गेम ऑफ थ्रोन्स

२४ तारखेला गेम ऑफ थ्रोन्सचा सहावा सीझन सुरू होतोय. त्या निमित्ताने कालच आधीच्या पाच सिझन्सचे बिंज वॉचिंग करून संपवले. सलग पाच सिझन्स बघितल्यावर एक वेगळाच मूड निर्माण झालाय आणि सहाव्या सिझनची उत्सुकता आहे.

इथेही अनेक जण ही सिरीज फॉलो करतात असे समजते. त्यामुळे खफवर लिहिण्यापेक्षा त्यावर इथेच गप्पा हाणूयात म्हणून धागा काढलाय.

तुमची आवडती क्यारेक्टर्स, दर एपिसोडवरच्या गप्पा, आधीच्या सीझन्सवरील गप्पा, टिका, टिपण्या, पिंका, याचं चित्रीकरण, बिहाइंड स सीन्स गॉसिप, यातील तंत्रज्ञान, पुस्तक आणि सिरीजमधील केलेल्या फरकावर चर्चा, आगामी सीझनमध्ये काय होईल याचे अंदाज या व अश्या कशावरही इथे गप्पा मारू शकता.

====
डिस्क्लेमरः या पुढे पाचव्या सिझनच्या टर्निंग पॉइंटबद्दल बोलणार आहे. ज्यांना रसभंग नको असेल त्यांनी पुढे वाचू नये

गेल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडनंतर जॉन स्नो खरंच मेलाय का? हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. अनेक ब्लॉगर्सने ट्रेलर्सचा अभ्यास करून जॉन स्नो जिवंत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काय ते कळेलच.
माझी यातील पहिल्या सीझनपासूनची आवडती पात्रे खलीसी, आर्या स्टार्क आणि टीरीयन लॅनिस्टर तिघेही जिवंत असल्याने माझा इंटरेस्ट अजून टिकून आहे Smile

या सिरीजचे फॅनफिक मी अजून वाचलेले नाही. पण ते सिरीजपेक्षा भारी असेल असा अंदाज आहे. कोणी वाचलेय का?

भारतात ही सिरीज कुठल्या च्यानेलांवर दिसते का? ती ही अनसेन्सॉर्ड (कठिणच आहे Wink ).. बहुदा जालावरच पहावी लागेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Game ऑफ Thrones 5th season बघतेय .

यातील कोणतेही पात्र घ्या जे नायकाच्या आदर्शीकरणाच्या जवळ जैल त्याची हमखास विकेट काढतात नायतर फ्लाव ठेवतात

जिमी लिनेस्तर - देखणा, शुर बट यु नो वाट ही दीड लास समर
जॉन स्नो - न्यायी, धाडसी अन गचकला बरोबर
नेट स्टार्क - जॉन स्नो सारखीच गत
रॉब स्टार्क - तिच गत

मग पुरून उरला तो टायरिओन लिनेस्तर... अर्र ही इज क्लेवर बट कांट से चार्मिंग दिड फुट्या आहे ना तो...

तुम्ही चार लोकात छातीठोक पणे म्हणुच शकणार नाही आय कैन रिलेट मायसेल्फ़ टू अमुक करैक्टर कोज ही गोट सम इश्यु ज ओर मोस्ट प्रोबेब्ली ही इज डेड. मायला तो पीटर बेलीश ज्याला त्याला घोड़ा लावत सुटलाय पन कोणी त्यावर अविश्वास दाखवत नाय अन ती खेलिसी प्रत्येकाकडून घोड़ा लावून घेता घेता सहीसलामत बाहेर पड़ते सुरुवातीला प्रकरण बरे वाटत होते पण आता सगळे कृत्रिम वाटत आहे. तगड़ी स्टारकास्ट, दर्जेदार अभिनय, अत्युच्च महागडी निर्मितीमुल्ये, दणकेबाज नग्नता या बाबी कमकुवत स्लाईड शो टाइप कथानक सादरीकरणावर मात करतात इतकेच.

actions not reactions..!...!

