चेहऱ्यामागचं रूदन

तुझ्या हसण्यातसुद्धा एक प्रकारचं
रूदन दडलेलं असतं...
तुझ्या हसण्यापासून ते जर विलग केलं
तर ते एखाद्या विशुद्ध रडण्याच्या अगदी
जवळपासंच पोहोचलेलं असेल...

वर्षानुवर्ष पुरूषत्वाच्या अंगरख्यात लपेटूनच
ठेवत आलास तू तुझ्या अश्रूंना,
डोळ्यांच्या आड दडवून ठेवला आहेस
अश्रूंचा घडा आणि त्याची राखण करतो आहे
पुरूषी अहंकाराचा नाग...

आता आज झटकून टाक तो अंगरखा,
आणि फुटून जाऊदे तो घडा,
कळूदे आता दुनियेला
तुझ्या दबलेल्या आवाजाचं रहस्य...

पण तरीही आड येतं आहे तुझं पुरूष असणं...
मनावरचं ओझं वाढतंच जातं मग हळूहळू...
वाढत जातं आणि एक दिवस असह्यच होतं
तरिही तू सारं काही हसून साजरंच करतोस...

आणि मग एखाद्या दिवाशी तोंडावर
भरपूर पाणी मारून घेतोस,
आणि त्यात वाहून जाऊ देतोस तू
तुझ्या डोळ्यातलं पाणी ....

हे असं रडल्यावर तुझा घसा नाही का रे दुखत?
जीव गुदमरत नाही?
जबडाही दुखत नाही तुझा,
जेव्हा तुझं रडू असं कचाकचा चावून खातं
तुझं पुरूष असणं तेव्हा?

आता एक कर... माझ्या हातात हात दे तुझा...
मी शिकवेन तुला
रडण्याची कला...
अरे रडणं दुबळेपणा नाही रे...
हे एक साहस करून पहा एकदा,
झटकून टाक तुझा पुरूषी अहंकार
इतिहासातल्या मिथकापासून सुटका करून घे,
आणि रडून घे मनसोक्त,...
तुझ्या साऱ्या अंतःपिडा संपून जाईपर्यंत रडून घे...

सारं सरून गेल्यावर,
मला खात्री आहे तू हेच म्हणशील,
" रडणं सुद्धा किती चांगलं असतं!
सर्वात निर्मळ भाव रूदनाचा, नितळ पाणी अश्रूंचं!"
आणि मग म्हणशील, " आता मी आधीपेक्षा अंशतः बरा माणूस झालोय...खरंच रडणंसुद्धा चांगलंच असतं!"

~अवंती

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me