हळहळ

आयुष्यात शालेय जीवनात, पुढे शिक्षणात, नोकरीत हळहळ वाटावी असे प्रसंग आपल्याला किंवा इतरांना येत असतात. हे हौसेचे,छंदातले.

हळहळ १)
नवीन टिवी घेतलेला होता (85-86). दोनच चानेल लागायचे. नॅशनल आणि डीडी मेट्रो. इंदिरा गांधीची पहिली पुण्यतिथी (85 october)होती. काही कार्यक्रम दिवसभर लावणार होते. माझी सुट्टी. टिवी चालू ठेवला होता वेळ जाण्यासाठी. कुणी वादक, गायक कला सादर करत होते. भजन वगैरे. अचानक काही वेगळाच आवाज कानावर पडला. घुमत होता. एक मोठे मुंडासेवाला म्हातारा गात होता. तासभर ऐकलं. छान वाटलं. दुसरे दिवशी गाण्यातल्या कळणाऱ्याला विचारलं "कोण रे तो मोठा मुंडासेवाला?"
श्टोरी सांगितली. "तुला त्याचं एक तास गायन ऐकायला मिळालं?"
"हो, जरा बरं वाटलं."
"छ्या, (मल्लिकार्जुन मन्सुर /कोणी खाँसाहेब सांगितलं) *याचं गाणं ऐकण्यासाठी खटपट करावी लागते ते चक्क एक तास तुझ्यासारख्याला ऐकायला मिळालं !!"
दिवसभर तो हळहळतच होता.

हळहळ २)
एक नवीन शेजारी आला. थोडी ओळख झाल्यावर कळलं तो रविंद्र नाट्यमंदिरजवळ अगोदर राहात होता. तिथेच फावल्या वेळात बॅक स्टेजला असायचा. सगळी नाटकं पाठ.
" तुम्ही सांगाल त्या नाटकाचे पास आणतो."
" नाटकातलं काही कळत नाही हो."
"मग मोरुची मावशी तरी बघा, त्यांच्याबरोबर भारत फिरलोय."
मग ते एक पाहिले.
ओफिसातले हळहळले. "नको त्यांना फुकट पास!"

हळहळ ३) नशिबाने वाचलेली.
एकदा पेप्रात जुन -जुलैचा पावसाची बातमी आली. ओढे वहायला लागले की लोक डुंबायला निघतात. तसे काही लोक उपवनमधून संजय गांधी उद्यानात जायला प्रवेश आहे( ठाणे पश्चिम, पाटणेपाडा) तिथून आता गेले. बरेच आत जाऊन भिजले. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला, परतायला जो ओढा ओलांडला होता तो भरल्याने इकडे येता येईना. अडकले. कुणाशी संपर्क होऊन ठाणे अग्निशमन दलाचे लोक आले, दोर लावून सुटका केली.
तर ती बातमी वाचून अमचा सहकारी म्हणाला "चला रे जाऊ तिकडे. "
"आताच बातमी आली म्हणजे तिकडे जाणे शक्य नाही."
" तुम्ही दोघे फिरता पण मी म्हटले की नाही म्हणता."
"नाही,तसं नाही. आता तिकडे बंदोबस्त असणार. दुसऱ्या ओढ्या, धबधब्यावर जाऊ."
"ठाणे अगदी जवळ आहे, बस आहे. शिवाय माझा मित्र तिकडेच एरफॅार्स कॅालनीत राहतो त्याचेकडेही जाऊ."
"अरे, मग तुम्ही जा त्याच्याकडे नवराबायको. पिकनिकच्या वेळी कुणाकडे जायला आवडत नाही."
"जाऊ याच, या रविवारी."
हट्टामुळे आम्ही गेलोच. पाटणेपाडा येथे उतरलो तर तिथेच सीआरपीएफचा बंदोबस्त.
" आत जायला बंद केलंय."
किती गयावया केल्या तरी ते ठामच. मग काय करायचं? आता दहा वाजलेले आणि त्या मित्राकडे कॅालनीत दोन अडीचला जायचे होते. इतका वेळ काढणार कुठे? रस्त्याने चालत मागे येत राहिलो. सर्व बाजूला खासगी प्रॅापर्टी, बंद गेट . एका ठिकाणी गेट उघडे दिसले तिकडे आत एक वाचमन होताच.
" हे खासगी प्रापर्टी आहे, इथे बसता येणार नाही."
कुणा वकिलाची प्रापर्टी होती. मग वाटेत एक देऊळ सापडले. तिकडे आवारात बसून डबे खाता आले. घरी जाऊन डबा खावा लागला नाही हाच आनंद. ठाण्यातल्या कुठल्या हाटेलात जाऊन बाकडी गरम करत रोडगे खाण्यात कुणाचा इन्टरेस्ट नव्हताच.
पाऊस नव्हता त्या दिवशी हे बरेच झाले.

वेळ काढून एरफोर्स कॅालनीच्या गेटवर दोन वाजता पोहोचलो. फोन लावला तर मित्र ये म्हणाला. त्याच्या क्वार्टरमध्ये गेलो. मित्रांच्या गप्पा झाल्या.
"इकडे उपवनमध्ये आत जायचं होतं पण आत जाऊ दिलं नाही."
"तुम्ही चौघे आहात ना? तर जाता येईल वरती."
"?"
"वरती एरफोर्सची रेडार,ट्रॅकिंग डिश आहे. कुणाला परमिशन नाही. मला सुद्धा. पण आता माझी ड्युटी आहे तिथे जायची. तुम्हालाही नेतो. कधी पाहिलं नाही असा परिसर दाखवतो. एरवी इथे शुटअॅटसाइट आर्डर आहे आदिवासीसोडून."
त्याने फोर विल ड्राइव मारुति काढली. "इथल्या घाटात फक्त हीच चढू शकते."
बारा किमि घाट होता. वाटेत चार गेट्सवर त्याचेही आइडी तपासले गेले.
अवर्णनीय रान. धबधबे. पक्षी निर्धोकपणे आम्हाला पाहात होते. सर्पन्ट इगल अगदी जवळून. एका वळणावर एक पॅाइंट दाखवला. "इथे आमची एक टेक्निकल ओफिसर बसायची. तिच्या नावे केलाय हा रम्य पॅाइंट."
वरती गेलो. खडा पहारा सैनिकांचा.
" इथेच उभे राहा गाडीपाशी, कुठे जाऊ नका दूर. एन्ट्री करून येतो."
वरून बोरिवलीर्यंत दृष्य दिसत होते. त्या डोंगरातच कन्हेरी लेणी पलिकडे.
मग परत फिरलो. खाली एका छोट्याशा बंधाऱ्यावर थांबलो. "प्राण्यांना पाणी मिळावे म्हणून बांधलाय. आणि हा जो खडक दिसतोय ना यावर एकदा बिबट्या माकडाला खात होता. ते एका ओफिसराने विडिओ शुटिंग केलय."
संध्याकाळ होत आली, ठाणे शहराचे दिवे छान दिसत होते.
"इथून दिवाळीतले फटाके छान दिसतात."
-
त्या सहकाऱ्याच्या हट्टाला मान दिला नसता तर हा अनुभव एका हळहळीतच जमा झाला असता.

हळहळ ४)
तीनचार वर्षांपूर्वी हेच मार्च एप्रिलचे दिवस होते. पाटणेपाडाला पोहोचलो. संजय गांधी उद्यानात जाण्याची चौकी आहे तिथे कुणीच नव्हते. आत गेलो. दुपार अकराची वेळ. कॅालेजातली तरुण प्रेमी जोडपी थोडेच पुढे जाऊन बसलेली. आतमध्ये मोठा कच्चा रस्ता आहे. ते ओढे होतेच, कोरडे पडलले. घड्याळात वेळ पाहून दीड तास फिरून परतायचं नक्की केलेलं. हातात डोक्यावर मानेकडे छत्री धरलेली. ऊन फार लागत नव्हतं पण बिबट्या मागून हल्ला करतो म्हणून धरलेली. बिबट्या काही दिसला नाही. झोपला असेल. संध्याकाळी तो माकडे पकडतो. पक्षीही दुपारचे चुप. एवढी रेकी करून परतलो तीन तासांनी.
दिवाळीनंतर परत लवकर सकाळी येईन आणि पलिकडे बोरिवलीकडे बाहेर पडू हा विचार. असेल दहाबारा किमी.
डिसेंबरात तयारीनेच आलो. स्टॅापला उतरल्यावर एकच चहाची टपरी. शेवटचा पहिला चहा घेतला. आता संध्याकाळपर्यंत पलिकडे जाईन तेव्हाच चा मिळेल. चौकीपर्यंत गेलो तर गुल!
दहा फुटी कॅान्क्रिटची भिंत. तीसुद्धि तेवढ्याच भागात नाही , दूरपर्यंत पसरलेली.
परत फिरून जवळच्या बंगल्यातल्या केअरटेकरना विचारले.
"भिंत हल्लीच बांधलीय. आता कुणालाच इकडून प्रवेश नाही."
एक मोठी ट्रेकची संधी हुकलीच.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ताजी एक हळहळ आहे -
न्यु जर्सीला येण्यापूर्वी बसमध्ये, बसस्टँडवरती ज्या ज्या गरिब, फाटकी परिस्थिती असलेल्या मैत्रिणींची ओळख होत गेली, त्यांना काही ना काही भेट द्यायची राहून गेली. अतिशय वाईट वाटले.
माझ्या अतिशय आवडीचा एक रोलर/डॅब ऑन लहान पर्फ्युम आहे. उभट अतिशय चिंचोळ्या अशा काचेच्या नळकांडीत एक १५-३०ml येतो. इतका सुरेख आणि दिवसभर दरवळणारा सुगंध आहे त्याला.कानामागे. किंवा घळीत (क्लिव्हेज) फिरवला की दिवसभर माझे मन प्रसन्न रहाते.
माझी एक इटॅलिअन मैत्रिण आहे मरीया.ही बसस्टँडवरती असते. तेथिल बाथरुम साफ ठेवणे, केर-फर्शी (यंत्रानी) करणे तिचे काम. तिच्याकरता एक घेउन गेले शेवटच्या दिवशी. गप्पा मारल्या आणि द्यायचाच राहीला. नंतर तिला विचारत फिरले पण ती पुढे कुठेतरी कामावर निघून गेलेली होती. दुसऱ्या दिवशी माझी फ्लाईट असल्याने, जणे शक्य नव्हते मला.
____________________
अजुन एक भयंकर हळहळ व गुन्हेगारीची भावना आणि स्वत:ची चीड अशी सरमिसळ असलेला प्रसंग - मी होते २४-२५ वयाची. जातीपातीचा पगडा होता माझ्यावरती.माझ्या नणदेची मैत्रिण मुंबईला आमच्याकडी रहायला आलेली होती. मी पहाटे उठुन रेडिओ लावुन, पोळी-भाजी वगैरे करुन नोकरिवर जात असे. त्या दिवशी रेडिओवरती एक सुरेल गाणं वाजत होतं, एकीकडे माझ्या पोळ्या चालल्या होत्या, कावळा स्वयंपाकघराच्या खिडकीत येउन पोळी कावकावुन मागत वगैरे होता. It was an ordinary but extraordinarily pleasant day. तिला आपण आनंदी म्हणु यात. आनंदी जागी झालेली होती. मी चहा वगैरे विचारला. तिनी माझं खूप कौतुक केलं की आटोपशीर आहे, उरक आहे,आनंदी स्वभाव वगैरे. ती काही दिवस राहीली. मला खूप आवडली पण ............ एके दिवशी मी मूर्खासारखी तिला समोरासमोर जात विचारली. ती बौद्ध होती पण तिला फार वाईट वाटले.चेहऱ्यावर स्पष्ट दिसले.
मी आजतागायत स्वत:ला क्षमा ना केलेली आहे ना करेन. How could I be so crude, tactless & insensitive? SadSad

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

मला या पद्धतीच्या हळहळ(किंवा खंत )सांगणाऱ्या गोष्टींचा धागा अपेक्षित होता. आपल्याला हव्या असलेल्या, करायच्या,बघायच्या बकेट लिस्टितल्या गोष्टींसाठी नाही. त्या अनंत निघतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला धागा आहे. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

"कोण रे तो मोठा मुंडासेवाला?"

a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो बहुतेक हाच गायक. आवाज घुमतो यांचा.
( काही वर्षांपूर्वी गाण्यातला bass आवाज खुलावा म्हणून एक स्पिकर मटक्याच्या तोंडावर उलटा ठेवायची फ्याशन निघाली होती ते आठवलं.)
स्पिकर, बेस फ्रिक्वन्सी, वॅाल्युम ( loudness) आणि बॅटरी करंटचा वापर याचे एक वेगळेच गणित आहे. हे वाचलेलं.)
यास गाण्याच्या भाषेत खर्ज म्हणतात आणि त्यासाठी मोठा श्वास लागतो. ३६ हर्टझ फ्रिक्वन्सीला रिस्पॅान्स देणारे( लंबगोल , खोल) स्पिकर्स यासाठी लागतात आणि सर्किटमध्ये तसे फिल्टर्स टाकावे लागतात. ती टु-वे स्पिकर सिस्टिम त्या टिवित असल्याने या गायकाचा आवाज खुलला. ( फिलिप्स आणि सोनी यात पुढे होते परंतू मार्केटच्या स्वस्त वस्तुंच्या मागणीमुळे त्यांनी १००हर्टझ खालच्या फ्रिक्वन्सिज दाबून ( supress) टाकल्या. दुसरे एक कारण म्हणजे रेडियो ब्रॅाडकॅास्टिंगवाल्यांनीही ते वजा केले.
--
आदूबाळ धन्यवाद. तुमचा 'तो' प्रेक्षकांचा धागा आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अब्दुल करीम खाँसाहेब नसावेत. ते टीव्हीचा जमाना येण्यापूर्वीच निवर्तले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या आठवणीप्रमाणे "बाssजुबंद खुल खुल जाssए" असावी चीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही ठुमरी फैय्याज खांसाहेबांनी गायलेली प्रसिद्ध आहे. पूर्वी आकाशवाणीवर वाजत असे. खांसाहेबांची ती हुकमी चीज होती असे म्हणतात. पण अर्थात हे खूप पूर्वीचे. कदाचित त्यांचा कोणी परात्पर शिष्य असेल. आणि अर्थात खांसाहेब फेटा बांधीत नव्हते. त्यांच्या हिंदु शिष्यांपैकी , जे फारसे नव्हते, रातंजनकरसुद्धा १९७४ साली वारले. तेव्हाही टीवी अगदीच नवीन होता. शिवाय तेही फेटा/पगडी/मुंडासे घालीत नव्हते. ती प्रथा तोपर्यंत अस्तंगत झाली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0