फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

एखादी कविता लिहून झाल्यावर कालांतराने ती आपण कोणत्या अर्थाने लिहिले असेल बरे, असा स्वत: कवीचाच गोंधळ होण्याचा प्रकार झाला, असे होत असेल का?

त्या अगम्य कवितांबद्दल होत असेल ब्वॉ Smile
___

अशा प्रकारे प्रत्यक्ष सिनेमा सुरू होण्यापूर्वी छान वातावरण निर्माण झाले पाहिजे असा त्याचा आग्रह असे.

ROFL सॉलिड मलाही असच आवडतं. पण वेगळ्या क्षेत्रात Wink

फुसके बार – ०५ मार्च २०१६

कन्हैयाची पोपटपंची व भुक्त लोकांची वळवाची दिवाळी
.
काल व आज भुक्त लोकांनी वळवाची म्हणजे अवेळी दिवाळी साजरी केली. सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये पप्पू सरकारची पिसे काढेल असा या भुक्त लोकांचा अंदाज होता. स्वत: पप्पूनेही सरकार त्याला घाबरते, म्हणून त्याला संसदेत बोलू दिले जाणार नाही अशा वल्गना केल्या होत्या. त्यामुळे तर या भुक्त लोकांच्या अपेक्षा फारच वाढल्या होत्या. पण पप्पूचा जोर तर लवंगी फटाक्याएवढाही पडला नाही. त्यावर पंतप्रधानांनी केलेल्या प्रभावी भाषणामुळे तर विरोधक दीनवाणे होऊन गेले. ‘मेक इन इंडिया’चीही हे विरोधक टिंगल करतात, या पंतप्रधानांच्या विधानाने त्यांनी विरोधकांच्या ‘विरोधाच्या’ दर्जाची खरे तर लायकीच काढली. त्यामुळे निराश झालेल्या भुक्त लोकांनी आसरा शोधला तो जामीनावर सुटलेल्या कन्हैयाकुमारच्या आवेशपूर्ण भाषणात. आताच्या अधिवेशनातील भाषणाचे सोडा, पण पप्पूने ब-याच संधी मिळूनही त्यांची माती केली. त्यामुळे या भुक्त लोकांना राजकीयदृष्ट्या अनाथ किवा पोरके झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे जर ते कन्हैयाकडे डोळे लावून बसले असतील तर खरे तर त्यांची स्थिती किती केविलवाणी झालेली आहे हे स्पष्ट दिसावे.

अर्थात पप्पूच्या आताच्या भाषणाने भारावलेले भुक्तही पाहिलेले अाहेत मी.

तर या कन्हैयाकुमारच्या कालच्या भाषणावरून भुक्त लोक फारच भारावून गेलेले दिसत आहेत.

खरे तर कन्हैयाकुमारचे कालचे भाषण हे कॉलेजच्या पातळीवर चालणा-या टवाळक्या या सदरात मोडण्यापलीकडे काहीही नव्हते. तरीही अठ्ठावीस वर्षांच्या व्यक्तीकडून पोपटपंचीएवजी काही अभ्यास ऐकायला मिळावे ही कोणाची तरी अपेक्षा होती का? माइक हातात अाला व सुरू झाली ती नेहमीची पोपटपंची.

तो तुरूंगातही टीव्ही वगैरे पहात होता. त्यामुळे त्याच्यावर कोणत्या अंगाने टीका होते आहे याची त्याला कल्पना होती. त्यातला मुख्य भाग होता की तिकडे सीमेवर आपले जवान जीवावर उदार होऊन काम करतात आणि जेएनयुमधील विद्यार्थी देशविरोधी घोषणांमध्ये सामील होतात.

