Skip to main content

"माझ्या घरी स्त्री-नातेवाईक आहेत."

सूचना : अमेरिकी निवडणुकांबद्दल चर्चांचा ज्यांना कंटाळा आहे; अशांसाठी ही चर्चा सुरक्षित आणि असुरक्षित ह्यांच्या मधल्या न-चर्चा-भूमीत आहे.

(अमेरिकन वेळेनुसार) शुक्रवारी संध्याकाळी डॉनल्ड ट्रंपने स्त्रियांसंदर्भात उधळलेली मुक्ताफळं जगजाहीर झाली. (मुक्ताफळांचा एक दुवा.) ट्रंपने जी बडबड केली आहे त्याचं थोडक्यात वर्णन 'लैंगिक अत्याचार' असं करता येईल. (हे वर्णन ट्रंपने नाकारलं तरी अमेरिकन न्यायमंडळानुसार हे वर्णन ग्राह्य आहे.)

पुरुष अशा प्रकारच्या, छटाक गप्पा मारतात, ह्यात काही नावीन्य नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू पाहणाऱ्या इसमाने अशा छापाच्या गप्पा मारल्या होत्या आणि ह्या गप्पांचं रेकॉर्डींग फुटलं ह्यातही आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही वाटत नाही. विशेषतः, पहाटे ३ ते ५ च्या मध्ये माजी मिस युनिव्हर्सला नावं ठेवणं, आणि तिची सेक्स टेप बघायला लोकांना सांगणं, असं वर्तन करणाऱ्या माणसाने, त्याच्या सुकुमार, कोवळ्या, एकोणसाठीत, आजपासून साधारण दहा वर्षांपूर्वी स्त्रियांबद्दल असे उद्गार काढावेत ह्याचंही काही नवल वाटत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल असणाऱ्या आपल्या अपेक्षा अगदी पाताळात पोहोचलेल्या असतील, तर त्यांच्या बाळलीलांबद्दल नवल वाटतच नाही. ट्रंपच्या बाबतीत माझं हेच झालेलं आहे.

रविवारी टीव्हीवर चर्चांचे काही कार्यक्रम बघितले. हौसेने काही वृत्तपत्रंही वाचली. ट्रंप ज्या रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे, त्यांतल्या अनेकांची झालेली पंचाईत बघताना मला मजा आली हेही नमूद करायला हरकत नाही. ह्यांत बहुतांश लोकांचं म्हणणं असं होतं, घरी आमच्या मुली, बायका, बहिणी, आया आहेत. 'मी ट्रंपला मत दिलं', असं मी ह्या स्त्री-नातवाईकांच्या डोळ्यांत बघून कसं सांगू? तुलनेत, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅन्सी पेलोसी, हिलरी क्लिंटन आणि अगदी ट्रंपच्या गोटातल्या मेलानिया ट्रंप, केलीअॅन कॉनवे ह्या स्त्रियांनी ह्या विधानाचा सरळ धिक्कार केला.

हा इमोसनल अत्याचार सहन करणं खरंच कठीण होतं.

गेल्या महिन्यात बातमी होती, दोन पुरुषांना मिळून अपत्याला जन्म देता येईल. विचार करा, समजा हे अपत्य पुुरुष अपत्यच असेल, ह्याला कोणी बहिणी नसतील, हा पुरुष समलैंगिक असेल, तर त्याच्या आयुष्यात जवळच्या नात्यातल्या स्त्रिया नसण्याची शक्यता खूप जास्त आहे. ह्या माणसाला समजा ट्रंपचे सदर उद्गार किळसवाणे, घृणास्पद वाटले, त्याबद्दल त्याने कोणाच्या डोळ्यात डोळे घालण्याबद्दल इमोसनल अत्याचार करावा? ह्या विचाराने माझं स्त्रीहृदय कातर कातर१० झालं. ;;)

---

सिमोन दी बोव्हार तिच्या 'द सेकंड सेक्स'मध्ये स्त्रियांचा उल्लेख 'रिलेटीव्ह बीईंग' असा करते. कोणाचीतरी कोणीतरी. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसतं. आपल्याकडचा प्रसिद्ध क्लिशे, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. ह्या जागी कोणी 'स्त्री ही सोयीसवडीनुसार पत्नी, माता आणि स्वतः असते; सगळ्या माणसांसारखीच' असं म्हणालं तर मी त्यांचं कौतुक करायला तयार आहे११. १९४६ मध्ये लिहिलेल्या 'द सेकंड सेक्स'च्या तुलनेत आताचं जग बदललेलं नाही, असा माझा दावा नाही. पण आजही स्त्रिया आई, बहिण, बायको अशा रूपांमध्येच अडकलेल्या आहेत का, ह्याचं उत्तर, ह्या स्कँडलमुळे 'काही अंशी हो' असंच द्यावं लागेल.

ट्रंपच्या गोतावळ्यातल्या स्त्रियांनीही ह्या विधानांचा सरळच धिक्कार केला तरीही बहुतांश रिपब्लिकन पुरुषांनी१२ 'आमच्या घरच्या स्त्रियांना काय सांगू?' अशी भूमिका घेतली. ही भूमिका, फक्त स्त्रियांसाठीच घातक आहे असं वाटत नाही.

आपल्या गोतावळ्यात, कुटुंबात कोणी मुसलमान, समलैंगिक, एकंदरच LGBTQ, दलित, (अमेरिकन संदर्भात, हिस्पॅनिक, कृष्णवर्णीय) येईस्तोवर आपण ह्या लोकांच्या दुःखाचा, अडचणींचा विचार करणार नाही का?

---

१. vox.com हे संस्थळ आवडत नसेल तर आपापल्या आवडत्या संस्थळांवर ह्याचा शोध घ्या. कोकमं आणि परकरांच्या व्यापारी संस्थळांवरही कदाचित ही फीत सापडेल.
२. "मी नाही त्यांतला" म्हणणाऱ्यांच्या समाधानासाठी, सगळ्या पुरुषांवर हा आरोप नाही. परंतु अशा छापाच्या गप्पा काही व/वा बऱ्याच पुरुषांमध्ये होतात, ह्याबद्दल सदर लेखिकेस शंका नाही.
३. सदर लेखिकेने 'हाऊस ऑफ कार्ड्स' बघितलंय.
४. पाताळापेक्षा यादीत बरीच बाळं आहेत; जाताजाता ही एक उगाच दुगाणीवजा नोंद.
४अ. इथे कोणाचीही नावं न घेता व्यक्तिगत टीका टाळली आहे; ह्याची कृपया व्यवस्थापकांनी, सदस्य आणि वाचकांनी नोंद घ्यावी.
५. दुर्दैवाने कोणतीही स्त्री-रिपब्लिकन नेती माझ्या वाचन-दर्शनात आली नाही.
५आ. असा पदार्थ असतो का नाही, ह्याबद्दल मला पुरेशी खात्री नाही. एकेकाळी काँडोलिझा राईस होती. परंतु, वेल्स फार्गोच्या कृपेमुळे डेमोक्रॅट पक्षाच्या इलिझाबेथ वॉरनचं नाव हल्ली बरंच चर्चेत होतं.
६. पॉर्न बघायचं आणि वर 'आनंद' लपवताना त्रास होत होता; अशी तक्रार करू नये; अशी पाटी अजूनपर्यंत कुठेही बघितलेली नाही. माणे गुरुजींनी मणावर घ्यावं.
७. हा विचार भीषण आहे. मी वॉर्निंग दिली नाही, अशी तक्रार चालणार नाही.
८. सैद्धांतिक पातळीवर दोन पुरुषांना मिळून स्त्री अपत्य जन्माला घालता येईल. स्त्रिया अशी भेसळ करू शकणार नाहीत. जितम्‌ जितम्‌ जितम्‌.
९. 'आपल्या पोरांनी काय दिवे लावले' हे बघून समजा त्याच्या धार्मिक ख्रिश्चन आज्या अकाली गेल्या असतील. एक शक्यता.
१०. काय, जमलंय ना? बी रोमन्स इन रोम आणि बी इमोसनल अत्याचारी इन अमेरिका.
११. माणे गुरुजी, भलत्या (बाईच्या) सापळ्यात अडकून लोकप्रियता कमी करून घ्याल. 'गावात होईल शोभा, हे वागणं नव्हं' आज चार वेळा यूट्यूबवर ऐका.
१२. विदेचं शास्त्रीय मोजमाप केलं नाही.

कठीण ;-) शब्दाचा अर्थ -
पाताळापेक्षा = पाताळात गेलेल्या अपेक्षा = पाताळ + अपेक्षा

.शुचि Tue, 11/10/2016 - 00:20

स्त्री नातेवाईक नसतील. फॅमिलीत मुसलमान, दलीत, समलैंगिक नसतील तर दु:ख कळत नाही असे नाही. पण नात्यात जर कोणी असेल तर ते जास्त चांगल्या रीतीने कळो येते हे सत्य आहे.
.
(१) मला खात्री आहे मुलीचा बाप होण्यापूर्वी आणि मुलीचा बाप झाल्यानंतर पुरुषांच्या विचारसरणीमध्ये काही मुलभूत फरक पडत असणार.
.
(२) आतापर्यंत तर समलैंगिकता ही लोकांना विकृती वाटे त्यामुळे त्यांचा विरोध यामधुन आलेला असणार की "व्यक्ती बरी होऊ शकत असेल तर का नाही तिला बरे करायचे?"
.
(३) मुस्लिमांचे दु:ख म्हणजे नक्की काय ते मला कळलेले नाही. आणि कोणीतरी म्हटल्याप्रमाणे "सिस्टीम मधील दोषाला नेहमी सिस्टीमबाहेरचे लोकच कारणीभूत असतात असे नव्हे" असो.
.
(४) दलितांबद्दल अनुभव नाही. मी जिथे आहे तिथे (अमेरीका) हे जातपात वगैरे कोणीही आता मानत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 00:32

In reply to by .शुचि

मुस्लिमांचे दु:ख म्हणजे नक्की काय ते मला कळलेले नाही. आणि कोणीतरी म्हटल्याप्रमाणे "सिस्टीम मधील दोषाला नेहमी सिस्टीमबाहेरचे लोकच कारणीभूत असतात असे नव्हे" असो.

हेच तर!

काल ट्रंपला एका मुसलमान व्यक्तिने इस्लामोफोबियाबद्दल विचारलं. त्याने त्याबद्दल (सदर वाक्यासारखीच) मुसलमानांवरच जबाबदारी टाकली; तुमच्या आजूबाजूला कोणी संशयित दिसत असेल तर रिपोर्ट करा म्हणाला आणि स्वतः हात झटकून मोकळा झाला. आणि मग ...

काय झालं ते वाचा - #MuslimsReportStuff

Nile Tue, 11/10/2016 - 00:57

सदर लेखिकेने नवी बाजूंची एखादी बाजू ग्रॅबली की काय? (श्टाईलबद्दल म्हणतोय. उगाच नंतर बोंबाबोंब नको!)

.शुचि Tue, 11/10/2016 - 02:25

खालील विचार अतोनात विस्कळीत बडबड आहे. -

माझ्या एक्स्टेन्डेड फॅमिलीमध्ये (विस्तारीत कुटुंब) एक बांग्लादेशी मुस्लीम मैत्रिण आहे. तिची मला प्रचंड मदत होते. ही मदत मला माझ्या उघड्या डोळ्यांना दिसते. तिचा चांगुलपणाही डोळे व मनाचे गवाक्ष उघडे असल्याने कळो येतो. पण दुर्दैवाने याच उघड्या डोळ्यांनी मला हा फरकही दिसतो की ती तिच्या मुलाला धर्माबद्दल खूप शिकवते, धर्माचे बाळकडू पाजते, तो नास्तिक होऊच नये याची काळजी घेते. याविपरीत माझी एक हिंदू मैत्रिण तिच्या मुलीला कोणतीच जबरदस्ती करत नाही उलट हेच सांगते की तुझे निर्णय, धर्मापासून अन्य कोणताही तू घ्यायचा आहे आणि तुला त्याचे बरेवाईट परीणाम भोगायचे आहेत. तिचा नवरा तिच्या मुलीला रोज शुभंकरोती म्हणावयास लावतो ज्याचा अर्थही त्या मुलीला माहीत नाही. ते तसे करवण्यात तिला अजिबात काही पॉइन्ट वाटत नाही. मुलगी नास्तिक झाली तरी मैत्रिणीला काहीही खंत वाटणार नाही. मुलगी मुस्लिम्/ख्रिश्चन/बौद्ध झाली तरीही काही वाटणार नाही. कारण - She will respect the longings & need of lessons for her daughter's soul to grow. आणि हे एवढे करुन शेवटी ती आई आहे, मातृत्व = अपरिहार्य गिल्ट या न्यायाने, तिच्याही मनात अन्य सर्वांसारखा धर्म, आस्तिकता-नास्तिकता, एकंदर आपल्या मुलांना भक्कम पाळेमुळे देण्यात धर्माचा वाटा किती असतो, असतो का आदि बाबींबाबत प्रचंड गोंधळ आहे. "स्वतःशी प्रामाणिक" असणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे ती मुलीला शिकवते. She can only feebly hope that her daughter will be less confused about the subject "religion" compared to herself.
.
मुस्लीम मैत्रिणीचे काही चुकते का? असल्यास का नसल्यास का नाही. चला असे म्हणू यात चुकत नाही. पण मग धर्माच्या भिंतीमध्ये ती मुलाला बंदिस्त करत नाही का? काय असा मोठा विशाल दृष्टीकोन ती त्याला देते? तिचे हृदय मोठे आहे हे मला मान्य आहे. ती बेसिकली चांगली आहे हे मला मान्य आहे. पण जिथे धर्म येतो तिथे ती इतकी घट्ट का चिकटून रहाते? आणि रहाते त्याचा काही दुष्परीणाम होऊ शकतो का?. मला मान्य आहे की काही एका जमातीचे लोक भयाने अधिकच धर्माला घट्ट चिकटतात. जसे ती वारा व सूर्याची गोष्ट आहे - एका माणसाची बंडी त्याच्या अंगावरुन उतरवायची पैज दोघांत लागली. वार्‍याने पहीला प्रयत्न केला तो सुसाट वाहू लागला तसं त्या मनुष्याने बंडी उतरविणे तर सोडाच अजुन एक शाल पांघरुन घेतली. याउलट सूर्य पहील्यांदा कोवळा तळपला मग माणसाने शाल दूर केली मग सूर्य अधिक तळपू लागल्यावर त्याने बंडीही उतरवली.
.
वरील उदाहरणांमध्ये संकुचित विश्व कोणाचे आहे? दोघींचे की फक्त बांग्लादेशी मैत्रिणीचे? आणि जर असे दुखर्‍या अंगठ्यासम ती वेगळी वेगळी रहाणार असेल तर काही तोटे हे तर येणारच ना.
.
मला उदाहरणातून जास्त नीट कळते म्हणुन ते उदाहरण.बाकी जागतीक स्तरावरील मुस्लिमांचे अवलोकन करुन काही निष्कर्ष काढण्याइतका विचार मला करता येत नाही. सीमा आहे. आणि त्यावरती मी माझ्यापुरता मार्ग काढला आहे - वैचारीक नेतृत्वाची कल्पनाही झुगारुन द्यायची. या जन्मी आपली तेवढी वट नाही म्हणायचे, जे की सत्य आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 04:03

In reply to by .शुचि

मला मान्य आहे की काही एका जमातीचे लोक भयाने अधिकच धर्माला घट्ट चिकटतात.

एकाच जमातीचे लोक धर्माला भीतीपोटी चिकटतात; हे मला पटत नाही. माणसांची उत्क्रांती कशी झाली, साधारणपणे माणसं विचार कसा करतात, ह्याचा विचार करता एकाच जमातीचे लोक इतरांपेक्षा निराळ्या पद्धतीने वागतील ही गोष्ट फार पटत नाही. बहुतेकांचे आपापले 'धर्म' असतात. काही कुराण वाचतात, काही ज्योतिषाची पुस्तकं; काही लोक आपापल्या जातींच्या चौकटींना घट्ट चिकटून बसतात.

तसा माझाही 'धर्म' आहेच; मी उजव्या विचारांची, कोणत्याही धर्माशी संबंधित, संस्थळं, प्रकाशनं, लेखन फार वाचत नाही; अमेरिकेत आल्यापासून ओळखीचे आणि अनोळखी लोक उत्क्रांतीविरोधी लेखन वाचायला पाठवतात/देतात. मी त्याचा आकारच बघून 'एवढ्याशा लेखनात माझे विचार बदलणार नाहीत; दहा मिनीटं ह्यावर फुकट घालवणार नाही'; म्हणून ते सोडून देते.

मिलिन्द Wed, 12/10/2016 - 00:12

In reply to by .शुचि

सर्वच धर्मात गलिच्छ पितृशाही असली तरी इस्लाम सोडल्यास बाकी बऱ्याच धर्माच्या लोकांत आधुनिकतेमुळे ती कमी झाली आहे असे दिसते. वर्षाला वीस हजार (स्वतःच्याच !) मुली सामाजिक प्रतिष्ठेपायी ( "ऑनर किलिंग") मारणाऱ्या धर्माचे विश्व संकुचित नाही हे कसे म्हणावे?

आडकित्ता Wed, 12/10/2016 - 12:41

In reply to by मिलिन्द

नुसताच मुलगा पाहिजे या भूमीकेतून हिंदू लोकांत किती लेकिंच्या स्त्रीभ्रूणहत्या होतात, व किती सुना हुंड्यापायी जाळून मारण्यात येतात, याचा हिशोब मांडावा काय? हा हिशोब 'कमी' झाल्यानंतरचा असेल तर कठीण आहे.

प्रतिसादात दृष्टीकोणाचा संकोच झालेला आहे काय?

अनुप ढेरे Wed, 12/10/2016 - 13:42

In reply to by आडकित्ता

स्त्री भ्रूण हत्या या हिंदू धर्माचं लक्षण नसाव्यात. त्यात धार्मिक कारणं नसून सामाजिक आहेत. चीनमध्येपण भरपूर स्त्रीभृणहत्या होतात असं वाचलं आहे.

अनु राव Wed, 12/10/2016 - 13:51

In reply to by अनुप ढेरे

तुम्ही चुकताय ढेरे शास्त्री. मी खाली लिहीलय तसे बोलायचे.

भारतात जे काही चुकीचे होते ते हिंदु धर्मामुळे. चीन मधे तिच गोष्ट झाली तर सामाजीक कारणांमुळे. आणि वाळवंटात ह्याच्या पेक्षा १०० पट चुकीची गोष्ट झाली तर ती अमेरीका, भारत वगैरे काफीर देशांच्या आक्रमणामुळे

चिंतातुर जंतू Wed, 12/10/2016 - 14:19

In reply to by अनु राव

>>तुम्ही चुकताय ढेरे शास्त्री.

तुम्हाला ढेरेंचा कावा कळला नाही असं खेदानं म्हणतो. 'इस्लाममध्ये असं होतं' ह्यावर 'हिंदू धर्मात पण असं होतं की' म्हणणारा उघड सेक्युलर उदारमतवादी वगैरे असतो. पण त्यावर 'चीनमध्ये पण असं होतं' असं म्हटल्यानं जगभरात इस्लामी देश सोडून इतरत्र 'असं' खूप होतं हे सिद्ध होतं. (भारताची आणि चीनची लोकसंख्या एकत्र करा म्हणजे समजेल.) म्हणजे इस्लाम इतकाही वाईट नाही असं सिद्ध होतं. म्हणजे उदारमतवादी सेक्युलरांचा अजेंडा राबवला जातो. हा संस्थळचालकांच्या मर्जीत राहण्याचा गनिमी कावा आहे.

