शतशब्दकथा - सोपा निर्णय

शतशब्दकथा हा कथेचा प्रकार मी एका संस्थळावरती वाचला. मला आवडला व त्यानुसार प्रयोग करुन पहाते आहे.
अन्य कोणाला अशी कथा (१०० शब्दात) मांडायची असेल तर या धाग्याचा उपयोग करावा.
________________________________________________
ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तिला प्रश्न पडत नसतील?
इतकी देवभोळी नाही ती.
तिलाही गूढ जाणून घ्यावेसे वाटते. पूजा केल्यानंतरही ती विचार करते - तू आहेस का?
अन नसशील तर? माझ्याच हाती सर्व निर्णय? मी स्वतंत्र ? ना कोणाचा अंकुश ना कोणाचे सार्वभौमत्व. मी म्हणेन ते होणार. मी म्हणेन ती दिशा आयुष्याला देऊ शकेन.
.
खुडबुडीच्या आवाजाने ती दचकते. हा आवाज तिच्या परिचयाचा आहे.
गर्भाशय काढून टाकलेली, तिची मतिमंद मुलगी, भूक लागली की भांडं आपटते.
.
त्याक्षणी तिचा निर्णय झालेला आहे - सरळ आहे. ईश्वर आहे, त्रिवार आहे. तो तिच्या मुलीचं, तिच्या पश्चात बघणार आहे.
She cannot afford denial of his existence. Can she?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

यामध्ये ती आस्तिक असो वा नास्तिक - आतापासून मुलीची तरतूद करुन ठेऊ शकली असती वगैरे मतं मांडता येतील.
.
पण कथेमागचा उद्देश्य हाच होता की "काही काळजी/चिंता हाताबाहेरच्याही असतात" अन तेव्हा कमकुवत मनाला दिलासा द्यायला "ईश्वररुपी कुबडी" योग्य ठरते.
.
अर्थात बरेच जण अशी कुबडी न वापरताही संसार तरुन जाणारे असतीलही.
.
पण पॉइन्ट हा आहे की त्या वरील लोकांप्रमाणे असेही असतील जे कमकुवत असतील व मनोमन हे पटलेले असतील - की They cannot afford denial of his/her existence.
याला शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसणे ही म्हणता येइल.
.
पण मग शहामृगासारखे वाळूत तोंड न खुपसणे म्हणजे काय असेल याचा विचार करते व वाटते - देवाचे अस्तित्व न मानता, स्व-सामर्थ्यावर भर द्यायचा.
.
पण मग मला कोणी हे सांगू शकेल का त्या बाईने मुलीची अगदी पूर्ण आर्थिक्/मानसिक आरामाची तजवीज करुन ठेवली असेल तर शाश्वती आहे की मुलगी सुरक्षित व खूष राहील?
.
अन जर तशी शाश्वती कोणी देऊ शकत नसेलच तर एखाद्या काल्पनिक्/अज्ञात शक्तीचा सहारा घेण्यास हरकत असावी की नसावी = She cannot afford denial of his existence. ..... पण त्या प्रश्नाचे उत्तर परत वैयक्तिक आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्नएकोणसाठ साठ एकसष्ठ बासष्ठ त्रेसष्ठ चौसष्ठ पासष्ठ सहासष्ठ सदुसष्ठ अडुसष्ठ एकोणसत्तर सत्तर एक्काहत्तर बाहत्तर त्र्याहत्तर चौर्‍याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव
त्र्याण्णव -"
अवो धृतराष्ट्रभौ, हे सगळे तुहेच पोट्टे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज ह ब ह रा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

६ आक्षरी प्रतिसाद?
हेचि फळ मम तपाला.
========
शिरेसली - ही आयडिया चांगली आहे. इथे टाका की जरा बर्‍याशा शतशब्दकथा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्य!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हेच बोल्तो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

....सत्तावन्न अठ्ठावन्नएकोणसाठ साठ...
......और शतक पूरा करने की जल्दी में 'अठ्ठावन्नएकोणसाठ' शब्द उछालने की गंभीर भूल... प्रूफरीडरने कॅच पकडा और अस्वलभौ निन्न्यानवे पे औट| Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल. नर्व्हस् नाइन्टीज..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डॅम इट + तळहातावर मूठ आपटल्याचा आवाज.
त्या संपादकांच्या आवश्यकतावाल्या धाग्यावर ह्याचा एक्झिबीट म्हणून उपयोग करा आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन मुलांत योग्य ते अंतर असावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मुलींतही.

तुम्हाला ना बॉ, संस्थळाच्या प्रतिमेविषयी मुळ्ळीच म्हणजे मुळ्ळीच काळजी नाही. श्या!;-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@अस्वल & अनामिक-
ROFL हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो ROFL
ठ्ठो ROFL

ठ्ठो ROFL

ठ्ठो ROFL

ठ्ठो ROFL

ठ्ठो ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा हे काय नवीन बॅट्या तुझं डोकं ना.
ग्राफिक डिझायनर हो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(हा हा) (x 50)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी गंभीरपणे शुचिला "चांगला प्रयत्न आहे, अजून लिहीत जा" असं म्हणणार होते तर या अस्वल आणि अमुकनी साला मूड किरकिरा कर दिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा Smile
हा प्रकार जमेल आपल्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रात्री बस वारंवार येत नाही. आदली थोडक्यात चुकली असणार.
नाही, नाही, मग मिळाली नोकरी, ती रात्रपाळीची. नवसासायासाने मिळाली मुलगी, ती मंदमतीची. मग आपण तिच्यासाठी एकटेच. उशीर झाला की सांभाळणाऱ्या बाईचा तळतळाट. मुलीचा थयथयाट. तिला समज नाही, ते कळतं, तरी कान बधीर होतात.
आता पोटर्‍या बधीर झाल्यात दांडीला रेलून. झटकन बाजू व्हायचा वांधा कालचा दारुडा पुन्हा आला तर.
बाईचा दारुडा प्रेमळ आहे, म्हणे. पण तिला वेळ झाला तर रोजच्यापेक्षा जास्त हाणतो. आपणही धपाटे घालतो मुलीला कावून. मग तिचं सताड भोकाड. आपलं मुसमुस रडणं. रात्रीचं हे चक्र वारंवार येतं. थोडंही चुकत नाही.
येते आहे, ती आपलीच बस नं? असली नसली, चढू तिच्यातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आधीच फक्त शंभर शब्द, त्यांत काही इंग्रजी. कसे मोजायचे ? त्या द्येवालाच ठाऊक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधल्या सफेद जागा मोजून शब्द मोजणे अभिप्रेत असावे, बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथेतलं शेवटचं वाक्य आवडलं नाही. वरची कथा उलगडून दाखवणाऱ्या तात्पर्याप्रमाणे ते येतं. त्याची गरज नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सटल्टीचा आमचा ३६ च आकडा असल्याने ते झालं खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शतशब्दकथा आवडली. पूजा (सर्वार्थाने) केल्यानंतर ती विचार करते आणि मूल झाल्यावर देवावर विश्वास ठेवते. त्याआधी तिच्या विचारांची नस बंद असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचारांची नसबंदी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर.
संपूर्ण कथावस्तू १०० शब्दांत व्यवस्थीत बसली आहे. अन लेखिकेची मूळ कल्पनाही व्यवस्थीत पोहोचते आहे. शेवटी कथा सांगण्याचे प्रयोजन रंजनासोबत उद्बोधनही असतेच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वर्तमानपत्रातलं भविष्य बोललं, ' सुदिन- जुन्या मित्रांच्या गाठीभेठी होतील'.
भेटला, एक जुना मित्र वाटेत भेटला. किती बोलू, काय बोलू मला काही सुचेचना.
काही सुचेपर्यंत तो मित्र 'चल निघतो' म्हणाला.
'ती वाट पाहतेय' म्हणत दिसेनासा ही झाला.
प्रश्न पडला, आजच्या भविष्यात दिलेला सुदिन खरा की जुना मित्र?
असो, चालायचंच, शेवटी भविष्यच ते - माझा तसाही त्यावर विश्वास कुठे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. प्रयत्न चांगला जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

void भूतआहेतिथे(एक, दोन)
{
"भूत आहे फ्रीजमधे."
"भूत?"
"ह्होss"
"कुठे?"
"खालच्या कप्प्यात"
"इथे तर ...काहीच नाहीये-"
return शून्य.
}

दिवस १:
भूतआहेतिथे(नवरा,बायको);

दिवस २:
"हे झालं तेव्हा घरी अजून कोण होतं?
"मी होते सायेब.."
"थंड पाणी द्या रे आधी मला कुणीतरी"
"स्स्सायेब, साधं चालेल का? फ्रीज उघडायला भिती वाटते."
"का?"
भूतआहेतिथे(इन्स्पेक्टर, कमलाताई);

दिवस ३०:
"मस्त फ्लॅट आहे. हवेशीर. बाहेरचा व्यू सॉलिड!"
"ह्म्म.. सेलिब्रेट करू बे. फ्रीजमधे बघ"
"नाही.. बाहेरून-"
"काय को बे?"
भूत्_आहे_तिथे(रूममेट१, रूममेट२);

दिवस १३३४:
"हॉ! काय बरं वाटलं बाहेर आल्यावर.."
"जीव कोंडला होता आत. चल जरा घराबाहेर जाऊ."
"कुठे? बाहेर? नको"
"का?"
माणूसआहेतिथे(भूत१,भूत२);
runtime Error- Function missing: माणूसआहेतिथे()

=========================
शंभरी मोजायला वर्ड काऊंट वापरलाय हो.
========================

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__ थोर आहे ही शतशब्दकथा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

समजावून घेतेय. आवडली आहे - एक वेगळा प्रयोग म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा...!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

अस्वला, पाया पडते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

@आ.बा, शुची, मेघना-खरं तर हा चावटपणा आहे Tongue
programming करताना जर एकच आशय पुन्हा पुन्हा वापरायचा असेल तर त्याला function मधे टाकतात. आता शतशब्दांची जर मर्यादा असेल तर जास्त आशय कसा व्यक्त करता येईल? functions वापरून! म्हणून तो पॅटर्न वापरलाय, बाकी सब नॉर्मल.---
आणि मॅट्रिक्स वगैरे नाव आणि शेवटची ओळ हे उगाच गिमिक Biggrin त्यावरून आठवलं, मूळ मॅट्रिक्सवरून निघालेला अ‍ॅनिमॅट्रिक्स जरूर बघा. एकदम जब्राट प्रकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0