसन होते.

_________________________________
हे सर्व विचार अचानक उफाळून यायचे कारण झीनुबेबीचा "कुर्बानी" कालच पाहीला असल्याचे कारणही असू शकते. ९९% असावे ;) ती काय वट्टास अगदी मारु दिसलेली आहे.

रेड बुल Tue, 10/03/2015 - 01:23

हा धागा सामाजिक आहे की वैयक्तीक याचे भान येइपर्यंत आपला पास.

ऑन सेकंड थॉट (स्त्रि-पुरुष)सौंदर्याचे फार उपयोग असतात हे वास्तव आहे... विशेषतः तुमचे सौन्दर्य तुम्ही जे कोणी आहात त्याची धार वाढवायला अतिशय कामी येते. मग याला महत्व अवास्तव आहे असे का म्हणावे ? ऐकायला विचीत्र वाटेल पण सुंदर असणे आनंदी व यशस्वी असण्याचा फार मोठा भ्रम निर्माण करते(अर्थात हे वास्तवही असु शकतेच).

अवांतर :- Branded २०१२ चित्रपट अवश्य बघा. स्टोरी रेटींग वगैरेचा विचार न करता बघा. एक्सलंट चित्रपट... तसेही जे जे हुच्च तेतेच आम्ही बघत असतो.

वृन्दा Tue, 10/03/2015 - 01:49

In reply to by रेड बुल

मी बरेच जुने धागे वाचत होते अन हे लक्षात आलय की "माझं सततचं हे dumb रडगाणं खरं तर आता थांबवलं पाहीजे." या धाग्याला सर्वांनीच अनुल्लेखाने मारलं तर फार बरं होइल. पण तसं होणार नाहीये कारण विनाकारण हा वैचारीक-contribution-शून्य धागा काढला गेला आहे." :(

रेड बुल Tue, 10/03/2015 - 18:55

In reply to by वृन्दा

पॉप्युलर टु काँट्रारी ओपिनिअन एक प्रयोग म्हणून यापुढे सगळं मनातल्या मनात ठेवायला लागा. काहीही झालं तरी मनातलं तोंडात चुकुनही बाहेर आलं नाही पाहिजे. हवं तर तुम्हाला हेरगीरीचं ट्रेनिंग सुरु आहे समजा. अजीबात वैयक्तीक भावना शेअर करायच्या नाहीत. कोणत्याही प्रकारे. यातुन जे काही बरं वाइट विचारचक्र सुरु होइल ते ही आपल्या मनापुरतेच ठेवायचे व्यक्त व्हायचे नाही. पण ज्या भावना व विचार तुमच्या (मांडलेल्या)नाहीत त्यावर बिंधास्त व्यक्त व्हा भरपुर विचार करा जे तुमचं नाही त्यात हिरीहीरेने सहभागी व्हा, लिखाण करा पण पुन्हा या लिखाणात तुमच्या वैयक्तीक प्रेफर्ड भावना व्यक्त कराय्च्या नाहीत. १ महिना प्रयोग करा. नेमकेपणे केलात तर नेमक्या गोश्टीनी कप इतक भरला असेल की dumb रडगाण्यासाठी जागाच उरणार नाही. दॅट ड्संट मीन dumb रडगाणं निर्माण होणं थांबेल पण तुम्हाला त्यात अडकण्यासाठी आवश्यक रिसोर्स व कारणही मिळणार नाही.

हा प्रयोग कष्टप्रद असुन फक्त स्वजबाबदारीवर करावा एकटेपणा टाळा. यशस्वी झाला तर कधीच मागे वळुन बघावे लागणार नाही झाला नाही तर जवळच्यांना काही दिवस लइ त्रास द्याल

नितिन थत्ते Tue, 10/03/2015 - 07:17

>>मध्येच मनात विचार येतो कितीशा स्त्रियांना राजकारण, क्रीडा विषयात गम्य व रुचि असते?

म्हैला दिनाच्या दुसर्‍याच दिवशी हे विधान? कोण वाचवणार आता तुम्हाला मेघनातै आणि विक्षिप्तबैंपासून?

>> ती काय वट्टास अगदी मारु दिसलेली आहे.
झीनत अमानला मारू म्हटलेले पाहून ......

गब्बर सिंग Tue, 10/03/2015 - 07:30

आज जिममध्ये ५/६ "ग्लॅमर" नावाच्या मासिकाचे अंक होते अन एक "वीमेन टुडे" चा अंक होता. त्या मॉडेल परफेक्ट बायका पहायला लागू नयेत म्हणून "वीमेन टुडे" चा अंक घेतला तर त्यातही तेच - "How to obtain gravity defying butt", पोट पातळ कसे कराल त्याचे १२ व्यायामप्रकार वगैरे. म्हणजे परत तेच या मासिकातही तेच "अतिरेकी आदर्श शरीराच्या" कल्पना विकणे.
डोकं खरच आऊट होतं. या अपेक्षा पुरषांनी लादल्या अन मग स्त्रियांच्या गळी उतरल्या आहेत की व्हाइसे व्हर्सा? पण इतकं सौष्ठवपूर्ण, नितळ शरीर सामान्य स्त्रियांचे असते का? अन कशाला या अवाजवी अपेक्षा? कशाला ते बोटॉक्स अन खोटे बुब्ज (स्तन)?

चिंताजनक प्रश्न.

१) व्यायाम प्रकार शेकडो आहेत. त्यांचे दुष्परिणाम नेमके कोणते ?? अगदी अतिरेकी आदर्श शरीर बाळगण्याची दुर्दम्य इच्छा बाळागणार्‍या व्यक्तीच्या शरीरावर हेल्थ-फ्रीक असण्याचे कोणते अनिष्ट परिणाम होतात ? (तुम्हास त्याचा नेमका काय त्रास होतो ? हा प्रश्न अतिच बेसिक आहे.)

२) कशाला या अवाजवी अपेक्षा ?? - तुमच्या त्यांच्याकडून ???? की त्यांच्या स्वतःकडून ??? कोणाच्या दृष्टीने अवाजवी ?? वाजवी म्हंजे कोणत्या व अवाजवी कोणत्या ??

३) या अपेक्षा पुरषांनी लादल्या अन मग स्त्रियांच्या गळी उतरल्या आहेत की - बलपूर्वक उतरवल्या गेलेल्या आहेत का ??

------

मध्येच मनात विचार येतो कितीशा स्त्रियांना राजकारण, क्रीडा विषयात गम्य व रुचि असते?

इथे पुरुषांनी स्त्रियांना क्राऊड आऊट केलेले आहे अशी नवकल्पना मनास चाटून गेली. या विषयांवर स्त्रिया बोलायला लागल्या की पुरुष याबद्दल इतके बोलतात की स्त्रिया क्राऊड ऑट होत असाव्यात. अँड देन दे लूज देअर इंट्रेष्ट.

adam Tue, 10/03/2015 - 10:55

In reply to by गब्बर सिंग

राजकारण करण्यात स्त्रिया पटाईत असतात; कदाचित राजकारणाबद्दल बोलत मात्र कमी असतील्ही.
क्रीडा :- इतरांना खेळवण्यात देखण्या तरुणी तरबेज. क्रीडा ह्या विषयाबद्दल प्रत्यक्ष बोलत कमी असतीलही.
(हाती पायी धड रहायचं तर आता पळा मनोबा.)