तेव्हा त्याने त्याच्या भाषणात सर्वात प्रथम सीमेवरील जवानांना सॅल्युट केला. त्यावर त्याने भरपूर बडबड केली. पण त्याच्याच विचारसरणीचे माऔवादी तिकडे आपल्या सुरक्षारक्षकांना मारत आहेत हे सांगण्याचा प्रामाणिकपणा त्याने दाखवला का? त्याचे जाऊ दे, कारण जो कम्युनिस्ट विचारसरणीतच त्याची जडणघडण झालेली आहे. पण त्याच्या एका भाषणाने चेकाळलेल्या ज्या भुक्त लोकांचा ऑर्गॅझमच झाला, त्यांच्याही हे लक्षात येऊ नये? संघविचारसरणीच्या विविध संघटंनांच्याबाबतीत केवढे रान माजवले जाते? कुठल्या तरी श्रीरामसेनेने कोठे आंदोलन केले तर त्याचा संबंध लगेच थेट भागवतांशी लावला जातो. पण येथे डाव्या विचारसरणीच्या म्हणवणा-यांचेच माओवादी हे एक हात आहेत हा प्रकाश भुक्त लोकांच्या डोक्यात पडतो का? बरे, हे माओवादी उघडपणे एकीकडे पोलिस, सीआरपीफच्या सुरक्षारक्षकांना मारतात, तर दुसरीकडे काश्मीर व न जाणे आणखी कुठल्या फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करून याच सीमेवरच्या जवानांना मारतात. पण कन्हैया जो या भुक्त लोकांच्या आंखौं का तारा झाला आहे, तो लहानपणापासूनच कम्युनिस्ट विचारसरणी कोळून प्यालेला आहे व ती विचारसरणी मुळातच रक्तरंजीत क्रांतीच्या विचारसरणीचा पुरस्कार करते हे आपले लोक भुक्त लोक सोयीस्करपणे विसरतात. तेव्हा हा कन्हैया सीमेवरच्या जवानांना सॅल्युट करतो असे म्हणतो, तेव्हा खरे तर तो त्यांच्या सांडलेल्या रक्ताची कुचेष्टा करत आहे. बरे असा दुष्परचार करणे हा त्याच्या पक्षाच्या विचारसरणीचा भागच आहे. पण या भुक्त लोकांनी तरी काही ताळतंत्र ठेवायला हवे ना?

आजवरचा कन्हैयाचा परीघ आहे जेएनयु विद्यापीठ. त्याचे आजादीच्या घोषणांचे गाणे त्याच्या पाठीराख्यांच्या कोरसमुळे छान रंगते. ते नारे व त्यांचा क्रम त्याला तोंडपाठ असल्यामुळे छान करमणूकही होते. मला देशापासून स्वातंत्र्य नको आहे, तर देशातच स्वातंत्र्य हवे आहे असे तो म्हणतो. या बकवासचा नक्की अर्थ काय हो? त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता त्याला इतर ठिकाणी पीएचडी करणेही शक्य नाही असे तो म्हणतो. मग येथे जेएनयुमध्ये त्याला अशी काय धाड भरली आहे की त्याला मनुवादापासून काय किंवा आणखी कशाकशापासून आजादी हवी आहे? ज्या सगळ्या गोष्टींमुळे तो पारतंत्र्यात आहे असा दावा करतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी आज जेएनयुमध्ये आहेत? तेथे मनुवाद्यांचा प्रादुर्भाव आहे म्हणून त्याचे आंदोलन आहे का? नाही. तर मग हा चेकाळून कशासाठी या घोषणा देतो? आता दुस-या एखाद्या विद्यापीठामध्ये दुस-या कोणी याच्याचप्रकारचे आंदोलन केले असते, घोषणा दिल्या असत्या तर त्याला किती प्रसिद्धी मिळाली असती? फार नसती. परंतु हा त्याच्या अजेंड्याखाली विद्यापीठातल्या नसलेल्या अशा मुद्द्यांवरून आंदोलन करतो, या सरकारविरूद्ध घोषणा देतो व ते करताना चक्क पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवतो हे पाहून भुक्त लोकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.

कालच्या भाषणात कन्हैया म्हणाला की हे संघाचे लोक नेहमी स्टॅलिन वगैरेंचा उल्लेख का करतात, हिटलरचा का नाही. तेव्हा असे हास्यस्पद मुद्देही जेव्हा या भुक्त लोकांच्या कौतुकाचा विषय ठरतात, तेव्हा काय करावे!