तात्पर्य : ढेरे अनुताईंपेक्षा 'पहुंचे हुए' आहेत ;-)

अनुप ढेरे Wed, 12/10/2016 - 15:28

In reply to by चिंतातुर जंतू

( उजव्या आघाडीत फूट पाडण्याचा पयत्न :) )

मूळ मुद्दा धार्मिक ऑनर किलिंग किती होतं हे मोजताना स्त्री भृण हत्या मोजू नये एवढाच होता. ( जातीय ऑनर किलिंग मोजावीत.)

अबापट Wed, 12/10/2016 - 15:43

In reply to by चिंतातुर जंतू

चिन्तातूर जंतू , तुम्ही सेक्युलर /उदारमतवाद्यांची अशी पोल खोल करून कॅपिटॅलिस्टांच्या तंबूत हलकेच प्रवेश करत आहात हे जाणवायला लागले आहे . पण संस्थळ चालक मालक इत्यादी आणि आरशातील प्रतिमे विरुध्ध बंड का बरे ? ;)

चिंतातुर जंतू Wed, 12/10/2016 - 17:12

In reply to by अबापट

>> संस्थळ चालक मालक इत्यादी आणि आरशातील प्रतिमे विरुध्ध बंड का बरे ?

अंहं. संस्थळचालकांची प्रतिमा मूर्तिभंजक आहे. त्यामुळे मी माझीच प्रतिमा भंगून संस्थळचालकांच्या मर्जीत राहायचा प्रयत्न करतो आहे ;-)

गब्बर सिंग Tue, 11/10/2016 - 02:14

आपल्या गोतावळ्यात, कुटुंबात कोणी मुसलमान, समलैंगिक, एकंदरच LGBTQ, दलित, (अमेरिकन संदर्भात, हिस्पॅनिक, कृष्णवर्णीय) येईस्तोवर आपण ह्या लोकांच्या दुःखाचा, अडचणींचा विचार करणार नाही का?

भविष्यकाल वापरलात.

  1. सध्या आपण विचार करत नाही असं म्हणायचंय का ?
  2. व्यक्तीगत नागरीक म्हणून करत नाही असं म्हणायचंय का ?
  3. नागरिक-समुदाय म्हणून करत नाही असं म्हणायचंय का ?
  4. हा विचार आपण सध्या (नागरिक म्हणून किंवा नागरिक-समुदाय म्हणून) कमी करतो असं म्हणायचंय का ?

मिलिन्द Wed, 12/10/2016 - 00:16

In reply to by गब्बर सिंग

  1. सध्या आपण विचार करत नाही असं म्हणायचंय का ?
  2. व्यक्तीगत नागरीक म्हणून करत नाही असं म्हणायचंय का ?
  3. नागरिक-समुदाय म्हणून करत नाही असं म्हणायचंय का ?
  4. हा विचार आपण सध्या (नागरिक म्हणून किंवा नागरिक-समुदाय म्हणून) कमी करतो असं म्हणायचंय का ?

All of the above!

मिलिन्द Wed, 12/10/2016 - 05:16

In reply to by गब्बर सिंग

हे "आम्ही" (म्हणजे "तुम्ही"- गब्बर सिंह ) उच्चवर्णीय हिंदू पुरुषांचे प्रतिनिधी आहेत असे दिसते . आता सांगा: तुमच्यावर नक्की कोणते अन्याय /अत्याचार होत आहेत की जे दूर करण्यासाठी आपला विचार विशेष "सहानुभूतीने" व्हावा (जो या धाग्याचा विषय आहे) ?
हा "Rhetorical question" नाही. जाणून घेणे आवडेल .

गब्बर सिंग Wed, 12/10/2016 - 07:52

In reply to by मिलिन्द

हे "आम्ही" (म्हणजे "तुम्ही"- गब्बर सिंह ) उच्चवर्णीय हिंदू पुरुषांचे प्रतिनिधी आहेत असे दिसते . आता सांगा: तुमच्यावर नक्की कोणते अन्याय /अत्याचार होत आहेत की जे दूर करण्यासाठी आपला विचार विशेष "सहानुभूतीने" व्हावा (जो या धाग्याचा विषय आहे) ? हा "Rhetorical question" नाही. जाणून घेणे आवडेल .

तुमचे कॅटेगरायझेशन चुकीचे आहे.

आम्ही म्हंजे "त्या" कॅटेगरीबाहेरचे सर्व लोक.

आमचं म्हणणं हे आहे की - You are forcing us to insource* many of the costs associated with having to think/worry about them and the correction of so-called injustices meted out to them by a few people who are using force on them. We want to be free to be unequal to them. We want to leave them alone and we want them to leave us alone. We do not want to be forced to think and act as if we are equal to them or as if they are equal to us.

* insource is opposite of outsource

मिलिन्द Wed, 12/10/2016 - 22:12

In reply to by गब्बर सिंग

"injustices meted out to them by a few people"
This is not as innocent as it sounds. The perpetrators are empowered by the broad social outlook of bigotry and conservatism.
At a personal level, the need to be "left alone" is valid, though.

We do not want to be forced to think and act as if we are equal to them or as if they are equal to us.
To tell anyone how they should think is a bum's game anyway. How do you monitor and stop that?

गब्बर सिंग Wed, 12/10/2016 - 23:37

In reply to by मिलिन्द

This is not as innocent as it sounds. The perpetrators are empowered by the broad social outlook of bigotry and conservatism.
At a personal level, the need to be "left alone" is valid, though.

जोपर्यंत बलप्रयोग होत नाही तोपर्यंत पुरोगाम्यांना/लिबरलांना conservatism विरोधी कारवाया करता नाही यायला पायजेत. नॉन व्हायोलंट conservatism ही फक्त भिन्न मतप्रणाली आहे. व पुरोगाम्यांच्या/लिबरलांच्या आयडिऑलॉजीनुसार मतभिन्नतेचा आदर राखला पाहिजे. नैतर ती पुरोगाम्यांची/लिबरलांची bigotry होइल.

गोगोल Tue, 11/10/2016 - 06:57

> ट्रंपने जी बडबड केली आहे त्याचं थोडक्यात वर्णन 'लैंगिक अत्याचार' असं करता येईल.

असच काहीस म्हणण ट्वीटर वरील फेमीनाझींच पण आहे.
फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे चवीचवीने वाचणार्या वर्गाला एखादा बिलिनेअर प्रत्यक्षात असे करत आहे हे ऐकून होणारे त्रास ऐकून अंमळ करमणूक झाली.
बाय द वे, उद्या जर का हीलरी ताईन्च्या ह्यांची ब्लोजॉब ची क्लिप रिलिज झाली तर फेमीनाझींची काय प्रतिक्रिया असेल याबाबतीत उगीचच एक उत्सुकता वाटून राहीली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 19:15

In reply to by गोगोल

तुम्ही फिफ्टी शेड्स वाचता का? मी बाऊंड अँड गॅग्ड वाचलंय. ह्या पुस्तकात लॉरा किपनीस लोकांच्या फँटस्या, सज्ञान लोकांचे 'विचित्र' समजले जाणारे लैंगिक व्यवहार, 'विचित्र'पणा असला तरीही असणारा सभ्यपणा, आणि काही बाळकांना हे सहन न होणं ह्याबद्दल लिहिते.

असो. परवाच एक बातमी वाचली मी, कुठे ते आठवत नाही. काही शब्दकोशांमध्ये म्हणे परस्परसंमती (consent) हा शब्द छापायचा राहून गेला. तुम्हाला असे दुय्यम प्रतीचे शब्दकोश विकून कोणी तुमची फसवणूक केल्ये की नाही हे तपासून बघाल का?

गोगोल Tue, 11/10/2016 - 21:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हीच तुमच्या कुठ्ल्यातरी लेखात कितीतरी स्त्रियांच्या रेप फँटसीज असतात असे लिहिले होते ना?
ईफ ईट ईज कन्सेशुअल, देन हाउ इस इट अ रेप? हाऊ डू यु रिकन्साईल दीज कॉन्ट्राडिक्टरी पॉईन्ट्स?

आणि एकाने पॉवरचा अ‍ॅडवान्टेज घेउन सेड्युस केल आणि दुसर्याने पैशाचा, तर मग पहिल्या केस मधला परस्परसंमती वाला आणि दुसर्या केस मधला लैंगिक अत्याचार वाला, अस का?
आणि यात ज्या स्त्रिया "सेड्युस" होतात त्यांना गोल्ड डिगिंग होअर्स का म्हणले जाउ नये?

बाय द वे, हे सगळे जेन्युईन प्रश्न आहेत, तुमचा अपमान करायचा हेतु नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 22:09

In reply to by गोगोल

माझा अपमान करणं सोपी गोष्ट नाही; तेव्हा तुम्हाला लिहायचं आहे ते मनमोकळेपणाने लिहा.

तुमच्या कुठ्ल्यातरी लेखात कितीतरी स्त्रियांच्या रेप फँटसीज असतात असे लिहिले होते ना?

हे मुळात माझं म्हणणं नाही, मी मास्टर्स आणि जॉन्सनचं म्हणणं उद्धृत केलं होतं. (अभ्यासकांना मान देण्याइतपत विनय माझ्याकडे आहे; अगदी आंजावर नाव कमावूनही!) त्यात पुढे मास्टर्स आणि जॉन्सन असं म्हणतात, परस्परसंमतीने बलात्कार होऊ शकत नाही. काही फँटस्या ह्या फक्त फँटस्याच असतात, त्या प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. ज्या स्त्रियांना बलात्काराची फँटसी आहे, त्या परस्परसंमतीने होणारा संभोग सुरू असताना बलात्काराचा विचार करतात. काही फँटस्या प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत, म्हणून त्या फक्त डोक्यातच राहतात. प्रत्यक्षात कोणावरही बलात्कार व्हावा अशी ह्या स्त्रियांची इच्छा आहे, असं दिसत नाही.

शेवटी लैंगिकतेचा संबंध फक्त दोन पायांच्या मध्येच असतोच असं नाही; दोन कानांच्या मध्ये जो अवयव असतो, तो सुद्धा महत्त्वाचा असतो.

तुम्हाला रोल प्ले ह्या प्रकाराबद्दल कितपत कल्पना आहे, हे मला माहीत नाही. लॉरा किपनीसच्या 'बाऊंड अँड गॅग्ड'चा उल्लेख मुद्दामच केला. लोकांच्या निरनिराळ्या फँटस्या असतात. परस्परसंमतीने दोन सज्ञान लोक काय वाटेल ती भूमिका घेतात - वडील-मूल किंवा दोघांपैकी (अनेकांपैकी) कोणी लहान मूल बनतात. म्हणून हे लोक प्रत्यक्ष लहान मुलांशी संभोग करतात, तशी इच्छा बाळगून असतात, असं नव्हे. अनेकांच्या बाबतीत, ही फँटसी प्रत्यक्षात येणं अशक्य असतं; म्हणून दोघंही ठरवून असा विचार करतात की त्यांच्यापैकी एक (१८ वर्षांपेक्षा) लहान मूल आहे.

ट्रंपच्या बडबडीमध्ये कुठेही स्त्रीच्या संमतीचा भाग नव्हता. अगदी त्या फीतीमध्येच दिसतं की 'अॅक्सेस हॉलिवूड'साठी काम करणाऱ्या स्त्रीला ट्रंप आणि बिली बुशला मिठी मारायची नव्हती. पण बिली बुशने तिला असं करण्यासाठी भाग पाडलं. नोकरीचा भाग म्हणून तिने ते केलं; हे परिस्थितीचा गैरफायदा घेणं ठरतं. ह्या सगळ्या संवाद आणि कृतीची फळं आता बिली बुश भोगतोय. (बिली बुशला 'टुडे' शोमधून काढून टाकणारं आख्खं एनबीसी फेमिनाझी आहे अशी तक्रार ज्यांना करायच्ये त्यांनी करा बुवा. तसंही, ट्रंपच्या डिबेटमधल्या तक्रारखोरीमुळे अशी रडारड करणं प्रतिष्ठेचं बनायला सुरुवात झालेली असेलच.)

सिडक्शन निराळं. त्यातही हिंस्र बलात्कार आणि संभोग ह्यांच्या अध्येमध्ये घडणाऱ्या गोष्टी असतात. म्हणूनच परस्परसंमती अतिशय महत्त्वाची. उदाहरण म्हणून प्रा. मेरी बेअर्ड ह्यांच्यावर न्यू यॉर्करमध्ये एक लेख आलेला होता; त्यात त्यांनी सांगितलेलाला एक प्रसंग (अधोरेखन माझं) :

In 2000, Beard wrote a scathing column about “A Natural History of Rape,” by Randy Thornhill and Craig Palmer, for the L.R.B. Her essay included an account of being raped in 1978, while she was travelling through Italy as a graduate student. She was waiting for a train in a station bar in Milan when she met an architect on his way to a site outside Naples. He offered to help upgrade her ticket from a seat to a sleeping car. It was not until they were alone in the train compartment that she discovered the architect was not merely being kind, and that she was entirely vulnerable in the face of his intentions: “With two heavy cases and a backpack I couldn’t make a dash for it.” She continued, “He bundled me in, took off my clothes and had sex, before departing to the upper bunk.” Later, she awoke to find him repeating the activity. “Even now, more than twenty years later, I can still rage at the memory of waking up to find him doing it again,” Beard wrote.

The essay was a blunt announcement of a previously private experience. “To all intents and purposes, this was rape,” she wrote. “I did not want to have sex with the man and had certainly not given consent. If I appeared compliant, it was because I had no option: I was in a foreign city, with enough of the local language to ask directions to the cathedral maybe, but not to search out a reliable protector and explain convincingly what was happening.” But the account was also a subtle analysis of the event and its subsequent reverberations. Her experience was “relatively harmless,” she wrote—she was coerced, but not forced. Beard did not report the assault, and the next day she told her friends that she had been “picked up.” Over the years, she explained, her understanding of what happened had slid between “rape” and “seduction.” She had even found herself “making sense of the incident as a much more emphatically willed part of my sexual history: the perfect degree-zero sexual encounter between complete strangers.”

The difficulty of knowing how to talk about rape is not limited to those who have experienced it, she wrote. It is an enduring cultural problem, one that was familiar to Roman authors, who had to contend with their city’s being founded on a large-scale program of sexual violence—the rape of the Sabine women. “Rape is always a (contested) story, as well as an event,” Beard wrote. “It is in the telling of rape-as-story, in its different versions, its shifting nuances, that cultures have always debated most intensely some of the most unfathomable conflicts of sexual relations and sexual identity.”

गब्बर सिंग Tue, 11/10/2016 - 22:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटी लैंगिकतेचा संबंध फक्त दोन पायांच्या मध्येच असतोच असं नाही; दोन कानांच्या मध्ये जो अवयव असतो, तो सुद्धा महत्त्वाचा असतो.

क्या ब्बात है !!!

गोगोल Tue, 11/10/2016 - 22:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही ईतके कष्ट घेऊन प्रतिसाद टाईपल्याबद्दल धन्यवाद.

मला त्यातील अनेक गोष्टी पटल्या नाहीत, पण मी आता त्यावर काही लिहायला गेलो तर मोठ्ठा प्रतिसाद पडेल, मग तुमचा अजून एक मोठठा प्रतिसाद, मग अजून माझा एक, अशी और एक और एक ची मालिका चालूच राहील, म्हणून मी आता आवरते घेतो. ट्रंप मुर्ख आहे यात काहीही वाद नाही, पण माझ्यामते हिलरी खूप ज्यास्त धुर्त आणि आतल्या गाठीची आहे. तिला आपल जेंडर कधी कुठे आणि कस वापरून घ्यायच हे बरोब्बर समजत.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 23:46

In reply to by गोगोल

ट्रंप मूर्ख आहे, हिलरी धूर्त आहे ह्याबद्दल मलाही शंका नाही. किंबहुना धूर्त असल्याशिवाय स्त्री ह्या स्थानावर पोहोचणं शक्य नाही, ह्याबद्दलही मला खात्री आहे. तिचं स्त्री असणं, तिने त्याचा वापर करून घेण्यासारखी (असमानतेची) परिस्थिती जगात असणं, तिने धूर्तपणे आपलं स्त्रीपण वापरून घेणं हे सगळं ठीकच. पण सदर टेप, त्यावर पुरुषांच्या टिपिकल पुरुषप्रधान प्रतिक्रिया, ट्रंपच्या माचो बकवासवर खूश होणाऱ्या पुरुषांची मतं आता ट्रंपला मिळण्याशी शक्यता वाढणं आणि बहुतांश लोकांनी ट्रंपचा धिक्कार करणं ह्याचा हिलरीशी संबंध कसा काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 22:34

In reply to by गोगोल

आणि यात ज्या स्त्रिया "सेड्युस" होतात त्यांना गोल्ड डिगिंग होअर्स का म्हणले जाउ नये?

बोलणाऱ्यांचं तोंड कसं धरणार? हिलरीची मैत्रीण मिशेल ओबामा म्हणाली होती, "ते नीचपणे वागले तर तुम्ही आणखी उच्च कोटीचं वर्तन करा". हा सल्ला मला आवडला, पण ह्या वाक्याबाबत पाळणं शक्य नाही. तसं केलं तर ह्याला मूकसंमती समजली जाण्याची भीती वाटते.

आपल्याला जी गोष्ट आवडली, एखाद्यावर/एखादीवर भाळण्यासारखा गुण वाटला त्या गुणावर भाळण्याबद्दल कोणी आपल्याला वेश्या वगैरे म्हणत असेल तर म्हणू देत. लहानपणी आम्ही म्हणायचो, 'पहिले बोलतो तेच असतो', किंवा 'हसतील त्याचे दात दिसतील'. आणि आंजाच्या भाषेत, 'जळजळ पोहोचली', 'मोठे व्हा'.

गब्बर सिंग Tue, 11/10/2016 - 22:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"ते नीचपणे वागले तर तुम्ही आणखी उच्च कोटीचं वर्तन करा". हा सल्ला मला आवडला, पण पाळणं शक्य नाही. तसं केलं तर ह्याला मूकसंमती समजली जाण्याची भीती वाटते.

तेरी इस बेरूख़ी पे हम ग़ज़ल कहने से डरते है
कही ऐसा ना हो तू और भी मगरूर हो जाये

( आज सकाळी सकाळी चढलिये मला.... न पिताच)

मनीषा Tue, 11/10/2016 - 11:32

जे घड्लं ते वाईट आहे. समाजातील सर्व घटकांसाठीच वाईट आहे .
लोकांनी धिक्कार केला, त्यांनी माफी मागीतली. चूक कबूल केली.
मग आता हा विषय किती ताणणार?

अशा वृत्ती बद्दल बोलायचं .. तर कितीतरी संभवित सज्जन आसपास वावरत असतात. .. अगदी साळसूद पणे. त्यांच्या वागण्या बोलण्याला, या घटनेने लगाम बसणार आहे का ? उलट त्यातलेच काही तावातावाने याचा धिक्कार करत असतील .. काय माहीत?

पण आजही स्त्रिया आई, बहिण, बायको अशा रूपांमध्येच अडकलेल्या आहेत का, ह्याचं उत्तर, ह्या स्कँडलमुळे 'काही अंशी हो' असंच द्यावं लागेल.

अगदी खरं .. समाजाला घरची बाई अगदी सीतामाई सारखी आदर्श हवी असते. पण अशी अपेक्षा करताना आपण श्रीरामासारखे नाही आहोत हे सोयिस्कर विसरले जाते.

पण, एखाद्याचं खाजगी आयुष्यं, संभाषण चव्हाट्यावर मांडून त्यावर चर्वितचर्वण करणं अक्षेपार्ह्य, अनैतिक आहे असं कुणालाच वाटत नाही, याचं मात्रं नवल वाटतं.
शिर्षपदावरच्या व्यक्तीच आयुष्यं बेदाग असावं अशी अपेक्षा असणं काही चूक नाही. पण व्यवहार्य देखिल नाही. आपण भिंग घेऊन कितीजणांची आयुष्यं तपासणार? मग, "पकडा जाये वो चोर, बाकी सब साव" असं म्हणायचं का?

