..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो.
अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो

हाताने ती भरवीत होती घास कुणाला .
तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.

तिने ठेवले खांद्यावर मस्तक विश्वासाने
साधा भोळा हा आपला शृंगार म्हणालो.

किती वेदना दाराजवळि दिसल्या घुटमळताना
होईल तुमचा छान इथे उपचार म्हणालो.

दु:ख म्हणाले निघताना "मज बरे वाटते"
गायब केला जुना तूझा आजार म्हणालो.

बदनामी जर यदाकदाचीत सत्य निघाली.
होईल माझा नक्की जयजयकार म्हणालो.

नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली
दिसशी तू तर चतूर देखणी नार म्हणालो

स्वागत केले इथे तसेही सुमनांचे पण
काट्यांनाही मी माझा परीवार म्हणालो..

शत्रू येता कवटाळूनी मी त्याला तेव्हा..
मित्रा तू तर नवाच माझा यार म्हणालो..

मेघ गर्जवत संकट येता दाहीदिशांनी
होईल आता नक्की मुसळाधार म्हणालो.

नशीब येता घेऊन माझी हार कधी जर..
हार नव्हे हि,हा तर माझा सत्कार म्हणालो

पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा!
निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो..

------
कानडाऊ योगेशु

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोडक्यात लै झालंय. बास आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

बै/बुवा, कै समजलं नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावेळेची विशेष आवडली नाही. नवीन चमकदार कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन चमकदार कल्पना नाही.

अगदी प्रामाणिक प्रतिसाद आवडला. गझलसदृश कवितेत नक्की तेच अभिप्रेत आहे.

पण वेगळ्या अंगाने पाहा. अश्या टाईप्सच्या गझलमध्ये नेहेमी संकंटांशी मी कसे झुंजलो दु:खालो कसे पिटाळून लावले व्गैरे अशाच कल्पना असतात.
पण ह्या कवितेत मात्र मी जरा वेगळे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी वाईट वेळ का आलीय हो तुमच्यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई गं. नका हो असं काही बोलु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग काय वो? तुम्ही दुखाला दुख म्हणत नाही, वेदनेला बोलावताय, पराभवाला विजय समजताय.

तुम कुछ लेते क्युं नही? गब्बु कडे छान ऑप्शन्स असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु माझे दोन्ही हात तोडुन टाकेल ना! Biggrin

बाकी कवितेतली भावना ही दरवेळी वैयक्तीक असेलच असे नाही. एखाद्या विचाराचे ते अ‍ॅनालिसिस असु शकते.
संदीप खरे नामंजूर मधे

रोख पावती इथेच घ्यावी अन द्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे नामंजूर

असे लिहितो तेव्हा जर त्याला कोणी काय हिंमतवान मनुष्य आहे असे समजले तर पुढे तोच कवी मी मोर्चा नेला नाही मधे

मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजुस जेव्हा
तेव्हा मारायाला देखील मज कुणी उचलले नाही

असे अगदी कचखाऊ भ्याड मनोवृत्तीचे वर्णन करतो.
दोन्ही कविता वाचुन तो तसाच आहे असे समजणे ही चूक आहे.
त्या त्या वेळेला कवीची ती ती विचार करतानाची मनस्थिती असू शकते.

दुखाला दुख म्हणत नाही, वेदनेला बोलावताय, पराभवाला विजय समजताय

अहो दु:खाला दु:खच म्हणतोय उलट त्याला बरे करुन परत पाठवलेय.
वेदना आलीच आहे तिचा उपचार चालु आहे आणि पराभव अटळ दिसतोच आहे तेव्हा दरवेळी विजय मिळणारच असे काही नसते, कधी पराभव पत्करावा लागला तर सन्मानाने स्वीकारला तर काय हरकत आहे असा विचार मांडलाय.
आयुष्यात दरवेळेला ऊर फुटेस्तोवर संघर्ष करायलाच हवा असे काही नसते कधी कधी थोडा दृष्टीकोन बदलला तर जे आहे ते स्वीकारता येते अशी भूमिका मांडली आहे इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर कवि कमी आणि त्याला प्रतिसाद देणारे अजुनी दुर्मिळ. लिहीत जा पण दर वेळेला काळजाला भिडेलच असे होणार नाही. "तर्क वापरउन, कारणे शोधून मग कविता आवडुन घेण्याच्या द्राविडी प्राणायामाला" तर अगदीच अर्थ नाही. कविता काळ्जात शिरली पाहीजे. थांबा तुम्हाला एक मस्त वाक्य सांगते. माझ्या आवडीचे आहे.
__________
A passionate woman, I like my men and books to knock my socks off. It's got to be love at first sight. इथे बुक च्या जागी मी कविता हा शब्द बदलेन. बस्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हनिसिंग च्या गाण्यासारखी वाटली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!