आताच्या सरकारचे दोष जरूर दाखवा, भरपूर आहेत. पण हे सरकार जे करते आहे त्यातले काहीतरी त्यांना चांगले वाटते का? बहुधा काही नसेलच. तसे असेल, तर सवयीचे विरोधक म्हणून यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायला हवे. शिवाय बिहारमध्ये नितीशनी सुशीलकुमार मोदींची साथ सोडून लालूचा आधार घेतला, तेव्हा त्यात या भुक्त लोकांना थोडेतरी वावगे वाटले होते का? आज तो लालू तेथे अक्षरश: नंगा नाच घालतो आहे, पण तो केवळ या सरकारच्या विरोधात आहे म्हणून यांच्या तोंडून त्याचे नावही येत नाही. उत्तर प्रदेश, बंगाल ही नावे घ्या. त्या राज्यांमध्ये काय स्थिती आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मालदामध्ये जे झाले त्याबद्दल तरी हे लोक किती स्पष्टपणे बोलले हेदेखील तपासण्याची गरज आहे. हरयाणातल्या हिंसाचाराला पंजाबच्या माजी कॉंग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराची फूस आहे हे स्पष्ट होते आहे, याबद्दल या लोकांना इवलेसेतरी काही म्हणायचे आहे का, हेदेखील आजवर आपण पाहिले. आपण यांच्या नक्राश्रूंची का होईना अजूनही वाटच पहात आहोत. तेव्हा एखाद्या घटनेचे तारतम्याने मूल्यमापन करणे सोडून आताच्या सरकारला विरोध करणे हा यांचा एककलमी अजेंडा बनलेला आहे, हे वेगळे सांगायला नको.

आता परत कम्युनिस्टांच्या पिलावळीबद्दल. पप्पूसारख्यांकडून पुन्हा पुन्हा अपेक्षाभंग झालेल्यांनी आता कम्युनिस्टांवर आशेने डोळे लावावेत यासारखे दुर्भाग्य नाही. कम्युनिस्टांची टेप इतकी वर्षे घासून घासून खराब होऊन ऐकवेनाशी झाली, म्हणून या अठ्ठावीस वर्षांच्या घोड्यांना विद्यार्थी या नावाचा मुलामा देऊन, कारण त्यामुळे मिळणारी सहानुभूती अधिक असते, त्यांचे प्यादे म्हणून वापर केला जात आहे याचेही भान या भुक्तांना नाही. राज्यघटना लागू होण्यापूर्वी एक-दोन दिवस आधी डॉ. आंबेडकरांनी संसदेत केलेल्या भाषणात ही राज्यघटना कम्युनिस्टांना व सोशॅलिस्टांना का आवडणार नाही याची कारणे दिली होती. तेव्हा या कम्युनिस्ट नेत्याने रोहित वेमुला या मागासवर्गीयला साथी म्हणून आपल्या कवेत घेण्यातला खोडसाळपणा व त्यातले गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. आज तर तो म्हणतोय की रोहित वेमुला हा त्याच्यासाठी आयकॉन आहे. संघाने डॉ. आंबेडकरांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर हे भुक्त लोक त्यांची खिल्ली उडवतात. पण आता हे कम्युनिस्ट लोक आंबेडकरांचे नाव घेतात, रोहित वेमुलाच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाऊ पाहतात, त्यात भुक्त लोकांना काहीही वावगे दिसत नाही. डॉ. आंबेडकरांनी या कम्युनिस्टांबद्दल काय म्हतले, त्या रोहित वेमुलाने कम्युनिस्टांबद्दल काय म्हटले हेदेखील हे भुक्त लोक सोयीस्करपणे विसरतात.