एका कुठल्याशा साईटवर (बहुदा कोरावर) एका युजरचा प्रतिसाद मार्मिक होता. (भारतात ही सिरीज एनसेन्सर्ड का प्रक्षेपित होत नाही? असा काहिसा प्रश्न होता)

बरं झालं ही सिरीज जशीच्या तशी टिव्हीवर येत नाही. सत्तरीतल्या सास बहुमध्ये गुरफटलेल्या माझ्या घरातील अनेक मोठ्यांना हि सिरीज बघुन त्यांच्या "संस्कार व परवरीश" या शब्दांनाही फेफरं येईल. भारतात टिव्ही महातार्‍यांसाठी व इंटरनेट तरुणाईसाठी अशी ठाम वाटणी आहे तेच उत्तम आहे Tongue

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टिरियन लॅनिस्टर, हँड्स डाउन. त्याला मारले तर सेरीज़ बघणेच थांबवीन.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

माझे फेवरीट खालील क्रमाने

१) मेलीसांड्रे द रेड वुमन - मला तिचा अ‍ॅटीट्यड, जादु, धोकादायकपणा आणी लाल केस प्रचंड आवडतात.
२) जॉन स्नो - प्रामाणीक, शुर, प्रेमळ आणी बराच माझ्यासारखा थोडक्यात "ही नोज नथिंग" Smile
३) आर्या स्टार्क - ब्रेव अँड प्रॅक्टीकल. लाँग लीव यु डीअर.
४) टीरीअन लिनेस्टर - द गेम चेंजर. ज्याच्याशी कधीच शत्रुत्व घेउ नये असा.
५) प्रिन्स ओबेरायन - शस्त्रांची जाण, वापर असणारा उत्कृश्ट योध्दा. बट इन क्लोज काँबॅट विदाउट वेपन्स ही इज जस्ट नथिंग अँड दॅट्स द फॅक्ट वी आल शुड हॅव टु लिव वीथ.

आणखी एक पात्र आवडते आहे पण ते आवडणे माझ्यावर अथवा सर्वच प्रेक्षकांवर लादलेले आहे असे माझे प्रामाणीक मत आहे. म्हणून त्याबाबत दोन ओळी जास्त लिहाव्या वाटणे अस्वाभावीक नाही. ते पात्र म्हणजे खॅलिसी - हिच्यामधे घंटा काडीचे गुण नाहीत, एक्सेप्ट द फॅक्ट दॅट शी इज द बॉय हु लिव्ड थोडक्यात अशी व्यक्ती जिच्यात तिला वरचढ बनवणर्‍या नैसर्गीक शक्ती आपोआप असतातच तरीही ती व्यक्ती डोक्याने थोडी कमीच असते (स्लो लर्नर, डीस्लेक्सिया कांइंड ऑफ पर्सन) ज्याची हमखास भरपाइ अशा व्यक्तीला कथेत नेमकी योग्य माणसे मिळत मिळत होतच राहते. मग तो रानटी टोळीप्रमुख परंतु प्रेमळ नवरा असो ज्याला डॉग शॉट ऐवजी काउगर्ल पोजीशन शिकवुन ती त्याची आवडती बनते (व्हॅट अ क्रॅप) अन त्याच्या म्रुत्युनंतर ड्रॅगनची अंडी उबवुन त्याच्या कबील्याचा ताबा घेते. अ लॉट ऑफ बुल्शीट हॅप्पन वीथ हर बट शी सर्प्राइजींगली फाइंड्स हर वे. सो शी कॅन नॉट डाय इफ सिजन इज नॉट अबाउट टु एंड. येट आय लैक हर फॉर हर फेमीनीटी, सो डज एवरीवन. बिकाज शी इज क्युट दो. आय वुड से गॉड ब्लेस द क्वीन.

actions not reactions..!...!

