आपण (मुद्रित वा ई) पुस्तकं का वाचतो? (व का वाचतच राहणार?)

p2

हार्वर्ड विद्यापीठातील मनोवैज्ञानिक जेरोम ब्रुनर (1915-2016) यानी लिहिलेल्या Essays for the Left Hand या पुस्तकात नेहमीच्या रहाटगाडग्याऐवजी वेगळे काही तरी करण्याचे प्रयत्न केल्यास, आपल्या सर्जनशीलतेला वेगळी दिशा मिळू शकते, यावर भर दिला आहे. उदाहरणार्थ एक प्रयोग म्हणून उजव्या हाताने लिहिणाऱ्यानी डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केल्यास - कदाचित सुरुवातीचा कंटाळा वा वाकडे तिकडे लिहिणे इत्यादीकडे दुर्लक्ष केल्यास – ते नक्कीच जमू शकेल. व ते जमल्यानंतर मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही, हेही तितकेच खरे.

मुळात आपण जेव्हा बालपणी लिहायला-वाचायला शिकत होतो तेव्हा आपल्यासमोर एक वेगळे विश्व उभे केले जात आहे, याची कल्पनाच नसते. अक्षरांची ओळख नसलेल्या काळात केवळ एकमेकाशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर होता. सर्व काही मुखोद्गत करूनच पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात होता. नंतर चित्रलिपी आली. त्यातूनच अक्षर उमटू लागले. काही सरळ व/वा वाकड्या-तिकड्या रेषांमधून अक्षऱ ओळख होते; त्यातून शब्दरचना होऊ शकते; वाक्यं तयार होतात; त्यातून काहीतरी अर्थ निघतो; त्यातून आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते दुसऱ्याना कळू शकते; तेही त्याबद्दलचा प्रतिसाद वा नवीन काही तरी, आपल्याला माहित असलेल्या रेषासमुच्चयातून सांगू शकतात; हे समजल्यानंतर आपण एका विस्मयकारक विश्वात हिंडू-फिरू लागलो. ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे ती व्यक्ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी नसतानासुध्दा आपण त्याचे विचार समजू शकतो, ही एक आश्चर्यकारक घटना आहे, याची आपल्याला कल्पनाच नसते. जसजसे आपण मोठे होत जातो व जेव्हा वाचणे-लिहिणे अंगवळणी पडते, तेव्हा ते जादूमय विश्व नाहिशी होते व लिहिणे-वाचणे यातील नाविन्यता हरवून जाते व हे नैसर्गिक आहे अशी समजूत करून घेत आपण आपल्या इतर कामात व्यस्त होत जातो.

p1

लिखित शब्दांची जादू काय असते याबद्दल नोबल पारितोषक विजेता हेर्मन हेस (1877-1962 ) यानी त्याच्या The Magic of the Book या पुस्तकात फार सुंदरपणे टिप्पणी केली आहे. निसर्गाकडून भेट म्हणून न मिळालेल्या अनेक विश्वापैकी माणसानेच त्याच्या बुद्धी कौशल्याने निर्माण केलेले पुस्तकविश्व याचा प्रथम क्रमांक असेल. शब्दच नसते तर, पुस्तकच नसते तर इतिहास हा प्रकारच अस्तित्वात आला नसता. मानवता ही संकल्पनाच अस्तित्वात आली नसती. एखाद्याला इमारतीतील एका बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन या मानवाच्या कर्तृत्वाचा इतिहास समजून घेत आपलेही योगदान द्यायचे असल्यास पुस्तकं वाचण्याला पर्याय नाही.

पुस्तकं काय करू शकतात आणि पुस्तक म्हणजे नेमके काय हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. काफ्काला पुस्तक म्हणजे आपल्या मनातील बर्फाळ समुद्राला फोडू शकणारे कुऱ्हाड; कार्ल सेगनला माणसातील अभूतपूर्व जादुई क्षमतेचा पुरावा; जेम्स बाल्ड्विनला तुमच्या नियतीचा बदलून टाकणारा मार्ग; नेल गायमनला मानवातील खोल दडलेल्या सत्याचा वाहक; नोबल पारितोषक विजेती विस्लावा स्झिंबोर्स्काला स्वातंत्र्याची सीमारेषा. गॅलिलिओला तर पुस्तकं म्हणजे अतीमानवी शक्तीवरील नियंत्रण.

लिखित शब्दांच्या इतिहासाचे वर्णन करताना हेर्मन हेस यानी केलेली टिप्पणी उद्बोधक ठरेल. एके काळी शब्द व लिहिणे हे एक पवित्र कार्य असे मानले जात होते. लिहिण्यात एका प्रकारची जादू होती. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय लिहिता येणे शक्य नाही असे वाटत होते. लिहिणे-वाचणे यात काही तरी गूढ असून ही पवित्र कला फक्त प्रीस्टहुडपर्यंत पोचलेल्यांनाच वा ऋषी-मुनीनाच अवगत होते, असे सामान्य लोकांना वाटत होते.

आज हे सर्व पूर्णपणे बदलले आहे. लेखन-वाचनाचे विश्व व त्यातून मिळणारे शहाणपण सर्वांसाठी खुले झालेले आहे. लिहिणे-वाचणे श्वासोच्छ्वास घेण्याइतके सोपे झालेले आहे. लेखन व पुस्तकं यांना विशेष प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्या वाचकांना मंत्रमुग्ध करू शकतात. एवढेच नव्हे तर त्या वाचकांना एका वेगळ्या भूलभुलैया जगात नेऊन सोडतात. एक प्रतिसृष्टी निर्माण करतात. उदारमतांच्या लोकशाहीवादी विचारवंत यालाच प्रगती म्हणतात. त्याचवेळी त्यांचे विरोधक मात्र ही मानवांची अधोगती व विकृतीकरण असे नावे ठेवतात.

हेस मात्र याविषयी भलताच आशावादी होता. त्यानी याविषयी लिहिलेल्या निबंधानंतर बराच काळ लोटला आहे. नवीन तंत्रज्ञान व त्यातून निर्माण होत असलेला निराशेचा सूर पुस्तकांच्या मृत्युची घंटा वाजवत आहे. व्हिर्जिनिया वूल्फ यानी चित्रपटांचे पुस्तकावरील आक्रमणाविषयी एक निबंध लिहिला होता. (spirited admonition against the evils of cinema) हेस मात्र ही नवीन माध्यमं – रेडिओ, चित्रपट (व आता इंटरनेट) - यांच्यामुळे पुस्तकावर काहीही परिणाम होणार नाही याबद्दल ठाम होता. कारण पुस्तक मानवी चैतन्य जागृत ठेवणारे एकमेव साधन आहे, याची त्याला पुरेपूर खात्री होती.
जगातून पुस्तकं नाहिशी होतील, याची भीती बाळगण्याचे काही कारण नाही. तद्विरुद्ध जितक्या मोठ्या प्रमाणात मनोरंजन व शिक्षण यासाठी कितीही प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले तरी तितक्याच मोठ्या प्रमाणात पुस्तकांना प्रतिष्ठा व अधिकार प्राप्त होत राहील. कुठले तरी चित्र विचित्र तंत्रज्ञान वापरून अल्पकाळासाठी सामान्यांच्या जीवनातून लेखन-वाचनाची हकालपट्टी करण्यात यशस्वी झाले तरी पुस्तकं ही आपले अनंत काळाचे सोबती आहेत, हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल. शब्दरचना करून लिखित स्वरूपात त्याची मांडणी करणे हे मानवी इतिहास समजून घेण्यात व प्रत्येकात प्राणशक्ती फुंकणारे, प्रत्येकात चेतना भरविणारे ते एक अत्यंत महत्वाचे साधन आहे, हे नाकारण्यात हशील नाही.

हेसच्या मते नुकतेच उदयास आलेल्या रेडिओ वा चित्रपटासारख्या शत्रूपासून मुद्रित पुस्तकांना कुठलाही धोका नाही. कारण जे महत्वाचे आहे ते पुस्तकात राहणार असून फक्त पुस्तकातील टाकावू गोष्टीच या नवीन शत्रूंच्या हाती लागणार आहेत.

एक मात्र खरे की सर्जनशील व्यक्ती कुठल्या माध्यमातून आपली सर्जनशीलता व्यक्त करू शकते, याचा अंदाज घेता येत नाही. आणि ते समजून घेण्यासाठी दीर्घकाळ वाट पहावी लागते. तोपर्यंत भिकार पुस्तकं वा चित्रपटं वा इतर कलाप्रकारांची निर्मिती होतच राहील. स्यूडो कलावंतांचा उदो उदो काही काळ होतच राहणार. परंतु तो फार काळ टिकणार नाही. जे अभिजात आहे ते नक्कीच दीर्घ काळ टिकेल. म्हणूनच अजूनही होमर, शेक्सपीयर, जॉर्ज बर्नार्ड शॉ, जेन ऑस्टिन, मिल्टन, वर्ड्सवर्थ सारख्या हजारो-लाखो अभिजात साहित्यिकांची पुस्तकं वाचली जातात. त्यामुळे टीव्हीमालिका, चित्रपटासारखी माध्यमं साहित्यप्रकाराचे काहीही बिघडू शकत नाहीत. उलट ही माध्यमं साहित्यामुळे वेगळी उंची गाठू शकतात. तंत्रज्ञानावर आधारित कलाप्रकारातसुद्धा सर्जनशीलता दाखविता येते, हे कळू लागल्यानंतर साहित्याबरोबर चित्रपट व फोटोग्राफीत सर्जनशील कलावंत भाग घेऊ लागले. वेगवेगळे प्रयोग करून त्या त्या कलाप्रकारांची उंची वाढवू लागले. कॅमेराचा शोध लागल्यानंतर पेंटिंग्स अस्तंगत होतील असे वाटत होते. परंतु चित्रकलाविदाबरोबर छायाचित्रकलाकारसुद्धा गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

पुस्तकाचे हे अजरामरत्व कशात आहे याबद्दल टिप्पणी करताना हेस पुस्तकातील विस्मयकारक कॅरेक्टर्सकडे बोट दाखवतो. नवीन माध्यमं त्यांना कितीही बदलण्याचा वा त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केले तरी ते पुन्ह पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात जिवंत होतात. माणसातील चैतन्य शक्ती निसर्गाच्या नियमाप्रमाणे फार बदलत नाही. त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही. धर्मोपदेशक वा इतर व्यावसायिक यांच्या विशेष सवलतीना धक्का लावणे शक्य आहे. लेखन-वाचनाची मक्तेदारी मोडून काढता येणेसुद्धा शक्य आहे. परंतु हे सर्व बदल कदाचित वरवरचे असण्याची शक्यता आहे. लुथर यानी बायबलचा अनुवाद केला वा गुटेनबर्ग यानी मुद्रणयंत्राचा शोध लावला. याच्या मागे मानवी चैतन्यशक्ती होती. व या शक्तीला हिरावून घेणे कदापि शक्य होणार नाही. कदाचित ही चैतन्यशक्ती काही मूठभर लोकांचा विशेषाधिकार असू शकेल व आता ती निनावी असू शकेल.

p3
.
आजच्या धकाधकीच्या कालखंडात संवेदनशीलता तीक्ष्ण होत चालली आहे. संस्कृतीची मोडतोड होत आहे, नवीन संस्कृती उदयास येत आहे. लेखक व इतर कलावंत एका बाजूला तर केवळ कंटेंटरायटर्स दुसऱ्या बाजूला अशी थेट विभागणी होत आहे. संस्कृतीतील सर्व घटकांची कंटेंटमध्ये बदलण्याची, लघुरूपीकरण करण्याची चढाओढ जोरात सुरू आहे. एके काळी समाजाचे नेतृत्व धर्मोपदेशक व विद्वानांच्याकडे होते. ते केव्हाच त्यांच्या हातातून निसटून गेलेले आहे वेगवेगळ्या स्तरावरील लेखक व बुद्धिवंत समाजाचे नेतृत्व करत होते. समाजाचे मतपरिवर्तन करत होते वा किमान समाजाचे दिशादर्शक घोषणा तरी देत होते. ते आता अस्तंगत होत आहे. नवे नेतृत्व बेजबाबदारपणे व कुठलेही अधिकार नसल्यासारखे वागत आहे. सर्जनशीलतेचा स्तर निर्मितीनंतरही कित्येक वर्षे टिकून होता. यात पूर्वेकडील व पश्चिमेकडील तत्वज्ञांचा, लेखकांचा सहभाग होता. नित्शेसारखे तत्वज्ञ काही मूठभर लोकांसाठी वैचारिक खाद्य पुरवित होते. त्यांच्या जिवीत काळात लोकांनी झिडकारले. परंतु त्यांच्या मृत्युपश्चात कित्येक दशकानी त्यांची पुन्हा आठवण झाली. त्याकाळी त्याच्या पुस्तकांच्या प्रती मुद्रित होऊ शकल्या नाहीत. अनेक कवी-कवयित्रींची अवस्थासुद्धा अशीच झाली.

पुस्तकांच्या इतिहासाकडे एक ओझरती नजर टाकल्यास हा इतिहास एखादी परिकथा आहे की काय असे वाटेल. एका क्षणात ते तुमच्यासमोर एक विस्मयकारक विश्व उभे करतील व दुसऱ्या क्षणी अदृश्य करतील. कवी जिवंत राहतील व मरूनही जातील परंतु त्यानी कोरलेले कल्पनाविश्व अजरामर राहील. पुढील कित्येक शतके त्याचे वाचन होत राहील. त्यांनी पेटवलेली ज्योत बारमाही तेवत राहील. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून विसरून जाण्याकडेच आपली मानसिकता असेल.

आज आपल्याला मिळालेली वाचनक्षमता एक अती प्रभावशाली साधन आहे. लहानपणी झालेल्या अक्षरओळखीतून बालगीते म्हणण्यातील आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यानंतरच्या काळात छोट्या-छोट्या गोष्टी, परिकथा, कॉमिक्स, साहसकथा, ऐतिहासिक रोमांचकारी कथा, थोरा-मोठ्यांच्या कथा वाचताना मिळणाऱ्या आनंदाला सीमा नाही. थोडेसे मोठे झाल्यानंतर वृत्तपत्रे वाचण्यात, त्यातील महत्वाच्या घडामोडी समजून घेण्यात, क्रीडा पानातून आपल्या हीरोंचे कर्तृत्व समजून घेण्यात आपण कसे हरवून जात होतो, याची आठवणसुद्धा आता नाही. नंतरच्या काळात आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचण्यात कसे गुंग होऊन जात होतो, हे आता आपल्या लक्षातच नाही. कथा-कादंबरी, कविता इत्यादीवर तावातावाने चर्चा करण्यात कसा वेळ जात होता, याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही.

शारीरिकरित्या असाध्य असल्याशिवाय पुस्तकवाचनाची सवय जडल्यानंतर मागे फिरणे शक्य होणार नाही. पुस्तकविश्वातील ही सफर अविस्मरणीय ठरते. या विश्वाची क्षितिजे उंचावत जातात. पहिल्यांदा बालपणी आपण घराच्या मागील विविध फुलांनी नटलेल्या बागेत बागडत होतो. नंतर ही बाग उद्यान वा जंगल होते. नंतर पृथ्वीचा तुकडा वाटणारे विस्तीर्ण मैदान होते. विस्तीर्ण अशा समुद्राच्याकाठी प्रवेश करतो. बघता बघता चांगली चांगली पुस्तकं वाचताना आपण स्वर्गसुख अनुभवू लागतो. बाग-जंगल वाटणारा हा अनुभव एका भव्य-दिव्य मंदिरासारखा कधी होतो हे कळत नाही. या मंदिरातील हजारो गर्भगृहात डोकावल्याशिवाय राहवत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळे रोमांचक अनुभव. प्रत्येक वाचकाचा अनुभवही वेगळा. या जंगलात वा मंदिरात शिरण्यासाठी हजारो मार्ग. हे मार्ग कुठल्या ठिकाणी पोचवणार आहेत हे सांगताही येत नाही. तरीसुद्धा क्षितिजे रुंदावतच जातात.

अमेरिकन पॉप सिंगर, बॉब डिलनच्या मते या जगाला आणखी गीत-कवितांची गरज भासणार नाही. कारण ज्याना खरोखरच काही ऐकायचे आहे त्यांच्यासाठी भरपूर गीत-कविता लिहिलेल्या आहेत. नियमितपणे वाचणाऱ्या वाचकाला डिलनचे म्हणणे नक्कीच पटेल. वाचणाऱ्यासाठी या जगात पुस्तकांची कमतरता कधीच भासणार नाही. खऱ्या वाचकाला नवीन पुस्तक छापले नसले तरी या पूर्वीच्या खजिन्यातून पुस्तक काढून वर्षानुवर्षे वाचत राहील, अभ्यास करत राहील. व पुस्तकविश्वात हरवून जाईल.

वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या लेखकानी लिहिलेल्या शब्दांची जादू और असते. व गंमत म्हणजे हे विविध लेखन अगदी कमीत कमी शब्दात सांगून वैश्विक मानवी सत्यापर्यंत पोचता येते. वाचनाच्या रहस्यमय अनुभवाचे मूळ त्यातील विविधता, संवेदनशीलता व तादात्म्यता यांच्यात शोधता येते. आपण जसजसे वाचत राहतो तसतसे आपले विचार स्पष्ट होत जातात. प्रत्येक पुस्तकातील वेगळेपण जाणवू लागते. वाचत असताना लेखकानी निर्माण केलेले व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते. त्याच्या मर्यादा व सोंदर्य आपल्याला मोहित करू लागतात. आपल्या भोवती त्यांचे हजारो ध्वनी ऐकू येऊ लागतात. त्याच्या स्वप्नात आपण आपली स्वप्न पाहू लागतो. या आनंदाला भाषा, प्रदेश व काळ यांच्या मर्यादा नाहीत. मानवतेकडे झेप घेणारे हे अमूल्य साधन आहे व आपण हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उदाहरणार्थ एक प्रयोग म्हणून उजव्या हाताने लिहिणाऱ्यानी डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केल्यास - कदाचित सुरुवातीचा कंटाळा वा वाकडे तिकडे लिहिणे इत्यादीकडे दुर्लक्ष केल्यास – ते नक्कीच जमू शकेल. व ते जमल्यानंतर मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही, हेही तितकेच खरे.

अमेरिकन पॉप सिंगर, बॉब डिलनच्या मते या जगाला आणखी गीत-कवितांची गरज भासणार नाही. कारण ज्याना खरोखरच काही ऐकायचे आहे त्यांच्यासाठी भरपूर गीत-कविता लिहिलेल्या आहेत. नियमितपणे वाचणाऱ्या वाचकाला डिलनचे म्हणणे नक्कीच पटेल.

मला ही वाक्यं अजिबातच पटली नाहीत. माझं एक मत सोडा. पण ही मतं न पटल्यामुळे मी -
१. सुरुवातीचा कंटाळा सोडला नाही. आणि
२. मी नियमितपणे वाचत नाही,

हे दोन आरोप माझ्यावर करण्यामागचं कारणही समजत नाही.

माझ्यावर आरोप करण्याचं दुःख नाही. मात्र ज्यांना ही मतं पटवून द्यायची असतील आणि पटत नसतील त्यांच्यावर असे आरोप करून त्यांना ही मतं पटतील का, याबद्दल शंका वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

‘We don’t need no songs nohow no’more..’ नावाच्या बॉब डिलनच्या एका अप्रसिद्ध गाण्यात तुमच्या शंकांची सांगोपांग उत्तरं दिलेली आहेत. ते ऐका (किंवा वाचा). डाव्या हाताने गिटार वाजवत म्हटलेलं आहे. नुसतं गूगल करून सापडणार नाही, पण डार्क वेबवर आहे.
----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

डाव्या हाताने गिटार वाजवत म्हटलेलं आहे.

हा (पाडगावकरांच्या?) ‘डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम’सारखा काही प्रकार आहे काय?

——————————

हे नुसते गूगल करून सापडते; त्याकरिता डार्क वेबचा आश्रय घ्यावा लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉमी गोष्ट असेल नबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

उदाहरणार्थ एक प्रयोग म्हणून उजव्या हाताने लिहिणाऱ्यानी डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केल्यास - कदाचित सुरुवातीचा कंटाळा वा वाकडे तिकडे लिहिणे इत्यादीकडे दुर्लक्ष केल्यास – ते नक्कीच जमू शकेल. व ते जमल्यानंतर मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही, हेही तितकेच खरे.

यात मांडलेल्या प्रमेयाचा संदर्भात, त्याच्या बाजूने वा विरोधात असे कसेही मला काहीच म्हणायचे नाही. (तूर्तास त्यावर मी विचार केलेला नाही; कदाचित पुढेमागे करणारही नाही.)

मात्र, या संदर्भात एक वेगळेच कुतूहल वाटते.

हेच प्रमेय, जगाच्या इतिहासात सर्वप्रथम जेव्हा कोणी काही (कोठल्याही हाताने) लिहिण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेससुद्धा हे प्रमेय लागू होईल काय?

तेव्हाची ‘चांगल्या हस्ताक्षरा’ची संकल्पना काय असेल? म्हणजे, नेहमी उजव्या हाताने लिहिणारा जेव्हा सर्वप्रथम डाव्या हाताने लिहितो, तेव्हा सुरुवातीस त्याचे हस्ताक्षर ‘चांगले’ येत नाही, असे जे आपण म्हणतो, तद्वत, जगात सर्वप्रथम जेव्हा कोणी काही लिहिले, तेव्हा त्याचे हस्ताक्षर ‘चांगले’ नसणार, असे आपण नेमके कशाच्या आधारावर म्हणू शकतो? (तोवर कोणीच काहीच कधीही लिहिलेले नसल्याकारणाने, ‘चांगल्या हस्ताक्षरा’चे कोणतेच मानक तोवर निर्माण झालेले नसणार. म्हणजे, भारतीय रेल्वेने जर वेळापत्रके छापली नसती, तर ‘आज गाडी लेट आहे’ असे म्हणण्याचे कोणतेही कारण राहिले नसते, तत्सम परिस्थिती तेव्हा नसणार काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0