बाकी याच्या हिंमतीबद्दल कोणी तोंडात बोटे घातली असतील, त्यांनी त्याला तुरूंगात कोणकोण भेटायला गेले होते त्यांची यादी पहावी. काल राजदीपसमोर आदित्य मुखर्जी नावाचे जेएनयुचे प्राध्यापक काय बरळले हेही पाहू या. हे महाशय विद्यापीठाच्या Centre for Historical Studies School of Social Sciences चे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासारखा माणूस, खरे तर बेअक्कल माणूस जेव्हा भाजपच्या पीडीपीशी असलेल्या युतीबद्दल प्रश्नचिन्ह ऊठवतो, त्याला ही कल्पना नसावी की काश्मीरात राष्ट्रीय पक्षाचा सत्तेत सहभाग हवा; मग तो यापूर्वी कॉंग्रेसचा होता तो असो किंवा आताचा भाजपचा असो. हा मूर्ख माणूस एवढेही समजू शकत नाही आणि या विभागाचे प्राध्यापकपद भुषवतो आहे. जेएनयुमध्येच एका प्राध्यापिकेने काश्मीरच्या आजादीवरून अतिशय आक्षेपार्ह भाषण केले. हा मूर्ख प्राध्यापकदेखील काश्मीरच्या सार्वमताच्या अधिकाराची तुलना स्कॉटलंडच्या सार्वमताशी करत होता. धर्म आणि दुस-या राष्ट्राचा हस्तक्षेप या गोष्टी स्कॉटलंडच्या बाबतीत लागू होत नाहीत किंवा मूळ सार्वमताचा जो मुद्दा होता तो पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मीरचा बराचसा भाग बळकावल्यामुळे लागू होत नाही एवढेही ज्ञान या मुर्खाला नसावे असे कसे म्हणावे? ‘RSS, School Texts and The Murder of Mahatma Gandhi: The Hindu Communal Project, Sage, 2008, (co-author)’ हा या महाभागाचा एक प्रोजेक्ट आहे. भाजपशी संबंधित नेत्याने एखाद्या वादावरून टीव्हीवर असे मूर्खपणाचे विधान केले असते, तर या भुक्त लोकांनी त्याची किती खिल्ली उडवली असती? वर उल्लेख केल्याप्रमाणे संघाच्या विचाराच्या एखाद्या प्राध्यापकाने या धर्तीच्या पण दुस-या प्रोजेक्टवर काम केले असते तर या भुक्त लोकांनी त्याला जातीयवादी वगैरे ठरवून त्याची पिसे काढली असती का नसती? तेव्हा येथे केवळ भाजपविरोध दाखवणे हेच आपले परमकर्तव्य असल्यासारखे हे थोर लोक वागतात आणि या भुक्त लोकांना ते ओळखूही येत नाही हीच यांच्या भुक्तपणाची कमाल आहे. की सारे काही ओळखूनही ते निर्ढावल्यासारखे त्याकडे दुर्लक्ष करतात असे म्हणावे? मुळात कन्हैयासारख्याच्या उड्या कोणाच्या जीवावर चालल्या आहेत हेही लक्षात येईल. राजकारण करायलाही हरकत नाही, पण मग त्याला राजकारणी म्हणून वागवा.

जेएनयु हा कम्युनिस्टांचा अड्डा आहे हे काही हे भुक्त लोक मान्य करायला तयार होत नाहीत आणि म्हणूनच एफटीआयआयच्या बाबतीतही त्यांनी असाच कांगावा केला तो एका नियुक्तीवरून. मलाही ती नियुक्ती पटली नव्हती. पण त्या निमित्ताने तिथल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या आवारात चालणारे दारू व ड्रग्ज हे धंदे प्रकाशात आले. शिकत असतानाच बाहेरचे उद्योग करत राहून आपला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण न करता वर्षानुवर्षे तेथील सुविधा वापरत राहण्याचा प्रकारही त्यामुळे कळला. आताही बापाची जहागिर असल्यासारखे वर्षानुवर्षे तेथेच पडून असलेल्या ‘विद्यार्थ्यांना’ खमकेपणाने त्यांचे प्रोजेक्ट्स पूर्ण करून घेऊन तेथून बाहेर पडण्यास भाग पाडले जात आहे. तेव्हाही या भुक्तांना केवळ नियुक्तीमागील अनुचितता दिसली. किती जणांनी तेथील विद्यार्थ्यांच्या अंदाधुंदीबद्दल बोलण्याचा मोकळेपणा दाखवला? आताही जेनयुमध्ये इतके कंडोम रोज सापडतात, वगैरे बेजबाबदार वक्तव्यांवर हे भुक्त लोक एकोळ्यातून किंवा चारोळ्यातून लगेच पिंक मारतात. हरकत नाही, कारण ते बेजबाबदारपणाचेचविधान आहे. पण तोच न्याय हे भुक्त कॉंग्रेसशासित, लालूशासित किंवा इतर राज्यांच्याबाबतीत लावताना दिसतात का? मुळात निष्पक्षपणा त्यांना मान्य आहे का?