खलीसीबद्दल सहमत.

बाकी डारिओ नहारिस हे पात्रदेखील जबर्‍या आहे.

व्हॅलार मोर्गूलिस!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

व्हॅलार दोहारीस

.

actions not reactions..!...!

पण खलिसीच्या समर्थकांना मी फार स्विकारत नाही. कारण आज तागायत कथेत सत्तेसाठी हुतुतु चालु असताना अनेक लोकांच्या विवीध चाली स्वभावांचे दर्शन सत्तेच्या खेळाच्या अनुशंगाने होत असताना, प्रत्येकजण खलीसीच्या प्रेमात पडुन तिचा समर्थक बनतो ही गेम ऑफ थ्रोन्स च्या द्रुश्टीकोनातुन भितीदायक बाब आहे. अर्थात बुटक्या मात्र स्वतःचा जिव वाचवायला तिला जॉइन झालाय बघुया पुढे काय होतय ते...

...तरीही खलीसीवर अग्नीचा प्रभाव चालत नाही म्हणून मेलीसांड्रे तिचे काही वाकडे करु शकत नाही आणी व्हाइट वोकर्स (उर्फ झोंबी) जे समग्र माणुसकीचे शत्रु आहेत त्यांना तिचे ड्रॅगनच वरच्यावर जाळुन संपवु शकतात या कारणाने तिच्यासमोर सर्वांना शरण जावेच लागेल हेच काय ते बघणे आपल्या नशीबी असेल तर गेम ऑफ थ्रोन्स हे नाव बदलणेच योग्य.

लेट्स सी, फिंगर्स क्रॉस्स्ड.

actions not reactions..!...!

खलिसी हे पात्र मोठं रंजक काहिसे अवास्तव आहेच, पण साला कॅरेक्टरमध्ये काय माज ए! त्या माजावरच मी फिदा!

बाकी ती, आर्या आणि नेड स्टार्कची बायको ही स्त्रीपात्रे काय बनव्लीयेत.
त्याच सोबत सर्सी आणि मार्जरी या बायाही कहर उभ्या केल्यात. पाचव्या सीझनमधील सर्सीच्या न्यूड वॉकच्या वेळची एक्सप्रेशन्स कम्माल!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खलीसीला कसला आलाय माज. माजबीज काही जमत नै तिला, यद्यपि तो अनिवार्य असला तरी. माज म्हणजे काय हे बघायचे असेल तर सर्सेई बघा. आर्या माजुरडी नाही, फक्त अ‍ॅसर्टिव्ह आहे. माजुरडी कोणी असेल तर सर्सेईच. न्यूड वॉक करायला लावले हे उत्तम झाले. माज बरा उतरला. नंतर भलेही एकेकाला तेलात तळून काढले तरी बेहत्तर, तूर्तास तरी तिचा माज उतरवला हे बेष्ट झाले.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सरसईची भयानक धिंड काढली राव. शी डिजर्व इट.

actions not reactions..!...!

माझे आवडते कॅरेक्टर हे अर्थात टिरियन. पण या शिवाय दोन लोक सगळ्यात महत्वाचे आहेत, पिटर बेलीश आणि लॉर्ड व्हेरिस. सगळ्यात नावडते कॅरेक्टर म्हणजे सॅन्सा स्टार्क अगदी पहिल्या एपिसोड पासुन मुर्खपणा चालु आहे हिचा. सहाव्या सिझन मधे बहुदा सॅन्सा चेच पात्र बदलणार असे प्रोमो बघुन वाटत आहे.

आहाहाहा, अगदी अगदी. बेलिश आणि व्हॅरिस खरेच लय बेरकी तेच्यायला.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मला ओलेना टायरेलबद्दल उत्सुकता आहे .

टिरियन लॅनिस्टर बेस्ट आहे .तो नसेल तर काही इंटरेस्ट उरणार नाही .

