.

.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

त्याला असे कोणीही सोम्यागोम्या येऊन, त्याचे स्वत:चे काहीही योगदान न देता नावे ठेवतो आणि आणखी गैरसमज पुढे पसरवतो हे अतिशय चुकीचे आहे.

म्हणजे लिनक्स हे फक्त संगणक प्रणालीत बदल करता येणार्‍यांसाठीच आहे का?
जर मी एक चित्रकार आहे किंवा नट आहे किंवा नावाडी आहे किंवा मंदीरातला पुजारी आहे आणि मला संगणकातील काहीही येत नाही तर मी काहीही योगदान करू शकत नाही हे सत्य आहे
मात्र तरी मला लिनक्स वापरणे जड जाते? मग मी फक्त अपराधगंडाने त्याची स्तुती करू!? हॅट मी ते जड आहे त्यात मला आवश्यक ती सॉफ्टवेअर्स चालत नाहीत तर तसेच म्हणणार.,.. खुशाल नावे ठेवणार!

लिनक्स हे हुच्च्भ्रू आहे असे मला वाटते. विंडोज वापरायला कितीतरी सोपे आहे.
तिथे नुसते स्वातंत्र्य आहे पण सुविधा नाही (आणि त्या सुविधा बनवणे माझ्या कुवती पलिकडचे आहे) तेव्हा गड्या अपुला विंडोज बरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा! संगणकाचे तांत्रिक ज्ञान असणे हे अन्नाइतकी जीवनावश्यक गरज आहे होय!
असो. मग चालु द्या!

आमच्यासाठी संगणकाचे तांत्रिक ज्ञान ही दुय्यम बाब आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.
जाता जाता: विंडोजवाले नाही बॉ असे म्हणत. ते तर आमच्यासारख्या अडाण्यांनाही सहज वापरता येईल अशी प्रणाली देतात! जर तरीही वापरता येण्यात अडचणी असतील तर स्वतःचे प्रॉडक्ट बदलतात वापरकर्त्यांना तुम्ही किती अडाणी आहात म्हणत नाहीत!
लिनक्स सारख्या प्रणाल्यांचा मुख्य तोटा हाच की त्याला "विक्रेता" नाही त्यामुळे "ग्राहक" नाही आणि त्याच्या प्रश्नांना कोणी वाली नाही (उत्तरदायी नाही)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिनक्स हे मुळातच आर्थीक फायद्यासाठी बनवलेले आहे का? मग तिथे हे सगळे कसे असेल? बरे कोणी एकाच व्यक्तीने त्याच्या स्वतःसाठी बनवले आहे का? सगळ्यांनी एकत्र येऊन सगल्यांसाठी बनवले आहे ना?

असेल लिनक्स हेतु उदात्त म्हणून त्याच्या कशालाही चांगले म्हणायचे? का?
मुळात लिनक्स वापरणे सोपे नाही तरी फक्त हेतू उदात्त आहे म्हणून माझ्या आयुष्याचे काही दिवस ती प्रणाली शिकण्यात घालवायचे? का?

प्रश्न पैशाचा नाही उत्तरदायित्त्वाचा आहे. माझ्याकडे काही चाललं नाही तर त्यासाठी विंडोजने जे काही कॉल सेंटर वगैरे दिलं आहे ते मला कोड करायला लावत नाही. नुसता एक पॅच देते. नी काम होतं! मला काय करायचंत त्यात काय कोड आहे ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तंत्रअडाणी आहे हे तर मी आधीच सांगितले! त्यात नवे काय?
मी तंत्रअडाणी असूनही विंडोज वापरू शकतो आणि लिनक्स वापरू शकत नाही! यातच कोणती प्रणाली सुलभ आहे हे स्पष्ट नाही का होत?
मी अडाणी असूनही मला विंडोजमध्ये आलेला प्रश्न सोडवायला सोपे जाते, मला हवा तो सॉफ्टवेअर विंडोजमध्ये चालवता येतो पण लिनक्स येत नाही यात कोणाची मेंटेनेबिलीटी अधिक सुलभ आहे हे स्पष्ट नाही का होत?

--

आणि ठेवायची असतील नावे तर आधी योगदान द्या - एवढेही साधे सौजन्य दाखवता येऊ नये तुम्हाला?

हे म्हणजे सार्वजनिक मुतारीत घाण वास येतो असे म्हणायच्या आधी तुम्ही किती वेळा स्वच्छता केली आहे असे विचारणे झाले! लिनक्स सुधारणे हे माझे काम नाही!
मी त्याचा केवळ वापरकर्ता होऊ इच्छितो मला तयार, सर्व काही चालणारे आणि सुलभ असे प्रोडक्ट हवेय नुसते, त्याच्या काय काय आहे हे शिकायचे नाहिच्चे!

==

बाकी काही मित्रांनी व्यनी खरडींतून सांगितल्यानुसार मी हा छळ (ह. घ्या) थांबवतो आहे. मी मुद्दाम जमिनी वास्तवाच्या बाजूची जरा अभिनिवेषी अ‍ॅडवोकसी करत होतो.
पण त्या शैलीने तुम्हाला त्रास होतोय असे दिसते. मी थांबतोय. या नादात काही उणापुरा शब्द लिहिला असेल तर क्षमस्व!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तंत्रअडाणी असूनही विंडोज वापरू शकतो आणि लिनक्स वापरू शकत नाही! यातच कोणती प्रणाली सुलभ आहे हे स्पष्ट नाही का होत?

+१ मलाही लिनक्स अवघड वाटलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय मी १५ वर्षांपूर्वी वापरलेलं खरं. आय अ‍ॅम नॉट इन टच.

मग नवे मत तयार करा.

नक्कीच. असं कन्व्हिन्स करा ना अभिनव. Smile तुम्ही तुटून पडू नका. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑल थिंग्ज आर डिफिकल्ट बिफोर दे आर ईझी,

A

इतके म्हणून खाली बसतो.

आभारः विकीमीडिया चित्रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग जी गोष्ट तुमच्यासाठी दुय्यम आहे त्यावरील लेखात स्वत:चा किमती वेळ वाया घालवुन निगेटीव्ह प्रतिसाद का देता आहात? त्या उत्पादनाची बदनामी करण्यासाठीच ना? की तुम्हाला लिनक्स शिकणॅ जमले नाही हे लपवण्यासाठी?

अतिशय अनावश्यक अभिनिवेश!!!! तुम्हाला फक्त गुडी गुडी कमेंटस हव्यात का? मग तसं लिहायचत ना लेखात.

आमचे आम्ही बघुन घेऊ.
जे तुमच्यसाठी महत्वाचे आहे तिकडे जाऊन लक्ष द्या.

काय हे!!!
___
तुम्ही लिनक्स शिकविण्याचे क्लासेस घेता का हो? Wink
___
बाय द वे स्त्रोत नसून तो स्रोत (https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4) असा शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मला सांगणारे कोण?

मला तुम्ही संस्थळावरती नवीन वाटलात म्हणून माझं मत सांगीतलं. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋचा प्रतिसाद वरकरणी नकारात्मक दिसत असला, तरीही (मला वाटतं) तो जे सुचवू पाहतो आहे, ते असं आहे:

सर्वसामान्य वापरकाला काही अडचणी असतात. त्या सोडवण्याइतकं तांत्रिक कौशल्य त्याच्याकडे नसतं. त्याचं मुख्य काम सोडून त्यानं ते कौशल्य मिळवावं ही अपेक्षाही गैर ठरते. अशा वापरकाच्या दृष्टीनं लिनक्स काही विचार करतं का? तसा करत नसेल्, तर त्यामागचा हेतू कितीही उदात्त असला, तरी त्याच्या प्रसारा-प्रचारात अडचणी येणार.

