ब्रिटिशांनी भारतातून काय नेलं?

"ब्रिटिशांनी भारतातून काहीतरी नेलं" या axiom वर सर्वमान्यता आहे. पण आत घुसायला लागलं, की फाटे फुटायला लागतात. यातला "भारतातून" म्हणजे नक्की कुठून हा बॅट्याचा विषय आहे, आणि त्याबद्दल त्याने कुठेतरी लिहिलंही आहे.

बाकीच्याबद्दल लिहितो.

काहीतरी मध्ये दोन गोष्टी येतात. पैसे/संपत्ती/जडजवाहीर (cash and cash equivalents, easily convertible assets) आणि संसाधनं (resources). त्यातल्या पैशाच्या लुटीचं इतकं काही वाटत नाही, कारण मुळातल्या श्रीमंतांना, राजेरजवाड्यांना लुटूनच ती संपत्ती मिळवलेली होती. त्यांनी - इन टर्न - रयतेला नाडून ती मिळवली होती.

संसाधनांची लूट मात्र खतरनाक होती. नीळ, मसाले वगैरे कमी किमतीत नेऊन इंग्लंडमध्ये जास्त किमतीत विकणे, वगैरे तर होतंच, पण तीन गोष्टींचा विशेष उल्लेख केला पाहिजे.

(१) चीनबरोबर केलेल्या अफूच्या व्यापारामध्ये ब्रिटिशांनी भारताचा उपयोग कच्चा माल सप्लाय करण्यासाठी केला. बिझिनेस टर्मिनॉलॉजी वापरायची तर अफूच्या व्यापाराचे principal / headquarters इंग्लंडमध्ये होतं, manufacturer भारतात होता, distributor हाँग काँगमध्ये होता, आणि consumer चीनमध्ये होता. नीमच, गाजीपूर वगैरे भागात अजूनही चिक्कार अफीम पिकवतात. भारतातली सरकारी अफू फॅक्टरी गाजीपूरला आहे. यातला दु:खाचा भाग म्हणजे आधी पिकवत असलेली पारंपरिक पिकं थांबवून शेतकर्‍यांना अफीम पिकवायला जवळजवळ भाग पाडलं गेलं. आणि तेही अशा रितीने की त्या दुष्टचक्रातून तो शेतकरी कधी बाहेरच पडू नये.

(२) भारतातला कापूस मँचेस्टरला नेऊन त्यापासून बनवलेलं कापड भारतात विकणे हा वसाहतीकरणाचा आणि शोषणाचा मास्टरस्ट्रोक वाटला तरी वस्तुस्थिती तशी नाही. मँचेस्टर गिरण्यांना कपाशीचा मुख्य पुरवठा अमेरिकेतून होत असे - अलाबामा, टेनेसी वगैरे राज्यं - ज्यांना डीप साऊथ म्हणतात तिथून. जर अटलांटिकमध्ये काही अडथळा निर्माण झाला (उदा० महायुद्धं) तरच भारतातल्या कापसाला मागणी वाढत असे. आणि तसंही - कापड काही luxury goods मध्ये मोडत नाही. किमतीचं प्रेशर कायम असणारच. अशा वेळेला कच्चा माल भारत - उत्पादन इंग्लंड - विक्री भारत अशी लंबी सप्लाय चेन असण्यापेक्षा भारत-भारत-भारत अशी सप्लाय चेन असणं चांगलं. भारतात कापड गिरण्या उभ्या रहायचं कारण हेच आहे. हे काँपिटिटिव्ह अ‍ॅडव्हांटेज इंग्लंडकडून लवकर हिसकावलं गेलं. (भारतातल्या पहिल्या गिरणीकामगार संपाचा उल्लेख काहीतरी १८९१चा आहे!)

(३) चहा ही पेशल केस आहे. चहा मुळात भारतातलं पीकच नव्हतं. ते चीनमधून भारतात एका ब्रिटानेच चोरीछुपे आणलं (कसं तो किस्सा लय भारी आहे.) ब्रिटांनीच डोंगरऊतार ताब्यात घेऊन बागा लावल्या. भारतातल्या इतर शेतीच्या तुलनेत चहाची शेती संघटित आहे याचं हेच कारण आहे. त्या डोंगरऊतारांचं नुकसान झालं / तिथलं जैववैविध्य उध्वस्त झालं हे खरं आहे, पण तिथे चहापूर्वी कोणतीही शेती होत नव्हती.

