चंद्रावरची ती..अन्..जमिनीवरचा तो.

ती चंद्रावरची..
अन् तो जमिनीवरचा..
तरीही.. नजर भिडावी..
काळोखाची रात्र चंद्रकिरणांनी संपवावी..

दोघांमधल्या घनांनाही मग इर्षा व्हावी...
भरपावसात दोघांच्या ह्रदयघरी ही वीज पडावी..

अंतर पाहुन चंद्रालाही मग जमिन दुर व्हावी ..
जमिनीवर मात्र एकतर्फी ही प्रीत बहरावी..
जमिनीवरच्याने चंद्रावरती मग नजर धरावी..
पण चंद्राची कक्षा चंद्रानेच ठरवावी..

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life