या मुद्द्याकडे तो लक्ष्य वेधू पाहतो आहे. त्याबद्दल तुम्ही काही मत मांडाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा एका मित्राच्या पडीक लॅपटॉपवर उबंटू इन्टॉल केले होते पुढे मला हवे ते त्यावर काहीच चालेना. काही चालवायचं तर अजून काही लिंका वाचायला सांगतात! त्यात दिलंय तसं करा म्हणे! कोण वाचत बसणार. महिनाभर झटापट केली मग दमलो नी पुन्हा गुमान विंडोजकडे वळलो.

विंडोजवर इथे नेक्स नेक्स्ट नेक्स्ट केले की हव्वे ते क्षणात मिळते, एक अक्षर न वाचता! हे ब्येष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिनक्सचा 'वापर' अ‍ाणि इनस्टॉलेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वापराची गोष्ट सोपी वाटणे हे सवयीचा भाग आहे.

विंडोज 'सोपे' अ‍ाहे कारण एक तर तुम्ही संगणक विकत घेता तेेव्हा ते आपोआपच तुमच्या सिस्टमवर आलेले असते. किंवा तुमच्या संगणकासोबत त्याची सीडी - तुमच्या संगणकाला लागणाऱ्या ड्रायवरच्या सीडीसकट आलेली असते. त्यामुळे नेक्स्ट-नेक्स्ट करणे सोपे आहे. त्यातही बहुतांश लोकांना इकदा इन्स्टॉल केलेले विंडोज परत टाकावे लागत नाही त्यामुळे डिस्प्ले चालत नाही, वायफाय चालत नाही, आवाज चालत नाही या अडचणी येत नाहीत.

लिनक्स अवघड आहे म्हणजे मुळात इन्स्टॉलेशन असे आयते होत नाही. मुख्य अडचणी डिस्प्ले-ऑडिओ आणि वायफाय ड्रायवरच्या आहेत. आता लिनक्स-मिंट सारख्या डिस्ट्रोमध्ये हे अगदी विंडोजसारखे एकाच सीडीत येते. आयते इन्स्टॉल केलेले लिनक्स हे आयत्या विंडोजपेक्षा नक्की सोपे आहे. मी घरी बायकोच्या आणि भावाच्या लॅपटॉपवर उबुंटु इन्स्टॉल करुन दिले. इमेल चेक करणे, इंटरनेट ब्राऊजिंग, यूट्यूब, बातम्या वाचणे वगैरे सामान्य वापरकर्त्यांच्या कामांसाठी आवश्यक ती सर्व सॉफ्टवेअर्स तिथे उपलब्ध आहेत. कुठे चुकून एखाद्या जाहिरातीवर क्लिक वगैरे होऊन मालवेअर घुसण्याचा धोका बहुतांशी नष्ट झालाय. आणि काही महिन्यांच्या वापरानंतर त्यांना लिनक्स हे विंडोजपेक्षाही सोपे वाटते आहे.

विंडोज सोपे वाटणाऱ्यांनी विंडोज ७/८ ते १० असे फ्रेश इन्स्टॉल किंवा अपग्रेड करुन पाहा. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे लिनक्स हे फक्त संगणक प्रणालीत बदल करता येणार्‍यांसाठीच आहे का?

नाही. साधारण यूजरसुद्धा (म्हणजे प्रोग्रामिंग न करणारा, फक्त इंटरनेट ब्राऊजिंग, ईमेल, सिनेमा बघणे, डॉक्युमेंट बनवणे, प्रिंटींग करणे इ.) वापरू शकतो.

जर मी एक चित्रकार आहे किंवा नट आहे किंवा नावाडी आहे किंवा मंदीरातला पुजारी आहे आणि मला संगणकातील काहीही येत नाही तर मी काहीही योगदान करू शकत नाही हे सत्य आहे

नाही, हे सत्य नाही. तुम्ही इतर प्रकारे मदत करू शकता: उदा: बग टेस्टिंग करणे आणि ते डेव्हलपर्सना कळवणे, काय सुधारणा हव्या ते सांगणे (उदा. नवीन फीचर्स, यूजर ईंटरफेस वगैरे), डॉक्यूमेंटेशन करणे, यूजर मॅन्यूयल किंवा व्हिडीओ बनवणे, इतर यूजर्सना प्रश्नांची उत्तरे देणे, ब्लॉगवर/विकीवर माहितीचे लेख लिहिणे, आर्थिक मदत/डोनेशन देणे वगैरे.

मात्र तरी मला लिनक्स वापरणे जड जाते? मग मी फक्त अपराधगंडाने त्याची स्तुती करू!? हॅट मी ते जड आहे त्यात मला आवश्यक ती सॉफ्टवेअर्स चालत नाहीत तर तसेच म्हणणार.,.. खुशाल नावे ठेवणार!

स्तुती करा असे कुणीच म्हणत नाहीये. तुम्ही वापरून बघा, आवडले तर इतरांना सांगा. नाही आवडले तर काय सुधारणा करता येतील, ते सांगा.

लिनक्स हे हुच्च्भ्रू आहे असे मला वाटते. विंडोज वापरायला कितीतरी सोपे आहे.

काय उच्चभ्रू आहे, हे वैयक्तिक मत असू शकते. थोडा प्रयत्न केला आणि सवय झाली की लिनक्स पण सोपे वाटेल.

तिथे नुसते स्वातंत्र्य आहे पण सुविधा नाही (आणि त्या सुविधा बनवणे माझ्या कुवती पलिकडचे आहे) तेव्हा गड्या अपुला विंडोज बरा!

स्वातंत्र्य (Freedom: "Free as in Freedom, not free as in free beer") हा कळीचा मुद्दा आहे. विंडोजवर सुद्धा तुमचे स्वातंत्र्य जपणारे फ्री सॉफ्टवेर वापरून बघा. मी वापरतो त्याची यादी इथे देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...तुला पण लिहितो - "...पहिल्या काही प्रतिसादात लेखकाने जे गमावलं होतं ते तू या उत्तराने परत कमावलंस - नुसत्या श्रेणीत हे सगळं सांगता येइना म्हणून हा खास प्रतिसाद!!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋ'ने मिस केलेला प्वॉईंट तुम्ही प्रतिसादात दिलाय का? Biggrin Biggrin Blum 3 Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक अदिती लिनक्स वापरते. कॉलिंग हर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हय, व्हय. मी लिनक्स वापरते.

