दिंडी

अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या

तिथे सुदूर चंद्रभागेकाठी
काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत
कल्पांतापर्यंत अकिम्बो

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क‌विता अतिश‌य मार्मिक, आणि आश‌य‌घ‌न आहे. खूप आव‌ड‌ली. अजून वाढ‌व‌ता आली अस‌ती.

व्य‌क्तिग‌त म‌तांचे भेसूर गुलाल
जिंद‌गीत‌ल्या स्ट्र‌ग‌ल‌ची बेसूर गाऱ्हाणी
एसीत ब‌सून आयफोनव‌र सिष्ट‌मच्या नावाने एक‌तारी
ट्रोलिंग क‌र‌ता क‌र‌ता कोणाच्याही आईमाईला फास‌लेला काळाकुट्ट अबीर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

+१
वाढवता आली असती. लिंक लागेस्तोवर संपली पण.छान. अजून लिवा. (भंगारवाल्या पोराची कविता लै आवडली)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

दिन्डीत‌ले टाळ, मृदंग, रिंगण आणि आर‌ती एव‌ढेच डोळ्यापुढे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

क‌विता उत्त‌म आहे. थोडीशी श‌र‌दिनीची झाक वाट‌ली प्र‌तिमासृष्टीत‌.

बाय‌द‌वे ते अहिर्निश न‌सून अह‌र्निश असे पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहि-न‌कुलात‌ला अहि प‌ड‌ला. दुरुस्त‌ क‌रू श‌क‌तो का? श‌र‌दिनीच्या क‌वितान्ची लिन्क आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या

हे इत‌के निगेटीव्ह भाव का जोड‌ले आहेत्. आम्ही त‌र जालाव‌र म‌स्त म‌जा क‌र‌तो. WWF च्या कुस्ता अस‌तात त्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वास्त‌व‌वादी? स‌र्व‌च सापेक्ष‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण

जीए च‌ क‌विता क‌राय‌ला उत‌र‌ले आहेत की काय‌, असे वाट‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

म‌ला त‌र श‌र‌दिनीताईंची आठ‌व‌ण झाली.

बाय‌द‌वे साठ‌मारीचे घोड‌रिंग‌ण ज‌रा विजोड वाट‌त नाही काय‌? साठ‌मारी ह‌त्तींची अस‌ते/असाय‌ची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"विजोडिका" स‌म‌जा हवंतर ह्या ओळीला. "अग्ग‌डात" खेळ‌ली जाणारी साठ‌मारी ह‌त्तीन्चीच असाय‌ची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

..लिंक देऊ शकाल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

ही घ्या लिंक‌.

www.misalpav.com/user/3807/authored

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं