Skip to main content

मोठ्यांचे ऐका

अन्यत्र पूर्वप्रकाशित
______________________________

एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी
चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१||

आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला
जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२||

मासोळी होती उचापती,भारी होती करामती
तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३||

शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी
लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४||

सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे
आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५||

मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी
कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६||

इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर
दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला ||७||

राजा ठेवतसे संग्रही, चमचमणारी बाळ मासोळी
मासोळी मात्र लागे झुरणी,आईबाबा मित्र आठवुनी ||८||

मासोळी बाळास उशीराने गोष्ट कळे, आईचे नेहेमी ऐकावे
आई सांगे कळकळीने, बाळासाठी तिचे हृदय तळमळे ||९||

मोठे सांगती गोष्ट हीताची, ऐकावे त्यांचे ही रीत जगाची
म्हणून मुलांनो आईबाबांचे ऐका,धोक्यापासून लांब रहा ||१०||

ऋषिकेश Thu, 21/04/2016 - 10:12

बालगीताला ठेका फार महत्त्वाचा. दुर्दैवाने मला एका ठेक्यात म्हणता आली नाही. :(
दुसरं काही जुन्या वळणाचे शब्द आहेत (जळ, सम इत्यादी). ते असावेत का नसावेत हा वैयक्तिक आवडीचा भाग झाला पण त्यामुळे हल्लीच्या मुलांना कवितेत कमी रस वाटू शकतो.

==

नुसतं छान छान म्हणण्याच्या पलिकडे काही वेगळं लिहायचा प्रयत्न आहे असं जाणवल्याने अधिक चिकित्सा केली आहे.

अनु राव Thu, 21/04/2016 - 10:56

इतक्या ट्रॅजिक कबितेला बालगीत कोण म्हणतय?

वर ऋ ला ही दु:खी कविता ढँकचिक ढँकचिक ठेक्यात म्हणायची आहे. काय करावे ह्या दुष्टांचे?

.शुचि. Fri, 22/04/2016 - 01:25

In reply to by अनु राव

ट्रॅजिक काय आहे एवढं? आणि ट्रॅजिक बालगीत असू नये का? तू "अ‍ॅन बिशपची" द लिटील मॅच गर्ल नावाची परीकथांच्या पुस्तकातील कथा वाचली नाहीयेस का? ती तर खरच ट्रॅजिक आहे आणि असे असुनही ती लहान मुलांची कहाणी आहे निदान लहान्यांच्याच पुस्तकात सापडते.