ऋषिकेश Tue, 10/03/2015 - 09:08

यात पुन्हा स्त्री पुरूष करणे मला गैरवाजवी वाटते. जरा गंमतः
================
आज जिममध्ये ५/६ "बिल्डर" नावाच्या मासिकाचे अंक होते अन एक "मेन टुडे" चा अंक होता. त्या मॉडेल परफेक्ट पुरूष पहायला लागू नयेत म्हणून "मेन टुडे" चा अंक घेतला तर त्यातही तेच - "How to obtain gravity defying chest", पोट पातळ कसे कराल त्याचे १२ व्यायामप्रकार वगैरे. म्हणजे परत तेच या मासिकातही तेच "अतिरेकी आदर्श शरीराच्या" कल्पना विकणे.
डोकं खरच आऊट होतं. या अपेक्षा स्त्रियांनी लादल्या अन मग पुरूषांच्या गळी उतरल्या आहेत की व्हाइसे व्हर्सा? पण इतकं सौष्ठवपूर्ण, पिळदार शरीर सामान्य पुरूषांचे असते का? अन कशाला या अवाजवी अपेक्षा? कशाला ते सिक्स पॅक्स अन पहाडासारखी छाती (प्रसंगी ५६ इंची;) )?
भारतात तर अति अति आहे हे फॅड. अन पंजाबात तर उच्चांक आहे. हे नीरीक्षणावर बेतलेले विधान आहे, त्याला मर्यादा आहेत. पण ५५-६० वर्षे वयाचे पुरूष अतिशय बेदरकार व उन्मत्त वागताना पाहीले आहेत, फक्त या हेतूने की अधिक तरूण भासावे.
__________________________________
शिळ्या कढीला ऊत आहे का हा धागा (मनातील विचार)? असावा. पण मला जाम खटकत असेल तर हे सौंदर्याला दिले जाणारे अतिरेकी महत्त्व अन अतिरजित कल्पना. या कल्पनांचे, अपेक्षांचे catalyst स्त्रियाच आहेत अन पुरूष easy pray. की स्त्रिया मुद्दाम करत नाहीत पण highly visually oriented असतात कोणास ठाऊक. पण तसे असेल तर बहुसंख्य आर्किटेक्ट स्त्रिया हव्या होत्या. तसं तर दिसत नाही पुरूषही तितक्याच प्रमाणात दिसतात. (परत विदा नाही. फक्त बेफाम नीरीक्षण आहे )
असो, As far as I know most men pretty much beat themselves over this "I am not desirable" hang up.
__________________________________
आता कोणीतरी काढणारच - त्यात वाईट काय आहे? अन पुरुषांनाही तस्सेच वागायचे स्वातंत्र्य आहे की वगैरे.
__________________________________
मध्येच मनात विचार येतो कितीशा पुरूषांना क्रोशाचे नमुने, पाककृती, गॉसिप विषयात गम्य व रुचि असते? स्त्रियांनाही अपेक्षा असणार की. अन मग त्या पातळीवर बोलता येत नाही म्हणून ते फक्त सौंदर्यावर लक्ष केंद्रित करतात की काय?
की अनेक पुरूषांना रुचि असते पण मीच त्या गोटात नाहीये? असे अनेक प्रश्न उद्भवतात. अन मुख्य aesthetically अन intellectually, inferior वाटण्यात पर्यवसन होते.
_________________________________
हे सर्व विचार अचानक उफाळून यायचे कारण बेनेडिक्टचा शेरलॉकहोम्स कालच पाहीला असल्याचे कारणही असू शकते. ९९% असावे तो काय वट्टास अगदी मारु दिसलेला आहे.

==============

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 13:19

In reply to by ऋषिकेश

मूळ लेखात नसताना, ----------------------- आणि ========================== अशा रेषा का वापरल्या आहेत? त्या फक्त माझ्या प्रतिसादात दिसतात. एरवी तोडके मोडके, फ्लो नसलेले विचार फ्लो मधे आहेत असे भासवायला.

अनु राव Tue, 10/03/2015 - 09:16

मध्येच मनात विचार येतो कितीशा स्त्रियांना राजकारण, क्रीडा विषयात गम्य व रुचि असते? पुरषांनाही अपेक्षा असणार की. अन मग त्या पातळीवर बोलता येत नाही म्हणून ते फक्त सौंदर्यावर लक्ष केंद्रित करतात की काय?

स्त्रीयांना अशी अपेक्षा असते की पुरुषांनी पुरुषांसारखे वागावे आणि पुरुषांना अशी अपेक्षा असते की स्त्री ने स्त्री सारखे वागावे.

मला कोणी पुरुषानी माझ्याशी टीपीकल बायकी विषयांवर बोलावे असे वाटत नाही. ते विषय बोलायला मैत्रिणी आहेत ना. आणि जर कोण्या जवळच्या पुरुषाशी काही बायकी विषय शेयर केला तर त्या वर त्याच्याकडुन फक्त सहमतीच हवी असते ( वेगळा विचार वगैरे नाही )

तसेच पुरुषांना राजकारण, क्रीडा वगैरे विषयात गप्पा मारायच्या असतील तर पुरुष मित्र असतातच ना. पुरुषांना स्त्रीयांनी "पुरुषांच्या" विषयात बोलावे अशी अपेक्षाच नसते, पुरुषांची अपेक्षा असते स्त्री ने तिचे स्त्रीत्व अनुभवास येइल अश्या गोष्टी कराव्यात / बोलाव्यात.

नितिन थत्ते Tue, 10/03/2015 - 09:46

In reply to by अनु राव

>>जर कोण्या जवळच्या पुरुषाशी काही बायकी विषय शेयर केला तर त्या वर त्याच्याकडुन फक्त सहमतीच हवी असते ( वेगळा विचार वगैरे नाही )

मागे मेन्स ब्रेन-वूमन्स ब्रेन असा टेड व्हिडिओ पाहिला होता त्याची आठवण झाली.

If a man talks to you about a problem; he wants you to fix it for him or give a solution. If a wonam talks to you about a problem; she does not want a solution. She just wants to talk about it.

अधोरेखिताची प्रचिती "राइट टु पी" वगैरे धाग्याच्या निमित्ताने आलीच होती.

रेड बुल Tue, 10/03/2015 - 13:14

In reply to by नितिन थत्ते

If a man talks to you about a problem; he wants you to fix it for him or give a solution. If a wonam talks to you about a problem; she does not want a solution. She just wants to talk about it.

बेफाम सत्य _/\_. कंपनीत एक (कुमारीका)टेस्टर होती रोज संध्याकाळी घरी जाताना पार्कींगमधे वैतागुन बोलायची आता ड्राइव करुन घरी पोचायचे, मग स्वयंपाक करायचा, किती वैताग आहे... इतक उशीरा सोदतात इथुन. त्यावेळी पुण्यात बलात्कार वगैरे झालेले न्हवते व स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने रात्र होइ परेंत काम करत थांबवले जात असे. शेवटी मीच विचारले तुला कंपनी बदलायची आहे का ? उत्तर "नाही". लवकर येत नाही म्हणून घरात काही बोलतात का ? "नाही". तुला घरकाम, स्वयंपाकाची सक्ती आहे का ? "नाही". मग प्रॉब्लेम काय आहे ? काहीही नाही... उगाच... एक चर्चा विषय इतकंच. तेंव्हापासुन स्त्रियांच्या तक्रारी हा एक विनोदाचा विषय आहे असेच बराच काळ समजत होतो.

'न'वी बाजू Sun, 15/03/2015 - 17:54

In reply to by रेड बुल

कंपनीत एक (कुमारीका)टेस्टर होती

तुम्हांस कसे ठाऊक?

'न'वी बाजू Mon, 16/03/2015 - 04:06

In reply to by आदूबाळ

त्यांनी 'होती' असा भूतकाळ वापरलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद.

वामन देशमुख Sun, 15/03/2015 - 15:12

In reply to by नितिन थत्ते

"...If a wonam talks to you about a problem..."
हे वाक्य चुकून
"...If a venom talks to you about a problem..."
असे वाचले आणि क्षणभरासाठी आपल्याशी विषकन्या बोलत आहे असा कल्पना मनात तरळून गेली!

adam Tue, 10/03/2015 - 11:02

सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे;
सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे.
.
.
विद्वान स्त्रीला "तू सुम्दर आहेस" असं म्हण्णं हा तिला सन्मान वाटेल.
सुंदर स्त्रीला "तू खूप बुद्धीमान आहेस" असं म्हण्णं तिचा अपमान वाटेल (तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल)

गवि Tue, 10/03/2015 - 11:27

बाकी कोणी असो वा नसो, खुद्द धागाकर्त्या ताई या विषयांशी बांधिलकी बाळगून आहेत असं जनरल निरीक्षण वाटतं.

:)

अगदी या धाग्यापुरतंच मर्यादित चर्वण करायचं तर, जिममधे तरी कशाला जायचं मग?

खास डिझायनर बॉडी नको अन नुसतं जरा अंग सुटसुटीत, हेल्थी रहावं इतका उद्देश सामान्य माणसाला बास आहे.

नुसतं साधं चालणं व्यायाम म्हणून जनरल हेल्थला पुरतं (तेवढंच पाहिजे असताना). त्यामुळे खास कोणतेही अतिरेकी अथवा परफेक्शनिस्ट काँटूर्स आणि शेप्स येत नाहीत.

मसल्स, टोनिंग, ठराविक भागाला टार्गेट करुन खास व्यायाम, स्टीम सोना इत्यादि बाथ्स आणि तत्सम "अनावश्यक" गोष्टींसाठीच जिममधे जावं लागतं.

त्या मासिकात वर्णन केलेल्या स्त्रिया अन पुरुष निदान पूर्णपणे त्या जिम कल्चरला अ‍ॅक्सेप्ट करुन निदान "समाजमान्य" व्याख्येने का होईना परफेक्ट बॉडी, पातळ पोट अन कायकाय अगदी मोजूनमापून करण्यासाठी धडपडतात तरी. पण तेही अतिरेकी, गळी उतरवलेलं असं म्हणत त्याच जिमच्या वेटिंगरुममधे मासिकं वाचणं अन त्या कल्पना "अतिरेकी अन आदर्श" असा विचार करणं कशाला?

शंभर टक्के मार्क टार्गेट केले की कुवतीनुसार ७०, ८० ९०, ९५ मिळतात.

तसल्या परफेक्शनिस्ट कोचिंग क्लासला जायचं, तसल्या ९५+ ओन्ली असं टार्गेट ठेवणार्‍या भारी शाळांमधे जायचं आणि तिथली ध्येयवचनं पाहून ते अभ्यासाचा अतिरेक का करतात? शंभराचा कसला ध्यास असं म्हणायचं हे काय?

