अडनिडी मुलं

लेक मागच्या वर्षी दहावीला होती . मैत्रिणी इतकंच सख्ख्य असल्यामुळे बऱ्याच हृदयातल्या गोष्टी ती शेअर करते . अगदी मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा सल्ला मागते .तिला माहित आहे काहीही सांगितले तरी चालते, ओरडा मिळत नाही मग बरीच देवाण घेवाण होते . ती आणि तिचे मित्र मैत्रिणीविषयी अपार माया आहेच पण काय होणार ह्या अडनिड्या मुलांचे याची चिंता सतत सतावत असते . म्हणून हा थोडासा प्रयत्न .

मॉम यु नो , ऑल गर्ल्स क्रेझी अबाउट ..... , ऑल ह्याव क्रश ऑन हिम ,. क्लास बंक करून मुली त्याला बघायला जातात ... मी अवाक ... पण न जाणवून देता ... एवढं काय आहे ग त्याच्यात... सर्व जणी एवढ्या वेड्या झाल्यात त्या ? माझा भाबडा प्रश्न ... ही इज स्पोर्टस कॅप्टन मॉम ... खूप हार्ड वर्क लागतं तेंव्हाच स्कुल चा स्पोर्टस कॅप्टन होता येत . माझ्या ज्ञानात लेकीची भर . पण मला आठवले ते ब ,क तुकड्यातले आडदांड .. खेळण्यात खूप हुशार असून पण कोण कुत्रं विचारायचा नाही त्यांना .... अभ्यास करून कितींनी झेंडे लावले हा एक रीसर्च पेपर होईल .. असो भूतकाळात जास्त रमू नये ..

आज कॉलेजचा पहिला दिवस .ओरिएन्टेशन होतं , लेकीला सोडवायला गेले होते . तिथे मित्र मैत्रिणी भेटल्यावर लेक कुठे गायब तेच समजत नव्हते . एकमेकांना मिठ्या काय ,पूर्ण बत्तीशी दाखवून स्माईल काय .. प्रत्येकाच्या हातात ४-५ इंची मोबाईल काय ... ५०%पेक्षा जास्त मुलं सेल्फी काढण्यात मग्न ... सर्वांत महत्वाचे म्हणजे रंगलेले केस ... काहींनी निळे ,काहींनी जांभळे ,तपकिरी,लाल ,पिवळे , गुलाबी , ऑर्गण्डी ... बापरे ... जांभळे केस मात्र खूप सुंदर दिसत होते एकीचे . लेकीचे कमरे पर्यंत वाढलेले केस कापून असे रंगवून काढावे वाटले ... टॅटूज ... हिरवेगार हात ,मान ,पाठ ..

आता थोडं ह्या मुलांचे काय होणार ह्या चिंतेविषयी ...
एक मुलगा सतत खेळात रमायचा ,सतत माकडउड्या ,सतत काहीतरी विचित्र प्रकार . नववीत तो पळून गेला ,खूप शोधला त्याला . बंगलोरच्या रेल्वेस्टेशन वर कोण्या एका नातेवाइकायला सापडला ,तिकडून आणला .मग अर्थात कॉन्सेलिंग . घरी आई वडिलांची सतत भांडणे ... अभ्यासाचे दडपण ... म्हणून तो पळून गेल्याचं ऐकून आहे .खूप जपायला ,काळजी घ्यायला सांगितली होती . शाळा पण खूप काळजीपूर्वक त्याचे समुपदेशन करायची .. दहावीत तो मुलगा पुन्हा पळून गेला ... नक्की काय झाले असेल ?कोठे असेल ? काय खात असेल ? कसा जगत असेल ? काय हाल अपेष्टा भोगत असेल ... ? दहावीच्या निरोप समारंभात मुलांना त्याच्या आठवणीने व्याकुळ व्हायला झाले ... जिथे असशील तिथे सुखी रहा अँड वुई ऑल आर मिसिंग यू असे बोलून प्रत्येकाने डोळ्यातून पाणी काढले ....

