ख्रिसमस केक

खरंतर या पाककृतीत विशेष असं काहीच नाही. ही 'ऑथेंटिक'ही नसावी. माझ्या मामीनं मला ही कृती शिकवली. तिनं शिकवलेल्या अनेक पाककृतींमधली ही माझी सगळ्यात आवडती आहे कारण या केकमध्ये रम वापरून, लवंग, दालचिनी, संत्र्याच्या साली अशा विविध जिन्नसांचे तिखट-गोड-आंबट स्वाद आणि त्यांचे गंध केकमध्ये मुरवले जातात. ती प्रक्रिया करून बघायला नेहमीच मजा येते. केक ख्रिसमसच्या थोडा आधी बेक करून एखादा आठवडा त्याला रोज थोडी थोडी रम 'भरवायची' असते. या कृतीला, 'फीडिंग द केक' असंच म्हणतात. रोज रम भरवण्यासाठी म्हणून डब्याचं झाकण उघडलं की केकमधल्या मसाल्यांचा आणि फळांचा उत्तरोत्तर तीव्र होत जाणारा सुगंध येतो. नुसतं त्या वासानंही पोट भरतं. मी कधीच ख्रिसमससाठी म्हणून हा केक केला नाही. पण थंडी पडू लागली की या पाककृतीची आठवण येते.

केक करायची पहिली पायरी म्हणजे बाजारातून रम विकत आणणे. पुण्यात हा अनुभव नेहमीच आल्हाददायक असतो. एखाद्या बाईला दारूच्या दुकानात जाता येऊ नये किंवा जायची भीती वाटावी इतकं काही पुणं मागास नाही. असं असलं, तरीही दुकानदारांना ते फारसं रुचत नाही. एक स्त्री म्हणून दारू-खरेदीकडे बघितलं, तर पुण्यात अनेक पर्याय आहेत. कोरेगाव पार्कातल्या एखाद्या उच्चभ्रू वाणसमानाच्या दुकानात गेलं, तर आपल्या टोपलीत सिराचा, कसुंदी, ब्लू चीज, गलांगल, व्हेजीमाईट अशा वस्तूंबरोबर एखादी रीझलिंग किंवा पिनो नुआर सहज टाकता येते. एखाद्या स्त्रीनं 'एकावर एक फ्री' आहेत म्हणून अशा आठ बाटल्या घेतल्या तरी तिथले कॅशियर तिच्याकडे ढुंकून बघत नाहीत. पण तिथे रम, व्हिस्की, व्होदका असल्या अट्टल दारवा मिळत नाहीत. त्यामुळे त्या आणायच्या असतील, तर वाईनशॉपमधे (जिथे अनेकदा वाईन मिळतच नाही!) जाणं अपरिहार्य आहे. दुसरा पर्याय म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या समजूतदार पुरुषांचा वापर करून हे कार्य साध्य करायचं. पण आता या वयात वडील, भाऊ, नवरा, मित्र वगैरे लोकांच्या आडून आपली छोटी मोठी व्यसनं पुरवून घेण्याचा दांभिकपणा मनाला पटत नाही. म्हणून तोही पर्याय रद्द होतो आणि वाईनशॉपची वाट धरावी लागते.

सलवारकुर्ता -- ओढणी -- कपाळावर टिकली -- हातात पाटली अशा अवतारात दुकानात गेल्यावर, शरीरात ई-कोलाय शिरल्यावर रक्तातल्या पांढऱ्या पेशी जितक्या तत्परतेने त्यांच्याकडे लक्ष देतात तितक्याच तत्परतेने दुकानदार माझ्याकडे देतात. हा काकू-सदृश बॅक्टीरिया जितक्या लवकर दुकानातून निघून जाईल तितकं बरं म्हणून लाईन लावून उभ्या राहिलेल्या समस्त मदहोश पेताडांना टांगून ठेवत ते आधी मला काय हवं ते विचारतात. खरंतर त्यांची अडचण समजून घेऊन पटकन 'एक ओल्ड मंकची क्वार्टर द्या' असं म्हणायला हवं. पण शेवटी आम्ही काकवाच! कासटमध्ये पैठणी किंवा हस्तकलामधले दणकट सलवार-सूट खरेदी करताना मध्यमवर्गीय काकवा ज्या उत्साहाने 'अजून व्हरायटी दाखवा' म्हणतात त्याच उत्साहाने मी, “तुमच्याकडे कोणकोणत्या डार्क रमा आहेत?” असं त्यांच्या काऊंटरवर नखांनी तबला वाजवत विचारते. मग दुकानदार ओशाळून मला यादी सांगतो आणि 'हीच घ्या' असं अधिकारानं सांगत ओल्ड मंक देऊन फुटवतो.

तर आंतरजालावर पाककृती लिहिण्याच्या नियमांनुसार, सुरवातीलाच दोन निरर्थक परिच्छेद लिहून लवकर मुद्द्यावर न येण्याची प्रथा पाळून आता पाककृतीकडे वळू.

लागणारे जिन्नस:

१. एकास एक प्रमाणात १ कप मैदा, साखर (शक्यतो ब्राऊन), लोणी

२. ३ अंडी

३. एक क्वार्टर चांगली डार्क रम (व्हिस्कीही चालते)

४. काळी मनुका, प्रून्स, क्रॅनबेरी यापैकी जे काही मिळेल ते किंवा सगळं थोडं थोडं
५. सुक्या अंजिराचे आणि सुकवून साखर लावलेल्या आल्याचे तुकडे (सुकवलेली अशी इतर फळंही वापरता येतील, आंबा सोडून)

६. आतला पांढरा, तंतुयुक्त थर सुरीने संपूर्ण खरवडून काढून, नाजूक पट्ट्यांमध्ये कापलेली संत्रासाल

७. २ चमचे मार्मलेड / १/२ कप संत्र्याचा रस (इथे शक्यतो मार्मलेड वापरावं कारण संत्र्याच्या रसाने केकचं पीठ पातळ होऊन सुकामेवा खाली बसायची शक्यता असते)

८. साधारण १-१ चमचा दालचिनी आणि लवंग पूड

९. अक्रोड किंवा बदामाची पूड ( १ कप मैद्यास १/४ कप) - हवे असल्याचं अक्रोडाचे भरड तुकडे.
१०. बेकिंग पावडर (१ कप मैद्यास पाव चमचा)
११. व्हनिला अर्क

( १ कप मैदा असेल तर त्याला साधारण अर्धा कप सुकामेवा पुरेसा होतो.)

कृती

१. बेकिंगच्या किमान २४ तास आधी सगळा सुकामेवा, संत्रासाल, मार्मलेड आणि मसाल्यांची पूड एका काचेच्या बाटलीत घेऊन त्यावर अर्धी रम ओतावी. झाकण लावून बाजूला ठेवून द्यावे. ही कृती जितकी आधी करता येईल तितका केक चविष्ट होईल. काही लोक हा सुकामेवा एक वर्षं रममध्ये बुडवून ठेवतात. पण २४ तास भिजवून केलेला केकही काही अगदीच टाकाऊ होत नाही.

२. बेकिंग करायच्या आधी केकच्या भांड्याला (ते सिलीकोनचे नसल्यास) आतून नीट बटर पेपर लावून घ्यावा. शक्यतो भांड्याच्या आकाराचा गोल/आयत आणि बाजूच्या पट्ट्या कापून घ्याव्यात. त्या भांड्याला चिकटण्यासाठी त्यांना फेविकॉल लावतो तसे लोण्याचे ठिपके लावावेत. असं न करता संबंध कागद त्या भांड्यात ठेवला तर केकचं पीठ त्या कागदाच्या चुण्यांमध्ये जातं आणि आकार चांगला होत नाही. ज्या केकमध्ये फळांचे तुकडे असतात ते केक नाजूक बांध्याचे असतात. त्यामुळे स्पंज केकसारखं केकचं भांडं उलटं करून त्याला धपाटे घालून ते बाहेर निघत नाहीत. आणि असं करून अर्धा केक आत आणि अर्धा बाहेर राहण्यापेक्षा नीट पेपर लावून घेणं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम.

३. लोणी वितळवून मोजावं. लोण्याच्या समप्रमाणात मैदा आणि साखर मोजून घ्यावी. एका खोलगट भांड्यात वितळलेल्या लोण्यात आधी अंडी फोडून फेटून घ्यावीत. यातच साखर आणि व्हनिला घालून, शक्यतो विजेवर चालणाऱ्या रवीनं, हे मिश्रण बराच वेळ फेटावं. इथे मी बरीच गडद रंगाची (मळीच्या रंगाची) साखर वापरली आहे. तशी साखर भारतात सहज मिळत नाही. म्हणून केक आतूनही गडद होण्यासाठी १/४ साखरेचं कॅरॅमल करावं. बाकीची साखर पांढरी घालावी. सगळी साखर कॅरॅमलाइझ केली तर केक कडवट लागेल. कृती इथे (https://www.youtube.com/watch?v=yWxuPDynKOY). या कृतीत थर्मोमीटर वापरलं आहे. पण ते वापरायची गरज नाही. नीट लक्ष देऊन केल्यास रंगावरून कुठे थांबायचं ते लक्षात येतं. हे करायचं नसेल तर गूळ अगर खायची मोलॅसेस किंवा मेपल सिरप वापरू शकता. पण यांचं प्रमाण प्रयोग करून ठरवावं लागेल.

४. अंडी, साखर आणि लोणी यांचं मिश्रण हवेशीर आणि हलकं वाटायला लागलं, की त्यात हळूहळू बेकिंग पावडर मिसळलेला मैदा घालायला सुरुवात करावी. सगळा मैदा मिश्रणात गेल्यावर पुन्हा एकदा रवीनं हे मिश्रण जमेल तितकं हवेशीर फेटून घ्यावं.

५. यानंतर बाटलीतले जिन्नस चमच्याने अगदी हलक्या हाताने त्यात पेरावेत. रम राखून ठेवावी. अर्धे जिन्नस मिश्रणात घातल्यावर मिश्रण केकच्या भांड्यात हलक्या हाताने ओतावं. उरलेले जिन्नस हलक्या हाताने मिश्रणात पेरावेत. आणि १५० - १८० सेल्सिअस (तुमच्या अव्हनला जे तापमान मानवतं त्या तापमानाला) केक ४०-५० मिनिटं
भाजून घ्यावा. काटा किंवा सुरी खुपसल्यास तिला काहीही चिकटणार नाही आणि वरून खरपूस भाजला जाईपर्यंत भाजा.

६. केक गार झाल्यावर एका डब्यात काढून घ्या. आणि राखून ठेवलेली रम त्यावर सगळीकडे समप्रमाणात ओता. यानंतर केक ज्या दिवशी खाणार आहात त्या दिवसापर्यंत रोज त्याला दोन चमचे रम भरवत राहा.


Christmas Cake
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

सुका मेवा आणि दारू घालून ....... पण त्या आधी; आंतरजालावर प्रतिसाद लिहिण्याच्या नियमांनुसार - "तोंपासु", "हा केक दारू न वापरता करता येईल का?", "म्हणजे आता जाउन रम घेऊन येणं आलं" यातलं कुठलंही गोड मानून घ्या! बाय द वे, शेवटची प्रतिक्रिया लिहीणाऱ्याला एखाद्याला "अरे साल्या, तुझ्या घरच्या बारमधे काय हल्ली सरबतं ठेवतोस का रे?" विचारायचा मोह होतो.

तर काय म्हणत होतो, सुका मेवा आणि दारू घालून केलेला पाउंड केक वाटतोय एकंदरीत. साखर (जरा उजळ झाला तरी चालेल) आणि बटर वापरून करून बघतो. कधी आमंड फ्लोअर वापरून हा / या सारखा / कुठलाही केक केलाय का? जरा डेन्स होतो म्हणून का काय पण झकास लागतो. पण ते शिंचं योग्य प्रमाण काही सापडलं नाहीये. एकदा जमला तो नशीबाचा भाग होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"म्हणजे आता जाउन रम घेऊन येणं आलं" … "अरे साल्या, तुझ्या घरच्या बारमधे काय हल्ली सरबतं ठेवतोस का रे?" विचारायचा मोह होतो.

चुकताय तुम्ही!

समजा, एखाद्याच्या घरच्या बारमध्ये, (१) व्हिस्की, व्होडका, कोन्याक वगैरे वगैरे बाकीची द्रव्ये मुबलक प्रमाणात असतील, (२) रम नुकतीच संपली असेल, आणि (३) घरात एवढ्या दारवा पडलेल्या आहेत, तर इतक्यातच रम आणण्याची घाई काय आहे. असा विचार केला असेल, तर? (त्यात पुन्हा, ‘शक्य तोवर ओल्ड मंकच हवी’ असा जर रेसिपीचा आग्रह असेल, तर खंबा शोधीत जावे लागणार नाही काय?) अशा मनुष्यावर, परिस्थिती समजून न घेता, थेट बारमध्ये सरबते ठेवण्याचा आरोप करणे म्हणजे, त्या मनुष्यावर अन्याय होत नाही काय?

(माफी मागा बरे!)

"हा केक दारू न वापरता करता येईल का?"

प्रश्न अंमळ चुकलाय, असे विनम्रपणे सुचवू इच्छितो.

वास्तविक, ‘हा केक अंडी न घालता करता येईल का?’, असे विचारणे परंपरेस अनुसरून झाले असते. मात्र, एगलेस केक इज़ ॲक्च्युअली अ थिंग, त्यामुळे, त्यात म्हणावा तो ‘पंच’ येत नाही; सबब, पर्यायी प्रश्नाचा तुमचा प्रयत्न समजू शकतो.

मात्र, तुमच्या जागी जर मी असतो, तर ‘ही दारू केक न बनविता तशीच गट्टमस्वाहा करता येईल का?’, असा काहीसा प्रश्न मी विचारला असता.

असो. परंतु, पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, त्यामुळे… चालायचेच.

—————

याला ‘व्होद्का’ अथवा ‘व्हॉद्का’ म्हणणे आजकाल फॅशनेबल असेलही; आम्ही मात्र ‘व्होडका’च म्हणणार! नागरिकत्वाने कितीही अमेरिकन जरी झालो, तरी आतमध्ये कोठेतरी आमचा (गावठी) पिंड यत्किंचितही बदलला नाही, हे दर्शवून देण्याचा आमचा दारुण प्रयत्न समजा, हवे तर. (किंबहुना, ‘व्होद्का’ वगैरे म्हणणे हे आपले गावठित्व डेस्परेटली लपविण्याचे आत्यंतिक घाटीचोट लक्षण आहे, असे आमचे (आणखी एक) मत आहे. तर ते एक असूद्या बापडे.)

तरी बरे, हल्ली परिस्थिती तितकीही वाईट नाही. आमच्या अटलांटात आजकाल ओल्ड मंक मिळू शकते.२अ, २ब (मेड इन महाराष्ट्रा मिळत नाही, मेड इन नॉयडा नाहीतर मेड इन सोलनवर समाधान मानावे लागते, परंतु, बॉटमलाइन, मिळू शकते.) हं, वाटेल त्या दारूच्या दुकानात मिळेल, याची शाश्वती नसते, परंतु जरा थोड्याफार देशी इलाख्यात जाऊन एखादे देशी मालकाचे दारूचे दुकान२क शोधले, तर (स्टॉक२ड संपला नसेल तर) मिळण्याची शक्यता मुबलक वाढते. आणि, असे एखादे दारूचे देशी दुकान जर सापडले, तर मग तेथपर्यंत तंगडतोड (खरे तर चाकतोड) करीत गेल्यावर अनेकदा ओल्ड मंकच काय, परंतु अमृत, रामपुर… यू नेम इट! काय वाटेल ते गावून श्रमसार्थक होऊ शकते.

२अ पूर्वी असे नव्हते. भारतवारीत स्वतः विकत आणून बॅगेत घालून आणावी लागे, नि पुढील भारतवारीपर्यंत टिकवावी लागे. आता अच्छे दिन आले.

२ब काहीसे अवांतर: आमच्या अटलांटात संजीव कपूरचे एक बऱ्यापैकी रेष्टॉरंट आहे. किंचित महागडे आहे, परंतु जेवण उत्कृष्ट आहे; मात्र, येथे तो मुद्दा नाही. तर सांगण्याचा मुद्दा, त्याच्या येथील पिण्याच्या मेनूमध्ये बकार्डीचा ग्लास नऊ डॉलर, तर ओल्ड मंकचा ग्लास दहा डॉलर! (साले नॉस्टाल्जियामूल्यावर किती म्हणून लुटतील?) दुसरे म्हणजे, तुम्ही मला सांगा, माझ्या घरी जर अटलांटातच विकत घेतलेला ओल्ड मंकचा खंबा असेल, नि त्यातून मी वाटेल तेवढी ओल्ड मंक वाटेल तेव्हा घरबसल्या पिऊ शकत असेन, तर मी (केवळ नॉस्टाल्जिया के वास्ते) याच्या रेष्टारंटात येऊन नि दहा डॉलर (तोही बकार्डीपेक्षा एक डॉलर जास्त!) देऊन ओल्ड मंक (किंवा फॉर्दॅट्मॅटर बकार्डीसुद्धा) कशाला झक मारायला पिईन? त्यामुळे, तिथे जर कधी गेलो, तर मी फक्त खाऊन येतो. (बरे, दालचावलचा भाव माहीत करून घेऊन तो लक्षात ठेवण्याची आपली फिलॉसफी नसल्याकारणाने, ओल्ड मंक आणि बकार्डीच्या बाटल्यांच्या (दुकानातल्या) तौलनिक किंमती मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकणार नाही, परंतु, (दारूच्या देशी दुकानांत) ओल्ड मंकची बाटली बकार्डीहून अधिक महाग निश्चितच नसावी. पण लक्षात कोण घेतो?)

२क मोटेलव्यवसाय, डंकिन डोनट्स, सब्वे, यांचबरोबर दारूच्या दुकानांच्या धंद्यातसुद्धा देशी लोक मुबलक सापडतात. त्यातसुद्धा, दारूच्या देशी दुकानांत जास्त करून सेकंड/थर्ड जनरेशन देशी/एबीसीडी पब्लिक पुष्कळ पाहिलेले आहे.

२ड माझ्या कल्पनेप्रमाणे, न्यूयॉर्कातली कोठलीतरी कंपनी घाऊक भावात या देशी ब्रँडच्या दारवा बाकायदा आयात करून यूएसएभरातील दारूच्या देशी दुकानांत वितरित करते. तर ते एक असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मी म्हणतो एकवेळ नेमकी सिंगल माल्ट नाहीये असं झालं तर समजू शकतो पण अरे साधी रम ती, तीही कधीही मिळू शकणार नसेल तर घरी बार असण्याला काहीही अर्थ नाही, काय समजलेत?? हे म्हणजे विश्वासाने सारस्वताकडे जावं आणि त्याने "आज घरी नारळ नेमका नाहीये म्हणून सोलकढी नसणारे" ऐकवावं तसं झालं!
.
.
.
.
आपण स्वत: बिअरदेखील पित नाही, थंडाई वगैरेसुद्धा दूरकी बात, आपल्या पेयपानाचा आलेख लिंबू/कोकम सरबत, उसाचा रस (कानिफनाथ रसवंतीतलाच) आणि ताक ह्यात आटोपतो हे विसरून मत ठणकावता आलं पाहीजे - "रम घरी नाही म्हणजे काय?" ठोका Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

(बरे, दालचावलचा भाव माहीत करून घेऊन तो लक्षात ठेवण्याची आपली फिलॉसफी नसल्याकारणाने, ओल्ड मंक आणि बकार्डीच्या बाटल्यांच्या (दुकानातल्या) तौलनिक किंमती मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकणार नाही, परंतु, (दारूच्या देशी दुकानांत) ओल्ड मंकची बाटली बकार्डीहून अधिक महाग निश्चितच नसावी. पण लक्षात कोण घेतो?)

आजच जाऊन दालचावलचा भाव माहीत करून आलो. ओल्ड मंक ७५० मिली: $१८.०० (+ स्थानिक कर); बकार्डी ७५० मिलि: $१४.०० (+ स्थानिक कर).

च्या**, म्हणजे दुकानांतसुद्धा ओल्ड मंक बकार्डीहून महाग आहे तर!

असे का असावे बरे? ओल्ड मंक 'इंपोर्टेड', तर बकार्डी (मेड इन पोर्टो रिको म्हणजे निदान तत्त्वत: तरी) 'डोमेस्टिक', म्हणून? (कस्टम्स ड्यूटी, वगैरे?)

(म्हणजे, संजीव कपूर ग्लासाला दहा डॉलर म्हणजे एकंदरीत लुटतोय तर खरा; परंतु, ओल्ड मंककरिता केवळ नॉस्टाल्जिया के वास्ते म्हणून अधिक लुटत नाहीये तर! माय बॅड.)

——————————

अंशतः नवजागृत कुतूहल म्हणून, परंतु मुख्यत्वेकरून घरातला लवकरच संपुष्टात येऊ घातलेला ओल्ड मंकचा साठा रिप्लेनिश करायला गेलो होतो, तेव्हा अनायासे, म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>हा केक दारू न वापरता करता येईल का?"
येईल. पण त्यात मजा नाही.

>>कधी आमंड फ्लोअर वापरून हा / या सारखा / कुठलाही केक केलाय का? जरा डेन्स होतो म्हणून का काय पण झकास लागतो.

हो! बदामाचं पीठ वापरायचं असेल तर अंड्यांचा पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करायचा. आधी पांढरा भाग फेटून घ्यायचा. त्यात बदामाचं पीठ एकदम हलक्या हाताने मिसळायचं. चॉकलेट+बटर+ साखर+अंड्याचा पिवळा भाग फेटून हे दोन शेवटी मिसळून घ्यायचे. या केकमध्ये मी बेकिंग पावडर वापरत नाही कारण अशा पद्धतीनं केला की तो जसा होतो तसाच छान लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"एकदाच चांगला झाला होता" म्हणालो मी तेव्हा बेकिंग पावडर चांगली नव्हती म्हणून झाला का काय? करून बगतांव नी सांगतांव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पुढचा ख्रिसमस पुण्यात घालवावा काय! ती ज्यू लोकांची घोषणा असते, पुढच्या वर्षी जेरुसलेमला, तसलं कायसंसं.

मला रमखरेदीलाही जायला आवडेल, तुझ्याबरोबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साडी नेसून यावे लागेल. आणि टिकलीही लावावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नेहमीच साडी नेसते, अगदी बलोपासना करतानाही. मी भारतीय आहे, मी जो स्वयंपाक करते तो भारतीय असतो; त्याचप्रमाणे, मी जी वस्त्रे परिधान करते ती साडीच असते.

माझी टिकली पापी लोकांना दिसत नाही. पापी-डिटेक्टर आहे तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी जी वस्त्रे परिधान करते ती साडीच असते.

‘अंतर्बाह्य’?

माझी टिकली पापी लोकांना दिसत नाही.

आणि, तुमची ‘साडी’?

– (मनाने पापी, नि म्हणूनच भलत्या शंका मनात येणारा) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेथे वाइन अजिबात मिळत नाही, अशा दुकानास हिंदुस्थानात ‘वाइन शॉप’ का म्हणतात, हे एक कोडेच आहे. बहुधा तर्खडकरांनी तसे म्हणावयास शिकविले असावे.

——————————

आमच्या जॉर्जियातला प्रकार आणखीही और आहे. इथे बियर आणि वाइन हे प्रकार उर्वरित बहुतांश अमेरिकेतल्याप्रमाणे वाटेल तिथे (बोले तो, ग्रोसरी स्टोअरांत, पेट्रोलपंपांवर, फार्मसीत, झालेच तर वालमार्टात वगैरे) मिळू शकतात. मात्र, कोठल्याही प्रकारची डिस्टिल्ड लिकर विकत घेणे असल्यास खास (एक्सक्लूज़िव) दारूची दुकाने जी असतात, त्यांची पायरी चढावी लागते.

तर अशा या दारूच्या दुकानांना आमच्या जॉर्जियात ‘पॅकेज स्टोअर’ असे नामाभिधान आहे. (आता, ‘अमूकअमूक पॅकेज स्टो‌अर’ अशा दुकानावरील पाटीवरून, ‘हे दारूचे दुकान आहे’ असे होतकरू गिऱ्हाइकास आपोआप समजणे हे नेमके कसे काय अपेक्षित आहे, या प्रश्नाचे उत्तर मजजवळ नाही. मात्र, गिऱ्हाईक जॉर्जियातला असल्यास, माहीत असल्याकारणाने, कळते!)

अगदी परवापरवापर्यंत, दारूविक्रीसंदर्भात आमच्या येथे तथाकथित ‘निळे कायदे’ लागू होते. (या कायद्यांमागील नेमके तत्त्व (मला) ठाऊक नाही, परंतु, काहीतरी ख्रिस्ती फंडा आहे.) बोले तो, रविवारच्या दिवशी जॉर्जियात तर सोडाच, परंतु आख्ख्या दक्षिणी संयुक्त संस्थानांतील कोठल्याही राज्यात दारू विकण्यास मनाई होती. रविवारच्या दिवशी दारू विकत घेणे निव्वळ अशक्य असे. गेल्या काही वर्षांत मात्र, उर्वरित दक्षिणी संयुक्त संस्थानांबद्दल कल्पना नाही, परंतु, निदान जॉर्जियात तरी, हे कायदे पूर्णपणे हटविण्यात जरी आलेले नसले, तरी, अंमळ शिथिल करण्यात आलेले आहेत. बोले तो, आता ही बंदी केवळ रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत (बोले तो, चर्चच्या वेळेपुरती) लागू आहे.

या बंदीचे स्वरूपदेखील काहीसे चमत्कारिक तथा अतार्किक होते/आहे. बोले तो:

१. ही बंदी दारूच्या (बाटलीबद्ध) किरकोळ विक्रीसाठी होती/आहे; दारूच्या प्राशनासाठी नव्हे. बोले तो, पूर्वी जेव्हा आख्खा रविवारभर बंदी असे, तेव्हा, शनिवारी बाटली विकत आणून ठेवून ती रविवारी घरी प्यायला बंदी नसे. किंवा, रविवारी एखाद्या रेष्टारंटात किंवा बारमध्ये जाऊन प्यायला (नि रेष्टारंटवाल्याला किंवा बारवाल्याला तुम्हाला पाजायला) मनाई नसे. मात्र, दुकानातून विकत आणणे – चान्सिल्ले. (आतासुद्धा, दुपारी बाराअगोदर उघडणारा बार नसावा बहुधा, परंतु, असता, तर त्याला ही बंदी बहुधा लागू नसती. परंतु, तसेही, ब्रेकफास्टला दारू कोण पितो?)

२. दारूप्रमाणेच, नॉन-अल्कोहोलिक बियर/वाइनलासुद्धा (ज्यात अगोदर रेग्युलर बियर/वाइन बनवून नंतर रासायनिक प्रक्रियेने त्यातील मद्यार्क बहुतांशी काढून टाकलेला असतो) हे नियम लागू आहेत. मात्र, कुकिंग वाइनला (जी मूलतः (काहीशी हलक्या प्रतीची, परंतु) रेग्युलर वाइन असते, नि रेग्युलर वाइनइतकाच मद्यार्काचा अंश जिच्यात असतो; मात्र, जिच्यात बचकभर मीठ घातलेले असते, जेणेकरून ती वाइन म्हणून पिण्यास पूर्णतया नालायक ठरते, नि केवळ शिजविण्याकरिता तिचा उपयोग होऊ शकतो) हे नियम लागू नाहीत.

परंतु, अर्थात, धर्म/चर्च जेथे मिसळतो, तेथे तर्काची अपेक्षा करणे हेच मुळात जेथे अतार्किक आहे, तेथे… चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेही, ब्रेकफास्टला दारू कोण पितो?

तुम्हाला मिमोसा माहीत नाही! अरेरे!!

इथे मिमोसा लिहिलं आणि फोननं त्याजागी निमओसाड हा शब्द सुचवला. मिमोसा माहीत नसणाऱ्यांना निमओसाडच म्हणलं पाहिजे.

तळटिपेला आकडे देत बसणार नाही. तेवढी बुद्धी आपली आपण वापरावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुरवातीलाच दोन निरर्थक परिच्छेद, पाकसिद्धी आणि कृती यांमध्ये पहिलेअधिक आवडतात.
बाकी लेख छान झाला आहे. रमा आणणे हे काम माझ्यासारख्या निरिच्छ पुरुषांवर सोपवू शकता.
-----------
एका उडपीकडच्या क्रिस्चन सहकाऱ्यास विचारले होते की तुमचा मुख्य पदार्थ कोणता तर तो म्हणाला प्लम केक. साठवलेले प्लम वापरत असतील. बाकी भर म्हणून शेव,लाडू,चिवडा,चकल्या वगैरे. हे तर भारीच छान करतात त्यांच्याकडे.
--------------------
माझ्या चवीप्रमाणे केक म्हणजे भाजून केलेला कडवट चवीचा कमी गोड शिरा होय. आमच्याकडे अधुनमधून केक करते मुलगी. (अंडी, रम वगैरे बाद). एक जण म्हणाला की हा केक नसून पेस्ट्री आहे. (केक आणि पेस्ट्री यातला फरक माहीत नाही,पण जे काही होतं ते बरं लागतं असं बहुमत आहे.
असो, चालायचंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केरळी प्लम केक मलाही फार आवडतो. या केकमध्ये caramelized साखर घालायची कल्पना केरळी प्लम केकमधूनच उचलली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उडुपीकडचे ख्रिश्चन म्हणजे केरळी??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या चवीप्रमाणे केक म्हणजे भाजून केलेला कडवट चवीचा कमी गोड शिरा होय.

चव सोडा, अन्नपदार्थाचा पोतही बदललेला समजत नाही तुम्हाला? कमी भाजलेल्या रव्याच्या गच्चगिळगिळीत शिऱ्याचा पोतही केकसारखा नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

…यावरून, रव्याच्या शिऱ्यात रम घालण्याची कल्पना सुचून गेली, त्याबद्दल अचरट ऐसीकरांचे आभार मानलेच पाहिजेत.

कधीतरी ट्राय करून पाहायला पाहिजे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिजवायच्या आधी का नंतर? प्रयोग करून सांगा. त्या शिऱ्यात इराणी केशर मी घालणार नाही. त्रिवार नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या शिऱ्यात इराणी केशर मी घालणार नाही. त्रिवार नाही!

हरकत नाही. या पदार्थात रम सोडल्यास उर्वरित सर्व घटक (शिऱ्यासकट) वैकल्पिक आहेत. (किंबहुना, शिऱ्याला रम पाजण्याऐवजी, शिऱ्याला सोडून देऊन, बनविणाऱ्याला पाजली, तरी चालते. टीप: येथे ‘शिऱ्या’ हे ‘शिरा’ किंवा ‘शिऱ्या’ (शॉर्ट फॉर शिरीष? श्रीधर?) यांपैकी कशाचेही विकरण होऊ शकते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. पाणीपुरीच्या पाण्यात व्होडका घालून तिला "कूल" करणे.
२. घोड्याला इंजेक्शन देतात त्या सुई आणि सिरींजने संबंध कलिंगडात जिन टोचणे. आणि पाहुणे आल्यावर ते कलिंगड कापणे.
३. वेलची, लवंग घालून काळा चहा करणे आणि त्यात रम ओतून पिणे (हा खरंच छान पर्याय आहे). इथे अर्ल ग्रेही वापरता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

That’s the spirit!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिन टोचलेल्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग काढून तो थालिपीठात खपवला तर ते थालिपीठ पौष्टिक ठरेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाककृती एकंदरीत रोचक दिसते आहे. मात्र, इतकी सारी फाइट मारून स्वतः बनवेन, हे अंमळ कठीण वाटते. हं, आयता जर मिळाला, किंवा कोणी करून जर घातला, तर गोष्ट वेगळी.

(टीप: हा आमंत्रण सॉलिसिट करण्याचा प्रयत्न नव्हे. किंबहुना, मी पुण्यात कधी जर टपकलो, तर तेथून अटलांटाला मी परत जाईपर्यंत तेथे मी टपकलो होतो, याची गंधवार्तादेखील येथील कोणाला असणार नाही, याची शाश्वती देऊ इच्छितो. असो.)

तसा अनेक वर्षांपूर्वी जमैकाच्या टूरिष्टी भागांत (अर्थात टूरिष्ट म्हणून) गेलो होतो, तेव्हा तेथून आणून रम केक हा प्रकार खाल्ला होता, त्यामुळे, प्रकार एकंदरीत छान लागू शकतो, याची कल्पना आहेच.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>टीप: हा आमंत्रण सॉलिसिट करण्याचा प्रयत्न नव्हे.

तसंही पुण्यात इतक्या सटली आमंत्रण सॉलिसिट करता येत नाही. तुम्ही घरी येऊ का? असं स्पष्ट विचारलं तरी लोक "नका येऊ" म्हणू शकतात. त्यामुळे तुम्ही कुणाला न सांगता परत जाता ही गोष्ट परिस्थितीनं तुमच्यावर लादलेलीदेखील असू शकते.
असं असलं तरी, मी काही पक्की पुणेरी नाही. त्यामुळे कधी डिसेंबरात पुण्यात असाल तर जरूर कळवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक अवांतर
हा रम केक खाऊन रात्री ड्राइविंग करत येत असता ट्राफिक पोलिसाने थांबवून यंत्राने परीक्षा घेतली श्वासाची तर पॉझटिव दाखवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे अवन नाही.

माइक्रो आहे. पण अवन साठी मोठ्या पातेल्यात वाळू घालून गरम करून वापरतो. तंत्र जमले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केक खाणाऱ्या लोकांची स्वतःची ची पसंती असते आणि ते तसेच केक बनवतात.

तुमची रेसिपी फक्त तुमच्या साठी आवडची असू शकते बाकी लोकांचा त्याच्या शी काही संबंध नाही.

केक ची नवीन रेसिपी शोधल्याचा आनंद तुम्ही घेवु शकत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक क्वार्टर चांगली डार्क रम (व्हिस्कीही चालते)

काय हो हे? चार लवंगा, (वेलदोडेही चालतात)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं.

रम/व्हिस्की खाण्याचा एक पर्याय म्हणून तो केक असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

इथे दारू हे केवळ एक माध्यम आहे हो! मसाल्यांमध्ये आणि फळांमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या पाण्यात (किंवा पाणी असलेल्या दूध इत्यादी इतर पदार्थांत) विरघळत नाहीत. संत्र्याची साल दुखवली की जो वास हाताला लागतो, तो तिचा पाण्यात लगदा केला की तसाच येत नाही. पण अल्कोहोलमध्ये टाकल्यास तो तसाच येतो आणि काही काळाने त्यातलं अल्कोहोल उडून जातं (केक भाजला की बरीचशी दारू उडून जाते) पण गंध आणि चवी मागे राहतात.
त्यामुळे सिट्रस फळांना साजेशी कोणतीही दारू चालते. व्होदका, जिन वगैरे व्हिस्की रम इत्यक्या या फळांशी एकरूप होत नाहीत (असं माझं वैयक्तिक मत आहे.)
शिवाय, चांगली व्हिस्की केकमध्ये वापरण्याइतकी मारी अंत्वानेतगिरी अजून जमत नाही. त्यामुळे नसलीच रम आणि असलीच व्हिस्की, आणि तेवढं डेस्परेशन असेल तर व्हिस्कीही चालेल असं आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळ वाया घालवणे म्हणजे काय?

तसं पाहिलं तर करंज्या करणे हे सुद्धा यामध्ये धरता येईल. खोबऱ्याचं सारण आणि पुऱ्या वेगवेगळे द्यायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात, जर ओल्ड मंक उपलब्ध नसेल तर दुकानदार मॅकडाॅवेल वगैरे पर्याय सुचवतात. परंतु, किंचित वॅनिलाचा स्वाद असलेली ओल्ड मंक थेट काॅलेजकाळात घेऊन जाते, हे खरे.

त्यामुळे, एरवी विस्की वगैरेचे नाद केले तरी कित्येकांना रियुनियनला ओल्ड मंकच पाहिजे असते!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला भारतीय पुरुषांचं रम आणि व्हिस्कीबद्दलचं प्रेम कळत नाही. 'चला बसुया' अशी हाक आली की एरवी कट्टर राष्ट्रवादी, ल्युटेन्स संस्कृतीला विरोध करणारे, मोदींना मत देणारे, भिकबाळी घालणारे असे सगळे पुरुष रम आणि व्हिस्की प्यायला बसतात. या दोन्ही दारवा किती कलोनियल आहेत याची त्यांना कल्पना नसावी का? त्यांनी खरंतर मोहाच्या फुलांची दारू, किंवा काजूची फेणी प्यायला हवी.
शिवाय वाईन ही बायकांची दारू आहे असंही मत व्यक्त करतात. आणि लवकरात लवकर 'आऊट' व्हायचं असलं की व्होडका पितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही काय भानगड ? व्होडकाने लवकर आउट का होत असतील माणसे ?
भारतात सगळी स्पिरिट्स विशेषतः IMFL 42 टक्के +/१ -२ टक्केच असतात तर हे का व्हावे
की हे फक्त प्रवाद ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरपूर दारू प्यायची असली की भारतीय पुरुष व्होडका पितात असा माझा समज झाला आहे. मला व्होडका कशी (म्हणजे कशाबरोबर/कशात घालून) पितात तेही आता आठवत नाही कारण मी २००५ सालापासून आजवर एक थेंबही व्होडका प्यायले नाही.
व्होडका घातलेली काही भयाण रंगीत सरबतं बाजारात मिळतात. तीही बरीच पॉप्युलर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या दोन्ही दारवा किती कलोनियल आहेत याची त्यांना कल्पना नसावी का?

प्रत्यक्षात ओल्ड मंक ब्रँड नव्हे (तो बऱ्याच नंतर अस्तित्वात आला असावा), परंतु तो ब्रँड बनविणारी कंपनी ही मुळात जनरल डायरच्या बापाने सुरू केलेली होती, नव्हे काय?

(ओल्ड मंकचा जनक मात्र शुद्ध देशी असावा. (चूभूद्याघ्या.))

त्यांनी खरंतर मोहाच्या फुलांची दारू, किंवा काजूची फेणी प्यायला हवी.

काजूची फेणीसुद्धा तत्त्वतः तितकीच कलोनियल नसावी काय? (की, (‘साहेब’ लोकांचे चालत नाही, परंतु) ‘सायबा’ लोकांचे कलोनियॅलिझम तेवढे चालते?)

शिवाय वाईन ही बायकांची दारू आहे असंही मत व्यक्त करतात.

हाय कंबख्त! वगैरे वगैरे.

आणि लवकरात लवकर 'आऊट' व्हायचं असलं की व्होडका पितात.

(अवांतर चौकशी.) भारतात व्होडका कोठल्या ब्रँडची मिळते? (बोले तो, आयेमेफेल ब्रँड, हो. नाहीतर तसे आता उदारीकरणानंतर बरेच विदेशी ब्रँडसुद्धा मिळू लागले असतील. (चूभूद्याघ्या.))

(बाकी, दारू ही ‘आउट’ होण्यासाठी प्यायची असते, हीदेखील बहुधा टिपिकल भारतीय मानसिकता असावी. म्हणजे, एका टोकाला ‘दारू म्हणजे वाईट, त्याने संसार उद्ध्वस्त होतात, बाटलीने बाटला तो संसारातून उठला’ वगैरे वगैरे (न पिता) तरी बोंबलायचे, नाहीतर मग दुसऱ्या टोकाला जाऊन द्यायची झोकून! ‘रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंग’ची संकल्पनाच नाही! (किंबहुना, ती संकल्पना कधी रुजूच दिली गेली नाही, हीच आमच्या तथाकथित उच्च संस्कृतीची शोकांतिका आहे. आणि, त्याकरिता, झोकून पिणाऱ्यांइतकेच, न पिणारेही (आमच्या भाषेत ‘टीटोटॅलिटेरियन्स’!) जबाबदार आहेत. परंतु, काय करणार!)

'चला बसुया' अशी हाक आली की एरवी कट्टर राष्ट्रवादी, ल्युटेन्स संस्कृतीला विरोध करणारे, मोदींना मत देणारे, भिकबाळी घालणारे असे सगळे पुरुष रम आणि व्हिस्की प्यायला बसतात.

त्याचे असे आहे, आता अमेरिकेत आल्यावर बाजारात इतकी तऱ्हेतऱ्हेची चीजे मिळू लागली, तरी आम्ही फॉर ओल्ड टाइम्स सेक म्हणून चाकतोड करीत पटेल ब्रदर्सपर्यंत जाऊन अमूलच्या त्या निनावी प्रकारच्या पारंपरिक पांढऱ्या चीजच्या क्युबा घाऊक भावात आणतोच ना? तसेच आहे हे.

कसे आहे, की सोशालिस्ट जमान्यात वाढलेल्या आमच्या पिढीला दुसरे चीज माहीतच नव्हते. एक तर ते चीज ubiquitous असायचे; दुसरे म्हणजे, दुसरे कोठले चीज बाजारात उपलब्ध नव्हतेच. (नाही म्हणायला, १९८७-८८च्या सुमारास, मला वाटते ‘आरे’ने गूडा चीज (अज्ञानापोटी आम्ही त्याला ‘गौडा चीज’ म्हणायचो!) बाजारात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो फार काळ चालला नाही.) त्यामुळे, आता मुबलक व्हरायटी मिळत असली (आणि क्वचित थोडीफार खातही असलो), तरी त्या पांढऱ्या ठोकळ्याचे नॉस्टाल्जियात्मक आकर्षण वाटते.

तसेच, ओल्ड मंक, झालेच तर ती तथाकथित ‘व्हिस्की’ (बोले तो, खरीखुरी नव्हे. रंग घातलेला पातळ केलेला इंडस्ट्रियल अल्कोहोल. ‘ॲरिस्टोक्रॅट’ वगैरे छाप.) याचे आकर्षण मला वाटते भारतीयांच्या एका विशिष्ट पिढीला वाटत असावे. (कारण सोशालिस्ट काळात दुसरे जेव्हा काही मिळतच नसे तेव्हा, वगैरे वगैरे.) ‘राष्ट्रवादा’चा त्याच्याशी काहीही संबंध नसावा. (किंवा, कदाचित, एके काळच्या ‘राष्ट्रवादा’चेच हे फळ असावे, असेही उलटे आर्ग्युमेंट करता येईल.)

(यात पुन्हा एक गंमत आहे. ‘ॲरिस्टोक्रॅट’च्या इयत्तेतून जेव्हा ही मंडळी पुढे सरकत (भारताबाहेर जाऊन उपलब्धी वाढल्यामुळे, वगैरे), तेव्हा पहिले आकर्षण ‘रेड लेबल’, ‘ब्लॅक लेबल’, किंवा (अगदीच गंगेत घोडे न्हायले, तर) ‘शिवास रीगल’चे असे. (‘सरड्याची धाव’, वगैरे. तीही बहुधा ऐकीव माहितीवरून.) ती सिंगल माल्ट वगैरे भानगड बोले तो डॉक्टरेट लेव्हलचा अभ्यास. चालायचेच!)

(तरी, नशीब! अटलांटात ओल्ड मंक मिळू शकते, परंतु ‘आमच्या जमान्यातल्या’ त्या तथाकथित ‘व्हिस्क्या’ मिळत नाहीत. नव्याने येऊ घातलेल्या देशी सिंगल माल्ट मात्र मिळू शकतात. एनाराय/ओसीआयांच्या बदलत्या अभिरुचीचे हे द्योतक समजावे काय?)

(बाकी, ‘आउट होण्यासाठी पिण्या’प्रमाणेच, ‘चल बसूया’ (पक्षी: सामूहिक (अ)पेयपानाकरिता सामूहिक (अ)पेयपान. Purpose-driven वगैरे.) हीदेखील भारतीय (आणि, त्यातसुद्धा, बहुतांशी पुरुषी) खासियत असावी काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर: भारतातील (IMFL वर्गातील हजार रुपयांच्या खालील किमतीच्या) बहुसंख्य "व्हिस्की" या व्हिस्की नसून रमसदृश द्रव्य असतात हे बहुतांश लोकांना माहीत असावे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण अल्कोहोल टक्केवारीच ठरवणार ना दारवांतला फरक?

आंब्यांच्या बाबतीत चवीला फरक मान्य. पण दारू ही चढणे ( शरिरात, डोक्यात वगैरे) याने ओळखतात ना? मग IMFL mark कशाला?

दारवांचा अनुभव नसल्याने हे विधान केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वासाने पोट भरलं तर हे सगळं पुढचं कशापायी ??? अगदीच काटकसरीत राहता येईल की मग. वासानेच बास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वीन खान

हो ना! उगाच कॅलरीज खायला नकोत. असं करू शकणारे माझ्या माहितीत आहेत (मीच!).
काही लोकांचं असं विचार करूनच समाधान झालं असतं तर किती बरं झालं असतं! त्यांचे लेख वाचायला लागले नसते!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0