अशा घटनांना प्रसिद्धी दिल्याने त्या कमी होतील? की कुणा अनभिज्ञासाठी प्रेरणादायक ठरतील ?

हे जरा विषयांतर आहे -- जर्मनी मधे एका १८-१९ वर्षांच्या मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ६-७ जण मारले गेले. तपासणीत असे समोर आले की त्या आधी किमान ५ -६ महिने तो अशा प्रकारच्या बातम्या वाचत होता, आणि त्याचे व्हीडीओज बघत होता.

( तुम्ही फुटनोटा फार टाकल्यात. त्यामुळे लेख वाचायला आणि समजायला माझ्या मंदबुद्धीला लै अवजड झालय. )

मिलिन्द Thu, 13/10/2016 - 04:53

In reply to by मनीषा

यावर एक वेगळा अँगल असा की स्त्रीची अशी प्रतिमा राहणे हा काही प्रमाणात भाषेचाच दोष आहे : पुरुष जोडीदार न म्हणता "पती" म्हणण्यातच एक स्वामित्वाची भावना अंतर्भूत असते . (जसे: पशुपती, करोडपती वगैरे). इंग्रजीतही पशुपालनाला ऍनिमल हजबंडरी म्हणतात . हे घालविण्यासाठी (स्त्रियांनी) एका नव्या भाषेची निर्मित करणे आवश्यक आहे .

रेड बुल Tue, 11/10/2016 - 16:10

हे अजुन ऐसीच आहे. फार महत्वाच्या विष्याला तोंड फोड्ल्याबद्द्ल लेखकाचे सर्वप्रथ्म अभिनंदन.

ट्रंप आणी हिलरी दोघेही महामंद आहेत यात शंकाच नही पण ट्रंप ची विधाने वक्तव्ये करत आहे ते बघता हिलरीनेच त्याला पध्दतशीर पुढे आणले होते की काय जेणेकरुन तिचा विजय एक औपचारीकता उरावी ? असो.

बाकी आणखी काय बोलायचे ? प्रत्येकाच्या नाकात शेंबुड हा असतोच... कोणाचा दिसतो कोणाचा दिसत नाय..

'न'वी बाजू Tue, 11/10/2016 - 16:34

In reply to by रेड बुल

ट्रंप आणी हिलरी दोघेही महामंद आहेत यात शंकाच नही पण

ट्रंपबद्दल निश्चित माहीत नाही. हिलरी महाचालू आहे.

ट्रंप ची विधाने वक्तव्ये करत आहे ते बघता हिलरीनेच त्याला पध्दतशीर पुढे आणले होते की काय जेणेकरुन तिचा विजय एक औपचारीकता उरावी ? असो.

हीच शंका आम्हांसही बरेच दिवसांपासून आहे. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 19:25

मूळ मुद्दा असा होता, खरं तर आहे - ट्रंपचं हे बोलणं चारचौघांत, बाहेर मिरवता येण्यासारखं नाहीये. किंबहुना, ती लैंगिक अत्याचार करण्याची फँटसी आहे; आणि लैंगिक अत्याचार करणं घृणास्पद आहे. (आणि इथे मोठा निबंध लिहिता येईल, पण ते असो.) हे सगळं म्हणताना, "माझ्या घरी आई-बहीण-बायको-मुली आहेत", ह्याची गरज काय?

"हिलरी महाचालू आहे." ह्याबद्दल शंकाच नाही. किंबहुना ती महाचालू नसती तर इथपर्यंत पोहोचली असती का, अशी मला शंका आहे. माझ्या स्वप्नातले भारतीय पंतप्रधान किंवा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष माझ्या स्वप्नांतच त्या-त्या स्थानांवर पोहोचतात. प्रत्यक्षात हे लोक (अस्तित्वात नक्की असणार पण) तालुका-प्रमुखसुद्धा बनू शकतील का, ह्याबद्दल शंका आहे.

---

डॉनल्ड ट्रंपची ही विधानं म्हणजे न्यूनगंड झाकण्यासाठी मारलेल्या बढाया आहेत; न्यूयॉर्करच्या अॅडम गोपनिकचं म्हणणं आहे. दुवा थोडक्यात मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या लोकांना न्यूनगंडच फार, असं सर्वसाधारणपणे म्हणता येईल; तो तसंच काहीसं लिहितो. ह्याबद्दल लोकांचं काय म्हणणं -

... along with the compulsive Trump creepiness, there was also, perhaps significantly, something pathetic and therefore newly vulnerable about the taped Trump. This was not a dominant American Mussolini asserting himself contemptuously on stage. It was, well, a loser, struggling to impress a very insignificant new acquaintance with pitiful boasts about his masculinity. What runs through the tape is, along with his one-size-fits-all brutality, Trump’s deep insecurity and desperate need for approval from other men. Even the bad language doesn’t seem like that of a native speaker of English, certainly not what the nasty sex predator he wants to portray himself as being would use. “I moved on her like a bitch!” Is that even an idiom? He is not boasting so much as begging, looking for Billy Bush’s confirmation of his sexuality and his stardom, as crazy narcissists will. The same thing is true of the newly discovered tapes of his conversations with Howard Stern. He engages in matchlessly creepy celebration of his own daughter as an object of sexual interest, yes, but it’s obvious that he is doing it above all to be admired and accepted by Stern. He is willing to throw his daughter under the bus and onto a mattress, so to speak, in exchange for a moment more of the King of All Media’s approval. It is the desperate need for validation and success, as much as the mere ugliness, that impresses.

गब्बर सिंग Tue, 11/10/2016 - 21:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ मुद्दा असा होता, खरं तर आहे - ट्रंपचं हे बोलणं चारचौघांत, बाहेर मिरवता येण्यासारखं नाहीये. किंबहुना, ती लैंगिक अत्याचार करण्याची फँटसी आहे; आणि लैंगिक अत्याचार करणं घृणास्पद आहे. (आणि इथे मोठा निबंध लिहिता येईल, पण ते असो.) हे सगळं म्हणताना, "माझ्या घरी आई-बहीण-बायको-मुली आहेत", ह्याची गरज काय?

लैंगिक फँटसीज ह्या पॉर्न मधे प्रचंड प्रमाणावर चालतात. काही लोक त्यातल्या काही फँटसीज प्रत्यक्षात (चार दीवारोंके अंदर) करतही असतील. काही फँटसीज बोलून दाखवण्याजोग्या असतात व काही नसतात. काही फँटसीज बहुतांशांना अत्यंत घाण वाटतात तर काही फँटसीज काहींना घाण वाटतात. बिल माहर चा हा व्हिडिओ पहा. त्यात तो म्हणतो की स्त्रियांमधे व पुरुषांमधे जे फरक असतात त्यातला एक हा असतो की त्यांच्या फँटसीज अतिभिन्न असतात. Your fantasies bore us. Our fantasies offend you. (And hence a traditional couple cannot explore their mutual fantasies.)

"These comments are repugnant, and unacceptable in any circumstance," - असा डायलॉग एका अमेरिकन खासदाराने मारला. पण ट्रंप जे म्हणाला त्याहीपेक्षा जास्त राडेबाज वर्तन अ‍ॅक्च्युअली पॉर्न मधे सर्रास होतं, दाखवलं/पाहिलं जातं. पॉर्न शिष्टसंमत आहे असं नाही व राजकारण्यांनी तसं बोलावं असं मला म्हणायचं नाही. पण ट्रंप च्या वक्तव्यांपेक्षा प्रचंड repugnant स्टफ अनेकदा पॉर्न मधे दाखवला जातो. म्हंजे तसं repugnant वागणं हे unacceptable in any circumstance असं अजिबात नाही. अ‍ॅक्च्युअली ट्रंप जे बोलतो त्याहीपेक्षा घाण शब्द अनेक लोक (अनेक म्हंजे सर्व नव्हे) रोज त्यांच्या बोलण्यात वापरतात. तो शब्द आहे - shit.

हे सगळं म्हणताना, "माझ्या घरी आई-बहीण-बायको-मुली आहेत", ह्याची गरज काय? - हा प्रश्नच (धागाकर्तीने) कैतरी विचारायचं म्हणून विचारलेला आहे. खरंतर ह्या धाग्याची गरजच नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 21:43

In reply to by गब्बर सिंग

काही फँटसीज बोलून दाखवण्याजोग्या असतात व काही नसतात.
(बिल मार) म्हणतो की स्त्रियांमधे व पुरुषांमधे जे फरक असतात त्यातला एक हा असतो की त्यांच्या फँटसीज अतिभिन्न असतात. Your fantasies bore us. Our fantasies offend you.

अमेरिका सामाजिक पातळीवर एवढी मागास का, ह्याचं उत्तर जागोजागी मिळतं; उदाहरणार्थ बिल मार लैंगिकतेसंदर्भातला तज्ज्ञ असल्यासारखी त्याची उद्धरणं दिली जातात. किन्सी, मास्टर्स आणि जॉन्सन ज्या देशात जन्मले तिथे हा 'धर्म'बुडवेपणा!

असो. मास्टर्स आणि जॉन्सनच्या पुस्तकाचं भाषांतर करणं आणि ते लोकांपर्यंत किती महत्त्वाचं आहे हे ह्या निमित्ताने पुन्हा एकदा समजलं. आभार.

ज्यांना दुय्यम दर्जाचे शब्दकोश विकून फसवलं आहे, त्या सगळ्यांसाठी - डॉनल्ड ट्रंपने केलेली वर्णनं फँटसी किंवा प्रत्यक्षात येण्याबद्दल एकमेव आक्षेप आहे - परस्परसंमती. परस्परसंमतीशिवाय असं वर्तन लैंगिक गुन्हा आहे; ट्रंपने केलेल्या वर्णनात परस्परसंमती धाब्यावर बसवली आहे, ते वर्णन लैंगिक अत्याचाराचं आहे. जोपर्यंत हे वर्णन त्याच्या मनात होतं, त्याच्या अगदी जवळच्या मैत्रांमध्ये होतं तोवर ती फँटसी होती. चारचौघांत ती टेप प्रसिद्ध झाल्यावर, ज्यांना ट्रंपच्या लैंगिक व्यवहारांमध्ये काडीचा रस नव्हता त्यांच्यासाठी हे वर्णन गुन्ह्याचं वर्णनच आहे.

गब्बर सिंग Tue, 11/10/2016 - 22:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्यांना दुय्यम दर्जाचे शब्दकोश विकून फसवलं आहे, त्या सगळ्यांसाठी - डॉनल्ड ट्रंपने केलेली वर्णनं फँटसी किंवा प्रत्यक्षात येण्याबद्दल एकमेव आक्षेप आहे - परस्परसंमती. परस्परसंमतीशिवाय असं वर्तन लैंगिक गुन्हा आहे; ट्रंपने केलेल्या वर्णनात परस्परसंमती धाब्यावर बसवली आहे, ते वर्णन लैंगिक अत्याचाराचं आहे. जोपर्यंत हे वर्णन त्याच्या मनात होतं, त्याच्या अगदी जवळच्या मैत्रांमध्ये होतं तोवर ती फँटसी होती. चारचौघांत ती टेप प्रसिद्ध झाल्यावर, ज्यांना ट्रंपच्या लैंगिक व्यवहारांमध्ये काडीचा रस नव्हता त्यांच्यासाठी हे वर्णन गुन्ह्याचं वर्णनच आहे.

एकदम सहमत. (लिबर्टेरियन/काँट्रॅक्टेरियन विचारप्रणालीशी एकदम सुसंगत विचार आहे.)

गोगोल Wed, 12/10/2016 - 00:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

> ज्यांना दुय्यम दर्जाचे शब्दकोश विकून फसवलं आहे, त्या सगळ्यांसाठी - डॉनल्ड ट्रंपने केलेली वर्णनं फँटसी किंवा प्रत्यक्षात येण्याबद्दल एकमेव आक्षेप आहे - परस्परसंमती. परस्परसंमतीशिवाय असं वर्तन लैंगिक गुन्हा आहे; ट्रंपने केलेल्या वर्णनात परस्परसंमती धाब्यावर
> बसवली आहे, ते वर्णन लैंगिक अत्याचाराचं आहे. जोपर्यंत हे वर्णन त्याच्या मनात होतं, त्याच्या अगदी जवळच्या मैत्रांमध्ये होतं तोवर ती फँटसी होती. चारचौघांत ती टेप प्रसिद्ध झाल्यावर, ज्यांना ट्रंपच्या लैंगिक व्यवहारांमध्ये काडीचा रस
> नव्हता त्यांच्यासाठी हे वर्णन गुन्ह्याचं वर्णनच आहे.

व्हाट द फक डीड आय जस्ट रीड? माय ब्रेन जस्ट एक्सप्लोडेड.

म्हणजे धागाकर्तीला तो हे सगळे बोलल्यचा पण आक्षेप नाहीये, केवळ ते कुणीतरी लीक केला म्हणून आता तो गुन्हा आहे.
म्हणजे या न्यायाने मागे ते अनेक फिमेल सेलेब्रिटीज चे उघडे नागडे फोटोज लीक झाले होते, त्या सगळ्याच्या सगळ्या स्लट्स आहेत. कारण की जोपर्यन्त ते त्यांच्या खासगीत होत तोपर्यंत ती फँटसी होती, चारचौघांत ते प्रसिद्ध झाल्यावर, ज्यांना त्यांच्या लैंगिक व्यवहारांमध्ये काडीचा रस नव्हता त्यांच्यासाठी त्या अटेंशन होअर्स आणि स्लट्सच आहेत.

> ज्यांना दुय्यम दर्जाचे शब्दकोश विकून फसवलं आहे, त्या सगळ्यांसाठी

बाकी याचा उल्लेख दोनदा झाला आहे आणि रोख माझ्यावर दिसत आहे. मला हे अशा प्रकरच शेमिंग ओपन माईंडेड चर्चेसाठी उपयुक्त ठरत नाही असे वाटते. पण यात चूक माझीच आहे, मला वाटल होत की लोक दुसर्या बाजूचा विचार करायला पण ओपन असतील. पण ईथे
सगळेच जज, ज्युरी आणि एक्झीक्युशनर सजा सुनावून मोकळे झाले आहेत आणि कुणी जराही वेगळा विचार मांडायचा प्रयत्न केला तर त्यांच्या कपॅबिलिटी बद्दल (दुय्यम दर्जाचे शब्दकोश विकत घेणे ई ई) शंका उपस्थित केली जात आहे.

थोड्क्यात हे एक एको चेंबर आहे ज्यात एकाने विचार मांडायचे आणि बाकिच्यांनी " मम् " म्हणायचे.
ठीक आहे, माझी रजा, चालू देत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 01:27

In reply to by गोगोल

ट्रंपने अशा गोष्टी बोलण्याबद्दल मला फारसा आक्षेप नाहीये. स्वतःला तिस्मारखाँ समजणारे अनेक पुरुष अशा छापाची बडबड करतात ह्याबद्दल मला काहीही शंका नाही. हे पुरुष मोठ्या संख्येत असावेत, असं वाटतं; त्यामुळे ह्याला मानसिक विकार म्हणावं आणि त्यावर इलाज कसा करता येईल ह्याबद्दल विचार करावा, असे माझे विचार आहेत. ह्या प्रकरणात ट्रंपबद्दल माझा आक्षेप असेलच तर अशी बडबड कोणासमोर आणि कधी करावी ह्याची अक्कल नसण्याबद्दल आहे. उदाहरणार्थ ट्रंपने त्याच्या बायको अथवा संमतीसह-सखीसमोर अशी बडबड व/वा संमतीसह वर्तन केल्यास मला अजिबात, काहीही अडचण नाही; त्याला मी विकारसुद्धा म्हणणार नाही. ही बडबड जगजाहीर झाल्यावरही मी त्याला 'गुन्हा' समजत नाही. (कृपया माझ्या परवानगीशिवाय माझ्या तोंडात शब्द अथवा अन्य काही घालू नये. धन्यवाद.)

ट्रंपने लैंगिक अत्याचाराचं वर्णन केलं आहे; हे तो स्वतः मान्य करत नाही. अमेरिकी न्यायपालिका ह्या वर्णनाला लैंगिक अत्याचार म्हणते, पण सदस्य गोगोल ह्यांना ते ही मान्य नाही; उलट असं वर्णन करणाऱ्यांना ते फेमिनाझी म्हणत हिणवतात. आहे बुवा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अमेरिकेतही आहे आणि ऐसीवरही आहे. बोलून घ्या, हवं ते.
ह्याउलट स्त्रियांच्या ज्या फोटोंबद्दल तुम्ही बोलत आहात, ते त्यांच्या स्वतःबद्दल असतात. त्यात इतरांना त्रास देण्याचा हेतू, विचार किंवा कृती नसते. आपलं आपण काहीही करणं आणि इतरांवर अत्याचार करण्याबद्दल बढाया मारणं ह्यात काही किंचित फरक आहे. (कदाचित मेंदूचा स्फोट झाल्यामुळे हे लक्षात आलेलं नसेल. ह. घेणे.) गुन्हा करण्याची फँटसी आणि अभिव्यक्ती ह्यात काही फरक असतो; स्वतःचा फोटो ही अभिव्यक्ती असते.

त्यातूनही नग्नता आणि लैंगिकता ह्याचा सरळसरळ, थेट संबंधच असतो असंही नाही. रधोंनी अशा अर्थाची वाक्यं लिहून ८०+ वर्षं झाली; अजूनही आपण कोरडेच.

तरीही, माझा मुख्य मुद्दा तुम्हाला अजूनही समजलेला नाही. (मेंदूचा स्फोट होण्याआधी जे समजलं नव्हतं ते स्फोटानंतर समजेल अशी आशा मी अजिबातच धरत नाही. ह. घेणे.) ट्रंपचा धिक्कार करताना "माझ्या घरी आई-बहीण-बायको-मुली आहेत", हे बोलण्याची गरजच काय; हा तो मुख्य मुद्दा आहे. उदाहरणार्थ, धाग्याचं शीर्षक पाहा.

---

तुम्ही रजा घेत आहात तर प्रतिसादांबद्दल आभार मानणं क्रमप्राप्त आहे.

'ट्रिमेंडस' अवांतर करणारे तुमचे प्रतिसाद मला 'ट्रिमेंडस' शैक्षणिक वाटले. पुरुषप्रधान मनोवृत्तीला नावं ठेवली की आपले विचार मांडण्याजागी विचार मांडणाऱ्यांना 'फेमिनाझी'सारखी लेबलं लावणं, आपल्या स्वतःच्या नैतिकतेच्या कल्पनांमध्ये न बसणाऱ्या बायकांना वेश्या, स्लट म्हणणं; हिलरीला ब्लोजॉब मिळाला असेल अशी स्वतःच कल्पना करून घेऊन केलेला त्रागा; 'फिफ्टी शेड्स' वाचणाऱ्या असं आचरट सरसकटीकरण; मुख्य विषय भलताच असताना ट्रंप-हिलरीबद्दल कॉमेंट्स ... हा वस्तुपाठ 'ट्रिमेंडस' रोचक आणि शैक्षणिक आहे. (हे हलकेच घेण्याची गरज नाही.)

धागा एवढा हिट होईल, असं लिहिताना मला कोणी सांगितलं असतं तर मी तेव्हा 'ट्रिमेंडस' राक्षसी हसले असते.

नितिन थत्ते Wed, 12/10/2016 - 09:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पुरुषप्रधान मनोवृत्तीला नावं ठेवली की आपले विचार मांडण्याजागी विचार मांडणाऱ्यांना 'फेमिनाझी'सारखी लेबलं लावणं,

इझन्ट इट फ्रॉम आयदर साइड? फेमिनिझमच्या सहानुभूतीदार पुरुषांपैकी कुणी फेमिनाझींच्या सरसकटीकरणावर आक्षेप घेतल्यावर "अजून किती प्रबोधन व्हायला हवं आहे ते समजतं" अश्या कमेंट टाकून त्यांना एम सी पी म्हणून लेबल लावणं वगैरे !!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 18:54

In reply to by नितिन थत्ते

स्वतःच स्वतःला लेबल लावून घेण्याबद्दल बोलत आहात असं समजते.

एरवी, 'अजून किती प्रबोधन व्हायला हवं हे समजतं', अशा छापाची प्रतिक्रिया लिहिण्यापूर्वी ह्या धाग्यावर बरीच स्पष्टीकरणं लिहिलेली आहेत. (कावऱ्याबावऱ्या स्वरात) कोणां द्वांड श्रेणींदात्यांनी तें प्रतिसांद लपवून तर नाहीं नां टांकलें? (एवढं कावरेबावरेपण पुरे)

.शुचि Wed, 12/10/2016 - 20:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतःला तिस्मारखाँ समजणारे अनेक पुरुष अशा छापाची बडबड करतात ह्याबद्दल मला काहीही शंका नाही.

आणि अशा बडबडीमुळेच ट्रंपच्या हाताचे बोट खरच लहान असावे असा संशय घेण्यास जागा आहे. ओव्हरकॉम्पेनसेशन ;) जो गरजते है वोह बरसते नही या न्यायाने.
अरारारा साइझबद्दल किती शेन्शिटिव्ह असतात नाही काही इन्सेक्युअर पुरुष =))

गोगोल Wed, 12/10/2016 - 21:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे कळस आहे.

१.
> ही बडबड जगजाहीर झाल्यावरही मी त्याला 'गुन्हा' समजत नाही. (कृपया माझ्या परवानगीशिवाय माझ्या तोंडात शब्द अथवा अन्य काही घालू नये. धन्यवाद.)

वर तुम्ही लिहिले आहे की:

> परस्परसंमतीशिवाय असं वर्तन लैंगिक गुन्हा आहे; ट्रंपने केलेल्या वर्णनात परस्परसंमती धाब्यावर बसवली आहे, ते वर्णन लैंगिक अत्याचाराचं आहे. जोपर्यंत हे वर्णन त्याच्या मनात होतं, त्याच्या अगदी जवळच्या मैत्रांमध्ये होतं तोवर ती फँटसी होती.
> चारचौघांत ती टेप प्रसिद्ध झाल्यावर, ज्यांना ट्रंपच्या लैंगिक व्यवहारांमध्ये काडीचा रस नव्हता त्यांच्यासाठी हे वर्णन गुन्ह्याचं वर्णनच आहे.

यातून काय सिद्ध होत? हे म्हणजे नरो वा कुंजरो वा झाल. मेसेज तर बरोब्बर पोहोचवायचा पण म्हणायच की मी हे म्हणत नाही.

२.
> अमेरिकी न्यायपालिका ह्या वर्णनाला लैंगिक अत्याचार म्हणते, पण सदस्य गोगोल ह्यांना ते ही मान्य नाही;

त्यानी त्यात स्वतः म्हणलय की "व्हेन यु आर अ स्टार दे लेट यु डू दॅट", म्हणजे काही टक्के महीलांना तरी अशा प्रकारचे अटेंशन एका बिलिनेअर कडून मिळ्वणे आवडते असे मानायला वाव आहे.
याशिवाय, संबधित महीलेने काही तक्रार नोंदवली होती का?

३.

> ह्याउलट स्त्रियांच्या ज्या फोटोंबद्दल तुम्ही बोलत आहात, ते त्यांच्या स्वतःबद्दल असतात.

मी इथे अ‍ॅनॉलॉजी देत होतो की त्या केस मध्ये जशा स्त्रिया विक्टीम आहेत तसच या केस मध्ये ट्रंप.

४.
> स्वतःच्या नैतिकतेच्या कल्पनांमध्ये न बसणाऱ्या बायकांना वेश्या, स्लट म्हणणं;

वन्स अगेन, आय वॉज एक्स्टेडींग युअर आर्ग्युमेंट. मी त्यांना पर्सनली असे समजत नाही.

५.
> हिलरीला ब्लोजॉब मिळाला असेल अशी स्वतःच कल्पना करून घेऊन केलेला त्रागा;

माझा रोख मोनिका लेविन्स्की कडे होता. अभ्यास वाढवा.

६.
> हा वस्तुपाठ 'ट्रिमेंडस' रोचक आणि शैक्षणिक आहे. (हे हलकेच घेण्याची गरज नाही.)

मी काय करावे अथवा करू नये हे सांगायची तुमची माझ्या मनामध्ये लायकी, कुवत आणि पत नाही.
हा "होलिअर दॅन दाऊ" अ‍ॅप्रोच माझ्यावर चालत नाही.

.शुचि Wed, 12/10/2016 - 21:38

In reply to by गोगोल

संबधित महीलेने काही तक्रार नोंदवली होती का?

अहो तक्रार करणार कशी ती एकदा ट्रंप तिच्या मागे येऊन तिली म्हणाला होता - माझ्याकडे मोठ्ठी मोठी जहाजे आहेत तुला एखाद्या जहाजात घालून समुद्रात माझ्या माणसांनी बुडवलं तरी कोणाला पत्ताही लागणार नाही. हे अर्थात ती खोटे बोललेली असू शकते कारण या स्नीकी बोलण्याची टेप नाहीये. पण तो जर असे बोलला असेल तरे तिची हिंमत होइल का कम्प्लेंट करायची. वॉज ही नॉट पॉवरफुल. आणि तो मनुष्य पॉवरचा मिसयुझ करण्यात वाकबगार असावा असे मानायला भरपूर वाव आहे.

गोगोल Wed, 12/10/2016 - 21:51

In reply to by .शुचि

> आणि तो मनुष्य पॉवरचा मिसयुझ करण्यात वाकबगार असावा असे मानायला भरपूर वाव आहे.

यात काहीही वाद नाही. पण अमेरिकेतील एकंदरीत सुईंग, आणि बायकांची(आणि इतरांचीही) लैंगिक खटले भरून, आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून पैसे मिळवायची हिस्टरी बघता ती खोट बोलल्याचीही शक्यता खूप ज्यास्त असू शकते. पुरावे सापडल्यास त्याला खुशाल तुरुंगामध्ये डांबा, पण त्या आधीच त्याल गुन्हेगार अथवा मनोरुग्ण ठरवू नये अशी अपेक्षा. मला तो फार तर फार नार्सिस्टिक वाटतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 21:56

In reply to by गोगोल

सहज गूगलून काय मिळालं -
Narcissistic personality disorder is a mental disorder in which people have an inflated sense of their own importance, a deep need for admiration and a lack of empathy for others. But behind this mask of ultraconfidence lies a fragile self-esteem that's vulnerable to the slightest criticism.

(संदर्भ)

गोगोल Wed, 12/10/2016 - 22:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गूगलून झाल होत पण हे म्हणजे अतीच झाल.

या न्यायाने डिप्रेशन नी त्रास होणारे लोक पण मानसिक रोगीच असतात. त्याअर्थी लोकसंखेचा एक मोठ्ठा भाग पण असाच आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 21:31

In reply to by गोगोल

गुन्हा, गुन्ह्याचं वर्णन, मानसिक विकार, इत्यादी मुद्द्यांबद्दल मला जे काही म्हणायचं आहे ते मी आधीच म्हणून घेतलेलं आहे. पुन्हा-पुन्हा तेच-ते लिहिण्यात मला हशील दिसत नाही. बाकीचा प्रतिसाद दखलपात्र वाटत नाही.

गोगोल Wed, 12/10/2016 - 22:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ठीक आहे.

पण जरातरी स्वतःची मत उघडपणे मांडा म्हणजे प्रतिवाद करायला सोप जात. नाहीतर होत काय की तुम्ही स्वतःला जे बोलायच असत ते बोलून घेता आणि मग पळवाटांचा आधार घेता जस की
१. अमेरिकन न्याय व्यवस्था अस म्हणते अस मी म्हणाले, मी कधीच त्याला डायरेक्ट्ली गुन्हेगार म्हणाले नाही, माझ्या तोंडी शब्द कोंबू नका. अरे पण मुद्दा तुम्हीच मांडला ना? मग जर तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तर मुद्दा मांडायचा पॉईंट काय? हे म्हणजे पोपट पिंजर्यामध्ये उताणा पडला आहे, डोळे पांढरे झाले आहेत वगैरे लिहायचे, पण मेला आहे असे नाही म्हणायचे.
२. रेप फँटसी च्या उदाहरणाबद्दल पण असच. मी नाही अस म्हणत पण मास्टर अँड जॉन्सन असे म्हणतात असे एकीकडे म्हणायचे, आणि दुसरीकडे
"मास्टर्स आणि जॉन्सनच्या पुस्तकाचं भाषांतर करणं आणि ते लोकांपर्यंत किती महत्त्वाचं आहे हे ह्या निमित्ताने पुन्हा एकदा समजलं. आभार" हे ही म्हणता.
म्हणजे तुम्ही त्याच्याशी अ‍ॅग्री करता का नाही करत? का फक्त जिथे त्यांचे संदर्भ सोयीस्कर रित्या वापरता येतील तिथेच फक्त स्ट्रॉन्ग्ली अग्रीड?

.शुचि Wed, 12/10/2016 - 22:11

In reply to by गोगोल

रेप फँटसी

अगदी रेपच नाही पण आपल्या पुरुषाने आपल्यावरती स्वामित्व गाजवावे किंबहुना थोडा दुष्टपणाच करावा ही फॅन्टसी माझ्या काही मैत्रिणींची आहे. अ‍ॅग्रीड. अर्थात अदितीने मान्य करुन काय फरक पडणार होता? अशा काय याहुनही वेगळ्या व विचित्र अगदी टॅबु फॅन्टसीज असू शकतात की. त्या प्रत्यक्षात यावे असे कोणालाच वाटत नसेल पण एनॅक्ट कराव्या ही सुप्त इच्छा असू शकते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 22:46

In reply to by गोगोल

ही माझी प्रतिक्रिया. त्यात (आकड्यांशिवाय) लिहिलेलं आहे -
१. ट्रंपने प्रत्यक्षात बोलल्यासारखं काही केलं का नाही केलं, हे अजून समोर आलेलं नाही. ट्रंपने जी बडबड केली, ते गुन्ह्याचं वर्णन आहे. गुन्हा करणं, (त्याचे निदान काही प्राथमिक पुरावे उघड होणं) आणि गुन्हा केल्याची शेखी मिरवणं ह्या दोन्हींमध्ये फरक आहे.

२. हे सगळं केलं तेव्हा तो सुकुमार ५९ वर्षांचा होता. आपण जे वर्णन केलं ते प्रत्यक्षात केलं असता गुन्हा असेल, हे त्याला (निदान रविवार रात्रीपर्यंत) आजही समजत नाही. असा पाचपोच नसलेला, कायद्याची प्राथमिक माहिती नसलेला माणूस राष्ट्राध्यक्षपदी असावा का? (आणि निवडणुकीत जिंकलाच तर त्याला हिलरीला तुरुंगात धाडायचं आहे!) कंसातलं वाक्य ह्या संदर्भात अवांतर आहे; पण ट्रंपचा ढपणा दर्शवणारं आहे.

३. तिसरं, ही अशी बडबड हा गुन्हा समजावा का मानसिक आजार? हा मानसिक आजार नाहीच, असं जोपर्यंत तज्ज्ञ म्हणत नाहीत तोवर ट्रंप मनोरुग्ण आहे, असं मानायची माझी तयारी आहे.
आधीच्या प्रतिसादात वाढीव मजकूर - ट्रंपचं स्वप्रेम (नार्सिसिझम) आणि इतरांना कस्पटासमान लेखणं (उदाहरणार्थ रोझी ओ'डॉनेल, मेगन केली, गर्भार आणि/किंवा आकर्षक न दिसणाऱ्या स्त्रियांना नोकरीवरून काढणं, हिस्पॅनिक आणि मुस्लिमांविरोधात केलली बडबड, इ.) ह्या गोष्टी त्याला मनोविकार आहे हेच दर्शवतात. त्या विकाराची तुलना डिप्रेशन ह्या मनोविकाराशी करणं काही अंशी योग्य आहे. डिप्रेस्ड, नार्सिसिस्ट किंवा इतर मनोविकार असणारी व्यक्ती कोणत्याही देशाची राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी नालायक आहे, असं मला वाटतं. (गंमत म्हणजे, हाच ट्रंप हिलरीच्या आरोग्याबद्दल शंका उपस्थित करत होता.)

---

तुम्ही त्याच्याशी अ‍ॅग्री करता का नाही करत? का फक्त जिथे त्यांचे संदर्भ सोयीस्कर रित्या वापरता येतील तिथेच फक्त स्ट्रॉन्ग्ली अग्रीड?

ते जे मी लिहिलेलं आहे ते मास्टर्स (मास्टर नाही) आणि जॉन्सन ह्यांचा संदर्भ देणं आहे. हे माझे विचार नाहीत म्हणजे, ह्या विषयात स्वतंत्ररीत्या विचार करून मांडायची माझी पत नाही, हे मान्य करणं आहे. ह्या विषयात त्या थोर अभ्यासकांच्या लेखनाची मी फक्त पोस्टगिरी केली.

.शुचि Wed, 12/10/2016 - 22:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डिप्रेस्ड, नार्सिसिस्ट किंवा इतर मनोविकार असणारी व्यक्ती कोणत्याही देशाची राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी नालायक आहे, असं मला वाटतं. (गंमत म्हणजे, हाच ट्रंप हिलरीच्या आरोग्याबद्दल शंका उपस्थित करत होता.)

मग तसे तर अमेरीकेत प्रत्येक ५ जणांमागे एका व्यक्तीला मानसोपचारतज्ञाची गरज भासते. म्हणजे २०% जनता नालायक झाली? लिंकनला बायपोलर डिसॉर्डर होती असा संशय आहे. संशय कारण तेव्हा ते निदानच उपलब्ध नव्हते.
हे मान्य की काही डिसॉर्डर्स्मध्ये स्ट्रेस घेता येत नाही. पण म्हणुन सर्रास त्या व्यक्तीला नालायक ठरविणे हे योग्य वाटत नाही. हां "अनमॅनेज्ड" आजार किंवा निदान न झालेला आणि त्यामुळे उपचार न झालेला अजार किंवा निदान होऊनही, उपचार न झालेला आजार घातक आहे हे मान्य. अशा व्यक्तीने राष्ट्राध्यक्ष होऊ नये हे मान्य, पण ती व्यक्ती जर आजार व्यवस्थित मॅनेज करु शकत असेल तर, तिला एखाद्या पदापासून वंचित ठेवणे योग्य नाहीच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 23:11

In reply to by .शुचि

ट्रंपच्या बचावासाठी लिंकन! परवा हिलरी स्वतःसाठी लिंकनला वापरत होती किंवा कायसंसं.

मनोविकार असणाऱ्या लोकांबद्दल मला संवेदना आहेत. अशा लोकांना समाजाने अपमानास्पद वागणूक देऊ नये, गरज असल्यास त्यावर उपचारांची योग्य सोय व्हावी, हे सगळं मान्य आहे. पण सर्वसामान्य माणसं जितपत मानाने जगतात, तितपत मान देणं आणि राष्ट्राध्यक्ष बनवणं ह्यांत फरक आहे.

राष्ट्राध्यक्ष लोकनियुक्त असतात. ट्रंप किंवा कोणीही व्यक्ती स्वप्रेमाच्या विकाराचे शिकारी आहेत, असं डॉक्टरी निदान सगळ्यांसमोर आलं तर अशी व्यक्ती निवडून येऊ शकेल का? अशा 'प्रथमपुरुषी मीवचनी' लोकांना इतरांनी मतं का द्यावीत? ह्यांतला विरोधाभास असा की हिलरीकडे शारीरिक क्षमता नाही म्हणून ट्रंपच तिला काही आठवड्यांपूर्वी हिणवत होता. हेच विधान मानसिक विकारांसाठीही लागू आहे. एकवेळ शारीरिक व्यंग असणारे लोकही नेते बनू शकतात; उदाहरणार्थ, सध्याचा टेक्सन गव्हर्नर, ग्रेग अॅबट, कमरेखाली लुळा आहे.

१. शब्दश्रेय - उसंत सखू

.शुचि Wed, 12/10/2016 - 23:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्रंपचा बचाव नाही मानसिक विकारांच्या टॅबूला आक्षेप आहे. आणि लिंकन यांचे उदाहरण कारण त्यांना काही एक विकार होता असा समज रुढ आहे.

अशा लोकांना समाजाने अपमानास्पद वागणूक देऊ नये, गरज असल्यास त्यावर उपचारांची योग्य सोय व्हावी, हे सगळं मान्य आहे.

कोणी मान्य अथवा अमान्य करण्याचा प्रश्नच नाही.

पण सर्वसामान्य माणसं जितपत मानाने जगतात, तितपत मान देणं आणि राष्ट्राध्यक्ष बनवणं ह्यांत फरक आहे.

राष्त्राध्यक्षपद भूषविणे, त्या पदाची धुरा सांभाळणे हे शिवधनुष्य आहे हे मान्य परंतु स्वतःच्या विकार-व्यंगांसहीत जर कोणी व्यक्ती ती धुरा पार पाडू शकणार असेल तर तसे उचित मानण्यास काहीच प्रत्यावय नाही.

राष्ट्राध्यक्ष लोकनियुक्त असतात. ट्रंप किंवा कोणीही व्यक्ती स्वप्रेमाच्या विकाराचे शिकारी आहेत, असं डॉक्टरी निदान सगळ्यांसमोर आलं तर अशी व्यक्ती निवडून येऊ शकेल का?

येऊ शकणार नाही म्हणजे ते तसे बरोबर आहे असे नव्हे. तर जर ती व्याधी/विकार त्या व्यक्तीने नीट मॅनेज केलेला असेल तर त्या व्यक्तीला अजिबात खालचे समजले जाऊ नये.

ट्रंपच तिला काही आठवड्यांपूर्वी हिणवत होता.

ट्रंपकडुन अधिक अपेक्षा काय बाळगणार? कधी स्त्रीत्वाचा हुकमी पत्ता खेळते तर कधी प्रकृती ठीक नाही हे तो बोलणारच कारण त्याला विजय हवा आहे.

अशा 'प्रथमपुरुषी मीवचनी'१ लोकांना इतरांनी मतं का द्यावीत?

येस्स्स ही रोगाची लक्षणे ढळढळीत दिसत असताना लोकांनी मते देऊच नये हे मान्य. आणि मग परत "एखाद्याने अर्ध्या तासात, ६ वेळा मी म्हटले" हे मला रोगाचे लक्षण वाटू शकते तर तेच एखादीला सामान्य वाटू शकते तेव्हा रोगाचे निदान करण्याच्या भानगडीत आपण सामान्य (नॉनमेडिकल) लोकांनी न पडलेलेच बरे नाही का? त्याकरता भरमसाठ फीया देऊन डॉक्टरकी करणारे तज्ञ आहेत्च की. डॉक्टरांनी ठरवावे एखादी व्यक्ती "फिट्ट" आहे की नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/10/2016 - 00:02

In reply to by .शुचि

न-डॉक्टरांनी निदान करावं आणि धोरणं, कायदे, घटना त्यानुसार बनवाव्यात असं मी कुठेही म्हटलेलं नाही.

राष्ट्राध्यक्ष बनणं हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाही. उदाहरणार्थ, ३५ वर्षांखालच्या व्यक्तीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनता येत नाही; १४ वर्षांपेक्षा कमी काळ अमेरिकी वास्तव्य असणाऱ्यांना राष्ट्राध्यक्ष बनता येत नाही. पण ३५ वर्षांखालच्या व्यक्तीला, अमेरिकेत नुकत्या (अगदी वैध कागदपत्रांशिवायही) आलेल्या व्यक्तीलाही जगण्याचा अधिकार आहे; कारण जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.

ज्या व्यक्तिमध्ये मानसिक विकाराची लक्षणं दिसत आहेत; म्हणजेच विकार मॅनेज करून आपली पात्रता सिद्ध करणं ह्या लोकांना जमत नाहीये; अशा व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष बनवू नये, असं माझं मत, इच्छा आहे. हे सरकारी किंवा ऐसीचं धोरण नाही, असावं असा माझा आग्रह नाही. जिथे लोकांनी मत देऊन निवडून येण्याचा सवाल असतो, तिथे माझ्यासारख्या, आपल्यासारख्या क्षुद्रांची मतं, मतं मांडण्यासाठी उपलब्ध असणारी व्यासपीठं, ह्यांचा विचार करण्याची गरज पडते. माझ्या मते मानसिक विकार असणाऱ्या व्यक्तीने राष्ट्राध्यक्ष बनू नये. ह्या मताशी असहमत असण्याचा अधिकार इतर सर्वांना आहे, पण मला माझ्या मताचा अधिकार आहे; तो बदलत नाही.

.शुचि Thu, 13/10/2016 - 00:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होय मी हे जाणते कारण आपल्यामध्ये संवादांचे मार्ग खुले आहेत. तुला माझी भूमिका कुठुन स्टेम होते (उगम पावते) हे माहीत आहे. तर मला तुझी भूमिका माहीत आहे. फक्त आवडणार्‍या विषयावर बोलण्याचा चान्स आला तो मी घेतला. एवढेच.

.शुचि Thu, 13/10/2016 - 18:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

nine emotional lives of cats" पुस्तकात मांजरी नार्सिसिस्ट असतात याचा उहापोह करुन शेवटी लेखक या निष्कर्षाला पोचलाय की असतात खर्‍या पण त्या माणसावरती प्रेमही करतात. :)
हे बरोबर नाही तिर्री, नार्सिसिस्ट असूनही तू तिच्यावर प्रेम करतेस आणि मग आमच्या डॉन्युनेच काय घोडं मारलय? ;)

मिलिन्द Wed, 12/10/2016 - 00:06

In reply to by गब्बर सिंग

हे सगळं म्हणताना, "माझ्या घरी आई-बहीण-बायको-मुली आहेत", ह्याची गरज काय? - हा प्रश्नच (धागाकर्तीने) कैतरी विचारायचं म्हणून विचारलेला आहे.
सिरियसली ? मला वाटलं होतं की प्रागतिक चळवळ समजत किंवा मान्य नसलेल्या सामाजिक प्रतिगाम्यांना सुद्धा , केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून , पन्नास टक्के लोकसंख्येबद्दल काढलेले घाणेरडे उद्गार, आया -बहिणी नसताना सुद्धा आक्षेपार्ह वाटायला हरकत नसावी .

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 00:24

In reply to by मिलिन्द

आंजावर लिहिताना काही लोक शिवराळ भाषा वापरतात. त्यांचा हेतू, प्रत्येक वेळेस अपमानव्यंजक बोलण्याचा असतोच असंही नाही. त्या बोलण्यावर संस्कृतिरक्षकांच्या ठरावीक प्रतिक्रिया असतात, "इथे बायकाही आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही असं कसं बोलता!"

बायका आहेत, त्या बोलतात तर त्यांचा त्या निषेध व्यक्त करतील किंवा गप्प बसतील. त्यांचा ठेका घ्यायला ह्या संस्कृतिरक्षक पुरुषांना कोणी सांगितलंय. खरं तर शिवराळ लोक परवडले पण हे लादलेले पालनकर्ते नकोत, असं माझं बरेचदा होतं. काहींना विचारांची ही दिशा समजत नाही; काहींना आपल्या अधिकारांचा संकोच होत आहे, असं वाटतं.

एकेकाळी संस्कृतीरक्षकांनी मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या "अश्लील" चित्रांबद्दल राळ उठवली होती, म्हणे ही नियतकालिकं मुलं आणि स्त्रियांनाही दिसतात, म्हणून त्यावर बंदी आणा. त्यावर रधोंनी लिहिलं की, पाप ह्याच संस्कृतीरक्षकांच्या मनात आहे. अशी चित्रं छापल्यामुळे ते पाप उघडं पडतं, म्हणून त्यांचा ह्या चित्रांवर राग आहे. त्या लेखाची आठवण झाली.

सिरियसली ? मला वाटलं होतं की प्रागतिक चळवळ समजत किंवा मान्य नसलेल्या सामाजिक प्रतिगाम्यांना सुद्धा , केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून , पन्नास टक्के लोकसंख्येबद्दल काढलेले घाणेरडे उद्गार, आया -बहिणी नसताना सुद्धा आक्षेपार्ह वाटायला हरकत नसावी .

हा धागाच मुळात अस्तित्वात नसायला हवा कारण परस्परसंमतीचा मुद्दा फक्त एका प्रतिसादात मांडता येतो. व ते करण्यासाठी "ही बातमी समजली का ?" चा पर्याय उपलब्ध आहे/होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/10/2016 - 01:32

In reply to by गब्बर सिंग

परस्परसंमती हा धाग्याचा विषयच नाही; किंवा तुम्ही आणि सदस्य गोगोल त्यात अडकून बसले नसतात तर तो विषय माझ्या डोक्यातच नव्हता. आमच्याकडे चांदणं नव्हतं, मग तुमच्याकडे कसं आलं, अं?

उदाहरणार्थ, धाग्याचं शीर्षक बघितलं तरीही ते समजेल. दुसरी गोष्ट, मला टिंगल करण्याची लहर आली; बातमी दाखवण्याची नाही. म्हणून स्वतंत्र धागा काढला.

गब्बर सिंग Wed, 12/10/2016 - 02:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धाग्याचा गोषवारा -

(१) "माझ्या घरी स्त्री-नातेवाईक आहेत." ( धाग्याच्या शीर्षकावरून साभार)
(२) परस्परसंमती हा धाग्याचा विषयच नाही;
(३) आपल्या गोतावळ्यात, कुटुंबात कोणी मुसलमान, समलैंगिक, एकंदरच LGBTQ, दलित, (अमेरिकन संदर्भात, हिस्पॅनिक, कृष्णवर्णीय) येईस्तोवर आपण ह्या लोकांच्या दुःखाचा, अडचणींचा विचार करणार नाही का? - (१) चा मुद्दा वेगळ्या शब्दात.

------

आमच्याकडे चांदणं नव्हतं, मग तुमच्याकडे कसं आलं, अं?

तुम्हीच "चांदणे शिंपीत" जाता ... आणि वर आम्हाला विचारता ?

मिलिन्द Thu, 13/10/2016 - 04:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एखाद्या "महाचालू" वगैरे नसलेल्या व्यक्तीला पुतीन वगैरे अतिचालू व्यक्तींशी सामना करायला पाठविणे कितपत शहाणपणाचे ठरेल ?

.शुचि Tue, 11/10/2016 - 20:53

Donald Trump calls 2005 vulgar recording about women 'locker room talk'
Several of Donald Trump’s top campaign surrogates say they aren’t sure if grabbing a woman by the genitalia without her consent — as the candidate described in a 2005 video that leaked over the weekend — would be considered sexual assault.

किती विकले गेलेयत हे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक. आय विश हे स्त्री होतील आणि एकदा मॉलेस्ट होतील. आय विश...!!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 21:01

In reply to by .शुचि

लैंगिक अत्याचार फक्त स्त्रियांवरच होतात, पुरुषांचं 'भेदन' होऊच शकत नाही, हेही एक पुरुषप्रधान संस्कृतीमधून आलेलं मिथक.

.शुचि Wed, 12/10/2016 - 20:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू म्हणतेस ते खरे आहे. आणि भेदन जाऊ दे गं ग्रोपिंग हादेखील अत्यंत गर्हणीय गुन्हा आहे आणि तो सेक्श्युअल असॉल्टच असतो.

मिलिन्द Tue, 11/10/2016 - 23:58

मुस्लिमांचे दुःख्ख काय आहे हे समजले नाही हे सरळ सरळ वेड पांघरून पेडगावला जाणे आहे . सोप्या शब्दात सांगायचे तर मुस्लिमांचे दुख्ख काय तर "Being tarred with the same brush as the terrorists/fundamentalists". "तुमच्यातले " ०.१ % लोक (?) हिंस्त्र दहशतवादी असल्यामुळे ( व कदाचित दहा टक्क्यापर्यंतच्या लोकांचा त्याला वैचारिक/मूक पाठिंबा असल्यामुळे) तूही त्यातलाच असणार -इतकेच नाही तर त्याबद्दल स्पष्टीकरणाची संधीही तुला देण्यात अर्थ नाही-तू खोटेच बोलत असणार .: ही वृत्ती .

गब्बर सिंग Wed, 12/10/2016 - 01:13

In reply to by मिलिन्द

"Being tarred with the same brush as the terrorists/fundamentalists". "तुमच्यातले " ०.१ % लोक (?) हिंस्त्र दहशतवादी असल्यामुळे ( व कदाचित दहा टक्क्यापर्यंतच्या लोकांचा त्याला वैचारिक/मूक पाठिंबा असल्यामुळे) तूही त्यातलाच असणार -इतकेच नाही तर त्याबद्दल स्पष्टीकरणाची संधीही तुला देण्यात अर्थ नाही-तू खोटेच बोलत असणार .: ही वृत्ती .

हे सुद्धा वेड पांघरून पेडगावला जाणे आहे.

गब्बर सिंग Wed, 12/10/2016 - 07:14

In reply to by मिलिन्द

Your comment proves my point!
"जरूरत है मुझे नये नफरत करने वालाे की ।
पुराने ताे अब मुझे चाहने लगे है ।"

हॅहॅहॅ

जनरलायझेशन, स्टिरिओटायपिंग चा मुद्दा इतका घिसापिटा झालेला आहे की टीकाकारांना गप्प बसवणे/निरुत्तर करण्यासाठीच फक्त त्याचा उपयोग केला जातो. प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही किंवा प्रॉब्लेम सोडवला जाईल हा संदेश पोहोचवण्यापर्यंत गाडी पोहोचतच नाही.

.शुचि Wed, 12/10/2016 - 20:15

In reply to by मिलिन्द

पॅशनेटली वाटत नाही तोपर्यंत मला लिहीता/वाद करता येत नाही त्यामुळे मी तुमची नवीन शत्रू बनणार नाही. मला मुसल्मान लोकांबद्दल ना उत्कट प्रेम आहे ना द्वेष :)

लोळगे सायकल कंपनी Wed, 12/10/2016 - 10:12

आपल्या गोतावळ्यात, कुटुंबात कोणी मुसलमान, समलैंगिक, एकंदरच LGBTQ, दलित, (अमेरिकन संदर्भात, हिस्पॅनिक, कृष्णवर्णीय) येईस्तोवर आपण ह्या लोकांच्या दुःखाचा, अडचणींचा विचार करणार नाही का?

बर्‍याचदा कुटुंबातील लोकांचा स्टँड एकदम उलटा असतो - घरातल्यांचे कष्ट, दु:ख दिसत नाहीत पण बाहेरील लोकांच्या दु:खाच्या बातम्या वाचून हळहळतात लेकाचे. :)

गब्बर सिंग Wed, 12/10/2016 - 10:22

In reply to by लोळगे सायकल कंपनी

बर्‍याचदा कुटुंबातील लोकांचा स्टँड एकदम उलटा असतो - घरातल्यांचे कष्ट, दु:ख दिसत नाहीत पण बाहेरील लोकांच्या दु:खाच्या बातम्या वाचून हळहळतात लेकाचे.

Truly नार्मिक प्रतिसाद.

ऋषिकेश Wed, 12/10/2016 - 17:02

जोवर कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच न करता किंवा कोणताही कायदेभंग न करता एखादी व्यक्ती खाजगीत काय बोलते ती माहिती मुळ व्यक्तीच्या मान्यतेशिवाय (व त्या वक्तव्याची पार्श्वभुमी/पुर्वपिठिका काहीही न देता) चव्हाट्यावर आणणे हे अत्यंत अनैतिक नाही का? असा प्रश्न मला या निमित्ताने पडला!

अमेरिकन मिडीयाला एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याची इतकीही बेसिक पोच नाही बघुन आश्चर्य नाही वाटले, पण एकुणच अमेरिकन जनता असल्या 'संध्यानंद'छाप गॉसिपीय बातम्यांवरून आपला राष्ट्राध्यक्ष निवडते का हे मात्र बघायला मौज वाटेल इतके नक्की!

अनु राव Wed, 12/10/2016 - 17:13

In reply to by ऋषिकेश

व्यक्तीच्या मान्यतेशिवाय (व त्या वक्तव्याची पार्श्वभुमी/पुर्वपिठिका काहीही न देता) चव्हाट्यावर आणणे हे अत्यंत अनैतिक नाही

अगदी अनैतिक आहे. हिलरी अनैतिक आहे हे कीतीवेळा सिद्ध होणार अजुन काय माहिती.
ट्रंप ला ह्या विषयावरुन नावे ठेवणार्‍यांना काय बोलणार? आंधळे झालेत.

मैने मजनू लडकपन मे असद, संग उठाया के सर याद आया. हे गालिब म्हणुन गेलाय, पण हिलरीला अजुन खाली कोसळण्याचा तळ सापडत नाहीये.

Nile Wed, 12/10/2016 - 18:21

In reply to by अनु राव

ट्रंप ला ह्या विषयावरुन नावे ठेवणार्‍यांना काय बोलणार? आंधळे झालेत.

इतकं होऊनही ट्रंप ट्रंपची जपमाळ लावणारे आंधळे, बहीरे अन मेंदूत तांत्रिक बिघाड असणारे असणार असे आम्हाला वाटते.

पण हिलरीला अजुन खाली कोसळण्याचा तळ सापडत नाहीये.

ट्रंपला त्यांची चिंता नाही. तो रोज नविन तळ गाठतोय. अन त्याच बरोबर त्याचे समर्थकही तळागाळात रुतत चाल्लेत.

अनु राव Wed, 12/10/2016 - 18:41

In reply to by Nile

ट्रंप ला ह्या विषयावरुन नावे ठेवणार्‍यांना काय बोलणार? आंधळे झालेत.

निळुभाऊ, ह्या वाक्याचा काँटेक्स्ट असा होता की, जवळजवळ सर्वच पुरुष ट्रंप बोलला असेल तश्या प्रकारच्या टिप्पण्या वक्तव्य करत असतात स्त्रीयांच्या शरीराबद्दल. स्वता असे करणार्‍या पुरुषांना आणि अश्या सर्व पुरुषांच्या बायका/मैत्रीणींना ट्रंपला नावे ठेवण्याचे काय कारण? म्हणुनच पुढे मी गालिब चा शेर पण दिला होता.

हिलरी नी एकुणातच काही बोलणे हे तिला शोभत नाही. काय बोलले ह्या पेक्षा कोण बोलले हे माझ्यासाठी महत्वाचे.

ट्रंपला त्यांची चिंता नाही. तो रोज नविन तळ गाठतोय. अन त्याच बरोबर त्याचे समर्थकही तळागाळात रुतत चाल्लेत.

ट्रंप मूर्खपणाचा तळ गाठत असेल कदाचित, हिलरी नीच पणाचा तळ गाठतीय. आय प्रीफर स्टुपिड ओव्हर इव्हिल.

चिंतातुर जंतू Wed, 12/10/2016 - 18:57

In reply to by अनु राव

>> स्वता असे करणार्‍या पुरुषांना आणि अश्या पुरुषांच्या बायका/मैत्रीणींना ट्रंपला नावे ठेवण्याचे काय कारण?

तुमच्या मते लोकनियुक्त राष्ट्रप्रमुखाला सामान्य माणसाचेच सर्व नैतिक नियम लागू पडावेत? की ज्यानं कधीच पाप केलेलं नाही त्यानंच मेरीवर दगड भिरकवावा?
आणि ज्या बायकांचे पुरुष असं बोलतात त्यांच्या नैतिक हक्कांवर ही गदा का?

'न'वी बाजू Wed, 12/10/2016 - 19:01

In reply to by अनु राव

आय प्रीफर स्टुपिड ओव्हर इव्हिल.

अनलेस यू आर अ यू.एस. सिटिझन फ्रॉम द फिफ्टी ष्टेट्स ऑर डी.सी. (अँड अ रजिष्टर्ड व्होटर अट द्याट), तुमच्या प्रेफरन्सला प्रस्तुत संदर्भात काडीमात्र महत्त्व नाही.

जष्ट एफवायआय.

चिंतातुर जंतू Wed, 12/10/2016 - 19:05

In reply to by 'न'वी बाजू

>> तुमच्या प्रेफरन्सला प्रस्तुत संदर्भात काडीमात्र महत्त्व नाही.

एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याची इतकीही बेसिक पोच नाही तुम्हाला? नक्कीच तुम्ही अमेरिकन मिडीया असणार! ;-)

Nile Wed, 12/10/2016 - 20:20

In reply to by अनु राव

, ह्या वाक्याचा काँटेक्स्ट असा होता की, जवळजवळ सर्वच पुरुष ट्रंप बोलला असेल तश्या प्रकारच्या टिप्पण्या वक्तव्य करत असतात स्त्रीयांच्या शरीराबद्दल. स्

Speak for yourself, will you? I have never said a fucking thing like that in my life!

.शुचि Wed, 12/10/2016 - 20:23

In reply to by Nile

अगदी अगदी मलाही असे पुरुष माहीत आहेत जे अशी बडबड स्वतःही करत नाहीत आणि चालवुनही घेत नाहीत. अनुताईंच्या घेट्टोत कदाचित नसतील तसे. समझा करो निळे जी.

गोगोल Wed, 12/10/2016 - 22:23

In reply to by अनु राव

> आय प्रीफर स्टुपिड ओव्हर इव्हिल.

+१००००००००००००००

मला हिलरीला हसताना पाहून "ईट सेंड्स शिव्हर्स डाऊन द स्पाईन" टाईप फिलिंग येतो.

Nile Wed, 12/10/2016 - 18:18

In reply to by ऋषिकेश

जोवर कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच न करता किंवा कोणताही कायदेभंग न करता एखादी व्यक्ती खाजगीत काय बोलते ती माहिती

१. बोलणे आणि गुन्ह्याची कबुली यात काही फरक आहे का?
२. कायद्यात ज्याला सेक्शुअल अटॅक म्हणतात तो कायदेभंग नाही का?

(व त्या वक्तव्याची पार्श्वभुमी/पुर्वपिठिका काहीही न देता)

३. नक्की कोणती पार्श्वभुमी तुम्हाला हवी आहे? आम्हाला तर पुष्कळ पार्श्वभुमी कळाली.

व्हाट्यावर आणणे हे अत्यंत अनैतिक नाही का? असा प्रश्न मला या निमित्ताने पडला!

४. मी कसा थोर आहे हा दावा जेव्हा एखादा राजकीय उमेदवार करतो तेव्हा तो खोटं बोलत आहे ही माहिती असताना उघडकीस न आणणे अनैतिक नाही का? (नेशन वाँट्स टू नो!)

अमेरिकन मिडीयाला एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याची इतकीही बेसिक पोच नाही बघुन आश्चर्य नाही वाटले,

५. जगातल्या कुठल्या मिडीयाने अशी बातमी छापली नसती? बाकी, हीच बातमी जगातल्या इतर मिडीयाने छापलेली नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

एकुणच अमेरिकन जनता असल्या 'संध्यानंद'छाप गॉसिपीय बातम्यांवरून आपला राष्ट्राध्यक्ष निवडते का

६. ही बातमी संध्यानंदीय आहे? आम्ही पुष्कळ संध्यानंद वाचलेला आहे. त्याती गायी एलियनांनी चोरल्या वगैरे बातम्या असतात जिथे तथ्य अन वास्तव यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. उपरोल्लेखित बातमीततही दोन्हीचा काही संबंध नाही असे तुम्हाला सुचवायचे आहे का?

गोगोल Wed, 12/10/2016 - 20:42

In reply to by Nile

हा प्रतिसाद वाचून अगदीच रहावले नाही म्हणूनः

> १. बोलणे आणि गुन्ह्याची कबुली यात काही फरक आहे का?

मी खाली म्हणल्याप्रमाणे हे लोक्स स्वतःच "जज, ज्युरी आणि एक्झीक्युशनर"आहेत. केवळ यांच्या नैतेकतेच्या व्याखेत काही कल्पना बसत नाही म्हणून ट्रंप लगेच गुन्हेगार. तो जे काही बोलला ते क्लास्लेस असेल, मी स्वतः असे कधी बोलणार नाही, पण माझ्या उपस्थितीत कुणी असे बोलले तर मला त्याने काहीही फरक पडत नाही. एखाद्याला जर एखाद्या गोष्टी बद्दल ब्रॅग करावेसे वाटले तर तो त्याचा वैयक्तिक हक्क आहे. मला फार तर फार अ‍ॅम्युझमेंट वाटेल. वर म्हणल्याप्रमाणे यातील खरा विक्टीम ट्रंप आहे कारण त्याच्या संमती शिवाय ही गोष्ट रेकॉर्ड करण्यात आली आणि लीक करण्यात आली.

बर्याच लोकांना अजून फेमीनाझीज, पांढरे सरदार आणि सोशल जस्टीस वॉरिअर्स यांचे उपद्रव मुल्य लक्षात आलेले नाही. भारतात याची अजून सुरुवात होतेय. हे लोक पॉलिटिक्स मध्ये अगदी मस्त वापरून घेता येतात. यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फक्त गोळी झाडायची.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/10/2016 - 23:53

In reply to by गोगोल

ट्रंप असं आपण होऊन बोललाच नव्हता; बिली बुशने असं बोलण्यासाठी भाग पाडलं; आणि गरीब, बिचारा ट्रंप राजकारणी नसल्यामुळे त्या डावपेचांना बळी पडला; बघा, बघा, मार्को रुबियोसुद्धा त्याच्या बारक्या बोटांबद्दल बोलत होता; अशी थिअरी अजूनपर्यंत कशी आली नाही? ट्रंपसमर्थक नाही, मेल शॉव्हनिस्ट नाही, किमान बोरोवित्झ, द अनियन, ह्यांनी तरी दखल घ्यावी.

बिली बुश अर्थातच असं करणार. कारण बुश कुटुंबीय सुस्थित रिपब्लिकनांचे प्रतिनिधी आहेत. बिली बुशने आपले चुलते आणि चुलत भावंडांसाठी ट्रंपला पिन मारली. (खरंखोटं काहीही असेल, पण ह्या विधानांमधल्या अनाक्रॉनिझममुळेही प्रतिसाद लिहायला नेहेमीच्या दुप्पट वेळ लागला.)

१. क्रॉनि ही अक्षरं आल्यावर गब्बरने कान टवकारू नयेत. अनाक्रॉनिझम म्हणजे कालविसंगती.

---

मला फार दिवस वाट बघायला लागली नाही. खुद्द डॉनल्ड ट्रंपच्या बायकोनेच, मेलानिया ट्रंपने म्हटलं की बिली बुशने डॉनल्ड ट्रंपला असं बोलायला भरीस पाडलं. 'ऐसी अक्षरे' वाचण्याबद्दल मेलानियाचे अनंत आभार. (दुवा) कोणी नकारात्मक श्रेणी दिली होती ह्या प्रतिसादाला; चला माफी मागा बघू!

Nile Wed, 12/10/2016 - 21:16

In reply to by गोगोल

हे लोक्स स्वतःच "जज, ज्युरी आणि एक्झीक्युशनर"आहेत.

तो त्याचा वैयक्तिक हक्क आहे. मला फार तर फार अ‍ॅम्युझमेंट वाटेल. वर म्हणल्याप्रमाणे यातील खरा विक्टीम ट्रंप आहे

इतर लोकांनी काय केलंय अन तुम्ही काय केलंय यात काहीच फरक नाही. फक्त तुमच्या मता विरुद्ध ते असल्याने तुम्ही रडताय इतकंच. चालायचंच. अनेकवेळा तुमच्या मताप्रमाणेही होतच असतं. तेव्हा इतकं मनावर नका घेऊ. डिटर्टे वगैरे आहेत पहा तुमच्यासाठी अजून शिल्लक. उगी उगी.

बर्याच लोकांना अजून फेमीनाझीज, पांढरे सरदार आणि सोशल जस्टीस वॉरिअर्स यांचे उपद्रव मुल्य लक्षात आलेले नाही.

बाकी, ट्रंपला उपरोल्लेखित लोकांचा कधीच सपोर्ट नव्हता. तेव्हा, आत्ताच्या परिस्थितीला त्यांना जबाबदार धरण्याचा कावेबाजपणा घेल्याने तुमचाच खुळेपणा उघड होईल हे विसरू नका. सद्ध्या ट्रंपच्या नाकी नऊ आलेत ते कंझर्व्हेटीव्ह, रिलीजीएस अन एरवी सोशल जस्टीसबद्दल फारशी कदर न करणार्‍या लोकांनी त्याला वार्‍यावर सोडला आहे म्हणून.

गोगोल Wed, 12/10/2016 - 22:19

In reply to by Nile

> उगी उगी.
> तुमचाच खुळेपणा उघड होईल हे विसरू नका.

हा एकंदरीत पॅट्रोनायझिंग टोन का?

बर असो, आम्ही तर खूळे आणि रडके आहोत. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ, बास?

Nile Thu, 13/10/2016 - 00:19

In reply to by गोगोल

बर असो, आम्ही तर खूळे आणि रडके आहोत. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ, बास?

छ्या! ट्रंपची बाजू घेत होतात म्हणून आम्हीपण जरा ट्रंपीय श्टाईल वापरली. निराशा केलीत. असो. (बाकी श्रेष्ठ-कनिष्ठ कुठून आलं यात?)

ऋषिकेश Thu, 13/10/2016 - 14:49

In reply to by Nile

निळ्याने असल्या घाईत लिहिलेल्या प्रतिसादालाही तपशीलवार उत्तर द्यायची तसदी घेतलीये त्यामुळे असे दुर्लक्ष करू इच्छित नाही. त्यामुळे जाहिर उत्तर देतोय. यापुढिल संभाषण व्यनीत करेन.

१. बोलणे आणि गुन्ह्याची कबुली यात काही फरक आहे का?

फरक आहे. पण गुन्ह्याची कबुली नोंदवताना काही विशिष्ट परिस्थितीत ती नोंदवावी लागते.(म्हणूनच तेव्हाच्या पाश्वभुमीचा प्रश्न विचारला होता).

२. कायद्यात ज्याला सेक्शुअल अटॅक म्हणतात तो कायदेभंग नाही का?

कायद्यात ज्याला सेक्शुअल अटॅक म्हणतात तो कायदेभंग आहे. ट्रम्प आपण जे केले असा दावा करून फुशारतो आहे तसे त्याने समोरच्याच्या इच्छेविरुद्ध केले असल्यास तो अटॅक म्हणता यावा.

३. नक्की कोणती पार्श्वभुमी तुम्हाला हवी आहे? आम्हाला तर पुष्कळ पार्श्वभुमी कळाली.

सदर वक्तव्य कोणत्या परिस्थितीत केले गेले? काय माहौल होता? ट्रम्प दारू प्यायला होता का? किती? त्याने इतर कोणते ड्रग्ज घेतले होते का? त्याच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे का? (असल्यास असे बरळणे ही गुन्ह्याची कबुली होऊ शकत नाही)? तो खरे बोलत होता याचे कोणते पुरावे आहेत?

मी कसा थोर आहे हा दावा जेव्हा एखादा राजकीय उमेदवार करतो तेव्हा तो खोटं बोलत आहे ही माहिती असताना उघडकीस न आणणे अनैतिक नाही का?

माझ्या अल्प माहितीप्रमाणे ट्रम्पचे म्हणणे मी थोर आहे असे नसून राजकारणी खोटे मुखवटे लाऊन वावरतात नी मी आहे तसा तुमच्या समोर आहे असा आहे. मी तुमच्यासारखाच एक आहे व तुमच्यातले गुणदोष माझ्यातही आहेत. मात्र मी राजकारण्यांसारखा खोटा मुखवटा घेऊन वावरत नाही असे त्याचे म्हणणे आहे.
सद्य घटना त्याचे म्हणणे उलट पक्के करते असे मला वाटते.

५. जगातल्या कुठल्या मिडीयाने अशी बातमी छापली नसती? बाकी, हीच बातमी जगातल्या इतर मिडीयाने छापलेली नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

निवडणुक अमेरिकेत आहे आणि उमेदवार अमेरिकेचा आहे, हा व्यक्तीसातंत्र्यावर हल्ल आमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल लिहिणार. इतरत्र झाले असते तर त्या बद्दलही लिहिले असते.

ही बातमी संध्यानंदीय आहे? आम्ही पुष्कळ संध्यानंद वाचलेला आहे. त्याती गायी एलियनांनी चोरल्या वगैरे बातम्या असतात जिथे तथ्य अन वास्तव यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. उपरोल्लेखित बातमीततही दोन्हीचा काही संबंध नाही असे तुम्हाला सुचवायचे आहे का?

ह्म्म संध्यानंद हे उदाहरण चुकले असावे. मी काही संध्यानंदचा वाचक नाही. अतिशय खागजी बाबी किंवा माहितीच्या कवडशावरून अख्खी स्टोरी रचणारे जे काही वृत्तपत्र असेल (इंडीया टुडे?) ते संध्यानंद ऐवजी घ्यावे.

=========

माझा मुद्द एवढाच आहे.
ट्रम्पच्या विरोधात इतके मुद्दे असताना राजकारण्यांना (व विरोधकांच्या बाजुने उतरलेल्या वृत्तपत्रांना) त्याच्या वैयक्तिक बाबींवर येऊन प्रचार करावा लागावा हे नक्की कसले लक्षण आहे? (मला तरी राष्ट्राध्यक्षाचा प्रचार या पातळीला येणे -हिलरी क्यांपला साजेसे असले तरी- दुर्दैवी वाटते). या घटनेनंतर सगळे मुरलेले राजकारणी (दोन्ही पक्षातील), तमाम मिडीया त्याच्या विरुद्ध एक झाल्यासारखे चित्र तिर्‍हाईताला दिसते आहे. ट्रम्पसारख्या एका व्यक्तीला हरवायला इतकी ताकद खरंच गरजेची आहे का? असल्यास ट्रम्पने या प्रस्थापितांच्या तोंडाला खरोखर फेस आणला आहे हेच सिद्ध होत नाही का?

भारत किंवा इतर देशांत असे काही झाले तर समजु शकतो. मुळात इथे फार व्यक्तीस्वातंत्र्य जपले जाते असा दावाच नाहीये. तुम्ही चार मित्रांत काय बोलताय (अगदी काहीही) हे ते चार मित्र वगळता अन्यांनी त्यांच्या परवानगीविना रेकॉर्ड करणे/शुट करणे आणि दशकभराने ते उघड करणे हे मला काही पोषक समाजव्यवस्थेचे लक्षण वाटत नाही.

====

जाता जाता:
ब्लॅक मिररमध्ये एक एपिसोड आहे. एका गुन्हेगाराला एका दिवसाच्या घटना रिपिट करण्याची शिक्षा दिली असते. दररोज त्याची मेमरी पुसून पुन्हा तोच दिवस त्याला भोगायला लावले जाते. सदर व्यक्ती ही कायद्याने गुन्हेगार असते. बाकी समुदायाही त्या व्यक्तीसोबत तत्कालीन कायद्याप्रमाणे शिक्षा देत असतो. पण म्हणून समाजाचे ते वागणे नैतिकदृष्ट्या अचुक ठरते असे नाही!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/10/2016 - 02:10

In reply to by ऋषिकेश

माझ्या अल्प माहितीप्रमाणे ट्रम्पचे म्हणणे मी थोर आहे असे नसून ...

(अमेरिकन माध्यमं हिलरीला विकली गेलेली आहेत असं टोकाचं गृहितक धरलं तरीही) पहिल्या डिबेटमध्ये हिलरी म्हणाली, 'ह्याने बहुतेक फेडरल आयकर भरलेलाच नाही'; तेव्हा ट्रंप तिचं बोलणं थांबवून मध्येच 'म्हणजे मी हुशार ठरतो' असं पचकला. 'मी थोर व्यवसाय उभारला', (वडलांकडून आलेल्या भांडवलाचा उल्लेख सरळ टाळून) 'मला माहित्ये पैसे कसे मिळवायचे' वगैरे बोलणारा (प्रथमपुरुषी मीवचनी) माणूस स्वतःला थोर समजत/म्हणवत नाही, असं म्हणणं धारिष्ट्याचं वाटतं. (लोकांना तो राजकारणी नव्हे आपल्यातला वाटतो, ह्यावर माझा काही अंशी विश्वास बसतो.)

---

अमेरिका शस्त्रबळावर जगावर राज्य करते, हे वगळता अमेरिकेकडून उच्च अपेक्षा करण्याचं काही कारण दिसत नाही. अमेरिकी निवडणुकांमध्ये भारतासारखे सडक-बिजली-पानी हे प्रश्न नसतात खरंच, पण नोकऱ्या-सुरक्षितता-भविष्य असे मध्यमवर्गीय भारतीयांना भेडसावणारे प्रश्न असतात. भारतात ह्या वर्गात ज्या प्रकारे गांधी कुटुंब किंवा शशी थरूर ह्यांची चारित्र्यहानी सुरू असते (काँग्रेस-युपीए सत्तेवर असताना होत होती) तोच प्रकार थोड्याबहुत फरकाने अमेरिकेतही चालतो.

सगळी अमेरिकन माध्यमं फक्त ट्रंपच्या मागे लागलेली दिसत असतील तर फेसबुकच्या फीडला नीट शिक्षण देण्याची गरज आहे किंवा आपण होऊन फॉक्ससारख्या माध्यमांकडे वळलं पाहिजे. डाव्या, डावीकडे कललेल्या किंवा ट्रंपकडे राष्ट्राध्यक्ष बनण्याची पत नाही असं समजणाऱ्या माध्यमांपलीकडे माध्यमं अमेरिकेतही आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित माध्यमांना, 'द वॉल स्ट्रीट जर्नल'सारख्या उजवीकडे कल असणाऱ्या माध्यमांनाही, ट्रंप राष्ट्राध्यक्षपदासाठी नालायक वाटत असेल, तर कदाचित त्यांच्या विधानात काही तथ्यही असण्याची शक्यता आहेच. दोन दिवसांपूर्वीच एनबीसीवर चक टॉड म्हणत होता, "हरणाऱ्या उमेदवाराबद्दल चर्चा अधिक होते." ह्या विधानाचा रोख प्रस्थापित आणि नवीन दोन्ही प्रकारच्या माध्यमांकडे होता.

ट्रंपने प्रस्थापित रिपब्लिकनांच्या तोंडाला फेस आणला आहे, अशा चर्चा निदान जेब बुशने प्राथमिक पायरीतून उमेदवारी मागे घेतल्यापासून (फेब्रुवारी २०१६) मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तरीही त्यातलं बातमीमूल्य कमी झालेलं नाही; कारण ट्रंप त्यात रोज काहीबाही भर घालत असतो. अगदी कालच त्याने 'रिपब्लिकन पक्षाची मला गरज नाही' छापाची विधानं करण्यावरूनही गरमागरम चर्चा सुरू होत्या. ह्या बातम्यांमध्ये ब्रेकिंग न्यूज मूल्य उरलेलं नाही.

पण 'ब्लॅक मिरर'च्या ठरावीक भागाची आठवण येणं, ह्या संदर्भात उचित वाटत नाही; त्या भागात सामान्य गुन्हेगाराची फरफट दाखवलेली आहे.

इथे ट्रंप आणि हिलरी आपण होऊन पब्लिक स्क्रूटिनी (मराठी?) करवून घ्यायला रिंगणात उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष बनायचं तर व्यक्तिगत चारित्र्य ते धोरणं ह्या सगळ्यांची स्क्रूटिनी होणारच. 'राष्ट्राध्यक्षा बिनडोक आणि अनैतिक वागणारी व्यक्ती नसावी', अशी अपेक्षा लोकांनी ठेवणं गैर नाही. ह्यात नैतिकता म्हणजे काय ह्याच्या व्याख्या माणसानुसार कमीजास्त प्रमाणात बदलतात. तर त्या कल्पनांवर काही प्रमाणात आक्षेप घेताही येईल; पण अमेरिकेसारख्या धार्मिक आणि सामाजिक न्यायात इतर प्रगत देशांच्या तुलनेत मागे असणाऱ्या देशाकडून फार अपेक्षा ठेवण्यात फार हशील नाही.

---

हा विषय सुरू आहेच म्हणून कालची एक बातमी. (प्रतिसादाचा हा भाग ऋषिकेशच्या प्रतिसादाला उद्देशून नाही.)
काल बातमी होती -
फक्त स्त्रियांनी मतदान केलं तर हिलरी (४५८ वि ८०) जिंकेल. फक्त पुरुषांनीच मतं दिली तर ट्रंप (३५० वि. १८८) जिंकेल. अशी सांख्यिकी प्रसिद्ध झाल्यावर काही काळ 'repeal the 19th' असा हॅशटॅग लोकप्रिय झाला होता; १९ वी घटनादुरुस्ती काढून टाका. ही घटनादुरूस्ती ९६ वर्षांपूर्वी झाली; त्यानुसार १८ वर्षांवरच्या, सर्व सज्ञान स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.

हे असं काही घडणार नाही, ह्याबद्दल निराळी खात्री देण्याची गरज नाही. पण ट्रंप जिंकावा म्हणून काही लोकांना सामाजिक असमानतेचा पुरस्कार करावासा वाटतो; ह्यावरून सामाजिक न्याय ह्या प्रकारात अमेरिका किती प्रगत आहे, ह्याची काही कल्पना यावी. (इच्छापूर्तीसाठी देव पाण्यात घालून बसणारे लोक अधिक प्रगत वाटतील, हे मला स्वतःशी मान्य करावं लागलं.)

ऋषिकेश Fri, 14/10/2016 - 10:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आभार. तुर्तास माहितीपुर्ण अशी श्रेणी देऊन शांत बसत आहे.
ट्रम्प इज नॉट दॅट वर्थ .. पण माझ्या अगदी विरोधी मतांचा तो प्रतिनिधी असला तरी त्याच्याशी असल्या पातळीवर उतरून लढणं मला अनैतिक वाटतं

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/10/2016 - 19:41

In reply to by ऋषिकेश

पातळीचा विचार सोडा, विनोदांसाठी किती कच्चा माल मिळतोय ते पाहा.

हिलरी एकटीच हे करत्ये असं नाही. ट्रंप बिल क्लिंटनची जुनी सिद्धासिद्ध लफड्यांबद्दल बोलतोय. ही टेप त्याच्या नकळत प्रकाशित झाल्ये म्हणून त्याला बळी समजण्याची गरज नाही; त्याने आपण होऊन एका रेडीओ शोवर, 'मिस अमेरिका स्पर्धेच्या वेळेस मी ड्रेसिंग रूममध्ये जात असे. तिथे ह्या सुंदऱ्या नग्न-अर्धनग्न स्थितीत असत. मी त्या पॅजन्टचा मालक असल्यामुळे काहीही केलं तरी खपून जात असे' असं म्हटलेलं आहे. हे रेडीओ शो त्या टेपच्या नंतरच्या काळातले. (काल/आज ट्रंपच्या मुलाने 'मी पण अशा गप्पा मारतो, त्यात काय झालं!' अशी भूमिका घेतलेली आहे. ट्रंपच्या माफीचा काय अर्थ लावायचा?)

काल-परवा अनेक माध्यमांमध्ये अशा अर्थाची विश्लेषणं छापली होती की, ट्रंपने स्वतःच्या लोकांना त्याच्या स्वतःविरोधात संशोधन (oppo-research) करायला मनाई केली. त्याच्या गोटातल्या लोकांना त्याची सगळी लफडी-कुलंगडी समजली असती तर अशा वेळेस उत्तरं तयार ठेवता आली असती.

आणि तिसरं, ही लफडी बाहेर आल्यावरही त्यावर मोजका वेळ घालवून बाकी त्याला महत्त्वाचे वाटणारे मुद्दे, व्यापार, मेक्सिकोच्या सीमेवर भिंत, देशांतर्गत सुरक्षितता, ह्यावर तो फार बोलतच नाहीये. त्याची तयारी नसणं पुन्हापुन्हा दिसून येत आहे. 'मी राजकारणी नाही म्हणून मी सामान्यांचं भलं करेन' हे सांगायला ठीक आहे; असा बिनतयारीचा राष्ट्राध्यक्ष, ज्याला अलेप्पो पडलं का नाही किंवा तिथल्या ह्यूमॅनिटेरियन क्रायसिस (मराठी?) ह्याबद्दल दोन शब्द धड बोलता येत नाही, तो कोणाचं काय भलं करू शकणार!

विषारी, विघातक कँपेन ट्रंपने सुरू केलं; दुसरी बाजूही त्याच प्रकाराने कँपेन चालवत्ये आणि मोठी आघाडी मिळवत आहे. ८ नोव्हेंबरला काहीही झालं तरी विषारीपणा तसाच राहणार.

नितिन थत्ते Fri, 14/10/2016 - 21:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>'मी राजकारणी नाही म्हणून मी सामान्यांचं भलं करेन'

हा हा हा. अण्णा, केजरी, भूषण्स, बेदीबै वगैरे..................

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/10/2016 - 22:37

In reply to by नितिन थत्ते

असं नै बै बोलायचं.

तरीही अण्णा, केजरी, भूषण्स, बेदीबै वगैरेंबद्दल माझं मत ट्रंपएवढं वाईट नाही. कदाचित त्यांना ट्रंपपेक्षा कमी प्रसिद्धी मिळाली असेल किंवा मी त्या बातम्या कमी लक्षपूर्वक वाचल्या असतील म्हणूनही असेल. कदाचित ट्रंप शोबिझमध्ये होता म्हणूनही असेल. हे लोक आपल्या चुका मान्य करण्याइतका मोठेपणा कधीमधी दाखवतात.

अनुप ढेरे Wed, 12/10/2016 - 18:34

काही प्रतिसादात ट्रंपने जे केलं ते कायद्यानुसार अमुक अमुक आहे आणि कायद्यानुसार गुन्हा आहे असा टोन आहे. याविरुद्ध बोलायला कायद्याचा का आधार घ्यावा लागतो. स्वतंत्रपणे, वॉटेवर कायदा मे से, हे जे काही आहे ते निंदनीय आहे असा ष्ट्यांड का नाही घेत?

चिंतातुर जंतू Wed, 12/10/2016 - 18:48

In reply to by अनुप ढेरे

>> याविरुद्ध बोलायला कायद्याचा का आधार घ्यावा लागतो. स्वतंत्रपणे, वॉटेवर कायदा मे से, हे जे काही आहे ते निंदनीय आहे असा ष्ट्यांड का नाही घेत?

ही विशिष्ट घटना तात्पुरती बाजूला ठेवू. 'देशाचा कायदा बेमुर्वतपणे मोडणारा आणि त्याविषयी वृथाभिमान बाळगत फुशारक्या मिरवणारा माणूस तुमचा लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख असावा का?' असा प्रश्न विचारला तर बरेचसे लोक त्याकडे 'हा काय प्रश्न झाला?' असं पाहात असावेत बहुधा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/10/2016 - 05:20

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय

ट्रंपने प्रत्यक्षात बोलल्यासारखं काही केलं का नाही केलं, हे अजून समोर आलेलं नाही. ट्रंपने जी बडबड केली, ते गुन्ह्याचं वर्णन आहे. गुन्हा करणं, (त्याचे निदान काही प्राथमिक पुरावे उघड होणं) आणि गुन्हा केल्याची शेखी मिरवणं ह्या दोन्हींमध्ये फरक आहे.

हे सगळं केलं तेव्हा तो सुकुमार ५९ वर्षांचा होता. आपण जे वर्णन केलं ते प्रत्यक्षात केलं असता गुन्हा असेल, हे त्याला (निदान रविवार रात्रीपर्यंत) आजही समजत नाही. असा पाचपोच नसलेला, कायद्याची प्राथमिक माहिती नसलेला माणूस राष्ट्राध्यक्षपदी असावा का? (आणि निवडणुकीत जिंकलाच तर त्याला हिलरीला तुरुंगात धाडायचं आहे!)

तिसरं, ही अशी बडबड हा गुन्हा समजावा का मानसिक आजार? हा मानसिक आजार नाहीच, असं जोपर्यंत तज्ज्ञ म्हणत नाहीत तोवर ट्रंप मनोरुग्ण आहे, असं मानायची माझी तयारी आहे.

माझा मुख्य मुद्दा - ही बडबड अनारोग्यकारक आहे, किंवा धिक्कार करण्यासारखी आहे, तत्सम काही म्हणताना, घरातल्या आई-बहिणी-बायको-मुली आठवण्याची गरज काय?

---

हा प्रतिसाद मुळात देऊन झाल्यावर साधारण पावणेबारा तासांनंतर अपडेट. वरच्या जंतूच्या प्रतिसादाला निरर्थक श्रेणी दिसत आहे. माझाच धागा असल्यामुळे मला ते सुधारता येत नाहीये. पण मूळ मुद्दा समजून न घेता आणि स्वतः एकही मुद्दा न मांडणारे आणि स्त्रियांना फेमिनाझी, स्लट, वेश्या वगैरे म्हणणारे, प्रतिसाद शिक्षेशिवाय सुटले आहेत, क्वचित 'मार्मिक'ही म्हणवले गेले आहेत आणि काही मुद्दा मांडणारे प्रतिसाद, भले त्यातला मुद्दा पटला नसेलही, 'निरर्थक'. हे बघून 'प्रबोधनाची किती गरज आहे', हे खरोखरच दिसत आहे. श्रेणीव्यवस्थेची गरज काय, तर कोषात राहणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना जमिनीवर आणण्यासाठीही श्रेणीव्यवस्थेची गरज आहे.

अनुप ढेरे Wed, 12/10/2016 - 23:02

In reply to by चिंतातुर जंतू

'हा काय प्रश्न झाला?' असं पाहात असावेत बहुधा.

मेबी याला कारण ट्रंपचा पर्याय असावा. नुकतच कुठशी वाचलं की 'Any half decent democrat would have easily beaten Trump and any half decent republican would have easily beaten Hillary.'

बाकी आम्हा देशी लोकांना हिलरीच बरी असं वाटतय. ट्रंपची आर्थिक धोरणं डेमोक्रॅट आहेत म्हणे ( TPPला विरोध वगैरे) !

@निळे:
घटनेबद्दल बोलताना लोक कायद्याप्रमाणे अमुक अमुक, गुन्ह्याची कबूली वगैरे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे हा गुन्हा टेक्निकल आधारे मांडला जात आहे. ही काहीशी पळवाट आहे. "ट्रंपने अमुक अमुक केलं हे वाईट आहे" या प्रकारची वाक्य डॉमिनंट न दिसता "अहो! त्याने जे केलं हा कायद्याने गुन्हा आहे, कायदेशीरदृष्ट्या त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे" या प्रकारची वाक्य डॉमिनंट दिसत आहेत. हे ट्रंपला केवळ कायदेशीर दृष्ट्या वाईट म्हणणं आहे. त्याने जे केलं ते इंमॉरल आहे असा डायरेक श्ट्यांड उघड दिसला नाही म्हणून प्रतिसाद दिला.

Nile Thu, 13/10/2016 - 00:15

In reply to by अनुप ढेरे

घटनेबद्दल बोलताना लोक कायद्याप्रमाणे अमुक अमुक, गुन्ह्याची कबूली वगैरे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे हा गुन्हा टेक्निकल आधारे मांडला जात आहे. ही काहीशी पळवाट आहे. "ट्रंपने अमुक अमुक केलं हे वाईट आहे" या प्रकारची वाक्य डॉमिनंट न दिसता "अहो! त्याने जे केलं हा कायद्याने गुन्हा आहे, कायदेशीरदृष्ट्या त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे" या प्रकारची वाक्य डॉमिनंट दिसत आहेत. हे ट्रंपला केवळ कायदेशीर दृष्ट्या वाईट म्हणणं आहे. त्याने जे केलं ते इंमॉरल आहे असा डायरेक श्ट्यांड उघड दिसला नाही म्हणून प्रतिसाद दिला.

असं कुठे दिसलं माहित नाही. (ह्या धाग्यावर?) बातम्यांमध्ये, चर्चासत्रांमध्ये (मी किमान २४ तास, गेल्या शुक्रवारपासून, हे टीव्हीवर पाहतोय) हे निंदनीय आहे असाच पहिला स्टँड आहे. विशेषतः रिपब्लिकनांचा. डेमॉक्रॅटिक लोकांचा "अर्थात निंदनीय आहे, पण यात नविन काय?" असा स्टँड आहे.

मात्र, ट्रंप सपोर्टस जेव्हा: "निंदनीय आहे, पण हे असलं तर लॉकर रूममध्ये सगळेच बोलतात. त्यात विशेष काय" असा युक्तिवाद करतात तेव्हा हे कृत्य (जे त्याने मी असं करतो अशी कबुली दिली आहे) कायद्याने सेक्शुअल असॉल्ट आहे असं उत्तर रिपब्लिकन अन बातमीदार्/होस्ट लोकांनी दिलेलं दिसतं.

Nile Wed, 12/10/2016 - 20:10

In reply to by अनुप ढेरे

स्वतंत्रपणे, वॉटेवर कायदा मे से, हे जे काही आहे ते निंदनीय आहे असा ष्ट्यांड का नाही घेत?

गुन्हा आहे पण निंदनीय नाही असं कोणी म्हणलंय का? ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड.

राजेश घासकडवी Wed, 12/10/2016 - 23:39

चर्चा ट्रंपने केलं ते बरोबर की नाही, सगळेच पुरुष असं करतात की, काही बायकांच्याही अशा फॅंटस्या असतात, आणि हिलरी काही स्वतः दूध की धुली नाही वगैरे मुद्द्यांवर चालू आहे. ते मूळ चर्चाप्रस्तावासाठी बऱ्यापैकी अवांतर आहे.

मला वाटतं अदितीला मांडायचा मुद्दा हा जास्त सटल आहे. ट्रंप दोषी आहे की नाही, त्याच्या विधानांचा धिक्कार करायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवावं. ज्यांनी त्याच्या विधानांचा/वर्तणुकीचा धिक्कार केला त्यांना तो धिक्कार करताना आपल्या आयाबहिणी का मध्ये आणण्याची गरज पडते हा खरा प्रश्न आहे. म्हणजे वाईट गोष्ट ही वाईट गोष्ट हे माणूसकीच्या दृष्टिकोनातून समजायला हवं. जर मला कुठच्या हीन विधानाचा धिक्कार करायचा असेल तर त्यासाठी माझ्या घरी त्या विधानाने दुःखी होऊ शकणारी व्यक्ती असण्याची गरज नाही. गे, दलित वगैरे उदाहरणं अदितीने दिलेलीच आहेत.

अदिती, मला वाटतं रिपब्लिकन नेत्यांना धिक्कार करतानाही काहीशी अपोलेजिटिक भूमिका घ्यावी लागते कारण ट्रंपचे सपोर्टर हे त्यांचेही सपोर्टर आहेत. म्हणून त्यांच्या धिक्कारातही 'तसं म्हणायचं तर माझा स्वतःचा असल्या विधानांना फारसा विरोध नाही. मी पुरुष आहे आणि मलाही माहिती आहे की आपण सगळेच पुरुष असलं काही ना काही, कधीतरी बोलतोच, नैका? पण आता माझ्या घरच्या आयाबहिणींना हे असं काही ऐकावं लागणं मला कसं चालवून घेता येणार, तुम्हीच सांगा.' अशा प्रकारचं पुरुषप्रधान, स्त्रियांच्या नाजूक मनाला जपण्याची भूमिका बजावणाऱ्या तर्कशास्त्राचं सबटेक्स्ट आहे.

हर्षच Thu, 13/10/2016 - 02:05

In reply to by राजेश घासकडवी

घरी आमच्या मुली, बायका, बहिणी, आया आहेत. 'मी ट्रंपला मत दिलं', असं मी ह्या स्त्री-नातवाईकांच्या डोळ्यांत बघून कसं सांगू

ट्रंप च्या त्या विधानाचा लोकांना निषेधच करायचा असेल पण जेव्हा आपण ज्या समुदायाचा अपमान केला त्यांच्या समोर जानार तेव्हा अपराधिपणाची भावना जास्त तिव्रतेने जाणवनार, बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना अस माझ्या छोट्या बुद्धिच मत. त्यातही आम्ही ट्रंपला मत दिलं म्हंजे त्या विधानाचा सपोर्ट करतो आणि आमचहि तेच मत आहे असा विचार आयाबहिणी करनार अशी भिती असावी. ह्या वरुन एक किस्सा आठवला लहानपनी महिला महाविद्यालया करता देणगी मागायला काही लोकं घरि आले होते तर त्यांचा मुख्य मुद्दा असा होता कि तुमच्या घरात आज मुली नसल्यातरी उद्या नाती/मुलि/सुना येतिल आणि त्यांच्यासाठि आपण आजच योगदान दिलं पाहिजे.

अवांतर: तसंहि ऐन निवडनुकिच्या वेळा कसं काय बर सगळे विडिओ लिक होता आहेत रोज काय माहिति, ह्या गळक्या पाईपलाईन मध्ये येत पाणि(विडिओ) कुठुन असाव बरं?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/10/2016 - 05:14

In reply to by हर्षच

अखेर १०० प्रतिसाद धारातीर्थी पडल्यावर, २४ तास उबवून आपण मुद्द्यावर आलो तर! हुश्श!!

ज्यांना लाज वाटते, त्यांचा अपमान होतो. ट्रंपच्या ह्या उद्गारांमुळे कोणाला लाज वाटली पाहिजे? जे लोक ट्रंपसारखे आहेत, असं ज्यांना स्वतःला वाटतं. टॉम हँक्सला असं वाटतं कारण तो एक पुरुष आहे. ओबामाला एक माणूस म्हणून ट्रंपच्या बडबडीची लाज वाटते.
Tom Hanks Explains Why Donald Trump Shouldn’t Be President With One Simple Analogy

“He was at work, man. He wasn’t in a locker room. He was at work. He was showing up to do a thing on camera,” Hanks told the Press Association during an interview for his new movie. “Look... I’m offended as a man. I’m not offended as a husband or a father. I’m offended as a guy.”

ओबामाच्या बातमीचा दुवा

“You don’t have to be a husband or a father to hear what we heard just a few days ago and say, ‘That’s not right,’” Obama said. “You just have to be a decent human being to say that’s not right.”

ट्रंपच्या ह्या बडबडीमुळे माझा, कोणत्याही स्त्रीचा काहीही अपमान होत नाही. Because I do not and will never identify myself with Trump. 'प्रथमपुरुषी मीवचनी' माणसाशी माझा काहीही संबंध नाही. मला किंवा कोणत्याही स्त्रीला त्याच्या वर्तनाची लाज का वाटावी?

ह्या रिपब्लिकन नेत्यांची बडबड ही 'स्लट-शेमिंग'ची दुसरी बाजू आहे. 'बायका नाजूक असतात, त्या देवी असतात, त्या आपल्या मालकीच्या (वस्तू) असतात, त्यांचं रक्षण केलं पाहिजे.' बरं, त्यातही बायकांचं रक्षण केलं पाहिजे तर ते फक्त घरच्या बायकांचंच. नात्यातल्या नसलेल्या बायांचं काहीही का होईना! त्यांना काय त्याचं पडलं आहे! आणि हे म्हणे सगळ्यांचे नेते, घरच्या, बाहेरच्या, पुरुष आणि स्त्रियांचे नेते. ह्या लोकांना लाज वाटताना 'माझ्या मतदारसंघातल्या, राज्यातल्या, सोबत काम करणाऱ्या स्त्रियांना मी काय सांगू', इतपत व्यापक दृष्टीकोनही नाही.

अतिशहाणा Fri, 14/10/2016 - 20:23

Trump allegedly admits to kissing and touching women against their will. But on the same recording Trump clearly says, “When you’re a celebrity, they let you do anything.” The word “let” implies permission, verbal or otherwise. Therefore it is not true that Trump confessed on the tape to sexual abuse. (It is a separate question whether Trump did inappropriate things. Here I’m only talking about the rumor that he admitted inappropriate actions on the leaked tape.)

असो.

बाकी ट्रंप शो बिझनेसमध्ये होता. तिथं ह्या भानगडी चालतात ब्वॉ. रिचर्ड गिअरने शिल्पा शेट्टीचा मुका तिला विचारुन घेतला होता का?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/10/2016 - 22:42

In reply to by अतिशहाणा

“When you’re a celebrity, they let you do anything.”

ट्रंपने त्याच्या पदाचा गैरवापर करून स्त्रियांशी गैरवर्तन केल्याचे आरोप आता काही स्त्रिया करत आहेत. ते आरोप खरे का खोटे हा मुद्दा निराळा. जर त्या सांगत आहेत तो घटनाक्रम घडला असेल तर ह्या प्रकाराला त्यांची परवानगी नव्हती, हे स्पष्ट आहे. त्यांनी असं वर्तन करू दिलं, पण ते त्यांना नको असेल तर त्या ब्लॅकमेल झाल्या.

दुसरं उदाहरण, वरच्या एका प्रतिसादात मेरी बेअर्डचं दिलेलं आहे. (संदर्भ; अधोरेखन माझं) -

In 2000, Beard wrote a scathing column about “A Natural History of Rape,” by Randy Thornhill and Craig Palmer, for the L.R.B. Her essay included an account of being raped in 1978, while she was travelling through Italy as a graduate student. She was waiting for a train in a station bar in Milan when she met an architect on his way to a site outside Naples. He offered to help upgrade her ticket from a seat to a sleeping car. It was not until they were alone in the train compartment that she discovered the architect was not merely being kind, and that she was entirely vulnerable in the face of his intentions: “With two heavy cases and a backpack I couldn’t make a dash for it.” She continued, “He bundled me in, took off my clothes and had sex, before departing to the upper bunk.” Later, she awoke to find him repeating the activity. “Even now, more than twenty years later, I can still rage at the memory of waking up to find him doing it again,” Beard wrote.

The essay was a blunt announcement of a previously private experience. “To all intents and purposes, this was rape,” she wrote. “I did not want to have sex with the man and had certainly not given consent. If I appeared compliant, it was because I had no option: I was in a foreign city, with enough of the local language to ask directions to the cathedral maybe, but not to search out a reliable protector and explain convincingly what was happening.” But the account was also a subtle analysis of the event and its subsequent reverberations. Her experience was “relatively harmless,” she wrote—she was coerced, but not forced. Beard did not report the assault, and the next day she told her friends that she had been “picked up.” Over the years, she explained, her understanding of what happened had slid between “rape” and “seduction.” She had even found herself “making sense of the incident as a much more emphatically willed part of my sexual history: the perfect degree-zero sexual encounter between complete strangers.”

The difficulty of knowing how to talk about rape is not limited to those who have experienced it, she wrote. It is an enduring cultural problem, one that was familiar to Roman authors, who had to contend with their city’s being founded on a large-scale program of sexual violence—the rape of the Sabine women. “Rape is always a (contested) story, as well as an event,” Beard wrote. “It is in the telling of rape-as-story, in its different versions, its shifting nuances, that cultures have always debated most intensely some of the most unfathomable conflicts of sexual relations and sexual identity.”

अतिशहाणा Fri, 14/10/2016 - 23:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जर त्या सांगत आहेत तो घटनाक्रम घडला असेल तर ह्या प्रकाराला त्यांची परवानगी नव्हती, हे स्पष्ट आहे. त्यांनी असं वर्तन करू दिलं, पण ते त्यांना नको असेल तर त्या ब्लॅकमेल झाल्या.

इतकं सरळ असेल असं वाटत नाही. त्यावेळी ट्रंप जे काही करतोय त्याला (विरोध न करुन अप्रत्यक्ष) परवानगी दिली असेल. पण नंतर त्या घटनेचा हवा तसा फायदा झाला नाही त्यामुळे आता हिलरीकडून फायदा उकळून पाहू असंही असू शकतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/10/2016 - 00:23

In reply to by अतिशहाणा

आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन नग्न-अर्धनग्न, अज्ञान-सज्ञान स्त्रियांच्या ड्रेसिंग रूममध्ये शिरणाऱ्या आणि त्याबद्दल आपण होऊन, वेळोवेळी शेखी मिरवणाऱ्या पुरुषाच्या वर्तनाबद्दल शंका उपस्थित करणं सहजसोपं आहे.

ह्या सगळ्या चर्चांमध्ये लैंगिक गुन्हांचं सरलीकरण होतं आहे; पण काळ सोकावल्याचं दुःख कोणाला!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/10/2016 - 01:21

In reply to by .शुचि

गेल्या काही तासांमधल्या ताज्या बातम्या. बचावासाठी अशा गोष्टी बोलवून घेणाऱ्या माणसाच्या वर्तन शुद्ध-शुभ्र असेल, खरंच?
Donald Trump Jr: Women Who Can’t ‘Handle’ Harassment ‘Don’t Belong In The Workforce’

ह्या स्त्रीच्या तक्रारीत तथ्य असेल तर तिला 'पैसापिपासू वेश्या' असेल असं म्हणणं थोडं कठीण होईल, नाही का?
New Trump Accuser Says He Fondled Her In A Nightclub

हा आरोप खरा असेल तर हिच्या बाबतीत ट्रंपने स्वतःच्या पदाचा दुरूपयोग केला नाही असं कसं म्हणायचं?
Former ‘Apprentice’ Contestant Says Trump Assaulted Her In A Hotel Room

---

ह्यात खऱ्या-खोट्यापेक्षा, लैंगिक छळ म्हणजे नक्की काय, ह्याबद्दल चर्चा करणं अपेक्षित आहे म्हणून लिंका डकवल्या. फक्त 'निर्भया' किंवा कोपर्डी म्हणजे लैंगिक छळ नव्हे.

.शुचि Sat, 15/10/2016 - 01:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डोनाल्ड ज्युनिअर हा तर सिनीअरपेक्षाही बथ्थड दिसतोय.
___
निर्भया/कोपर्डी ही टोकाची उदाहरणे आहेत बाकी भारतात तर लैंगिक विकृतीचे विश्वरुप दर्शन घडतच असते.
(१) हावभाव
(२) अक्चुअल ग्रोपिंग
(३) छातीकडे टक लाउन पहाणे हे अगदी ऑफिसतही
(४) फ्लॅशिंग
(५) सेलेफोनवर बोलत असल्याच्या बहाण्याने स्त्रियांना अर्वाच्य मागण्या/विचार ऐकवणे

साल्यांचा कापुन टाकावासा वाटतो :( स्पेशली लहान मुलींना छळणार्‍यांचा.
____
अगं पण अदिती तुला कळत कसं नाही, अप्रत्यक्ष संमतीशिवाय (whatever that means) हे घडूच शकत नाही. :(

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/10/2016 - 01:59

In reply to by .शुचि

संमती कोण देऊ शकतं? कुठल्या परिस्थितीत देऊ शकतं? आपली नोकरी, जीव, सामाजिक प्रतिष्ठा अशा कोणत्या बाबींसाठी जी व्यक्ती ब्लॅकमेल होऊ शकते ती व्यक्ती ब्लॅकमेलरला संमती देत असेल, तरीही ती गृहित धरू नये. संमती देणारे-घेणारे सामाजिक स्तरात एकाच पातळीत असणं आवश्यक आहे. नाही तर तो लैंगिक छळ ठरू शकतो.

अचानक कोणीतरी लैंगिक कृती केल्या, आपल्याला स्पर्श केला तर काय करावं हे बऱ्याच लोकांना समजत नाही. म्हणून ते लोक काही प्रतिकार करत नाहीत. ही संमती नाही.

.शुचि Sat, 15/10/2016 - 02:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी हे नाकारत नाही की काही बायका मुद्दाम नफा काढायला बघत असतील आणि ते अत्यंत हीन आहे. पण डोनाल्ड ट्रंप हा सुद्धा गैरफायदा घेतच नसेल असे म्हणता येत नाही. तेव्हा .... खरं काय खोटं काय हे न्यायालयात सिद्ध होऊनच जाऊ देत आणि मग त्यात खोटं बोलणार्‍या ट्रंप अथवा बाई कोणालाही शिक्षा ही व्हावी.
___
जाऊ दे ट्रंप हा प्लेसहोल्डर हा "हिट & रन" करणारे अनेक लोक उजळ माथ्याने वावरतायतच की. स्वतःला स्ट्रॉन्ग बनविणे याव्यतिरिक्त काहीही उपाय नसतो. लहान मुलांना लवकरात लवकर शिक्षण देणे हाच एक मार्ग. Prevention is better than cure. भले पर्‍यांच्या गोष्टी चुकुन सांगायला विसरा, पण हे सांगायला विसरलात की ब्वॉ जगात विकृत लोक आहेत आणि आपला बचाव कसा करायचा तर तो आआईवडीलांचा अक्षम्य अपराध आहे. एक लेख आहे ऐसीवर या विषयाचा तो शोधते आहे. इथे लिंक देईन.
___
भय इथले संपत नाही - हा तो अस्वस्थ करणारा लेख.
____
अजुन एक अदिती - त्या बायकांना २ च चॉइस होते - Give in to Trump's lwed demands किंवा Walk away even if it means jeopardizing their own career.
त्यात त्यांनी जर जाणून बुजुन पहीला मार्ग स्वीकारला असेल तर चूक कोणाची? त्यांची की ट्रंपची? हे मी तुला जेन्युइन विचारतेय. मला इथे संभ्रम्/गोंधळ आहे. तुझ्याकडेही उत्तर असेलच असे नाही.मला वाटतं चूकी ही ट्रंपची आणि ती जी शिक्षा त्याला तेव्हा होऊ शकली नाही ती आत्ता झाली तर टाळ्यापीटणारे बरेच असतील.
पण तो सापडला गं असे न सापडलेले कित्येक असतीलच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/10/2016 - 04:44

In reply to by .शुचि

ह्या प्रतिसादाला मुद्देसूद उत्तर देणं इथे खूप अवांतर आहे. पण थोडक्यात दुसराच मुद्दा सांगायचा तर -

'बॅड फेमिनिस्ट' नावाच्या पुस्तकात, रोक्झॅन गे काहीसं असं म्हणते की, काही स्त्रियांना स्त्रीवाद अजिबात मान्य नसतो. पण तरीही स्त्रीवादामुळे त्यांना जे फायदे होऊ शकतात ते सगळे त्यांना मिळावेत ह्यासाठी मी प्रयत्न करेन. कारण त्या स्त्रीवादी नसल्या तरीही मी स्त्रीवादी आहे.

मला व्यक्तिगत प्रतिसाद द्यायला आवडत नाही; पण तुझ्याबद्दल मी हेच म्हणेन.

Nile Sat, 15/10/2016 - 21:32

In reply to by अतिशहाणा

rump allegedly admits to kissing and touching women against their will. But on the same recording Trump clearly says, “When you’re a celebrity, they let you do anything.” The word “let” implies permission, verbal or otherwise. Therefore it is not true that Trump confessed on the tape to sexual abuse. (It is a separate question whether Trump did inappropriate things. Here I’m only talking about the rumor that he admitted inappropriate actions on the leaked tape.)

काहीही. The "let" you do anything could very well mean, he thinks they let him do it. Did they really give any sort of permission is still up for debate. त्याचा नार्सिसीस्टीकपणा पाहता, हा त्याने काढलेला सोयीस्कर अर्थ आहे. Now, if you are arguing, he somehow got a permission to "grab pussy", would you care to enlighten how this process works,Verbal or otherwise? If it's verbal, then it would be clear and he can admit he asked a verbal permission to grab pussy, among other things. As far as I know, there is no non verbal code for grabbing pussy. (I say this, because, there are non verbal codes/mannerisms to know if the person in front of you is ok for kissing or not.)

हे आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावणारे, आणि, पुराव्याशिवाय, ज्यांनी आरोप केले आहेत त्यांचे दावे खोटे आहेत असे मानणारे लोक हास्यास्पद आहेत. ज्या व्यक्तीला भरपूर किसेस आणी पुसी ग्रँबिग करायला मिळते, तो "I just start kissing them. Grab pussy" अशी भाषा कशाला वापरेल? किंवा अशी भाषा या पुर्वी कोणी वापरली आहे का?

शिल्पा शेट्टी: तिने रिचर्ड गिअरवर जर असा आरोप केला तर आमचा तिला पाठींबाच असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/10/2016 - 21:39

In reply to by Nile

सदस्य निळे ह्यांना माझ्याकडून पाच मार्मिक.

प्रमाणित करण्यात येते की हा प्रतिसाद लिहिण्याबद्दल त्यांना ऐसीवरून बॅन केलं जाणार नाही.

अतिशहाणा Thu, 20/10/2016 - 19:16

In reply to by Nile

शिल्पा शेट्टी: तिने रिचर्ड गिअरवर जर असा आरोप केला तर आमचा तिला पाठींबाच असेल.

एक्झॅक्टली. आणि रिचर्ड गिअरच्या मुक्याला ती घटना घडली तेव्हा हसतहसत सकारात्मक प्रतिसाद देऊन नंतर १० वर्षांनी त्याने केलं तो लैंगिक अत्याचार होता असा दावा करणारी शिल्पा शेट्टी ही दांभिकच असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 20/10/2016 - 19:56

In reply to by अतिशहाणा

पण आता पुढे आलेल्या ह्या नऊ स्त्रियांपैकी कुणी तेव्हा त्याला हसतहसत, सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती कधी आणि कुठे छापली आहे?

गब्बर सिंग Thu, 20/10/2016 - 20:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण आता पुढे आलेल्या ह्या नऊ स्त्रियांपैकी कुणी तेव्हा त्याला हसतहसत, सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती कधी आणि कुठे छापली आहे?

अगदी.

आमच्या इथे एकाने असा युक्तीवाद केला की "आत्ताच का ?" त्यावेळी ते प्रकरण घेऊन कोर्टात का गेला नाहीत ? आत्ता तो राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीस उभा आहे म्हणून तुम्ही पुढे का येताय ?

उत्तर हे की त्यावेळी त्याला (ट्रंप) बार्गेनिंग पॉवर होती. कारण त्यातल्या अनेकींचा तो एम्प्लॉयर होता. आज त्या मुलींना/स्त्रियांना बार्गेनिंग पॉवर आहे कारण त्या मुलीं/स्त्रिया मतदार आहेतच (व त्यावेळीही होत्या) पण शिवाय्/जोडीला पब्लिक पर्सेप्शन reshape करण्याच्या स्थितीत आहेतच. टायमिंग हे त्यावेळी त्यांच्या बाजूचे नव्हते कारण त्यांना जॉब ची गरज होती (तो एम्प्लॉयर होता). आज तेवढी नसेलही. राजकारणात टायमिंग महत्वाचे असते असं म्हणतात. मग आज ते त्या ९ स्त्रियांच्या बाजूचे असताना त्यांना त्याचा उपयोग का करता येऊन नये ?

अतिशहाणा Thu, 20/10/2016 - 20:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नऊ स्त्रियांपैकी कोणी त्याला त्यावेळी विरोध केल्याचे तत्कालीन बातम्यांत आलेले दिसले नाही. आम्ही त्याला त्यावेळी विरोध केला होता असे आता म्हणत आहेत.

Nile Thu, 20/10/2016 - 21:10

In reply to by अतिशहाणा

१. शिल्पा शेट्टी प्रकरण जाहीर घडलं. त्यामुळे तिची प्रतिक्रीया जाहीर आहे. त्यामुळे, तिने जर आज काही दावे केले तर ते त्यासंदर्भाने 'जज' केले जाऊ शकतात.
२. त्या स्त्रियांनी काय केलं हे तुम्हाला माहीत आहे का? एका स्त्रीने ती विमानतली सीट सोडून गेल्याचं सांगितलं आहे. दुसरीने त्याला दूर लोटल्याचं सांगीतलेलं आहे. तेव्हाही हे घटना घड्ल्याचं इतरांना सांगितलेलं वॉपो (?), एनवायटीनं तपासलं आहे. (आणि हो, घटना घडल्याचं किळसवाणं म्हणून सांगितलं हे आधीच सांगतो. नाही, तुम्ही लगेच म्हणायचात अभिमानाने सांगितलं नसेल कशावरून म्हणून) हे तुमच्यात 'आमंत्रण' आहे असं समजायचं का सोयीस्कर डोळेझाक? का हेच ते तुमचं 'दे लेट ही डू इट' मधलं 'लेट'?

असो. तुमच्यासारखे वाट्टेल ते तर्क करणारे लै आहेत. किती पालथ्या घड्यांवर पाणी ओतणार आम्ही? तेव्हा, असो. चालूद्या तुमचं ट्रंपपुराण.

राजेश घासकडवी Thu, 20/10/2016 - 22:14

In reply to by अतिशहाणा

अशा अनेक गोष्टी असतात ज्या गुन्हा आहे/गुन्हा नाही यांच्या सीमारेषेवर असतात. गुन्हा असलेल्या प्रत्येक गोष्टीची पोलिसात तक्रार कोणी करत नाही. कदाचित करायला हवी, पण ती करून नक्की फायदा काय होणार असा प्रश्न असतो. रस्ता क्रॉस करताना सिग्नलला न थांबणारं वाहन अचानक अंगावर येण्याचा अनुभव आपल्याला प्रत्येकाला आलेला असतो. हा ड्रायव्हरचा गुन्हा आहे. अशा प्रत्येक बाबतीत आपण प्रत्येकाने तक्रार करावी का? हो. केली जाते का? नाही.

मात्र कोणी ड्रायव्हर जर तोंड वर करून म्हणाला की मी सिग्नल वगैरे बिलकुल पाळत नाही. साला, हा अमुकअमुक झेंडा असेल तर बिनधास लोक सिग्नल तोडू देतात. आणि नंतर त्याने म्हटलं छे, छे, मी हे गमतीने म्हणालो होतो. आता जर दहा लोकांना त्याच्या अशा बेमुर्वतखोर वर्तनाचा अनुभव असेल तर त्यांनी काय करावं? 'मला अनुभव आहे, त्याने माझ्या अंगावर गाडी घातली होती. सुदैवाने मला फक्त खरचटलं म्हणून मी सोडून दिलं.' 'माझ्या अंगावर त्याने गाडी घातली, मी दचकून मागे झालो आणि हातातली पिशवी पडून बाटली फुटली.' असे अनुभव सांगण्याची गरज पडते. त्यावेळी तुम्ही पोलिसात का गेला नाही? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच - हा माणूस खोटं बोलत राष्ट्राचा पंतप्रधान होणार आहे असं माहीत असतं तर केलीही असती. पण तत्कालिक बातमी अर्थातच सापडणार नाही.

शेवटी प्रश्न असा येतो की तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? सातत्याने खोटं बोलणाऱ्या, प्रचंड आक्रमक पुरुषी वर्तणुक आणि वाक्ताडन करणाऱ्या ट्रंपवर की या स्वतंत्रपणे पुढे आलेल्या बायकांवर? या बायकांना पुढे आणण्यात क्लिंटन कॅंपेनचा हात असला तरीही मी ट्रंपवर विश्वास ठेवणं जन्मात शक्य नाही. तुम्ही ठेवायचा की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा.

अतिशहाणा Thu, 20/10/2016 - 22:49

In reply to by राजेश घासकडवी

मी कुणावर विश्वास ठेवणार याने निवडणुकीत काडीचाही फरक पडत नाही. मात्र

शेवटी प्रश्न असा येतो की तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? सातत्याने खोटं बोलणाऱ्या, प्रचंड आक्रमक वर्तणुक आणि वाक्ताडन करणाऱ्या

हे वाक्य दोन्ही उमेदवारांना लागू पडते. किंबहुना सातत्याने खोटं बोलणे हा गुणधर्म कुठल्या उमेदवाराला जास्त लागू पडतो हे उघड गुपित आहे. गोपनीय माहिती हलगर्जीपणाने हाताळणारी व्यक्ती एखाद्या देशाच्या सर्वोच्च पदावर असणे योग्य की आक्रमक वागणूक असणारी योग्य हा निर्णय त्या देशाच्या नागरिकांनीच घ्यायचा आहे.

अनु राव Fri, 21/10/2016 - 09:31

In reply to by राजेश घासकडवी

हा माणूस खोटं बोलत राष्ट्राचा पंतप्रधान होणार आहे असं माहीत असतं तर केलीही असती. पण तत्कालिक बातमी अर्थातच सापडणार नाही

अहो राष्ट्राध्यक्ष असताना हे सर्व प्रकार करणारा आणि वर शपथ घेउन खोटे बोलणारा नरपूगव चेटकीणीचा नवरा आहे.
राष्ट्राध्यक्ष असताना खोटे बोलला तरी कोणाला काही विशेष वाटले नाही. वर तो जी काही मजा मारत होता ती जनतेच्या पैश्यावर होती.

त्याला काय शिक्षा झाली? आणि चेटकीणीनी त्याला शिक्षा व्हावी अशी कधी इच्छा तरी व्यक्त केली का?

अतिशहाणा Thu, 20/10/2016 - 19:19

In reply to by मिलिन्द

This "let" means "shut up in presence of overwhelming power", "ignore', etc. etc., and does not remotely imply "consent".

अच्छा म्हणजे तेव्हा फक्त पैशाच्या जोरावर काहीही करणाऱ्या ट्रंपची भीती वाटत होती आता मात्र पैशासकट काही बंदुकधारी यडचाप लोकांचा पाठिंबा असलेल्या ट्रंपची भीती वाटत नाही. असं काही आहे का?

.शुचि Thu, 20/10/2016 - 22:39

मग काय ठरलं अतिशहाणा कोणाला मत देणारेत? ;)
तुमच्या एका मतावर अमेरीकेचे भवितव्य अवलंबुन आहे अतिशहाणा. का तुम्हीही ट्रंपने ऐसीवर पेरुन ठेवलेला माणुस आहात? =))

बॅटमॅन Thu, 20/10/2016 - 22:44

In reply to by .शुचि

कारण आता थोरले साहेब ट्रंपला भेटणारेत म्हणे. त्यामुळे पूर्वानुभव पाहता ट्रम्पोबा पडेल बहुधा.

अनु राव Fri, 21/10/2016 - 10:08

In reply to by बॅटमॅन

ट्रंप पडणार हे पहिल्यापासुनच नक्की होते ना.
ज्या लोकांनी ओबामाला निवडुन दिले ती ८ वर्षाइतक्या छोट्या काळात थोडीच शहाणी होणारेत?

अनुप ढेरे Fri, 21/10/2016 - 10:05

In reply to by अतिशहाणा

काँग्रेसची सद्य स्थिती पहाता स्वतः राहूल गांधी काही दिवसात भाजपामध्ये आले तरी आश्चर्य वाटणार नाही. :)

अनु राव Fri, 21/10/2016 - 10:09

In reply to by अनुप ढेरे

रागा ला हसु नका लोकहो. रागा राजकारणात आहेत म्हणुन मोदींना सत्ता मिळालीय.

रागांनी राजकारण सन्यास घेतला तर मोदींना कोण आणि का मत देइल?