२००४ मध्ये मी प्रथमच लिनक्स वापरायला सुरुवात केली. ते काहीसं लादलं गेलंच म्हणा. तेव्हा लिनक्स बघून दडपून जायला होत असे. ऑफिसात रेड हॅट लिनक्समधून काढलेलं कोणतंसं लिनक्स असे. मी लॅपटॉप घेतला तेव्हा घरमित्राच्या सूचनेबरहुकूम आणि त्याने सगळ्या खटपटी करून दिल्या म्हणून जेन्टू नामक लिनक्स वापरायला सुरुवात केली. रेड हॅट, जेंटू या प्रकारांना लिनक्सचे फ्लेवर्स म्हणायची पद्धत आहे. ज्यांना लिनक्सबद्दल काही माहीत नाही त्यांच्यासाठी - वरकरणी या गोष्टी, सगळे फ्लेवर्स सारखेच वाटतात. आत चालतं काय आणि कसं ते बदलतं. पण टीव्ही बघायचा असेल तर आतली सर्किट्स कशी काम करतात हे माहीत असण्याची गरज नाही तसंच लिनक्स आणि एकूणच ऑपरेटींग सिस्टम्स आणि कंप्यूटरच्याही बाबतीत खरं आहे.

तर ते रेड हॅट आणि जेंटू अशी द्वि-ओएस-पद्धती माझ्या आयुष्यात काही काळ होती. त्याच सुमारास आजूबाजूचे काही मित्र चवीचवीने लिनक्सचे निरनिराळे फ्लेवर्स काय आणि कसे याबद्दल गप्पा मारत असत. ते संस्कृत बोलतात, असं म्हणून मी तिकडे दुर्लक्ष करायचे.

२००६ च्या सुमारास उबुंटू नावाचं लिनक्स आलं. तोवर माझे हे सगळे मित्र, वेगवेगळे फ्लेवर्स वापरून, चाखून, दमून म्हातारे झाले होते. त्यामुळे "आलंय काहीतरी नवीन लिनक्स" म्हणून सोडून दिलं. उबुंटूवाल्यांना पुढे लोकांकडून मदतीचा हात मिळाला आणि उबुंटू बरंच प्रसिद्ध आणि वापरण्यासाठी सोपंही झालं. उबुंटूचा मोटोच आहे - माणसांसाठी बनवलेलं लिनक्स. आणि ते खरंच आहे. मी गेले पाचेक वर्षं किमान कुबुंटू (ही उबुंटूचू चुलत बहीण) वापरत्ये. काहीही अडचण आलेली नाही. काही अडचण आलीच तर गूगलमावशी आहेच.

उबुंटू वापरेस्तोवर, आणि ते आल्यावरही सुरुवातीचा काही काळ लिनक्सवर काहीही धड चालणार नाही, नवं हार्डवेअर त्रास देईल अशी परिस्थिती होती. गेली सहाएक वर्षं मी स्वतःचे कंप्यूटर्स आणि मित्रमंडळाचे कंप्यूटर्स धरून ताज्या दमाच्या कंप्यूटरांवर लिनक्स चढवायला मदत करत आहे. ब्लूटूथ चाललं नाही, वायफाय चाललं नाही, प्रिंटर काम करत नाही अशा काहीही अडचणी आलेल्या नाहीत. समोर दिलेल्या सूचना मठ्ठपणे कॉपी केल्या की सगळं व्यवस्थित चालतं.

आता ऋचा प्रश्न - चित्रकार, नावाडी, पुजारी, नट या लोकांनी लिनक्स का वापरायचं?
चांगला प्रश्न आहे.

लिनक्स वापरणं कठीण आहे का? अजिबात नाही.
सामान्य वापरात लिनक्स वापरताना अडचणी येतात का? अजिबात नाही.
चित्रकार, नावाडी, पुजारी, नट या लोकांना फक्त विंडोज किंवा मॅकसाठी बनवलेली सॉफ्टवेअर्स वापरायची गरज नसेल तर विंडोज काय आणि लिनक्स काय, काहीही फरक पडत नाही. इंटरनेट सर्फींग, लेखन, फोटो गोळा करणं, फोटो प्रोसेस करणं, फेसबुक-व्हॉट्सअॅप वापरणं, पॉर्न बघणं अशा सामान्य आयुष्यात चालणाऱ्या गोष्टी करण्यासाठी विंडोज आणि लिनक्स यांची काठिण्यपातळी अजिबात वेगळी नाही. दोन्ही सारखंच.

फरक कुठे पडतो?
कंप्यूटर विकत घेतला की विंडोज त्यासोबत येतं. एकतर कंप्यूटरच्या किंमतीत ते असतं किंवा चोरीची प्रत कोणीतरी देतं. लिनक्सचं तसं नाही; कष्ट करून ते इनस्टॉल करावं लागतं. हे कष्ट फार नाहीत. कोणी ओळखीचे लोक लिनक्स वापरणारे असतील तर फोन करा, चार प्रश्न विचारा, अर्धा तास जास्त खर्च करून लिनक्स इनस्टॉल होईल. लिनक्स वापरणाऱ्या लोकांशी मैत्री असेल तर त्यांच्याच गळ्यात पडून ते इनस्टॉल करून घ्या.

लिनक्स वापरण्याचा फायदा -
पॉर्न पाहताना, सिनेमे भलतीकडून डाऊनलोड करताना, फुकटच्या गोष्टी डाऊनलोड करताना व्हायरस आला, सिस्टम करप्ट झाली असल्या गोष्टींची भीती बाळगण्याचं कारण नाही.
मराठी टंकन करायचं असेल पण इनस्क्रिप्ट नावाचा, अजिबात इन्ट्यूइटीव्ह नसणारा, सगळी विरामचिन्हं उपलब्ध करून न देणारा कळफलक वापरायचा नसेल तर लिनक्स+बोलनागरी वापरा. विंडोजमध्ये असं काही करता येत नाही. (पुन्हा, स्वतःला कष्ट करायचे नसतील तर लिनक्स वापरणाऱ्या मित्र-मैत्रिणींच्या गळ्यात पडून फोनवर किंवा प्रत्यक्षात काम करवून घ्या. साधारणतः लिनक्स वापरणारे लोक हौशी असतात; हौसेने मदतही करतात.)

मी लिनक्स का वापरते -
१. मला सवय झाल्ये.
२. विंडोज आवडत नाही. वापरण्याची पद्धत आवडत नाही, मराठी टंकनाची पंचाईत होते. बरहासुद्धा मला आवडत नाही; अमराठी लोकांनी बनवलेल्या देवनागरीत ऱ्य, ऱ्ह, अॅ ही खास मराठी चिन्हं टंकायची धड सोय नसते.
३. पैसे खर्च करून भिकार सिस्टम वापरण्यापेक्षा फुकटातली गरीब सिस्टम वापरणं मला जास्त योग्य वाटतं. किमान पैसे फुकट जाण्याचं दुःख तरी होत नाही.
50 nerds of grey

लिनक्सचं पुढे काय होईल असं मला वाटतं -
विंडोज हा मोठा अजगर आहे; मॅकचंही तेच. कंप्यूटर विकत घेतला की त्यावर ओएस येतेच. ही ओएस विंडोज किंवा मॅक या दोनपैकी एकच असेल तोवर लिनक्स फार मोठं होणार नाही. सामान्यांपर्यंत लिनक्स पोहोचायचं तर ते बसल्याजागी, एकही दमडा आणि एक जादा सेकंदही फुकट न घालवता आलं पाहिजे. हे होणं जरा कठीण आहे; त्यामुळे जनता लिनक्स वापरत्ये असं दृश्य दिसेलसं मला वाटत नाही. पण काही हौशी लोक लिनक्स टिकवून ठेवतील आणि त्यांना पोट भरण्याइतपत पैसे देणारे दानशूर लोक असतील. त्यामुळे लिनक्स टिकून राहील. (इंटुक लोकांवर कितीही वरवंटा फिरवला तरीही ते उगवायचे राहत नाहीत, तसंच. Wink )

कमी लोकप्रियतेचा फायदाही आहे. जशी सॉफ्टवेअर्स लिहिताना लोक लिनक्सचा विचारच करत नाहीत तसं व्हायरस लिहितानाही कोणी विचार करत नाहीत. मोठमोठ्या हॅकर्सच्या रेडार्समध्ये लिनक्सवर लक्ष ठेवण्याची प्रणालीच नसते.

