दिवसातून छप्पन वेळा

दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
आरश्या पाठचा अचपळ पारा
नसानसातून दौडत जातो

दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
टेक्नोमंद ठरतो तेव्हा
थोडा थोडा कोकरू होतो

कोsहं प्रश्न पडतो तेव्हा
मुमुक्षू मी असतो खास
कटिंग सोबत बिडी पिताना
मीच टपोरी टाईमपास

अचाट काही जेव्हा बघतो
अफाट काही जेव्हा ऐकतो
अतर्क्याची हाक ऐकून
अवघा चेहेरा कुतूहल बनतो

जुनी गाणी, जुने छंद,
वार्‍यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा

लोलक तोच, तिरीप नवी
जुनीच कविता, नवा कवी
अनंतरंगी अनवट खेळ
बघायचा, तर हीच वेळ

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता फार आवडली.

> जुनीच कविता, नवा कवी

येस. मर्ढेकरांची झाक जाणवतेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

छान कविता. आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

पद्यरचनाही लयबद्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लयबद्ध कविता अर्थानेही उजवी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आवडली.

अचाट काही जेव्हा बघतो
अफाट काही जेव्हा ऐकतो
अतर्क्याची हाक ऐकून
अवघा चेहेरा कुतूहल बनतो

बेस्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

हा कवि एक एक कवीचा कवितासंग्रह घेऊन कविता लिहायला बसतो ( कधी कुसुमाग्रज, कधी मर्ढेकर कधी बहिणाबाई कधी बालकवि ) ओरिजिनल काहीच नाही. याने लिहिलेली एक ओळ तरी इथे कुणाला लक्षात राहिली आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

एक ओळ तरी इथे कुणी पाहिली आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0