********

तर संसाधनं लुटली गेली (पक्षी: संसाधनांना 'योग्य' किंमत न देता ती भारताबाहेर नेली गेली) हे सत्य आहे. पण 'योग्य' किंमत कोणती हा प्रश्न आहे. जगात डोकं चालवणार्‍याला (intangible assets) लय पैशे (residual returns) मिळतात. सप्लाय चेनमधल्या बाकीच्यांना थोडेफार पैशे देऊन (routine returns) फुटवलं जातं. (आयफोनचं उदाहरण बघा.) या वसाहतीच्या धंद्यात intangibles इंग्लंडमध्ये होते हे खरं आहे.

प्रश्न हा आहे, की इंग्रज आलेच नसते, तर हे intangibles भारतात असू शकले असते का? संसाधनांसाठी Routine returns देऊन फुटवणं टळलं असतं का? काय माहीत! आजवरचा इतिहास असा आहे, की intangible assets चं बनणं हे ती वस्तू जिथे विकली जाते त्या बाजारपेठेच्या जवळ असतं. (उदा० चारचाकी गाड्यांमधलं इनोव्हेशन (टेस्ला) जिथे चारचाकी गाड्या जास्त विकल्या जातात तिथे (अमेरिकेत) होतं. एरोसोल-बेस्ड कीटकनाशकांचं इनोव्हेशन जिथे त्याची जास्त गरज आहे अशा द० कोरियात होतं.) भारतात मार्केट तर तेव्हाही होतंच, त्यामुळे इनोव्हेशन होऊ शकलं असतं कदाचित...

---
आगामी: ब्रिटिशांनी म्हणजे नक्की कोणी?

---

व्यवस्थापकीय टिप्पणी - खरडफळ्यावरच्या चर्चेत आदूबाळ यांनी लिहिलेल्या खरडीचा धागा बनवला आहे. आदूबाळ यांनी आपल्या सोयीनुसार यात बदल करावेत, भर घालावी. लेखमाला बनवल्यास उत्तम.
व्यवस्थापकीय उपटिप्पणी - हा उघडउघड व्यवस्थापकीय दडपशाहीचा प्रकार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

युरोपात युद्धे होत असली तरी विद्यापीठे व्यवस्थित सुरू होती. धर्मात लिहिलेले सगळे बरोबर असेलच असे नाही या विचाराने मूळ धरायला सुरुवात केली होती.

एका कालखंडात दोन्ही प्रदेशांची स्थिती समान दिसत असली तरी एक अधोगामी आणि दुसरा ऊर्ध्वगामी असेल हे तिथल्या संशोधन/ ज्ञानसंवर्धनाच्या स्थितीमुळे साहजिक नाही का?

अगदी बरोबर. सतराव्या शतकात युरोपात इतके नावाजलेले शास्त्रज्ञ झाले, की त्यांचे थियरम, नियम आजही शिकवले जातात. बाराव्या शतकात ऑक्सफर्ड आणि तेराव्या शतकात केंब्रिज युनिव्हर्सिटी होती. या दोन्हींची पुढच्या शतकांत भरभराट झाली. त्या तुलनेत भारतातलं ज्ञानसंवर्धन थंडावलेलंच म्हणायला हवं. ज्ञानाकडे दुर्लक्ष करून आहे ती सरंजामशाही व्यवस्था चालवण्यात पुरेसा तत्कालीन फायदा होता.

मी एक वदंता ऐकलेली आहे. ग्योटेनबर्गने आपलं छपाईच्या यंत्राचं काम अकबराला दाखवलं. त्यावर अकबराने तुच्छतेने आपल्याकडे असलेली कुशल कॅलिग्राफर्सची फौज आणि त्यांनी केलेली कुराणं दाखवली आणि म्हटलं की तुमच्या यंत्रातून इतकं सुंदर काम होणं शक्य नाही. हे खरं होतं. मात्र ज्ञान लाखो लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे यावर त्याचा विश्वास नव्हता. वदंता खरी असो नसो, त्याकाळी ज्ञान ही सामान्यासाठी आवश्यक गोष्ट आहे, नवीन शोध लागले तर त्यांचा प्रसार होण्याची गरज आहे यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. जे चाललं आहे तेच चालू राहावं अशी एक कठोर व्यवस्था निर्माण झाली होती. त्याचा दूरगामी तोटा पारतंत्र्यात दीडशे वर्षं खितपत पडण्यात झाला. गेल्या काही दशकांत ही दरी भरून काढली गेलेली आहे. पण अजून काही दशकं तरी बरोबरी साधणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याकडचे _सगळेच_ टाकाऊ असा माझे मत आहे असा तुमचा समज झाला असेल तर गैरसमजाबद्दल दिलगिरी. तसे अजिबात म्हणायचे नव्हते. नेतृत्वात दूरदृष्टीचा अभाव आणि प्राधान्यक्रमाची वानवा हे मुख्य मुद्दे मला अधोरेखित करायचे होते. उदा पेशव्यांनी अटक किंवा पानिपताकडे लढायला जाणे. सीमा म्हणजे कुंपण अपेक्षित नसून एका नेत्याच्या शासनाधिपत्यातील प्रदेश असे अपेक्षित होते.

>नुसत्या तांत्रिक प्रगतीने युद्धे जिंकली जात नसतात.
एकदम सहमत. यासाठी अर्वाचीन एन्विडिया, एएम्डी व इंटेलचे उदाहरण बघावे. Wink

तुम्ही सतराव्या शतकात वसाहतवादी येणे हे साहजिक नाही म्हणता तर भारतासारख्या परिस्थितीत असलेल्या तरी वसाहत न झालेल्या प्रदेशाचे उदाहरण द्याल का? परिस्थिती = भौगोलिक, राजकीय, सामाजिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वसाहतवादाचे फायदे मोजणारांसाठी एक मस्त उदाहरण- वसाहत न झालेले देश किती प्रगत आहेत. मग कळेल कि तो किती मोठा अपकार होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतात अतिप्राचीन काळापासून बाहेरचे लोक आलेले आहेत. त्यामुळे युरोपियन लोक भारतात येणे साहजिकच होते. पण याचा अर्थ त्यांनी इथे येऊन राज्य स्थापणे साहजिक होते असा होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्रिटिशांनी भारतातून काय नेलं? माहित नाही पण
.
.
.
ब्रिटिशांनी भारताला काय दिलं ? घंटा!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पराभवाचे फायदे शोधणारी मानसिकता ब्रिटिश देऊन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अशा कॅची सिंगल लायनी मारत जाऊ नका हो. त्यापेक्षा तुमचा नेहेमीचा त्रेसष्ट ओळींचा गडबडगुंडा बरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जरी सिविल इंजिनिअरिंगचं काम करत असलो तरी स्मार्ट सिविल इंजिनिअरिंगचे मी २५० च्या वर प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यामुळे मला लॉगाऔट करून इंप्रेस कराल इ इ असं वाटलं असलं तर त्यात अर्थ नाही.
==============
ऐसीचा एक सदस्य दुसर्‍या सदस्याला लॉग आउट करतो असं व्यवस्थापन योग्य नाही. अशी निती योग्य नाही. असं जाउ देणं योग्य नाही. कोणताही सदस्य अन्य सदस्यांच्या सेटिंग बदलतो, सिस्टिम हॅ़क करतो, इ इ याची मी तक्रार करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय? कोणी केलं तुम्हाला लॉग आऊट अजो? Sad
काहीतरी गैरसमज झाला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचीमामी,
द्याट इज माय सही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला इंप्रेस करावंस वाटावं असं तुमच्यात काय आहे?
जाने भी दो जोशी. जस्ट चिल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ मुद्दा 'आम्हाला इंप्रेस करावंस वाटावं असं तुमच्यात काय आहे?' असा आहे. जस्ट चिल अँड आन्सर दॅट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जिव्हारी लागली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एका वाक्यात सिक्सर!