आंधळी झाल्यावर आर्या स्टार्क काय करते ते बघायचय .

जॉन स्नो नाही मारायला पाहिजे राव .
तो नेड स्टार्कच्या बहिणीचा लिएनाचा आणि Rhaegar Targaryen चा मुलगा आहे असं spoilers म्हणत आहे .

जॉन स्नो हा नेड स्टार्कचा मुलगा नाही????

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तसं नसावं. रुमर्स असतील
नेड स्तार्कच्या बायकोचा एक संवाद आहे ना की नेडचा हा मुलगा दुसर्‍या बाईपासून तो झालाय हे मी स्वीकारू नाही शकले आणि त्याच्यावर प्रेम नै करू शकले वैग्रे वैग्रे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तेच तर. म्हणजे कॅटलीन स्टार्कला जॉन स्नो हा नेडचा पोरगा आहे हे माहिती आहे/ पर्सेप्शन आहे. त्यामुळे तो स्टार्कचा नसून त्याच्या बहिणीचा पोरगा आहे ही माहिती नवीन होती.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

. अर्थात मग त्याला नाईट वाच ला का पाठवतात हे मलाही न समजलेले कोडं आहे

actions not reactions..!...!

तो नेड स्टार्कच्या बहिणीचा लिएनाचा आणि Rhaegar Targaryen चा मुलगा आहे असं spoilers म्हणत आहे .

बोले तो, पुस्तकात याच्या खूप हिंट्स आहेत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

कॅटलीन टुलीची बहीण ही जॉन अ‍ॅरिनची बायको. हाच तो म्याड किंग. तो टार्ग्यारियन नव्हता काय?

झालंच तर (फक्त सीर्यलीच्या आधारे बोलायचे तर) नेड स्टार्कची बहीण ही कुणा टार्ग्यारियनशी संबंधित असल्याचे कधी दिसते?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

जॉन अ‍ॅरिन हा टार्गारिअन नाही बे. मॅड किंग बोले तो 'डेनिरिस + र्हाइगर + विसेरिस'चा बाप. अर्थात हे पुस्तकातलं आहे. सिर्यलीत काय दाखवलय नाही माहित. बघितली नाहिये अजून. पण र्हाइगर टार्गारिअन लिअ‍ॅनावर लट्टू असतो हे पुस्तकात आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धन्यवाद. हे माहिति होतं पण लिअ‍ॅनावर लट्टू असलेला तो रॉबर्ट बाराथिऑन असे दाखवलेय सीर्यलीत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

रॉबर्ट नेट स्तार्कच्या बहिणीला र्‍हेगारच्याच तावडीतून सोडवायला निघतो आणि एकुणच टार्गेरियन वंशाला (मॅड किंग सकट) संपवतो असा रॉबर्टपूर्व काळाचा इतिहास आहे.
हे पुस्तकात बर्‍यापैकी स्वच्छ आहे, सिर्यलीत पहिल्या सिझनच्या नेड आणि रॉबर्टच्या तळघरातील बोलण्यात फारच मोघम व इन्डिरेक्ट उल्लेख आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक मिनिट, मॅड किंगला रॉबर्टने संपवले तर जेमी लॅनिस्टरला किंगस्लेयर का म्हणतात मग?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मॅड किंगला रॉबर्ट नाही मारत . जेमीच मारतो .पण युद्ध kidnapping मुळे सुरु होते .

रॉबर्टचा लिएनावर जीव असतो .बहुतेक त्या दोघांचा लग्न ठरलेला असतं असं वाटतंय .

