आज मी आहे

आज मी आहे
त्या वळणावर उद्या तू असशील
झिरपत राहील झरा , उन्मळत राहतील उपळे,
तरीही तिथे पाणी शेंदायला कोणीच नसेल
ते तळे देखील आज विरक्त आयुष्य जगत असेल कारण
आज मी उभा तिथे _ उद्या तू असशील |
जुळतील धागे , मिळतील नातीगोती
बांधल्या जातील रेशीमगाठी
टाकली जातील बंधने संस्कृतीची
लादले जातील निर्बंध रूढी परंपरांचे
आपसूकच टाकले जातील नांगे
स्वतंत्र स्वभावाचे
कारण आज मी उभा ठाकलो आहे
त्या बंधनात _ उद्या तू असशील |
विखुरल्या जातील सोंगट्या
बुद्धिबळाच्या पटावर
तसे आयुष्य
बिथरली असशील तू प्रत्येक भेटीआधी
अगदीच नवख्या नववधूपरी
मोजता मोजता पाऊले थकून जातील
वाटांना मात्र अंत नसेल
निबरगट्ट क्षीतेजे मात्र साद घालत असतील
पाऊले थकतील थांबतील विश्रांतीसाठी
एकाच
मेळ घाटावरती
अगदीच शेवटची
निवांत निद्रा घेत असेल देह
त्यावेळी मी असेन
त्या निद्राश्य्येवरी
केव्हांतरी
तू असशील ||||||

>> मी मात्र @ राजवर्धन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान प्रयत्न आहे. सुरेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

स्वतः अत्यंत मोठे कवि असताना अशी प्रतिक्रिया द्यायची असते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'उन्मळत राहतील उपळे' या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपळ/उपळे हा एकप्रकारचा त्वचारोग असतो बहुतेक. काहीतरी कारणाने त्वचेला भेगा पडतात आणि त्यातून रक्त / पू बाहेर पडतो.

माझ्या लहानपणी "माऊ आज्जी" नावाने आम्हां बालगोपाळांत फ्यामस असलेल्या, गल्लीच्या आश्रित बाईंना हा रोग झाला होता. तेव्हापासून त्यांच्याजवळ जायला बंदी केली होती. नंतर कधी हा रोग झाल्याचं पहाण्यात आलं नाही. (असंच "डोळ्यांत फूल पडणे" या प्रकाराचंही. बहुतेक तो काचबिंदूचा प्रकार असावा.)

'उन्मळत राहतील उपळे' म्हणजे बहुदा त्या जखमा वाहतच रहातील असं काहीतरी असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओके. आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मित्र हो ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मित्र हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0