Skip to main content

वैद्यकशास्त्र

महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी

एचआयव्हीसारख्या व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर प्रत्यक्ष उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. विनय कुलकर्णी सांगताहेत - करोनाच्या महासाथीकडून आपण कोणते धडे घ्यायला हवेत?

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)

कोरोना हा केवळ जास्त धोकादायक फ्लू आहे का? लशीकरण झाल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं लागेल का? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)

सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न म्हणजे कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.

मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड

पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.

वाढत्या वयात स्नायू दुबळे होत जाऊन आलेल्या क्षीणपणावर यशस्वी मात!

Taxonomy upgrade extras

वाढत्या वयात स्नायू दुबळे होत जाऊन जो क्षीणपणा येतो तो वजन उचलायच्या व्यायामाने घालविता येतो हे आता अनेकांनी सिद्ध केले आहे.
त्यातला सुरुवातीचा एक गाजलेला शोध-निबंध:
आठ आठवडे वजनाचे व्यायाम केल्यामुळे सरासरी ८७ वयाच्या लोकांची ( ६३ स्त्रिया, ३६ पुरुष ) स्नायूंची ताकद 113%, मांडीच्या स्नायूंचे क्षेत्रफळ ९%, जिने चढण्याचा वेग २८ % आणि चालण्याचा वेग 11.8% वाढला . आठवड्यात तीन दिवस, दर दिवशी ४५ मिनिटे हा व्यायाम चालत असे.

"तारुण्य टिकवून ठेवण्याच्या लढाईतला एक महत्वाचा विजय: "

Taxonomy upgrade extras

paper attached.
Post: "तारुण्य टिकवून ठेवण्याच्या लढाईतला एक महत्वाचा विजय: "

वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणणारे "एपीटॅलोन" हे पेप्टाइड

Taxonomy upgrade extras

वार्धक्याबाबतचा अलीकडचा एक अत्यंत महत्वाचा शोध: "एपीटॅलोन" हे पेप्टाइड
व्लादीमीर अनिसिमोव्ह या रशियन शास्त्रज्ञाने जन्मभराच्या प्रचंड संशोधनानंतर "एपीटॅलोन" नावाचे चार अमिनो-अम्लांचे संयुग ('पेप्टाइड ') शोधून काढले आहे, ज्याचे स्ट्रक्चर आहे Alanine-Glutamate-Asparagine-Glycine
हे संयुग आपल्या पेशींची विभाजनाची क्षमता (तारुण्याचा महत्वाचा गुणधर्म) बरीच वाढविते .
रशियात माणसांवर प्रयोग करण्याबाबतचे नियम बरेच शिथिल असल्यामुळे त्यांनी ते करून पाहिले आहेत. (अमेरिकेत नको तितके कडक नियम व खर्च असल्यामुळे ते सहजपणे शक्य झाले नसते!). त्यातील निरीक्षणे :

आयुष्यमान वाढविण्याच्या बारा कृती

Taxonomy upgrade extras

राजकारण इत्यादी सोडून जरा माझ्या आणि सर्वांच्या इंटरेस्टचा एक विषय मांडतो . खालच्या दुव्यामध्ये "उंदरात यशस्वी झालेल्या" आयुष्यमान वाढविण्याच्या बारा कृती मांडल्या आहेत . आता लगेच 'शेवटी मरणारच ना!" इत्यादी सुरु होईलच. त्याला एक उत्तर असे की साधारणपणे ज्याने आयुष्यमान वाढते त्यानेच आरोग्यपूर्ण आयुष्याचा कालखंडही (healthspan) वाढतो . दुवा अत्यंत टेक्निकल आहे त्याबद्दल क्षमस्व. मराठीत मांडायचा प्रयत्न अजून सोडलेला नाही , पण योग्य वैज्ञानिक परिभाषेच्या अभावामुळे (आणि माझ्या अज्ञानामुळे ) सतत अडखळलायला होत आहे . वेळ लागणार आहे .

मोबाइल फोनमुळे कर्करोग ?

Taxonomy upgrade extras

मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.

प्रतिजैविकांचा भडिमार आणि वस्तूस्थिती

Taxonomy upgrade extras

टीप: या चर्चेतून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. तसे वाटल्यास हा धागा लगेच काढून टाकावा ही संपादक मंडळाला नम्र विनंती!