काकडी गार आहे, बीअरचा बार आहे, अजोंच्या नादाला लागाल तर तिथे स्वर्गाचं दार आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मूळात या प्रश्नाचं उत्तर देताना विचार कसा केला पाहिजे?
मूळात आपण ज्या प्रदेशाला जिंकू शकतो त्याला जिंकून त्याच्यावर राज्य करणं हे स्वीकार्य आहे. अशा राज्यातून महसूल मिळवून आपलं राज्य अधिक स्रोतसंपन्न आणि सुरक्षित बनवणं हे साहजिक मानलं जातं/जायचं. तसं करण्यासाठी कोणी ब्रिटिशांना नावे ठेऊ शकत नाही. मात्र कसं जिंकावं आणि कसं राज्य करावं याचे संकेत प्रत्येकच काळात असतात.
आता इतिहास फार विचित्र पद्धतीने लिहिला आहे.
१. प्रश्न: ब्रिटिश भारतीयांपेक्षा कोणत्या बाबतीत श्रेष्ठ होते?
अ. भारत सरकार कधी बिर्ला कंपनीला स्वतःचे लष्कर ठेवायचा अधिकार देईल का? पण असं झालं त्याच्या बाबतीत. प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकली असे लिहितात. वास्तवात ते तसं नाही. प्लासीचे बंड मीर जफर ने सिराजुद्दौलाच्या विरोधात जिंकले. त्यात इंग्रजांचा काही संबंध नव्हता. इंग्रज हे स्थानिकांच्या लढायांचे प्यादी होती. प्यादीचा प्रधान झाला. मात्र पक्ष फोडणे हे सामान्य होते, तेव्हा इंग्रजांची १७५६ ते १९४७ अशी स्थिर सत्ता (१९० वर्षे) येईल असे त्यांना वापरणारांना वाटले नव्हते. मानवतेच्या दृष्टीने मूल्ये नसणे पण आपल्या लंडनमधल्या जातीच्यासाठी खूप निष्ठा असणे (ज्याला ते शिस्त, इ म्हणत.) हे इंग्रजांचे मोठे श्रेष्ठत्व असावे. मीर जफरने आपल्या सैन्याला लढू नका असे सांगीतले तर तुलनेने ब्रिटिशांचे सैन्य शिस्तबद्धच दिसणार आहे! बरं इंग्रज राजे झाले का? प्लासीची लढाई ते जिंकले तर मीर जफरला राजा का बनवला? आणि अगोदर सैनिक ठेवायचा अधिकार होता नि आता कर जमा करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला? अरे, लढाई तुम्ही जिंकले का मीर? आणि मीर लोकांत अप्रिय होता तर राजा बनायचा तुमचा मस्त चान्स होता. मूळात काय, यांनी इतिहास "मूर्खांसाठी" लिहिला आहे.
(विनोदी साहित्य वाचण्यात रस असेल तर किमान "सर्वात अधिक उत्क्रांत प्राणी" हा इंग्लिश आहे असा इतिहास रचण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले याचा इतिहास अवश्य वाचावा. त्यावरून ब्रिटिश डेस्परेशनची आयडीया येईल.)
२. इंग्रजी राज्य कल्याणकारी होते काय?
भारतात असलेले सारे इंग्रज इतके कमी होते कि भारतीय लोकांच्या मनात (तेव्हा सोशल मिडिया नव्हता, तेव्हा बुद्धीजीवी लोकांत, जसे लोकहितवादी, फुले, पेरियार, इ) ते कल्याणकारी राज्य आहे अशी प्रतिमा बनवणे हे राज्य टिकवायची एक पॉलिसी होती. (लोकहो, नोंद घेणे, आता ते राज्य नाही आणि ती पॉलिसी देखिल नाही.). तर इंग्रजी हितांस पूरक आणि या पॉलिसीस पूरक अशी कामे इंग्रजांनी केली.
इंग्रजांची आपल्या जातीबाहेर लोकांना वागवायच्या खालील पद्धती होत्या:
१. मानव न मानून मारून टाकणे
२. मूर्ख मानव मानून गुलाम करणे
३. असंस्कृत मानव मानून ख्रिश्चन बनवणे
४. अशिक्षित धर्मांध पण श्रीमंत मानव मानून लुटणे
५. अलाय मानणे
६. शत्रू मानणे
इंग्रज जगाशी कसे वागले याचा इतिहास वाचल्याशिवाय ते भारताशी कसे वागले हे ठरवू नये.
प्रश्न ३: इंग्रजांनी भारताला किती लुटले?
इंग्रज आले तेव्हा भारत जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी होता. यूके सर्वात खटारा देशांपैकी एक होता. भारत आज सात नंबरवर आहे. यूके पाच नंबर्वर . https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_GDP_(nominal) दोन देशांची तुलना केली तर यूकेला असे कोणते अ‍ॅडावांटेज आहे?
१. लोकसंख्या?
२. भूप्रदेश?
३. नैसर्गिक स्रोत?
४. स्पर्धेचा अभाव?
यातलं काहीही नाही!
मग काय? भारतात उगववू चायनात ओपियम विकणारे लोक पैसे कूठून आणत असणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भर घालण्यासारखे ज्ञान माझ्याकडे नाही आणि वाचून प्रश्न विचारण्याची बुद्धिमत्ता नाही, तरीही लेख व प्रतिक्रिया अत्यंत आवडल्या, हे नमूद करतो.
अस्वलाने मधेच एंट्री घेऊन, आम्हाला गुदगुल्या करुन लोळवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर कोणीतरी ह्याचा ओझरता उल्लेख केला आहे पण पुस्तकाचे नाव दिलेले नाही. गांधींच्या अंतेवासी लोकांमधील धरमपाल नावाच्या विचारवंताने The Beautiful Tree: Indigenous Indian Education in the Eighteenth Century नावाचे पुस्तक लिहिले होते आणि ते जालावर येथे उपलब्ध आहे. ब्रिटिश राज्यकर्त्यांनीच गोळा केलेल्या काही माहितीच्या आधारे असे प्रतिपादन करण्याचा ह्या पुस्तकात प्रयत्न आहे की १) ब्रिटिशांपूर्वीहि देशामध्ये खाजगी प्रयत्नातून शिक्षण दिले जात असे २) ते सर्व जातींना उपलब्ध होते ३) मुलींनाहि ते मिळत असे. थोडक्यात म्हणजे येथे सर्व काही आलबेल hunky-dory चालू होते आणि ब्रिटिशांनी आणि मेकॉलेसारख्या दुष्टांनी भारतीयांना गुलामीत ठेवण्याच्या कुटिल डावाचा भाग म्हणून ती पद्धत रद्द करून इंग्रजी शिक्षण आमच्या माथी मारले. मेकॉलेच्या 'मिनट'चे जेथे विश्लेषण केले जाते अशा सर्व वादात हे पुस्तक केव्हा ना केव्हा तरी मेकॉलेसमर्थकांच्या तोंडावर फेकले जातेच. 'राष्ट्रीय' बाण्याच्या आणि विचाराच्या लोकांना हे पुस्तक म्हणजे एक god·send च आहे. (केवळ शिक्षणच नाही, अन्य अनेक बाबींमध्ये धरमपाल मानतात की मूळच्या भारतीय प्रणाली उत्तमच होत्या आणि त्या उखडून टाकून ब्रिटिशांनी भारताचे अकल्याणच केले आहे.)

पुस्तक खूप मोठे, सुमारे ४५० पानांचे आहे. ते सर्व वाचून त्याचा प्रतिवाद करण्याची energy ज्या कोणापाशी असेल त्याने ते जरूर करावे. मला त्यात पडायची इच्छा नाही.

पेशवाईच्या अंतापासून आपला काळ २०० वर्षे पुढे आहे. पेशवाईच्या अंतकाळाला जे खूपच जवळचे होते - उदा. फुले, जांभेकर, लोकहितवादी, रानडे - असे सर्वच जण ह्या आलबेल-hunky-dory मताच्या विरोधात होते हे लक्षणीय वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावित्रीबाईंच्या तोंडावर शेणगोळे फेकणारे आणि तसल्या विचारांना मान्यता देणारे लोक अस्तित्वात होते का नाही, याबद्दल पुस्तकात काही विवेचन आहे का?

(पुस्तकाचं वर्णन वाचून प्रतिवाद तर सोडाच, मला पुस्तक वाचण्याचीही इच्छा होत नाही. किंवा मला इतिहासाचं फार अंगच नाही. म्हणून शॉर्टकट प्रश्न. आपल्या-आपल्या गप्पांसाठी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फुले, जांभेकर, लोकहितवादी, रानडे

तेव्हाचे फुले मंजे आजचे कोल्हटकर, अदिती, इ इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फुले, जांभेकर, लोकहितवादी, रानडे

हे लोक इतके स्वस्त नव्हते हो. मारल्या चार पिंका की झाले असं नव्हतं त्यांचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साठाहून जास्त वर्षं उलटली तरी पब्लिक का मेकॉले मेकॉले करतंय माहित नाही.
मुळात आपण भारतीयांना ढकलाढकलीची इतकी भन्नाट सवय आहे म्हणता... मॅनेजमेंट शिक्षकांच्या नावाखाली हजाम ढकलतात. शिक्षक पोर्शन ढकलतात. मुलं गाईड, सिनीअर्सच्या नोट्स इ. वाचून आल्या सेमिस्टरची परीक्षा ढकलतात, विद्यापीठ निकाल ढकलतं. सगळे बाकीच्यांना 'फारिनला' जाताना पाहून बेरोजगारी बेरोजगारी करत इथेतिथे मोर्चे काढतात.
शेवटी सगळे ३ इडियट्स, तारे जमीं पर वगैरे फिल्म्सना टाळ्या वाजव-वाजव वाजवतात.
(त्याआधी राष्ट्रगीताला उभे न राहणार्‍यांना हाणतात वगैरे आलंच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

'ब्रिटिशांनी भारतातून काय नेले अशी चर्चा सुरू असल्याने त्याची उलट बाजू, ब्रिटिशांनी भारतात काय आणले, ही चर्चेत येणारच होती आणि तसे झाले की मेकॉलेचा उल्लेख आज ना उद्या होणारच होता. १८१३ च्या रेग्युलेटिंग अ‍ॅक्टानुसार जेव्हा educated Indian म्हणजे कोण अशी चर्चा सुरू झाली. १८१३च्या चार्टर अ‍ॅक्टानुसार कंपनीच्या उत्पन्नातील काही भाग 'for the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knowledge of the sciences among the inhabitants of the British territories' राखून ठेवला गेला होता. त्यामध्ये उल्लेखिलेले learned natives of India म्हणजे नक्की कोण अशी चर्चा मेकॉलेच्या मिनटमध्ये आहे. तत्कालीन ग.ज. ने ते मान्य केल्यामुळे इंग्रजीचा शिरकाव आधुनिक भारतीय शिक्षणात झाला. तत्पूर्वीचे शिक्षण पारंपारिक ज्ञान देणारे - तीन R's, थोडेफार संस्कृत आणि पारंपारिक ग्रंथ आणि नीतिकाव्य ह्यापलीकडे जात नसे. फारच थोडे ह्यापलीकडे जाऊन व्याकरण-मीमांसादि जुने उच्च शिक्षण घेत असत. हे सर्व ज्ञान फार मोठ्या प्रमाणात मोक्षवादी होते आणि इहवाद त्यामध्ये नव्हताच.

मेकॉलेने प्रथमच आधुनिक भौतिक शास्त्रे आणि संस्कृतच्या सावलीखाली गुदमरणार्‍या मराठीसारख्या भारतीय लोकभाषा ह्यांची बाजू पुढे मांडली. असे शिक्षण पुण्यामध्ये विश्रामबागेतील संस्कृत कॉलेजात मे.कँडीच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले तेव्हा विद्याथ्यांचा कल इंग्रजीकडेच होता. आजहि तीच स्थिति चालू आहे आणि मराठीसारख्या भाषा शिक्षितांच्या दैनंदिन वापरातून हद्दपार होऊ लागल्या आहेत हे आपण पहातोच आहोत. पण ह्या दुर्दशेची जबाबदारी आपणावरच आहे, आपल्याला आधुनिक विषय शिकायला उपलब्ध करून देणार्‍या मेकॉलेकडे नाही हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

(हे विचार अधिक विस्ताराने मी अन्य एका ठिकाणी लिहिलेल्या इंग्रजी टिपणीमध्ये आहेत. मात्र ते भाषान्तर करण्याचा कंटाळा मी करत असल्याने ते येथे देता येत नाहीत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम मराठी बोलून जर नोकरी मिळत असती तर सामान्य लोक इंग्रजीच्या नादाला का लागले असते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ब्रिटिश‌पूर्व‌ शिक्षणाविष्यी व‌र‌ थोडे लिहिले आहेच‌. इंग्र‌जी प‌द्ध‌तीचे (मेकॉलेचे) शिक्षण‌ हा एक‌ मोठा क‌ट‌ होता असे मान‌णाऱ्या राष्ट्रीय‌ विचार‌स‌र‌णीच्या लोकांना पुढील‌ उतारा उद्बोध‌क‌ ठ‌रेल‌. पेश‌वाईप‌र्य‌ंत‌चे शिक्ष‌ण‌ हे असे होते - तेहि ज्यांना मिळ‌त‌ होते त्यांनाच‌. हेच‌ चालू राहाय‌ला ह‌वे होते असे म्ह‌ण‌णे योग्य‌ आहे काय‌? हा उतारा Indian Antiquary Vol VIII 1879 म‌धून‌ उच‌ल‌लेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या इमेजेस ब्लर होत्या, वाचता येत नाहीए.

https://ia801600.us.archive.org/3/items/in.ernet.dli.2015.532695/2015.53...

या लिंक वर pdf फाइल मिळाली. त्यात पान नंबर २७७ वर वरील लेख सापडला. (वाचत आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिशांनी भारतातून काय नेलं?

लोक हो, ह्या प्रश्नाचे ढळढळीत उत्तर लेखाच्या टायटल च्या खालीच दिसत असताना, तुम्ही सर्व काय वाट्टेल ती उत्तरे देत आहात. आबांसारखा प्रतिभावान माणुस ( आणि ) ब्रिटिशांनी भारतातुन नेला आणि मलमल वगैरे फाल्तू गोष्टीची काय यादी देताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"An Era of Darkness: The British Empire in India" लेखक शशी थरूर यांच्या ऑक्सफर्ड मधील भाषणाधारित पुस्तक

लिबरल थरूर यांच्या या भाषणाचे लोकसभा सभापती , आदरणीय पंतप्रधान यांनी नावाजलेले ...

आदूबाळ आणि इतर तज्ज्ञ मंडळी : आपण वाचले असेलच असे गृहीत धरतो .. या पुस्तकावर काही टिप्पणी आहे का कोणाची ?

( बघा , मी काहीही तिरकस लिहायचं टाळलंय वरती !!!)

आता खालती ..
( कालच घेतलय किंडल वर ... आधीच कोणी या पुस्तकाबद्दल काही मते वगैरे असली तर सांगाल काय ? ( एकदा पूर्वग्रह कळले कि वाचायला व तपासून बघायला मजा येते )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही वाचलं अजून. थरूर यांची एक कंठाळी मुलाखत वाचली आणि वर्तुळपूर्वबाणन्याय आहे का असं वाटलं. मुलाखतीची लिंक शोधून देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>वर्तुळपूर्वबाणन्याय

बोले तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी बाण मारून त्याभोवती वर्तूळ काढणे आणि वाह काय नेम लागला म्हणणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://www.firstpost.com/living/shashi-tharoor-you-cant-revenge-yourself...

ही ती मुलाखत.

विशेषतः हा प्रश्न, आणि त्यावरचं उत्तर.

For some, nothing in the book is new (as you admit in the preface), except perhaps that for once these facts have been presented with a stimulating narrative, one that is neither bereft of emotion or self-checked diction.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ब्रिटिशांनी भारतातून भारतीयांमधील एकता व अखंडता नेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क‌शी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा कितीही सामान विमानातून नेलं तरी पैसे पडायचे नाहीत ना! मग बॅगेज* घेऊन गेले.

*ही कोटी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Don't Blame the British

हे बॅटू व आबांसाठी.

शशी थरूर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रतिवाद ???????

या लेखाच्या तळाशी जी बिब्लिओग्राफी आहे ती रोचक वाटू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने