पीळ

कवितेच्या काही ओळी
काल सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या

यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग

मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक-
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक

मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली

खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती

वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त जमली आहे. पण ‘दमछाक’ ऐवजी ‘दमणूक’ टाकली तर ‘झुळूक’शी यमक जास्त चांगलं जुळेल.

---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मुक्तीच्या आनंदात, शेवटच्या कडव्याला यमकापासूनही मुक्ति मिळालेली दिसते. कवितेचा आशय आवडला पण ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0