हां रैट्ट है ये.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

उठावाचा नेता रॉबर्ट होता. र्हाइगरला रॉबर्ट मारतो. जेमीने अ‍ॅक्चुअली मॅड किंगला मारलं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धन्यवाद. हा र्‍हेगार कुठे दिसत नाही. मला अंमळ कन्फूजन झाले ते म्हणजे खलीसीच्या भावाचे नाव र्‍हेगार आहे असे वाटले, पण ति व्हिसेरिस आहे हे नंतर लक्षात आले.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अबे दोघेही तिचे भाऊ असतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

होय बे, पण डेनेरिस आणि तिचा तो इन्सेस्टी भाऊ हेच काय ते दिसतात प्रथमपासून. र्‍हेगार दिसतच नै कधी प्रत्यक्षात.

बाकी, ते दोघे पहिल्यांदा ज्याच्या व्हिलामध्ये राहतात त्याचे नाव आणि त्यांच्याशी रिलेशन काय असते? खाल द्रोगो डेनेरिसला गुलामांच्या बाजारात पाहिल्यासारखे पाहतो त्या सीनच्या वेळचा व्हिला.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मॅजिस्टर इलिरिओचं घर म्हणतोय्स का? आठवत नाही बे काय इशेश होत ते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हां तोच तो. इशेश असे नाही पण "व्हाय हिम, त्याच्याकडेच का आणि कसे आले" असा प्रश्न होता इतकेच. पुस्तके वाचायला माझी ना नाही पण सेरीज़ पूर्ण झाल्याशिवाय हाती घेणार नाही असे म्हणतोय सध्या तरी. उगीच पाचव्या कादंबरीनंतर कलपड व्हायला नको.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अर्रे बॅट्या ती लिंक टाकलीय बघ.. सगळ्या गोष्टी आहेत त्यात.

सदैव शोधात..

येस्सार, पाहतो. अनेक धन्यवाद!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

प्रत्यक्श मारले जेमिने पण तो रॉबर्टच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या सिव्हिल-वॉर सदृश लढ्यात लढत होता. (असं मला कळलंय इतकंच Wink )

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Aerys II Targaryen हा म्याड किंग . त्याचा मुलगा Prince Rhaegar हा लिएनाला kidnap करतो .

season ५ मध्ये किवा season १ मध्ये भरपूर उल्लेख आहे लिएनाच्या kidnaping चा .

जॉन अ‍ॅरिन म्हणजे लॉर्ड ऑफ इरी.

येस, जॉन अ‍ॅरिन माहितीये कोण ते. लिअ‍ॅनाच्या किडन्यापिंगबद्दलचं आठवत नैये. पाहिलं पाहिजे पुनरेकवार.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

season १ मध्ये रॉबर्ट आणि नेड स्टार्क तळघरात बोलत असतात . रॉबर्ट एका पक्ष्याच पीस लिएनच्य पुतळ्याच्या हातात ठेवतो .

season ५ मध्ये ,sansa स्टार्क तळघरात मेणबत्त्या पेटवत असते तेव्हा ती आणि बेलीश बोलत असतात.

हे प्रसंग आठवताहेत पण तेव्हाचे संभाषणातील तो भाग आठवत नाहीये.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

पण मग तो हे आपल्या सख्ख्या बायकोपासूनही का लपवून ठेवतो - त्याबद्दल पुस्तकात काही आठवत नाही (अर्थात मी सगळी पुस्तके वाचलेली नाहित. काही भागच वाचला)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तकातही अजून जॉन स्नोची आई कोण याचा उल्लेख नाही. काही थिअर्‍या आणि हिंट्स आहेत.

लिअ‍ॅनावर रॉबर्ट आणि र्हाइगर दोघेही टप्पे टाकत असतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

लिअ‍ॅनावर रॉबर्ट आणि र्हाइगर दोघेही टप्पे टाकत असतात.

मोलाची माहिती. कन्फूजन क्लिअर झालं, धन्यवाद.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

लिअ‍ॅनावर रॉबर्ट आणि र्हाइगर दोघेही टप्पे टाकत असतात.

त्याच्या मागचे खरे कारण पुस्तक नीट वाचले तर कळेल. मी गुपित फोडत नाही.