आजच राजदीपसारख्याने कन्हैयाची मुलाखत घेतली. त्याच्या अतीगोड प्रश्नांनाही कन्हैया व्यवस्थित उत्तरे देऊ शकत नव्हता. याला ज्या जातीपातीपासून आजादी हवी आहे असे तो म्हणतो, ज्या गरीबीपासून आजादी हवी आहे असे हा म्हणतो, ब्राह्मणवादापासून आजादी हवी आहे असे हा म्हणतो, दलितांवरील अत्याचारांपासून आजादी हवी आहे असे हा म्हणतो, हे मुद्दे काय आजचे आहेत? तर हे नजरेआड करून तो या सर्व गोष्टींसाठी आताच्या सरकारला, संघाला त्याबद्दल जबाबदार धरतो. सत्य हे आहे की तो कम्युनिस्ट मुशीतून घडलेला आहे, तो अशा भलत्याच घोषणा करणारच, दुष्प्रचार करणारच. खरे तर ती पोपटपंची आहे. पण या भुक्त लोकांचे काय? त्यांना कशाची बाधा झालेली आहे? ते मोदीद्वेषाने इतके पछाडलेले आहेत का, की त्यांनी आपली स्वतंत्र विचार करण्याची क्षमता गमवावी आणि पोपटपंचीचीही भुरळ पडण्यापर्यंत त्यांनी नीचे गिरावे?

काही दिवसांपूर्वी मराठी चॅनल्सवर राजकीय पोपटपंची करणा-या आठवीतल्या मुलाला फार प्रसिद्धी मिळाली. हा कन्हैया म्हणजे याचीच पुढची आवृत्ती आहे. त्याला कशाकशापासून आजादी हवी आहे, त्याची यादी पाहिली तरी लक्षात येईल की किती राजकीय भंकस आहे त्यात. तेव्हा हे भुक्त लोक एक दिवस त्या आठवीतल्या मुलाकडेही आशेने पाहू लागतील यात मला शंका वाटत नाही.

असो. माझे तरी त्याच्या भाषणाने म्हणजे पोपटपंचीने भरपूर मनोरंजन झाले. भुक्त लोकांनाही त्यांच्या मोदीद्वेषावर या पोपटपंचीने का होईना, पण थोडेसे आनंदाचे क्षण मिळाले हे चांगलेच झाले.

एक उदाहरण सांगतो. या अंधभुक्त लोकांची परिस्थिती कशी हास्यास्पद झालेली आहे, नव्हे ती त्यांनी कशी करून घेतली आहे. ज्यांना शक्य आहे व ज्यांची इच्छा आहे अशांना मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी स्वत:हून सोडावी असे आवाहन केले. त्यांनी हे आवाहन पक्षाचा नेता म्हणून नव्हे तर देशाचा पंतप्रधान म्हणून केले. पण अंधभुक्तांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली? तुमच्या पक्षाचे व संघाचे इतके-इतके सदस्य आहेत ना, आधी त्यांना तसे करू द्या, मग आमच्याकडे या. ही स्वेच्छेने करण्याची गोष्ट होती, ना त्यात कसली जबरदस्ती होती. तरीही हा आगाऊपणा. आज पन्नास-पंचावन्न लाख लोकांनी यांच्या आगाऊपणाकडे दुर्लक्ष केले आणि सरकारच्या विनंतीला मान देऊन तसे केले. आज आमची कामवाली सांगत होती की तिकडे कर्नाटकामधील तिच्या खेडेगावामध्ये तिच्या सासूने जेथे एलपीजी पोहोचलेला नव्हता, तेथे त्यासाठी अर्ज दिला आणि तिला ते आठवड्याच्या आत मिळालेही. या छोट्याशा उदाहरणात कमीत कमी दोन गोष्टी अंतर्भूत आहेत. सरकारच्या स्वत:हून एलपीजीवरील सबसिडी सोडा या आवाहनामागे ग्रामीण भागातील चुलीवर स्वयंपाक करणा-यांची त्या धुरापासून सुटका व्हावी हा हेतु होता. भलेही त्या जाहिराती परिणामकारक नव्हत्या. पण त्याचा परिणाम झालेला दिसतोय. आणि खेड्यांमध्ये खरोखर ही सिलिंडर्स उपलब्ध होताना दिसताहेत. आणि यातली दुसरी गोष्ट अशी की कर्नाटक हे सध्या भाजपशासित राज्य नाही. तरीही तेथेही या योजनेचा लाभ मिळताना दिसत आहे.

आताच्या अर्थसंकल्पात दलितांना उद्योग स्थापन करण्यासाठी काही विशेष पावले उचललेली आहेत. एका तरी भुक्ताने याचे स्वागत करणे जाऊ दे, त्याची नोंद तरी घेतल्याचे पाहिले का कोणी? उलट एक भुक्त तर इतक्या उलट्या दोक्याचा आहे, की तो हमखास म्हणेल की आमचे दलित बांधव काय उद्योग स्थापणार आहेत का? तेव्हा हा या मनुवादी सरकारचा कटच आहे. त्यांच्या नावावरचे पैसे दुसरीकडे वळवण्याचा. असे भुक्त लोक खरोखर अस्तित्वात आहेत. सांगायचा मुद्दा हा की सगळेच गढूळ नाही, पण त्यापलीकडे जाऊन पाहण्याचा मोकळेपणा हवा. तो यांच्याकडे नाही. हे दुर्दैव.

तेव्हा अंधभुक्त हे त्यांचे डोळे थोडेसे किलकिले करून पाहतील, तर त्यांनाही या गोष्टी स्पष्ट दिसतील. अखेर देशद्रोह आणि बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, देशहित कशात आहे यावर तरी एकमत व्हावे की नाही? वर एक उदाहरण दिले. प्रयत्न कराल तर आणखीही दिसतील.

खरी समस्या कन्हैया नव्हे, तो तर पोपटपंची करतोय, पण या भुक्तांचे काय करावे? खरी समस्या या भुक्त लोकांची आहे. की तीदेखील समस्या समजण्याचे कारण नाही? सरकारच्या चुकांवर यांच्याकडूनच काय, सर्वांकडूनच टीका होईलच, पण ज्या गोष्टी खरोखर जनहिताच्या आहेत, त्या मात्र सरकारने निग्रहाने कराव्यातच. या भुक्त लोकांकडे दुर्लक्ष करून.

आता भुक्त लोकांनी एवढे तरी करावे. कन्हैयाला त्याच्या विचारसरणीचे भाऊबंद जे हिंसाचार करतात, त्यापासून अाजादी मागण्यास सांगावे व त्यांच्या तत्वज्ञानात ज्या सशस्त्र म्हणजे रक्तपातावर आधारित क्रांतीची जी शिकवण दिली अाहे त्यापासून आजादी मागण्यास सांगावे. झालेच तर मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदरसे बंद करून इतर मुलांबरोबर शिकण्यास सांगावे. ही आजादी मागण्यास सांगावी. लाल रंग आणखी लाल कसा दिसतो हे त्यांना लगेच व आपोआप कळेल.

काय हा जळफळाट राकु! शोभत नाही तुमच्यासारख्या व्यासंगी आणि निष्पक्षपाती माणसाला...

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला जो अर्थ कळतो, त्याप्रमाणे याला उद्वेग असे म्हणतात. पोस्टमध्ये उल्लेख केला आहे तो भुक्त लोकांच्या जळफळाटाचा.

हॅ हॅ हॅ! म्हणूनच म्हटलं, शोभत नाही. पण असू दे, चालू दे!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भुक्त म्हणजे ?

