तू

डोळ्यांमधली रात्र
हा वारा चोरून नेई
तू अशी उभी नि शुभ्र
ही जाई बहरत जाई

जळ इतुकेसे पातळ की
डोळ्यान्त असुनी तू दिसते
प्रतिबिम्ब? नव्हे ही छाया
तू असो वा नसो हसते

तुज स्पर्श करावा इतुका
मी आरस्पानी नाही
काचेच्या वलयापाशी
मी अखेर थाम्बुन राही

हेतू मनातले सारे
धरतात फेर चौफेर
तव पायाञ्च्या क्षितिजाञ्चा
मज भूल पाडितो घेर

गरगर भिरभिरतो वारा
आजू बाजू भवताली
मी शोधीत बसतो चिन्हे
अन् ऐकत एक गजाली

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

आवडली. अतिशय सुंदर!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. तिसरे आणि चौथे कडवे ग्रेसच्या प्रतिमांची याद जागवणारे.
(गजाली हा शब्द खटकत नसला तरी, तितकासा चपखल वाटत नाही. कदाचित त्याला जी light-hearted थट्टा-मस्करीची छटा आहे, त्यामुळे असेल.)

अवांतर - त्याच्या प्रियेचे हे (संभाव्य) प्रत्युत्तर. (ताजमहालाला वीट इ.)

गात्रांमधली हाडं
अजिबात दिसेना होई
तू असा उभा नि आडवा
जणू वड फैलावत जाई

डाळ इतकीशी पातळ की
उडद असुनी ना दिसते
डाएट? तरीही काया
नित षोडशस्टोनी असते

तुझा स्पर्श टाळण्याइतकी
ही जागा रुंदच नाही
विस्तारभयाच्या पोटी
मी अखेर लांबून जाई

पट्टे सदनातील सारे
धरतात फेर चौफेर
तव पोटाच्या परिघाचा
त्यां गार पाडितो ढेर

गरगर भिरभिरतो वारा
आजू बाजू भवताली
मी यूट्यूबी ऐकत बसते
'आला गंधित वारा' बाई

१. स्टोन = वजनाचे माप

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL हे भारीय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा मस्त, खालचं कडंव फार आवडलं.

हेतू मनातले सारे
धरतात फेर चौफेर
तव पायाञ्च्या क्षितिजाञ्चा
मज भूल पाडितो घेर

इथे मनातले च्या एवजी मनातील असे चांगले बसेल काय?

हेतू मनातील सारे
धरतात फेर चौफेर
तव पायाञ्च्या क्षितिजाञ्चा
मज भूल पाडितो घेर

नंदनचं विडंबनही सुरेख, फक्त शेवटचं कडवं चालीत बसेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली, अंमळ इराणी-प्रभावित ज्यूलियनसाहेबांच्या कवितेचा जरा प्रभाव वाटतो आहे, उदा.

तुज स्पर्श करावा इतुका
मी आरस्पानी नाही
काचेच्या वलयापाशी
मी अखेर थाम्बुन राही

बाकी हे लाँगिंग तर झकासच!

हेतू मनातले सारे
धरतात फेर चौफेर
तव पायाञ्च्या क्षितिजाञ्चा
मज भूल पाडितो घेर

गरगर भिरभिरतो वारा
आजू बाजू भवताली
मी शोधीत बसतो चिन्हे
अन् ऐकत एक गजाली

मस्त आवडल्या गेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविता आणि नंदनची प्रतिकविताही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

>>>हेतू मनातले सारे
धरतात फेर चौफेर <<<

यावरून हे आठवलं :

आलो क्षणिचा विसावा म्हणून;
टेकले पायः
तो तुच हटकलेस 'कोण?' म्हणून.
आणि मनातले शिणलेल्या हेतूंचे
शेण झाले.

- बा सी मर्ढेकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दोन वर्षांपूर्वी मी नवखा असताना टाकलेल्या कवितेला आता प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून धाग्यांच्या वर-खाली होण्याची गंमत वाटली. प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद. शंका-शेर्‍यांना सावकाशीने उत्तरे देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हो, हे लक्षातच आलं नाही. सारिकामुळे धागा वर आला बहूदा, पण ते 'गंमत वाटली' वगैरे खोचक आहे का खरच गंमत वाटली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:D> मस्त आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0