अनु राव लबाड आहेत. एकीकडे म्हणतात सीर्यलीचा धागा पाहून मायबोलीची अआतह्वण झाली आणि दुसरीकडे सगळी पुस्तके-सीर्यली पचवून बसलेल्या आहेत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मला काल्पनिक पात्र आणि व्यक्तींबद्दल जणु काही ते सर्व खरे असल्या प्रमाणे चर्चा करणे उदा "अ" "ब" शी असा का वागला वगैरे, हे अतिशय कंटाळवाणे वाटते. मी सिरीयली बघते पण म्हणुन त्या बद्दल अशी चर्चा मला झेपणारी नाही.

वय हो वय! TongueWink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वय तुझे झालय ऋ, काहीच रोचक वाटत नाही तुला हल्ली. ग्रंपी ओल्ड मॅन ऑफ ऐसी कुठला.

चर्चा तर होनारच ओ. बाकी तुम्ही इतके सगळे वाचून-पाहून बसल्या आहात त्यामुळे तुमचा आक्षेपही कसा व्हॅलिड ठरतो काय की.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

असा आपण गैरसमज करून घेतला असेल पण वस्तुत: चर्चा कथासुत्राबाबत चालु आहे ज्याचा पात्रांच्या खरे असण्या नसन्या बाबीचा काडीचा संबंध नाही एवढे सुध्दा समजत नाही ? एनीवन कैन एक्सप्रेस्स वाट दे थिंक ऑफ़ स्टोरी इज अल्टीमेट थिंग इज हेपनिंग अराउंड

actions not reactions..!...!

ओके.
त्या युद्धात एकुणाच लॅनिस्टरांचा सहभाग रॉबर्टला त्यांच्या पैशासाठी करावा लागतो त्या बदल्यात आपल्या मुलीला राणी कर अशी मागणी लॅनिस्टर हाउसकडून होते असं माझं अंडरस्टन्डिन्ग योग्यय का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येस. मला वाटते लॅनिस्टर दादाजी हे कधीतरी प्रत्यक्ष पुढच्या (४-५) सीझनमध्ये सांगतोदेखील. सर्सीच्या मुलीला डॉर्न देशात पाठवायला सांगतो तेव्हा सर्सी विरोध करते की तिलाही असेच किंग्स लँडिंगमध्ये पाठवले गेले होते, तेच तिच्या मुलीच्या नशिबी नको वगैरे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

लॅनिस्टर चढती बाजू कोणाची ते बघून पलटी मारतात. पैशाची गरज रॉबर्ट राजा बनल्यावर मग येते. पैशाच्या बदल्यात राणी कर हा सौदा होता का ते आठवत नाही.

सर्सी र्हाइगरवर लाईन मारत असते हाही पदर आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सर्सी र्हाइगरवर लाईन मारत असते हाही पदर आहे.

हे माहित नव्हतं! तरीच तिचा स्टार्कांवर इतका राग. तिचा नवरा आणि प्रियकर दोघेही त्या स्टार्क कन्येसाठी झगडताहेत Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका बाईच्या प्रेमात पडतो ज्यातून बास्टर्ड जॉन स्नो जन्मतो अशा स्पष्ट हिंट्स सिरिअलमधे आहेत .

actions not reactions..!...!

जॉन स्नो लईच भारी दिसतो .

डारिओ नहारिस पण बेस्ट आहे .

खलीसी डोक्यात जाते .

बाकी ते व्हाईट वॉकर लोक्स एकदा वेस्टेरॉसमध्ये येवोत अशी फार कळकळीची वगैरे इच्छा आहे. हे लॅणिस्टरफिणिस्टर सगळे पाचोळ्यागत उडून जातील त्यांपुढे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

काय हे?
आपल्या एकापेक्षा एक लाम्बण लावलेल्या, पिढ्यान्पिढ्या चाललेल्या सरस(?) सिरियल सोडुन फॉरिनची पाटलीण (मराठीत चर्चा चाललीय म्हणुन सिरियल आपली पाटलीण हो) कुठे शोधलीत? ;;) Blum 3

चान्गला धागा आहे. मौजमजा आवडली.