दुसरा एक मुलगा गडगंज श्रीमंत बापाचा मुलगा. अगदी ऑडी तुन शाळेला यायचा पण किती दिवस आला शाळेला तर फक्त वर्षातून १० दिवस , त्यात पण वर्गाच्या बाहेर बसून त्याला जुन्या टेस्ट पूर्ण करायला लागायच्या . तो आला कि मुलं त्याची बाकं वाजवून स्वागत करायचे ... तो प्रत्येक वेळी येण्यासाठी टिचरलाच घरी फोनकरावा लागायचा ... का येत नसेल तो शाळेला ? ज्या मित्रांशी मैत्री करायचा त्यांना शाळेत पोहचवायला यायचा ,मॅक डी वैगेरे त जायचा पण शाळेत नाही . मोठी नायकिची पाच सहा हजाराची बॅग घेऊन ,नायकीचे शूज घालून शाळेत यायचा ... शाळेचे शूज कधीच घातले नाहीत ... परीक्षाही दिली नाही .. काय करायचे ह्या मुलाच्या आई वडिलांनी ?

तिसरा एक मुलगा अतिशय खेळण्याची सवय , निम्मा वेळ खिडकीतून ग्राउंड कडे बघत बसायचा .क्लास सुरु असला तरी टिचरला सांगून खेळायला जाणार . शर्ट भिजेपर्यंत खेळणार . शूज ,शर्ट,पॅन्ट सर्व मातीने अतिशय घाण होईस्तोवर आणि मग तसाच घामेजलेला पुढच्या क्लास ला येऊन बसणार ... कदाचित त्याच्या स्पोर्ट्स च्या आवडीवर कोणी मेहनत घेतली असती तर ऑलम्पिक मेडल नक्की मिळवले असते ...

चौथा अतिशय ढ होता ,एका मुलीवर त्याला क्रश झाले , पण ती मुलगी खूप हुशार .पटवण्याचा खूप प्रयत्न केला पण शक्यच नव्हते . पण त्याने तिच्यासाठी खूप अभ्यास पण केला आणि बऱ्या मार्कानी पास पण झाला . तिला बड्डेला चॉकलेटचा बुके त्याने स्वतः करून आणलेला .त्या मुलीमुळे तो इतर सर्व मुलींचा रिस्पेक्ट करायला पण शिकला . स्वतःचे भवितव्य पण सुधारून घेतले . तिच्या बापाच्या मोबाईलवर वर त्याने हाय पाठवले म्हणून त्याने त्या मुलीच्या खूप शिव्याही खाल्ल्या पण सुधारलाही नक्कीच ... पण अशी उदाहरणे विरळाच ..

पाचवा अजून एक ,तो हि खूप ढ होता , पण बापाने आय फोन आणि बाईकचे स्वप्न दाखवले , १० सीजीपीए मिळाला कि हे सर्व मिळेल असे सांगितले ... बापाला वाटले असेल पोरग्याला हे कधीच शक्य नाही मग काय देऊन बसला बाप वचन . पोरगा हळूहळू अभ्यासात गढला . अक्षर तर इतके कुत्र्या मांजराचे पाय होते , त्यावर पण खूप मेहनत घेतली आणि हळूहळू गाडी रुळावर आली ... आणि फायनली ही गॉट १० सीजीपीए...

अजून असाच उदाहरण माझ्या बहिणीच्या मुलाचे , त्यालाही ८०% च्या वर मार्क मिळाले की तुला बुलेट असे बापाने सांगून ठेवले होते , रिझल्ट लागायच्या आदी १५
मिनिट सुद्धा तो पप्पाना गाडी बघून यायला सांग म्हणून फोन कर अशी आईला धमकी देत होता . भावोजी सतत पोरगं गुण उधळणार ह्यावर ठाम म्हणून बहीण धास्तावलेली . तर त्याला ६६% गुण मिळाले तर प्रत्येक जण त्याला शिव्या घालत होता . मला डिप्लोमालाच ऍडमीशन घ्यायचीय म्हणून त्याचा हट्ट एकीकडे आणि पोरगा तिकडे जाऊन नापास होईल म्हणून बापाचे पूर्ण दुर्लक्ष ... सायन्स ला नाही तू आर्ट्स लाच जा म्हणजे बारावी निदान पास होशील अशी वडिलांची भूमिका . दोघांच्या मध्ये बहिणीचे मरण ... अजून एक त्याचा पराक्रम म्हणजे आजी नेट साठी पैसे देत नाही म्हणून त्याने उसावर मारायचे औषध चूळ भरले . फक्त घाबरवण्यासाठी .लगेच पाण्याने चूळ वैगेरे भरली ... दहा बारा दिवस तोंड उकलून आले होते ... काहीही खाता येत नव्हते ... मध्ये एका मुलीने लिहिलेली चिट्ठी सापडली होती ... बहीण हे सर्व पाहून मला मुलं झालीच नसती तर बरं झालं असतं म्हणून रडत होती ...

पुढचा भाग नंतर ...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ढुंगणावर वेताचे फटके दिले की अशी कारटी सरळ होतात,काऊन्स्लींग वगैरेने ही कारटी सरळ होत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

असे फटके फक्त आठवी पर्यंतच देता येतात... तिथुन पुढे सरळ हाथ धरतात मुले....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्छा. म्हणजे आठवीपर्यंत मुलं कमजोर असतात म्हणून बडवा त्याज्यायाला. आणि मग पलटवार करायची क्षमता त्यांच्यात आल्यावर चुळबुळत गप्प बसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

नाही... फटके मारायची कल्पना माझी नाही... माझ्या बहिणीचा अनुभव सांगितला.... तसही... अशा प्रकरणात काय करायचे हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही करायचे नाही वेगळे. वेळ जाऊन द्यायचा. वेळ झाली की प्रत्येकाचा मुलभुत रंग येतोच बाहेर. जर चांगला असेल तर चांगला, वाईट असेल तर वाईट.

आपले नियम शिथील करायचे नाहीत. सुझी ऑरमन म्हणते तसे, "प्रेमापोटी नाही म्हणा, भिती पोटी हो म्हणु नका" भिती कसली तर मुलगी आपल्यावर चिडेल वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारहाण करणं हा कधीही उपाय होऊ शकत नाही. लहानपणी पालकांकडून मारहाण होत असलेल्या मित्रांच्या मनावरचे चरे प्रत्यक्ष पाहिले आहेत. कृपया तुमच्या बहिणीला हे सांगा.

इन एनी केस - लहानपणी दुर्बळ म्हणून मारणार्‍या पालकाने ते पोर सबळ झाल्यावर ते रट्टे सव्याज खाण्याची तयारी ठेवली पाहिजे असं माझं विनम्र मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

आजी नेट साठी पैसे देत नाही म्हणून त्याने उसावर मारायचे औषध चूळ भरले... दहावित असताना प्रेम प्रकरण, आजीला पैसे देण्यावरुन मारहाण...पैसे चोरणे... छोट्या भावाला मारहाण... भयंकर आहे सर्व... काय करायचे आई बापाने...?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारणं हा उपाय नाहीच होऊ शकत. या वयाला तर खात्रीने नाही.

स्वतःला इजा करून मागण्या पूर्ण करून घेण्याची सवय अचानक उपटत नाही लहानपणापासून घरातल्यांनी त्याला खतपाणी घातलेलं असतं. वय वाढल्यावर मागण्या आवाक्याच्या बाहेरच्या होतात, घाबरवण्याच्या पद्धती बदलतात आणि मग पालकांना जाग येते. लहान मुल रस्त्यावर, मॉलमध्ये गडाबडा लोळून हट्टाला पेटलेलं असतं आणि तो हट्ट करतो म्ह्णून त्याचं म्हणणं मानणारे (आणि ते इतरांनीही मानावं अशी इच्छा असणारे) पालक दिसतात तेव्हाच त्या मुलात तुमच्या बहीणीच्या मुलासारखा एखादा वाढणारा दिसत असतो. तेव्हा चूक फक्त मुलाचीच नाही हे लक्षात घ्यायचं असेल तर उपयोग. आपलं मूल चारचौघांसारखं नाही तर स्पेशल आहे असं त्याच्या लहानपणी वाटत असतं आणि ते स्पेशलपण जपण्याच्या नादात ते दुसर्^या अर्थानं स्पेशल होतं.

कौन्सिलरला भेटायला सांगा त्याच्या आईवडीलांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर अगदी "अंतरा" प्रतिसाद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांपुढे हात टेकायला होतं. आपली माया, ममत्व सग्गळं त्यांच्यात अडकलेलं असतं आणि ती पठ्ठी इमोशनल ब्लॅकमेल करण्यात प्रवीण असतात. त्यात टीनेज मध्ये तर आई ही गावंढळ, अडाणी आहे आणि कशी काय बाहेरच्या जगात सर्व्हाइव्ह होते - असेच ठाम मत असते. बरं चल्ल्यावरकु फटकेही देता येत नाहीत.
पण एक हेही पाहीलय साधारण आपण जसे टीनेजमध्ये असतो (बंडखोर वगैरे) अगदी तशीच त्याच वळणावर आपली मुलं जातात. आपलेच दात आणि आपलेच ओठ. मग फक्त स्वतःच्या पालकांना दिलेला त्रास आठवुन, त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती वाटू लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचीमामींचा आजचा आय डी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या काही वर्षांत, ज्याला अ‍ॅबनॉर्मल म्हणता येईल, अशा अनेक केसेस बघितल्या आहेत. मारणं हा अतिशयच चुकीचा व मागासलेला उपाय झाला. पण हल्लीच्या पिढीतली ही मुलं इतकी टोकाची हट्टी असतात की, कितीही समजावून सांगितलं तरी फारसा उपयोग होत नाही. त्यांच्या मनांत असेल तेच करतात.
आमच्या व्यक्तिगत अनुभवातून सांगू शकतो की सुधारण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश आले नाही, तर रिझाइन्ड टु फेट, अशी अवस्था येते.त्यांत आपण एवढेच करु शकतो की स्वतःलाच सावरायचे आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. कारण तुम्ही स्वतः, या प्रकाराने डिप्रेशन मधे गेलात तर परिस्थिती आणखीनच वाईट होते. नास्तिक असल्यामुळे सगळे देवावरही सोडता येत नाही. पुढे काय होणार आहे, हे स्पष्ट दिसत असते, खोट्या आशेवर राहू शकत नाही. पण हे हलाहल पचवावेच लागते. 'फक्त आसपासच्या घरांतच प्रॉब्लेम होतो आणि आपल्यावर ही वेळ कधी येणारच नाही', या गैरसमजातून आपण बाहेर पडतो आणि कटु सत्याला सामोरे जायला शिकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

सुरुवात आपल्यापासून करावी.
कोणात काय कला असेल ते सांगता येत नाही म्हणून मुलांना निरनिराळ्या प्रदर्शन,कार्यक्रमास घेऊन जावे.चित्रकला,नाच,खेळ,गाणी,फॅशन डिझाइनिंग,अभिनय,ऐतिहासिक जागा,ट्रेकिंग,बर्ड वॅाचिंग,टुअरिझम वगैरे लहानपणीच ओळख करून द्यावी."शाळा कशीबशी पूर्ण कर मग काय वाटेल ते कर" हे सांगा.करून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चायनीज मदर्स चा मुल वाढवण्याचा फंडा हा वेस्टर्नर पेक्षा भारी असतो. अस एक टाइम्स ऑफ इंडियात वाचलेल आठवतय. म्हणजे वेस्टर्नर्स अमेरीकन आया फार अनावश्यक सॉफ्ट वगैरे असतात. चायनीज आया मुलांना उत्कृष्ठ वाढवतात. शिस्त लावतात अशी एक तुलना होती. कोणा एका चायनीज आईच पुस्तक बहुचर्चित होत. चायनीज पोर माजत नाहीत धाकात असतात व अमेरीकन पोरांपेक्षा यशस्वी होतात अस काहीस होत.
थोड गुगलल तर हे सापडल इथे बर वाईट चक्रम काय ते तुम्ही बघा
http://www.npr.org/2011/01/11/132833376/tiger-mothers-raising-children-t...

Chinese parents can do things that would seem unimaginable — even legally actionable — to Westerners. Chinese mothers can say to their daughters, "Hey fatty — lose some weight." By contrast, Western parents have to tiptoe around the issue, talking in terms of "health" and never ever mentioning the f-word, and their kids still end up in therapy for eating disorders and negative self-image. ... Western parents are concerned about their children's psyches. Chinese parents aren't. They assume strength, not fragility, and as a result they behave very differently.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.