मोठ्यांचे ऐका
अन्यत्र पूर्वप्रकाशित
______________________________
एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी
चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१||
आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला
जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्यावरी ||२||
मासोळी होती उचापती,भारी होती करामती
तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३||
शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी
लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४||
सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे
आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५||
मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी
कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६||
इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर
दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला ||७||
राजा ठेवतसे संग्रही, चमचमणारी बाळ मासोळी
मासोळी मात्र लागे झुरणी,आईबाबा मित्र आठवुनी ||८||
मासोळी बाळास उशीराने गोष्ट कळे, आईचे नेहेमी ऐकावे
आई सांगे कळकळीने, बाळासाठी तिचे हृदय तळमळे ||९||
मोठे सांगती गोष्ट हीताची, ऐकावे त्यांचे ही रीत जगाची
म्हणून मुलांनो आईबाबांचे ऐका,धोक्यापासून लांब रहा ||१०||
बालगीताला ठेका फार
बालगीताला ठेका फार महत्त्वाचा. दुर्दैवाने मला एका ठेक्यात म्हणता आली नाही. :(
दुसरं काही जुन्या वळणाचे शब्द आहेत (जळ, सम इत्यादी). ते असावेत का नसावेत हा वैयक्तिक आवडीचा भाग झाला पण त्यामुळे हल्लीच्या मुलांना कवितेत कमी रस वाटू शकतो.
==
नुसतं छान छान म्हणण्याच्या पलिकडे काही वेगळं लिहायचा प्रयत्न आहे असं जाणवल्याने अधिक चिकित्सा केली आहे.
ट्रॅजिक काय आहे एवढं?
ट्रॅजिक काय आहे एवढं? आणि ट्रॅजिक बालगीत असू नये का? तू "अॅन बिशपची" द लिटील मॅच गर्ल नावाची परीकथांच्या पुस्तकातील कथा वाचली नाहीयेस का? ती तर खरच ट्रॅजिक आहे आणि असे असुनही ती लहान मुलांची कहाणी आहे निदान लहान्यांच्याच पुस्तकात सापडते.
सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी
हात-पाय नसताना माशाची आई माशाला कसं मारतं असेल हे इमॅजिन करून हसू आलं.