उल्का

अरे किती तो कीस काढताय रे उगी.? Wink
हे विडिओज पहा, सगळी प्री-सिरियल हिस्टरी थोडक्यात नि मस्त सांगितलीय. Smile

सदैव शोधात..

सिरीज दोन वेळा पाहून झालीए. पाच पैकी अडीच पुस्तकं वाचून झाली आहेत. सिरीज एकंदरीत ठिकच. पुस्तकांत फार्फार लांबण आहे अन रिपिटीशन आहे. पण काही इंटरेस्टींग कॅरॅक्टर्सची श्टोरी सिरीजमध्ये बदललेली आहे.

खलिसीचं कॅरॅक्टर पुस्तक अन सिरीज दोन्ही मध्येही एकदीच रद्दड आहे. टिरीयनचं कॅरॅक्टर बरं आहे, ड्रिंकलेजनी त्याला चार चांद लावलेत सिरीजमध्ये.

इतक्या रामायणानंतर सैरावैरा सुटलेल्या गोष्टींना ग्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मार्टीन वेसण कसं घालतो ते बघण्यात उत्सुकता आहे. तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतील असं वाटतं. (इंटरनेटावरील ओव्हर अ‍ॅनॅलिसीसचा कंटाळा आला आहे. मार्टिननेही इतका विचार केला नसेल. त्यातल्या त्यात ह्या चॅनेलचे व्हिडीओ पहाण्यासारखे आहेत.)

इतक्या रामायणानंतर सैरावैरा सुटलेल्या गोष्टींना ग्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मार्टीन वेसण कसं घालतो ते बघण्यात उत्सुकता आहे.

+ १००

बादवे, तसं त्याला कंटाळा आला की तो ते पात्र मारून टाकतो तेव्हा इतकंही कठीण जाऊ नये Wink

तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतील असं वाटतं

ते हवेतच. त्याशिवाय फॅनफिक कसे येणार?
महाभारत नाहि का आधी तुलनेने लहानच होतं, फॅन फिकची उपकथानके अ‍ॅड होत होत केव्हढं झालं!!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बापरे साठ प्रतिसाद ते सुध्दा फुटकळ क्लिशे वादविवाद टाळुन ? आशा धाग्यांची तुलनेत इथे नक्कीच उणीव आहे. जनमताला साद घालणारा धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे अभिनंदन

actions not reactions..!...!

season ६ चा first एपिसोड पाहिला का कोणी?

मी पाहिला कालच. पण म्हटलं कोणी पाहिला नसेल तर उगाच काय झालं कशाला फोडा! Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जॉन स्नो खरच मेला का ?

बाकी नाही सांगितलं तरी चालेल ..

होय अजून तरी तो खरंच मेलेला आहे Wink
आणि रेड वुमन हे पहिल्या एपिसोडच्या नावावरून ती त्याला या एपिसोडमध्ये जिवंत करणार असा तर्क लाव्ला जात होता तसे या एपिसोडमध्ये काहीही होत नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

:-S Biggrin

ती स्वतःच म्हातारी झाली आहे न या एपिसोड मध्ये .

ती म्हातारी असते हे आपल्याला कळलेय Smile
फक्त ती म्हातारी असते का अमर हे बघायचेय! (शिवाय तिने यु नो नथिंग जॉन स्नो असा ड्वायलाग मारलेला हयच!)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तिने यु नो नथिंग जॉन स्नो असा ड्वायलाग मारलेला

तेच मला कळेना, भेंडी सगळं सोडून तिला हे कळालं कसं? संगती लागत नैये याची.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मला कळलेला अर्थ .. तिला magical powers असतात. त्यामुळे तिला कळत. तिला अजिबातच सूट होत नाही तो dialog . तो यीग्रीतलाच शोभून दिसतो.