ज्या आदित्य मुखर्जी यांना राकुंनी तीनदा मूर्ख, एकदा बेअक्कल म्हटलं आहे आणि एकदा ज्यांचं विधान मूर्खपणाचं म्हटलं आहे त्यांचं जेएनयूच्या संस्थळावरचं होमपेज. मुखर्जी यांचे सहा पेपर्स अकॅडेमिया संस्थळावरून उतरवता येण्यासारखे दिसतात. (दुवा). मुखर्जी यांनी लिहिलेली पुस्तकं इथे. मुखर्जी यांची कारकीर्दही या दुव्यांमधून दिसत्ये.

इतिहास या विषयात मला गती नाही. मी ही पुस्तकं आणि पेपर्स वाचलेले नाहीत; वाचण्याची शक्यता नाही. पण जेएनयूच्या एका विभागप्रमुख प्राध्यापकाला मूर्ख आणि बेअक्कल म्हणण्यामागे राकुंनी जो काही तर्क लिहिलेला आहे ते गरळ वगळता इतर काही आहे असं सकृतदर्शनी दिसत नाही. हे आणि असं गरळ ऐसीवर असू नये.

(सदस्य) अदिती

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे आणि असं गरळ ऐसीवर असू नये.

संपूर्ण लेख म्हणजे गरळ, जळफळाट, विखार, मळमळ, तडफड, लोकांना अनाठायी मूर्ख म्हणणं यामुळे अत्यंत बेताल आणि कुरुप भाषेचा झालेला आहे. संपूर्ण वाचवतही नाही.

भुक्त हा शब्द चाळीसेक वेळा तरी आलेला आहे. पण त्याचा अर्थ काही कळत नाही. मला त्याचा अर्थ 'जेवलेला' असा वाटतो. पण राकुंनी तो काहीतरी शिवी थुंकल्यासारखा वापरलेला दिसतो.

"संपूर्ण लेख म्हणजे गरळ, जळफळाट, विखार, मळमळ, तडफड, लोकांना अनाठायी मूर्ख म्हणणं यामुळे अत्यंत बेताल आणि कुरुप भाषेचा झालेला आहे. संपूर्ण वाचवतही नाही.
भुक्त हा शब्द चाळीसेक वेळा तरी आलेला आहे. पण त्याचा अर्थ काही कळत नाही. मला त्याचा अर्थ 'जेवलेला' असा वाटतो. पण राकुंनी तो काहीतरी शिवी थुंकल्यासारखा वापरलेला दिसतो."
तो लेख दिवाळी साजरी करणा-या भुक्त लोकांसाठी आहे. इथे उठसुट मला लेबले लावणा-या कमेंट्स तुमच्यासह अनेकजण करत असतात तेव्हा तुम्हाला नाही का वाटत 'गरळ, जळफळाट, विखार, मळमळ, तडफड, लोकांना अनाठायी मूर्ख म्हणणं यामुळे अत्यंत बेताल आणि कुरुप भाषेचा झालेला आहे. संपूर्ण वाचवतही नाही.' वगैरे. उलट असा कमेंट्सवर मिटक्या मारत कमेंट्स करत टवाळक्या करत राहता की नाही?
भुक्त शब्दाचा अर्थ खरेच कळला नाही की वेड पांघरून ....?
नेहमी स्वत:चे डोेके गहाण टाकून दुस-यांना लेबले लावणा-यांना हा शब्द ऐकून घेण्याची सवय करून घ्यायला हवी की नाही? बाकी लेख पूर्ण वाचलाच नसेल तर मुद्दे लक्षात आलेच नसतील. नुसतेच भुक्त शब्द कितीवेळा वापरला आहे ते मोजत बसलात वाटते.
वर दुस-या संपादक येथे ज्याचा उल्लेख केला आहे त्यावर बोलण्यापेक्षा मुखर्जींचा सीव्ही शोधत बसल्यात.

दुवा

भुक्त (p. 615) [ bhukta ] p [S] Enjoyed or used. 2 Eaten. 3 Crossed, passed, accomplished--a space by a heavenly body in its course.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने