मार्ग मुक्तिचा

तहानलेली नदी
पाण्याच्या शोधात
भटकत होती
भयाण वाळवंटात.

उडणार्या गिधाडास
विचारले तिने
भाऊ मिळेल का कुठे
जीवनदायी पाणी.

पाण्याचे विचारू नको
सापडेल तुला पुढे
ताई मार्ग मुक्तिचा.

एका वळणावर
नदीने पहिले
शुष्क वडाच्या फांदीवर
लटकलेले होते एक प्रेत.

झाडाखाली साचलेला होता
एक ढीग मोठा कवट्यांचा
खेळत होती त्यांच्या सवे
गिधाडांची गोंडस पोरे
फुटबॉल फुटबॉल.

टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐसिच्या विचारवंत वाचकांसाठी अर्थ स्पष्ट करतो आहे.
खर तर कविता शेतकऱ्यांचा परिस्थिती वर लिहायची होती. मुटे भरपूर कविता लिहितात. काही वेगळ्या रीतीने लिहायला घेतली. तहानलेली नदी - शेतकऱ्यांची परिस्थिती, शुष्क वड: उदासीन सरकारी व्यवस्था (वडाचे झाड हजारोंच्या संख्येत पाखरांना,पक्ष्यांना आसरा देते, पण आज शेतकऱ्याला काहीच मदत मिळत नाही). उलट गिधाडे तर मेलेल्या माणसाचे सडलेले गाडलेले मांस हि ठीकान्यावर लावतात. इथे तर गिधाडे मानवीय कवट्यांसोबत खेळतात आहे. (शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर हि मलाई खातात). बाकी फुटबॉलच्या खेळात हि गिधाडे एका दुसर्याला पास द्यायला पटाईत आहेतच.

पण कविता लिहिल्यावर लक्ष्यात आले, या कवितेचे इतर अर्थ हि निघू शकतात. म्हणून अर्थ वाचकांवर सोडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका वाचकाने काढलेला अर्थ

नदी = मुमुक्षु
गिधाड = नास्तिक
जीवनदायी पाणी = दुःखापासून मुक्ती देणारे आध्यात्मिक ज्ञान
मार्ग मुक्तीचा = illuminati way of life
शुष्क वड = ईश्वरविहीन नीरस आयुष्य
एक प्रेत = नास्तिकतेच्या भयाण एकांतात जगणारा जीव
ढीग कवट्यांचा = तत्सम भयाण एकांतवासी जीव
गिधाडाची पिले = नास्तिकतेच्या गहन अंधारातून जन्मणारे consequences...

रचनाकाराच्या अर्थ लावण्याच्या स्वातंत्र्यास दिलेल्या अधिकाराप्रमाणे...(ह.भ.प. मोरघडे यांनी मिसळपाव वर हा अर्थ काढला).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0