त्याचे नाव ओपनींग क्रेडीट्स ला आहे, गेस्ट स्टार म्हणून न्हवे... त्यामुळे त्याचे दर्शन होतच राहील. लेट्स सी. प्रमाणाबाहेर सब प्लॉट तयार केले की एपीसोड कसे स्लाइड शो बनु लागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स. थँक गॉड अंजावर फॅन्स कडुन प्रमुख पात्रांचे अख्या सिजनचे एपीसोड एडीट करुन सलग कथानक दाखवणारे विडीओ उपलब्ध्द आहेत. यु डोंट मिस द फन दॅट वे.

actions not reactions..!...!

थँक गॉड अंजावर फॅन्स कडुन प्रमुख पात्रांचे अख्या सिजनचे एपीसोड एडीट करुन सलग कथानक दाखवणारे विडीओ उपलब्ध्द आहेत. यु डोंट मिस द फन दॅट वे.

एखादा नमुन्यादाखल व्हिडो द्या.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सुरुवात म्हणून ही लिंक बघा...!

https://www.youtube.com/playlist?list=PLAgV9yBW1uhe5ptPOEoCSnBXSzLcItIpZ

आणी शेवट याचीच एक आख्खी सलग फाइल (४० मिनीटांच्या तुकड्यात) कुठे आहे ते समजण्यात नक्कि होइल. आहे, नेट वर उपलब्ध्द आहे.

actions not reactions..!...!

धन्यवाद!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

थीम कव्हर्सची ही लिस्ट जरूर ऐका!

http://time.com/3894017/best-game-of-thrones-theme-song-covers/

त्यातले पहिले फ्लॉपीज वापरून केलेले आहे!!!

मला आवडणारे हे पर्शिअन कव्हर -

हे दोन व्हिडीयो बघितले काय? मराठीत पहिल्यांदा बघतोय. ऐसीकर 'निखिल देशपांडे' पण दिसतोय यातः

http://www.bobhata.com/manoranjan/hivalayetoy-game-thrones-season-6-prev...

http://www.bobhata.com/manoranjan/hivalayetoy-part-2-gameofthrones-s06e0...

हे असं मराठीत होतंय हे काय भारीये!

मस्त रे निखिल!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वांनी सिजन सिक्स पार्ट टु पाहिला का ? उगाच चर्चा सुरु होउन नंतर स्पॉइलर नको वाटायला?

actions not reactions..!...!

सास भी कभी बहू थी मध्ये मिहिर परत आला म्हणतात. ROFL

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

BiggrinBiggrinBiggrin

असो सिजन प्रेडिक्शन म्हणून सुचवतो खलीसी, सान्सा अथवा सरसई यापैकी एक शेवट्च्या एपीसोडमधे नक्कि मरणार.

actions not reactions..!...!

होय!!! मिहिर परतूनी आला!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोण मिहिर ??? (is it john snow )

मी अजून बघितला नाहीये पार्ट २ .

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे पण सास भी कभी बहू थी बंद झाली न ? आता कशाला तो येईल परत ? आणि अजून एक म्हणजे काय केकता कपूरने Game of thrones direct करायला घेतलंय का ?

मला काहीच clue लागत नाहीये .

बघ बघ, आधी दुसरा एपिसोड बघ मग बोलू Tongue

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या मध्ये बहुतेक R+L=J Theory ही फॅन थिअरी खरी ठरेल अशा आवया उठत आहेत. एकंदरीत प्रचंड मजा येत आहे!

अजून एक म्हणजे Tyrion Lannister is Targaryen

आयला. म्हणजे खलीसीचा भाऊ होणार की काय टिरियन?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

येस
.three headed dragon .

खलीसी,टिरियन आणि john snow

भाऊ नाही म्हणता येणार exactly .

पाने