त्यापेक्षा साधी म्युनिसिपल शाळा, घरगुती शिकवणी किंवा घरीच पुस्तकं वाचून स्वाध्यायावर गरजेपुरते रास्त मार्क मिळवावेत हे योग्य वाटत नाही का?

ता.क. असाच फील त्या अध्यात्मिक दुकानातल्या अनुभवकथनावरुन आला होता.

वृन्दा Tue, 10/03/2015 - 16:46

In reply to by गवि

हां गवि, अहो मी त्याचा विचार फार पूर्वी केला आहे. व्यायाम हा मुख्य २४ तास मूड चीअरफुल रहायला करायचा असतो. मूडवरती व्यायामाचा प्रचंड परीणाम होतो.

अनु राव Tue, 10/03/2015 - 11:27

तसल्या परफेक्शनिस्ट कोचिंग क्लासला जायचं, तसल्या ९५+ ओन्ली असं टार्गेट ठेवणार्‍या भारी शाळांमधे जायचं आणि तिथली ध्येयवचनं पाहून ते अभ्यासाचा अतिरेक का करतात? शंभराचा कसला ध्यास असं म्हणायचं हे काय?

मुद्द्याचे बोललात गवि.

अजो१२३ Tue, 03/03/2015 - 13:22

नालंदा विश्विद्यालय ६ महिने जळत होते, लाखोंच्या संख्येत पुस्तके नष्ट झाली

श्श्श्श्श्स!!!! हे लेजंड आहे. तथ्यहीन. सतत जळण्याचे एकमात्र उदाहरण सूर्य.

व्यवस्थापकः सदर प्रतिसाद इथून हलवला आहे. मुळ धागा "संस्थळाची माहिती" या सदरातील असल्याने तिथे अनेक नवखे सदस्य संदर्भासाठी येतात. त्यामुळे तिथे विषयाशी संबंधित चर्चा झाली तर उत्तम या भुमिकेतून हा प्रतिसाद हलवला आहे.

बॅटमॅन Tue, 03/03/2015 - 13:31

In reply to by अजो१२३

नालंदा, बगदाद, अलेक्झांड्रिया, इ. सर्व युनवर्शिट्या अन लैब्रर्‍या जळत असल्याचे वर्णन करतानाचे काही टिपिकल वाक्प्रचार आहेत हे. सहा महिने जळणे, पुस्तकांची शाई नदीत जाऊन नदीचे पाणी काळे व रक्ताने लाल होणे, इ.इ.

बाकी काही असो, पण आयसिसने आपल्या परंपरेचं नाव राखलं.

अजो१२३ Tue, 03/03/2015 - 13:41

In reply to by बॅटमॅन

लोक मुसलमानांनी गेल्या काळात अत्याचार केले यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. खासकरून ते अत्याचाराचे टिपिकल रूप. आय एस आय एस ने या लोकांना पुरावा दिला आहे. बाबरी मस्जिद प्रश्नात उजव्या लोकांना "तांत्रिक" प्रतलावर देखिल तोंडे बंद ठेवायला सांगणारांची तोंडे लपवायला जागा उरलेली नाही.

बॅटमॅन Tue, 03/03/2015 - 14:38

In reply to by अजो१२३

वाळूत डोके खुपसून बसलेल्यांना आयसिसचं काही वाटत नाही. त्याच्या सपोर्टकरिता भारतातूनही काही लोक तिकडे मरायला गेले हेही त्यांना योग्यच वाटत असेल. शेवटी तेही एक अभिव्यक्तिस्वातंत्र्यच आहे. भारतात हिंदूंच्या बाजूने काही बोललं की मग मात्र ती बहुसंख्यांची दांडगाई होते.

शिवाय असं काही लिहिलं की प्रतिसादही दांडगाईने दाबला जातो कैकदा.

माझे भाकित अगदी त्वरित खरे केल्याबद्दल दांडगाई करणारांना बहुत धन्यवाद!

अजो१२३ Tue, 03/03/2015 - 16:47

In reply to by बॅटमॅन

"काही लोक" म्हणणं मिसलिडिंग आहे. (भारतात आय एस आय एस चे झेंडे चूकून (सौजन्य - उमर) काश्मिरात दाखवले गेले. पण त्यांचाही आय एस आय एस ला सपोर्ट विरला आहे. असो. ) १७ कोटी लोकांतले "काही" म्हणजे पुन्हा प्रचंड संख्या होते. तसं अज्जिबात नाही.

'न'वी बाजू Sun, 15/03/2015 - 18:54

In reply to by बॅटमॅन

चंगीझखान वै मोगल (मंगोल) लोक त्यांनी अत्याचार केले त्या काळी मुसलमान होते का हो?

हे वाक्य मी

चंगीझखान वै मोगल (मंगोल) लोकांनी अत्याचार केले त्या काळी (ते लोक - बोले तो, चंगीझखान आणि त्याची मंगोलचमू) मुसलमान होते का हो?

असे पार्स केले.

त्या काळी मुसलमान लोक अस्तित्वात होते.

चंगीझखानाच्या काळात मुसलमान लोक (जगात कोठेतरी) अस्तित्वात होते, याबद्दल वाद नाही. (फार कशाला, हे थोडेसे अवांतर होत आहे, पण, महाभारतकाळातसुद्धा मुसलमान अस्तित्वात होते, आणि तेही आर्यावर्तात! द्रौपदीचे 'पाञ्चाली' हे नाव यास साक्षी आहे. 'जिस के पाँच अली, वह पाञ्चाली' अशी साधीसोपी व्युत्पत्ती आहे. 'अली' हे नाव किंवा नामप्रत्यय मुसलमानांव्यतिरिक्त इतरांत कधी ऐकले आहेत काय? पण ते एक असो.) प्रश्न तो नाही.

प्रश्न असा आहे, की चंगीझखान आणि त्याच्याबरोबरची मंगोलमंडळी (ज्यांचा वारसा मोगलमंडळी सांगत असत) या लोकांनी जेव्हा अत्याचार केले, तेव्हा (ते अत्याचार करते वेळी) ते लोक (बोले तो, चंगीझखानच नव्हे, पण एकंदरीतच तत्कालीन मंगोलमंडळी) हे मुसलमान होते काय? (त्यांचे काही वंशज पुढे नंतर कधीतरी मुसलमान झाले असल्यास गोष्ट वेगळी.)

असा त्यांचा प्रश्न आहे, असे मला वाटते. (चूभूद्याघ्या.)

अनुप ढेरे Tue, 10/03/2015 - 18:02

ब्रिटीश पूर्व भारतात लिखित कायदे आणि त्या कायद्याप्रमाणे चालणारी कोर्टं अशी व्यवस्था होती का कुठे भारतात? आणि ब्रिटीश काळात संस्थानांमध्ये ब्रिटीश कायदे लागू होते का?

आदूबाळ Tue, 10/03/2015 - 18:29

In reply to by अनुप ढेरे

आणि ब्रिटीश काळात संस्थानांमध्ये ब्रिटीश कायदे लागू होते का?

नसावेत.

(१) श्री. ना. पेंडशांच्या "तुंबाडचे खोत" मध्ये बजापाची गर्ल्फ्रेंड जुलालीच्या पूर्वेतिहासाबद्दल असं काहीसं लिहिलं आहे - ती एका संस्थानिकाची मुलगी असते, आणि तिचं संगीतशिक्षकावर प्रेम बसतं. हे संस्थानिकाला कळल्यावर तो त्या शिक्षकाच्या अंगावर मारेकरी घालतो. पाठलागाचा शीन होतो, आणि ब्रिटिश हद्द समोर दिसत असतानाच मारेकरी त्याला गाठतात.

म्हणजे ब्रिटिश हद्दीत असं काही होतं (कायदा, सुव्यवस्था) जे संस्थानाच्या हद्दीत नव्हतं. त्यामुळे ब्रिटिश कायदे संस्थानात लागू होत नसावेत असं मानायला जागा आहे.

(२) "अहमदभाई उमरभाई" या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आयकर खटल्यात करदात्याला हैद्राबाद संस्थानात तेलाची विक्री करून मिळालेला नफा १९२२ सालच्या आयकर कायद्याच्या कक्षेबाहेरचा मानलेला आहे.

अनुप ढेरे Tue, 10/03/2015 - 18:36

In reply to by आदूबाळ

धन्यवाद.
सो आम्हाला ट्याक्स द्या आणि तुम्ही संस्थानात वाटेल तो गोंधळ घाला असा काहीसा अप्रोच होता असं म्हणता येईल का?

आदूबाळ Tue, 10/03/2015 - 19:00

In reply to by अनुप ढेरे

नाही नाही, तसं नव्हे. संस्थानांत आणि ब्रिटिश इंडियात आयकराची कशी वाटणी होत असे याबद्दल कल्पना नाही. ती केसही याबद्दल नाही.

अहमदभाई उमरभाईची केस (माझ्या आठवणीप्रमाणे) अशी काहीशी आहे:

अहमदभाई उमरभाई कंपनी ("अ.उ.कं") चे तेलाचे घाणे हैद्राबाद संस्थानात होते, आणि विक्री हैद्राबाद संस्थानात आणि ब्रिटिश इंडियात होत असे. आयकर कायदा फक्त ब्रिटिश इंडियातल्या नफ्यावर आकारला जायचा (income accruing and arising in British India)

हैद्राबादेत उत्पादन + हैद्राबादेत विक्री ==> ब्रिटिश इंडियातला आयकर लागू नाही (हैद्राबादेतला असू शकतो.) या मुद्द्यावर कधीच कोणाचंच भांडण नव्हतं. (हाच रेफरन्स वरच्या प्रतिसादात होता.)

हैद्राबादेत उत्पादन + ब्रिटिश इंडियात विक्री ==> सरकार म्हणत होतं की विक्री ब्रिटिश इंडियात झाली आहे म्हणजे नफाही ब्रिटिश इंडियातच "अक्रू अ‍ॅण्ड अराईज" झाला आहे. अ.उ.कं म्हणत होती की उत्पादन हा विक्रीचा / व्हॅल्यू चेनचा अविभाज्य घटक आहे, आणि त्यामुळे नफ्याचा काही भाग उत्पादनाच्या ठिकाणी (पक्षी: हैद्राबादेत) अक्रू आणि अराईज होतो.

अ.उ.कं. जिंकली, पण तो एकमताने घेतलेला निर्णय नव्हता.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 12:46

In reply to by अनुप ढेरे

सगळीकडेच होती थोड्याफार प्रमाणात. 'फक्त' लिखित कायद्याप्रमाणे नव्हती, तर परंपरा + लिखित कायदा (म्ह. स्मृतिग्रंथ) यांना अनुसरून निर्णय दिले जात असत. अधिक माहितीकरिता विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे द ज्युडिशिअल सिस्टिम ऑफ मराठाज़ नामक पुस्तक इथे पाहता येईल

https://archive.org/details/judicialsystemof029313mbp

शिवाय इस्लामी राज्यसत्ता असतानाही शरिया वगैरेंच्या आधारे न्यायदान केले जातच असे.

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 13:59

In reply to by अनुप ढेरे

यंदाच्या साधनेच्या दिवाळी अंकात 'जागतिक न्यायदानामध्ये शरियाचे उमटलेले पडसाद' अशा विषयावर संध्या गोखले यांचा लेख आहे. वाचनीय आहे.

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 18:23

इंटनेटवर पत्ते* लिहिताना कधी कधी दिलेल्या पत्त्यात आपणहून %२०** चार पाच दा घुसडते. तरीही साइट खुलते. हा काय प्रकार आहे?
----------------
*मंजे सायटीचा अ‍ॅड्रेस
**%20. अजून दुसरं कै नै.

अतिशहाणा Tue, 10/03/2015 - 18:31

In reply to by अजो१२३

लिंक (यूआरएल) मध्ये मोकळी जागा (स्पेस) (व असे इतर अनसेफ कॅरॅक्टर्स) असण्यास परवानगी नाही. जर ती असल्यास यूआरएलचे 'शुद्धीकरण' करण्यासाठी ती स्पेस %20 ने बदलली जाते.
सोप्या भाषेत प्राथमिक माहिती.
http://www.w3schools.com/tags/ref_urlencode.asp

थोड्या क्लिष्ट भाषेत
http://www.blooberry.com/indexdot/html/topics/urlencoding.htm

अतिशहाणा Tue, 10/03/2015 - 19:14

In reply to by अजो१२३

जन्विन यूआरएल असेल तर त्यात स्पेस असू नये असाच संकेत आहे. स्पेस घुसडल्याने %२० चा उपाय करावा लागतो. मुळात यूआरएल कुठे 'संपते' हे शोधण्यासाठी 'स्पेससदृश' गोष्टींचा वापर करावा लागतो. त्यामुळे यूआरएलच्या मध्येच स्पेस असेल तर पूर्ण यूआरल मिळवण्यासाठी तर %२० वापरावे लागते.

एकंदर स्ट्रींग पार्सिंगबाबत अधिक कुतूहल असल्यास हे वाचा. यूआरएलबाबतही ब्राऊजरमध्ये साधारण असेच लॉजिक वापरले जाते.

http://en.wikipedia.org/wiki/Lexical_analysis#Tokenization

नगरीनिरंजन Tue, 10/03/2015 - 19:44

आजच चेपुवर पोस्ट वाचली की सगळ्या स्त्रिया आपल्या शरीराबद्दल समाधानी झाल्या तर किती उद्योग धंदे बंद पडतील याचा विचार करा.
याचाच विस्तार म्हणजे सगळ्या माणसांनी दुसर्‍या कोणाशीतरी तुलना करणे सोडून दिल्यास किती उद्योगधंदे बंद पडतील?

ॲमी Wed, 11/03/2015 - 08:39

मुळ धाग्यावरून मनात आलेला प्रश्न:
भारतातील सर्वसामान्य स्त्रिया जनरली बॉटम हेवी असतात. सर्वसामान्य पाश्चात्य स्त्रियांच काय?
चिंतातुर जंतू, चित्रगुप्त वगैरेंनी टाकलेली जुनी चित्र पाहिल्यावर त्यातही स्त्रिया बॉटम हेवीच दिसतात. मग ३६-२४-३६ हे नक्की कधी चालू झालं? इम्प्लांटचा शोध लागल्यावर?

नितिन थत्ते Wed, 11/03/2015 - 09:11

In reply to by ॲमी

माप ३६ इंच की १०८ अंगुलं हे सोडा.... मानव गुहेत रहात असेल तेव्हापासूनच असणार- नितम्बिनी + कुम्भिनी, उत्क्रांतीचा रेटा वगैरे......

adam Wed, 11/03/2015 - 09:27

In reply to by ॲमी

धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं ( http://www.aisiakshare.com/node/3790 )
.
.
खूपशा बाबतीत, जे जे अमेरिकेत लोकप्रिय , तो तो जगाच्या लोकप्रियतेचा मानदंडच होउन जातो.
माझ्या माहितीप्रमाणे ३६-२४-३६ हे फ्याड अगदि अलीकडे म्हणजे पन्नासच्या दशकानंतर आलेलं आहे.
ही फिगर/ हा बांधा / हे मोजमाप मर्लिन मन्रोचं असल्याचं मानलं जातं.
ती कलाकार, अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय असेल ; त्याहून किमान शेकडोपट लोकप्रिय तिच्या निव्वळ मोहक,मादकतेमुळे होते.
तिच्याबद्दल जबरदस्त शारीरिक आकर्षण अमेरिकन समाजात होतं.
ते इतकं होतं; की तिचं मोजमाप हे चिकणेपणाचा मानदंड होउन गेलं.
वैद्यकीय शाखेत किंवा इतरत्र ह्या मापाबद्दल इतकं काही काटेकोरपणे लिहिलेलं नाही.
.
.
एखादी स्त्रीचं मोजमाप जितकं ह्या मापनाच्या जवळ तितकी ती शारिरीकदृष्ट्या अधिक टक्के मर्लिन मन्रोसारखी!
अदरवाइज त्यात काय विंट्रेष्टिंग नाय.
.
.
पाश्चात्त्य जगात विशीतल्या दशकात काही नृत्य प्रकारात स्त्रिया टाइट ड्रेस घालत आणि आपले छातीचे उभार अधिकाधिक सपाट दिसावेत असा प्रयत्न करीत.
त्या काळात ते आकर्षक मानलं जाई. नंतर अजून दोन चार दशकांतच असे उभार दिसणं, मुलगी उफाड्याची दिसणं हेच पुन्हा आकर्षक मानलं जायला लागलं.

सुनील Wed, 11/03/2015 - 11:55

In reply to by adam

एखादी स्त्रीचं मोजमाप जितकं ह्या मापनाच्या जवळ तितकी ती शारिरीकदृष्ट्या अधिक टक्के मर्लिन मन्रोसारखी!
अदरवाइज त्यात काय विंट्रेष्टिंग नाय

मर्लिन मन्रोचीच समकालीन मधुबाला (४०-४०-४०) ही आपल्याकडे सौंदर्याचा अ‍ॅटम्बाँब मानली जात होतीच की! ;)

सुनील Wed, 11/03/2015 - 12:45

In reply to by गवि

अतिशयोक्ती सोडा. पण मधुबाला म्हणजे गोग्गोड चेहर्‍याचे पिंप (मराठी शब्द!) नव्हे काय?

गब्बर सिंग Wed, 11/03/2015 - 12:34

In reply to by adam

माझ्या माहितीप्रमाणे ३६-२४-३६ हे फ्याड अगदि अलीकडे म्हणजे पन्नासच्या दशकानंतर आलेलं आहे.

मनोबा, जमाना काफी बदल गया है.

(यावर कोणताही प्रतिप्रश्न विचारू नये.)

रेड बुल Wed, 11/03/2015 - 16:07

In reply to by adam

@मनोबा...

वैद्यकीय शाखेत किंवा इतरत्र (३६-२४-३६) ह्या मापाबद्दल इतकं काही काटेकोरपणे लिहिलेलं नाही.

वैद्यकशास्त्र म्हणते ही शारीरीक ठेवण निरोगी उत्साही स्त्रिला लाभणे अशक्य आहे.

ॲमी Wed, 11/03/2015 - 10:01

In reply to by ॲमी

थत्ते, मनोबा आभार!
पण माझा प्रश्न किंचीत वेगळा आहे. माप ३६ की ४० यापेक्षा छाती आणि नितंब यांचा रेशे १:१ किंवा १+:१ असे पामेला अँडरसनीकरण इम्प्लांटच्या शोधानंतरच झाले असावे. नैसर्गिकरित्या कुठल्या वंशात असे आहे का?

नितिन थत्ते Wed, 11/03/2015 - 10:19

In reply to by ॲमी

नैसर्गिकरीत्या काहींचे उरोज असतीलही तसे.

पण एखादी गोष्ट सुंदर म्हटल्यावर ती अधिक ताणण्याची प्रवृत्ती बनत असावी. लांब केस सुंदर म्हटल्यावर कमरेपर्यंतचे* केस सुंदर समजणे ठीक आहे पण केशतेलांच्या जाहिरातीत वरच्या मजल्यावरच्या बाईचे केस खालच्या मजल्यावर आलेले दाखवतात तसं आहे.

*खरे तर गुडघ्यापर्यंतचे केस ही सुद्धा अ‍ॅबनॉर्मलिटी समजायला हवी.

पण मनोबा म्हणतात तसं हे अमेरिकनिस्ट नाही. आपल्याकडे पण असावे.

adam Wed, 11/03/2015 - 10:50

In reply to by नितिन थत्ते

" पारंपरिकदृष्ट्या हेच माप लय भारी "(३६-२४-३६) हे इतके काटेकोर पारंपरिकरित्या आपल्याकडे सर्वत्र मानत नसावेत असे मला वाटते.
विविध टाइपच्या बायका सांगितलेल्या दिसतात. त्यात तुम्ही म्हणता ती गोष्ट आहे; पण तेवढी एकच गोष्ट काय ती सुंदर असलं काय नसावे.
वृन्दा, बतमन, कोल्हटकर हे लोक देत असतात तसल्या संस्कृत श्लोकांत गुबगुबीत व आकर्षक स्त्रियांचीही वर्णनं आहेत.
आरामात बसलेली असताना पार्वतीच्या पुष्ट पोटाला पडलेल्या वळ्यांचीही वर्णनं आहेत.
भरल्या अंगाच्या अप्सराही मोप सापडतील. भरल्या अंगाच्या म्हणजे फक्त छाती व कंबर भरीव असं नाही.
ओव्हरऑल गुबगुबीत. आणि तुम्ही म्हणताय तशाही क्याटेगरीच्या मुलींच्या सौंदर्याची स्तुती आहे.
थोडक्यात सांगायचं तर विविध प्रकारच्या सौंदर्याची तारिफ केलेली आहे.
प्रियांका चोप्रा -- दिपिका पदुकोणही मस्त; विद्या बालनही झकास, अशा टाइपचं ते कवतिक आहे.
.
.
फार दूर कशाला जायचं. पंजाबी समाजमनात काय आहे त्याचं झकास चित्रण आहे 'रंग दे बसंती ' मध्ये.
सोहा अली खान आमिरच्या आईला भेटते तेव्हा ती "किती वाळलिस गं पोरी, बारीक झालिस बरीच" म्हणते;
व ह्यावर सोहा अली खान खुश होते. त्यावर आमिरची आई थेट " इतकी वाळकी असशील तर नऊ महिने पोटात पोर कसे सांभाळशील.चांगली भरीव हो(पक्षी :- बारीक होण्याचे फ्याड डोक्यातून काढ. धष्ट पुष्ट असणेच चांगले)" अशा अर्थाचं उत्तर देते.
.
.
'नमस्ते लंडन'मध्येही लंडनहून भारतात आलेल्या कत्रिनाच्या प्रसंगांमध्ये हे जाणवतं.
.
.
कोल्हटकर , वृन्दा, बतमन आणि इतर संस्कृत वाचणारी माणसे शांत राहून माझ्या अज्ञानाच्या प्रदर्शानाची मूकपणे गंमत पाहत आहेत असे वाटते.

वृन्दा Thu, 12/03/2015 - 23:46

In reply to by adam

पुरषांच्या दृष्टीने "सरसकट" माहीत नाही ब्वॉ पण त्या लॅटीनो टंच (=गच्च) सुंदरी फार गोड वाटतात. अन कपडे किती आखूड असावे याचा त्या विधीनिषेध न बाळगल्याने पहायला आवडतात. बाकी आफ्रो-अमेरीकन बायकांचे नितंब कायच्या काई टंच असतात. तो अतिरेकही खास आवडत नाही.
_________

विविध टाइपच्या बायका सांगितलेल्या दिसतात. त्यात तुम्ही म्हणता ती गोष्ट आहे; पण तेवढी एकच गोष्ट काय ती सुंदर असलं काय नसावे.

त्या कामसूत्रमधल्या (बहुतेक) पद्मिनी/हस्तिनी वगैरे का रे?
______

आरामात बसलेली असताना पार्वतीच्या पुष्ट पोटाला पडलेल्या वळ्यांचीही वर्णनं आहेत.

३ वळ्या पडणं हे सौंदर्याचे लक्षण मानतात असे कॉलेजमध्ये एका मैत्रिणीने ज्ञान दिले होते.

सुनील Wed, 11/03/2015 - 10:14

In reply to by ॲमी

पामेला अँडरसनीकरण इम्प्लांटच्या शोधानंतरच झाले असावे

नै हो!

कालमापनासाठी वालुकायंत्रे वापरली जात, तेव्हापासूनचे आहे ते!! ;)

ॲमी Wed, 11/03/2015 - 13:13

In reply to by चिंतातुर जंतू

चांगली होती ती लेखमाला. अपुर्णच आहे वाटतं. वाचते सगळे भाग परत.

पहिल्या भागातल्या मातृदेवतांचे ओघळलेले स्तन नैसर्गिक वाटतायत. थत्तेंनी दिलेल्या फोटोतल्याएवढे पुष्ट स्तन नैसर्गिकरित्याच एवढे फर्म फार काळ राहणार नाहीत. यावरून भारतात पुरातन काळापासून इम्प्लांट अस्तित्वात होते असे म्हणता येईल ;-)

यात आधीचा आदर्शवाद जाऊन शरीराचं चित्रण थोडं वास्तववादी झालेलं दिसतं. तशीच ही अॅफ्रोडाईट उर्फ प्युडिक
व्हीनस पाहा (ख्रिस्तपूर्व चौथं शतक) >> एक्झेक्टली! ती प्युडिक व्हीनस वास्तववादी वाटतेय. उरोज:नितंब रेशो १:१ नाही.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 13:38

In reply to by ॲमी

पहिल्या भागातल्या मातृदेवतांचे ओघळलेले स्तन नैसर्गिक वाटतायत. थत्तेंनी दिलेल्या फोटोतल्याएवढे पुष्ट स्तन नैसर्गिकरित्याच एवढे फर्म फार काळ राहणार नाहीत. यावरून भारतात पुरातन काळापासून इम्प्लांट अस्तित्वात होते असे म्हणता येईल

रिचर्ड बर्टन साहेबांचे याबद्दलचे एक निरीक्षण जाता जाता नोंदवायला हरकत नसावी. तो म्हणतो की हे ओघळणं उत्तरेकडे जास्त होतं, तर महाराष्ट्रात पोरं होऊनही तुलनेनं कमी होतं. त्याचा जीवनकाळ १८२१-१८९० आणि भारतात होता ते १८५० पासून काही वर्षे पुढे. सध्या जर यात काही फरक पडला असेल तर माहिती नाही.

रुची Thu, 12/03/2015 - 21:53

In reply to by बॅटमॅन

तो म्हणतो की हे ओघळणं उत्तरेकडे जास्त होतं, तर महाराष्ट्रात पोरं होऊनही तुलनेनं कमी होतं.

अरारा..उगीचच महाराष्ट्र सोडून इकडे उत्तर ध्रुवावर रहायला आले म्हणायचे! :D

बॅटमॅन Thu, 12/03/2015 - 23:04

In reply to by रुची

ळॉळ.

हा संदर्भ रिचर्ड बर्टनच्या बाळ सामंतलिखित 'शापित यक्ष' नामक चरित्रात आहे. नेमका पान क्र. सांगू शकत नाही कारण पुस्तक सध्या समोर नाही. यावच्छक्य त्या पानाचा फोटोच टाकतो.

आदूबाळ Wed, 11/03/2015 - 15:39

"जिंदगी" या शब्दाचा उगम बहुदा फारसी आहे. त्याचे "आयुष्य" (उदा. "जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम") आणि "मालमत्ता" (उदा. "भूमी आणि जिंदगी कार्यालय") असे दोन होतात. असं का? असे भलतेच अर्थ का चिकटले आहेत? मूळ फारसीतही दोन अर्थ आहेत का?

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 15:44

In reply to by आदूबाळ

उगम फारसी आहे हे बरोबर. पण त्या कार्यालयाच्या नावाचा उगम एखाद्या इंग्लिश नावाच्या शब्दशः भाषांतरात नसेल कशावरून? एकूण घाट पाहता तसाच संशय येतोय खरा. बाकी फारसीत त्या शब्दाचा अजूनेक अर्थ असल्यास माहिती नाही.

गवि Wed, 11/03/2015 - 16:15

गोवंशहत्याबंदीविषयी बातमीच्या धाग्यात भरपूर चर्चा झाली आहे. एक मुद्दा प्रश्न या स्वरुपात अजूनतरी विशेष उल्लेखिला गेलेला दिसला नाही तो म्हणजे एकेका लहान शेतकर्‍याला ऑपरेशनल कॉस्टवर आधारित किंमत मिळत नसेल असे गृहीत धरले तरी दुग्धोत्पादन व्यवसाय हा बराच मोठा व्यवसाय आहे आणि अनेक ठिकाणी मोठे संघ / कंपन्या यात आहेत हे लक्षात घेऊन आता गायीला दुभतेपण संपल्यावरही उर्वरित आयुष्यासाठी पोसण्याचा वाढीव खर्च हा दुधाच्या उत्पादनखर्चात वाढीव धरला जाऊन दुधाच्या किंमती प्रचंड वाढतील असं वाटतं का ?

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 16:20

In reply to by गवि

भाव वाढणार नाहित मात्र अशा गाईंची अन्य राज्यात (जिथे अशी बंदी नाही) निर्यात वाढिस लागू शकेल.
मोठे व्यावसायिक जे शेकडो गाई पाळून हा व्यवसाय करतात त्यांचा कॉस्ट-बेनिफिट अनलिसीस या गाई अन्य राज्यात धाडल्याशिवाय फायद्यात दिसणार नाही.

मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे म्हशी तुलनेने कमी प्रमाणात आहेत, तिथे चामड्याच्या वस्तु महाग होतील असे दिसते.

मिहिर Tue, 10/03/2015 - 11:36

आपण होऊन स्वतःचे सदस्यनाम बदलता येण्यावर बंदी आली पाहिजे बुवा!
आंतरजालावर सदस्यनाम ही सदस्याची ओळख असते. चर्चेमध्ये, व्यनिंमध्ये, खरडींमध्ये अचानक नाव बदलेले दिसले की फार गोंधळ होतो. समांतर उदाहरण म्हणून कोणी व्यक्ती जर रोज आपला चेहरा बदलून (प्लॅस्टिक सर्जरी करून वा मुखवटा वापरून) वावरू लागली तर काय होईल? आणि मग 'तुझ्या गळ्यावर तीळ दिसतोय, म्हणजे परवा ज्याच्याशी बोललो होतो तो तूच की' अशा प्रकारे ओळख पटवून संवाद चालू ठेवणे हे कसे वाटते? (इथे चेहरा ही प्रत्यक्ष आयुष्यातली प्राथमिक ओळख गृहीत धरली आहे, जालावरच्या सदस्यनामाला समांतर. गळ्यावरचा तीळ म्हणजे जालावरचा बिल्ला क्रमांक वगैरे). ज्यांना तेच नाव वापरायचा कंटाळा येतो किंवा जगाला काही तात्कालिक संदेश द्यावा वाटतो त्यांनी वाटल्यास स्वाक्षरीत लिहीत जावे, केवळ मला कंटाळा येतो म्हणून बाकी सदस्यांना त्रास व्हावा हे पटत नाही (आणि इथे ओळख तीच हवी आहे, पूर्ण वेगळी ओळख हवी असल्यास प्रश्न नाही).
ऐसीवर संपादक (/व्यवस्थापक) नेहमी उपलब्ध असतात. अगदीच जर एखाद्याला वाटले बऱ्याच काळाने नाव बदलावेसे, तर संपादकांना विनंती करून बदलता येईल.

गवि Wed, 11/03/2015 - 13:56

In reply to by मिहिर

वारंवार सदस्यनाम बदलू नये या सूचनेशी सहमत आहे. सदस्य अ‍ॅक्टिव्ह, विशेषतः इंटरअ‍ॅक्टिव्ह असल्यास इतरांना ते त्रासाचं होतं हे नक्की.

पण तसा नियम अथवा सक्ती करावी की नाही याविषयी शंका आहे.

खरंतर सदस्यनाम बदलायचं असेल तर आधीच्या आयडीला विसर्जित करुन नवीन आयडी घ्यावा हे जास्त बरे.

कारण नुसते नाव बदलूनही ती व्यक्ती ट्रेसेबल राहतेच आणि त्यामुळे बदल या दृष्टीने तसा त्याचा काहीच फायदा नाहीच.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 14:12

In reply to by गवि

+१ नावबदल्यांचं त्यांना ती मुभा हवी पण असे नाव बदलणे मलाही सुयोग्य वाटत नाही.
----
त्यामुळे कित्येकदा जुने प्रतिसादही संदर्भरहित वाटतात. उदा. नगरीनिरंजन घासकडवी पैजेचा अख्खा धागा दोघेही आपापली नावे बदलून इन्व्हॅलिड करू शकतात

वृन्दा Thu, 12/03/2015 - 23:30

In reply to by ऋषिकेश

त्यामुळे कित्येकदा जुने प्रतिसादही संदर्भरहित वाटतात. उदा. नगरीनिरंजन घासकडवी पैजेचा अख्खा धागा दोघेही आपापली नावे बदलून इन्व्हॅलिड करू शकतात

ह्म्म रोचक मुद्दा आहे. पण काही सदस्य नाव-बदल सुविधेचे अति-स्वातंत्र्य घेत असल्याचे माझ्याही निदर्शनास आले आहे ;) त्यांना द्या बुवा ताकीद. गरजच आहे ताकीदीची :)

नितिन थत्ते Fri, 13/03/2015 - 08:35

In reply to by वृन्दा

शुचि आजी त्यातल्या एक आहेत का?

पण कर्केतला सिंह आणि गुरूतला मेष असं कायतरी लिहून त्या आपली ओळख देतच राहतात.

ॲमी Wed, 11/03/2015 - 14:03

In reply to by मिहिर

असहमत.
मुळात बर्यापैकी फ्रिक्वेंटली नाव बदलणारे असे किती अॅक्टीव्ह सदस्य आहेत? मग त्यासाठी सगळ्यांचीच सोय का काढून घ्यायची? खर्या आयुष्यात नावबदल अवघड आहे; जालिय आयुष्याततरी सोप्पा असूदेत.
बादवे ओपनली डूआयडी असलेल्यांच्या दोन्ही/तिन्ही खात्यांना श्रेणीदानाची सोय आहे का?

मिहिर Wed, 11/03/2015 - 16:34

In reply to by ॲमी

मुळात बर्यापैकी फ्रिक्वेंटली नाव बदलणारे असे किती अॅक्टीव्ह सदस्य आहेत? मग त्यासाठी सगळ्यांचीच सोय का काढून घ्यायची?

मुळात जे फार फ्रिक्वेंटली नावे बदलत नाहीत त्यांना ह्या सोयीची गरज नाही (स्वतः नाव बदलता येण्याच्या). ते संपादकांना सांगून बदलू शकतात. माझा मुद्दा नाव बदलता येऊच नये असा नाही, तर सहजतेने वारंवार बदलता येऊ नये असा आहे. त्याची कारणे वर सांगितली आहेत.

बादवे ओपनली डूआयडी असलेल्यांच्या दोन्ही/तिन्ही खात्यांना श्रेणीदानाची सोय आहे का?

प्रश्न रोचक आहे.

नितिन थत्ते Thu, 12/03/2015 - 22:42

In reply to by अनुप ढेरे

गोमूत्र जितपत औषधी असते तितके मानवी मूत्र सुद्धा असावे.

पण माझा भाऊ जर म्हणाला,"आंब्यावर जंतुनाशक म्हणून मी मुतलो" तर लोकांना ते चालणार नाही. लोक त्याच्याकडचे आंबे घेणार नाहीत. पण त्याने जर सांगितले,"जंतुनाशक म्हणून गोमूत्र फवारलं" तर लोकांना ते अ‍ॅक्सेप्टेबल असेल.

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 11:34

http://www.ndtv.com/india-news/in-this-state-capital-over-30-blasts-in-…
मणिपूरमधे ८० दिवसात ३० बाँबस्फोट झाले. त्यात बरेच लोक मेले, बरेच जखमी झाले.
मणिपूरी लोकांवर जेव्हा दिल्लीत वा इकडे अन्यत्र अन्याय होतो तेव्हा ते व त्यांचे (सगळ्याच अन्यायाच्या प्रकारांमधे सर्वांना साथ देणारे मानव अधिकारवादी, इ इ ) साथी मेणबत्त्या इ इ घेऊन येतात, प्रदर्शन करतात, रोचक रोचक घोषणा असलेले फलक घेऊन मोर्चा काढतात, वंशवाद कसा वाढलाय म्हणून मिडियाच्या सर्वेंत बाईट्स किंवा लेक्चर्स ठोकतात. एकूणात भारताला आणि ईशान्येतर भारतातील शहरांना, इथल्या लोकांना मागास, रेसिस्ट, इ इ म्हणून इथल्या प्रगत आणि जगातल्या अतिप्रगत लोकांच्या नजरेत बदनाम करतात. त्यांचं प्रेशर इतकं असतं कि "पायर्‍यांवरून घसरून युवकाचा मृत्यू" ही बातमी "पायर्‍यांवरून घसरून मणिपूरी युवकाचा मृत्यू" अशी येते. (म्हणजे पायर्‍या खास मणिपूरी युवकाचाच पाय घसरावा अशा डिजाईन केलेल्या? असे क्षणभर वाटल्याशिवाय राहत नाही.)

पण हे मणिपुरी लोक वर्षातून १-२ दा मणिपूरला जातच असतात. तिथे तिथल्या मायनॉरिटीची काय अवस्था आहे हे त्यांना माहित नाही का? देशातल्या कोणत्याही भागातून येणार्‍या सामान्य माणसाकडे 'आपल्यासारखाच एक' म्हणून पाहायची भावना तिथल्या शिक्षितांत किंचितही नाही. ( भारत सरकार आणि सैन्य यांच्याशी दुश्मनी वेगळी. त्याचा हिशेब मधे न आणता.) पण नेहमी मायनॉरिटींच्या वस्तीत स्फोट. त्यांच्या हत्या. आणि सन्मान मीठाएवढा नाही. मैतेई-नागा-कुकी वादात ते कस्पटासमान.

दिल्लीत एवढे मोर्चे काढता. कधी इम्फाळमधे मोर्चा काढा. त्या बिहारी मायनोरिटीजसाठी.
===============================================================================================
तेच (डावखुर्‍या) एन आर आय लोकांचं. आम्हाला अमेरिकेत एवढा सन्मान मिळतो, समानता मिळते आणि भारतातले हिंदू पहा...काय करतात.
अरे भावड्यांनो, इट इज नथिंग अबाउट हिंदूइजम. उद्या जीआरई आणि जीमॅट (आणी सॉफ्टवर) चे आणि संख्येचे निकष काढून हिंदूंचे होर्डसच्या होर्ड्स अमेरिकेत पाठवले तर त्यांना देखिल स्थानिक सापत्नभावाची वागणूक देणार. अमेरिकेत राज ठाकरेच राज ठाकरे पैदा होतील.

ऋषिकेश Fri, 13/03/2015 - 14:01

In reply to by अजो१२३

तुमचे म्हणणे नक्की कळले नाही, कारण काही वाक्यांचा संदर्भच माहित नाहीये. मणिपूरला स्फोट झाल्याबद्दल उद्वेग वाटतो आहे हे समजले.
असो. बॉम्बस्फोटात लोकांचा जीव जाणे कधीही वाईटच. अश्या (बॉम्ब पेरणार्‍या) प्रवृत्तींचा निषेध!

अनु राव Fri, 13/03/2015 - 16:52

In reply to by वृन्दा

वृंदा - अवांतर माहीती म्हणुन. हे एक लोकसंगीत बेस्ड उपशास्त्रीय गाणे आहे आणि ह्या गाण्याच्या प्रकाराला "लाचारी" असे नाव आहे ( जसे होली, कजरी असते तसे ).

वृन्दा Fri, 13/03/2015 - 16:56

In reply to by अनु राव

लाचारी? खरं सांगताय अनु राव? म्हणजे मराठीत वाईट अर्थ आहे त्या शब्दाला म्हणून विचारले.

गवि Fri, 13/03/2015 - 17:01

In reply to by वृन्दा

नदी नारे न जाओ श्याम पैंय्या पडू

अगदी चपखल नाव आहे संगीतप्रकाराचे. लाचारी.

शिवाय एकूण ते गोपी अन कृष्ण टाईपचे सर्वच कलाप्रकार ...

तेच ते अन तेच ते.. पीळ आहे नुसता..

जाऊदे.

अनु राव Fri, 13/03/2015 - 17:11

In reply to by वृन्दा

मराठीतल्या "लाचारी" ह्या अर्थानीच ते नाव दिले आहे. त्यात त्या स्त्रीची लाचारीच दिसते आहे ना. शेवटचे कडवे तर बघा.

संग सवतीया जो लाओ तो जैबे करो.
हमका ना मिलाओ, शाम पैंय्य पडु.

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 17:06

http://ibnlive.in.com/news/rss-mouthpiece-shows-pok-as-pakistan-territo…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गॅनायझर या मुखपत्रात POK चक्क पाकिस्तानचा म्हणून दाखवला आहे. एरवी हे लोक काश्मिर म्हटले कि किती धिंगाणा करतात! ३७० कलम काय, काश्मिरी पंडीत काय , भारताचे बहाद्दूर सैन्य काय - काय काय बोलत असतात. आता स्वतःच पी ओ के पाकिस्तानात दाखवून रायले! आता भारतात उच्चशिक्षित, उच्चवर्णीय (खासकरून ब्राह्मण) लोकांची संघाला प्रचंड सहानुभूती असते हे कोणाला माहिती नाही? पण हे सगळे लोक "सहानुभूतीसकट*" अमेरिकेत गेलेले दिसतात. म्हणून अलिकडे संघ थोडं काही लिहायला गेला कि चूकाच चूका होतात (हवं तर मोदींची भाषणं ऐका). हे सगळं या ब्रेन्-ड्रेन मुळे आहे.

अजून एक गोष्ट आहे. स्सग्ळे सवंगडी (आणि ते ही हुश्शार!) अमेरिकेत गेल्यामुळे संघात इनोवेटीवनेस नाहीच. तेच तेच उगाळत असतात. अगोदर २५ वर्षे सतत भारत हिंदू देश आहे असे म्हणायचे. मग कोणीतरी टूम काढली कि देशातले सगळे अल्पसंख्यांक हिंदू आहेत असे म्हणायला चालू करू. मग संघाचे लोक हेच वाक्य गेल्या ६०-७० वर्षांपासून म्हणत आहेत. मग अलिकडे लोकांना ते बोर व्हायला लागले. ते थोडे रसाळ (शिवाय अर्थप्रद?) व्हावे म्हणून मग त्यांनी त्यात विशेषणे आणि क्रियाविशेषणे घातली. उदा. अल्पसंख्यांक राष्ट्रीयतेने हिंदू आहेत. अल्पसंख्यांक राष्ट्रीयतेने आणि संस्कृतीने हिंदू आहेत.
सगळे संभाव्य हुश्शार समर्थक अमेरिकेत गेल्याने संघात एकदम मेडिऑकर लोक उरले आहेत, अज्जिबात अपडेटेड नसतात हे वेगळे सांगायला नको. अलिकडे बोलता बोलता संघवाल्यांना डी एन ए मंजे काय असते ते स्काईपीवरून 'पलिकडून' कोणीतरी सांगीतले. तर लग्गेच बातमी:
http://www.firstpost.com/india/all-indians-are-culturally-nationally-an…
.
.
.
भाषेवरून ... अर्थातच अजून २०-२५ वर्षांनी हे संघी लोक भारतीय अल्पसंख्यांकांचे (सॉरी, मुसलमानांचे, कारण अल्पसंख्यांक नसतातच ना!) मांस भारतीय हिंदू हिग्ज बोसॉनांचे बनले आहे असे म्हणणार हे निछ्छित!!!

========================
*म्हणजे सहानुभूतीचा निवास तिकडेच!
** लिंक उघडायची गरज नाही, फक्त हॉवर करा.

ऋषिकेश Fri, 13/03/2015 - 17:13

In reply to by अजो१२३

मी मागे प्रश्न विचारला होता की आर एस एस्च्या "अखंड भारत"मध्ये नक्की काय काय येते? त्याचे मला अजूनही उत्तर मिळालेले नाही.

ऋषिकेश Sat, 14/03/2015 - 15:48

In reply to by बॅटमॅन

मला याबद्दल एक असं ठाम उत्तर मिळालेलं नाही
माझा गोंधळ तुम्हाला कमी आश्चर्यचकीत करेल जेव्हा तुम्ही गुगल इमेजेसवर घेतलेला हा शोध बघाल

यातील प्रत्येक नकाशा वेगवेगळा आहे. :)

बॅटमॅन Sat, 14/03/2015 - 16:28

In reply to by ऋषिकेश

माझा गोंधळ तुम्हाला कमी आश्चर्यचकीत करेल जेव्हा तुम्ही गुगल इमेजेसवर घेतलेला हा शोध बघाल

काय मटीय वाक्य आहे भेंडी. इंग्लिशच लिहायचंत की =)) वाचूनच फुटलो.

तदुपरि- पाहिले, पण नॉटविथस्टँडिंग सम डिफरन्सेस, सध्याचा भारत + पाकिस्तान + श्रीलंका + बांगलादेश + बर्मा हे मिळून होतो तो अखंड भारत.

यात अफगाणिस्थान व नेपाळही यावा असे वाटते. ते चेकवले पाहिजे, पण वरील पाच देश तर नेहमीच असतातच असतात.

धर्मराजमुटके Sat, 14/03/2015 - 18:38

In reply to by बॅटमॅन

माझा गोंधळ तुम्हाला कमी आश्चर्यचकीत करेल जेव्हा तुम्ही गुगल इमेजेसवर घेतलेला हा शोध बघाल.

मटीय वाक्याबद्दल सहमत पण ते नभाटातील वाक्याचे भाषांतर आहे की टीओआय मधील वाक्याचे ते काही कळले नाही बॉ !
नाहीतरी टीओआय, मटा, नभाटा ही एकाच बापाची (अमर, अकबर, अँथोनी टाईप) पोरे आहेत. त्यामुळे बातम्यांत बर्‍याचदा साम्य आढळते.

'न'वी बाजू Sat, 14/03/2015 - 22:43

In reply to by बॅटमॅन

नॉटविथस्टँडिंग सम डिफरन्सेस, सध्याचा भारत + पाकिस्तान + श्रीलंका + बांगलादेश + बर्मा हे मिळून होतो तो अखंड भारत.

...बोले तो, पूर्वाश्रमीचा ब्रिटिश इंडिया (अधिक ब्रिटिश अंकित इंडियन प्रिन्सली ष्टेट्स अर्थात संस्थाने) म्हणताय काय?

१. पण... पण... पण... सिलोन हा (ब्रिटिश वसाहत असली, तरी) ब्रिटिश इंडियाचा भाग कधीच नव्हता.

२. गोवा, पाँडिचेरीचे काय? त्यांना 'अखंड भारता'पासून स्वतंत्र करावे काय?

३. सिक्कीमचे काय? सिक्कीम हा ब्रिटिश इंडियाचा भाग कधीही नव्हता, आणि अर्थाअर्थी ब्रिटिश अंकित इंडियन प्रिन्सली ष्टेटही कधीच नव्हते. (फार फार तर ब्रिटिश इंडियाचे करारांकित प्रोटेक्टरेट असावे - चूभूद्याघ्या - परंतु ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ब्रिटिश इंडियन सुझरेनटीखालील टेरिटरी असण्याचा खुद्द हिंदुस्थानातील ब्रिटिश हुकूमतीचादेखील दावा नसावा. किंबहुना, संस्थानांचे विलीनीकरण करते वेळी सिक्कीमचे विलीनीकरण करण्याचा विचारसुद्धा झाला नाही, यामागे कदाचित हेच कारण असावे काय? सिक्कीमचे विलीनीकरण झाले, ते बरेच नंतर, आणि वेगळ्याच कारणांसाठी.)

ते काही नाही. अखंड हिंदुस्थानाबरोबरच स्वतंत्र सिक्कीमही झालाच पाहिजे!

४. येमेनमधील एडन वसाहत हादेखील प्रशासकीयदृष्ट्या १९३०च्या दशकाच्या मध्यापर्यंत मुंबई प्रांताचा भाग होता. बर्मा ब्रिटिश इंडियापासून प्रशासकीयदृष्ट्या वेगळे केले, त्याच्याच मागेपुढे आणि त्याच दशकात कधीतरी मुंबई प्रांतापासून वेगळा केला. एडनवर तिरंगा (की भगवा?) फडकलाच पाहिजे!

५. फार कशाला, जवळजवळ १९६०च्या दशकापर्यंत आजच्या संयुक्त अरब अमिरातींत आणि एकंदरीतच आखाती प्रदेशातील बर्‍याच मोठ्या भूभागावरील देशांत भारतीय रुपया हे अधिकृत चलन होते. अबूधाबीवर आणि दुबईवर भगवा फडकवावा काय? (तसेही भारतीय हिंदू मोठ्या प्रमाणात आजही तेथे सापडतातच.)

(सौदी अरेबियात भारतीय रुपया हे कधी अधिकृत चलन होते किंवा नाही, याबद्दल नक्की खात्री नसल्याकारणाने, रियाधवर - आणि मुख्य म्हणजे मक्केवर नि मदिनेवर - भगवा फडकविण्याबद्दलचा प्रश्न तूर्तास स्थगित केलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

यात अफगाणिस्थान व नेपाळही यावा असे वाटते.

अफगाणिस्तानाचे जाऊ द्या, पण नेपाळातील (बहुसंख्येने हिंदू) जनतेला 'अखंड हिंदुस्थाना'चा भाग होण्यात कितपत स्वारस्य आहे, याचा अभ्यास कधी झालेला आहे काय?

..........

भगवाच बहुधा. तिरंगावाल्यांच्या डोक्यात सहसा असले विचार येत नसावेत. असली दिवास्वप्ने शक्यतो भगव्यांचीच.

असा अभ्यास खरोखरच झाल्यास, अशी दिवास्वप्ने पाहणारांचे डोळे खाडकन उघडावेत, असा कयास आहे. (दे हेट इंडियन हेगेमनी, रियल अँड/ऑर पर्सीव्ड, अँड दे हेट इंडियन्स, बट इकॉनॉमिकली, दे आर हेविली डिपेंडंट ऑन इंडिया अँड इंडियन्स.)

पण अर्थात, आपल्या सदाशिवपेठेतील घरातील आरामखुर्चीत बसून अशी दिवास्वप्ने पाहणे हे सोपे आणि स्वस्त - फुकट! - आहे. मात्र, ते बहुतांशी निरुपद्रवी आहे. अडचण तेव्हा येते, जेव्हा ही मंडळी आपल्या सदाशिवपेठेतील घरांतील आरामखुर्च्या आणि असलेलेनसलेले कामधंदे सोडून स्वखर्चाने अयोध्येस दाखल होतात. असो.

नितिन थत्ते Sun, 15/03/2015 - 00:07

In reply to by 'न'वी बाजू

सदाशिवपेठेतल्या आरामखुर्चीत (मटार उसळ आणि शिकरण खाल्लेली असताना) इतका डिट्टेलवार विचार होत नसावा.

अखंड भारत म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या भूभागाची फाळणी झाली तो भूभाग असे असावे.

'न'वी बाजू Sun, 15/03/2015 - 12:06

In reply to by नितिन थत्ते

सदाशिवपेठेतल्या आरामखुर्चीत (मटार उसळ आणि शिकरण खाल्लेली असताना) इतका डिट्टेलवार विचार होत नसावा.

म्हणजे काय प्रश्न आहे काय, चाचाजान? कसले विचार घेऊन बसलात?

शिकरणीची नशा ही काय चीज़ असते म्हणून सांगू तुम्हाला, महाराजा! आणि त्यात मटार उसळीचा साथ असेल तर, ओय होय, क्या कहने, बहोत खूब, मार डाला, माश्या आल्या, सुभाषसुद्धा आला, वगैरे वगैरे. बोले तो, निव्वळ व्वा! अशा माहौलमध्ये दिमाग़मध्ये कसलेही ख़यालात आणणे तुम्हाला तरी मुमकिन होईल काय, उस्ताद? बल्कि, हा काय विचार करण्याचा वक़्त आहे?

बॅटमॅन Mon, 16/03/2015 - 12:45

In reply to by 'न'वी बाजू

होय, ब्रिटिश भारतच म्हणतो आहे.

तदुपरि आखाती प्रदेशाबद्दल बोलायचे झाले तर 'त्या' शहरातले पवित्रतम स्थान एक शिवलिंग होते असे अगोदरच सिद्ध झालेले असल्याने तिथे भगवा फडकायला कसलीच अडचण नाही.

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 17:45

"अखंड भारत"मध्ये नक्की काय काय येते?

ऋषिदा, भारतीय राजकारणावर भाष्य करण्याचा नैतिक अधिकार आपण गमावला आहे हा प्रश्न विचारून. ज्याला आपण डॅबलर म्हणतो त्यालापण हे जी के आहे कि हो. तरीही खास तुम्हाला म्हणून सांगतो -
आर एस एस च्या अखंड भारतात खालिल गोष्टी येतातः
१. हिंदी महासागर
२. वरच्या बाजूने एक बाजू गायब (किंवा अंधुक, अनिश्चित म्हणा) असलेला एक त्रिकोणाकृती जमिनीचा तुकडा,
३. एक लालबुंद लुगडं घातलेली बाई
४. तिला नीट टेकून उभे राहायला एक सिंह.

अनामिक Fri, 13/03/2015 - 17:51

In reply to by अजो१२३

लुगडं घातलेल्या बाईच्या हातातला झेंडा राहिला का?

उगाच अवांतर - आपल्या विदर्भ मराठवाड्यात लुगडं घालतात, तर इतरत्र ते (किंवा नव्वार) नेसतात!

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 17:59

In reply to by अनामिक

अजून थोडं अवांतर - रौद्र महासागर, रखरखित जमिन आणि हिंस्र सिंह यांच्या पार्श्वभूमीवर क्म्फर्टेबली, अभिमानाने थांबलेली स्त्री हे आपले सिंबल निवडले म्हणून एक स्त्रीवादी या नात्याने मला आर एस एस चा अभिमान आहे.
=)) =)) =))