पुन्हा ऋचा प्रश्न - चित्रकार, नावाडी, पुजारी, नट या लोकांनी लिनक्स का वापरायचं?
वापरावंसं वाटलं तर वापरावं. त्यांच्या मागे लागून त्यांच्या कंप्यूटरांवर लिनक्स चढवून देणारे मित्रमैत्रिणी असतील तर हे लोक लिनक्स वापरतीलही. माझ्या दोन मित्रांच्या घरच्या काही कंप्यूटर्सवर फक्त लिनक्सच आहे. माझ्या कंप्यूटरवर आलेलं विंडोज मी उडवलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...पहिल्या काही प्रतिसादात लेखकाने जे गमावलं होतं ते तू या उत्तराने परत कमावलंस - नुसत्या श्रेणीत हे सगळं सांगता येइना म्हणून हा खास प्रतिसाद!!

तुझे पुढचे प्रतिसादही वाचले. सगले वाचून डोक्यात आलेले प्रश्न वेगळे लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आदिती, मस्त आणि उपयुक्त प्रतिसाद.
चार पाच वर्षांपूर्वी उबंटू इन्स्टॉल केलं होतं, पण फारसं वापरलं नाही. या प्रतिसादामुळे वापरायला हवं असं वाटतय. विंडोजला व्हायरस आणि मालवेअर त्रास देतात. खास करुन मराठी नीट टंकता येत असेल तर छानच. बरहाला पर्याय मिळाला तर हवाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी टंकन करायचं असेल पण इनस्क्रिप्ट नावाचा, अजिबात इन्ट्यूइटीव्ह नसणारा, सगळी विरामचिन्हं उपलब्ध करून न देणारा कळफलक वापरायचा नसेल तर लिनक्स+बोलनागरी वापरा.

बरहासुद्धा मला आवडत नाही; अमराठी लोकांनी बनवलेल्या देवनागरीत ऱ्य, ऱ्ह, अॅ ही खास मराठी चिन्हं टंकायची धड सोय नसते.

बोलनागरीत व ह्यात काय फरक आहेत? मराठी टंकनासाठी कोणता अधिक योग्य वाटतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

बोलनागरीत व ह्यात काय फरक आहेत? मराठी टंकनासाठी कोणता अधिक योग्य वाटतो?

कीबोर्ड लेआऊटमध्ये किंचित फरक आहे. दोन्हीं इंप्लिमेंटेशनबद्दल चांगली गोष्ट अशी दिसते की आपल्याला आपल्या कीबोर्डची रचना ठरवता येते. उदाहरणार्थ - f आणि F माझ्याकडे ट आणि ठ आहेत. कोणाला ते प आणि फ बनवायचे असतील तरीही शक्य आहे.

आपल्याला कोणता लेआऊट आवडेल ते आपलं आपण ठरवावं. कोणती रचना अधिक योग्य हे उत्तर बऱ्यापैकी व्यक्तिनिष्ठ असेल. तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या माहितीनुसार ऊ साठी डबल ओ आहे; मी राईट-आल्ट+शिफ्ट+यू वापरते. बोलनागरी ज्या प्रकारे लिनक्समध्ये वापरलं जातं त्यात एका कीवर चार देवनागरी अक्षरं मॅप करता येतात - कॅपिटल, स्मॉल, आणि राईट आल्ट+कॅपिटल, स्मॉल. त्यामुळे u वापरून ऱ्हस्व, दीर्घ उकार आणि उ, ऊ टंकता येतात. बोलनागरीत अकारान्त शब्दांच्या शेवटी अ टंकावा लागत नाही; जोडाक्षरं बनवण्यासाठी हलन्त टंकावा लागतो.
तुम्हाला यांतला जो पर्याय सोपा वाटेल तो वापरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

माझ्याकडे अजूनही कंम्प्युटर नाही परंतु पंधरा वर्षांपासून IC CHIP, DIGIT वगैरे मासिकांतून याचे वाचन करत होतो.अगर मेरे बस की बात होती तो मैं मेरा "windows for dummies" के श्टाइल पर "linux for अचरट develop करता।जाने दो टैम टैम की बातें हैं । नही तो आप लोग मेरी ओएस पर काम करते दिखाई देते।छोडो कल की बातें।
असो.
लेख आणि प्रश्नोत्तरे आवडली.
इकडे या लिनक्सवर BOSS ओएस CDACने काढून धा वर्स झालीत.BOSS नावामुळे लोक घाबरतात.
B O S Sची बदनामी थांबवा ! ! ! ! !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्याचे शिर्षक बदलून "अभिनव" आणि "ऋ" ची प्रश्नोत्तरे असे करावे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अभ्यासपूर्ण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला काही शेवटपर्यंत किल्ला लढवता येत नाही ब्वॉ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही खरे आहे मुटके साहेब. अभिनिवेश आणि अभ्यासपूर्णता दोन्ही. म्हणून दोन्ही सांगीतले.
___
१५ वर्षांपूर्वी वपरलेले होते व नंतर उपयोग केला नाही. आता भीती बसलीये. पण प्रयत्न करेन. तुम्ही व अदिती दोघं म्हणताय म्हणुन + नवीन शिकायचं म्हणुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला लिनक्स इनस्टॉल करताना भरभक्कम नैतिक आणि मानसिक पाठींबा आणि मोडकीतोडकी मदत हवी असेल तर फोन कर.

सध्या सोप्या सूचना -
१. मी कुबुंटू वापरते, मला ते आवडतं म्हणून ते वापरा असं सुचवते. उबुंटू/कुबुंटूचे LTS - Long Time Support प्रकार येतात. मागच्या वेळचं LTS १२.०४ आहे (नक्की ना?). म्हणजे २०१२ सालच्या एप्रिल - चौथ्या महिन्यात आलेलं. ते डाऊनलोड करा. आयएसो फाईल मिळेल.
२. वुबी WUBI नावाचं सॉफ्टवेअर विंडोजवर टाका.
३. रिकामी यूएसबी स्टिक कंप्यूटरमध्ये टाका. वूबी सुरू करा आणि सूचना वाचून नेक्स्ट-नेक्स्ट करा. ती डाऊनलोड केलेली फाईल यूएसबीवर चढवून, या यूए्सबी ड्राईव्हला 'लाईव्ह लिनक्स' बनवायचं आहे.
४. कंप्यूटर बंद करा; यूए्सबी ड्राईव्ह कंप्यूटरमध्ये राहू द्या आणि कंप्यूटर सुरू करा.
५. थोडा वेळ नेक्स्ट-नेक्स्ट खेळा. थोडे काही व्यक्तिगत प्रश्न विचारले जातील; नाव काय, टाईमझोन कोणता असले. त्यांची उत्तरं द्या.

एक पावरनॅप काढा, चहा/कॉफी प्या. लिनक्स इनस्टॉल झालेलं असेल. कंप्यूटर रिस्टार्ट करताना यूएसबी काढून टाका. लिनक्स वापरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थँक्स अदिती. मला गळ्यात पडायचं होतं. आता तूच "आ बैल मुझे ...." Wink
मला नवीन शिकायचय कारण सायकिअ‍ॅट्रिस्ट हजारदा सांगतो - नवीन शिका. मेंदूकरता फार चांगलं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन शिका. मेंदूकरता फार चांगलं.

याकरता लिनक्सचा फार फायदा नाही. फार काही नवीन शिकावं लागण्याची शक्यता उबुंटू/कुबुंटूने मोडीत काढली आहे. माझ्या मते, लेख आणि माझा मोठा प्रतिसाद यांत हेच म्हणायचा क्षीण प्रयत्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओह ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच्याशी सहमत. एकदा व्यवस्थित इन्स्टॉल केले की अगदी रोबस्ट ओएस असल्याने लिनक्समध्ये नवीन असं काहीच शिकावं लागत नाही. त्यामानाने मी गेल्या एक दोन महिन्यात विंडोज १० अपग्रेड - नंतर वायफाय न चालणे - परत डाऊनग्रेड - या दरम्यान विंडोजची कुठलीतरी रजिस्ट्री एंट्री बदलल्याने दररोज मध्यरात्री आपोआप चालू होऊ लागला. पहिल्यांदा आपोआप चालू झाला तेव्हा जाम घाबरलो. एखादा चोर घरात शिरुन नेमका माझा ऐसीचा पासवर्ड ढापतोय की काय असं वाटलं. शेवटी फॅक्टरी रिसेट करावा लागला. तरी आता दररोज विंडोज १० अपग्रेड करा असा डायलॉग येतोच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा चोर घरात शिरुन नेमका माझा ऐसीचा पासवर्ड ढापतोय की काय असं वाटलं.

अतिशहाणा यांना 'ऑल इंडिया लिनक्स वापर्णार फेडरेशन' कडून ऐसीपद्मरत्न पुरस्कार देण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...की फोन/टॅब्लेटवर खेळायला (अ‍ॅण्ड्रॉईड / अ‍ॅपल कुठलंही) बरेच strategy games असतात. निदान "थोडा नशीबाचा भाग, थोडं आपलं कौशल्य" टाइपचे तर नक्कीच असतात. त्यातले काही ट्राय केलेस तर फायदा होईल का? अर्थात हे सगळ्यानाच लागू होतं.

मी काही प्रकार करतो ते म्हणजे पियानोवर ट्यून वाजवणे - फार ठेचकाळायला होतं सुरुवातीला पण नेटाने चालू ठेवायचं. महिना-पंधरा दिवसात बोटं आपोआप फिरतात ठराविक लकेर वाजवायला आणि आपणंच थक्क होउन जातो! - कींवा डाव्या हाताने जेवणे/लिहिणे वगैरे (भुरका मारून बघ मग कळेल की ते सोप्पं नाहीये!), वेगळ्याच भाषेतले शब्द लक्षात ठेवणे, स्नॅपचॅट आपलं आपण शिकणे वगैरे. "नवं काहितरी मेंदुला शिकायला लावायचं" एव्हढाच हेतू बाकी काही उपयोग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

+१

माझा आवडता टैमपास म्हणजे चित्रं काढणे. पोस्ट इट नोट्सवर.

हल्ली माझी प्रगती (?) झाल्याने नकाशे काढतो. कसलेही. काल्पनिक स्थळांचेही. लय मज्जा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी गेली काही वर्षे उबंटू वापरतो. पहिल्यांदा जेव्हा साधं रेडहॅट वापरलं होतं, तेव्हा विंडोज ९८ पेक्षाही जुनाट दिसतं आणि विंडो बंद करायची फुली उजवीकडे असण्याऐवजी डावीकडे असणे वगैरे वगैरे कारणांमुळे आवडले नव्हते. उबंटू मस्त चकचकीत दिसतं. जर तुम्ही संगणकाचा वापर ब्राउझिंग, पिक्चर पाहणे वगैरे साध्या कारणासाठीच करणार असाल तर उबंटू वापरणे अजिबात अवघड नाही. उबंटूच्या आवडणाऱ्या काही गोष्टी:
१. लॅपटॉप चालू आणि बंद करायला बराच कमी वेळ लागतो.
२. अदितीने म्हटल्याप्रमाणे देवनागरी लिहिण्यासाठी बोलनागरी वापरता येते.
३. रॅम तुलनेने कमी लागते.
४. टर्मिनल वापरून बरंच काही करता येतं.

मला वाटतं शाळांमधल्या संगणक लॅबमध्ये लिनक्स शिकवायला सुरू केलं पाहिजे. एवढे पैसे देऊन सगळ्या संगणकांवर विंडोज ठेवण्यापेक्षा किंवा चोरून इन्स्टॉल करण्यापेक्षा फुकटातले लिनक्स ठेवले पाहिजे. शिवाय लिनक्स-साक्षरताही वाढेल हे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि एक :

माझ्या लॅपटाॅपवर मुळात विंडोज ७ आलं. तेच अजूनही आहे.

टचपॅडच्या उजव्या कडेला बोट लावून खाली आणलं की स्क्रोल झालं पाहिजे. विंडोजमध्ये हे होत नाही. लिनक्समध्ये होतं. सुरुवातीपासूनच. विंडोज मोडलंय हे दिसल्यावर मी घरी डँस प्यार्टी केली होती.

मागे कोणत्याशा अपडेटनंतर विंडोजमध्ये इंटरनेटच चालेना. वायफाय नाही, इथरनेट नाही, काही नाही. मग आॅफिसातलं लिनक्स वापरून अर्धा तास गूगलून ते सुधारता आलं.

विंडोज १० मुळे कंप्यूटर बोंबलल्याच्या दोन घटना माहीत आहेत.

नवर्याने मोबाईलची स्क्रीन टीव्हीवर दिसण्याचं हार्डवेअर घेतलंय. ते कायमच धडपडत चालतं. फोनमधले व्हिडीओ बघताना हमखास ठेचा लागतात.

पैसे घेऊन असा सुमारपणा! नकोच मला ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वापरायला साध्या सोप्या विंडोजमध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम आल्यावर फॉर्मॅट मारणे हाच उपाय असतो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या लॅपटाॅपवर मुळात विंडोज ७ आलं.

माझ्याही (काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या) लॅपटॉपवर विंडोज ७ होतं. अपग्रेडेशन होऊन ते विं. १० झाले. मला उबुन्टूची स्वय असल्यामुळे पीसी व नेटबुकप्रमाणे ह्यावरही उबुन्टू ड्यूअल बूट इन्स्टॉल करायला गेलो तर खालील धमकीवजा संदेश आला:


https://goo.gl/photos/tAKzW5vzSQND42a88

फारसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे गूगलूनही उपयोग झाला नाही. ह्या परिस्थितीत ड्यूअल बूट इन्स्टॉल करण्यासाठी काय करता येईल? लॅपटॉपला मुख्य यंत्र (वर्कहॉर्सचा कामघोडा असा अनुवाद करण्याचा मोह कसाबसा टाळला Wink )करण्याच्या मार्गात हा अडथळा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

हं ... मला अशी अडचण कधी आलेली नव्हती. UEFI हा प्रकार काय हेच मला माहीत नाही. वाचावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती,
- कुबंटूची शिफारस केल्येस पण वेबसाईटवरनं तरी उबंटू जास्त चांगलं वाटलं. एक KDE वापरतं, दुसरं Gnome वापरतं वगैरे जाउंदे. मला हे दोन शब्द वेगळे आहेत एव्हढंच! पण मी कुठलंही यातलं घेतलं तर will I be closing any doors for me? समजा कुबंटूने सुरवात केली नी "अदितीचा प्रेफरन्स भलताच आहे" Blum 3 असा शोध लागून उबंटू वापरायचं ठरवलं, तर काही प्रॉब्लेम येइल का?
- तू वर सूचना दिल्यायस, वूबी वापरून, त्या लिनक्स पॅरलल इन्स्टॉल करायच्या आहेत बरोबर?
- LTS साठी कीती दमड्या जास्त मोजायच्या अंदाज देशील? वेबसाईटवर पटकन नाही उलगडा झाला
- ब्राउझिंग, ई-मेल, फोटो बघणे वगैरेला सहज पर्याय आहेत. पण Excel (with substantial VB code), क्विकन, टर्बोटॅक्स, VPN, audacity, logmein desktop यासाठी तू काय पर्याय वापरतेस? कींवा तुला माहित्येत कोणी वापरलेले? (क्विकनला नूकॅश आहे माहित्ये. पण मला कोणी विंडोजवरच्या गड्याने असा पर्याय वापरून आलेला अनुभव हवाय. हे आपलं उदाहरण म्हणून दिलं.) हे सगळं नाहीच कळलं तर निदान पॅरलल ईन्स्टॉल करून बघायचा विचार आहे या वर्षी. एकतर अनुभव घेउन, "नाही बुवा हे आपल्याला शक्य", हे तरी कळेल कींवा पुढच्या वर्षी "the year I came out....of windows tyranny" असं काहीतरी पुस्तक तरी लिहिन!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मला लिनक्सबद्दल फार समजतं असं नाही. गाडीच्या आतली फार माहिती नसली तरीही वर्षानुवर्षं गाडी चालवल्यामुळे थोडी खाडखूड करता येते ना, तेवढंच माझं 'ज्ञान'.

- कुबुंटू आणि उबुंटूत फार फरक नाही. मोजक्या काही गोष्टी वेगळ्या असतील. डिस्प्ले बराच निराळा असेल. स्क्रीनशॉट बघून KDE हवं का Gnome हे ठरवता येईल.
मी लिनक्स वापरायला सुरुवात केली तेव्हा ऑफिसात KDE होतं. माझ्या ज्या घरमित्राने मदत देऊ केली होती तो ही KDE वाला होता. म्हणून मी पण KDE वापरते. त्या काळात KDE बरंच चांगलंही होतं. आता असा फार फरक असेलसं मला वाटत नाही.
प्रतिसादांत अभिनवने मिंट लिनक्सचा उल्लेख केलाय. मी ते कधीच वापरलेलं नाही. पण साधारण अंदाज असा की हेसुद्धा वापरायला सोपं असेल. माझ्याकडून सूचना मिळवणं सोपं वाटत असेल तर उबुंटू किंवा कुबुंटू वापरा. त्याचं १४.०४ हे नवीनतर स्थिर व्हर्जन आहे ते घ्या.

- वूबी वापरून दोन्ही करता येईल; विंडोज उडवायचं असेल तर तसं करता येईल; विंडोज-लिनक्स दोन्ही हवं असेल तर तसंही करता येईल.

- LTS किंवा LTS नसलेली कोणतीही उबुंटू/कुबुंटू ओएस फुकट येते. दर दोन वर्षांनी नवीन व्हर्जन्स येतात. १६.०४ या वर्षी एप्रिलमध्ये येईल. मी साधारण मे किंवा जूनमध्ये, आहे ते लिनक्स उडवून नवीन १६.०४ ओएस चढवेन.

- क्विकन, logmein desktop बद्दल माहीती नाही. VPN लिनक्सवर चालत नाही (हे बऱ्या अर्ध्यामुळे माहित्ये). एमेस ऑफिसला पर्याय म्हणून लिब्रऑफिस आहे (libreoffice). हे विंडोजवरही चालतं. पण मला या सॉफ्टवेअरांच्या तपशीलात शिरावं लागत नाही. (ऐसीच्या दिवाळी अंकाची पीडीएफ लिब्रऑफीस वापरून बनवते.) सध्या विंडोजवालं लिब्रऑफिस वापरून बघा, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल. audacity हे आवाजाच्या फाईल्स संपादित करण्याचं सॉफ्टवेर लिनक्सवर टकाटक चालतं. टर्बोटॅक्स वापरलेलं नाही, पण पुढच्या वर्षी वापरायचा विचार आहेच. एक-दोन दिवसांत त्याबद्दल वाचून कळवते. किमान फुकटचं व्हर्जन चालतं का नाही ते तपासता येईलच.

एकेकाळी लिनक्सवर वाईन (विंडोजची नक्कल करणारं) सॉफ्टवअर वापरून विंडोजसाठीच असलेले काही गेम्स मी लिनक्सवर खेळत असे. पण त्यात फार रॅम खाल्ली जाते (आणि खेळांचं व्यसनही सोडवायचं होतं) म्हणून ते प्रकरण काढून टाकलं.

पण वरच्या प्रतिसादात म्हटलंय तसं, मी रोजच्या रोज लिनक्सच वापरते तरीही कंप्यूटरवरचं विंडोज काढलेलं नाही. पैशांशी संबंधित, इंडस्ट्रीत वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स उदा. टर्बोटॅक्स, VPN, लिनक्ससाठी बनवली जात नाहीत. (त्याबद्दल खाजगीत मी चिक्कार आरडाओरडा करते.) मला वर्षातून दोन-चार वेळा विंडोज वापरावंच लागण्याची वेळ येते. तेव्हा बऱ्या अर्ध्याकडे कंप्यूटर मागावा लागत नाही. (याउलट, त्याला टोरंटवरून काही डाऊनलोड करायचं असतं तेव्हा तो माझं लिनक्स वापरतो.) टर्बोटॅक्स लिनक्सवर वापरण्यासाठी बऱ्याच लांबलचक सूचना जालावर दिसल्या, म्हणजे ते सोपं नाहीच. लिनक्स वापरणं हा तत्त्वाचा प्रश्न नसेल तर तेवढ्यापुरतं रीबूट करता येतं.

अवांतर - एकेकाळी मी आणि बॉयफ्रेंड (आताचा बरा अर्धा) दोन वेगवेगळ्या देशांत होतो. तेव्हा स्काईप बाल्यावस्थेत होतं, हँगाऊट नव्हतंच, स्मार्ट फोन फक्त सायफायमध्येच होते. एकमेकांशी व्हिडीओ चॅट करायला आम्ही स्काईप वापरायचो. स्काईपचा ऑडीओ-व्हीडीओ चालण्यासाठी विंडोज वापरावं लागत असे. आता लिनक्सवर ते सगळं व्यवस्थित चालतं. पण गेले काही महिने अँड्रॉईड फोनवर स्काईपमधून लॉगाऊट करता येत नव्हतं. आता ही समस्या सोडवली का नाही, माहीत नाही. पण अगदी २०१५ च्या डिसेंबरमध्येही ही अडचण असल्याचं आठवतंय. प्रत्येक वेळेस लॉगाऊट झालं नाही की मी फीडबॅक देत होते. पैसे देऊन स्काईपची सेवा मी विकत घेत होते. गेली काही वर्षं स्काईप हे मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर आहे.

हे सगळं आम्ही दोघं - बरा अर्धा आणि मी - बोलत होतो. त्याने नवीनतम सरफेस कंप्यूटरसाठी चिक्कार डॉलर्स खर्च केल्येत; तरीही म्हणाला, "मायक्रोसॉफ्ट ना? हे असंच व्हायचं. ससा कासवाच्या शर्यतीसारखं. मायक्रोसॉफ्ट आधी सशासारखं पळत सुटेल, झोपा काढेल. आणि मग बाकीची कासवं पुढे जातील. तुला अँड्रॉईडच आवडतं तर काही काळ वाट पहा. सगळं व्यवस्थित चालेल आणि तेव्हाही विंडोज मोडकंच असेल."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

VPN लिनक्सवर चालत नाही (हे बऱ्या अर्ध्यामुळे माहित्ये).

मी ऑफिसच्या कामासाठी लिनक्स ल्यापटॉपवरुन वीपीएन कनेक्ट करु शकतो. आऊट ऑफ द बॉक्स चालले. काहीही शोधाशोध, किंवा कॉन्फिगरेशन बदल वगैरे करावे लागले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तुझा शब्द प्रमाण. त्याने कदाचित लिनक्सवर चालवायचा प्रयत्नही केला नसेल. मला हे वापरावं लागलं नव्हतं म्हणून मी कधी लक्षच घातलं नाही.

एकेकाळी मी TightVNC नामक प्रकरण वापरत असे. पण त्यात VPN प्रकारचं कनेक्शन लागतं का नाही याची काहीच कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@अतिशहाणा - अजून एका गोष्टिचा उलगडा झाला - कने़टीव्हीटी. wifi कसं जोडू चिंता करायचं कारण नाही असं दिसतंय.
@अदिती - LTS म्हणजे एखादं व्हर्जन मागे असेल पण जास्त भरवशाचं असेल. बरोबर? KDE आणि Gnome विषयी तुलनात्मक माहिती काढायचा प्रयत्न केला आणि पाच मिनिटात सोडून दिला! too much to digest. दोन्ही नवेच आहेत मला आणि दोन्ही कळपात खूप भिडू दिसताहेत त्यामुळे कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही Ubuntu 14.04.3 LTS या लिनक्स प्रणालीची चाचणी तत्वावर चाचपणी करण्याचे नक्की केले आहे. Smile तुझ्या सविस्तर उत्तरांबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

LTS म्हणजे एखादं व्हर्जन मागे असेल पण जास्त भरवशाचं असेल. बरोबर?

अगदी अगदी. दोन वर्षं किंवा अधिक या व्हर्जनला सपोर्ट असतो. पुढे नवीन LTS येतं तेव्हा एका व्हर्जनवरून 'अपग्रेड'चं बटण दाबून नवीन व्हर्जनला जाण्याचा पर्यायही असतो. तो मी कधी वापरलेला नाही (मलाच खाज आहे); पण या वर्षी वापरून बघेन म्हणत्ये.

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही Ubuntu 14.04.3 LTS या लिनक्स प्रणालीची चाचणी तत्वावर चाचपणी करण्याचे नक्की केले आहे.

'कळपात' स्वागत आहे. काही अडलंनडलं तर इथेच लिहा किंवा नवा धागा काढा. हौशी लोकं जमेल तेवढी मदत अगदी अगत्याने, प्रसंगी हिरीरीने करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चाचणीसाठी लिनक्स-मिंट वापरा. उबुंटूवरच आधारित आहे पण वायफाय, डिस्प्ले, मीडिया फाईल्स वगैरे ड्रायवर्स व्यवस्थित चालतात.
http://www.linuxmint.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

की उबंटूचा प्रॉब्लेम झाला तर फार न झगडता लिनक्स-मिंट कडे वळायचं. चाचपणी म्हंटलं असलं तरी जमेल तितकं लिनक्सवर स्थलांतर करायचा विचार आहे. त्यामुळे "मिंट जमलं पण उबंटू हे खरं पण ते तर वापरलं नाहिये" असं नको. घरचा काँप्यूटर विस्टावर आहे. (हे वाक्य "मी अजूनही गावठीच पितो" अशा सुरात वाचावं!!) विन ८ सोडूनच द्या, पण विन १० लाही घाबरून विन ७ घेणार होतो पण एकंदरीत असं दिसतंय की येनकेनप्रकारे मायक्रोसॉफ्ट सगळ्याना विन १० वर जायलाच लावणारे. त्यापेक्षा काही वेगळं आजमावं का? विचार चालू होता गेले दोन-तीन महीने आणि हा लेख आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"मी अजूनही गावठीच पितो"

Biggrin

मिंट का उबुंटू का कुबुंटू याने फार फरक पडत नाही. साधारण वापरण्यात फार फरक पडत नाहीत, उन्नीस-बीस फरक इनस्टॉलेशनमध्ये असेल. ऐसीवर मिंट आणि उबुंटू/कुबुंटू वापरणारे लोक आहेत. दोन्हींपैकी काहीही घेतलं आणि काही अडलं तर मदत मिळेल. वाटलंच तर नाणं उडवून ठरवा कोणता फ्लेवर आणि किती स्ट्राँग हवाय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विन्दोज ८/१० प्री-इन्स्टौल्ड असलेल्या संगणकांवर लिनक्स टाकणं सीक्यूर बूट वगैरे मुले अवघड झाले आहे.वुबीही चालत नाही.
पण व्हिस्टा इ.असणार्या संगणकांसाठी,ते २/३वर्षे जुने झाल्यानंतर मिंट/उबंटू हे वरदान आहे.यूनेटबूटीन हा वुबी पेक्षा जास्त सक्षम पर्याय वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

डीसेबल करता येतं असं दिसतंय - http://www.howtogeek.com/175641/how-to-boot-and-install-linux-on-a-uefi-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

विंडोज वापरून न आवडल्याने सोडून दिलं.
मग लोकलज्जेखातर लिनक्स वापरायला सुरु केल (अरे तु लिनक्स वापरत नाहीस? अस नाक ऊडवून विचारल जायच)
पण खरतर मला ते तेव्हाही आवडल नाही आणि आत्ताही आवडत नाही (उबंटू सुद्धा, मला खरच त्याचा गुई भिकार वाटतो)

माझा सद्ध्याचा सेट अपः
१. मॅक बूक प्रो वर मस्त पैकी मॅक ओ एस चालवतो
२. एका वर्चुअल बॉक्स वर लिनक्स उबंटू ईन्स्टॉल केलेले आहे.
३. अजून एका वर्चुअल बॉक्स वर विंडोज ७ आहे.

प्रोग्रॅमींग करताना लिनक्स वर्चुअल बॉक्स वर बरेचदा एस एस एच करतो आणि प्रोग्रॅम एक्जेक्युट करतो. विंडोज प्रोग्रॅम्स वापरायाला विंडोज वर्चुअल बॉक्स चालवतो.

हा प्रतिसाद लिहिताना, एकाच लॅपटॉपवर, मॅक ओएस, विंडोज ओएस आणि उबंटू ओस चालू आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गम्मत म्हणून-
संगणकात बय्राच ओएस अजमावता येतात भरपूर रॅम /स्पिड/मेमरीमुळे परंतू मोबाइलवर असं काही शक्य आह का? त्याच्या मूळ ओएसशी भांडण होतं का?( फोन मेमरी १६ जीबी असायला हवी हे मान्यच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात ओएस हा कोणाच्या अस्मितेचा प्रश्न कसा होऊ शकतो हेच मला आजपर्यंत समजलेलं नाही. हा प्रश्न मी अनेक विंडोज वि. लिनक्स, आयओएस वि. अँड्रॉईड वि. विंडोज (मोबाईलसाठी) वगैरेंवर हिरीरीने वाद घालणार्‍या लोकांना विचारलेला आहे. कुठली का ओएस असेना, त्याने माझं काम सोपं होत असेल तर मला शष्पं फरक पडत नाही त्यात लिनक्स आहे का विंडोज आहे का आयओस आहे याच्यामुळे (मी सगळ्या वापरून पाहिलेल्या आहेत, लिनक्स त्यातल्या त्यात कमी, ६-८ महिने. शिक्षण संपल्यावर लिनक्सचा संबंध कधी आला नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण काय हो, सगळ्यांनी सदासर्वकाळ प्रत्येक गोष्ट मुक्तस्रोत केली तर ती उपलब्ध करून देणाऱ्याचं घर कसं चालणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते ( चुक ही असेल ) - माय्क्रोसॉफ्ट फक्त कल्पना विकत नाही, प्रॉडक्ट विकते.

सिलिंग फॅन"

किंवा तत्सम गोष्टी बनवणे ह्या साठी पूर्वी पेटंट होती, त्यांची मुदत संपली. किंवा रॉयल्टी घेउन ती वापरायला दीली गेली. फक्त गाड्यांबाबतीत पण हजारो पेटंट अजुन ही आहेत.

गाडी भाड्यानी देणे, शेती करणे हे व्यवसाय आहेत. एखादी कृती करण्याच्या कल्पनेला कोणीच अडवत नाही. पण शेतीत सुद्धा बियाण्यांची पेटंट असतातच की.

सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार करणे ही झीरो कॉस्ट गोष्ट आहे ( ते करणार्‍या व्यक्तीचा फावला वेळ सोडुन ).
पण स्वताचे औषध किंवा कार बनवणे ह्याला पैसे लागतात आणि म्ह्णुन त्या कोणी कोणाला फुक्टात वापरायला देत नाही. म्ह्णुन ही फॅडं सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार करणे इथ पर्यंत ठीक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाडी हे उदाहरण इथे फारसं योग्य नाही. गाडीचं बॉनेट उघडून आपण "काय" केलंय ते बघू शकतो, (त्यातली गती असेल तर) समजू शकतो. पण ते "कसं" केलंय हे समजणार नाही. किंवा ते जरी समजलं तरी ते तसंच्या तसं करण्यासाठी मला गाडी-उत्पादकाच्या क्षमतेएवढा कारखाना उघडावा लागेल. ते सहज शक्य नाही. तस्मात, हा एन्ट्री बॅरियर आहे.

पण प्रोग्रामिंगच्या केसमध्ये तो प्रोग्राम तसाच्या तसा रेप्लिकेट करता येतो (येत असावा). तिथे एन्ट्री बॅरियर कमी आहे. त्यामुळे अशा क्षेत्रासाठी पेटंट कायद्यात वेगळी तरतूद असणं योग्यच वाटतं.

----

जे करायचे ते सामान्य लोकांसाठी / ग्राहकासाठी त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुन करायचे. कंपन्यांचे / इन्वेस्टरचे हित बघायचे नाहीये आम्हाला.

हो, पण एक्स्क्लूजिव्हिटी नसेल तर नवीन संशोधन करायला इन्सेन्टिव्ह काय राहणार?

कंपन्या/इन्व्हेस्टरने पैसे + स्किल ओतून काहीतरी घडवलं आहे. मुख्य म्हणजे रिस्क/अन्सर्टनटीचा सामना करत संशोधन यशस्वी करून दाखवलं आहे. आता त्यातून पैसे मिळवायची वेळ झाली की बाजूच्या गल्लीतला अन्या गन्या डिस्को सन्या "मी सामान्य आहे हो, ग्राहक आहे हो... मला आपलं म्हणा..." करत दारात येऊन उभा राहणार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि नैतिकता + कॉमन सेन्स कोण ठरवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं याचा विचार तीन बाजूंनी करायला हवा.

फंक्शन्सः पेटंट/संशोधनासंदर्भात प्रत्यक्ष कार्य कोण करत आहे? प्रत्यक्ष कार्य म्हणजे (१) शोध लावणे (डिव्हेलपमेंट), (२) मूल्यवर्धन (एन्हान्समेंट), (३) मूल्यसंरक्षण (मेंटेनन्स), (४) संरक्षण (प्रोटेक्शन), (५) विपणन (एक्सप्लॉयटेशन).

अ‍ॅसेट्सः वरील पाच कार्यांसाठी प्रत्यक्ष भांडवल (मानवी, आर्थिक आणि यांत्रिक) कोण देतं आहे?

रिस्कसः वरील पाच कार्यांमध्ये (अ) काही चू़क झाली, तर भुर्दंड कोणाला बसणार आहे? (डाऊनसाईड रिस्क) (आ) ही कार्यं योग्यप्रकारे केली तर फायदा कोणाचा होणार आहे? (अपसाईड पोटेन्शियल)

या तीन बाजूंमध्ये जो सामील आहे तोच त्या पेटंट / संशोधनासंबंधीच्या नफ्याचा मालक असेल. याव्यतिरिक्त कोणालाही दमडा देणं लागत नाही. सध्याचे पेटंट कायदे (इथे फक्त भारताबद्दल बोलत नाहीये - अगदी वायपो प्रणित आदर्श कायदे (मॉडेल लेजिस्लेशन), ओईसीडीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था याच स्वरूपाचं बोलतात.)

-------------------

आता तुमच्या प्रतिसादाच्या सुराबद्दल. तुम्ही चिरडीला का येत आहात मला समजलेलं नाही. "छान प्रगती आहे विचारात.
योग्य दिशेने चालला आहात"
वगैरे वैयक्तिक खोचक टिप्पणी करायची खरोखर आवश्यकता नाही.

"जग ओपनसोर्स असावं" असा आग्रह धरणार्‍यांची तात्विक भूमिका नक्की काय असते याबद्दल मला उत्सुकता आहे. म्हणून तुम्हाला प्रतिसाद देत होतो. तरीही तुम्हाला "देवा यांना क्षमा कर... ते काय बोलताहेत ते त्यांचं त्यांनाच कळत नाही" हा राग आळवायचा असेल तर तुम्हाला हा माझा शेवटचा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे प्रेम लिनक्सवर नाही. मुक्तस्त्रोत या तत्वज्ञानावर आहे.

मुक्तस्त्रोत आहे की नाही हा सुद्धा अस्मितेचा भाग का असु शकतो?

असल्या अस्मितांपेक्षा मला काय सोईस्कर आहे हे महत्वाचे नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने